साहित्य
अर्धा किलो खेकडे/चिंबोर्या/कुरल्या, साफ करून
१ मोठा कांदा बारीक चिरून
१ मध्यम कांदा उभा चिरून
१ तमालपत्र
१ तुकडा दालचिनी
२ ते ३ हिरवे वेलदोडे
१ बडी इलायची
२ चमचे धने
१ चमचा शहाजिरे
२ ते ३ लवंगा
१० ते १२ काळेमिरे
१ मूठ किसलेले ओले खोबरे
२ चमचे पंढरपूरी डाळं
२ चमचे आलं, लसूण, हिरवी मिरचीची पेस्ट
१ चमचा लाल तिखट
१ चमचा हळद
१ लिंबा एवढ्या चिंचेचा कोळ
मीठ चवीनुसार
२ ते ३ मोठे चमचे तेल
चिरलेली कोथिंबीर
कृती
हि कृती माझ्या आईची. अगदी लहानपणा पासून ह्या अश्या खेकड्याच्या मसाल्यावर ताव मारत आलोय. यंदा सुद्धा पाककृती केली तिनेच आहे, मी फक्त प्लेटिंग आणि फोटो काढलाय. मी अकरावीत असताना वडिलांचा अपघातामुळे हाथ फ्रॅक्चर झालेला, तेव्हा त्यांना, खेकडे खा, असा सल्ला डॉक्टरांनी दिलेला. मूळचे खवय्ये असलेले वडील आणि सुग्रण असलेली आई, त्यामुळे मग अगदी दर २ दिवसा आड घरी जेवायला खेकडे आणि हे असं मसालेदार कालवण! पण हे प्रकरण इथेच थांबला नाही, ऐन बारावीच्या परीक्षेच्या ४ महिने आधी, अस्मादिक स्वतः सायकल वरून पडले, आणि हाथ मोडून घेतला! मग काय, पुन्हा खेकडे पुराण सुरु! शेवटी शेवटी तर अगदी नकोसे झालेले नंतर कित्येक दिवस खेकडे!
खेकडे साफ करून त्यांना हळद आणि तिखट लावून ठेवा. एका पॅन मध्ये १ चमचा तेल सोडून त्यात आधी उभा चिरलेला कांदा छान लालसर परतून घ्या. ह्यातच किसलेले ओले खोबरे आणि पंढरपुरी डाळं घालून ते देखील कांद्या सोबत छान खरपूस भाजून घ्या. (पंढरपुरी डाळं वापरल्याने रस्श्याला एक दाट पणा येईल, ते नसल्यास १ चमचा तांदळाची पिठी पाण्यात घोळवून वापरली तरी चालेल). हे गार झाल्यावर मिक्सर मधून अगदी बारीक वाटून घ्या. (वाटल्यास थोडा पाणी घालून).
ह्याच पॅन मध्ये सगळे खडे मसाले भाजून, मग त्याची मिक्सर मधून पावडर करून घ्या (अश्या ताज्या गरम मसाल्याचा वास, आणि त्याने पदार्थाला येणारी चव हि काही वेगळीच असते!).
पॅन मध्ये तेल घालून त्यात बारीक चिरलेला कांदा ३ ते ४ मिनिटे परतून घ्या. ह्यात आता आलं लसूण मिरची पेस्ट घालून अजून थोडा वेळ परतून घ्या. ह्यात खेकडे घालून ते कांद्या सोबत परतून घ्या. आपण बारीक वाटलेली कांद्या खोबऱ्याची पेस्ट ह्यात घालून, थोडं पाणी घालून, मंद आचेवर, झाकण ठेवून, खेकडे शिजू द्या (साधारण १०-१५ मिनिटे). शेवटी गरम मसाला पावडर, चवीनुसार मीठ आणि चिंचा कोळ घालून अजून एक वाफ द्या. रश्याला दाटपणा जसा हवा असेल त्यानुसार पाणी कमी जास्त करा. वरून चिरलेली कोथिंबीर घाला.
हा असा मसालेदार रस्सा मऊ भात सोबत खायला घ्या!
[खेकड्याच्या रस्सा आदल्या दिवशी करून फ्रिज मध्ये ठेवावा, दुसऱ्या दिवशी खायला घ्यावा. त्याने खेकड्याची चव अतिशय सुंदर उतरते रश्यात!]
जबरदस्त पाक्रु. आणि फोटो..
माझ्या माहितीप्रमाणे
In reply to माझ्या माहितीप्रमाणे by सूड
बरोबर, पण मग आकारामुळे
In reply to बरोबर, पण मग आकारामुळे by केडी
ओके, शुभेच्छा!!
In reply to ओके, शुभेच्छा!! by सूड
धन्यवाद!
In reply to बरोबर, पण मग आकारामुळे by केडी
हाहाहा
झकास
अत्यंत आवडता प्रकार!
वा !!!
आकाराने मोठी असते ती चिंबोरी आणि लहान असतात त्या कुरल्या.....
In reply to आकाराने मोठी असते ती चिंबोरी आणि लहान असतात त्या कुरल्या..... by अभय म्हात्रे
बरं....थोडक्यात आता ह्या
कालवण
In reply to कालवण by सुमो
आणि या ठिकाणी गरमा गरम भात,
जबराट कृती आणि चित्र!
In reply to जबराट कृती आणि चित्र! by चतुरंग
हाहाहा... कल्पना भारी आहे ..
सुंदर फोटो!
In reply to सुंदर फोटो! by आषाढ_दर्द_गाणे
डाळं, हे रश्याला दाटपणा
भाताचा नगारा वाजवायलाय खेकड़ा.
किती सुंदर फोटो आलाय ! मी
In reply to किती सुंदर फोटो आलाय ! मी by स्रुजा
मी सुद्धा किती तरी वेळ हाच
कुरल्या
खेकडे, कुर्ली, चिंबोरी काय
In reply to खेकडे, कुर्ली, चिंबोरी काय by विशाखा राऊत
धन्यवाद! _/\_
In reply to खेकडे, कुर्ली, चिंबोरी काय by विशाखा राऊत
+१
In reply to +१ by निशाचर
काय आठवण काढलीत हो... अगदी..
In reply to +१ by निशाचर
मुठे आणि त्यात पीठ भरायचं
कहर आहे हे !!!
जबरा...!
"खेकडा साफ करुन" म्हणजे काय?
In reply to "खेकडा साफ करुन" म्हणजे काय? by गवि
"खेकडा साफ करुन" म्हणजे काय?
In reply to "खेकडा साफ करुन" म्हणजे काय? by सूड
धन्यवाद सूड.
In reply to धन्यवाद सूड. by गवि
त्यांना शिजवण्यापूर्वी मारत
In reply to त्यांना शिजवण्यापूर्वी मारत by सूड
म्हणजे या स्टेपला, पाठ-पोट
In reply to म्हणजे या स्टेपला, पाठ-पोट by सूड
भावूक होऊन अजून पण खेकड्यात
In reply to म्हणजे या स्टेपला, पाठ-पोट by सूड
खेकडा ही हाटेलात खायची गोष्ट
In reply to खेकडा ही हाटेलात खायची गोष्ट by गवि
जौद्या गविराज,
In reply to जौद्या गविराज, by अभ्या..
तूच रे बाबा एक खरा मित्र....
In reply to जौद्या गविराज, by अभ्या..
आपण खेकडा भजी खाऊ. सहमत!!
In reply to खेकडा ही हाटेलात खायची गोष्ट by गवि
खेकड्याचे सगळे खाणेबल पार्ट्स
In reply to खेकड्याचे सगळे खाणेबल पार्ट्स by केडी
धन्यवाद...
In reply to "खेकडा साफ करुन" म्हणजे काय? by गवि
सूड ह्यांनी परफेक्ट लिहिलंय.
हाहाहा
In reply to हाहाहा by वरुण मोहिते
आयला बदलापूरला कुठे म्हणे?
In reply to हाहाहा by वरुण मोहिते
हाहाहा..... गोणीभर खेकडे
राहाटोली ,चोण, बदलापूर गाव , जुवेली
In reply to राहाटोली ,चोण, बदलापूर गाव , जुवेली by वरुण मोहिते
गाववाले की मग तुम्ही!! कधी
केडी, आपल्या पाकृने प्रेरणा
In reply to केडी, आपल्या पाकृने प्रेरणा by आषाढ_दर्द_गाणे
अ फा ट!
In reply to अ फा ट! by केडी
टिम्ब