✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

जीव झाडाले टांगला...!

व
विसोबा खेचर यांनी
Fri, 02/27/2009 - 00:07  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
14483 वाचन

💬 प्रतिसाद (43)

प्रतिक्रिया

तात्या, झका

आपला अभिजित
Fri, 02/27/2009 - 00:27 नवीन
तात्या, झकास लेखन! बाकी, तुमचे मुखप्रुष्ठावरचे रसग्रहण (आणि नाठाळांच्या पार्श्वभूमीवरील लत्ताप्रहारही!) उत्तमच असते. पण दरवेळी प्रतिक्रिया देणे जमत नाही. बाकी, सुगरण पक्ष्याचं मला नेहमीच अप्रूप वाटतं. एवढं सुंदर घरटं तिथे नर बनवतो आणि मादीला आकर्षित करू पाहतो. मादी मग त्या घरट्याचं `इन्स्पेक्शन' करून त्यात राहायचं की नाही, हे ठरवते. राहिली, तर पटली. नाही, तर बसा बोंबलत!! आणि आपण क्रेडिट मात्र सुगरणीला (मादीला) देतो. कलीयुग आहे बाबा!!!
  • Log in or register to post comments

झकासच...

नाटक्या
Fri, 02/27/2009 - 00:48 नवीन
तात्या, क्या बात है!! फारच सुंदर लेख... - नाटक्या
  • Log in or register to post comments

+१

मुक्तसुनीत
Fri, 02/27/2009 - 06:30 नवीन
हेच म्हणतो ! उत्तम लिखाण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाटक्या

+२

अवलिया
Fri, 02/27/2009 - 08:12 नवीन
हेच म्हणतो उत्तम लिखाण --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

+३

बिपिन कार्यकर्ते
Fri, 02/27/2009 - 09:15 नवीन
मस्त आणि उत्कट लिखाण. पण थोडक्यात आटोपलंस रे भाऊ..... पूर्ण लिही ना... बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

+४

दशानन
Fri, 02/27/2009 - 09:27 नवीन
घरट्याची उब ती घरट्याचीच उब! मग ते उबदार घरटं कुणा तुमच्याआमच्यासारख्यांचं असो, काऊचिऊचं असो, वा बहिणाबाईंच्या लाडक्या कुण्या सुगरणीचं असो. पंचतारांकीत हाटेलातल्या सुसज्ज खोल्यांना त्याची सर नाही! क्या बात है ! सही तात्या.. सुंदर वाक्य ! हे आठवलं बघा.. लगेच. निळा पारवा वसुंधरेच्या माथ्यावरती घुमतो आहे आभाळाचा निळा पारवा. डोळ्यावरती राखी ढापण, लक्ष सदाचें धनिणीपाशी अन धनिणीच्या पायामधल्या रुणझुणणाऱ्या नादापाशी. -अवचित काही घडलें आणि दचकला निळा पारवा; टपोरल्या डोळ्याच्या गुंजा. जाती त्याच्या अगदी जवळून किलबिलणारे कुणी मुशाफिर रंगित पक्षी… कुणी घासली चोच तयावर; कुणी घातली शिळ तयाला; ऐकवैली…पंखाची फडफड; दाखविले चित्रांकित वैभव पंखावरचे. गिरकी घालुन त्याच्या भवती निघुन गेले.. धुंद मुशाफिर; झुलवित अपुले पंखे, झुलवित त्याला. पुन्हा दचकला निळा पारवा’ मनात भरले वारे–\ पिसा पिसातुन थरथरणारे; फुगली पंखे; उचलुन धरला पोटापाशी पाउ एकुटा; मान ताठली जरा खालती झेंप भाराया… तोच वरी ये वसुंधरेचा तांबुस गोरा कोमलसा कर. भरवई त्याच्या टोची मध्ये एकच मोती शुभ्र टपोरा, एकच माणिक , झगमगणारे. पुन्हा टेकले पाउल खाली; नितळाई ये पुन्हा पिसांवर -आणि लागला पुन्हा घुमाया आभाळाचा……. निळा पारवा. इंदिरा संत. Brains x Beauty x Availability = Constant. This constant is always zero. सत्य वचन :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

सुंदर

समिधा
Fri, 02/27/2009 - 00:55 नवीन
खुपच मस्त लिहीलाय लेख तुम्ही तात्या, तुमच लिखाण कायमच चांगल असत. :)
  • Log in or register to post comments

मस्त.

शितल
Fri, 02/27/2009 - 01:04 नवीन
तात्या, बहिणाबाईंची अप्रतिम काव्य ओळी घेऊन सुंदर लिखाण. :) बहिणाबाईंच्या ह्या काव्यात आईच्या प्रेमाची उब जाणवते.
  • Log in or register to post comments

क्या बात है...

