प्रतिक्रिया
स्वतःचे अप्रकाशित टुकार लेखन प्रकाशित करण्यासाठी प्रत्येकाचे लेखण टुकार असते हे तुम्ही कसे म्हनु शकता आपण यू.एस. ऑफ ए ला जाऊन आलो ते सांगण्यासाठी आता तो / ती तिकडे कमवते आहे त्याला तुम्ही काहि करु शकता ते लोक पोट भरण्यासाठी गेलेत मजा करायला नाही इतरांच्या लेखनाला जळजळीत प्रतिसाद देऊन वातावरण गढूळ करण्याकरता काही अंशी सहमत आहे कंपूबाजीसाठी पटत नाहि हे मनाला बुद्धीला सुद्धा स्वत: बहिर्जी नाईंकाचा अवतार असल्याचा साक्षात्कार झाल्यामुळे शत्रूच्या स्थळावर हेरगिरी करण्याकरता पटल मला हे शत्रूस्थळावर आंतरजालावरील प्रसिद्ध व्यक्तिंच्या नावे फेक आयडीज घेऊन शिवीगाळ करण्याकरता ईथे अस कोणी करत नाहि हे लक्षात घ्या फेक आयडी काढून आपणच आपल्या टुकार लेखनावर दाद देणारे प्रतिसाद टाकायला गैरसमज आहे तुमचाडिसक्लेमर २ मनावर घेतला की काय राव? तुम्हीच नवीन संस्थळ काढणार आहात असं दिसतंय ;) . लोड काहून घेऊन राहिले भौ?
युद्धात, प्रेमात आणि विनोदात सर्वकाही माफ असते असे म्हणतात :)
भांडणे (स्पर्धा) आणि विकास हे जनरिक आहे असे वाटते. फक्त संकेतस्थळ निर्मितीतच नव्हे तर इतरही (मोबाईल फोनच्या कंपन्या, मॉल्स, ईलेक्ट्रॉनिक वस्तू इ. इ.) व्यवसायांमध्ये भांडणे-स्पर्धा-विकास हे लागू होईल.
बंडखोरी सर्वत्र आहे.... (अगदी संपादक मंडळात सुद्धा... ;) )
-झेल्या
मी लिहिलेलं.. (वाचा आणि कळवा आणि इतरांना वाचवा (वाचायला सांगा..)! )
हे तर मिपाघराण्याचे अस्सल वारसदार संपादकीय आहे.
तात्यांना सांगितले असते तर येत्या सोमवारी टिळक महाराजांच्या रांकेत जाऊन बसला असतात.
असो. संपादकीय आवडले.
कोणीतरी (नक्की माहित नसले की असे म्हणायचे असते) म्हटलेलेच आहे - युद्धच नव्या संस्कृतींना जन्म देते. ;)
संपादकीय आवडलं, अंमळ मौज आली वाचताना आणि विसुनानांचा प्रतिसादही!
अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.
असेच म्हणतो.
शुद्धलेखन - शाप की वरदान (हस्त*थुन - शाप की वरदान स्टाईल) इ.मराठी संकेतस्थळांमधील हा नेहमीच्या चर्चेला शक्तिमान यांनी देऊ केलेली अजरामर उपमा होय.
मराठी संकेतस्थळांमधील हा नेहमीच्या चर्चेला शक्तिमान यांनी देऊ केलेली अजरामर उपमा होय.
धनंजय लय फार्मात
--अवलिया
अवलियाची अनुदिनी
'बंडखोरी' नावाचे नवे संकेतस्थळ चालू करूया का?
....फक्त बंडखोरांसाठी... :)
-झेल्या
मी लिहिलेलं.. (वाचा आणि कळवा आणि इतरांना वाचवा (वाचायला सांगा..)! )
मराठी आंतरजालावर "स्वाभिमानी व बाणेदार" लोकांची कमी नाही आहे त्यामुळे मराठी आंतरजाल आणि त्याचा विकास दिन दुगना रात चौगुना होणारच.नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार पोटदुखी.कॉम [अपचन, जळजळ इ ], गैरसमज.कॉम, दु:खभावना.कॉम लवकरच येणार आहे.
लेख चांगला आहे आशिष.
अजुन लिहीत रहा.
पुलेशु.
:-)
पुलेशु !
हेच म्हणतो !
बाकी तुमचा इतिहास चांगलाच पक्का आहे ;)
आपण यू.एस. ऑफ ए ला जाऊन आलो ते सांगण्यासाठी
हे फारच पटले
बंडखोर संपादकीय आवडेच !!
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
या वेळचे बंडखोर मिपा संपादकीय हे एका गहन परंतु दुर्लक्षित विषयाला समर्पित आहे.
आभारी आहे! नेहमीप्रमाणे येत्या सोमवारी प्रसिद्ध होणारे संपादकीय तीन दिवस आधीच प्रसिद्ध झाले असे वाचकांनी समजावे ही विनंती! :)
गेले काही दिवस मिपावर सायलेंट-मोडमध्ये वावरताना
सायलेन्ट मोडमध्ये असतांनादेखील आपला अभ्यास कौतुकास्पदच आहे! :)
"मराठी आंतरजालचा विकास भांडणांमधूनच झाला आहे" - असे आमचे प्रामाणिक आणि क्रांतिकारक विधान आहे.
सहमत आहे! :)
परंतु, मराठी आंतरजालच्या भरभराटीसाठी अत्यावश्यक कच्चा माल म्हणजे दुखावले गेलेले लोक होत.
हा हा हा! खरं आहे! :)
शक्तिमानराव,
आपण खरोखरच शक्तिमान आहात! संपूर्ण लेखच जबरा झाला आहे! आम्ही याला लेख ऑफ द इयर अशी दाद देतो..!
आपला,
(एक नंबरचा कंपूबाज असलेला एका मराठी संस्थळाचा मालक) तात्या.
कसचं कसचं!
लेख ऑफ द ईयर, संपादकीय वगैरे गोष्टींसाठी आम्ही अजून लहान आहोत तात्या!
आपल्या या दादेबद्दल आभार!
लेख छान आहे .
पण जौ द्या.
आपण मिसळ खाऊ .
जै हो.
लेख छान आहे
बाकी तुमचा इतिहास चांगलाच पक्का आहे हे नक्की
पु ले शु
--अवलिया
अवलियाची अनुदिनी
लेख छान आहे :)
तुम्ही अनेकांना टपल्या मारल्याने तुम्ही आपोआपच नि:पक्षपाती आणि प्रतिभावान ठरलात किंवा तसे सिद्ध केलेत. (तपासा निरनिराळ्या संस्थळांचा इतिहास. तसेच जाताजाता पुणेकरांना टपली मारल्यामुळे तुमचा बाणेदारपणा सुद्धा सिद्ध झाला. (ह.घ्या्ए सां न लगे ) :)
कंसात वाक्ये टाकून पुढे वाचण्यास उद्युक्त करण्याची शैली मस्त :)
-- लिखाळ.
आणि उत्कृष्ट लेखन असणारे ब्लॉग्स् सापडणे महाकठीण! काही चांगले ब्लॉगही आहेत....हा .. म्हणजे तुम्ही माझा ब्लॉग वाचलात तर ! :) -- लिखाळ. खरेतर मला दर्जेदार लेखक बनायचे होते. पण अवांतर आणि फुटकळ प्रतिसादच देत बसलो.
एकमेकांच्या सह्या चोराव्यात की नाही, अमुकअमुक ठिकाणी पुण्याचा उल्लेख का केला आहे
हे वाक्य अमुक्-अमुक शहर म्हणून करता आला असता...(ह्.घ्या.)
लेख बाकी उत्तम...
सुहास..
अवा॑तर:एखादा शब्द "पुण्याविषयी"लिहीला की लेख प्रसिध्द होतो का (ह.घ्या)
बंडखोर अग्रलेख चांगला आहे. मात्र बंडखोर व्यक्ती फेक आयडीज ने असे कसे लिहीते त्यामुळे बंड हे बंड वाटत नाही. असो.
सर्वप्रथम एक डिसक्लेमर हवा ;)
ह्या संपादकीयाचा आणि येथील "विकास" या नावाच्या सदस्याचा काही संबंध नाही. असलाच तर तो योगायोग समजावा (प्रतिसाद देणारा हा "विकास" त्याला एक भोग समजेल) :-)
असे लिहायचे कारण खालील शिर्षक आणि वाक्यात दडले आहे -
बंडखोर मिपा संपादकीय - मराठी आंतरजाल आणि त्याचा विकास (ऊहापोह) मराठी आंतरजालचा विकास भांडणांमधूनच झाला आहे. तर या अशा बाणेदार, स्वाभिमानी लोकांमुळे मराठी आंतरजालाची भरभराट होत आहे. म्हणूनच बाणेदार लोकांनी पुढे यायला पाहिजे, यातच मराठी आंतरजालाचा विकास आहे.तसेच अजून एक आक्षेपार्ह विधान आढळले: इच्छुकांनी पुण्यातील 'बाणेदार मी होणार' या अभ्यासवर्गात दाखल व्हावे. या विधानाचा गर्भितार्थ असा होतो की पुणेकरांना बाणेदार होण्यासाठी अभ्यासवर्गात जावे लागते. अशी वाक्ये कारण नसताना अस्मिता दुखवून अजून एखाद्या संकेतस्थळाला जन्म देऊ शकतात. म्हणजे परत तेथे जा, आयडी घ्या, लिहा, वाद घाला, विकास (मी नाही) करा आणि परत नवीन संकेतस्थळ तयार करा... आता आपले डिसक्लेमर ० आणि १ वाचले तर काय समजते? डि. ० :- हा लेख विनोदी आहे असे समजून वाचावा. डि. १ :- येथे सत्य परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला आहे. थोडक्यात आपल्या लेखी "सत्य हा एक विनोद" आहे असा होवू शकतो. आपल्याला माहीत असेलच की, रामदासांनी म्हणलेच आहे की "टवाळा आवडे विनोद". म्हणजे एकत्रीत अर्थ असा होतो की "सत्य हे टवाळांचे" असते. आता विचार करा, येथील गांधीवादी, हे संकेतस्थळ इतर नव्याने विकसीत झालेल्या संकेतस्थळाप्रमाणे मजेशीर अथवा विरंगुळा म्हणून घेत नाहीत हे आपल्याला येथील चर्चा/लेख वाचून माहीत असेलच. त्यामुळे, अशा डिसक्लेमरच्या विधानांनी गांधीवादींना नकळत दुखवले जाऊ शकते. असो.
लेख आवडला. या बाबतीत "द्वंद्वात्मक भौतिकवादाचे " ( शुद्ध मराठीत "डायालेक्टीक मटेरिलिझम") च्या नियमांची आठवण होणे अपरिहार्य आहे.
प्रस्तुत लेखातले प्रमुख वाक्य आहे : "मराठी आंतरजालचा विकास भांडणांमधूनच झाला आहे" , जे "द्वंद्वात्मक भौतिकवादाच्या" सूत्राचेच एक उदाहरण आहे असे मला वाटले. काय आहे हे सूत्र ? ते सूत्र असे आहे की, कुठल्याही गोष्टीबद्दल वाद आणि प्रतिवाद यांच्या , अनेक काल चाललेल्या लढाईतूनच नवीन गोष्ट अस्तित्वात येते. थोडक्यात , सामूहिक इतिहासात कुठल्याही नवीन बदलाचे स्पष्टीकरण या एका सूत्राने करता येते (असे हे शास्त्र म्हणते). कुठल्याही जड गोष्टीला लागू होतील असे हे नियम समूहाला , समूहाच्या वर्तनाला लागू केले की त्या त्या समूहाचा इतिहास आपल्याला समजावून घेता येतो.
तर मग काय आहेत या "द्वंद्वात्मक भौतिकवादाचे " नियम ?
१. "परस्पर विरोधाचे तत्त्व" : कुठल्याही गोष्टीचे अस्तित्त्व हे परस्परविरोधी घटकांच्या मीलनाचा परिणाम असतो. भौतिक जगतात याची उदाहरणे द्यायची तर पॉझिटिव्ह्-नेगेटीव्ह वगैरे वगैरे अनेकानेक देता येतील. हा नियम समूहाला लागू केला की , परस्परविरोधी मतांचे गट असे त्याचे रूप दिसते. या विरोधामुळेच समूहात खळबळ , हालचाल निर्माण होते.
२. "स्वतःची घट करण्याचे तत्त्व " : याचा अर्थ असा की , एखाद्या समूहातला एखादा घटक विरोधी गोष्टीचा समजला जातो. या विरोधामुळेच समूहात खळबळ , हालचाल निर्माण होते. तर या सगळ्या खळबळीचा परिणाम तो घटक कमजोर होण्यात होतो. म्हणजे असे की , जर एखादा घटक विरोध करत असेल , त्या विरोधाने जर समूहात खूप खळबळ माजत असेल , तर त्याचा एक परिणाम म्हणजे , खळबळ माजवणाअर्या गटाचे खच्चीकरण होणे असाही होतो. थोडक्यात , जोषात तरवारी फिरवताना , ती तलवार अपरिहार्यपणे स्वतःला जखमी करतेच.
३. "निर्णायक बदलाचे तत्त्व " : आणि अशा , शक्तीने , संख्येने छोटेछोट्या असणार्या अनेक खळबळी , हालचाली यांचे रूपांतर एका निर्णायक क्षणी एका निर्णायक बदलामधे होते. (quantitative developments lead to qualitative change)
वर उल्लेख केलेल्या सूत्रांचा उपयोग अर्थातच मार्क्सिस्ट विचारसरणीत झालेला आहे. (किंबहुना , त्याचा उगम तिथलाच. ) पण , उत्क्रांतीवाद , इतकेच काय तर शेअर बाजारातील भावभावना (मार्केट सेंटीमेंट) समजावून घेताना सुद्धा काही अभासकानि याचा उपयोग केला आहे.
हीच सूत्रे आपल्या मराठी आंतरजालाला (कळत नकळत ) लावून हा लेख बनला असे एका अर्थाने म्हणता येईल.
हे सगळे मराठित लिहाल का?
--अवलिया
अवलियाची अनुदिनी
हे सगळे मराठित लिहाल का?
हाहा =))
या विधानाचा गर्भितार्थ असा होतो की पुणेकरांना बाणेदार होण्यासाठी अभ्यासवर्गात जावे लागते. अशी वाक्ये कारण नसताना अस्मिता दुखवून अजून एखाद्या संकेतस्थळाला जन्म देऊ शकतात.
हे मात्र खर ...जे ते पुण्याच्या मागे का ...ईतका छान लेख पण.....
इच्छुकांनी पुण्यातील 'बाणेदार मी होणार' या अभ्यासवर्गात दाखल व्हावे.
अशी वाक्ये का ???
मराठी आंतरजालाचे इतिहासकार म्हणावे लागेल तुम्हाला.
लेख अंमळ गमतीदार झाला आहे.
(आवांतर : बाय द वे, शक्तिमान खेरीज तुमचे आणखी किती फेक आयडीज आहेत हो?) ह. घ्या. :)
- (प्राजु आणि बिनडोक बनी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
(प्राजु आणि बिनडोक बनी)प्राजु:O हे नविनच आहे!! विकेड बनी पण तुम्हीच काय मग?
अनिरुद्ध अभ्यंकर आणि केशवसुमार
आनंदयात्री आणि केशवटुकार
हेआयडीद्वयसुद्धा (प्रत्येकी ) एकाच व्यक्तिंचे आय्डीज आहेत. (सामान्य ज्ञान.)
कळावे
(मुक्तसुनीत आणि मुक्तसुनीत हे आयडीज असणारा.)
जसेकी 'विसोबा खेचर' आणि 'आणिबाणीचा शासनकर्ता' आणि 'सरपंच 'आणि ..... जे सगळे एकाच व्यक्तिचे आयडीज आहेत.
पण बनी म्हणजे प्राजुताई हे माहित नव्हते.
सामन्य ज्ञान कच्चे म्हणा झालं!
बापरे... रोज काहीतरी नवीनच माहिती कळते
--अवलिया
अवलियाची अनुदिनी
मी बिनडोक असू शकते पण विकेड नाही हो..
आणि बिनडोक बनीच्या ख व मध्ये प्राजु च्या पानाची लिंक आहे. इतकं साधं सोप्पं आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
श्री. शक्तिमान ह्यांचा मराठी आंतरजालाचा अभ्यास, व्यासंग, आणि योग्य निष्कर्षाला येण्याचा गुण बघता, आता अस्मादिकांना निवृत्ती घेण्यास काहीही प्रत्यवाय नसावा.
उत्कृष्ट संपादकीय.
-- सर्किट
सर्केश्वर ... खरे तर हा लेख वाचल्यावर आम्हाला वेगळाच संशय आला होता.
आपला प्रतिसाद पाहुन तो संशय फिटला. असो
--अवलिया
अवलियाची अनुदिनी
छ्या ! अहो, आम्ही कसले शक्तिमान ?
("शक्तिपाताची विविध कारणे" अस विप्रंचा आगामी अग्रलेख वाचा.)
-- सर्किट
छे छे -- मी समजलो होतो तुम्ही आधीच निवृत्त झालात...
पण तुम्ही आताशी निवृत्तीची (फक्त) भाषा सुरु केली हे वाचुन बरे वाटले.
बाकी तुम्ही शक्तिमान नाहीत ह्या खुलाशाची तशी आवश्यकता (निदान आम्हाला) नव्हती ...
--अवलिया
अवलियाची अनुदिनी
आवडला.
(ऐतिहासिक)बेसनलाडू
आवड्ला पण काहि तरी खटक्तय