Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by संदीप डांगे on Tue, 10/25/2016 - 21:37
मित्रो! मी गेले कित्येक वर्षे दुचाकी फारशी चालवली नाहीये, वीसेक वर्ष आधी लुना (ब्रह्मे फेम), राजदूत (300-400 किमी) नंतर बजाज प्लॅटिना (500 किमी), होंडा सीबीआर 250 (100 किमी), स्टारसिटी(100 किमी), ऍक्टिवा (100 किमी) अशी अनुभव गंगाजळी आहे, होंडा युनिकोर्न घेणार होतो, फायनल झाले होते, त्याच दिवशी बाळराजे येण्याची चाहूल लागली आणि पूर्वीच ठरवल्यानुसार कि पत्नीस अशा अवस्थेत बाईकचे धक्के नको म्हणून प्लॅन बदलून लांसर घरी आणली, ;) आताशा एक बाईक असावी अशी गरज भासत आहे, पण दुचाकीबद्दल विचारच टाकून दिल्याने बरीच वर्षे ह्या क्षेत्रातले फॉलोअप घेतलेले नाहीत, त्यामुळे माहिती न के बराबर! तसेच आता बाजारात इतके ऑप्शन्स आलेत कि गोंधळायला झाले आहे. तस्मात बाईकविषयी चांगली माहिती असलेल्या मिपाकर मित्रांना सल्ला मागतो आहे, मदत करावी. माझी उंची 5'6", वजन 94 kg (पाच वर्षांपासून अगदी मेंटेन आहे, एक ग्राम इकडे तिकडे नाही). ;) माझी गरज: शहरात फिरायला, सामान वगैरे आणायला. खेड्यापाड्यातल्या कसल्याही रस्त्याला (माझ्या वजनासकट) सांभाळून घेणारी, लॉंग हायवे ड्राइव्ह ला आरामदायक बजेट: बजेटचे नक्की नाही, परवडत नसल्यास थोडं थांबायची तयारी आहे, अगदीच दीडदोन लाखवालीही नकोय, नैयेत माझ्याकडे, ;) मायलेजपेक्षा कम्फर्ट, पॉवर व स्टाईलला महत्त्व देतो. मेंटेनन्स मध्ये रडवणारी नको. बजाज अवेंजर मनात बसलीये, थोडीशी चालवली होती, बुलेटची इच्छा फार पण अभी टेम नै आया वैसा! बाकी नवीन तत्सम गाड्यांची माहिती नाही तेव्हा त्या देखील ट्राय करण्यास हरकत नाही, कृपया मार्गदर्शन करा... (विंग्रजी शब्दांबद्दल माफी)
  • Log in or register to post comments
  • 86746 views

प्रतिक्रिया

Submitted by मोदक on Tue, 10/25/2016 - 21:44

Permalink

युनीकॉर्न घ्या.

युनीकॉर्न घ्या. माझी पॅशन + आहे, पण ती हिरो होंडा वाली आहे. हिरोने काही बदल केले असले तर माहिती नाही. पॅशन + पण चांगली आहे तुम्हाला उंचीला एकदम बरोबर होईल. पण शक्य असेल तर युनीकॉर्नच घ्या.
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Tue, 10/25/2016 - 21:54

In reply to युनीकॉर्न घ्या. by मोदक

Permalink

2010 चं मॉडेल मस्त होतं, नंतर

2010 चं मॉडेल मस्त होतं, नंतर डिझाईन बदललं बहुतेक त्यामुळे आजकाल रस्त्यावरून जातायेता उठून दिसत नाही, म्हणून विचार नव्हता केला, मला वाटलं बंद झाली की काय! टेस्ट ड्राइव्ह घेतो
  • Log in or register to post comments

Submitted by तुषार काळभोर on Tue, 10/25/2016 - 22:19

In reply to युनीकॉर्न घ्या. by मोदक

Permalink

युनीकॉर्न घ्या.

+१ मी ५ वर्षे झालं वापरतोय. झीरो मेंटेनन्स गाडी आहे. १५०सीसी मुळे चांगली शक्ती, चांगले acceleration,आणि तरी पण ५०+चे उत्तम average! माझे वजन ९२किलो, उंची ६'२". अतिशय आरामदायक आहे. सातारा, कराड, वाई, महाबळेश्वर असे लॉंग ड्राईव्ह केलेत. स्मूथ!! स्कुटरचा विचार करत असाल तर होंडाच घ्या डिओ, ऍक्टीवा किंवा aviator.
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Tue, 10/25/2016 - 22:58

In reply to युनीकॉर्न घ्या. by तुषार काळभोर

Permalink

माझे वजन ९२किलो, उंची ६'२"

माझे वजन ९२किलो, उंची ६'२"
हायला खरंच पैलवान आहात की. बेस्ट बेस्ट. कीपीटप.
  • Log in or register to post comments

Submitted by असंका on Wed, 10/26/2016 - 11:08

In reply to माझे वजन ९२किलो, उंची ६'२" by अभ्या..

Permalink

हायला खरंच पैलवान आहात की.

हायला खरंच पैलवान आहात की.
+१... अगदी हेच मनात आलेलं...
  • Log in or register to post comments

Submitted by माम्लेदारचा पन्खा on Tue, 10/25/2016 - 22:31

Permalink

माझी उंची 5'6", वजन 94 kg

तुम्ही युनिकॉर्न घ्या..... मुख्य म्हणजे वजनाची काळजी घ्या !
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Tue, 10/25/2016 - 22:41

Permalink

वजन ९४ किलो, प्लस तुम्ही

वजन ९४ किलो, प्लस तुम्ही सामान पण आणनार म्हणजे १०० व ११० सीसी सगळ्या बाद. आता पुढे १२५ मध्ये शाईन बरीय, पण जुनी झाली आता. स्टाइल इल्ला हिरो ग्लॅमर चांगलीय पण फायबर पार्ट खिळखिळे होतात कालांतराने. १३५ मध्ये पल्सर १३५ चांगली पण स्पोर्टी लुक आहे. (सामान मॅटर इल्ला) डैरेक्ट १५० मध्ये युनिकॉर्न बेस्ट. टफ, स्मूद, मायलेज ठिक. सीबीजी एक्स्ट्रीम. टफ, इंजिन बरेय, स्पोर्टी लुक. अ‍ॅव्हरेज नाही. (सामान मॅटर इल्ला) बजाज व्ही. हा सगळ्यात बेस्ट ऑप्शन माझ्या मते. जुने १५० डीटीएसाय प्रुव्हन इंजिन आहे. तुमच्या अ‍ॅव्हेंजर इच्छेला जवळपास जाणारी आहे. मेटल बॉडी. अगदी फंकी नसला तरी नवीन लुक आहे. तुमच्या हाईट वजनाला सूट होणारी. खिशाला पण परवडेल. (ऑन रोड ७० जाते बहुधा) मायलेज ५० पर्यंत. दिडशे सीसीला तेवढेच मिळणार. थोड्या वर्षानी कंटाळा आला तर कॅफे रेसरमध्ये कन्वर्ट करुन तन्मय पण वापरेल. ;) पल्सर १५०. ठिक पण फायबर पार्ट जास्त. अनावश्यक लांबी. (सामान मॅटर इल्ला) यमाहा एक्स झेड आर.(?) नवीन कलर्स. मजबूत आहे. मायलेज ठिक. परवडेबल डील. बाकी पुढे सगळी महाग सिरीज जी तुमच्या बुलेट रेटच्या जवळ जाते. तुम्हाला ती नकोय सो...इस्टॉप. स्कूटरेट मध्ये १०० सी नकोच. अ‍ॅक्टिव्हा १२५ बेस्ट. फरंट सस्पेन्शन टेलिस्कोपिक. पॉवर आहे. मायलेज ठिक. टीव्हीएस वेगो आणि हिरो ड्युएट जरा बरी. सुझुकी अ‍ॅक्सेस बेस्ट डील. १२५ सीसी आहे. मेटल बॉडी आणि मस्त कॉम्पॅक्ट लुक आहे. अ‍ॅव्हरेज पण उत्तम आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by बापू मामा on Mon, 01/03/2022 - 15:04

In reply to वजन ९४ किलो, प्लस तुम्ही by अभ्या..

Permalink

सायकल वापरा

अहो, वजन ९४ + असेल तर सायकल का वापरत नाही? जास्त वजनाने व अनुवांशिक मधुमेहाने मी ही त्रस्त झालो होतो. मागील महिन्यात कामावर येता जाता १६ किमी सायकलने जाणे सुरु केले व २० दिवसात ५ कि वजन व मधुमेह पूर्ण नाहीसा झाला.
  • Log in or register to post comments

Submitted by अभिजीत अवलिया on Tue, 10/25/2016 - 22:50

Permalink

सुझुकी अ‍ॅक्सेस, होंडा

सुझुकी अ‍ॅक्सेस, होंडा ऍक्टिवा 3g, होंडा ऍक्टिवा i ह्यातली उत्तम कुठली ते पण सांगा. मला घ्यायची आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Wed, 10/26/2016 - 13:40

In reply to सुझुकी अ‍ॅक्सेस, होंडा by अभिजीत अवलिया

Permalink

झैरात ;) - बायकांच्या बैका

झैरात ;) - बायकांच्या बैका
  • Log in or register to post comments

Submitted by एस on Tue, 10/25/2016 - 22:55

Permalink

युनिकॉर्न चालवायला आणि

युनिकॉर्न चालवायला आणि मेंटेनन्स ला चांगली गाडी आहे. बजाज अव्हेंजरसुद्धा चांगला पर्याय आहे. स्कूटर श्रेणीत स्टाइल वेस्पाची आणि यामाहाची नवीन (नाव विसरलो) छान दिसतात. नाहीतर ऍक्टिव्हा आणि ऍक्सेस प्रुव्हन गाड्या आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by amit१२३ on Wed, 10/26/2016 - 10:36

In reply to युनिकॉर्न चालवायला आणि by एस

Permalink

यामाहाची नवीन

फसिनो म्हणायचे आहे काय तुम्हाला
  • Log in or register to post comments

Submitted by स्वप्क००७ on Tue, 10/25/2016 - 23:04

Permalink

सामान ने आण करण्यासाठी tvs

सामान ने आण करण्यासाठी tvs ज्युपिटर किंवा होंडा ऍक्टिवा चांगली पण लॉन्ग रूट साठी गियर वाली मोटारसायकल चांगली. अव्हेंजर cruising बाईक आहे लोंग डिस्टन्स साठी चांगली पण टर्निंग रेडियस मोठा आहे तिचा म्हणून ट्राफिक मधून गाडी पटकन काढता येत नाही. बाकी ktm बद्धल लोकांची मत जाणून घ्यायला आवडेल मला.
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Wed, 10/26/2016 - 13:41

In reply to सामान ने आण करण्यासाठी tvs by स्वप्क००७

Permalink

KTM = Best Value For Money

KTM = Best Value For Money and offers much more than any of it's compititor
  • Log in or register to post comments

Submitted by साहना on Tue, 10/25/2016 - 23:21

Permalink

गरज पेक्षा प्लेजर साठी घेत

गरज पेक्षा प्लेजर साठी घेत असाल तर खालील गोष्टी जरूर पहा: १. १५०cc किंवा जास्त. ओव्हरटेक करणे सोपे जाते. राईड quality फार चांगली असते. २. डिस्क ब्रेक महत्वाचे. दोन्ही ब्रेक डिस्क असले तर आणखीन चांगले. ३. तुम्ही राहता तिथे जास्त पाऊस, धूळ किंवा समुद्र किनारा असेल तर एन्क्लोज्ड चेन असलेली बाईक घ्यावी. ४. मागे कोणी बसणार असेल/नसेल त्याप्रमाणे सुद्धा बाईक ची निवड ठरून आहे. पल्सर १५० चे सीट चांगले आहे. यामाहा Fz इत्यादी मध्ये मागचं व्यक्तीला खेटून बसण्याशिवाय पर्याय नाही. ५. मोटारसायकल सामानासाठी पूर्णतः निरुपयोगी आहे. आणि लॉन्ग ड्रियिवं साठी ऍक्टिव्ह सारखी स्कुटर निरुपयोगी/असुरक्षित आहे. माझ्या कडे १ डियो होती. अतिशय छान स्कुटर. दूर कधी गेले नाही पण ३ वर्षांत कधीहि दगा नाही दिला. त्यानंतर सुमारे ३००० KM करून विकली. त्या आधी एका मित्राची पल्सर १५० होती त्यावरून अक्खा दक्षिण महाराष्ट्र - गोवा - उत्तर कर्नाटक पालथा घातला होता ५०,००० KM चालून अजून चालत आहे. पल्सर ५ वर्षे विना तक्रार चालली. एकदा पंक्चर सोडून काहीही तक्रार नाही. पण पाच वर्षां नंतर ३ हजाराचा इलेक्ट्रॉनिक सामानाचा खर्च आला. त्याशिवाय ८ हजरांचा आणखीन काही मोठा खर्च आला असे ऐकून आहे. इतर मित्र मंडळींत यामाहा fz आणि युनिकॉर्न होती. युनिकॉर्न हि थोडी "मध्यम वर्गीय" बाईक वाटली. परफॉर्मन्स ओके असला तरी सामानाचा दर्जा फार खालचा होता. सदर मित्राला "अँपिअरन्स" चे थोडे वेड असल्याने जरा काही खरचटले तर त्याच्या जीवाला लागायचे. त्यांत त्याची फ्युएल टंक ला गंज लागला. एकूण मानसिक समाधान कमी होते. यामाहा fz फार छान होती. चालवायला एक नंबर. युवा लोकांसाठी फार छान आहे. पण चेन ओपन होती आणि ३ वर्षांत एकदा फक्त त्रास दिला. मागे बसायला: शहरांत ओके पण दूर जायला त्रास. सुरक्षा आणि वेग च्या बाबतित पल्सर १५० च्या थोडी उजवी. चालविण्याचा माझा अनुभव प्रचंड नसला तरी सर्व प्रकारच्या बाईक्स आणि गाडयां मी विविध परिस्थितीत हाताळल्या आहेत. एके काळी बुलेट वगैरे घेऊन लडाख ला जाण्याची मनीषा होती. जुन्या गॅंग मधील काही मित्र आता एकदम US style बाईक गॅंग चालवतात. कधी कधी बुलेट, हरली डेव्हिडसन वगैरे सुद्धा बऱ्यापैकी चालवली आहे. बजाज अवेन्गर कि काय ते अजिबात घेऊ नका एकाहि बाईकर मित्रांकडून चांगले ऐकले नाही. BMW चे कातडे पांघरून असलेली अल्टो असे कुणी तरी वर्णन केलेले आठवते पण मी हात लावला नाही. तुम्हाला परवडत असेल तर top tier मधील बाईक घ्यावी. कारण ह्या सेगमेंट मधील ग्राहक कमी कोस्ट सेन्सिटिव्ह असल्याने मालाचा एकूण दर्जा चांगला असतो. त्या शिवाय तुमचे वजन ९५ असल्याने (जे तुमच्या उंचीच्या मानाने सरासरी भारतीय पुरुषांच्या तुलनेत ३० किलो जास्त आहे) मिडल लेवल बाईक्स तुमच्या साठी अतिशय वाईट चालतील. मागे कुणी व्यक्ती असेल तर आणखीन वाईट.
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on Wed, 10/26/2016 - 00:39

Permalink

Aprilla 150

Image removed. १५० सीसी आहे आणि सामान भरपूर बसेल शिवाय डिस्क ब्रेक सुद्धा आहेत
  • Log in or register to post comments

Submitted by साहना on Wed, 10/26/2016 - 04:31

In reply to Aprilla 150 by कपिलमुनी

Permalink

वाव हे प्रकरण कधी लाँच झाले ?

वाव हे प्रकरण कधी लाँच झाले ?
  • Log in or register to post comments

Submitted by वेल्लाभट on Wed, 10/26/2016 - 07:39

In reply to वाव हे प्रकरण कधी लाँच झाले ? by साहना

Permalink

गेल्या दोन महिन्याभरात.

गेल्या दोन महिन्याभरात. कड्ड्ड्डक आहे ही. शिवाय गियरलेस. म्हणजे बासच.
  • Log in or register to post comments

Submitted by John McClain on Wed, 10/26/2016 - 15:54

In reply to गेल्या दोन महिन्याभरात. by वेल्लाभट

Permalink

Aprilia

Aprilia sr150 आहे माझ्याकडे. 1 महिना झाला... Run-in चालू आहे त्यामुळे पळवत नाहीये. पण चांगली वाटतेय.फक्त खूप उंच आहे ☺... कमी उंची असणाऱ्यांना तापदायक वाटू शकते. अजून एक कमीपणा जो मला वाटतो तो म्हणजे पुढचे suspensions खूप stiff आहेत. फायदे म्हणजे भरपूर power, मोठे टायर्स (उंची आणि width), डिस्क ब्रेक्स, सामानाची जागा, dynamics....
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on Wed, 10/26/2016 - 00:41

Permalink

बाईक

१ लाख १५०+ सीसी ५-६" उंची असे निकष पहाता आपाचे २०० किंवा १८० घ्या
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Wed, 10/26/2016 - 01:05

Permalink

ओहॊ, बरेच माहितीपूर्ण

ओहॊ, बरेच माहितीपूर्ण प्रतिसाद आलेत! धन्यवाद! थोडंसं अपडेट: ऍक्टीवा किंवा ज्युपिटर वेगळी घ्यायची आहेच पत्नीसाठी-तिची चॉईस फायनल आहे हा धागा बाईकसाठी आहे, स्कुट्रेटबद्दल नाही, अजून गोंधळ नको म्हणून खुलासा!
  • Log in or register to post comments

Submitted by वेल्लाभट on Wed, 10/26/2016 - 01:18

Permalink

आताची युनिकॉर्न भंगार केलीय.

आताची युनिकॉर्न भंगार केलीय. त्यापेक्षा अ‍ॅवेंजर केंव्हाही सरस दिसते. तुमच्या क्रायटेरियात बसणारी एका लाखाच्या आतली बाईक म्हणून टीव्हीएस आपाचे १८० आरटीआर सुचवेन. परफॉर्म्न्स खतरा आहे असं ऐकून वाचून आहे. कुठलाही एक्सपर्ट रिव्ह्यू काढून वाचा. आरटीआर ची प्रशंसाच वाचाल. माझी सजेशन्स आरटीआर १८० किंवा २०० सुझुकी जिक्सर (हिचे पण रिव्ह्यू उत्तम आहेत) नाहीतर सरळ अ‍ॅप्रिलिया एस आर १५० स्कूटर घ्या, आणि परफॉर्मन्स ची मजा शिवाय ऑटॉगियरची सोय अनुभवा. मी तर ऑटोगियरचा फ्यान आहे. सो ईजी टू राइड. आपण काय लांबलांब हायवे ने बाईक नेणारे नव्हे त्यामुळे सिटीत ऑटॉगियर बेस्ट
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Wed, 10/26/2016 - 13:42

In reply to आताची युनिकॉर्न भंगार केलीय. by वेल्लाभट

Permalink

परफॉर्म्न्स खतरा आहे असं ऐकून

परफॉर्म्न्स खतरा आहे असं ऐकून वाचून आहे. कुठलाही एक्सपर्ट रिव्ह्यू काढून वाचा. आरटीआर ची प्रशंसाच वाचाल.
कार अथवा बाईकचा कोणताही रिव्ह्यू नेहमी चांगलाच असतो...कारण कोणीही वाईट लिहित नाही...काही अपवाद सोडले तर
  • Log in or register to post comments

Submitted by विखि on Wed, 10/26/2016 - 01:36

Permalink

युनिकॉर्न बिन्धास्त........

डान्गे साहेब, बाईक साठी ची तुम्ची आन माझी गरज सेम होती, मी बी ५-६" उंची चा, फकस्त ६७ मधी खेळतोय :) १५० सीसी मधी लै शोध घेतला, जुनी युनिकॉर्न बन्द झाली तेव्हा लै नाराज झालो, मग कळाले नविन युनिकॉर्न येतिये मग तिच्या सठी थाम्बलो, पाहीली, काही राम नाय वाटला, मग कळाले युनिकॉर्न च्याच भावकी मध्ली हॉरनेट येतीये, तित पन काय दिसना, पलसर कुटुम्ब बघुन झाल, अपाचे, यामाहा, अव्हेंजर, शेवटी बुलेट वर गाडी येउन थाम्बली, पन आत्तच्या बुलेट मधी पहील्यागत मजा राहीली नाय ( माफी मागुन) ६ महिन्यात बुलेट ईन्जिन कामाला काढलेल्या पाहील्यात, या सगळ्यात एक वर्ष गेल. मन्ग जुनी युनिकॉर्न येतीये अस कळाल, कारन तिला लैच मागणी वाढाय लागली होती. तसाच जाउन बूक केली. १ महीना वाट पाहील्यावर दारात आली बया युनिकॉर्न ८ महीने झाले आता, एक नम्बर चालीत, बयाला लदाख ला न्यायचीत आता :)
  • Log in or register to post comments

Submitted by अभिदेश on Wed, 10/26/2016 - 02:56

Permalink

कोणतीही

घ्या , फक्त सुचवणाऱयांवर ते कंपनीची जाहिरात करतायत हा आरोप करू नका.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद भागवत १९८७ on Wed, 10/26/2016 - 10:06

Permalink

yamaha fz s version 2.0

मस्त आहे हि गाडी बघा दादा एकदा ! yamaha fz s version 2.0
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on गुरुवार, 10/27/2016 - 22:57

In reply to yamaha fz s version 2.0 by प्रसाद भागवत १९८७

Permalink

या गाडीचे डीझाईन इथून ढापलं

या गाडीचे डीझाईन इथून ढापलं आहे का? Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by कैलासवासी सोन्याबापु on Wed, 10/26/2016 - 10:28

Permalink

इलेकट्रा घ्या हो सरकी! सनान

इलेकट्रा घ्या हो सरकी! सनान हाय गाडी!
  • Log in or register to post comments

Submitted by वामन देशमुख on Wed, 10/26/2016 - 10:29

Permalink

अवेंजरच घ्या.

बजाज अवेंजर मनात बसलीये, थोडीशी चालवली होती.
अवेंजरच घ्या. मस्त दिसते.
  • Log in or register to post comments

Submitted by amit१२३ on Wed, 10/26/2016 - 10:38

Permalink

अवेंजर

अव्हेंजर मस्त आहे . घेऊन टाका
  • Log in or register to post comments

Submitted by राहुल काटु on Wed, 10/26/2016 - 11:16

Permalink

अव्हेंजर स्ट्रीट २२० घ्या

अतिशय रास्त दरात उत्तम क्वालिटी आणि आराम ....
  • Log in or register to post comments
Profile picture for user मराठी कथालेखक

Submitted by मराठी कथालेखक on Wed, 10/26/2016 - 11:27

Permalink

TVS Phoneix

125 cc चालणार असल्यास (आणि डिलरकडे मिळाल्यास :) Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Wed, 10/26/2016 - 11:58

Permalink

होंडा युनिकॉर्न मोटारसायकल हि

होंडा युनिकॉर्न मोटारसायकल हि दिसायला इतर गाड्यांइतकी आकर्षक नाही. परंतु अत्यंत मुलायम आणि खात्रीशीर इंजिन मोनो शॉक मुळे वळणावर गाडी रस्ता पकडून चालते. रुंद टायर, आरामदायक सवारी यामुळे हि गाडी अतिशय उत्तम चालते. माझी ९ वर्षे जुनी युनिकॉर्न सध्या माझा मुलगा चालवतो. त्याची मूळ बॅटरी ७ वर्षे चालली.( याचा अर्थ त्यांची विद्युत प्रणाली उच्च दर्जाची आहे). आज आहे त्या स्थितीत विना सर्व्हिसिंग लेह ला जाऊन येईल अशी खात्री आहे. तुमच्या अर्थशास्त्रात बसत असेल तर होंडा सीबी हॉर्नचा १६० (कम्बाइन्ड ब्रेक सिस्टीम) ची घ्या (घरपोच किंमत साधारण ९०,०००) . करा यात पुढे आणि मागे डिस्क ब्रेक असून ते एकत्र लावले जातात यामुळे अचानक ब्रेक लावायला लागले तरीही गाडी घसरत नाही. हा माझ्या दृष्टीने सर्वात मोठा फायदा आहे. गेल्या तीस वर्षात रस्त्यावर रहदारी अफाट वाढली आहे त्यामुळे बेशिस्त वाहनचालक आणि कानाला हेडफोन लावून रस्त्यावर अस्ताव्यस्त चालणाऱ्या कॉलेजच्या पोरी यांच्या पासून संरक्षण या दृष्टीने बोट लावल्यावर जागीच उभी राहणारी मोटार सायकल हि आजमितीला जास्त महत्त्वाची असते असे मी मानतो. होंडा गाड्या आपण सहज १५ वर्षे चालवू शकाल इतकी त्याची खात्री असते. (EXTREMELY RELIABLE) वाट पाहण्याची तयारी असेल तर ती व्ही एस अपाचे २०० आर टी आर विथ ABS आणि पिरेली टायर हीअगदी पुढील २-३ महिन्यात बाजारात येईल अशी अटकळ आहे (साधारण घरपोच किंमत १.२५ लाख). ( ABS/ पिरेली विना गाडी आताच उपलब्ध आहे १. १ लाख) बाकी "बुलेट वगैरे" आपण भक्त असाल तर ठीक आहे अन्यथा दार दोन महिन्यात काही तरी रुटू खुटू चालूच असते.
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Wed, 10/26/2016 - 12:16

In reply to होंडा युनिकॉर्न मोटारसायकल हि by सुबोध खरे

Permalink

युनिकोर्न बद्दल जास्त चांगली

युनिकोर्न बद्दल जास्त चांगली मतं येतायत, बजेटमध्ये बसेल तुम्ही सुचवलेल्या बाईक्स नक्की ट्राय करतो, बुलेटभक्त नाही, अजून चालवलीच नाहीये (बापू, मोदक मारतील आता मला!) देखभालीची भीती! :(
  • Log in or register to post comments

Submitted by भटकंती अनलिमिटेड on Wed, 10/26/2016 - 12:21

In reply to युनिकोर्न बद्दल जास्त चांगली by संदीप डांगे

Permalink

मी आधी युनिकॉर्न वापरायचो.

मी आधी युनिकॉर्न वापरायचो. दोन वर्ष वापरुन थंडरबर्डसाठी विकली. दोन्हीचे काही फायदे तोटे आहेतच. युनिकॉर्नचा स्मूथनेस आणि जब्रा हॅंडलिंग मिस करतो आहे. पण थंडरबर्डचा क्रुझिंग कंफर्ट आणि लो एंड टॉर्कमुळे रिग्रेट करत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Wed, 10/26/2016 - 12:36

In reply to मी आधी युनिकॉर्न वापरायचो. by भटकंती अनलिमिटेड

Permalink

Renegade बद्दल काय मत आहे?

Renegade बद्दल काय मत आहे?
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Wed, 10/26/2016 - 12:40

In reply to Renegade बद्दल काय मत आहे? by संदीप डांगे

Permalink

ते सोन्याबापू सांगतय.

ते सोन्याबापू सांगतय. माझे मत इतकेच की प्रथमदर्शनी इंजिन ब्लॉक लहान दिसतो. गाडीचा लुक जातो. आहे पॉवरफुल पण दिसत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by अनिरुद्ध.वैद्य on Wed, 10/26/2016 - 12:49

In reply to Renegade बद्दल काय मत आहे? by संदीप डांगे

Permalink

दिसायला इतकी खास

नाही वाटली शिवाय जरा जास्तच लो बेस आहे असे वाटते, पावसाळ्यात उगा चिखल माती उडायची. भारतात नुकतीच लाँच झालिये तर सध्या एखादं वर्ष थांबुन मग अंदाज बांधता येइल.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Wed, 10/26/2016 - 12:48

In reply to मी आधी युनिकॉर्न वापरायचो. by भटकंती अनलिमिटेड

Permalink

बुलेट आजही बोट लावल्यावर

बुलेट आजही बोट लावल्यावर आटोक्यात येईल अशी नाही. किंवा त्याचे डिस्क ब्रेक सुद्धा तितके पटकन लागत नाहीत. त्यामुळे शहरात किंवा गर्दीच्या रस्त्यावर चालवायला बुलेट आजही कटकटीचीच वाटते. शिवाय युनिकॉर्न सारखे एक वर्ष बिना सर्व्हिसिंगचे गेले असे शक्यच नाही. बुलेटचे कौतुक असणाऱ्या लोकांचा आपला एक संप्रदाय आहे. तुम्ही त्यातले असाल तर ठीक आहे. अन्यथा स्पोक च तुटला, टाकीच गंजली, केबल तुटली अशा कटकटी फार असतात. जाता जाता -- युनिकॉर्न वर धागा निघाला तर त्याचे १०० सुद्धा प्रतिसाद होणार नाहीत कारण त्या गाडीचे फायदे दोन तीन प्रतिसादात लिहून होतील. मग "असे झाले, तसे झाले" तर काय असे किती प्रतिसाद त्यात भरणार?
  • Log in or register to post comments

Submitted by भटकंती अनलिमिटेड on Wed, 10/26/2016 - 12:56

In reply to बुलेट आजही बोट लावल्यावर by सुबोध खरे

Permalink

बुलेट आजही बोट लावल्यावर

बुलेट आजही बोट लावल्यावर आटोक्यात येईल अशी नाही.
अमान्य. माझ्या गाडीला दोन्ही डिस्कब्रेक आहेत आणि एमर्जन्सी ब्रेकिंग कंट्रोल आतापर्यंततरी झाला आहे (टचवूड). फिशटेलिंगचा थोडा इश्यू आहे पण तो मुख्यतः टायरचा दोष. बुलेटप्रेमी असण्याचा प्रश्नच नाही. बजेट येईल आणि लॉंचिंग होईल तेव्हा नक्कीच ड्युक-३९०, बीएमडब्लु-३१० जीएस अशा गाड्यांचा विचार करेन. पण अद्यापतरी मला काही इश्य़ू आला नाही. पण हो बुलेटचे क्वालिटी इशूज आहेत हे मान्य. पण मी गाडी घेतली तेव्हा माझा मुख्य वापर "हायवेला तासनतास आरामदायी सीटवर क्रूझ करत राहणे" या पद्धतीचा होता (आणि आहे) आणि त्या पद्धतीला त्यावेळी मला थंडरबर्ड योग्य वाटली.
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Wed, 10/26/2016 - 13:44

In reply to युनिकोर्न बद्दल जास्त चांगली by संदीप डांगे

Permalink

बुलेटभक्त नाही, अजून चालवलीच

बुलेटभक्त नाही, अजून चालवलीच नाहीये (बापू, मोदक मारतील आता मला!) देखभालीची भीती! :(
बाब्बो..."बुलेट", "भक्त" आणि "मोदक" हे तीन शब्द एकत्र एकाच वाक्यात भरले कि विस्फोटक दारुगोळा तयार होतो =))
  • Log in or register to post comments

Submitted by कैलासवासी सोन्याबापु on Wed, 10/26/2016 - 14:05

In reply to बुलेटभक्त नाही, अजून चालवलीच by टवाळ कार्टा

Permalink

नाही रे भावा, उडता बाण होतो ,

नाही रे भावा, उडता बाण होतो , जो तुला अगदी आवर्जून वाटेत उभारून नेमक्या जागी घ्यायची हौस उफाळून येते ! =)) (हलके घे रे बाबा कलियुग आहे लेड बॅक पोरांना ही सांगावं लागतंय च्यायला)
  • Log in or register to post comments

Submitted by अनिरुद्ध.वैद्य on Wed, 10/26/2016 - 12:46

Permalink

जुनी युनिकॉर्न असेल

तर मस्त! नवी सिबिआर रेंज मधली काही खास नाही वाटली. वर डॉक्टर साहेबांनी सांगितले आहेच तर अपाचे टीव्हीएस २०० विथ एबीएस मस्त असेल. सध्याची ट्रॅफिक कंडीशन बघता, एबीएस / कंबाईंड ब्रेकींग असेल तर उत्तम.
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Wed, 10/26/2016 - 12:51

In reply to जुनी युनिकॉर्न असेल by अनिरुद्ध.वैद्य

Permalink

मलाही जुनीच माहिती आहे आणि

मलाही जुनीच माहिती आहे आणि आवडली होती, सीबीआर आल्यापासून जीव उडाला होता युनिकोर्न वरून, होंडा सीबीआर 250 सुद्धा इतकी खास वाटली नाही, लगेच हात दुखून येतात, स्टाईल मारायला दोन लाख जरा जास्तच!
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Wed, 10/26/2016 - 12:55

In reply to मलाही जुनीच माहिती आहे आणि by संदीप डांगे

Permalink

१५० सीबीआर आहे की. लाखात येते

१५० सीबीआर आहे की. लाखात येते. जवळपास तशीच यामाह आर १५ पण आहे. पल्सर एनएस आहे ऑईल कूल्ड.
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Wed, 10/26/2016 - 12:56

In reply to १५० सीबीआर आहे की. लाखात येते by अभ्या..

Permalink

रायडिंग पोजिशन जरा त्रासदायक

रायडिंग पोजिशन जरा त्रासदायक वाटते!!
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Wed, 10/26/2016 - 12:50

Permalink

एक महत्त्वाचे --तुम्हाला आपण

एक महत्त्वाचे --तुम्हाला आपण कसे "दिसतो" महत्त्वाचे वाटते कि कसे "आहोत" ते ठरवा. "जमाने को दिखाना है" असेल तर युनिकॉर्न घेऊ नका.
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Wed, 10/26/2016 - 12:55

In reply to एक महत्त्वाचे --तुम्हाला आपण by सुबोध खरे

Permalink

खरं आहे डॉक!

खरं आहे डॉक! माझं इंक्लिनेशन थोडे क्रुजर बाईक कडे आहे, बसण्याची आरामदायक पोजिशन हे अति महत्वाचे, मेंटेनन्स दुसरे, पावर तिसरे तर लुक चवथ्या प्रयोरिटी वर आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by एस on Wed, 10/26/2016 - 13:10

In reply to खरं आहे डॉक! by संदीप डांगे

Permalink

तसे असेल तर बजाज ऍव्हेंजर 220

तसे असेल तर बजाज ऍव्हेंजर 220 क्रूज चांगली आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by कैलासवासी सोन्याबापु on Wed, 10/26/2016 - 13:43

In reply to तसे असेल तर बजाज ऍव्हेंजर 220 by एस

Permalink

चालेल! तसंही डांगेब्वा, बुलेट

चालेल! तसंही डांगेब्वा, बुलेट चालवायला कल्टचा भक्त असायलाच पाहिजे असे नाही/नसते, बुलेट न आवडताही खिशात पैसा असता ती विकत घेता येतेच हो :), बाकी सन्माननीय मंडळीस वाटते तशी बुलेट अगदी टाकाऊ नाही हा फर्स्ट हँड अनुभव आहे , अवेंजर सुद्धा उत्तम रेनेगेड बद्दल थोड्या वेळात सविस्तर लिहितो
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • पान 5
  • पान 6
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com