प्राजु
Fri, 02/27/2009 - 01:07 नवीन
बरेच दिवसांनी लेखणी सरसावली तात्या! उत्तम.. ! उत्तम रसग्रहण! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

सुरेख रसग्रहण

संदीप चित्रे
Fri, 02/27/2009 - 02:25 नवीन
लहानपणी सुगरण पक्ष्याचं घरटं पाहिले होते. त्यातली कप्प्यांची रचना, कलाकुसर पाहिलं की थक्क व्ह्यायला होतं बहिणाबाईंच्या कवितेचा तर आनंद लुटायचा .... भरभरून.
  • Log in or register to post comments

चांगले रसग्रहण

चकली
Fri, 02/27/2009 - 02:35 नवीन
अजून काही कविता आणि गाण्यांविषयी वाचायला आवडेल! चकली http://chakali.blogspot.com
  • Log in or register to post comments

जीव झाडाले टांगला..

मनीषा
Fri, 02/27/2009 - 06:32 नवीन
पाखराची कारागिरी देख रे मानसा .... किती सोप्या शब्दात...केव्हढी मोठी गोष्ट सांगीतली आहे . मानवाला स्वतःच्या बुद्धीचा, कर्तुत्वाचा इतका अभिमान/गर्व आहे ...पण हे लहानसे पाखरु सुद्धा कमी नाही .. कविता सुंदरच आहे आणि त्याचं रसग्रहण सुद्धा सुरेख ..
  • Log in or register to post comments

आण़खी

रामदास
Fri, 02/27/2009 - 06:58 नवीन
रसग्रहण येऊ द्या.
  • Log in or register to post comments

+१

परिकथेतील राजकुमार
Fri, 02/27/2009 - 10:32 नवीन
असेच म्हणतो. सुरेख रसग्रहण तात्या. ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

छान लिहीलय तात्या..

लवंगी
Fri, 02/27/2009 - 07:04 नवीन
एकदा गावाला गेले होते तेंव्हा वाडीमध्ये एका झाडाखाली सुगरणीचा खोपा पडलेला मिळालेला.. रिकामा होता. तेंव्हा तो बाबांनी मध्ये कापून दाखवला होता. अतिशय सुंदर वीण होती. आत कप्पे होते. इवलासा जीव इतके सुंदर घरटे बांधतो हे खरच वाटत नाही. बहीणाबाईंनी थोडक्या शब्दात या पाखराचे आईपण दाखवले आहे.
  • Log in or register to post comments

फार छान

विकास
Fri, 02/27/2009 - 07:11 नवीन
एकदम मस्त! या गाण्याचे चित्रीकर्‍ण मला वाटते भक्ती बर्व्यांवर झाले होते. या पारंपारीक-अधुनीक मिश्रीत सुरेख चालीबरोबरच मला आठवतेकी बहुदा आशाच्या आवाजात पण एका वेगळ्याच चालीत हे गाणे आहे. ती चाल पण खूप छान आहे. कदाचीत सुधीर फडक्यांची असावी. मानिनी मधे होते का ते आठवत नाही...
  • Log in or register to post comments

अरे वा!

सहज
Fri, 02/27/2009 - 07:12 नवीन
ह्या रसग्रहणात फक्त बहिणाबाईंच्या काव्याचाच भाग आहे, (रागदारी) संगीतातील उल्लेख जवळजवळ नाहीच. तात्या तुम्ही कविता का बरे लिहीत नाही? :-)
  • Log in or register to post comments

खुप सुंदर . .

सुक्या
Fri, 02/27/2009 - 07:15 नवीन
सहजसुंदर रसग्रहण आवडले. सुक्या (बोंबील) चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.
  • Log in or register to post comments

उत्तम

प्रकाश घाटपांडे
Fri, 02/27/2009 - 08:52 नवीन
तात्या एका वेगळ्याच जगात नेलस ब्वॉ. भानावर आलो. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

मस्त!

यशोधरा
Fri, 02/27/2009 - 08:58 नवीन
मस्त!
  • Log in or register to post comments

आपुलकीने

विसोबा खेचर
Fri, 02/27/2009 - 09:13 नवीन
आपुलकीने प्रतिसाद देणार्‍या सर्व मंडळींचा मी ऋणी आहे... आपला, (कृतज्ञ) तात्या.
  • Log in or register to post comments

सुंदर रसग्रहण!

प्रमोद देव
Fri, 02/27/2009 - 09:24 नवीन
+१
  • Log in or register to post comments

मस्त ..!!!

