(तो मला खूप आवडतो)
तो मला आवडतो
जेव्हा लाडिकपणे
अंगाशी झोंबतो,
तेव्हा तो मला खूप आवडतो.
जेव्हा किरकोळ लागलं की
बँड-एड लावायला सांगतो,
तेव्हा तो मला खूप आवडतो.
मी योगासने करताना
पोटावर येऊन बसतो,
तेव्हा तो मला खूप आवडतो.
मी जरासं आवरून बाहेर जाताना
"आई... तू परी दिसतेस" म्हणतो,
तेव्हा तो मला खूप आवडतो.
कधी घाईत चटका बसतो
कधी चुकून बोट कापतं,
तेव्हा पळत येऊन बघतो
तेव्हा तो मला खूप आवडतो.
कधी कधी माझ्या रागवण्यावर
रडवेला होऊन जातो,
तेव्हा तो मला खूप आवडतो.
खाण्या पिण्याचे पदार्थ
आवडले की म्हणतो "तूपण खा ना",
तेव्हा तो मला खूप आवडतो.
शाळेत घ्यायला गेल्यावर, हात पसरून
मिठीत येतो, गालावर गोड पप्पी देतो,
तेव्हा तो मला खूप आवडतो.
"आई मला थोपटून झोपव."
असं जेव्हा म्हणतो,
तेव्हा तो मला खूप आवडतो!
(प्रेरणा)
एकदम गोड लिहिलय.
अरे...
छान..!
छान..!
मस्त!
अगं....किती गोड :) मस्तच!
सर्वांना धन्यवाद :)