महिलांना शनी शिंगणापुर चौथर्यावर प्रवेश द्यावा का नाही हा मुद्दा सध्या चांगलाच गाजतो आहे. मिपावर या विषयी काथ्याकूट न येणे ही काहिशी आश्चर्याची बाब आहे. ( पुर्वीचं मिपा राहीलं नाही...!) सदरील प्रकरणावर चर्चा करण्यासाठी हा काथ्याकूट !
यासंदर्भात "भुमाता ब्रिगेड" हे नाव चर्चेत येत आहे . या संघटनेविषयी नेटवर जास्त माहिती मिळाली नाही. कुणाला माहीत असेल तर क्रुपया टंकण्याचे कष्ट घ्यावे.
शनीच्या चौथर्यावर जाण्याची गरज आत्ताच का भासली ?
राज्य सरकारने यावर काय भुमीका घ्यावी ?
आपल्याला याबद्दल काय वाटते ?
मला असे वाटते की - मी जर आस्तीक असलो तर साहजीकच शेकडो वर्षांपासुन चालत असलेली परंपरा जी पाळण्याने कुणाचेही नुकसान नाही ती मोडन्याचे काही कारण नाही. मी जर नास्तीक असलो तर शनीच्याच काय तर कुठल्याच मंदिरात जाण्याचे कारणंच काय ?
सुज्ञ मिपाकरांच्या प्रतिक्षेत....
प्रतिक्रिया
28 Jan 2016 - 8:04 pm | संदीप डांगे
मी पैला. पॉप्कॉर्न प्लीज! मसाला मारके (प्राडॉ.साठी एक लार्ज टब)!
28 Jan 2016 - 8:46 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बर्फ आणि सोडा लागेल. चखण्याला काय आहे ? तिकडे ड्राय काबुली चना मिळतो का ? चकल्याही चालतील. :)
-दिलीप बिरुटे
28 Jan 2016 - 8:51 pm | विजय पुरोहित
सध्या बेस्ट ब्रांड बकार्डी ब्लॅक रम आहे. चखण्याला स्वीट अॅण्ड सोअर ड्राय चना...
बर्फ सोडा तयार आहे...
या सायबांनू...
28 Jan 2016 - 8:53 pm | संदीप डांगे
ब्रांड तुम बोले वो. चखणेमें भुना हुवा लहसुण और चना, स्पेष्यल मसाला मारके! ऑर्डर प्लीज!
28 Jan 2016 - 9:25 pm | कैलासवासी सोन्याबापु
गाववाले,
राजहंस ढाब्यावर जाने झाले कधी इंजीनियरिंग कॉलेज बाभुळगाव मधी तर, तिथलचे चना रोस्ट खासान! तंदूरी चिकनच्या दहीवाल्या मॅरिनेशनवाल्या मसाल्यात घोयलेले रायतेत! बंबाट आइटम हाय!
28 Jan 2016 - 9:43 pm | तुषार काळभोर
गणपाभौंच्या सौजन्याने
अन् आमचं आवडतं
अन् तोंडी लावायला
28 Jan 2016 - 10:21 pm | संदीप डांगे
जेव्याच्या टायम्बाले तुम्ही अशे आतरंगी काय तरी सांगता. आता जा लागीनच.
पैलवान भौ! रैवारी कोंबडी हाय मंग आता...
पेटोता लेको जाणून बुजून. निरा सुत नायी तुम्हाले. धागा आपला देवादिकाचा आन् चिकन-मटन-दारूच्या गोठी करू रायले. कुटी फेडसाल हे पापं?
29 Jan 2016 - 10:46 am | तुषार काळभोर
चौथर्यावर ?
28 Jan 2016 - 11:17 pm | भंकस बाबा
नाय म्हटल मिपावर काही आस्तिक मानसं पण हायित
28 Jan 2016 - 8:55 pm | राँर्बट
ओल्ड माँक!
28 Jan 2016 - 9:18 pm | कैलासवासी सोन्याबापु
ओनली ओल्ड मोंक!!!
+१११११११११११
29 Jan 2016 - 10:22 am | अद्द्या
या धाग्यावर प्रतिसाद फक्त ओल्ड मोन्क दिसला म्हणून
29 Jan 2016 - 12:46 pm | ओल्ड मोन्क
आला....
29 Jan 2016 - 4:27 pm | महासंग्राम
कारण बदल हि काळाची गरज आहे.
28 Jan 2016 - 8:11 pm | विजय पुरोहित
मुळीच जाऊ नये...
काही परंपरा या अनुभवावर तयार झालेल्या असतात...
त्यात बदल करणे घातकच ठरते...
मुळात अनेक हिंदु देवता या अगदी अनप्रेडिक्टेबल आहेत व त्यांना चुकीच्या पद्धतीने अॅप्रोच झाल्यास हटकून त्रास होतोच...
हिंदु धर्मात महिलांसाठी दुर्गा, गणपती, भोलेनाथ, महालक्षमी, सत्यनारायण, कृष्ण, श्रीराम वगैरे अनेक सौम्य देवता आहेत. त्यांना सोडून या कडक देवतेचा हट्ट धरणे अनावश्यक आहे...
28 Jan 2016 - 8:17 pm | विजय पुरोहित
हिंदु धर्मातील प्रत्येक देवता ही वेगवेगळ्या स्वभाव, गुणधर्म, वैशिष्ट्ये, मेंटॅलिटी यांचे प्रतिनिधित्व करते आणि जर तुम्हाला ते सूट होत नसेल तर रामराम करणेच शहाणपणाचे आहेत.
मी स्वतः याबाबत अनेक अनुभवांतून गेलो आहे आणि त्यातूनच सांगतो की वर उल्लेख केलेल्या सौम्य देवता या सर्वांसाठी अतिशय स्यूटेबल आहेत.
कारण नसताना अवघड वाटेवर जाऊ नये हा कळकळीचा सल्ला...
28 Jan 2016 - 8:31 pm | विजय पुरोहित
मुळात हिंदु भक्तीमार्ग हा महर्षी पतंजलींच्या योगसूत्रांवर आधारीत आहे की ज्यात स्पष्टपणे म्हटले आहे:
"तुम्ही ज्याचे ध्यान करता तसे तुम्ही बनत जाता."
मग आता सांगा की एखाद्या संसारी स्त्रीने या विरागी, निरपेक्ष, ब्रह्मानुसंधानी देवतेचा हट्ट धरण्याचे कारण काय?
मुळात अनेक पुरुष तिथे जातात ते पण चुकीच्या समजुती ठेवून जातात.
शनीमहाराज अतिशय काटेकोर हिशेब मांडतात. आणि जे निगेटीव्ह कर्म असेल त्याचा पाॅझिटीव्ह पर्याय तुम्हाला गोरगरीब, अंध अपंग, समाजाने तिरस्कृत केलेले व्यक्तीसमूह यांची सेवा करुनच परतफेड करावा लागतो.
तिथे ढोंग करुन उपयोग नाही. एक नारळ आणि १०-५ रुपयाची देणगी देऊन निगेटीव्ह कर्म नष्ट होत नाही.
तर ते मनापासून आपल्या चुका मान्य करून पुढे वर्तणूक सुधारणे यातूनच नलीफाय होते...
28 Jan 2016 - 8:56 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
राहु आणि शनी यांची युती झाली अन तो एकदा कोणत्या तरी घरात बसला की अरारा मग लै त्रास. दिवसातून दोनदा सोग्यानी डोळे पुसावे लागतात.
शनिचा त्रास टाळायचं असेल तर स्नान झाल्याबरोबर एक मंत्र सात वेळा म्हणावा लागतो. (मंत्र सांगायची फ़ीस घेतो मी) आपल्या आयुष्यात एका महिन्यात सुख, समृद्धि आणि शांती नै लाभली तर फ़ीस परत. घरात बरकत राहते. ज्यांना मुलबाळ नसेल त्यांना मुलं होतात. नौकरीत प्याकेज चांगलं मीळतं. नवरा बायकोचे सबंध मधुर होतात. महिलांना सासू सास-यांचा त्रास कमी होतो. मुला-मुलींसाठी चांगली स्थळे येतात.
-दिलीप बिरुटे
(अंदाजपंचे पुरोहीत) :)
28 Jan 2016 - 9:02 pm | विजय पुरोहित
सर मी वरच म्हटले आहे की असल्या भंगार उपायांनी प्रसन्न होणारी ती देवता शनीमाऊली नव्हे. त्यांना फक्त तुमचे उत्तम कर्म आणि इतरांशी तुम्ही कसे माणुसकीने वागता हेच पहायचे असते...
आणि त्यात तुम्ही चुकला तर be ready to taste the bitter fruits...
Then you have no option...
You have to go through it...
No other options are available...
28 Jan 2016 - 9:38 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
शनेश्वर असू देत नै तर आणखी कोणी. देव कोणाचं वाईट करणार नाही. (जर तो असेल तर)
आपली मस्ती आणि परिस्थिती कुठे तरी आडवी येते आणि त्याचा संबंध ग्रह तारे आणि देवदेवतांशी लावल्या जातो.
बाकी, जिथे जिथे पुरुष जात असतील तिथे तिथे महिलांना येऊ द्या.
आमचा महिलांना फुल सपोर्ट आहे.
आपलं एक निवेदन देऊन टाकू मिपाकरांच्या वतीने हाय काय अन नाय काय ?
-दिलीप बिरुटे
28 Jan 2016 - 9:45 pm | टवाळ कार्टा
मग हेच्च उलट करायला प्रतिबंध का? :)
28 Jan 2016 - 9:47 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
जिथे जिथे महिला जात असतील. (अपवाद सोडुन द्या)
तिथे तिथे पुरुषांनाही प्रवेश देण्यात यावा. ;)
-दिलीप बिरुटे
29 Jan 2016 - 1:52 pm | चिनार
हे वाक्य फारच आवडल्या गेले आहे. क्या बात है !
बाकी धाग्याच्या विषयावर आमचे काहीही मत नाही . जो जे वांछील तो ते लाहो !!
28 Jan 2016 - 8:22 pm | विवेकपटाईत
घरातल्या कडक लक्ष्मीने शनी सारख्या कडक देवतेची उपासना करून त्याला प्रसन्न केले तर बिचार्या नवर्यांचे काय हाल होतील. बहुतेक या साठीच महिलांना मज्जाव केला असेल.
बाकी घरातल्या कडक लक्ष्मीला घाबरून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी हि समर्थन केल्याचे ऐकले आहे.
28 Jan 2016 - 8:23 pm | यशोधरा
सुज्ञ मिपाकरांच्या प्रतिक्षेत.... >> उका, ह्ये वागनं बरं नव्हं!
सगळ्यात वरच्या फांदीवर बसून बघत आहे! पॉपकॉर्नचा बुधला आहेच.
28 Jan 2016 - 8:37 pm | पैसा
मी पण, मी पण!
सगळेच जण पॉपकॉर्न शोधताहेत. आखाड्यात कोण उतरेना!
28 Jan 2016 - 8:42 pm | विजय पुरोहित
ओ पैतै...
आम्ही केवढी मोठ्ठी उडी मारलेय की आखाड्यात...
त्यावर कुणीच काय बोलेना...
:(
28 Jan 2016 - 8:29 pm | संदीप डांगे
उगा, ही चर्चा आधीच एका धाग्यावर झाल्याचे स्मरते. त्यामुळे धागा आला नसेल. तरी नव्या घडामोडींसकट नव्या चर्चा घडायला पुर्ण वाव आहे. शनिचौथर्यावर प्रवेशासाठी महिला सक्षमीकरणवाल्यांनी मोर्चा, आंदोलन करणे म्हणजे 'बॉम्बींग फॉर पीस' असा प्रकार आहे.
असो. आम्ही पॉप्कॉर्नच्या प्रतिक्षेत आहोत. लार्ज टब यायला वेळ लागेल बहुतेक!
28 Jan 2016 - 8:32 pm | विजय पुरोहित
डांगे अण्णा असा नाय करुचा...
तुमचा मत मांडूकच होई...
आमकापण वाचुचा असा तुमचा मत...
28 Jan 2016 - 8:43 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पुरुषांनाही चौथा-यावर जाऊन दर्शन घेता येत नै आता. लांबूनच पूजा-यांच्या हातात तेल द्यावं लागतं आणि दुरुनच दर्शन घ्यावं लागतं. मी खुप वर्षापूर्वी ट्रिप घेऊन गेलो होतो तेव्हा सर्रास चौथा-यावर जाऊन शनेश्वराचं दर्शन घेता येत होतं. एकदा पुरुषांना चौथा-यावर जाऊ द्या मग महिलांना दर्शनाला घेऊन जाऊ. (वाक्यात घोळ होतोय काहीतरी) शनीचा त्रास महिलांना जास्त होतो विशेषत: असो, असे म्हणतात. माझा काही शनीवर विश्वास नाही. पण मी रिस्क घेत नै. ;)
गुलशनकुमार आणि अनुराधा पौड़वाल यांनी शिंगनापुरच्या या शनेश्वराचं महत्व वाढवलं. नसता तिथे अजिबात गर्दी नसायची.
-दिलीप बिरुटे
28 Jan 2016 - 8:49 pm | विजय पुरोहित
बिरुटे सर, शनीमाऊलीचा त्रास स्त्रियांना जादा होतो ही फार फार फार चुकीची इन्फो आहे...
कुठल्याच हिंदु धर्मशास्त्रात असा रेफरन्स मला तर मिळाला नाहिये...
शनीमाऊली फक्त व्यक्तीने केलेल्या चुकीच्या कर्माबद्दल त्याला इक्व्हीव्हॅलंट पीडा करून ते कर्म नलीफाय करतात...
शनीमाऊली कुणालाच मुद्दामहून त्रास देत नाहीत. त्यांचा हेतु फक्त आपले वाईट कर्म शून्य करणे हाच्च असतो आणि जेव्हां तसं होतं तेव्हा त्यांच्यासारखा देणारा तोच...
अगदी छप्पर फाडके देतात...
28 Jan 2016 - 9:03 pm | माहितगार
युनिक फिचरचा लेख क्रमांक १, लेख क्रमांक २
28 Jan 2016 - 8:48 pm | माहितगार
उगाजी या धाग्यावर हा विषय आधी हाताळला गेला आहे. नवीन धाग्यातून मागच्या/नव्या पानावरून पुढे जाण्यास आमची ना नाही.
28 Jan 2016 - 8:56 pm | उगा काहितरीच
मी मिसला होता तो धागा . खफवर बोललो होतो अगोदर याविषयी . जौद्या होउद्या डेडीकेटेड धाग्यावर चर्चा त्या धाग्यात अजून बरेच मुद्दे होतेना.
28 Jan 2016 - 8:58 pm | विकास
चेपु वर खालील माहिती बघण्यात आली...
अभिजीत साधले नामक एक आर्किटेक्ट या देवळाच्या नुतनीकरणाच्या कामात आहे. त्यांनी दिलेली ही माहीती आहे. त्यापेक्षा जर काही वेगळी (उलट) माहिती इतरांना असेल तर ती अवश्य सांगावीत...
28 Jan 2016 - 9:08 pm | विजय पुरोहित
विकास सर...
प्लीज स्वलिखित माहिती द्यावी. विषय खूप काॅम्प्लिकेटेड आहे. यात काही लक्षात येईना...
28 Jan 2016 - 9:39 pm | विकास
"जे नाही ते आहे, असे वाटणे म्हणजे माया" :) घटनेतले वास्तव वेगळे आहे का काय असे मी जे वर फोटो चिकटवलेत त्यावरून वाटते. कारण त्यात त्या देवळाच्या आर्कीटेक्टने दिलेल्या जाहीर माहितीनुसार अशी काही बंदी आता अस्तित्वातच नाही. मग या कोण ज्या बायका निदर्शने करत आहेत, त्या कशासाठी? हे कळत नाही.
त्याच बरोबर, जर अजून मंदीर ट्रस्टने हेच जाहीरपणे सांगितले नसेल तसेच मुख्यमंत्री पण "कालानुसार प्रथा बदलायला हव्यात" अशा पद्धतीचे या संदर्भात विधान करत असतील तर त्याचे कारण काय? का ते देखील नुसत्याच पेपरातल्या बातम्या बघून ठरवत आहेत, हे समजत नाही...
कुठल्याही प्रार्थना स्थळात सगळ्यांना प्रवेश असावा असे माझे मत आहे. हळू हळू तसे होत आहे पण हळू हळूच... याचे एक चांगले उदाहरण म्हणजे तिरूपती संस्थान आता दलीतांना पुजाअर्चा करण्याचे (पुजारी होण्याचे) शिक्षण देऊन त्यांना देखील सामावून घेत आहे.
त्या उलट एक ऐकीव गोष्टः एक कुटूंब आपल्या लहान मुलीला घेऊन कुळाचारानुसार कोल्हापूरच्या आंबाबाईच्या पुजेसाठी घेऊन गेले. पण पुजार्यांनी मुलगी असल्याने तिच्या हातून का तिच्यासाठी म्हणून पुजा करण्यास (प्रथेनुसार) नकार दिला. हे आजच्या काळात देखील होत आहे...
कधी काळी तत्कालीन पंतप्रधान इंदीरा गांधींना पुरीच्या देवळात देवदर्शनाला जायचे होते. पण देवस्थानाने त्यांना प्रवेश नाकारला. कारण त्यांनी पारशी माणसाशी विवाह केला होता म्हणून! त्यांना तो शेवटपर्यंत मिळाला नाही.
पण हे केवळ हिंदूंच्या विशिष्ठ देवस्थांपुरतेच मर्यादीत नाही. हजीअली संदर्भात गडबड चालू केली आहेच. मक्का-मदीनेस केवळ मुस्लीमच जाऊ शकतात. ख्रिश्चन लोकांच्या मॉर्मन पंथातील चर्चमधे केवळ मॉर्मनच जाऊ शकतात. (मला वाटते अगदी कोणी मॉर्मन झाले तरी तात्काळ सगळ्या चर्च/देवळात जाता येत नाही. परवानगी लागते आणि खात्री केल्यावरच मिळते).
हे झाले देवळांचे... आता किंचीत वेगळे, ते म्हणजे मुंबईतल्या कुठल्यातरी आलिशान क्लब/हॉटेलमधे एकदा एम एफ हुसैन अनवाणी गेले होते. (वेष पण अर्थातच नेहमीसारखा साधाच असेल) तर त्यांना देखील परवानगी दिली नव्हती. परत पाठवले होते. असे अनेक ठिकाणी नियम असतात जेथे अमुक कपडे घातलेले नसले तर चालत नाही वगैरे...
त्यामुळे हे आक्षेपार्ह असले तरी कळपसंस्कृतीचा भाग आहे. केवळ एका अथवा सर्व धर्मालाच जबाबदार ठरवून संपणार नाही. असो.
28 Jan 2016 - 10:54 pm | गामा पैलवान
विकास,
खाजवून खरूज काढणे ते हेच. हे कम्युनिस्टांचे व्यवच्छेदक लक्षण आहे. लोकं गुण्यागोविंद्याने नांदलेली त्यांना बघवत नाहीत. कुठूनतरी कसलंतरी खुसपट काढून भांडणं लावल्याखेरीज त्यांना चैन पडंत नाही. तस्मात भूमाता ब्रिगेडीस शनीच्या चौथऱ्याकडे जाण्यास प्रतिबंध करण्यात यावा. (पोलिसांनी तसा तो केलेला आहेच). तसेच तृप्ती देसाई यांच्याकडे दुर्लक्ष करणे हितावह आहे.
आ.न.,
-गा.पै.
28 Jan 2016 - 10:56 pm | विजय पुरोहित
सहमत...
समाजातील ईतर महत्वाच्या प्रश्नांचा विसर पडून या भुक्कडांना फक्त असल्याच गोष्टी महत्वाच्या वाटतात...
28 Jan 2016 - 9:13 pm | माहितगार
युनिक फिचर लेख
28 Jan 2016 - 9:40 pm | विकास
Page not found :)
28 Jan 2016 - 10:13 pm | माहितगार
http://uniquefeatures.in/blogs/सुहास-कुलकर्णी/वक्रदृष्टी
28 Jan 2016 - 8:58 pm | राँर्बट
काही मूलभूत भाबडे प्रश्न,
मशिदीत स्त्रियांना प्रवेश मिळावा म्हणून भूमाता ब्रिगेड कधी आंदोलन करणार आहे?
आजवर एकही स्त्री पोप झालेली नाही. भूमाता ब्रिगेड याबद्दल काय करत आहे?
28 Jan 2016 - 9:05 pm | पैसा
आज हाजीअलीला महिलांना प्रवेश मिळावा यासाठी निदर्शने, आंदोलन झाले. बातम्या येत आहेत. कोण करत आहेत माहीत नाही.
28 Jan 2016 - 9:12 pm | मारवा
पैसा जी
तुम्ही सांगा फक्त तुमच्या साठी काय आणु ?
आले लिंबु मिश्रीत नगरी उसाचा ताजा घुंगुरवाळा रस ?
की मलई वाली लबाबदार लस्सी ?
की मग गुणकारी नैसर्गिक निशापुर्व निरा
की गार गार लिंबु शरबत ?
नैत ते पाश्चात्य च हव असेल तर अंगठाअप पण आणतो
पण तुम्ही अस स्फोटक संदर्भ वगैरे नका देऊ बर
28 Jan 2016 - 9:29 pm | टवाळ कार्टा
पुण्यात नेउन पुणेकराच्या पैशांनी चहा पाजा =))
28 Jan 2016 - 9:32 pm | यशोधरा
पुण्याचा चहा लईच फ्येमस झालाय!
28 Jan 2016 - 9:42 pm | मारवा
मला बनवता येतो साहेब चहा उत्तम
दार्जीलीग ची माकाइबारी चाय पत्ती आहे माझ्या कडे
त्यासाठी पुण्यात का जायला हव ?
अमृततुल्य नव्हे अमृत चा च आग्रह आहे.
28 Jan 2016 - 10:14 pm | पैसा
ठांक्यू ठांक्यू!!
28 Jan 2016 - 9:09 pm | तर्राट जोकर
हे भाबडे प्रश्न घेऊन वेगळा धागा काढा. दोन मुद्दे मिसळू नका.
28 Jan 2016 - 9:11 pm | माहितगार
हि बातमी वाचलीत का ?
28 Jan 2016 - 10:26 pm | माहितगार
@रॉबर्टराव हा लेखपण तुमच्या मताची दखल घेत असावा
28 Jan 2016 - 10:10 pm | स्रुजा
अजुन एक सुपर मुलभूत प्रश्नः शनिच्या चौथर्यावर कुणाला जायचंय ?
28 Jan 2016 - 10:26 pm | यशोधरा
कशासाठी, हे पण अॅडवा.
28 Jan 2016 - 10:27 pm | स्रुजा
होय होय.. सो हे प्रश्न :
इथे जायचंय कुणाला शनिच्या चौथर्यावर ? कशाला जातात म्हणे आणि ? ;)
28 Jan 2016 - 10:47 pm | टवाळ कार्टा
29 Jan 2016 - 10:41 am | अन्नू
कशा दिल्या?
1 Feb 2016 - 2:32 pm | राजेंद्र मेहेंदळे
हे वाचा
http://maharashtratimes.indiatimes.com/nation/shani-is-not-god-says-shan...
1 Feb 2016 - 2:33 pm | राजेंद्र मेहेंदळे
प्रतिसाद स्रुजा यांना
3 Feb 2016 - 12:50 am | स्रुजा
वाचला लेख. आता ही बातमीदाराची चूक आहे की शंकराचार्यांचं निवेदन च असं आहे कोण जाणे पण धर्माचा अधिकार वेगळा अस्तो आणि तो परंपरा आणि मान्यतांवर चालतो हे म्हणताना , त्या मान्यता बदलायची वेळ आलीये हे त्यांनी मान्य करु नये किंवा अॅक्नॉलेज करु नये ही दुर्दैवाची गोष्ट आहे.
3 Feb 2016 - 12:54 am | संदीप डांगे
स्रुजातै, त्यांनी शनीची पुजाच करु नये ही 'नवी मान्यता'च सांगितली आहे ना?
3 Feb 2016 - 1:02 am | स्रुजा
अहो पण कंडिशनल मान्यता आहे ती. अशा अनेक मान्यता आहेत आपल्या धर्मात. पण सरसकट धार्मिक अधिकार हे मान्यतेने येतात हे विधान आहे त्यांचं. वडिलांना अग्नी द्यायची मान्यता मुलाला नाही तर जावयाला. मुंज मुलाची होते. अशा अनेक मान्यता आहेत च की. त्या सगळ्याच या "ब्लँकेट स्टेटमेंट " मध्ये आल्या च ना.
3 Feb 2016 - 1:19 am | संदीप डांगे
एक स्टॅण्ड अलोन स्टेटमेंट जनरलाइज पद्धतीने पाहिलं तर फुल्ली चूक आहे. धार्मिक मान्यता आहे च्या नावाखाली घटनादत्त अधिकारही संपुष्टात येऊ शकतील. म्हणजे हे शरीया टैप व्हायचं. बाकी पाळायचे कंपल्शन असलेल्या रितीत बळजबरी किंवा भेदभाव नकोच हे मी आधीच सांगितलंय ह्या धाग्यावर. म्हणजे मुंज करायची जबरदस्ती नको वा न करायचीही. हल्ली अग्नी देण्याची मान्यताही बदलत आहे. काही महिन्यांआधीच नाशिकच्या स्मशानभूमीत (मी स्वतः तिथे हजर होतो) एका कन्येने आपल्या पित्याला अग्नि दिला आणि जमलेले सर्व ते जणू काही वेगळं घडतंच नाही अशा पद्धतीने वागत होते. ये शादी नही हो सकती च्या धर्तीवर ये अग्नी नही दे सकती असा कोणी विरोध केला नाही. म्हणजे काही प्रथा आहेत ज्या बदलायच्या म्हटल्या तर चटकन बदलू शकतात. बरेच लोक 'लोक काय म्हणतील' ह्या रोगाने ग्रस्त असतात अन् कुणीच काही करत नाही. सगळ्याना वाटते प्रथा बदलावी कोणीच बदलत नाही.
एक रामबाण उपायः जी प्रथा, परंपरा, मान्यता, रुढी पाळण्यावाचून गत्यंतर नसते तीला बदलल्यावाचून ठेवू नये.
बाकी शनीचौथर्याबद्दल आपले मत क्लिअर आहे. तिकडे स्त्रियांनीच का पुरुषांनी सुद्धा जाऊ नये.
3 Feb 2016 - 1:28 am | स्रुजा
अहो आपल्याला (तुम्हा-आम्हाला) काय वाटतं हा मुद्दा नाहीये. शंकराचार्य हे खुप मोठं धर्मपीठ आहे. त्यांनी विधान करताना मान्यता या एकुणात अधिकृतरित्या बदलायला हव्यात हा सूर ठेवलेला नाही. ही मान्यता मुळात चुकीची आहे आणि बाकी धार्मिक अधिकार हे मान्यता आणि परंपरेने चालत आलेले असतात असा कुठेतरी "आहे ते, सकारण!" असा अध्याहृत सूर वाटला.
आणि एक, विधान आहे , सरसकटीकरण नको हे अगदी मान्य म्हणुनच सुरुवातीला मी म्हणलं की हा बातमीदाराने काढलेला अर्थ आहे की खरोखर त्यांचं विधान हे माहिती नाही. त्यांचं विधान असेल असं जर गृहित धरलं तर पुरेसं नाही, एवढंच.
हिंदु धर्म तसा ही बराच पुढारलेला आहे आणि इतर धर्मांसारखे प्रत्येकाची वैयक्तिक मान्यता ( आस्तिक, नास्तिक, कर्मकांडं मानणं न मा न णं रविवारी देवळात जाणं किंवा कोणत्या देवळात जाणं, वगैरे) काही ही असोत तो माणुस हिंदु असु शकतो. तुम्ही म्हणाता तशा घटना मी देखील पाहिल्या आहेत पण काही कट्टर लोकं याच धर्मपीठांचा किंवा चालत आलेल्या परंपरांचा आधार घेऊन हे कसं चूकीचं आहे असा नवीन बखेडा उभा करु शकतात. कालानुरुप अनेक गोष्टी बदलल्या आहेत पण अधिकृतरित्या केल्या गेलेल्या विधानांचं वजन वेगळं असतं , इतकंच.
3 Feb 2016 - 3:01 am | संदीप डांगे
शंकराचार्यांना अधिकृत वैगरे काही किंमत नाही हिंदू धर्माचरणात, ते उगाच आजकाल टीवी-पत्रकारांचा बुळबुळाट झाला म्हणून नाहीतर शंकराचार्य हे इतिहासाच्या पुस्तकात असतात एवढाच समज होता माझातरी. चार सामान्य लोकांना शंकराचार्य कोण किंवा हा शंकराचार्य कोणत्या पिठाचा ते सांगता यायचं नाही. ते पीठ म्हणजे गव्हाचं का बाजरीचं विचारतील. ;-) मुळात हे शंकराचार्य सर्वसामान्य हिंदू धर्माचे कोणी लागत नाहीत. त्यांचा संसारच वेगळा, सामान्य हिंदूंशी त्यांचा संबंध नाही. ते आखाडे, मठ वैगरे योगी-साधु-सन्याशांचे-अध्यात्मिकांचे हे धर्मगुरु, त्यांनी सांगितलेले नियम तिकडे पाळतात, ते नियम पाळण्याची पात्रता अंगी येण्यास खास संस्कार-विधि असतात. सामान्य संसारी हिंदूंचा ह्यांच्या मतांशी काही संबंध नाही. आपले संसारी हिंदू कृपाकटाक्षासाठी ह्यांचे पाय धरतात तेवढाच काय तो संबंध. सामान्य हिंदूंनी काय करावे करू नये हे सांगण्याचा कोणताही शास्त्रिय अधिकार ह्या शंकराचार्यांना नाही. हिंदूंनीही त्यांची मते घराबाहेरच ठेवावी. याचे उदाहरण म्हणुन तुम्हाला लक्षात येईल की काही साध्वि, महंत इत्यादी टिनपाटांची काही वक्तव्ये प्रचलित हिंदू मान्यतांपेक्षा वेगळी असतात, कारण हे नॉर्मल समाजात कधी नसतातच. त्यांच्या कोंडाळ्यात सदैव राजकारण राजकारण खेळत असतात. त्यांची सत्ता मठ व त्याच्याशी संलग्नित आखाडे यांच्यापुरतीच. हिंदूंच्या घर-संसारात, चाली-रीतीत, कर्मकांडांत काही लुडबुड करण्याचा, उपदेश करण्याचा लिगल, मॉरल, नॅचरल, रिलीजियस कुठलाच हक्क नाही. कुणाला काही गैरसमज असतील तर कृपया आजच दूर करावे.
मुद्दा असा आहे की चाली-रीती, मान्यता ह्या काही धर्मगुरु ठरवत नाहीत हिंदूंमधे, ज्याला जसं वाटतं तसे वागतात, वागणार्यांची मेजॉरिटी वाढली की त्याचे नियम, मान्यता होतात. तो मोडणार्यांची मेजॉरिटी झाली की परत नियम बदलतात. हिंदूधर्माचं हेच खुप सॉल्लिड आवडतं मला. फक्त तेवढ्यासाठी अभिमान आहे. बाकी कट्टर लोकांना काय, जंगल पेटवायला काहीही पुरतं, लोक तसे सुज्ञ आहेत. पण आता अशा अडगळीतल्या धर्माचार्यांना पुढे आणून मुल्लामौलवी, पोप-बिपच्या जागी बसवण्याचे प्रकार होत असतील तर कठिण आहे. एक ते मक्का मदिना स्टाईल राममंदिर करायचं चाल्लंय उगाच. त्यात आणि हे. कहर आहे.
आधीच खूप गोंधळ आहे भारतात, त्यात ह्या मिडीयावाल्यांनी 'भगवे कपडे घातलेला कोणी दिसला की उकळ काहीतरी त्याच्याकडून वादग्रस्त', असा स्वतःच्याच घराला आग लावण्याचा प्रकार चालवला आहे. शनि चौथर्याप्रकरणी फक्त शनि-भाविकांचे मत विचारात घेतले जावे. असल्या असंबंधित लोकांना महत्त्व देऊ नये.
(कुंभमेळ्यानिमित्त ह्या आणि अशाच दुर्लक्षित विषयांवर लिहायचं होतं पण वेळ मिळू शकला नाही. बघुया कधी जमतंय ते, फार खोदकाम करायला लागतं.)
3 Feb 2016 - 3:12 am | स्रुजा
हे पहा, आपण त्यांना महत्त्व देण्याचा न देण्याचा मुद्दा नाहीये. आपली मतं पेपर मध्ये येतात का छापून? ज्यांची येतात त्यांनी हा विचार करुन मत व्यक्त करावं .
बाकी सूज्ञ कशाला महत्व द्यायचं ते त्यांचं ते ठरवतात. पण म्हणुन शंकराचार्यांसारखं कुणी विधानं करताना त्यांच्यावर असलेलं (विधानकर्त्यावर) त्याचं उत्तरदायित्व टळतं असं नाही.
3 Feb 2016 - 3:35 am | संदीप डांगे
स्रुजाताई, माझे प्रतिसाद तुम्हाला व्यक्तिगत उद्देशून नाहीत, गैरसमज नसावा. सामान्यपणे वाचकांना ठावूक असावं म्हणून लिहलंय. पेपरात असली विधानं वाचणारे माझंही विधान वाचतील, विचार करतील, चार जागी अजून सांगतील. आपल्यालाही जे व्यासपीठ मिळालंय ते का सोडावं?
ज्यांची मतं छापून येतात त्यांनी उत्तरदायित्वाचा विचार केला असता तर आणि काय पाहिजे होतं. मुख्य म्हणजे जे छापतात त्यांच्यावर हे उत्तरदायित्व असावं असं मला वाटतं. उद्या मिडिया कोणाही माकडाला उचलून विचारवंत, अधिकारी, तज्ञ, धर्मगुरू म्हणून छापेल (जे आज नाही करत असे नाहीच म्हणा) तर त्याचं उत्तरदायित्व त्या माकडावर येईल काय? खरं उत्तरदायित्व वाट्टेल तसा प्रसार करणार्यावर व त्यातून वाट्टेल तसा अर्थ काढणार्यावर असावे असे माझे मत आहे. कुठलीही न्युजएजंसी, वृत्तपत्र, वॄत्तवाहिनी आपण प्रसारित करत असलेल्या बातम्यांची जबाबदारी घेते. त्या बातम्यांद्वारे काही अफवा, कटुता, अनिष्ट समज, धार्मिक तेढ, तणाव पसरत असतील तर ती जबाबदारी पूर्णपणे त्या संस्थेची आहे. इथे या विशिष्ट केसमधे शंकराचार्यांच्या विधानाला तसा काही अर्थ नाही पण मीडियाने छापले म्हणून ते महत्त्वाचे झाले, अन्यथा तो तिकडे आपल्या शिष्यांसोबत सत्संगमधे काही-बाही बरळला तर आपल्याला काय कळतं? किंवा मागचेच त्याचे विधान की 'साई हा देव वैगरे नाही, लोकांनी त्याची पुजा, भक्ती करु नये.' बराच वाद झाला. साईभक्तांवर कणभर फरक पडला नाही. त्यामुळे तुम्ही जे उत्तरदायित्वाचं म्हणालात तेवढं सिरियस म्याटर नाहीये.
28 Jan 2016 - 9:07 pm | मारवा
राबर्ट क्या हुआ
ये भुमाता वाले मेरे पीछे पडे है
एक काम करो भागो
वही तो कर रहा हु लेकीन थक गया हु बॉस
एक काम करो
खो खो खेलो
कैसे ?
तुम उन्हे दुसरो के पीछे भगाओ
और खुद बैठ जाओ
खो
यु मीन प्रो कब्बडी जैसा प्रो खो खो
येस
राबर्ट येस्स
28 Jan 2016 - 9:10 pm | विजय पुरोहित
ऑ??? या टुकार प्रतिसादाचा अर्थ काय???
28 Jan 2016 - 9:10 pm | जेपी
चौथार्यावर महिलांना प्रवेश द्या अथवा न द्या माज्या बा च काय जातय! ;) गेलतर शिंगापुर वाल्याच जाई.
-इति सूर्य पुत्र सनी..;)
28 Jan 2016 - 9:29 pm | यशोधरा
जेपीदादूस इज बॅक! नेटपॅक नवीने का?
28 Jan 2016 - 9:13 pm | कंजूस
तुमच्या गावात वेगळा शनि लावाना.त्योच कशाला पाहिजे?डोकं काय कुठंही आपटता येतं.
28 Jan 2016 - 9:43 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
काही तरी चांगला विषय घ्या राव चर्चेला.
काय मजा नै आली या विषयावर. :(
-दिलीप बिरुटे
28 Jan 2016 - 10:18 pm | संदीप डांगे
इंपॉसिबल सन्यासः जेपी! असा धागा काढावा काय?
28 Jan 2016 - 10:23 pm | संदीप डांगे
जेपीसायबा, हलके घेणे: हे राहिलं
28 Jan 2016 - 9:49 pm | जेपी
महिलांना शनी चौथार्यावर प्रवेश द्यावा का ?>>
अजिबात देऊ नये ..जी परंपरा आहे त्याला चालु द्या..
नायतर " बापा परीस बाप गेला,बौबंलताना हात गेला" अशी अवस्था व्हायची शिंगापुर वाल्याची ;)
आता सत्कार होईल.
28 Jan 2016 - 9:53 pm | विजय पुरोहित
जेप्या काय कळ्ळं नाय रे माका मेल्या...
सपष्ट बोल की मेल्या...
मांत्रिक...
28 Jan 2016 - 10:26 pm | विजय पुरोहित
धागा रंगात आला चांगलाच...
28 Jan 2016 - 10:36 pm | अजया
अंधश्रध्दा पाळायची असमानता दूर करण्याचे आंदोलन!
काय मिळणार हे करुन?
असो.मी पाॅपकाॅर्न घेऊन वरच्या फांदीवर जाऊन बसते कशी!
28 Jan 2016 - 10:51 pm | टवाळ कार्टा
28 Jan 2016 - 10:52 pm | स्रुजा
याच का त्या संस्कृती बुडवणार्या मिपा बायका??? काय मेल्या अगोचर आहेत..
28 Jan 2016 - 10:54 pm | टवाळ कार्टा
तुम्हीच विचारा की...झाडांवर तुम्हीच जौन बस्लायत
28 Jan 2016 - 10:55 pm | स्रुजा
तू अभ्यास वाढीव.. लाटकर काकांना विचारायचे असे प्रश्न..
28 Jan 2016 - 11:01 pm | टवाळ कार्टा
खिक्क...नक्को...
28 Jan 2016 - 10:57 pm | काळी मावशी
अशा बायका असतात का मिपावर ?
अशा पवित्र विषयाच्या धाग्यावर असली चेष्टा शोभते का?
तुमचा विश्वास नसेल पण आमचा आहे ना.
28 Jan 2016 - 11:00 pm | स्रुजा
होय हो, म्हणुन तर बुडते संस्कृती.
28 Jan 2016 - 11:02 pm | पैसा
कोणीच वाचवली नाही?
28 Jan 2016 - 11:03 pm | स्रुजा
नाय गं वर पॉपकॉर्न खाता खाता संसकृती चं मेलं डोक्यात च नाही आलं बघ ..
29 Jan 2016 - 10:45 am | सस्नेह
हे सगळे मिपा पुरुष झाडाखाली उभे राहून संस्कृतीकडे लक्ष ठेवायचे काम करत असल्याने झाडावरील सदस्यांना पॉपकॉर्णकडे लक्ष ठेवणे हेच्च काम !
29 Jan 2016 - 4:30 pm | अजया
संस्कृती कुठे आहे फोटोत? तिचं पुढे काय झालं ?
29 Jan 2016 - 4:35 pm | सस्नेह
ती बुडाली नाही का ? :)
29 Jan 2016 - 4:37 pm | यशोधरा
किती तो दुत्तपणा! जखमेवर मीठ का काय ते! अगं, बुडाली ना ती?
29 Jan 2016 - 4:40 pm | अजया
इतके महान मिपापुरुष असताना बुडालीच कशी ती :-/
29 Jan 2016 - 4:50 pm | यशोधरा
पाईंटाचे मुद्दे काढु नयेत!~ महानादेशावरुन!
29 Jan 2016 - 5:35 pm | टवाळ कार्टा
निदान झाडाची आयडीया तरी कॉपी नव्हती करायची :)
28 Jan 2016 - 11:03 pm | टवाळ कार्टा
आणि मग काळ्या मावशीकडे चोर येतो =))
28 Jan 2016 - 11:01 pm | टवाळ कार्टा
तुम्ही अकुंच्या कथेतल्या ना? =))
28 Jan 2016 - 11:04 pm | काळी मावशी
जिमो आमचे मायबाप. हे अकु कुठून काढले?
28 Jan 2016 - 11:07 pm | विजय पुरोहित
मुद्दा बरोबर गं मावशे...
टका कै पण विचारतो....
28 Jan 2016 - 11:10 pm | टवाळ कार्टा
खिक्क....अर्रे हो....मी मध्ये मिपावर नव्हतो ना ;)...म्हणून विसरलो =))
29 Jan 2016 - 3:46 am | स्रुजा
पण त्या दिवशी तर म्हणालास तुला सगऴ्या खबरी पोहोचत होत्या बराब्बर म्हणुन ? :प
29 Jan 2016 - 3:49 am | टवाळ कार्टा
आपण एकाच टिमचे ना...अस्स नै कर्यायचे :)
29 Jan 2016 - 4:21 am | स्रुजा
हॉ ! दुसर्या टीम मध्ये कोण कोण आहेत ते सांग आधी ;)
29 Jan 2016 - 2:35 pm | बोका-ए-आझम
वाईट सवय हो!
29 Jan 2016 - 10:06 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नो नाय नेव्हर !
-दिलीप बिरुटे
28 Jan 2016 - 11:03 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
टक्या उभ्या लायनीतली वरुन दुसरी आणि आडव्या लैनीतली डावीकडुन पहिली.
आय कॉल डिब्ज मेट.
29 Jan 2016 - 2:50 am | गामा पैलवान
हातात काठ्या कसल्या? मासे पकडायला झाडावर चढल्यात की काय?
-गा.पै.
29 Jan 2016 - 10:48 am | संदीप डांगे
बुडणार्या संस्कृतीला वाचवायला काठीचा आधार द्यायला आहेत त्या काठ्या...
28 Jan 2016 - 10:40 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
डबा रिकामा झाला रे.
28 Jan 2016 - 10:43 pm | स्रुजा
तू मेल्या, कधी ही बुड हलवुन पॉपकॉर्न आणायला जाऊ नकोस, पाप लागेल जणु. बसल्या जागेवरुन मिपा बायकांनी आणलेले पॉपकॉर्न हादडतोस, शोभतं का तुला? मामो- विदाऊट आमचे हे - मोड ऑफ ;)
28 Jan 2016 - 10:43 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
बेअरिंग जमलं नाही.
१० पैकी २ मार्क
(प्रा. डाँचा नाठाळ इद्यार्थी) कॅजॅस्पॅ
28 Jan 2016 - 10:48 pm | स्रुजा
मुद्दा बेअरिंग चा नाहीये.. मुद्दा तू आमचे पॉकॉ खाण्याचा आहे, जा दे आमचे पॉकॉ आणुन. आम्ही हालणार नाही, तेव्ढ्यात धागा उडला तर काय करा?
28 Jan 2016 - 11:05 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
शनीम्हाराजा ह्या पॉकॉखाउ बैकांना पॉकॉ आणायची बुद्दी दे रे म्हाराजा.
28 Jan 2016 - 11:15 pm | स्रुजा
शनिम्हाराज आम्हाला चौथर्यावरुन हटवण्यात बिझी हाईत.. ते पॉकॉ काय ते तुमचं तुम्ही सांभाळा असा निरोप धाडलाय त्यांनी.
28 Jan 2016 - 10:41 pm | विजय पुरोहित
इतका इंटरेस्टींग धागा आणि स्वप्नांची राणीतै, कतार अजून कशा आल्या नाहीत. त्या आल्या तर धाग्यावर अजून जोरदार तडका पडेल...
28 Jan 2016 - 10:44 pm | विजय पुरोहित
काॅलिंग स्वरातै, कतार....
आप कतार में है...
28 Jan 2016 - 11:12 pm | सतिश गावडे
तुम्ही कोणाचा आणि कितवा मिपावतार आहात?
28 Jan 2016 - 11:14 pm | विजय पुरोहित
ओ सगादादा...
खफ उघडून बघा की मी मांत्रिक आहे म्हणून मी कबूल केलंय की...
माझा मांत्रिक हा आयडी मी ब्लाॅक केलाय स्वतःच...
28 Jan 2016 - 11:19 pm | सतिश गावडे
खरडफळा म्हणजे काय मिपा चित्रगुप्ताची* डायरी आहे का सगळ्या नोंदी तिथे पाहायला? :)
असो, तुमचे या धाग्यावरील प्रतिसाद वाचून तुम्ही "निरागस आस्तिक" आहात की उगाच टिवल्या-बावल्या करत आहात अशा दुविधेत पडलो आहे.
*हे पॅरीसवाले कालसर्पयोगवाले चित्रगुप्त काका नव्हेत.
28 Jan 2016 - 11:23 pm | विजय पुरोहित
अहो सगासाहेब...
आस्तिक असलो तरी कधी गंमत करु नये का?
आणि माझे पहिले प्रतिसाद माझे आस्तिक नेचरच दाखवतात...
28 Jan 2016 - 11:34 pm | सतिश गावडे
>> आस्तिक असलो तरी कधी गंमत करु नये का?
नाही. आस्तिकानं कसं देवासारखं शांत बसलं पाहीजे. ;)
>>आणि माझे पहिले प्रतिसाद माझे आस्तिक नेचरच दाखवतात...
म्हणजे तुम्ही "निरागस आस्तिक" आहात. :)
28 Jan 2016 - 11:11 pm | सतिश गावडे
अगदी माझ्या मनातलं लिहीलंत.
का कोण जाणे, मला अत्रेंच्या "प्रेमाचा गुलकंद" कवितेतील "तुम्हीच उकला बिंग यातले काय असावे ते" ही ओळ आठवत आहे. :)
29 Jan 2016 - 12:51 pm | बाळ सप्रे
प्रश्न शनि चौथर्यावर जाउन काय होतं अथवा होत नाही असा नसून, कुठल्यातरी थातुरमातुर कारणांनी स्त्रीयांवर निर्बंध घालण्याची प्रवृत्ती बोकाळू नये म्हणून आंदोलनाला पाठिंबा.
वरील २ प्रश्नांच्या उलट पद्धतीने विचार करुन पहा.
आस्तिक असल्यास.. शनिच्या कृपेपासून स्त्रीयांना का वंचित ठेवावे..
नास्तिक असल्यास.. स्त्रीयांनी तेथे गेल्याने काय कोणाचे वाकडं होतं ते बघुया ना..
29 Jan 2016 - 2:48 pm | उगा काहितरीच
बाळ सप्रेजी , प्रतिसादाबद्दल धन्यवाद . पण आपले मुद्दे पटले नाही.
आस्तीकासाठी:- शंकराचार्य जर म्हणत असतील तर मानण्यात अर्थ असेल ना ! शिवाय परंपरा आहेत आपल्याच तर पाळू ना. उदाहरणार्थ परभणी जिल्ह्यातील एक गाव आहे पोखर्णी नावाचे. तिथे नृसिंहाचे जागृत देवस्थान आहे. तिथे अशी परंपरा आहे की पुरूषाने कमरेवरचे वस्त्रे काढूनच दर्शनाला जायचे (अगदी बनियनही काढावी लागते) मी जर पक्का आस्तीक असलो ना तर ही परंपरा मोडन्याचे काहीच कारण नाही.
हे म्हणजे "आम्ही चप्पल घालून मंदिरात जाणार ! पाहु देव आमचं काय वाकडं करतो ते असं झालं." त्यांच कदाचित काही वाकडं होणार नाही. पण जे हजारो आस्तीक ती परंपरा पाळतात त्यांच्या भावना दुखतील त्यांच काय ? शिवाय "आमचाच" शनीदेव दिसला का अंधश्रद्धा निर्मुलन करायला .अजूनही बरेच ठिकाणी स्त्रीयांना प्रवेश नाही . मग तेथून कराना सुरूवात .
असो!
माझे वैयक्तिक मत असे आहे की आपल्याकडे सार्वजनिक देवस्थानांचे काही सर्वमान्य नियम आहेत. जसेकी गुरूद्वार्यात जाताना डोक्यावर कपडा पाहिजे . मंदिरात जाताना चप्पल नाही पाहिजे इत्यादी . त्या नियमांचे पालन करताना कुणाला विशेष त्रास पडत नसेल, कूणाला इजा होत नसेल तर चालू ठेवन्यात प्रॉब्लेम काय आहे.
29 Jan 2016 - 3:02 pm | बाळ सप्रे
नियम आणि discriminiation यात फरक आहे..
चप्पल न घालता जाणे ह नियम असु शकतो, ज्यात स्वच्छता राखणे हा हेतु दिसतो.
पण स्त्रीयांनी येउ नये हे discriminiation आहे..
परंपरा एका गटासाठी अन्यायकारक असतील तरिही मोडण्याचे कारण दिसत नाही ??
29 Jan 2016 - 3:22 pm | उगा काहितरीच
Discrimination (भेदभाव) हा स्त्री-पुरूषात राहणारच साहेब. प्रत्येक ठिकाणी समानता शक्यच नाही. हं याचा अर्थ असा नाही की पुरूष हे स्त्रीपेक्षा वरचढ वगैरे आहेत. काही बाबतीत स्त्रिया या नेहमीच पुरूषांच्या पुढे असणारच! मग काही बाबतीत पुरूष महिलांच्या पुढे (अगदी थोड्या प्रमाणात का होईना) असतील तर कुठे बिघडले ?
29 Jan 2016 - 3:26 pm | विजय पुरोहित
सहमत उ.का. साहेब...
प्रत्येकाचे स्वतःचे + किंवा - आहेत. त्या त्या +/- ची जाणीव व आदर असावा.
29 Jan 2016 - 3:31 pm | बाळ सप्रे
इथे कुठल्या मायनस पॉईंटसाठी स्त्रीया प्रवेशास अपात्र आहेत ते तरी समजु द्या.. पटल्यास जाणीव आदर नक्की करु :-)
29 Jan 2016 - 3:38 pm | विजय पुरोहित
http://www.misalpav.com/comment/797150#comment-797150
सप्रे साहेब त्या अगोदर हा प्रतिसाद तर वाचा. विशेष म्हणजे एका स्त्री सदस्येनेच दिलाय.
29 Jan 2016 - 3:45 pm | बाळ सप्रे
ह्या प्रतिसादात माझ्या प्रश्नाचे उत्तर नाही.. त्यांनी वेगळा मुद्दा मांडलाय..
29 Jan 2016 - 3:29 pm | बाळ सप्रे
सर्वबाबतीत समानता शक्य नाही .. ठीकाय
पण इथे समानता नसायचे कारण काय??
29 Jan 2016 - 3:43 pm | उगा काहितरीच
इथेच समानता करायचे कारणच काय ? अन् तेही आत्ता ??
29 Jan 2016 - 3:48 pm | बाळ सप्रे
समानता हा घटनेने दिलेला अधिकार आहे.. तो नाकारला जातोय विनाकारण.
आतापर्यंत झालं नाही म्हणून आत्ता होउ नये असं का??
29 Jan 2016 - 4:13 pm | उगा काहितरीच
समानतेमुळे त्यांच नुकसान होत असेल तरी समानता करावी काय ?
(टिप:हे एक व्हॉट्सॲपवरील ढकलपत्र आहे त्यावर धागाकर्त्याचा विश्वास असेलच असे नाही. नोंद घ्यावी धन्यवाद !
.
.
सध्या वादातीत असलेल्या, महिलेने केलेल्या शनी देव मूर्ती स्पर्शाच्या घटनेवर नीट दृष्टिक्षेप टाकला तर आपल्या लक्षात येईल की पूर्वजांनी किती विचार करून ह्या गोष्टि अवलंबल्या होत्या, आणि आज आपण त्यांनाच मूर्ख ठरवतोय, आणि नाहक स्त्री-पुरूष समानतेच्या नको त्या ठिकाणी वाद घालतोय....
सविस्तर माहिती अशी----
शनी हा देव नसून ग्रह आहे त्याला छाया ग्रह असे म्हणतात. शनि ग्रहा पासून बाहेर पडणारी स्पंदनं स्त्रीयांसाठी घातक असतात, कारण मुर्ती विज्ञाना मध्ये काही मुर्ती विशिष्ट प्रकारची स्पंदने परावर्तीत करत असतात, मुळात स्त्रीयांची शारीरिक ठेवण स्पंदने ग्रहण करू शकते त्याचा परिणाम त्यांच्याच शरिरावर होतो, सावित्री धाम मध्ये पुरुषांना ही प्रवेश नाही,
अगदी साधं उदाहरण, देवीची ओटी स्त्रीया भरतात, कधी पुरुषाला ओटी भरतांना पाहिलंय कां? नाही नां? मग ह्याचा अर्थ तिथे पुरुषांना कमी प्रतीची वागणुक मिळते कां? नाही, तसं नाही, ती एक परंपरा आहे व त्या मागे साधं कारण आहे. पुरुषाच्या पोटी अपत्याचा जन्म होत नाही,
सृजनाचा अधिकार स्त्रींयानाच आहे, म्हणून त्या ओटी भरतात. आणि ह्या सृजन शक्तिवरच शनि ग्रहाच्या स्पंदनाचा प्रभाव पडतो.
जसं गाईचं दुध चांगलच, पण विषमज्वरात ते माणसाला विषाप्रमाणेच असतं. ह्यात ना दुधाचा दोष, ना त्या व्यक्तीचा दोष, तर त्या काळी असलेल्या शारीरिक क्षमतांचा होय.
कावीळ झाल्यावर आपण तेलकट खात नाही, कारण आपले शरीर त्या वेळी तो आहार घ्यायला अयोग्य असते. आता जर एखादा म्हणाला की मला तेलकट देत नाही हा माझ्यावर अन्याय आहे, अभिव्यक्ति स्वातंत्र्यावर घाला आहे. आतां सांगा, मुर्ख कोण? मला तेलकट द्या म्हणणारा की त्याला विरोध करणारा ?)
रच्याकने सप्रेसर, तुम्ही आस्तीक का नास्तीक? नाही काय आहे ना पुढील चर्चा त्याच अनुषंगाने पुढे नेता येईल. (अर्थात तुमची इच्छा असेल तरच!)
29 Jan 2016 - 4:19 pm | माहितगार
इथे उद्देश व्यक्ती लक्ष तर्कदोषाचा नाही ना ?
सहसा विरोधकांचा युक्तीवाद अग्राह्य ठरावा या उद्देशाने विरोधकाच्या दाव्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला जातो; यात विरोधकाच्या युक्तिवादाशी संबंधीत नसलेल्या कृती अथवा विरोधकाच्या चारीत्र्यातील खऱ्या (पण सदहुर युक्तिवादाशी संबंधीत नसलेल्या) उणीवांकडे लक्ष वेधणे याचा आंतर्भाव केला जातो.
एखाद्या व्यक्तिच्या समर्थ युक्तिवादाची तुलना त्या व्यक्तिच्या चारीत्र्यविषयक इतर गुणांशी, अथवा संबंध नसलेल्या कृतीशी करणे हा एक तर्कदोष असतो. युक्तीवादच अस्तीत्वात नसेल तर केवळ verbal abuse , however,व्यक्तिलक्ष्य तर्कदोष अथवा कोणत्याही प्रकारचा तर्कदोष म्हणवला जाऊ शकत नाही.[३]
उदाहरणे
" महापौरपदाच्या उमेदवाराचा विभागीकरण विषयक प्रस्ताव हास्यास्पद आहे. २००३ मध्ये त्यांच्यावर करचुकवेगिरीचे आरोप झाले होते."
" तू एवढा काय दिडशहाणा लागून गेला आहेस की इश्वराचे अस्तीत्वसुद्धा नाकारू शकतोस ? तुझे शालेय शिक्षण सुद्धा अजून पूर्ण झालेले नाही."
"डॉ.स्मीथ एवढे नावाजलेले हृदयरोग तज्ञ आहेत, तरीही त्यांना जुगार खेळण्याच्या कारणावरून अटक का केली गेली?"
"तुमचे फॅशन बद्दलचे मत अवैध आहे ;कारण तुम्हाला साधी नवे बूट घेणे देखील परवडत नाही."
"सरकारच्या आर्थीक स्थितीवर मत मांडावयास मोहन आहे तरी कोण? त्याला स्वत:ला साधी नौकरी सुद्धा नाही!"
29 Jan 2016 - 4:55 pm | उगा काहितरीच
बिलकुल नाही. त्याचं काय आहे ना , धाग्यात आस्तीक व नास्तीक असे दोन्ही मतप्रवाह मांडण्याचा प्रयत्न केलाय. सो श्री बाळ सप्रे यांना नेमक्या कोणत्या कारणांमुळे महिलांना चौथर्यावर जाऊ देणे अपेक्षित आहे ते कळले असते तर सोयीस्कर झालं असतं. त्यांच्या चारीत्र्याविषयी काहीही वाईट गोष्ट मांडण्याची इच्छा आणी गरज दोन्हीही नाही. शिवाय एखादी व्यक्ती आस्तीक किंवा नास्तीक असणे यावरून त्या व्यक्तीचे चारीत्र्य ठरवणे हे माझ्या दृष्टीने सर्वथैव अशक्य आहे. तरी तुमचा वरील प्रतिसाद गैरलागु आहे. हे नम्रपणे दृष्टीस आणून देऊ इच्छितो .
29 Jan 2016 - 5:10 pm | माहितगार
तस नै हो उगा सेठ एक तर निव्वळ आस्तीक ते निव्वळ नास्तिक या शिवाय इतरही पर्याय असू शकतात आणि पार्श्वभूमी कुठल्याही विचाराची असली तरी उपस्थीत मुद्दे गैरलागू होत नसावेत. सात्विकतेने मुद्द्यांना बळ येत नाही आणि ते नास्तिक आहेत किंवा त्यांच्या इतर विचारांच्या पार्श्वभूमीमुळे त्यांचे मुद्दे दुर्बळ ठरत नाहीत या कडे आपले लक्ष वेधायचे आहे.
29 Jan 2016 - 5:28 pm | उगा काहितरीच
ठीक आहे. तुमच्या भावना पोचल्या .पण नेमकं कोणत्या कारणांमुळे जाण्याची इच्छा आहे ते कळालं तर बरं पडेल ना ?
29 Jan 2016 - 4:25 pm | माहितगार
29 Jan 2016 - 5:08 pm | उगा काहितरीच
हे वाचा मालक!
29 Jan 2016 - 5:13 pm | माहितगार
तटस्थते दाखल तुम्हाला न पटलेल ढकलपत्र उदाहरण म्हणून ढकलल असेल तर ठिकच आहे.
29 Jan 2016 - 5:42 pm | उगा काहितरीच
होय मलाही बरचसं पटलेलं नाही ते. पण जे "आस्तीक" आहेत त्यांना कदाचित पटेल ते . किंबहुना ते पटल्यामुळेच इतकी वर्षे तिथे महिला जात नसतील. माहितगार साहेब, कसं आहे ना माझं स्वतःचे असे मत आहे की , "मंदीर तोड मस्जीद तोड लेकीन किसीका दील मत तोड" (हा माझ्या ओळी नाहीत बहुतेक कबीराच्या आहेत. नेमकं आठवत नाही.)
तुम्हाला प्रबोधनच करायचे तर त्याचेही सौम्य मार्ग आहेतच की! माहित आहे की पेशंट आजारी आहे मग थोssssडं दमानं इंजेक्शन देणार की जनावराला देतात तसं देणार ? या हजारो वर्षांपासून चालत आलेल्या परंपरा आहेत त्या नष्ट व्हायला वेळ लागेलच नाही का ? असे आंदोलन वगैरे करून मे बी तीथे प्रवेशही मिळेल पण लोकांच्या मनात या आंदोलनकर्त्यांविषयी प्रेम, आपुलकी येईल का? बसं तुर्तास इतकेच.
29 Jan 2016 - 6:46 pm | माहितगार
आपण उपस्थित केलेल्या उपरोक्त मुद्यांची चर्चा अंशतः माझ्या मागील धागा लेखात मुद्दा क्र. ३ आणि ४ मध्ये केली आहे.
29 Jan 2016 - 7:03 pm | उगा काहितरीच
हेच दोन मुद्दे का ? वाचले!
29 Jan 2016 - 7:05 pm | माहितगार
पंढपूरच्या मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळवून देण्यासाठी साने गुरुजींनी उपोषण केले, बर्याच सर्वोदयींनी टिका केली. कायदा करून अस्पृश्यांना मंदिर प्रवेश खुला होणारच आहे तर साने गुरुजींच्या उपोषणाचे प्रयोजन काय असा बर्याच सर्वोदयींचा सूर होता. केवळ कायदे करून काही प्रश्न सुटतात मुख्य म्हणजे केवळ कायदे केल्याने प्रबोधन होत नाही. सानेंनी उपोषण केले म्हणून प्र.के. अत्रें चौका चौकात उभे टाकून प्रबोधन करत निघाले. सानेंगुरुजींच्या आंदोलनाचे मुल्य आज नेमके कसे ठरवावे ?
'बगाड' परंपरेतील अंधश्रद्धेचा मुद्दा संत एकनाथ, संत तुकारामांनी उचलला पण आजही त्यात सुधारणा झालेली दिसत नाही. केवळ प्रबोधनावर काही गोष्टीत फरक पडताना दिसतो काही गोष्टीत शतके गेली तरीही फरक पडताना दिसत नाही.
पंढरपूरच्याच मंदिराच्या बाबतीत केशवपन न केलेल्या स्त्रीयांना देव्हार्यात प्रवेशाचा काही प्रश्न होता असे चि.वि.जोशींच्या कादंबरीवरून वाटते (कादंबरीतील उल्लेख पुरावा होऊ शकत नाहीत दुजोर्याची आवश्यकता असावी) आंदोलनांनी लगेच प्रबोधन होत नाही म्हणून आंदोलने सहसा ताणू नयेत पण आंदोलनांनी परिवर्तनवाद्यांना मानसिक बळ मिळते ते बळ मिळाले नाहीतर निव्वळ प्रबोधनाच्या व्याख्यानांनी फरक पडेलच याची खात्रीही देता येत नाही.
गंमत अशी की, प्रबोधनाचे काम आणि लढे परिवर्तनवादी करतात आणि आपला परिवर्तीत झालेला धर्मच कसा इतरांपेक्षा लवचिक आणि श्रेष्ठ आहे याची प्रौढी मिरवण्यात परंपरावादीच अधिक पुढे असतात पण पुन्हा परंपरेत बदल करण्याची वेळ आली की कर्मठपणाची भूमिका वठवण्यात पुढे असतात, आणि परिवर्तनवाद्यांना व्हिलन ठरवतात. असे का होत असावे कोण जाणे ? असो.
30 Jan 2016 - 8:52 am | बाळ सप्रे
ढकलपत्रातील माहिती pseudoscientific. त्या स्पंदनं वगैरे थिअरीला कुठलाही आधार नाही.
बाकी मी आधीच स्पष्ट केलय या प्रकरणात आस्तिक अथवा नास्तिक पेक्षा थातुरमातुर कारणांनी स्त्रीयांवर निर्बंध घालण्याची प्रवृत्ती हा मुख्य मुद्दा आहे.
आपण अथवा विजय पुरोहित यांच्याकडून या मुद्द्याला पटेल असा प्रतिवाद अजून आलेला नाही. तो आल्यास चर्चा पुढे जाउ शकते. माझ्या आस्तिक नास्तिक असण्याचा प्रश्न गैरलागू आहे.
30 Jan 2016 - 9:33 am | संदीप डांगे
ढकलपत्राचे जाऊ द्या. असल्या थीअरीजमधे टनाटन वाले वस्ताद असतात.
थातुरमातुर कारणांची व्याख्या नेमकी काय आहे? शब्दांच्या वापरातून कृतींचे अर्थ बदलतात हे लक्षात घेतले पाहिजे. आपण म्हणता की डीस्क्रिमिनेशन केले जाते. म्हणजे भेदभाव. स्त्रियांनी शनि-हनुमान ह्यासारख्या देवांपासून दूर राहायची रुढी समाजात आहे व त्याची कारणे माहितगार यांच्या धाग्यावर आलेली आहेत. ही कारणे सामाजिक मान्यतांमधून प्रचलित झाली आहेत. सामाजिक मान्यतांना वैज्ञानिक आधार असेलच असे नसते. कुठलाही प्रकारे जर एखादी रुढी प्रचलित होत असेल तर त्यामागे कुणाचा तरी अवमान करणे, किंवा गैरफायदा घेणे हीच कारणे असतात असे नसते. तुमचे प्रतिसाद ह्या परंपरेत "स्त्रियांचा अपमान करणे, त्यांना कमी लेखणे, त्यांचे खच्चीकरण करणे ह्या हेतुने प्रवेशास बंदी लादणे" हे उद्देश आहेत, ह्या अर्थाचे वाटतात. प्रथमतः जर आपण हे उद्देश सिद्ध करू शकलात तर पुढे चर्चा करु शकतो. कारण ह्या परंपरेवर आपण भेदभावाचा आरोप केला आहे जो सिद्ध करणे आधी आवश्यक आहे. यु मे प्लेज प्रोसीड नाऊ.
30 Jan 2016 - 12:55 pm | बाळ सप्रे
इथे स्त्रीयांना प्रवेश का नाही हे ठामपणे कोणालाच माहीत नाही. मग काहीतरी टनाटनी थिअरीज पुढे केल्या जातात..
एखादी रुढी/ प्रथा जरी explicitly अपमान करण्यासाठी अथवा खच्चीकरणासाठी नसली तरी त्यातून एखाद्या गटावर विनाकारण निर्बंध घालण्यात काही गैर नाही ही प्रवृत्ती बोकाळते ते गैर आहे.
30 Jan 2016 - 1:16 pm | संदीप डांगे
'कोणतेही ठोस कारण उपलब्ध नाही म्हणून जे होतंय ती बंदीच आहे, भेदभावच आहे' हे आपले मत सिद्ध करावे. जे आहे त्याचे खरे कारण शोधण्याचे कष्ट घेण्यापेक्षा असे आरोप करणं फार सोपं आहे. टनाटनी थिअरीज आणि ह्या थिअरीज मधे काही फरक दिसत नाही.
30 Jan 2016 - 5:26 pm | बाळ सप्रे
कसलीच थिअरी नाही यात. जे दिसतय त्यावर मत मांडलय. कमी लेखणं/ खच्चीकरण करायचं नाहिये यात अस मान्य केलं तरी न येण्याचे कारण सांगा नाहीतर ये द्या इतका सरळ प्रश्न आहे.. बाकीच्यांनी बंदीचे कारण शोधण्याचे कष्ट घेण्याचा प्रश्नच नाही. जे बंदी घालतायत (मंदीर ट्रस्ट) त्यांना याचे कारण माहीत असणे अपेक्षित आहे.