छोटा डॉन
Fri, 02/27/2009 - 09:33 नवीन
सुंदर रसग्रहण तात्या, मजा आली ... >>घरट्याची उब ती घरट्याचीच उब! मग ते उबदार घरटं कुणा तुमच्याआमच्यासारख्यांचं असो, काऊचिऊचं असो, वा बहिणाबाईंच्या लाडक्या कुण्या सुगरणीचं असो. पंचतारांकीत हाटेलातल्या सुसज्ज खोल्यांना त्याची सर नाही! वाह .. क्या बात है ...!!! बाकी बहिणाबाईं विषयी काय बोलायचे, अगदी वेचक साध्यासोप्या शब्दात योग्य तो संदेश पोहचवण्यात त्यांचा हातखंड. यानिमीत्ताने आपण टाकलेल्या मुखपॄष्ठावरील भाईकाकांचा किस्सा आठ्वला ... मस्त आहे, चालु द्यात ..!!! ------ छोटा डॉन एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
  • Log in or register to post comments

उत्तम

आकाशी नीळा
Fri, 02/27/2009 - 10:09 नवीन
उत्तम रसग्रहण!!!
  • Log in or register to post comments

उत्तम

सुप्रिया
Fri, 02/27/2009 - 10:25 नवीन
उत्तम रसग्रहण!!! असेच म्हणते. अशा सुंदर काव्याची आठवण करून दिल्याबद्दल अनेक धन्यवाद.
  • Log in or register to post comments

खुपच भावपुर्ण लेखन केले तात्या तुम्ही

वेताळ
Fri, 02/27/2009 - 10:29 नवीन
बहिणाबाईंच्या सर्वच कविता खुप सोप्या पण आशयपुर्ण आहेत. प्रत्येक कविता त्यानी वेगळ्या उंचीवर नेवुन ठेवल्या आहेत. ह्या अगोदर तुम्ही अरे संसार संसार ह्या कवितेचे मुखपृष्ठ तयार केले होते ते देखिल खुप छान होते. वेताळ
  • Log in or register to post comments

घरट्याची

मृगनयनी
Fri, 02/27/2009 - 10:35 नवीन
घरट्याची उब ती घरट्याचीच उब! मग ते उबदार घरटं कुणा तुमच्याआमच्यासारख्यांचं असो, काऊचिऊचं असो, वा बहिणाबाईंच्या लाडक्या कुण्या सुगरणीचं असो. पंचतारांकीत हाटेलातल्या सुसज्ज खोल्यांना त्याची सर नाही! तात्या... खूप छान ! आवडलं! :) आपलं घर ... ते आपलं घर.... मग ते चंद्रमौळी झोपडी का असेना! युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ

+१

मिंटी
Fri, 02/27/2009 - 10:37 नवीन
+१ सहमत........ तात्या नेहमीप्रमाणेच उत्तम लिखाण..... :) मनापासुन आवडलं.... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

+२

आनंदयात्री
Fri, 02/27/2009 - 12:44 नवीन
खुप छान लिखाण. आत्ता कुठे त्या विवेचनाचा आनंद घेतोय असे झाले की लेख संपला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिंटी

तात्या

झेल्या
Fri, 02/27/2009 - 10:37 नवीन
तात्या गुरूजींचा तास आवडला. पण तास पाच मिनिटांतच संपला. अजून असे रसग्रहण वाचायला नक्कीच आवडेल तात्या. -झेल्या थांबला असाल तर चालायला लागा, चालत असाल तर पळायला लागा, पळत असाल तर थांबा.
  • Log in or register to post comments

मस्तच !!

भाग्यश्री
Fri, 02/27/2009 - 11:08 नवीन
मस्तच !! http://bhagyashreee.blogspot.com/
  • Log in or register to post comments

अप्रतिम..

स्मिता श्रीपाद
Fri, 02/27/2009 - 11:20 नवीन
तात्या.... खुप खुप सुरेख... उरलेली कवीता आणि तुमचे रसग्रहण लवकर द्या :-) -स्मिता
  • Log in or register to post comments

जीव झाडाले

ढ
Fri, 02/27/2009 - 11:27 नवीन
जीव झाडाले टांगला.. ही ओळीला, त्याच्या चालीला, त्यातल्या गायकीला आपला सलाम..! माझाही सलाम. तात्या, सुंदर रसग्रहण. पुढल्या कडव्यांबद्दलचं रसग्रहण/प्रवचन पुन्हा कधितरी! हे "कधितरी" लौकर येवो ही विनंती.
  • Log in or register to post comments

तात्या... खूप छान !

sanjubaba
Fri, 02/27/2009 - 11:29 नवीन
मनापासुन आवडलं.... +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
  • Log in or register to post comments

जीव झाडाले टांगला

जागु
Fri, 02/27/2009 - 12:58 नवीन
तात्या खुपच छान लिखाण आहे तुमच. खरच वाचताना जीवाची घालमेल झाली हो. आमच्या सारख्या नोकरदार आयांचा असाच रोज जीव टांगलेला असतो हो. माझी पण ३ वर्षाची मुलगी आहे. म्हणुन मला टांगलेल्या जीवाची स्तिथी चांगली माहीत आहे.
  • Log in or register to post comments

माझी पण ३

विसोबा खेचर
Fri, 02/27/2009 - 15:04 नवीन
माझी पण ३ वर्षाची मुलगी आहे. म्हणुन मला टांगलेल्या जीवाची स्तिथी चांगली माहीत आहे. लेखाचं सार्थक झालं! तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जागु

+१ वाह....

गणपा
Fri, 02/27/2009 - 15:25 नवीन
तात्या सुंदर रसग्रहण्..
  • Log in or register to post comments

वाचनीय!

समीरसूर
Fri, 02/27/2009 - 15:49 नवीन
खूप सुंदर आणि सोप्या शब्दात कवितेचा गाभारा उलगडून दाखवला आहे तुम्ही तात्या!! खूपच सुंदर! अवांतरः बहुतेक सगळ्यांना ही अहिराणी भाषा आहे असे वाटते. पुण्या-मुंबईकडे बहिणाबाईंच्या कविता अहिराणी भाषेत आहेत असे सर्रास म्हटले जाते पण ते चूक आहे. बहिणाबाईंच्या या गोड कविता खान्देशी (अगदी खास जळगावच्या आणि जळगाव जिल्ह्यात बोलल्या जाणार्‍या) भाषेत आहेत. अहिराणी भाषा ही खूप वेगळी आहे आणि ती नाशिक जवळच्या सटाणा, कळवण, धुळ्याजवळच्या नाशिक जिल्ह्याला लागून असलेल्या भागात बोलली जाते. अहिराणी भाषा पटकन समजायला अवघड आहे. फार वर्षांपूर्वी किशोरी शहाणेला घेऊन 'सटीना टाक' नावाचा एक अहिराणी चित्रपट प्रदर्शित झाल्याचे स्मरते. त्यात्या, येऊ द्या अजून फर्मास लेख! --समीर
  • Log in or register to post comments

तात्या..........

अनामिका
Fri, 02/27/2009 - 16:09 नवीन
तात्या.......... अतिशय सुंदर व अप्रतिम रसग्रहण!!!!!!!!!!!१ कुठे तो सुगरणीचा खोपा आणि कुठे आपली दगड विटांनी बांधलेली घरे! तिच्या त्या सुंदर खोप्याची उब माणसांनी बांधलेल्या आद्ययावत घरांमधे मिळते का आताशा? घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती! त्यात असावा प्रेम जिव्हाळा नकोत नुसती नाती! आपण घरे बांधुन मनात या कविता आणि गाणीच म्हणत बसतो. तो जिव्हाळा ती उब आताशा खरच इतिहासजमाच झाली आहे या स्वार्थी जगात. त्या सुगरणीच्या खोप्यात मनुष्यप्राणी शरीरानेच काय मनाने देखिल मावु शकणार नाही कधीच? "अनामिका"
  • Log in or register to post comments

झुलता

विनायक प्रभू
Fri, 02/27/2009 - 17:08 नवीन
बंगला लै भारी
  • Log in or register to post comments

तात्या...

अनामिक
Fri, 02/27/2009 - 18:05 नवीन
तात्या... खुप आवडलं रसग्रहण! अनामिक
  • Log in or register to post comments

तात्या, छान

लिखाळ
Fri, 02/27/2009 - 18:14 नवीन
तात्या, छान आहे रसग्रहण :) -- लिखाळ.
  • Log in or register to post comments

तात्या, काय बोलू?

चतुरंग
Fri, 02/27/2009 - 19:30 नवीन
वरती सर्वांनी सगळे शब्द वापरलेत. तुझ्या लिखाणात अवचित हळवेपणाचा असा काही स्पर्श असतो ना की जणू बेसावधपणे भैरवी ऐकताना काळजात खोलवर घुसणारा एखादाच स्वर, का ते कळत नाही पण जाणवत मात्र रहातं! एवढं तुटपुंजं मात्र नका लिहू बॉ! आम्हा वाचणार्‍यांची घालमेल होत रहाते. :( चतुरंग
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा