✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

तुकयाची अवली.. .. अवलोकन

प
प्राजु यांनी
Tue, 01/22/2008 - 03:29  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
8445 वाचन

💬 प्रतिसाद (12)

प्रतिक्रिया

काळतोंड्या!

विसोबा खेचर
Tue, 01/22/2008 - 06:40 नवीन
प्राजू, 'आपण तुकारामांना सिद्धावस्थेपर्यंत नेण्यासाठी आवलीपासून दूर करतो आहोत, त्यामुळे आपल्याला शिव्या देण्याचा तिला आधिकार आहे' हे मान्य करणारा विठ्ठल मला या कादंबरीत भावला. क्या बात है! प्राजू, उत्तम परिक्षण केलं आहेस. छान, वेगळा विषय आहे. पुस्तक वाचलं पाहिजे! अवांतर - तुकोबा म्हटलं की प्रभातच्या 'संत तुकाराम' चित्रपटातील विष्णूपंत पागनीस आणि आवली म्हटलं की त्याच चित्रपटातील गौरी नांवाच्या अभिनेत्रीचा चेहेराच डोळ्यासमोर येतो, इतका मराठी रसिकांवर या चित्रपटाचा प्रभाव आहे! इतकेच काय, संत तुकारामाचे पूर्ण नांव काय होते या प्रश्नाचे उत्तर वर्गात एका मुलाने 'विष्णूपंत पागनीस' असे दिले होते अशी भाईकाकांनी एक आठवण सांगितली आहे! :) प्राजू, वरील परिक्षण वाचताना संत तुकाराम चित्रपटातील अभिनेत्री गौरी हीच आवली म्हणून माझ्या डोळ्यासमोर येत होती! विठोबाला काळतोंड्या म्हणणारी आणि कुण्या आई मंगळाईचे भक्तिभावाने नामस्मरण करणारी, साधीभोळी परंतु अत्यंत फटकळ, आणि नवर्‍याची सततची विठ्ठलभक्ति पाहून संतापणारी बायको, अशी आवलीची अत्यंत ठसठशीत भूमिका गौरीने उत्तम रितीने वठवली आहे हे इथे आवर्जून सांगावेसे वाटते! तात्या.
  • Log in or register to post comments

खरच छान लिहिलं आहेस प्राजु.

चतुरंग
Tue, 01/22/2008 - 09:26 नवीन
माझ्या पुढल्या भेटीत हे पुस्तक निदान चाळले तरी नक्कीच जाणार. आवलीचा विचारही कधी आपल्यामनात येत नाही, तुकारामांच्या समोर. पण हे खरं आहे की तिनं किती हाल सोसले असतील, काही गणतीच नाही. महापुरुषाची पत्नी म्हणजे काट्यांचं जिण! चतुरंग
  • Log in or register to post comments

आवली..

स्वाती दिनेश
Tue, 01/22/2008 - 12:29 नवीन
प्राजु, परीक्षण छानच लिहिले आहेस,पुस्तक मिळून वाचण्यासाठी मात्र पुढच्या भारतभेटीपर्यंत थांबावे लागणार... स्वाती
  • Log in or register to post comments

धन्यवाद..

प्राजु
Tue, 01/22/2008 - 19:55 नवीन
तात्या, चतुरंग, स्वाती, आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. मी तर सदर कादंबरी भारतातून मागवून घेतली. तुम्हाला तुमच्या भारत भेटीत ही कादंबरी वाचायला मिळो. कारण घरोघरी 'आवली' ही असतेच .. कधी तिचं भांडण नातेवाईकांशी असतं, कधी करिअरशी, कधी या समाजाशी... पण या ना त्या रूपांत आपल्याला आवली भेटतेच संसारासाठी झटणारी, मुलांसाठी तळमळणारी, नव-यासाठी झुरणारी... आणि म्हणूनच काल्पनिक असली तरी मला ही कादंबरी खूप भावली. - प्राजु.
  • Log in or register to post comments

मस्त

स्वाती राजेश
Wed, 01/23/2008 - 16:41 नवीन
प्राजु, तुझे या पुस्तकाचे परेक्षण फारच छान आहे. पुस्तक वाचायची उत्सुकता लागली आहे. जेव्हा भारतवारी होईल तेव्हा जरूर वाचेन. तुकारामांची आवडाबाई आम्ही फक्त "संत तुकाराम" सिनेमात पाहिली. ती कजाग, भांडखोर दाखवली आहे, पण त्याबरोबर आपल्या मुलांविषयी वाटणारे प्रेम.. ते उसाच्या प्रसंगातुन जाणवते.तुकाराम जेव्हा आपल्या मुलांसाठी ऊस आणतात, येताना ये वाटत वाटत येतात.. घरी येईपर्यंत एकच उरतो तेव्हा तिची ती वाक्ये लक्षात राहतात...
  • Log in or register to post comments

नमस्कार

विनायक पाचलग
Mon, 12/08/2008 - 11:14 नवीन
तर आज १ वर्शाने या ठिकाणी एक नवी प्रतिक्रिया येत आहे . मी ११ वीत शिकतो.गेल्याच महिन्यात महाविद्यालयात ग्रन्थ्परिक्शण स्पर्धा झाली. मलाही हेच् पुस्तक मिळाले होते परिक्शणाला. खुप छान आहे. सदरचे परिक्शण छानच आहे यात वाद नाही. मात्र असे राहुन राहुन वाटते की हे परिक्शण नसुन ओळाख आहे. पुस्तकातिल भावनिक आन्दोलने,समाज,टाळलेल्या अन्ध्श्रध्दा इत्यादी अजुन लिहावयास हवे होते. असुदे पुस्तक मात्र चान्गले आहे . सम्पादकान्ची परवानगी अस्ल्यास मी माझे परिक्शण येथे देवु इच्छितो
  • Log in or register to post comments

अवो दादा

विसुनाना
Mon, 12/08/2008 - 16:08 नवीन
पुस्तकाचं परीक्षान ल्ह्यायला परवाणगी कसली मागतायसा? बिन्धास्त येऊन द्या की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक पाचलग

अहो देतोच

विनायक पाचलग
Mon, 12/08/2008 - 21:52 नवीन
अओ देतोय दोन लेख विशय एक चालते का नाही माहित नाही म्हणुन विचारले दीन १ २ दिवसात
  • Log in or register to post comments

अहो देतोच

विनायक पाचलग
Mon, 12/08/2008 - 21:52 नवीन
अओ देतोय दोन लेख विशय एक चालते का नाही माहित नाही म्हणुन विचारले दीन १ २ दिवसात
  • Log in or register to post comments

असे

शंकरराव
Tue, 12/09/2008 - 03:04 नवीन
असे वाट्ते देवा घरचे ज्ञात कुणाला विचित्र नेमानेम कुणी रखडति धुळीत आणिक कुणास लाभे हेम ...
  • Log in or register to post comments

अर्थपूर्ण अवलोकन.

रेवती
Tue, 12/09/2008 - 04:35 नवीन
तू म्हणतेस ते खरे आहे. प्रत्येक घरात एक आवली असते. आजकाल तुकाराम मात्र फारसं कुणी नसेल (सगळ्या अर्थी "तुकाराम") असं वाटतय. रेवती
  • Log in or register to post comments

सुंदर ओळख!

राघव
Tue, 12/09/2008 - 09:49 नवीन
सुंदर ओळख! आवडली. आता वाचावे लागणार :) मलाही अवलीबद्दल अपार करुणा वाटते, पण वेगळ्या कारणासाठी.. तिलाही जर डोळसपणे विठ्ठलाची आराधना करता आली असती तर किती छान झाले असते!! तुकारामांसारख्या श्रेष्ठ साधकाची सोबत असतांना तर फक्त आनंद नांदला असता.. पण, मुलांची काळजी आईला कधीच सोडत नाही, भगवंतही आपल्या लेकरांची काळजी घेतोच की!!. त्यासाठी एवढ्या खस्ता खाऊन तिला संसारातच राहावे लागले. तिच्याशिवाय तुकारामांचे चरित्र अपूर्ण राहते ते याचमुळे. ती नसती तर?? यातच ती असण्याचे महत्त्व आहे. मुमुक्षु
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा