✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मैत्रीण ....... !!!!

फ — फिझा, Mon, 10/10/2016 - 10:38
मैत्रीण ....... !!!! माझ्याकडे दिवस डोक्यावर असताना तु चांदणे पाहत असतेस कदाचित , तुझ्या नि माझ्या देशातले ऋतूही सारखेच आहेत म्हणे .... ऋतूंबरोबर मैत्री बदलत नाही .... ती तिचा ओलावा कायम ठेवते, हे किती बरंय नाही ? कुठलातरी ढग कधीतरी गच्च भरलेला इथे माझ्या अंगणात येऊन बरसतो रापलेल्या इथल्या तृणांमधून तो, वाट काढत काढत दिशाहीन वाहत राहतो ....... 'तो 'ढग तुझा होता; ते मला कळत नाही, हे किती बरंय नाही ? कधी इथल्या उन्हाची झळ पोचत असेल तुला अन तुझ्या फुंकरीने थंड होऊन जात असेल, तू दारात शिंपडलेल्या सड्यामधले काही थेंब इथे मला चिंब करून टाकतात , त्या झळे मागे धावणारे एक मृगजळ होते , ते तुला कळत नाही, हे किती बरंय नाही ? हा ! कधीतरी होतेच कि ग भेट, तुझ्या डोळ्यातल्या अक्षरांबरोबर माझ्या न बोलणाऱ्या शब्दांची, अन आपल्या नजरेमध्येच दाटलेल्या त्या रिकाम्या ओळीत ती अक्षरे नि शब्द, कंठ फुटल्यासारखे उमटतात रिकामी ओळ गच्च भरून टाकतात .... डोळे बंद करेपर्यंत तेव्हा , ते इतर कुणाला कळत नाही , हे किती बरंय नाही ? ------------ फिझा

प्रतिक्रिया द्या
2916 वाचन

💬 प्रतिसाद (14)

कहर!! अप्रतिम!!!

रातराणी
Mon, 10/10/2016 - 10:42 नवीन
कहर!! अप्रतिम!!!
  • Log in or register to post comments

_/\_

अजया
Mon, 10/10/2016 - 10:56 नवीन
अप्रतिम अप्रतिम. अतिशय आवडली. माझ्या जीवलगे, तू हे वाचते आहेस का?
  • Log in or register to post comments

फिजा... फिदा... या कवितेवार...

राजेंद्र देवी
Mon, 10/10/2016 - 11:09 नवीन
फिजा... फिदा... या कवितेवर...
  • Log in or register to post comments

अप्रतिम!

इशा१२३
Mon, 10/10/2016 - 11:44 नवीन
अप्रतिम! सखीला वाचायला सांगते.
  • Log in or register to post comments

अप्रतिम !!! खूप आवडली :)

मितान
Mon, 10/10/2016 - 11:53 नवीन
अप्रतिम !!! खूप आवडली :)
  • Log in or register to post comments

छान कविता.

सस्नेह
Mon, 10/10/2016 - 11:58 नवीन
छान कविता.
  • Log in or register to post comments

हम्म

मिसळलेला काव्यप्रेमी
Mon, 10/10/2016 - 12:05 नवीन
कविता मोठी होतेय..मस्तचं असेच लिहीत रहा.
  • Log in or register to post comments

खूपच छान..... एक्दम मस्त झाली

कवि मानव
Mon, 10/10/2016 - 12:57 नवीन
खूपच छान..... एक्दम मस्त झाली आहे कविता मुक्त छंद ... छान शब्द आणि आशय...!!!!
  • Log in or register to post comments

वा !!! जबरदस्त !!!

पथिक
Mon, 10/10/2016 - 15:13 नवीन
वा !!! जबरदस्त !!!
  • Log in or register to post comments

सुरेख! अशी एक तरी सखी मिळाली

नूतन सावंत
Mon, 10/10/2016 - 18:25 नवीन
सुरेख! अशी एक तरी सखी मिळाली तर बस्स! इथे खूप मिळाल्यात.
  • Log in or register to post comments

छान कविता.

एस
Mon, 10/10/2016 - 22:40 नवीन
छान कविता.
  • Log in or register to post comments

सुंदर! शेवटचे कडवे तर अप्रतिम

रुपी
Tue, 10/11/2016 - 00:13 नवीन
सुंदर! शेवटचे कडवे तर अप्रतिम!
  • Log in or register to post comments

अफाट लिहिलं आहे. जबरदस्त.

यशोधरा
Tue, 10/11/2016 - 10:39 नवीन
अफाट लिहिलं आहे. जबरदस्त.
  • Log in or register to post comments

भन्नाट आवडली.......

Jabberwocky
Fri, 10/14/2016 - 12:55 नवीन
भन्नाट आवडली.......
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा