मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चो..पली

विनायक प्रभू · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
चो... अरे पली बोलतोय " बोल रे" अरे तुला घरी भेटायचे आहे "काही खास" माझ्या पुतणीला तुला भेटायचे आहे. तीच्या मुलाला दहावीत ९२ % मार्क मिळाले आहेत. "व्वा व्वा, अभिनंदन" तु नसतास हे शक्यच नव्हते. ७२ वरुन डायरेक्ट ९२. तुझे पेपर्स आणि मार्गदर्शन एकदम बुल्स आय. पर्सनली भेटुन पेढे द्यायचे आहेत.कधी भेटशील. "येत्या रविवारी ७ वाजता स॑काळी" चालेल, तु काय बाबा बिझी माणुस. तो पर्यंत एक सल्ला हवा होता. आय आय टी ला चांगला क्लास कुठला रे? "हे राम" (मनातल्या मनात) नाही पुतणी दोन क्लासेस ला जाउन आली. अ चे इन्फ्रा सॉलिड आहे ब पण वाईट नाही. "मेलो मेलो"(म.... म...) रिझल्ट दोन्ही कडे आहे. तुझे मत महत्वाचे. "फी काय सांगताहेत"? ४ प्लस कॉलेजचे वोकेशनल चे १ जवळ जवळ ५ "पुतणी ला परवडेल?" आता स्कॉलर मुलगा म्हटले तर काही तरी जुगाड करायला लागेल. मुलगा पवई कॉम्प म्हणतोय. १ कोटी नको पण २५ ची प्लेसमेंट कुठे गेली नाही. "मंत्राग्नी"(म्... म..) १ लाखाची स्कॉलरशिप पण दिली आहे अ ने. परिक्षा घेतली आणि मार्कांवरुन कन्शेशन. "मुकी बिचारी कुणी हाका" (म... म..) ब मधे तुझे नाव घेतल्यावर तिथला काउंसेलर जरा कावरा बावरा झाला आणि नमस्कार सांगा सरांना म्हणाला, फी ची अडचण असेल तर करेन म्हणाला, तु जरा फोन करशील का? "मग त्या अ च्या इन्फ्रा चे काय" तुझी अ मधे ओळख आहे का बघ जरा ५० कमी झाले तर बजेट मधे येइल. "आय आय टी झेपेल का याचा विचार केला आहे का"? न झेपायला काय झाले, आय. सी. एस. सी. च्या ९२ ला नाही झेपणार तर कुणाला झेपणार? "आयशीएसशी, सीबीएस्शी घाल चुलीत" झाली का तुझी मस्करी चालु " हे बघ पली तुम्ही निर्णय घेतला असेल तर गो अहेड उगाच माझ्या शिक्कामोर्तबीची नौटंकी कशाला? राहता राहीले अ आणि ब मधे निवड? टॉस कर. कारण दोन गाढवामधे चांगले कुठले ह्या प्रश्नाचे माझ्याकडे उत्तर नाही. हां माहीतीच हवे असेल तर पुर्ण मोकळ्या मनाने दोन तास काढुन या. सुरुवातीला जरा जड जाईल पण नंतर सर्व लक्षात येईल. तु फक्स्त साक्षिदार... आपली अक्कल मधे बोलुन उधळायची नाही." क्रमशः

वाचन 10128 प्रतिक्रिया 50