✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मी बी मंत्री होईन म्हणतो : नागपुरी तडका

ग — गंगाधर मुटे, Sat, 07/09/2016 - 12:48
मी बी मंत्री होईन म्हणतो : नागपुरी तडका

लाल दिव्याची चमक पाहीन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!

शेतमालाला रास्त भाव
भेटला काय, न भेटला काय
शेतकर्‍याला दारिद्रीत जगायची
उपजत सवयच हाय
मी तरी आपलं जमवून
घेईन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!

शेतकर्‍याला कर्जमुक्ती
भेटली काय, न भेटली काय
शेतकर्‍याला कर्जात जगायची
उपजत सवयच हाय
मी तरी आपला खिसा भरून
घेईन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!

शेतीचे प्रश्न
सुटलेत काय, न सुटलेत काय
या बैताडबेलण्या शेतकर्‍याले
उपजत अक्कलच नाय
संघटनेची सीडी करून
सत्तेच्या बोहल्यावर चढेन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!

शेतीशी प्रतारणा करून
सत्तेत येता येते
शेतकर्‍याशी इमान राखणारा
खड्ड्यामधी जाते
शेतकर्‍याचे नाव फक्त
कामापुरते घ्यावे
सीडी चढून झाली की
खुशाल सोडून द्यावे
सत्ताकारण करावे
तरच मिळते अभय....!!
एकमुखाने बोला भाऊ!
सत्तासुंदरी की जय....!!!

                     - गंगाधर मुटे "अभय"
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

प्रतिक्रिया द्या
175546 वाचन

💬 प्रतिसाद (484)

काका लोकस

मी-सौरभ
Wed, 07/20/2016 - 17:44 नवीन
त्यापेक्शा चॅलेंज खेळुन बघा. जास्त मजा येते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

चॅलेंज पेक्षा "नॉट अ‍ॅट होम" जास्त उत्तम..

मुक्त विहारि
गुरुवार, 07/21/2016 - 17:35 नवीन
कुणाकडेही पत्ता मागता येतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ

गड्डा झब्बू सगळ्यात चांगला!

स्पार्टाकस
Sat, 07/23/2016 - 23:19 नवीन
गड्डा झब्बू सगळ्यात चांगला! नाहीतरी १०-१५ जणांचा 'कंपू' आहेच.. असं 'त्यांचं' मत आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

मुटेसाहेब

बोका-ए-आझम
Wed, 07/20/2016 - 14:40 नवीन
तुम्ही स्वतःला शेतकरी म्हणवता अाणि इथे या धाग्यावर एवढा वेळ घालवता? खरा शेतकरी शेतात काम करतो, आमच्यावर कसा अन्याय झालाय हे जगाला सांगायला जात नाही. शिवाय तुमच्याकडे इंटरनेट आहे, वाया घालवायला भरपूर वेळ आहे. तुम्ही सधन शेतकरी आहात बहुतेक. त्यामुळे गरीब शेतकऱ्यांचे त्रास तुम्हाला समजणं शक्यच नाही. त्यामुळे हा खोटा कळवळा सोडून द्या!
  • Log in or register to post comments

तुम्ही आता पत्ता रिडायरेक्ट

सस्नेह
Wed, 07/20/2016 - 14:41 नवीन
तुम्ही आता पत्ता रिडायरेक्ट करू नका हां ! ए नॉय चोलबे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

:)

बोका-ए-आझम
Wed, 07/20/2016 - 18:10 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

आपल्या आस्वादासाठी माझा एक

गंगाधर मुटे
Fri, 07/22/2016 - 04:09 नवीन
आपल्या आस्वादासाठी माझा एक शेर; लक्ष्मीस आणखी मी, सांगा किती पुजावे? नांदूच देत नाही, ही अवदसा सुखाने! (मिसळपाववर पूर्वप्रकाशित)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

आपल्या आस्वादासाठी माझा एक

गंगाधर मुटे
Fri, 07/22/2016 - 04:07 नवीन
आपल्या आस्वादासाठी माझा एक शेर; डोक्यास ताण दे तू , अन सोड आत्मग्लानी काही तरी 'अभय' कर; मुक्ती मिळेल ज्याने (मिसळपाववर पूर्वप्रकाशित)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

आपल्या आस्वादासाठी माझा एक

गंगाधर मुटे
Fri, 07/22/2016 - 04:10 नवीन
आपल्या आस्वादासाठी माझा एक शेर; संपूर्ण सातबारा, कोरा करू म्हणाले भुललेत भाड़खाऊ, दिल्लीत पोचल्याने (मिसळपाववर पूर्वप्रकाशित)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सनईचौघडा

मुटे साहेब एक प्रश्न

श्री गावसेना प्रमुख
Fri, 07/22/2016 - 09:49 नवीन
मुटे साहेब एक प्रश्न पवारांनी संपुर्ण कर्ज माफी देउनहि शेतकर्याचा सातबारा हा कसा भरला हो,म्हणजे कर्जमाफी हा आत्महत्यांवर रामबाण उपाय असु शकतो का?असेल तर कसा?नसेल तर का नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे

श्री. मुटे यांची मते मला पटत

जयंत कुलकर्णी
Wed, 07/20/2016 - 17:30 नवीन
श्री. मुटे यांची मते मला पटत नाहीत. आमचे मतभेद जाहीर आहेत. पण या कवितेत त्यांनी त्यांच्यातीलच पुढार्‍यांवर टिकेचे आसूड ओढले आहेत. जे दुर्दैवाने खरे आहे. त्याबाबतीत काय तक्रार आहे हे मला तरी कळले नाही. श्री. मुटे, मला तरी या कवितेतील भाव आवडला. किंचित राग, हतबलता, बोचरा.... आवडली मला कविता.
  • Log in or register to post comments

म्हणजे इतके सगळे प्रतिसाद

बाळ सप्रे
Wed, 07/20/2016 - 17:31 नवीन
म्हणजे इतके सगळे प्रतिसाद कवितेवर आहेत असं वाटतय का तुम्हाला ?? :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

नाही. पण त्यांनी कविता लिहिली

जयंत कुलकर्णी
Wed, 07/20/2016 - 17:35 नवीन
नाही. पण त्यांनी कविता लिहिली आहे तेव्हा त्यावर प्रतिसाद असावेत अशा अपेक्षेने हा धागा उघडला होत... :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

जाऊ द्या काका ..दुसर्‍या धाग्यावर जाऊ

मी-सौरभ
Wed, 07/20/2016 - 17:46 नवीन
सामना संपलाय तेव्हा ज्यांना क्षणचित्रे बघायची आहेत त्यांना बघु द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

त्याबाबतीत काय तक्रार आहे हे

मोदक
Wed, 07/20/2016 - 18:30 नवीन
त्याबाबतीत काय तक्रार आहे हे मला तरी कळले नाही. तक्रार येथे आहे ******************* गंगाधर मुटे - दुर्दैव हे आहे की शेतकर्‍याचे नाव घेऊन सत्तेपर्यंत पोचणारे शेतकर्‍याच घात करत असते मोदक - हा घात करणे प्रकार मे २०१४ पासून सुरू झाला आहे की गेले कांही वर्षांपासून (समजा १०-१५ वर्षे) सुरूच आहे? गंगाधर मुटे - अव्याहत सुरू आहे. मोदक - १६ ऑगस्ट १९४७ पासून का? गंगाधर मुटे - १६ ऑगस्ट १९४७ च्या आधीपासून. लढाया कशासाठी होत होत होत्या? इंग्रज भारतात कशासाठी आले होते? लुटायसाठीच ना? (या वाक्यापुढेही प्रतिसाद आहे) मोदक - इंग्रज शेतकर्‍याचे नांव घेवून भारत लुटायला आले होते का? गंगाधर मुटे - भारत लुटायला म्हणजे काय? हे समजाऊन सांगा जरा. मोदक - वरचा प्रतिसाद तुम्हीच लिहिला आहे की मला भास होत आहेत? *******************
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

इथे ठीणगी पडली..

बाळ सप्रे
Wed, 07/20/2016 - 18:41 नवीन
इथे ठीणगी पडली.. आणि
तुम्हाला मानसोपचारतज्ञाची प्रचंड गरज आहे.
याने त्यावर पेट्रोल ओतले.. मग पत्त्यांचा डाव सुरु झाला :-)))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

ठिणगी पडण्याचे कारणच नव्हते.

मोदक
Wed, 07/20/2016 - 18:48 नवीन
ठिणगी पडण्याचे कारणच नव्हते. एखादे विधान सिद्ध करण्याची तयारी नसेल तर ते विधान करू नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

मे २०१४ पासून

कपिलमुनी
Wed, 07/20/2016 - 18:53 नवीन
मे २०१४ चा उल्लेख यायचा कारण नव्हता ! मुटे त्या आधीपासूनच लिहित आहेत . सदर उल्लेख अनावश्यक होत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

मुटेंच्या लिखाणात सत्ताबदलाचे

मोदक
Wed, 07/20/2016 - 18:58 नवीन
मुटेंच्या लिखाणात सत्ताबदलाचे धागे (ट्रेसेस या अर्थी) सापडतात म्हणून सरळ सरळ विचारले. हो / नाही इतके सरळ उत्तर अपेक्षित होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

हो / नाही इतके सरळ उत्तर

मोदक
Wed, 07/20/2016 - 18:59 नवीन
हो / नाही इतके सरळ उत्तर अपेक्षित होते. ते त्यांनी दिले. त्यांना जे खटकले नाही ते तुम्हाला का खटकले ते सांगता का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

मला काही खटकलं वगैरे नाही ओ..

बाळ सप्रे
गुरुवार, 07/21/2016 - 12:41 नवीन
मला काही खटकलं वगैरे नाही ओ.. मी फक्त प्रतिसाद ट्रॅक करत होतो .. कुठे सुरुवात झाली ते...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

तुमी नाय वो, हे त्या कमु ला

मोदक
गुरुवार, 07/21/2016 - 13:38 नवीन
तुमी नाय वो, हे त्या कमु ला उद्देशून आहे. मे २०१४ चा मुद्दा मुटेंना खटकला नाही, मात्र कमुंना खटकला...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

मे २०१४ चा मुद्दा मुटेंना

गंगाधर मुटे
Fri, 07/22/2016 - 03:27 नवीन
मे २०१४ चा मुद्दा मुटेंना खटकला नाही...
तुम्ही काय मुटेंचे अधिकृत प्रवक्ता आहात का हे अधिकारवाणीने सांगायला? मला खटकला की नाही हे ठरवण्याइतपत मनकवडे आहात का तुम्ही? अस्तित्वहीन आहात म्हनून काहीच्या काहीही लिहायचे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

अस्तित्वहीन नाहीत हो ते.

खटपट्या
Fri, 07/22/2016 - 03:29 नवीन
अस्तित्वहीन नाहीत हो ते. त्यांचे धागे पहा. त्यांचे फोटोही आहेत...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे

राजे

नाखु
गुरुवार, 07/21/2016 - 09:06 नवीन
त्यांनाच सत्ताबदल झाल्याचा इतका राग आहे की इथेच पहा मनातले शब्द बरं त्याम्च्या मतांबद्दल, आकडेवारीबद्दल आक्षेप असलेले प्रतिसाद सन २०११ पासून येत आहेत त्याची उत्तरे त्यांनी काय पद्धतीने दिली हे सगळ्यांनी पाहिले आहे,इथेहे मोदकने साधा प्रश्न विचारला त्याला शब्दाच्या जाळ्यात अडकवून गोल गोल फिरवले पण उत्तरपक्षी मत काही दिले नाही. इतकएच काय मुनीवर तुम्ही वगळता (त्यांच्या) एकाही पाठीराख्यांना त्यांनी जरातरी तारतम्य राखून आणि मुद्देसूद (माहीत नसेल तर प्रांजळपणे यातले मला माहीत नाही) मते/प्रतिसाद द्या असे एकदाही म्हटले नाही, फक्त आगीत तेल ओतण्याचेच काम केले. त्यांनी काही विधायक सकारात्मक काम केले असेल तर सांगावे.लोक त्याचे स्वगतच करतील, खटपट्या यांनी गावाकडे बंधार्याचे काम केले मिपाकरांना ते भावले आणि पटलेही. बाकी काय सांगणार आप्लाच नम्र नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

पाठीराखा

कपिलमुनी
गुरुवार, 07/21/2016 - 13:54 नवीन
मी मुटे किंवा इतर शेतकरी संघटनांचा पाठीराखा मुळीच नाही. यांचा राजकारण फार जवळून पाहिला आहे. आजचा विद्रोही उद्या सत्तेत भागीदार व्हायला किती आसुसलेला असतो ते पाहिला आहे. बाकी मुटे हे प्रॅक्टीकली बोलत नाहीत , विदा देत नाहीत याबद्दल सहमत. आणि विधायक कामाबद्दल मी सुद्धा वरतीच लिहिले आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

मग चर्चेला विनाकारण वेगळे वळण

मोदक
गुरुवार, 07/21/2016 - 13:56 नवीन
मग चर्चेला विनाकारण वेगळे वळण लावण्याचे कारण कळाले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

मे २०१४ चा उल्लेख

कपिलमुनी
गुरुवार, 07/21/2016 - 14:12 नवीन
मे २०१४ चा उल्लेख मला अनावश्यक वाटला इतकेच ! ( आता यावर पण भक्तगण आबजेशक्न घेतात का काय ??)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

लगेच भक्त वगैरे???

मोदक
गुरुवार, 07/21/2016 - 15:01 नवीन
लगेच भक्त वगैरे??? तुमच्यासारख्यांना "मे २०१४" मुळे लैच जळजळ झाली आहे बहुदा.. अजुनही बरी होण्याचे नाव घेत नाहीये. असूदे असूदे.. २०१९ पर्यंत (आणि रागांची कामगिरी अशीच सुरू राहिली तर किमान २०२४ पर्यंत) रोजच्या रोज इनो घेत रहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

गप

नाखु
गुरुवार, 07/21/2016 - 15:06 नवीन
र्हावा दोघं जरा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

नाय काका !

कपिलमुनी
गुरुवार, 07/21/2016 - 15:26 नवीन
आज २१ मोदक फस्त कर्नार :) मे २०१४ ला आनंद झाला होता . पण नंतर त्यावर पाणी ओतले गेलेय . बाकी रागां सध्या पोकेमॉन खेळत असतात असे ऐकून आहे , त्यांच्याकडून अपेक्षा करणार नाहीच. अवांतर : भक्तांबद्दलची टीका बोचण्याचे कार्ण काय बरं??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

भक्तांबद्दलची टीका बोचण्याचे

मोदक
गुरुवार, 07/21/2016 - 15:36 नवीन
भक्तांबद्दलची टीका बोचण्याचे कार्ण काय बरं?? सरसकटीकरन वो.. मानूस द्वेषात आंदळा व्हू न्ये याची क्ल्जी घ्याय्ची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

काल्जी क्रू नै

कपिलमुनी
गुरुवार, 07/21/2016 - 16:33 नवीन
आनि माजाच शेवटचा प्रतिसद आसनार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

पत्ता द्या.

मोदक
गुरुवार, 07/21/2016 - 16:38 नवीन
पत्ता द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

कुठला पाहिजे?

मुक्त विहारि
गुरुवार, 07/21/2016 - 20:30 नवीन
आमच्याकडे ५२ पत्ते आणि २ जोकर फ्री मिळतील शिवाय १ वाइल्ड कार्ड देखील फ्री.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

एखादे विधान सिद्ध करण्याची तयारी नसेल तर ते विधान करू नये....

मुक्त विहारि
Wed, 07/20/2016 - 18:54 नवीन
+ १
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

आपल्या आस्वादासाठी माझा एक

गंगाधर मुटे
Fri, 07/22/2016 - 04:15 नवीन
आपल्या आस्वादासाठी माझा एक शेर; शेती कसून दाखव, विद्याप्रचूर तज्ज्ञा सुटणार प्रश्न नाही, बुद्धी उगाळण्याने (मिसळपाववर पूर्वप्रकाशित)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

कुळकर्णी सर,

गंगाधर मुटे
Fri, 07/22/2016 - 04:14 नवीन
कुळकर्णी सर, या धाग्यावर झुंडशाहीने इतका चिखल आणि घाण करून ठेवला आहे की कुणाला धन्यवाद द्यायची इच्छा होत नाही आहे. त्यामुळे मी तुम्हाला धन्यवाद म्हणण्याच्या मुड मध्ये नाही आहे.म्हणेल कधीतरी. तोपर्यत उधार असू द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

धाग्याचा सारांश:

बोका-ए-आझम
Wed, 07/20/2016 - 23:42 नवीन
मै तो हूं पागल ये कहूं हर पल कर कोई हलचल होने दे होने दे होने दे होने दे होने दे कोई दीवानगी...!
  • Log in or register to post comments

परत चालू करायचं का ?

खटपट्या
Wed, 07/20/2016 - 23:49 नवीन
परत चालू करायचं का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

आपल्या आस्वादासाठी माझा एक

गंगाधर मुटे
Fri, 07/22/2016 - 03:20 नवीन
आपल्या आस्वादासाठी माझा एक शेर; स्मशानातल्या मसन्याउदास, कुठे काय वर्ज्य मेल्यावरती मर नाहीतर, जिवंतपणी मर (मिसळपाववर पूर्वप्रकाशित)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

असं नाय करायचं बाबा! इतक्यात

निंजा टर्टल
गुरुवार, 07/21/2016 - 01:40 नवीन
असं नाय करायचं बाबा! इतक्यात संपलं पण???? हे काय ब्रोब्र नाही. आत्ता कुठे इन्वेस्टमेंट केलो होतो. सगळे दुत्त दुत्त आहेत.
  • Log in or register to post comments

लय उशीर केलोत तुम्ही

खटपट्या
गुरुवार, 07/21/2016 - 02:14 नवीन
लय उशीर केलोत तुम्ही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निंजा टर्टल

.

बोका-ए-आझम
गुरुवार, 07/21/2016 - 07:19 नवीन
संपादित. कृपया व्यक्तिगत टीकाटिप्पणी टाळावी.
  • Log in or register to post comments

तस्मात

इरसाल
गुरुवार, 07/21/2016 - 12:24 नवीन
मिपावर फुकटात लिहाय्ला मिळणारी मंडळी १००% आहेत त्यात ७०% उजवी असुन ३०% डावी आहेत. आणी हे ७०% मधले १००% लोक हे झुंडशाहीने वागतात , कंपु बनवुन ३०% मधल्या २% लोकांना त्रास देतात. ह्यावरुन एक सिद्ध होते की ७०% मधले १००% जे असे वागतात त्यातले ४८% हे दुष्ट, २२% हे अतिदुष्ट, आणी ७% हे अतिअतिदुष्टदुष्ट आहेत.उरलेले तर हाता बाहेर गेलेले केस आहेत. प्रत्येकाने आपापले इव्ह्यलुएशन करुन आपण कोणत्या % मधे येतो हे पडताळुन पहावे. बाकीच्यांनी शेती, नोकरी, व्यवसाय करावा.
  • Log in or register to post comments

कट्टेकर्‍यांचे % न दिल्याबद्दल

मुक्त विहारि
गुरुवार, 07/21/2016 - 13:04 नवीन
आणि आपणहून पत्ता देणार्‍या किंवा कधीही या, स्वागतच आहे, असे सांगणार्‍या मिपाकरांचे % न दिल्याबद्दल, इरसाल ह्यांचा णिषेढ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल

आयमाय स्वारी बरकां

इरसाल
गुरुवार, 07/21/2016 - 13:18 नवीन
पत्ते देणार्‍यांचा डाटा जमा करायचं काम डाव्यांमधल्या १.५% जणांना दिलेले आहे, विदा मिळताच ते % दिले जाईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

कुणीतरी काम करतंय ना....मग झाले तर....

मुक्त विहारि
गुरुवार, 07/21/2016 - 14:03 नवीन
आता एखादी ट्रिप बडोद्याला काढावीच लागणार. बादवे, बडोद्याच्या आसपास बघण्यासारखे काय आहे? सयाजीरावांचा महाल तर बघायचा आहेच. अज्जुन काही महत्वाची ठिकाणे असतील तर फार उत्तम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल

माधव आचवलांनी साकारलेले EME

मोदक
गुरुवार, 07/21/2016 - 15:11 नवीन
माधव आचवलांनी साकारलेले EME टेंपल, श्रीराम टमटमवाला (टमटम हा भेळे सारखा एक प्रकार असतो) बाकी खादाडी इरसालबुवा सांगतीलच. सयाजीरावांचा महाल बघण्यास बहुदा परवानगी नाहीये. (लक्ष्मी विलास पॅलेस हाच सयाजीरावांचा महाल आहे का?) जमले तर आणंदला जावून या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

हे दोघे

इरसाल
गुरुवार, 07/21/2016 - 15:19 नवीन
उगाच चांगल्या धाग्यात मोडता घालत आहेत हे माझे आता सपष्ट मत झालेले हाये. ईथे लोकांना शेतीकरुन खायची पडलीय नी तुम्हाला खादाडी सुचतेय होय......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
  • «
  • ‹
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा