✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

गडकर्‍यांचे किस्से.

च
चतुरंग यांनी
Tue, 01/22/2008 - 23:02  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
12319 वाचन

💬 प्रतिसाद (19)

प्रतिक्रिया

पाच अक्षरी नाटके

मुक्तसुनीत
Tue, 01/22/2008 - 23:23 नवीन
गडकर्‍यांच्या सर्व नाटकांची नावे ही पाच अक्षरीच आहेत - "एकच प्याला", "पुण्यप्रभाव" (अजून आठवत नाहीयेत - कोणी मदत करेल?) ------------------ अजून काही: भावबंधन राजसंन्यास
  • Log in or register to post comments

अजून दोन

सुनील
Tue, 01/22/2008 - 23:24 नवीन
"एकच प्याला", "पुण्यप्रभाव" (अजून आठवत नाहीयेत - कोणी मदत करेल?) काही आठवतात ती - संयस्त खड्ग राजसंन्यास (बहुधा हे अपूर्ण राहिले) Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

संन्यस्त खड्ग ?

मुक्तसुनीत
Tue, 01/22/2008 - 23:26 नवीन
हे गडकर्‍यांचे नव्हे. सावरकरांचे.
  • Log in or register to post comments

अरेच्चा !

सुनील
Tue, 01/22/2008 - 23:31 नवीन
गडबड झाली वाटत! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

व्हती गडबड

प्रकाश घाटपांडे
Wed, 01/23/2008 - 17:59 नवीन
अहो व्हती गडबड कदि कदि. त्ये "जेथे सागरा धरणी मिळते तेथे तुझी मी वाट पहाते " ह्ये गानं बी सावरकरांचे म्हनून वाटतय. आता "ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला" ह्या सावरकरांच्या गान्याने तो घोटाळा व्हतोय. प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

धन्यवाद,

चतुरंग
Tue, 01/22/2008 - 23:33 नवीन
मुक्तसुनीत व सुनील. हो, राजसंन्यास अपूर्ण राहिले. चतुरंग
  • Log in or register to post comments

"वेड्यांचा

भडकमकर मास्तर
Wed, 01/23/2008 - 13:29 नवीन
"वेड्यांचा बाजार" नावाचे सुद्धा अपूर्ण राहिले बहुतेक.... त्या अपूर्ण नाटकाचे स्क्रिप्ट मी वाचले आहे फार पूर्वी...त्यात एक कोट्या करणारे पात्र असते, एवढेच आठव्तेय.......
  • Log in or register to post comments

इ-बुक समग्र गडकरी

नंदन
Wed, 01/23/2008 - 13:49 नवीन
राम गणेश गडकर्‍यांचे समग्र साहित्य इ-पुस्तकाच्या स्वरूपात उपलब्ध असल्याची बातमी मागे वाचली होती. [दुवा - येथे] कुणाला याबाबत अधिक माहिती आहे का? नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)
  • Log in or register to post comments

मजा आली..

विसोबा खेचर
Wed, 01/23/2008 - 17:19 नवीन
चतुरंगराव, गडकरी मास्तरांचे छोटेखानी किस्से वाचायला मजा आली. कृपया येऊ द्यात अजूनही... तात्या.
  • Log in or register to post comments

प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

चतुरंग
Wed, 01/23/2008 - 19:15 नवीन
आठवेल तसे लिहीनच. चतुरंग
  • Log in or register to post comments

गडकरी आणि अत्रे

मुक्तसुनीत
Wed, 01/23/2008 - 19:59 नवीन
मला वाटते, गडकर्‍यांच्या स्मृतिंची ज्योत पिढ्यानुपिढ्यांकरता तेवत ठेवण्याचे सारे श्रेय अत्र्यांना द्यायला हवे. चतुरंगरावानी लिहिलेले बहुतेक किस्से अत्र्यांच्या लेखांतून, भाषणांच्या संग्रहातून आलेले असावेत असा माझा अंदाज आहे. अत्र्यांची लोकप्रियता , आणि मुख्य म्हणजे एखाद्या व्यक्तिची योग्यता जाणून ती आपल्या ओघवत्या शैलीत लिहिण्या-सांगण्याची त्यांची हातोटी याचा सर्वात सुंदर मिलाफ झाला , तो गडकर्‍यांच्या गुणवर्णनात. केवळ गडकर्‍यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यानी शेकडो भाषणे केली, डझनावारी लेख लिहिले. सुदैवाने , हे सारे परचुर्‍यांसारख्या अत्रेभक्तामुळे मुद्रितस्वरूपात उपलब्ध आहे ....
  • Log in or register to post comments

अत्र्यांची काही मोजकीच पुस्तके मी वाचली आहेत.

चतुरंग
Wed, 01/23/2008 - 20:10 नवीन
ह्यातले बहुतेक किस्से मी माझ्या वडिलांशी बोलताना त्यांच्याकडून ऐकले आहेत. काही माझ्या वाचनात आलेत. आपण उल्लेख केलेले परचुर्‍यांचे पुस्तक कोणते ते सांगू शकाल का? ते मिळवून मी जरुर वाचेन. अवांतर - वाचनाची गोडी ही आयुष्य संपन्न करते. माझ्या आजोबांचा पुस्तकांचा संग्रह जवळपास २००० पुस्तकांचा होता. त्यांच्यामुळे मला वाचनाची आवड निर्माण झाली आणि ती वडिलांमुळे टिकून राहिली. चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

पुस्तकांची नावे

मुक्तसुनीत
Wed, 01/23/2008 - 20:52 नवीन
अत्र्यांची अनेक पुस्तके आहेत, आणि गडकर्‍यांचे संदर्भ बर्‍याच लेख आणि भाषणसंग्रहातून मिळतात. मला चटकन आठवणारी २ नावे : "क‍र्‍हेचे पाणी" या अत्र्यांच्या आत्मचरित्रामधे गडकरी, त्याकाळातले पुणे आदिंची रसाळ वर्णने आहेत. "आषाढस्य प्रथम दिवसे" नावाच्या लेखसंग्रहात गडकर्‍यांवर एक सोडून दोन-तीन लेख आहेत असे मला आठवते ... (परचुरे हे लेखक नव्हेत. ते अत्र्यांचे प्रकाशक. सावरकर आणि अत्र्यांचे खूपसे लिखाण "परचुरे प्रकाशन मंदिर" यांनी छापले आहे. या दोन लेखकांशिवाय परचुर्‍यांची मोठी कामगिरी म्हणजे जी एंच्या शेवटच्या वर्षातली (आणि त्यांच्या मृत्यूनंतरची त्यांची) पुस्तके या प्रकाशनाने काढली ...
  • Log in or register to post comments

१ २ ३ ४ ५

सुनील
Wed, 01/23/2008 - 21:04 नवीन
सहजच मनात विचार आला - गडकर्‍यांचे सर्वात गाजलेले नाटक - एकच प्याला. त्यांचे नाव, राम - दोन अक्षरी. वडिलांचे नाव, गणेश - तीन अक्षरी. आडनाव, गडकरी - चार अक्षरी. कवी म्हणून टोपणनाव, गोविंदाग्रज - पाच अक्षरी. (आकडेबहाद्दर) सुनील Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

खरचं की अजब आहे!

चतुरंग
Wed, 01/23/2008 - 21:24 नवीन
अजून एक दुर्दैवी योगायोग - गडकर्‍यांचा जन्म गुजरातेतल्या 'नवसारी' चा (१८८५) आणि मृत्यू विदर्भातल्या 'सावनेर' चा (१९१९)! अवघं ३४ वर्षांचं आयुष्य! ही 'मोठी' माणसं लहान वयात का जातात?? चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

खरे आहे ..

सुनील
Wed, 01/23/2008 - 22:16 नवीन
बालकवीही असेच तरुण वयातच गेले! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

राम गणेश गडकरी या नावातच

सुधीर कांदळकर
Sun, 01/27/2008 - 15:30 नवीन
जादू आहे. वाचून मजा आली. वरील सर्वांना धन्यवाद. मूकनायक कोणाचे होते बरे?
  • Log in or register to post comments

मूकनायक

मुक्तसुनीत
Sun, 01/27/2008 - 22:19 नवीन
गडकर्‍यांचेच ! आठवणीबद्दल धन्यवाद !
  • Log in or register to post comments

गडकरी आणि अत्रे

डॉ.प्रसाद दाढे
Wed, 01/30/2008 - 09:34 नवीन
समग्र गडकरी नामक पुस्तकात त्या॑चे सर्व साहित्य आहे. कर्‍हेचे पाणीमध्येसुद्धा गडकर्‍या॑चे पुष्कळ किस्से दिले आहेत. पर॑तु त्यातील सत्या-असत्त्याबद्दल प्रवाद आहेत. काही तत्कालीन टीकाकारा॑च्या मते गडकरी आणि अत्रे या॑ची कधी भेटच झाली नव्हती. अर्थात ह्या वादात आता पडण्याचे काही कारण नाही..
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा