अॅपल चा दहशतवाद
अॅपल ही अमेरिकन कंपनी गेल्या दोन दशकापासून दूरसंचार अन मनोरंजनपर तंत्रज्ञाना मध्ये जगात अव्वल स्थानावर आहे . पण त्याबरोबरच अनेक वेळा टीकेची देखील धनी होण्याची वेळ अॅपल वर येते . उत्तम तंत्रज्ञानाचा मोबदला म्हणून भरमसाठ पैसे आकारण्याचा किंवा मार्केट मोनोपोली , अनफेयर ट्रेड practises चे आरोप अगदी क्षुल्लक ठरावेत असा महाप्रचंड धोकादायक खेळ अॅपल खेळू पाहते आहे.
San Bernadino च्या दहशतवादी कृत्यातील आरोपी सईद रिझवान फारूख या दहशतवाद्याचा आयफोन unlock करून त्यातील माहिती एफबीआय ला द्यावी व त्यासाठी अॅपल ने सहकार्य करावे असा आदेश अमेरिकन कोर्टाने दिला . परंतु प्रायवसी चा मुद्दा उपस्थित करून अॅपल तसे सहकार्य करण्यास व फोन unlock करण्यास नकार देत आहे . आम्ही यावेळी फोन unlock करुन दिला तर तशी "अनुचित"प्रथा पडेल आणि ग्राहकांचा जो विश्वास आमच्यावर आहे ,त्याला धक्का बसेल आणि साहजिकच त्याचा परिणाम अॅपल चा मार्केट शेअर कमी होण्यात होईल असा युक्तिवाद अॅपल तर्फे केला जात आहे .
याचा अर्थ काय?
भले तुमचा फायदा कमी होईल किंवा मार्केट शेअर कमी होईल, पण म्हणून एका दहशतवाद्याची महत्त्वाची माहिती तुम्ही तपास यंत्रणांपासून लपवून ठेवणार ? देशहित अथवा मानवतेचे हित याला काहीच महत्त्व नाही? उद्या जगातील यच्चयावत दहशतवादी संघटना अन त्यांचे छुपे समर्थक "प्रायव्हसी सुरक्षित "राहते म्हणून आयफोन वापरू लागले (न जाणो, वापरत देखील असतील !) तरीही अॅपल वाले policy चा भाग म्हणून तपास यंत्रणांना मदत करणार नाहीत? हे भयानक आहे
यापेक्षा दूसरा धोका जो मला जाणवला तो असा की परवाच "हिजाब बार्बी " चे टुमणे वाजवण्यात आले , तो प्रकार म्हणजे सरळसरळ मुस्लिमांचे लांगूलचालन आहे. जगात मुस्लिमांची संख्या दुसर्या क्रमांकाची असल्याने ते "मार्केट" डोळ्यासमोर ठेवून मोठमोठ्या कंपन्या "मुस्लिम-टार्गेटेड" प्रोडक्टस आणू लागल्या आहेत .... ट्वीटर ,फेसबुक ही यात मागे नाही . आयसीस सारख्या विघातक संघटना कोणत्या धर्माच्या आहेत हे जगजाहीर असताना देखील आणि सईद रिझवान फारूख आणि त्याच्या पाकिस्तानी पत्नीच्या दहशतवादी पार्श्वभूमी समोर येवून देखील San Bernadino च्या शूटिंग ला दहशतवादी कृती म्हणण्यास अथवा त्याला मुस्लिम अतिरेकी ठरविण्यास अगदी ओबामा देखील विरोध करत होते ... हे विषण्ण करणारे आहे ....
याविषयी पूर्वीदेखील चर्चा झाली आहे , पण आजादेखील आयसीस अथवा अतीरेक्यांचा निषेध करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मुस्लिम बुद्धिजीवी वर्ग पुढे येत नाहीये . जगात मुस्लिमांची संख्या दुसर्या क्रमांकाची असल्याने त्या "मार्केट" ला दुखवू नये म्हणून अॅपल किवा इतर कंपन्या कोणत्याही पातळीला उतरू शकतात . जागतिक इस्लामी दहशतवाद अन तृतीय विश्व युद्ध यांचे संदर्भात विचार करताना हा अॅंगल खूप महत्त्वाचा आहे असे मला वाटते ....
आपले काय मत ?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
(No subject)
माझे जे मत आहे, त्याला किंमत
एस यांच्याशी सहमत .
अॅपलचं उत्तर बरोबर आहे
राष्ट्रीय हित
आरोपी जन्नत मध्ये हुरांशी
खूप छान लेख !!
ब्लॅकबेरी
धागा द्याल का?
धागा नाही
राष्ट्रीय हित सर्वोपरी आहे .
हे भगवान!
हा हा हा जबरदस्त ,आता इथले
राष्ट्रिय सुरक्षेचा सवाल
भारताच्या सरकारला या
गल्लत होतेय. फोनमधला डेटा
अॅपलच्या सीईओ ला एक दिवस
(No subject)
ब्लॅकबेरी
BlackBerry says it is willing
अमेरिकन सरकार हे जर विदेशी
गंदा है पर धंदा है ये.
+१
विषय थोडा किचकट आहे. देशाच्या
apple चे म्हणणे बरोबर आहे
गुनेह्गारांचे गुन्हे अन्वेषण
http://economictimes
नाही. हे अगदी बाळबोध विश्लेषण
तर... बात अशी हाये की-
फोर्थ अमेंडमेंट