Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by माम्लेदारचा पन्खा on Wed, 07/26/2017 - 22:10
काही करण्या उरले नसता । आपली पाटी कोरी असता । काही बकांची ध्यानस्थ स्तब्धता । मत्स्यमारीकारणे ।। दिसता कोणीही नवखा । लबाड साधिती मोका । त्याची बुडवती नौका । लागलीच ।। पाडावी भोके यथेच्छ । भाषा तरी वापरावी स्वच्छ । भासवावे तयाते तुच्छ । आत्मक्लेशे ।। कवीचे उडवावे शिरस्त्राण । मागाहुनि करावे शिरकाण । मनसोक्त मारावे पादत्राण । कवितेवरी ।। आपण गाडिले कुठे झेंडे । आपल्या कापसा किती बोंडे । सगळे विसरून फेकती अंडे । अशावेळी ।। अशाने होते तरी काय । कवी हतोत्साही होऊन जाय । परि अंतरी लागते हाय । कायमची ।। सांगे कवी अशा लोका । दिसताक्षणी तिथेच ठोका । असे जरी प्रसंग बाका । विजयीभव ।।

Submitted by सत्यजित... on Wed, 07/26/2017 - 22:38

Permalink

लै भ्भारी!

लै भ्भारी!
  • Log in or register to post comments

Submitted by जेनी... on गुरुवार, 07/27/2017 - 00:33

Permalink

=))

=))
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on गुरुवार, 07/27/2017 - 06:32

Permalink

=)))))

=)))))
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on गुरुवार, 07/27/2017 - 06:48

Permalink

खी खी खी =))

खी खी खी =))
  • Log in or register to post comments

Submitted by मंदार कात्रे on गुरुवार, 07/27/2017 - 06:55

Permalink

;)

;)
  • Log in or register to post comments

Submitted by ज्ञानोबाचे पैजार on गुरुवार, 07/27/2017 - 10:35

Permalink

कवीस्तोत्र

ज्याला पाहिजे फक्त कौतुक | मर्कट लीलेस लाईक | शब्द रचतो जो एकावर एक | तो निंदेचाच धनी|| आठवा सावित्रीबाई फुले | ज्यांनी झेलले शेणाचे गोळे आता जग वाहते फुले | पुतळ्यावरती जयांच्या || बोल बोबडे बालकाचे | त्यावर हसणे इतरांचे | म्हणौनी तयांना बालकाचे | दगड मारणे का बरोबर || दगड मारण्या जी शिकवते | ती माता नव्हे वैरीण असते | लांब रहाणेच बरेच असते | अशा दैत्यी पासौनी || जो हतोत्साही होउन जातो | तो खरा कवी कधीच नसतो| जो या सर्वांना पुरुन उरतो | कवी ऐसा वंदावा || जो असतो शब्दांचा ईश्वर | त्यास जगाची नसते फिकीर | शब्दांच्या दुनियेचा जो मिहीर | तोच कवी जाणावा || ऐसा कविश्र्वर वंदावा | यथोचीत आदर त्याला द्यावा | देव्हार्‍यात त्याला बैसवावा |इश्वराच्या शेजारी || पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

Submitted by माम्लेदारचा पन्खा on गुरुवार, 07/27/2017 - 11:24

In reply to कवीस्तोत्र by ज्ञानोबाचे पैजार

Permalink

दंडवत !

गुरुदेव . . . . . !
  • Log in or register to post comments

Submitted by हतोळकरांचा प्रसाद on गुरुवार, 07/27/2017 - 13:16

In reply to दंडवत ! by माम्लेदारचा पन्खा

Permalink

तुम्हा दोघांनाही दंडवत! कविता

तुम्हा दोघांनाही दंडवत! कविता आणि विडंबन दोन्ही रापचिक!
  • Log in or register to post comments

Submitted by अप्पा जोगळेकर on गुरुवार, 07/27/2017 - 17:29

In reply to कवीस्तोत्र by ज्ञानोबाचे पैजार

Permalink

खरोखरच प्रतिभावान आहात पैजार

खरोखरच प्रतिभावान आहात पैजार बुवा. नमस्कार घ्या. पंखा साहेबांचे पण मूळ काव्य भारीच.
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on गुरुवार, 07/27/2017 - 18:44

In reply to कवीस्तोत्र by ज्ञानोबाचे पैजार

Permalink

ह्या काव्यासाठी एक मस्तानी

ह्या काव्यासाठी एक मस्तानी दिली तुम्हाला पैजारबुवा.
  • Log in or register to post comments

Submitted by हतोळकरांचा प्रसाद on Fri, 07/28/2017 - 10:57

In reply to ह्या काव्यासाठी एक मस्तानी by सूड

Permalink

कोणती? ;) :)

कोणती? ;) :)
  • Log in or register to post comments

Submitted by ज्ञानोबाचे पैजार on Fri, 07/28/2017 - 11:47

In reply to कोणती? ;) :) by हतोळकरांचा प्रसाद

Permalink

कोणती हा प्रश्र्णच येत नाही

कोणती हा प्रश्र्णच येत नाही कारण सूड बुंदेलखंडाचे राजे छत्रसाल नाहीत आणि आम्हीही बाजीराव नाही आहोत हे आम्हा दोघांनाही पक्के माहित आहे. प्रश्र्ण फक्त इतकाच असू शकतो की सुजाताची? कोंढाळकरची? का गुजरची? पण हा प्रश्र्ण विचारायचा मला अधिकार पोचत नाही. त्यामुळे मस्तानी हवी असेल तर सूड जिथे बोलवेल तिकडे मला जावे लागेल. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

Submitted by हतोळकरांचा प्रसाद on Fri, 07/28/2017 - 12:14

In reply to कोणती हा प्रश्र्णच येत नाही by ज्ञानोबाचे पैजार

Permalink

अहो कोणती म्हणजे मँगो मस्तानी

अहो कोणती म्हणजे मँगो मस्तानी कि सीताफळ मस्तानी कि गुलकंद मस्तानी असे! :D :D .
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Fri, 07/28/2017 - 12:26

In reply to कोणती हा प्रश्र्णच येत नाही by ज्ञानोबाचे पैजार

Permalink

गुजरचीच सर्वोत्तम.

गुजरचीच सर्वोत्तम. सुजाता/कोंढाळकरवाले मस्तानीच्या नावाखाली पातळ श्रीखंड देतात.
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Fri, 07/28/2017 - 13:35

In reply to गुजरचीच सर्वोत्तम. by प्रचेतस

Permalink

पातळ श्रीखंड नसलेली म्हणजे

पातळ श्रीखंड नसलेली म्हणजे कशी ते तुमच्याच शब्दात वर्णन करा ना गडे। (ठर्राव सूचक कंज्यूस, अनुमोदन आत्मुस )
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Fri, 07/28/2017 - 17:48

In reply to पातळ श्रीखंड नसलेली म्हणजे by कंजूस

Permalink

म्हणजे लस्सी आणि ताक ह्यात

म्हणजे लस्सी आणि ताक ह्यात जसा फरक असतो तशी. मस्तानी पिता यायला हवी, चमच्याने खाता नव्हे.(त्यातले आईसक्रीम सोडून)
  • Log in or register to post comments

Submitted by शार्दुल_हातोळकर on Fri, 07/28/2017 - 23:48

In reply to कवीस्तोत्र by ज्ञानोबाचे पैजार

Permalink

सुपर्ब कविता पैजारबुवा !!

सुपर्ब कविता पैजारबुवा !! क्या बात है !! दंडवत __/\__
  • Log in or register to post comments

Submitted by एस on गुरुवार, 07/27/2017 - 12:08

Permalink

आपण गाडिले कुठे झेंडे ।

आपण गाडिले कुठे झेंडे । आपल्या कापसा किती बोंडे । सगळे विसरून फेकती अंडे । अशावेळी ।।
या कडव्याकरिता शिट्ट्या, टाळ्या आणि आरोळ्या!!!
  • Log in or register to post comments

Submitted by इरसाल on Fri, 07/28/2017 - 14:52

In reply to आपण गाडिले कुठे झेंडे । by एस

Permalink

अगदी अगदी

एस मलाही हेच कडवे अप्रतिम वाटले. भारीच......!!!!!
  • Log in or register to post comments
Profile picture for user नावातकायआहे

Submitted by नावातकायआहे on Fri, 08/18/2017 - 09:22

In reply to अगदी अगदी by इरसाल

Permalink

बाडिस...!

बाडिस...! लैच आवडल्या गेले आहे!
  • Log in or register to post comments

Submitted by पुंबा on गुरुवार, 07/27/2017 - 12:56

Permalink

हाहाह्हा... तुमचे आणी

हाहाह्हा... तुमचे आणी पैजारबुवांचेदेखील काव्ये फर्मास झाली आहेत.. हहपुवा..
  • Log in or register to post comments

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on गुरुवार, 07/27/2017 - 13:01

Permalink

=))

=))
  • Log in or register to post comments

Submitted by जव्हेरगंज on गुरुवार, 07/27/2017 - 13:27

Permalink

=)))))

=)))))
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on गुरुवार, 07/27/2017 - 14:11

Permalink

दोन्ही काव्ये जबरा जमली आहेत.

दोन्ही काव्ये जबरा जमली आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by सस्नेह on गुरुवार, 07/27/2017 - 14:41

Permalink

मस्त जुगलबंदी !!

मस्त जुगलबंदी !! पैजारबुवा रॉक्स !
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on गुरुवार, 07/27/2017 - 14:47

Permalink

=)) =)) =))

=)) =)) =)) मापंची कविता मुळात सुंदर । तीवरी ज्ञापैंचा कळस टोकदार । आमच्याकडून घ्याव्या वारंवार । टाळ्या आणि हशा ॥
  • Log in or register to post comments

Submitted by सानझरी on गुरुवार, 07/27/2017 - 14:54

Permalink

=)))))

=)))))
  • Log in or register to post comments

Submitted by नीलमोहर on गुरुवार, 07/27/2017 - 14:58

Permalink

एक नंबर !!

मूळ काव्य आणि त्यावर पैजारबुवांचा कळस, दोन्ही भारीच.
  • Log in or register to post comments

Submitted by खेडूत on गुरुवार, 07/27/2017 - 15:10

Permalink

:))

:))
  • Log in or register to post comments

Submitted by खेडूत on गुरुवार, 07/27/2017 - 15:10

Permalink

:))

:))
  • Log in or register to post comments

Submitted by पद्मावति on गुरुवार, 07/27/2017 - 16:15

Permalink

मापंची मुळ कविता आणि पैजार

मापंची मुळ कविता आणि पैजार बुवांची कविता दोन्हीही आवडल्या.
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप-लेले on गुरुवार, 07/27/2017 - 20:55

Permalink

दोन्ही कविता झकास :)

दोन्ही कविता झकास :)
  • Log in or register to post comments

Submitted by दशानन on गुरुवार, 07/27/2017 - 20:57

Permalink

=))

=))
  • Log in or register to post comments

Submitted by वरुण मोहिते on गुरुवार, 07/27/2017 - 21:04

Permalink

काव्य ह्या प्रांतात कमी येतो

पण पैजारबुवा आमच्याकडून नमस्कार घ्या .
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Fri, 07/28/2017 - 07:29

Permalink

गोविंदराव आणि नानोबांचे पैजार

गोविंदराव आणि नानोबांचे पैजार फार भारी.
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Fri, 07/28/2017 - 15:49

In reply to गोविंदराव आणि नानोबांचे पैजार by कंजूस

Permalink

हे गोविंध्राव कोण म्हणे? ;)

हे गोविंध्राव कोण म्हणे? ;) पण मापं झबरदस्त लिव्हलाय आणि आमचं माऊलीचं तर काय इचारायचं. शिस्तीत टोला सीमापार.
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Sat, 07/29/2017 - 07:27

In reply to हे गोविंध्राव कोण म्हणे? ;) by अभ्या..

Permalink

मापं हो!

मापं हो! आता सेल्फिकरांवर बोधामृतवाणी हून जाऊ द्या।
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Fri, 07/28/2017 - 13:38

Permalink

=))

=)) =))
  • Log in or register to post comments

Submitted by लीलाधर on Fri, 07/28/2017 - 23:47

Permalink

व्वा मुळ काव्य आणि

पै माऊली आपले विडंबन काय पण टोला हाणलाय कोपरापासुन दंडवत घ्यावा माऊली ..
  • Log in or register to post comments

Submitted by समाधान राऊत on Sat, 07/29/2017 - 09:24

Permalink

दोन्ही कविता आवडल्या गेल्या

दोन्ही कविता आवडल्या गेल्या आहेत
  • Log in or register to post comments

Submitted by राघव on Tue, 08/15/2017 - 21:48

Permalink

:-)

दोन्ही रचना उत्तम! आवडेश!!
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 15588 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com