✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

भुजबळ व राज यांचे 'कृष्णकुंज'वर खलबतं..????

S
shawshanky यांनी
Mon, 12/07/2015 - 09:29  ·  लेख
लेख
नसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते छगन भुजबळ यांच्या भेटीनंतर राजकीय पटलावर तर्कवितर्कांना उधाण आले आहे. या भेटीमागे कोणती राजकीय समीकरणे दडली आहेत हे जरी गुलदस्त्यात ठेवण्यात आले असले तरी विधानपरिषदेच्या निवडणुकीबाबतची भेट असावी अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगतेय. या महिन्यांत आठ जणांची विधान परिषद सदस्यत्वाची मुदत संपतेय. मुंबईतून शिवसेनेचे रामदास कदम आणि काँग्रेसचे भाई कदम, नागपूरमधून काँग्रेसचे राजेंद्र मुळक, धुळेतून काँग्रेसचे अमरिश पटेल, नंदुरबारचे महादेव महाडिक(काँग्रेस), सोलापूरात राष्ट्रवादीचे दीपक साळुंखे, बुलढाणातील शिवसेनेचे गोपीकिसन बजोरिया, नगरमधील अरुण जगताप (राष्ट्रवादी) निवृत्त होतायत. त्यामुळे या जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. शिवसेनेकडे पुरेसे संख्याबळ असल्याने मुंबईतील दोन जागांपैकी एका जागेवर शिवसेनेचा उमेदवार जिंकून येऊ शकतो. शिवसेनेचे रामदास कदम यांना परत उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. मात्र दुसऱ्या जागेसाठी चांगलीच चुरस पाहायला मिळणार आहे. मनसेकडे २९ मते असल्याने त्यांची ही मते या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहेत. ही मते ज्यांच्या पारड्यात पडतील त्यावर दुसऱ्या जागेवर कोण वर्चस्व मिळवणार हे ठरणार आहे. त्यामुळे ही मते आपल्या पारड्यात घेण्यासाठी सर्वांचीच जुळवाजुळव सुरु झालीय. यामुळे की काय भुजबळ राज यांच्या भेटीला गेले होते अशी अटकळ बांधली जातेय. दरम्यान, महाराष्ट्र सदन आणि कलिना भूखंड घोटाळय़ाप्रकरणी भुजबळांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यास मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे भुजबळांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रसमध्ये ते एकाकी असल्याचे दिसून येत आहे. तर विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर तसेच कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीतही पक्षाला चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे सध्याच्या राजकारणात राज ठाकरे यांचीही अवस्था यथातथाच आहे. या पार्श्वभूमीवर या दोन नेत्यांची भेट होणे. व दोघांमध्ये तब्बल अडीच तास चर्चा होणे यामागे नक्कीच काहीतरी राजकारण रंगल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
11295 वाचन

💬 प्रतिसाद (12)

प्रतिक्रिया

तसे कै नै (ह घ्या )

अत्रन्गि पाउस
Mon, 12/07/2015 - 10:02 नवीन
ती सदिच्छा भेट होती.... राज साहेबांच्या मातु:श्री आणि सौ भुजबळ ह्यांना भेटायचे होते ...आता त्या एकट्याच कशा जाणार ..सोबत श्रीयुत भुजबळ गेले असावेत आणि आता आलेच आहेत म्हटल्यावर कुणी बोलणार नाही का ? बाकी अडीच तास म्हणजे ? २ स्त्रिया भेटल्यावर एवढा वेळ कमीच कि ...
  • Log in or register to post comments

हा धागा उडवा

सामान्यनागरिक
Sat, 01/21/2017 - 13:56 नवीन
या मुद्द्याचे औचित्य संपले आहे. आता भुजबळ आणि राज ठाकरे दोघेही संपल्यात जमा आहेत. तेंव्हा हा धागा उडवावा.
  • Log in or register to post comments

हा धागा उडवा

सामान्यनागरिक
Sat, 01/21/2017 - 13:56 नवीन
या मुद्द्याचे औचित्य संपले आहे. आता भुजबळ आणि राज ठाकरे दोघेही संपल्यात जमा आहेत. तेंव्हा हा धागा उडवावा.
  • Log in or register to post comments

जुना धागा होय

पैसा
Sat, 01/21/2017 - 21:46 नवीन
मला कळेना भुजबळ कधी सुटले.
  • Log in or register to post comments

अहो, एवढ्या वेळात बी एम सी सुद्धा कचरा उचलते !

सामान्यनागरिक
Sun, 03/05/2017 - 20:22 नवीन
उडवा की हा धागा आता. आसपास दुर्गंधी सुटायला लागलीय .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

मी नाय ओ

पैसा
Sun, 03/05/2017 - 21:50 नवीन
ते उडवा बिडवायचे काम संपादक महाशयांचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सामान्यनागरिक

Once a संपादक always a संपादक

गॅरी ट्रुमन
Mon, 03/06/2017 - 13:40 नवीन
मी नाय ओ. ते उडवा बिडवायचे काम संपादक महाशयांचे.
"Once a संपादक always a संपादक" असे माझ्यासकट अनेक मिपाकरांना वाटत असते त्याचे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

:)

पैसा
Mon, 03/06/2017 - 13:57 नवीन
नवी म्हण!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन

उडवायचे म्हण्जे ....

चौकटराजा
Mon, 03/06/2017 - 16:30 नवीन
उडवायचे म्हणजे एक पेटी तरी लागणार . पैशाचे काम मग पैशाने नकार का द्यावा बरे ? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन

=))

पैसा
Mon, 03/06/2017 - 16:40 नवीन
=)) पेटी आणि खोके कुठे ठेवू?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

माझ्याकडे द्या पाठवून...सोबत

टवाळ कार्टा
Sat, 03/11/2017 - 22:18 नवीन
माझ्याकडे द्या पाठवून...सोबत काहीशे किलो काजूपण :ड
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

पाठवते

पैसा
Sat, 03/11/2017 - 22:29 नवीन
तेवढं तिकडे उतरवून घे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा