ऐसी काये केली करणी काय जाणो
ऐसी काये केली
करणी काय जाणो
तुझे तुज जाणों
काय जालें ।।
छन्द ऐसी गोडीं
सगुणाची आवडी
भक्तिचिच गुढी
आनंदाची ।।
निर्गुणाचे ध्यानी
ब्रह्मभाव खाणी
रूप तुझे मनी
नूरे परि ।।
नको आम्हा देवा
निर्गुण करणी
तुझेनि चरणी
वेध लागे ।।
मोहलो सावळ्या
टाळ अन चिपळ्या
धुंद देत टाळ्या
गजरी तुझे ।।
सागरलहरी
छान आहेत.
रोचक
व्वा व्वा वाह! मस्तच !
सुरेख.