✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

ईडीयट बॉक्स & बालिका बधु..

म
महेंद्र यांनी
Tue, 02/10/2009 - 05:29  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2527 वाचन

💬 प्रतिसाद (9)

प्रतिक्रिया

खरंतर अशा

भाग्यश्री
Tue, 02/10/2009 - 06:03 नवीन
खरंतर अशा मालिका पाहणं न पाहणं आपल्या हातात असतं हेच खरं! आपण स्वतः फारफारतर ती मालिका न पाहता पुस्तक वाचत बसू. पण आपल्याच घरातील माणसे मन लावून बघतात मालिका, हे पाहीलं की वैताग येतो! आमच्या घरात अक्षरश: असा अलिखीत नियम होता, ज्याला टीव्ही पहायचाय त्याने बाहेर हॉल मधे बसावं! बाकीच्यांनी स्वयपाकघरात बसून जेवले तरी चालेल.. अर्थात, रात्रीचे जेवण (तरी) एकत्र वगैरे फंडे काळाच्या पडद्याआड गेले आहेत या मुळे! (टीव्ही आणि एकंदरीत मालिकांची प्रचंड चीड असलेली) भाग्यश्री. http://bhagyashreee.blogspot.com/
  • Log in or register to post comments

कै च्या कै

दीपुर्झा
Tue, 02/10/2009 - 06:10 नवीन
कायच्या काय आहे ती मालिका. अन सगळे टीव्हीचे पुरस्कार त्याच मालिकेला मिळाले !! ती मुलगी गोड आहे पण असला विषय :( वरुन आव आणतात की आम्ही ह्याच्या विरोधातच आहोत म्हणून . परवा एक भाग सहज टी व्ही चाळताना पाहण्यात आला त्यात 'दहेज' साठी ती आजेसासू एक रूम भरुन सामान आणून ठेवते. त्यात जावयाला द्यायच्या बाइक पासून ते ४२" एलसीडी टीव्हीपर्यंत सगळे सामान !! अशानी तो प्रकार अजून कीती वाढेल, आधीच कमी म्हणून की काय हे असले बघून महिला वर्गाच्या मनावर नक्कीच परिणाम होत असणार .. अन आता लाडो नावाची असलीच एक मालिका येतीये अजून ... प्रोमो पाहिले परवाच ..
  • Log in or register to post comments

खरयं ..

सुक्या
Tue, 02/10/2009 - 06:50 नवीन
ह्या टी व्ही सिरियलसचा नेमका उद्देश काय असतो तेच कळत नाही. ढोल जसा दोन्ही बाजुने वाजतो तसे ह्यांचे आहे. दहेज च्या नावाने आकांड्तांदव करायचे अन् दहेज द्यावा लागेल म्हणुन हे सारे दाखवायचे. असलीच एक सिरियल मागे पाहण्यात आली. 'बेटीया ..". बेटा बेटीत फरक करु नका हे सांगायला १०० एपीसोड खर्च केले अन् आता 'ये मेरा बेटा है मेरा एकलोता वारीस' असले काहीतरी मुक्ताफळे उधळताहेत. आजकाल मला नागीन / अल्लादीन सारखा सिरियल आवडायला लागल्या आहेत. ताप नाय डोक्याला. जे दिसल ते बगायचं. (अल्लादीन प्रेमी) सुक्या (बोंबील) मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दीपुर्झा

मी जमेल

नीधप
Tue, 02/10/2009 - 07:19 नवीन
मी जमेल तेव्हा बघते. कारण एकच सुरेखा सिक्रीचा अप्रतिम परफॉर्मन्स. खूप दिवसांनी या अभिनेत्रीला खुलके परफॉर्म करताना पाहतेय. अनूप सोनी हे दुसरं आकर्षण. आणि त्याचाही अभिनय मस्तच. जे सुरेखा सिक्री आणि अनूप सोनी चे सीन्स असतात ते बघायला जाम मजा येते. बाकी इतर दळणापेक्षा थोडासा फ्रेशनेस आहे यात इतपतच. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments

बालिका

अविनाशकुलकर्णी
Tue, 02/10/2009 - 07:37 नवीन
बालिका वधुला कशाला नावे ठेवायला हवि? मराठी सिरियल्स अचरट पणा करण्यात काय मागे आहेत का? ..वहिनिसाहेब/कुलस्वमिनि/असंभव एका पेक्षा एक आहेत..समोर बसलेला प्रेक्षक मुर्ख आहे असे समजुन अचरट पणाचा हौदोस घालत ह्या सिरियल्स नि नको केले आहे..पण प्रवाह वरिल..राजा शिव छत्रपति, आणि अग्निहोत्र ह्या मालिका मात्र बघाव्याशा वाटतात
  • Log in or register to post comments

प्रेक्षक मूर्ख असे समजून ?

सातारकर
Tue, 02/10/2009 - 08:13 नवीन
अहो लोक हे सगळ बघत नसते तर ह्यान्नी दखवले कस असत ? त्या वाहीन्या एकट्या थोडीच जबाबदार आहेत... याच नियमाने आपण व्रुत्तवाहिन्यांच्या मनोरंजन करणाय्रा बातम्या देखील बघतोच की (माणसाचे सापात रुपांतर, राष्ट्रीय ब्रेकींग न्यूज -जीप पाण्यात पडली). जगातल्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी सांगून संपल्यासारख हे लोक अक्षरशः वाट्टेल ते दाखवीत असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी

बकवास वेळ जातो.

नन्या
Tue, 02/10/2009 - 08:37 नवीन
याच मुळे मी केबल बन्द केली. आता पुर्वी प्रमाणे रात्री एक्त्र जेवातो. ना रहा बाजा, ना बजती बासुरी.
  • Log in or register to post comments

ज्या

भडकमकर मास्तर
Tue, 02/10/2009 - 14:17 नवीन
ज्या गोष्टी पहातांना मला इरिटेट होतं त्याच गोष्टी स्त्रियांना खुप आवडतात.एखादी गोष्ट वाईट आहे हे समजुन सुध्दा ती गोष्ट सारखी पहाविशी वाटणं ही कुठली सायकॉलोगिकल डीसॉर्डर? एका स्त्रिवर होणारे अत्याचार (नाटकात किंवा सिरियल मधे का होइना) दुसरी स्त्री पाहुन एंजॉय कसे करु शकते?. या स्त्रियांवर केलेल्या सर्वसाधारण विधानांवरून मिपावरील महिलावर्गाचा स्फोट होईल, असा अंदाज होता पण अजूनही बरीच शांतता दिसते... ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments

अहो, मी

महेंद्र
Tue, 02/10/2009 - 15:20 नवीन
अहो, मी माझ्या घरच्या स्त्रियांना म्हणजे माझ्या दोन टिन एजर्स आणि बायको..उद्देशुन लिहिलंय ते..
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा