Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by संदीप डांगे on Fri, 01/29/2016 - 21:44
परवाचा वाद परत उकरुन काढतो. कारण माझे नेमके काय चुकले हे कोणीच सांगितले नाही अजून. वेश्यालयातल्या स्त्रीयांच्या शारिरिक संदर्भासाठी सनी लियोनचे उदाहरण दिले तेव्हा पब्लिक चिडली. म्हणे हा सनी लियोनचा अपमान आहे. म्हणजे 'वेश्या असणे, ते काम करणे' हे अपमानास्पद आहे असे त्यांचे म्हणणे आहे का? भले त्या वेश्या मजबूरीने, अजून कशानेही बळजबरीने झाल्या असल्या, आपले प्रपंच चालवत असल्या, आपल्या मुलींचे-मुलांचे शिक्षण करत असल्या, थोडक्यात आलिया भोगासी म्हणून सादर होत असल्या तरी त्यांची तुलना एका पॉर्नस्टारशी करणे हे त्या पॉर्नस्टारसाठी अपमानास्पद आहे. जी पॉर्नस्टार स्वतःच्या बुद्धीने, मर्जीने, घसघशीत पैसा घेऊन सर्वसामान्यांसाठी निषिद्ध अशा क्षेत्रात काम करते. मारवा म्हणाले. "सनी लियोनी ही कलाकार आहे पॉर्न चित्रपटात काम करते म्हणजे.....असेलच, असा विचार करत असाल तर ठीकच आहे " म्हणजे पॉर्नस्टार असणं हे उच्चभ्रू आणि वेश्या असणं हे नीच कृत्य असे काही आहे काय? पैसाताईंनी म्हटलंय की "ती लग्न झालेली मुले बाळे असलेली बाई आहे. तिच्याबद्दल असे बोलणे योग्य वाटले नाही. किंबहुना कोणाचाही उल्लेख अशा चर्चेत असा यावा हेच दुर्दैवी वाटले." 'असे बोलणे' म्हणजे नेमकं काय? वेश्यांना मुलंबाळं नसतात काय? वेश्याव्यवसाय करणारे समाजविघातक वैगरे काम करतात आणि पॉर्नस्टार हे समाजहितकारक काम करतात असे काही म्हणायचे आहे काय? मृत्यूंजय यांच्यामते, "एकुणात आक्षेप विधानाच्या सत्यतेबद्दल नसून औचित्याबद्दल आहे " येथे औचित्य म्हणजे नेमके काय? जेव्हा डॉक्टर "एखाद्याची बायको सनी लियोन(सारखी मादक दिसणारी, वैगरे) नसते" असे म्हणतात ते उचित. आणि "वेश्यालयात सनी लियोन(सारख्या माद्क दिसणार्‍या, वैगरे वेश्यां)साठी मोठी किंमत मोजावी लागते" हे माझे म्हणणे हे अनुचित, हे कसे काय? हे काथ्याकूट काढण्याचा उद्देश एवढाच की खालील प्रश्नांची उत्तरे मिळावीत. १. पॉर्नस्टार आणि वेश्या यांच्याबद्दल वाचकांच्या काय भूमिका आहेत? २. दोन्ही व्यवसायापैकी कोणते काम चांगले, कोणते वाईट असे वाटते व का? ३. दोन व्यवसायात तुलना आवश्यक की अनावश्यक? ४. दोन्ही व्यवसायात मान-अपमान करण्याचे/होण्याचे व्यवच्छेदक लक्षण कोणते व का? ५. माझ्या मूळ विधानातून मला जे म्हणायचे होते तो अर्थ संदर्भासहित व्यवस्थित ध्वनित होतोय की वाचकांना स्वतःला वेगळं काही वाटलं? आपल्या प्रतिसादांबद्दल आधीच खूप खूप आभार मानतो. अपेक्षा आहे नेहमीप्रमाणेच योग्य तर्‍हेने चर्चा होईल. धन्यवाद!
  • 35140 views

प्रतिक्रिया

Submitted by कपिलमुनी on Mon, 02/01/2016 - 22:28

In reply to हिणवणं?? by कपिलमुनी

Permalink

उल्लेख काढता येतील का ?

वरील प्रतिसादातील जातीवाचक उल्लेख काढुन टाकावे ही विनंती

Submitted by होबासराव on Mon, 02/01/2016 - 22:30

Permalink

नाहि तो व्यवसाय जर स्वतःहुन स्विकारला असेल

नाहि तो व्यवसाय जर स्वतःहुन स्विकारला असेल आणि त्याच्यामुळेच जर तुम्हि celebrity म्हणुन वावरत असाल तर त्याला हिणवने म्हणणे योग्य ठरणार नाहि. ह्याच्या अगदि उलट आपण जे दुसरे उदाहरण दिले त्याबद्दल आहे, बिचारे काहि बाप करत होता म्हणुन मुले करतात, पण शिकुन जरि हे नौकरिला लागले तरि लोक त्या व्यक्तिच्या मागे बोलतांना भंगी च म्हणतात हे हिणवणे आहे आणि अत्यंत वाईट आहे.

Submitted by अर्धवटराव on Tue, 02/02/2016 - 05:18

Permalink

लय भारी चर्चा

मिपाकरांना चान्स दिला तर एक अत्योत्कृष्ट वकिली सर्वीस एजन्सी जन्मास येईल. सनी मॅडमचा व्यवसाय, त्यांच्यावर संभाव्य आरोप, संस्थळाला संभाव्य धोका, एकीकडे मोदिं वगैरे मंडळींना जल्लाद संबोधणारी आणि त्याचबरोबर केजरीसाहेबांप्रती अत्यंत संवेदनशील बनलेली विनम्र शिवीगाळ... खुपच मस्त.

Submitted by सुबोध खरे on Tue, 02/02/2016 - 09:18

In reply to लय भारी चर्चा by अर्धवटराव

Permalink

अमान्य

अमान्य बरेचसे प्रतिसाद कायद्याचे अज्ञान दाखवतात.

Submitted by अर्धवटराव on Tue, 02/02/2016 - 10:13

In reply to अमान्य by सुबोध खरे

Permalink

म्हणुनच 'वकिली' सर्वीस म्हटलय डॉक

;) कायदेशीर सल्ला काय कुणीही देऊ शकेल :)

Submitted by सुबोध खरे on Tue, 02/02/2016 - 10:30

In reply to म्हणुनच 'वकिली' सर्वीस म्हटलय डॉक by अर्धवटराव

Permalink

येस सर

येस सर

Submitted by विवेक ठाकूर on Tue, 02/02/2016 - 11:19

In reply to अमान्य by सुबोध खरे

Permalink

सुबोधजी,

कायद्याचा प्रश्न दुय्यम आहे कारण तो इतका सरळ असता तर संपादकांना स्पष्टीकरण द्यावंच लागलं नसतं. मुद्दा दुहेरी धोरणांबद्दल आहे. केजरीवालांना एक न्याय आणि सनीला वेगळा न्याय का? आणि त्या अँगलनं पाहिलं तर एक वर्षानंतर ... हा धागाच डिलीट होईल! पण त्याबाबतीत धोरणात्मक चर्चा करणारा धागाच डिलीट होतो आणि मूळ प्रतिसाद मात्र तसाच राहातो. आणि या धाग्यावर मात्र, धोरणांची चर्चा होते, स्पष्टीकरणं दिली जातात.... म्हणजे तो पुन्हा, सद्स्यांतर्गत दुहेरी न्याय होतो! तुम्हाला स्मरत असेल, तुमच्या ब्रेस्ट कॅन्सरच्या पोस्टवर, संक्षींचा प्रतिसाद दोन की तीन वेळा, अप्रकाशित करून प्रकाशित आणि शेवटी अप्रकाशित केला गेला. मला वाटतं ही हॅड अ वॅलीड पॉइंट, पण त्याविषयी काहीही न विचारता, त्यांना सदस्यत्त्व रद्द करण्याची, ती सुद्धा बोर्डावर उघड धमकी दिली गेली. ज्याप्रमाणे तुमच्या पॉर्नच्या धाग्यावर, वैवाहिक संबाधातल्या तोचतोपणावर किंवा ऑरगॅजम या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर, चर्चा होऊ शकली नाही. तद्वत त्या पोस्टवरही स्त्रीयांच्या ब्रेस्ट कॅन्सरवर एका वेगळ्याच अँगलनं विचार करण्याची संधी होती. एखाद्याचा प्रतिसाद कळला नाही तर तो गोठवून, किमान त्याची लेखन कारकिर्द पाहून, त्याला स्पष्टीकरणाची संधी दिली असती तर स्त्री सदस्यांच्या मनातला ब्रेस्ट कॅन्सरचा धसका संक्षी दूर करु शकले असते असं वाटतं. थोडक्यात, धोरणातल्या या दुहेरीपणाबद्दल चर्चा आहे.

Submitted by बॅटमॅन on Tue, 02/02/2016 - 12:11

In reply to सुबोधजी, by विवेक ठाकूर

Permalink

विठाकाका बाकी कसेही असले तरी

विठाकाका बाकी कसेही असले तरी दुहेरीपणाच्या मुद्याबद्दल सहमत.

Submitted by सतिश गावडे on Wed, 02/03/2016 - 22:53

In reply to सुबोधजी, by विवेक ठाकूर

Permalink

तुम्हाला स्मरत असेल, तुमच्या

तुम्हाला स्मरत असेल, तुमच्या ब्रेस्ट कॅन्सरच्या पोस्टवर, संक्षींचा प्रतिसाद दोन की तीन वेळा, अप्रकाशित करून प्रकाशित आणि शेवटी अप्रकाशित केला गेला. मला वाटतं ही हॅड अ वॅलीड पॉइंट, पण त्याविषयी काहीही न विचारता, त्यांना सदस्यत्त्व रद्द करण्याची, ती सुद्धा बोर्डावर उघड धमकी दिली गेली. ज्याप्रमाणे तुमच्या पॉर्नच्या धाग्यावर, वैवाहिक संबाधातल्या तोचतोपणावर किंवा ऑरगॅजम या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर, चर्चा होऊ शकली नाही. तद्वत त्या पोस्टवरही स्त्रीयांच्या ब्रेस्ट कॅन्सरवर एका वेगळ्याच अँगलनं विचार करण्याची संधी होती. एखाद्याचा प्रतिसाद कळला नाही तर तो गोठवून, किमान त्याची लेखन कारकिर्द पाहून, त्याला स्पष्टीकरणाची संधी दिली असती तर स्त्री सदस्यांच्या मनातला ब्रेस्ट कॅन्सरचा धसका संक्षी दूर करु शकले असते असं वाटतं.
हे तुम्हाला कसं माहिती हो विठाकाका? संक्षींची आणि तुमची वरचेवर भेट होते का? भेटल्यानंतर संक्षी तुम्हाला मिपावर त्यांची बाजू मांडायला सांगतात का?

Submitted by पिलीयन रायडर on गुरुवार, 02/04/2016 - 14:02

In reply to सुबोधजी, by विवेक ठाकूर

Permalink

तर स्त्री सदस्यांच्या मनातला

तर स्त्री सदस्यांच्या मनातला ब्रेस्ट कॅन्सरचा धसका संक्षी दूर करु शकले असते असं वाटतं.
स्त्री सदस्यांच्या मनात धसका आहे की नाही हा एक वेगळाच मुद्दा आहे. पण मुळात मिपावर डॉ. साती सारख्या महिला डॉक्टर असताना संक्षीं सारख्या आरोग्य क्षेत्राशी काहिही संबंध नसलेल्या व्यक्तिचे ऐकुनच का घ्यायचे? मिपावर ह्या विषयावर मोकळेपणानी बोलायला डॉ. खरेंसारखे लोक आहेतच जे ह्यावर अद्ययावत आणि शास्त्रशुद्ध माहिती देऊ शकतील, पण ज्या महिलांना असे बोलण्यास संकोच वाटतो त्यांना सातीताई आणि अनाहिता विभागही आहेत. ह्याउप्पर संक्षी काय सांगणार होते? आपल्याला सगळंच कळतं हे अध्यात्म, आस्तिकता, अणु-रेणु ते पार शाररिक संबंध इ विषयांबाबत ठिक आहे. पण वैद्यकीय सल्ले तरी डॉक्टरनेच द्यावेत असे माझे मत आहे. विठा.. सोंग तरी नीट वठवा.. किंवा सरळ संक्षी म्हणुन लिहा की. ही सर्कस फार हास्यास्पद आहे..

Submitted by होबासराव on गुरुवार, 02/04/2016 - 14:06

In reply to तर स्त्री सदस्यांच्या मनातला by पिलीयन रायडर

Permalink

पिरा तै

____/\____ जियो :))

Submitted by श्रीगुरुजी on गुरुवार, 02/04/2016 - 14:08

In reply to तर स्त्री सदस्यांच्या मनातला by पिलीयन रायडर

Permalink

आपल्याला सगळंच कळतं हे

आपल्याला सगळंच कळतं हे अध्यात्म, आस्तिकता, अणु-रेणु ते पार शाररिक संबंध इ विषयांबाबत ठिक आहे. पण वैद्यकीय सल्ले तरी डॉक्टरनेच द्यावेत असे माझे मत आहे.
+ १ इथले काही सभासद आपण सर्वज्ञ आहोत अशा आविर्भावात ब्रह्मांडातल्या यच्चयावत प्रत्येक विषयावर अधिकारवाणीने सल्ले देत असतात.

Submitted by विवेक ठाकूर on गुरुवार, 02/04/2016 - 15:17

In reply to तर स्त्री सदस्यांच्या मनातला by पिलीयन रायडर

Permalink

आता तुम्ही विषय काढलाच आहे तर लिहीतो

पण वैद्यकीय सल्ले तरी डॉक्टरनेच द्यावेत असे माझे मत आहे ! वैद्यकीय अप्रोच हा एक भाग आहे आणि कॅन्सर होण्यामागची स्री-मानसिकता हा संपूर्ण वेगळा विषय आहे. कॅन्सरच्या मागचं मानसिक कारण, सततच्या रिजेक्शनमुळे चालू असलेलं अंतर-द्वंद आणि त्यामुळे होणारं इरिटेशन आहे. उरोज हा स्त्रीत्त्वाचा गौरव आहे आणि ज्या स्त्रीला स्वतःच्या स्रीत्त्वाचा अभिमान आहे तिच्या मनात स्त्री देहाविषयी कोणताही नकार असू शकत नाही. पण मूळात अनेक स्त्रीयांची, आपला`स्त्री देह' हेच आपल्या दु:खाचं मूळ कारण आहे अशी ठाम समजूत झालेली असते. याला त्यांची ही निर्विवाद धारणा, की जननवेणा आणि रजस्त्राव केवळ स्री देहाचे भोग आहेत, कारणीभूत आहे. आणि त्यातून स्त्रीची सुटका असंभव आहे. तुम्हाला कल्पना नसेल, `इकनॉमिक इक्विटी' नंतर सुद्धा, स्त्री अस्वस्थ असण्याचं कारण `जेंडर इनिक्वॅलिटी' आहे, असा भन्नाट प्रचार होऊन, पाश्चात्य देशात गेल्या दोन दशकापासून, जेंडर इक्विटी मूवमेंटचा दौर चालू आहे. जेंडर इक्विटी मूवमेंट हा स्त्रीत्त्वाचा अंतिम नकार आहे. यानंतर वैवाहिक संबधांचा गहन प्रश्न येतो, कारण ज्या स्त्रीला पुरुषाचं प्रेम लाभतं तिच्या देहावर पुरुष आशिक असतो आणि पर्यायानं तिला स्वतःच्या देहाचा आणि स्त्रीत्वाचा अभिमान असतो. जिथे पारस्पारिक अनुबंध नाही तिथे स्त्रीला नकळतपणे उरोजाचं ओझं वाटून, मनात अनाहूतपणे रिजेक्शनची भावना निर्माण होते आणि पर्यायनं काँन्सटंट इरिटेशन (अंतर-द्वंद) सुरु होतं. या अंर्तगत नकारामुळे उरोज अनावश्यक वाटून कॅन्सरची शक्यता निर्माण होते. यापुढे ऑरगॅजमची (स्रीचा अत्यंतिक आनंद) पायरी आहे. ज्या स्त्रीया ऑरगॅजम भोगू शकतात त्यांना प्रथमच, निसर्गानं स्त्रीला बहाल केलेल्या कमालीच्या वरदानाची प्रचिती येते. तस्मात, तिला आपल्या देहाप्रती आणि स्वतःच्या स्त्रीत्वाविषयी बेहद्द आनंद वाटू लागतो. उरोज हा स्रीत्वाचा सौंदर्याविष्कार आहे याची तिला जाणीव होते. देहाविषयी तिला कोणताही नकार राहात नाही. तस्मात, अशा स्त्रीच्या बाबतीत ब्रेस्ट कॅन्सरची शक्यताच शून्य होते.

Submitted by पिलीयन रायडर on गुरुवार, 02/04/2016 - 15:30

In reply to आता तुम्ही विषय काढलाच आहे तर लिहीतो by विवेक ठाकूर

Permalink

अशा स्त्रीच्या बाबतीत ब्रेस्ट

अशा स्त्रीच्या बाबतीत ब्रेस्ट कॅन्सरची शक्यताच शून्य होते.
आणि अर्थातच हे तुम्हाला कुठुन कळलं तर तुमच्या अनुभवातुन आणि निरीक्षणातुन..!! एवढा कॉन्फिडन्स तर जन्मभर कॅन्सरवर संशोधन केलेल्या माणसालाही नसेल...! काका, कॅन्सर हा विषय एका माणासाने आपल्या अनुभवातुन विचार बनवुन ते समस्त स्त्री प्रजातीला लागु पडतील असे मानण्यातला आहे का? तुमच्या विचारमंथनातुन आलं म्हणुन ते विचारमौक्तिक अमुल्य रत्नच असं "तुम्हाला" वाटणं समजु शकते मी.. तेवढं ओळखायला लागलेय मी तुम्हाला. पण इथे न जाणे किती लोक वाचक असतील.. सर्वच इथे चर्चा करुन प्रश्न मांडतीलच असे नाही. तेव्हा एवढी मोठी विधाने किती जबाबादारीने करायला हवीत? स्त्रीयांच्या मानसिक अवस्थांबद्दल वगैरे लिहीणं एक झालं.. त्यातुन आपल्या अत्यंत तोकड्या अनुभवांवरुन निष्कर्षाला पोहचणं चुकच. तुम्हाला ते पटणार नाहीच. प्लिझ.. कधी तरी लिहीताना.. "असं असु शकतं" "होत असावं" इ वाक्य रचना वापरुन पहा. कारण त्याच योग्य आहे. कॅन्सरची कारणं तुम्ही म्हणताय "तीच्च" नसतात. बाकी पुष्कळ असतात. पण त्यावर अभ्यास केलेल्या डॉक्टरांना ती सांगु देत. तुम्ही आम्ही इतक्या ठामपणे बोलणं योग्य नाही.

Submitted by विवेक ठाकूर on गुरुवार, 02/04/2016 - 15:42

In reply to अशा स्त्रीच्या बाबतीत ब्रेस्ट by पिलीयन रायडर

Permalink

तुम्हाला कल्पना नसतांनाही तुम्ही

बिनधास्तपणे संदिग्ध लिहीता.... कॅन्सरची कारणं तुम्ही म्हणताय "तीच्च" नसतात. बाकी पुष्कळ असतात ज्याचा कुणाला काही एक उपयोग नाही. आणि मला मानसिक कारणमिमांसा नक्की माहिती असल्यामुळे मी ठाम लिहीतो, इतकाच फरक आहे.

Submitted by पिलीयन रायडर on गुरुवार, 02/04/2016 - 15:54

In reply to तुम्हाला कल्पना नसतांनाही तुम्ही by विवेक ठाकूर

Permalink

काका... मला एक कळतं..

काका... मला एक कळतं.. कॅन्सर ह्या विषयावर संजय क्षीरसागर ह्या डॉक्टर नसणार्‍या व्यक्तिकडुन ऐकुन घ्यायचं नसतं. किंवा समजा घेतलंच, तर ते मनावर घ्यायचं नसतं. तुम्ही ह्या विषयाचे शिक्षण घेतलेले नाही, ह्या विषयावर ठाम मते मांडावीत एवढ्या लोकांचा विदा तुमच्याकडे नाही, शास्त्रशुद्ध पद्धतीने तुमची मते पडताळुन पाहिलेली नाहीत, तेव्हा तुम्ही "अमुक तमुक मुळे ब्रेस्ट कॅन्सरची शक्यता "शुन्य" होते" हे विधान तुक्केबाजीवर करत आहात. तुम्हाला कितीही ठाम वाटलं तरी ते तसं नाही. मी लोकांना सल्ले देत फिरत नाही, माझी मतं लिहीते. त्याखाली ती माझ्या सीमीत अनुभवांवर आहेत हे ही लिहीते. आणि तीच्च बरोबर आहेत असा दावाही करत नाही. आपल्यात फरक हा आहे. तुम्ही ह्या मिपावतारात तरी मान्य करणार नाही, आणि शेवटचा प्रतिसाद तुमचाच हे ही तुमचे खुळ असल्याने जरुर पुढचा प्रतिसाद द्यावा. उत्तर न देता शेवटच्या प्रतिसादाचा मान देऊन आपला आत्मा थंड केल्या जाईल.. बाकी...
मला मानसिक कारणमिमांसा नक्की माहिती असल्यामुळे मी ठाम लिहीतो.
विठा आयडीने संक्षी आयडीला डिफेंड करत आहात काका.. वाक्यरचना चुकली ना... संक्षीना मानसिक कारणमिमांसा नक्की माहिती असल्यामुळे ते ठाम लिहीयचे. असं हवं ना?

Submitted by विवेक ठाकूर on गुरुवार, 02/04/2016 - 16:14

In reply to काका... मला एक कळतं.. by पिलीयन रायडर

Permalink

पिरा, तुम्ही प्रतिसादाला अनुसरुन लिहीत नाही

मुद्दा साधा आहे. रिजेक्शनमुळे होणारं काँस्टंट इरिटेशन ही मानसिकता, शारिरिक लेवलवर सेल म्युटेशनला मोठ्याप्रमाणावर कारणीभूत ठरते. तुम्ही त्याविषयी काहीच लिहू शकत नाही पण शैक्षणिक आहर्ता मधे आणली की मूळ मुद्याला फाटा बसतो, यापलिकडे तुमच्याकडे युक्तीवाद नाही.

Submitted by तर्राट जोकर on गुरुवार, 02/04/2016 - 16:19

In reply to पिरा, तुम्ही प्रतिसादाला अनुसरुन लिहीत नाही by विवेक ठाकूर

Permalink

अंजेलिना जोलीला कसलं रिजेक्शन

अंजेलिना जोलीला कसलं रिजेक्शन चं कॉन्स्टंट इरिटेशन होतं हो काका?

Submitted by पिलीयन रायडर on गुरुवार, 02/04/2016 - 16:38

In reply to पिरा, तुम्ही प्रतिसादाला अनुसरुन लिहीत नाही by विवेक ठाकूर

Permalink

बरं माझ्याकडे युक्तिवाद नाही.

बरं माझ्याकडे युक्तिवाद नाही.. तुमच्याकडे काय आहे? कोणतीही गोष्ट सिद्ध होण्यासाठी चाचण्या कराव्या लागतात की नाही? पडताळुन पाहवं लागतं की नाही? ते सर्वांना लागु पडतं की नाही हे बघावं लागतं की नाही? शिक्षण जाउ द्या... खरंच जाऊ द्या.. तुम्ही सी.ए असलात म्हणुन मेडिकल मध्ये काम करु शकत नाही असं नाहीचे अजिबात.. पण तुम्ही तुमच्या ह्या निष्कर्षावर पोहचण्यासाठी नक्की काय केले ते सांगा. तुमचा कुठे पेपर वगैरे पब्लिश केलाय का? तो दाखवा.. तुमच्या कामाचे संदर्भ दाखवा? की हा शोध स्वयंभु आहे? किती बायकांशी तुम्ही आजवर ह्या विषयावर बोलला आहात? त्याचे रेकॉर्ड्स? तुम्ही तुमचे प्रश्न तयार केले असतीलच ना? ते सांगा.. मग तुम्ही आलेल्या उत्तरांचा अभ्यास कसा केलात? अनेक मुद्दे मानसिक आहेत, त्याच्या काही चाचण्या केल्यात का? त्याची सांगड काही मोजण्या सारख्या पॅरेमीटर्स सोबत घातली आहे का? जसे की हार्मोन लेव्हल्स वगैरे. की हा सगळा खयाली पुलाव आहे? कुठे काही डोक्युमेंटेशन? हे सगळं असलं तर लोक विश्वास ठेवायचा विचार तरी करतील.. सिद्ध करायला अजुन हजार गोष्टी असतील. हे तर प्रश्न मी.. सामान्य व्यक्ति तुम्हाला विचारत आहे. हे कसं झालंय ना संक्षी, मला माझ्यावर पुर्ण विश्वास आहे की माझ्यासमोर जे झाड आहे त्याचा पाला ठेचुन खाल्ला की डोकं ताळ्यावर येतं. मी एका कुत्र्यावर तो प्रयोगही केला आहे. प्रयोग म्हणजे त्याने तो पाला खाल्ला आणि मग तो गपगुमान बसुन राहिला. बाकी कुत्र्यांनी तो खाल्ला तर काय होईल ते माहिती नाही.. पाला खाल्ल्यानेच तो गप बसला हे माहिती नाही.. किती नक्की पाला खायचा ते माहिती नाही.. पाल्यातल्या नक्की कोणत्या घटकाने तो गप बसला ते माहिती नाही.. पाल्यासोबत आणखी काय खाल्लं ते माहिती नाही.. त्या कुत्र्याला मुळातच गप बसुन रहायची सवय आहे का ते माहिती नाही... पण तरीही मला "ठामपणे" वाटतय की पाला खाल्ल्याने जगातले सर्व कुत्रे गप बसुन रहातील.. हे शक्य आहे का काका??

Submitted by पैसा on गुरुवार, 02/04/2016 - 16:50

In reply to बरं माझ्याकडे युक्तिवाद नाही. by पिलीयन रायडर

Permalink

चरणकमले कुठे आहेत तुमची?

चरणकमले कुठे आहेत तुमची?

Submitted by सामान्य वाचक on गुरुवार, 02/04/2016 - 19:11

In reply to बरं माझ्याकडे युक्तिवाद नाही. by पिलीयन रायडर

Permalink

दंडवत

हम पिरा दीदी के फैन हो गाये हय

Submitted by स्रुजा on गुरुवार, 02/04/2016 - 19:30

In reply to बरं माझ्याकडे युक्तिवाद नाही. by पिलीयन रायडर

Permalink

स्टँडिंग ओव्हेशन तुला या

स्टँडिंग ओव्हेशन तुला या प्रतिसादासाठी !!!

Submitted by विवेक ठाकूर on गुरुवार, 02/04/2016 - 22:54

In reply to बरं माझ्याकडे युक्तिवाद नाही. by पिलीयन रायडर

Permalink

पिरा, व्यक्तिगत होण्याऐवजी मुद्दा पाहा...

कदाचित उपयोग होईल. एक) पुरुषातल्या ओरल आणि चेस्ट कॅन्सर्सची प्रमुख कारणं; तंबाखू, गुटका आणि सिग्रेट मानली गेली आहेत. त्या व्यसनांमुळे होणार्‍या काँस्टंट इरिटेशनचा परिणाम म्हणून कॅन्सर होतो. दोन) स्त्रीयांच्या जेंडर इक्विटी मूवमंटचे मुद्दे पाहा. त्यांच्या मते स्त्री देह हेच स्त्रीच्या दु:खाचं मूळ कारण ठरवलं गेलंय. थोडक्यात, जगातली कोणतीही स्त्री, जर कुठल्याही प्रकारे, स्वतःचा देह नाकारत असेल तर तिचा त्या चळवळीला अंतर्गत पाठींबा आहे. अगदी थोडक्यात म्हणजे, जेंडर इक्विटीचा अर्थ स्वतःच्या स्त्रीत्त्वाचा नकार आहे. तीन) उरोज हे स्त्रीत्वाचं महत्त्वाचं प्रकट लक्षण आहे. तस्मात, मानसिकदृष्ट्या स्त्रीत्त्वाचा नकार म्हणजे शारिरिकदृष्ट्या उरोजाप्रती नाराजगी व्यक्त करणं आहे. स्त्रीत्त्वाचा नकार हे मानसिक द्वंद्व, शरीरात काँस्टंट इरिटेशनला कारणीभूत ठरतं, त्याचा परिपाक म्हणून ब्रेस्ट कॅन्सरची शक्यता निर्माण होते. आता या मुद्द्यांचा तुम्हाला प्रतिवाद करता येतो का ते पाहा. कारण माझे पेपर्स पब्लिश होण्यापेक्षा कुणाला स्वतःचं अंतर्गत द्वंद्व सोडवायला मदत झाली तर ते जास्त उपयोगी होईल.

Submitted by संदीप डांगे on गुरुवार, 02/04/2016 - 23:16

In reply to पिरा, व्यक्तिगत होण्याऐवजी मुद्दा पाहा... by विवेक ठाकूर

Permalink

ओ बस कराओ, किती फेकताय,

ओ बस कराओ, किती फेकताय, तुम्हाला कंटाळा नाही येत काय? अ. पुरुषांना ब्रेस्ट कॅन्सर होण्याची कारणे सांगा. एकूण ब्रेस्ट कॅन्सरपैकी दहा टक्के ब्रेस्ट कॅन्सर पुरुषांना होतो. ते कोणता आपला देह नाकारतात? पुरुषांच्या मनातलं कोणतं मानसिक द्वंद्व, शरीरात काँस्टंट इरिटेशनला कारणीभूत ठरतं, त्याचा परिपाक म्हणून ब्रेस्ट कॅन्सरची शक्यता निर्माण होते? ज्या स्त्रियांना वांशिकपद्धतीने स्तनकर्करोगाचा त्रास सहन करायला लागला आहे त्यांना एकजात बावळट नवरे मिळाले आणि ज्यांना नाही त्यांना एकजात भन्नाट नवरे मिळाले असे तुमचा अभ्यास सांगतो काय? ब. मानवी शरीर हे मुवमेंटवाल्यांचे मुद्दे लक्षात घेऊन रिस्पॉन्स देतं काय? बुद्धांनी सांगितलंय ती दु:खाची कारणं स्त्रीयांच्या दु:खांना लागू होत नाहीत काय? पुरुषसत्ताक पद्धतीत स्त्रीयांचे सतत दमन झाले, हे दमन होणे मानवजातीच्या भटकंती संपून स्थीरस्थावर होण्याच्या काळानंतर सुरु झाले. ह्या सततच्या दमनामुळे स्त्रीया दु:खी आहेत. सततच्या दमनामुळे कुणीही दु:खी होतं, अगदी कुत्रं देखील. एक सभ्य सदस्य म्हणून मी आधीच माफी मागतो पण तुम्हाला स्त्रीची प्रत्येक सुखादुखाची गोष्ट तिच्या देहापर्यंत व नंतर लैंगिकतेच्या सुखापर्यंत मग प्रणयाच्या आनंदापर्यंत, मग तो कसा देतात हे फक्त मलाच ठावुक आहे ह्या पर्यंत - कदाचित अजून "अधिक माहितीसाठी व्यनि करा" स्टेज आली नसेल- नेऊन पोचवण्याची जी खोड लागली आहे त्यायोगे तुम्हाला कसला तरी मानसिक आजार झाल्याचे वाटत आहे, (हे माझे वैयक्तिक मत आहे. तुमच्या सर्व भयंकर प्रतिक्रिया वाचून तयार झालंय.) संपादकांना आक्षेपार्ह आणि कायदेबाह्य वाटलं तर उडवा प्रतिसाद. But I have had handled enough idiocity for the day.

Submitted by पिलीयन रायडर on Fri, 02/05/2016 - 00:02

In reply to पिरा, व्यक्तिगत होण्याऐवजी मुद्दा पाहा... by विवेक ठाकूर

Permalink

Straight question.. Straight

Straight question.. Straight reply.. Give me the proof that a women not being happy with her body is the reason for breast cancer. Tell us the analytical process through which you reached to this conclusion. And tell us how you concluded that it is applicable to all women. Questions are preety simple to understand. If you do not have answers then my theory of dog eating leaves is as good as yours.. I have not said anything personal in my previous reply to you. I am asking serious question. You please do not give me blanket answers. (Apologies for English. Cant type Devanagari from my mobile)

Submitted by अजया on गुरुवार, 02/04/2016 - 15:47

In reply to अशा स्त्रीच्या बाबतीत ब्रेस्ट by पिलीयन रायडर

Permalink

पिरा =))) तीव्र सहमती!

पिरा =))) तीव्र सहमती!

Submitted by पैसा on गुरुवार, 02/04/2016 - 15:32

In reply to आता तुम्ही विषय काढलाच आहे तर लिहीतो by विवेक ठाकूर

Permalink

ओह

ओह

Submitted by बॅटमॅन on Fri, 02/05/2016 - 01:52

In reply to आता तुम्ही विषय काढलाच आहे तर लिहीतो by विवेक ठाकूर

Permalink

विठाकाका,

विठाकाका, नक्की किती पेग घेतल्यावर असं काही सुचतं म्हणे? लोकमान्य टिळक म्हणायचे, "दिडकीची भांग घेतल्यावर वाटेल त्या कल्पना सुचतात." इन्फ्लेशन अ‍ॅडजस्ट करून कॅल्क्युलेट करून सांगू शकाल का की तेव्हाच्या दिडकीच्या भांगेशी कंप्यारेबल आज काय मिळतं ते? एक टकीला का काय असतं त्याचा शॉट की गेलाबाजार व्होडका बाटली?

Submitted by देशपांडे विनायक on Tue, 02/02/2016 - 10:24

Permalink

सेवा म्हणजे काय ? यावर विचार

सेवा म्हणजे काय ? यावर विचार करत असता काही गोष्टी share कराव्या वाटले सेवा देणे हा व्यवसाय होऊ शकतो सेवा देणे हा व्यवसाय असल्यास करार करून ही सेवा विकत घेता येते करारात नमूद केलेल्या अटीप्रमाणे सेवा देणे कायद्याने बंधनकारक आहे परंतु सेवा देणे हा एखाद्याचा व्यवसाय नसेल तर सेवा देणे बंधनकारक कसे ठरेल ? सेवा देणे /घेणे कायदेशीर ठरण्यासाठी ती सेवा मुळातच कायदेशीर असावी लागते वेशा व्यवसाय कायदेशीर आहे porn फिल्म बनवणे बेकायदेशीर असल्यास त्या फिल्ममध्ये काम करणे बेकायदेशीर ठरेल

Submitted by संदीप डांगे on Tue, 02/02/2016 - 11:00

Permalink

कायदेशीररित्या 'सनी लीयोन'

कायदेशीररित्या 'सनी लीयोन' अशी कोणी व्यक्ती अस्तित्वात नाही. तिच्या पासपोर्ट, ओळखपत्रावर सनी लियोन हे नाव असेल तर ती व्यक्ती अस्तित्वात आहे असे समजले जाईल असे मला वाटते. कायदेपंडितांचे काय मत आहे? Karenjit Kaur Vohra (born May 13, 1981) better known by her stage name Sunny Leone (pronounced /ˈsəniːliːˈoʊnˈiː/), is an Indo-Canadian Bollywood actress and model, and former porn actress. She has also used the stage name Karen Malhotra.

Submitted by विवेक ठाकूर on Tue, 02/02/2016 - 11:38

In reply to कायदेशीररित्या 'सनी लीयोन' by संदीप डांगे

Permalink

हे मात्र भारीच!

.
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Tue, 02/02/2016 - 11:51

In reply to कायदेशीररित्या 'सनी लीयोन' by संदीप डांगे

Permalink

हे संदीपभाऊ कडून कधी येतेय

हे संदीपभाऊ कडून कधी येतेय याचीच वाट पाहात होतो. आधीच्या ब्रॅन्ड इमेजच्या दाव्यात हे टायपले असते तर वेगळी चर्चा वाचायला मिळाली असती. टोपणनावाने असो वा खर्‍या नावाने असो. पर्पजली एस्टॅब्लिश केलेल्या इमेज ला फायदा होत असेल तर मूळ नावाने ते मिळवले जातात. हानी पोहोचत असेल तर काय तरतूद आहे याची उत्सुकता आहे.

Submitted by संदीप डांगे on गुरुवार, 02/04/2016 - 17:00

In reply to हे संदीपभाऊ कडून कधी येतेय by अभ्या..

Permalink

कायदेशीर तरतूदीबद्दल अजून

कायदेशीर तरतूदीबद्दल अजून उत्तर मिळाले नाही. लोक भलत्याच वादात अडकलेत! :-) तेही सनी लियोनच्या कायदेशीर अस्तित्त्वासारखा महाआवश्यक प्रश्न सोडून!

Submitted by पिलीयन रायडर on गुरुवार, 02/04/2016 - 17:07

In reply to कायदेशीर तरतूदीबद्दल अजून by संदीप डांगे

Permalink

डांगे काका.. सॉरी म्हणणारच

डांगे काका.. सॉरी म्हणणारच होते की तुमचा धागा हायजॅक झाला.. मी नाही.. विठा काकांनी केली सुरवात!! आणि सनीचे म्हणाल तर मला पहिल्या दिवसापासुन हा प्रश्न आहे. मी शोधण्याचा प्रयत्नही केलाय. पण उत्तर मिळाले नाही. कुणी वकील असेल तर ते सांगतीलच. सध्या महाआवश्यक प्रश्न बदललेला आहे..!! तुम्ही थोडी कळ काढा.. तुमचं पण उत्तर शोधु आपण..

Submitted by संदीप डांगे on गुरुवार, 02/04/2016 - 17:13

In reply to डांगे काका.. सॉरी म्हणणारच by पिलीयन रायडर

Permalink

जौ दे हो पिराताई, हाय जॅक चे

जौ दे हो पिराताई, हाय जॅक चे एवढे काय नाय, ब्रेस्ट कॅन्सरचं मूळ कुठे असते ते नवीन माहिती कळली यानिमित्ताने! पण ते पुरुषांनाही ब्रेस्ट कॅन्सर होतो तो मग कशामुळे हा नवीन प्रश्न मला पडलाय. त्यासाठी वेगळा धागा काढायची ताकत नाय माझ्यात आता. आणि सनीचे म्हणाल तर सनी चे वकिलच इकडे आल्यावर उत्तर देतील, तोवर वाट पाहायची तयारी आहे माझी. :)

Submitted by पिलीयन रायडर on गुरुवार, 02/04/2016 - 17:20

In reply to जौ दे हो पिराताई, हाय जॅक चे by संदीप डांगे

Permalink

तर तर हो.. मला तर जन्म वाया

तर तर हो.. मला तर जन्म वाया गेला असंच वाटतय.. तिकडे काका.. इकडे संक्षी.. स्त्री असुन मला स्त्री देहाबद्दल एवढी माहिती नाही हो.. व्यासंग लागतो.. उगाच नाही.. मला ह्या चर्चेतुन एझ्कॅक्टली काय केलं की ब्रेस्ट कॅन्सरची शक्यता शुन्य होते हे समजलं की तुम्ही पुर्शांचे प्रश्न मांडा.. सर के दरसे आजतक कोई बिना मेगाबायटी प्रतिसाद नही गया!

Submitted by अजया on गुरुवार, 02/04/2016 - 17:32

In reply to तर तर हो.. मला तर जन्म वाया by पिलीयन रायडर

Permalink

विठा काकांचा स्त्रिया इतकाच

विठा काकांचा स्त्रिया इतकाच पुरूषांचा अनुभव असेलच ना? पुरूषांना कँसर कोणत्या मानसिकतेने होतो काही सांगाल का?

Submitted by पैसा on गुरुवार, 02/04/2016 - 17:38

In reply to विठा काकांचा स्त्रिया इतकाच by अजया

Permalink

अरे भई

कहना क्या चाहती हो?

Submitted by संदीप डांगे on गुरुवार, 02/04/2016 - 17:35

In reply to तर तर हो.. मला तर जन्म वाया by पिलीयन रायडर

Permalink

नाय नाय, हे चीटींग आहे.

नाय नाय, हे चीटींग आहे. तुमच्या स्त्रीयांच्या प्रश्नांचे उत्तर द्यायला पुरूश आणि पुर्शांच्या प्रश्नांचे उत्तर द्यायला पुरुशच! कोणी स्त्री-संक्षी नाय का अवेलेबल?

Submitted by पैसा on गुरुवार, 02/04/2016 - 17:40

In reply to नाय नाय, हे चीटींग आहे. by संदीप डांगे

Permalink

नाय बा!

हौ इज इट पॉसिबल? अस्तित्वचा साचा मोडला नंतर.

Submitted by संदीप डांगे on गुरुवार, 02/04/2016 - 17:47

In reply to नाय बा! by पैसा

Permalink

कोण्यातरी स्त्रीनेच

कोण्यातरी स्त्रीनेच वेंधळेपणाने धक्का देऊन मोडला असंल. नैतर आज पुरुशांना एवढे कष्ट घ्यावे लागले नसते... ;-)

Submitted by पिलीयन रायडर on गुरुवार, 02/04/2016 - 17:51

In reply to कोण्यातरी स्त्रीनेच by संदीप डांगे

Permalink

पुरुषांनाच कष्ट घ्यावे लागतात

पुरुषांनाच कष्ट घ्यावे लागतात हो सारे.. लाळ पाजा.. मुड मध्ये आणा.. अमेरिकन स्त्रीवादाचा भांडाफोड करा.. आता संक्षी आले ना बायकांचा पुढचा प्रॉब्लेम घेऊन, मग अजुन बरंच काही येणारे पुरुषांच्या टु डु लिस्ट मध्ये.. बघालच तुम्ही..

Submitted by अजया on गुरुवार, 02/04/2016 - 18:00

In reply to नाय नाय, हे चीटींग आहे. by संदीप डांगे

Permalink

ज्यांचा पुरूश असून

ज्यांचा पुरूश असून स्त्रियांच्या मानसिकतेचा इतका व्यासंग आहे अशा महापुरशाचा पुरशांच्या मानसिकतेबद्दल तितकाच अस्णार ना.ते किंवा काका कें यांनीच द्यायला हवे उत्तर.

Submitted by संदीप डांगे on गुरुवार, 02/04/2016 - 18:08

In reply to ज्यांचा पुरूश असून by अजया

Permalink

तो एक ज्योक आठवला.

तो एक ज्योक आठवला. मुलांना सामान्य ज्ञानाचे प्रश्न विचारून भंडावून सोडणार्‍या माणसाचे 'जरा बाहेर फिरत जा, जरा बाहेर फिरत जा'च्या धोशाला कंटाळून एक मुलगा विचारतो, काका "शामलाल माहित आहे का?" तो म्हणतो "नाही, कोण आहे?" "जरा घरी ही थांबत जा!"

Submitted by बॅटमॅन on Tue, 02/02/2016 - 12:11

In reply to कायदेशीररित्या 'सनी लीयोन' by संदीप डांगे

Permalink

हाण तेजायला....

हाण तेजायला....
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Tue, 02/02/2016 - 12:13

In reply to हाण तेजायला.... by बॅटमॅन

Permalink

हेय्य बटोशास्त्री. वॉस्सप

हेय्य बटोशास्त्री. वॉस्सप ह्याप्पी टू सी यू.

Submitted by मारवा on Tue, 02/02/2016 - 14:09

In reply to कायदेशीररित्या 'सनी लीयोन' by संदीप डांगे

Permalink

प्रतिभाशाली प्रतिसाद मराठी संस्थळावर अनेक महीला

मराठी संस्थळावर अनेक महीला टोपण नावाने लेखन करतात. त्यांचे मूळ नाव ओळखपत्रावर वेगळे असते याचा अर्थ त्यांच्या विषयी आता काहीही वल्गना केल्या.......... कायदेपंडितांचे काय मत आहे ?

Submitted by नाव आडनाव on Tue, 02/02/2016 - 14:13

In reply to प्रतिभाशाली प्रतिसाद मराठी संस्थळावर अनेक महीला by मारवा

Permalink

सिक्सर हाणलाय ...

सिक्सर हाणलाय ...

Submitted by संदीप डांगे on Tue, 02/02/2016 - 15:39

In reply to प्रतिभाशाली प्रतिसाद मराठी संस्थळावर अनेक महीला by मारवा

Permalink

मराठी संस्थळावर अनेक महीला

मराठी संस्थळावर अनेक महीला टोपण नावाने लेखन करतात. त्यांचे मूळ नाव ओळखपत्रावर वेगळे असते याचा अर्थ त्यांच्या विषयी आता काहीही वल्गना केल्या.......... तर आयडी ब्लॉक/ब्यान होत/होईल, बाकी काही होत/होणार नाही. कायदेशीररित्या तर काहीच होऊ शकत नाही. संस्थळावरिल खोट्या नावाने घेतलेले आयडी म्हणजे सदर व्यक्तीचे कायदेशीर अस्तित्व नाही. संस्थळावरिल खोट्या आयडीच्या मानहानीने वास्तव जगात असलेल्या प्रत्यक्ष व्यक्तीच्या सन्मानास काही क्षती पोचत नाही. तशी पोचत असल्याचे प्रत्यक्ष व्यक्तीला सिद्ध करावे लागेल. मुखवटे लावून सर्कसमधे नाचणार्‍या जोकरास दर्शक हसतो दिल्या म्हणजे मुखवट्याआडच्या व्यक्तीवर हसतो असा त्याचा अर्थ होत नाही. निळु फुलेंना एकदा भरल्या ताटावरून उठावे लागले होते. कारण ज्या घरी ते जेवायला गेले तिथल्या गृहीणीने 'असला हरामखोर, बायकांच्या इज्जतीवर डोळा ठेवणारा, नालायक माणूस माझ्या घरी जेवता कामा नये." असा रणरागिणी अवतार धारण केला होता. निळू फुलेंनी हा अपमान न मानता आपल्या अभिनयकलेची सर्वोत्तम पावती/दाद मानले.

Submitted by मारवा on Tue, 02/02/2016 - 15:57

Permalink

आपण बहुधा अभिनयातील संवादाविषयी बोलत आहात

मी प्रत्यक्ष टीप्पणी विषयी बोलतोय फरक सुस्पष्ट आहे. अधिक उलगडा केला तर अवघड होऊन बसेल.

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com