✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

वाटा

प — पद्मश्री चित्रे, Tue, 12/12/2017 - 13:30
वाटा वाटा कितीक असती येती तुझ्याकडे ज्या नाहीच एकही माझी परक्याच वाटती साऱ्या दूरस्थ तूही तेथे ठाऊक पाहसी मजला ओठांवरी तुझ्या ही वसलेला तोच अबोला वाटे परंतु तरीही बोलणार कुणीही नाही निःशब्द भावनांना आभाळ साक्षी राही पद्मश्री चित्रे 24102017

प्रतिक्रिया द्या
4271 वाचन

💬 प्रतिसाद (11)

'...एक राह अकेली सी कदमों से

एस
Tue, 12/12/2017 - 15:45 नवीन
'...एक राह अकेली सी कदमों से उतरती है।' ची आठवण करून देणारी तरल कविता. आवडली.
  • Log in or register to post comments

खरंच

पद्मश्री चित्रे
Tue, 12/12/2017 - 20:26 नवीन
मनापासून धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

कविता आवडली

पैसा
Tue, 12/12/2017 - 22:01 नवीन
कविता आवडली
  • Log in or register to post comments

सुंदर!

राघव
Tue, 12/12/2017 - 23:33 नवीन
सुंदर! दूरस्थ तूही तेथे दूरस्थ हा शब्दप्रयोग आवडला. :-)
  • Log in or register to post comments

सुरेख...

ज्ञानोबाचे पैजार
Wed, 12/13/2017 - 09:46 नवीन
कविता अतिशय आवडली पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

पैबु...व्हाट्स धिस..

चांदणे संदीप
Wed, 12/13/2017 - 11:42 नवीन
म्हणजे आधी तुम्ही कविता विडंबवली मग तुम्हाला कविता आवडल्याचा प्रतिसाद द्यावा वाटला! =)) lol Sandy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

अरे !!! तू पण ना संदीप...

ज्ञानोबाचे पैजार
Wed, 12/13/2017 - 11:50 नवीन
कामाच्या आणि विडंबनाच्या गडबडीत प्रतिसाद द्यायचे राहून गेले होते. त्या साठी पद्मश्री ताईंची माफी देखिल मागितली आहे. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

खूप छान रचना आहे.

गबाळ्या
Wed, 12/13/2017 - 14:03 नवीन
पद्मश्री ताई, मनातले वेगवेगळे भाव खूप सुंदर रित्या मांडले आहेत. शेवटच्या कडव्याचा अर्थ नीट कळाला नाही. चालीत वाचताना थोडे अडखळया सारखे वाटले म्हणून हा बदल सुचवावासा वाटला (न मागता सल्ला देतोय किती मनावर घ्यायचा ते तुम्ही ठरवा.)                                      वाटा कितीक फुटती (माझे मन चंचल आहे, एकीकडे त्याला तुझी ओढ आहे, आणि ते सतत नवनवीन बहाणे शोधात आहे. म्हणून "असती" च्या ऐवजी "फुटती" ) नेती तुझ्याकडे त्या (त्या वाटा, मला तुझ्याकडे खेचत आहेत. त्या वाटा नुसत्याच तुझ्या कडे "येत" नाहीत तर त्यांच्याबरोबर मलाही तुझ्याकडे ओढतात ) मी वाट शोधते माझी (मी द्विधा मनस्थितीत आहे, पुढे काय करू हे मला कळत नाहीये, मी मार्ग शोधतेय. कदाचित तुझ्याकडे येण्याचा ? पण ती वाट असावी, मनाला पटणारी ) परक्याच भासती साऱ्या (मला तसा भास होतोय)    दूरस्थ तूही तेथे ठाऊक पाहसी मजला (पाहसी चा अर्थ काळाला नाही. प्रतिक्षा करतोय असे सूचित करायचे आहे का?) ओठांवरी तुझ्या तो परिचित सा अबोला "वसलेला तोच" च्या ऐवजी हे गेय होईल व त्याचप्रमाणे "तोच" पेक्षा "परिचित" हा जास्त अर्थपूर्ण होईल.    वाटा जरी मिळाल्या (या शेवटच्या कडव्यात नेमके काय म्हणायचे ते कळाले नाही. परंतु आणि तरीही या दोघांचा अर्थ जवळपास एकाच होतो. "जरी आपण भेटलो तरी" असे सूचित करायचे आहे काय?) परि शब्द हरवले काही निःशब्द भावनांना आभाळ साक्षी राही
  • Log in or register to post comments

वाटे तरी परंतु

पद्मश्री चित्रे
Wed, 12/13/2017 - 21:26 नवीन
मला म्हणायचं आहे की मनातून कितीही वाटलं तरी पण (परंतु) , दोघांपैकी कोणीही बोलणार नाही .. परिचितसा अबोला हे छान .. धन्यवाद सूचनांसाठी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गबाळ्या

सूचनांसाठी

पद्मश्री चित्रे
Wed, 12/13/2017 - 21:29 नवीन
धन्यवाद . परिचितसा अबोला .. हे छान
  • Log in or register to post comments

धन्यवाद

पद्मश्री चित्रे
Wed, 12/13/2017 - 21:34 नवीन
पै तै, राघव थँक्स् . खूप दिवसांनी आले मि पा वर . छान वाटलं .
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा