मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मी अभंगाची तुक्याच्या एक पंक्ती जाहलो!

सत्यजित... · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
मी न दोहा जाहलो वा मी न ओवी जाहलो मी अभंगाची तुक्याच्या एक पंक्ती जाहलो! मी जरी आलो न पायी दर्शनालाही तुझ्या मीच विठ्ठल,मीच रखुमा,मीच वारी जाहलो! रोज ढळतो अन् उगवतो..मी न झालो सूर्यही मंदिरा-गाभारची मी,नित्य समई जाहलो! चंद्रभागा अमृताची वाहते येथे सदा... मी विठू-नामात न्हाती,टाळ-चिपळी जाहलो! लाभली आहे दिशाही या प्रवासाला अता मी जसा या पालखीचा एक भोई जाहलो! मी अभंगाची तुक्याच्या एक पंक्ती जाहलो... —सत्यजित

वाचन 8163 प्रतिक्रिया 12