Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on गुरुवार, 01/21/2016 - 01:51
काही महिन्यांपूर्वी केंद्र सरकारने पॉर्नवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. बंदी लागू होण्याआधीच हा निर्णय मागे घेतला. त्या निमित्ताने पॉर्नबद्दल सर्वसामान्यांची आणि अभ्यासकांची, पॉर्नच्या बाजूने आणि विरोधात अशी सगळ्या प्रकारची मतं प्रदर्शित झाली. पॉर्न बघणं चांगलं का वाईट, योग्य का अयोग्य याबद्दल काहीही मत न बनवता लोकांना काय वाटतं याचा थोडा अभ्यास केला जावा; लोक पॉर्न बघतात का, बघतात तर किती प्रमाणात, किती नियमितपणे बघतात; बघत नसतील तर का बघत नाहीत; पॉर्न ही घृणास्पद गोष्ट आहे का अनावश्यक याबद्दल समाजाचं काय मत आहे याचा अभ्यास करणं महत्त्वाचं वाटतं. कारण समाजासाठी बनवलेले कायदे हे समाजाच्या मताकडे दुर्लक्षून बनवले जाऊ नयेत. आत्तापर्यंत अशा प्रकारची अनेक सर्वेक्षणं झालेली आहेत, पण ती पाश्चात्य समाजात झालेली आहेत. टीव्ही, सिनेमा, इंटरनेट या माध्यमांतून पाश्चात्य संस्कृती आपल्यापर्यंत पोहोचत असली तरीही भारतीय समाजाची, भारतात अनेक वर्षं घालवलेल्या लोकांची मतं काही निराळी असू शकतात. त्याची चाचपणी करावी असा या प्रश्नमालिकेमागचा हेतू आहे. या सर्वेक्षणात सहभागी होणाऱ्या कोणाचीही व्यक्तिगत माहिती, ओळख आमच्यापर्यंत पोहोचणार नाही. किंचित व्यक्तिगत माहिती हवी आहे ती वयोगट कोणता आणि स्त्री-पुरुषांच्या मतांमध्ये काही फरक आहे का असा अभ्यास करण्यासाठी. हे प्रश्न पूर्ण करण्यात तुमचा फार वेळ जाणार नाही. या प्रश्नांच्या उत्तरांमधून कोणाबद्दलही मतं बनवायची नाहीत, वा कोणालाही जोखायचं असा हेतू नाही. ही प्रश्नावली भरताना एक मिनीटापेक्षा जास्त वेळ जाऊ नये याची काळजी घेण्याचा प्रयत्न केला आहे. आपण समाज म्हणून कसा विचार करतो हे समजून घेण्यासाठी मदत करण्याबद्दल आभार. सर्वेक्षणाचे निकाल (बहुदा) मे महिन्यात इथेच जाहीर केले जातील. ३१ मार्चपर्यंत सर्वेक्षणात भाग घेता येईल. सर्वेक्षणात भाग घेताना गूगलमध्ये लॉगिन करण्याची गरज नाही. खाजगीपणा जपण्यासाठी प्रायव्हेट ब्राऊजिंगची सोय वापरून उत्तरं देऊ शकता; जेणेकरून मला आणि गूगललाही तुमची ओळख काय हे समजणार नाही. हा सर्वेक्षणाचा दुवा.
  • Log in or register to post comments
  • 31687 views

प्रतिक्रिया

Submitted by अर्धवटराव on गुरुवार, 01/21/2016 - 01:56

Permalink

सर्वेक्षणात भाग घेतोच

:) कुठल्याही प्रकारच्या अभ्यासाला आपला फुल्ल सपोर्ट आहे... आमच पिंडच मुळी तसा... 'शिक्शाआआआन'
  • Log in or register to post comments

Submitted by सायकलस्वार on गुरुवार, 01/21/2016 - 02:55

Permalink

भाग घेउन आलो.

भाग घेउन आलो.
  • Log in or register to post comments

Submitted by खटपट्या on गुरुवार, 01/21/2016 - 04:56

Permalink

अत्यंत रोचक धागा.

अत्यंत रोचक धागा.
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on गुरुवार, 01/21/2016 - 05:49

Permalink

पहिल्या चार तासांमध्येच २५+

पहिल्या चार तासांमध्येच २५+ प्रतिसाद आलेले दिसत आहेत. ए‌वढा उत्साहवर्धक प्रतिसाद, तो ही लगेचच मिळेल अशी अपेक्षा नव्हती. मराठी संस्थळांवर नसणाऱ्या, पण ओळखीच्या भारतीयांनाही याचा दुवा पाठवायला हरकत नाही. जितक्या वेगवेगळ्या विचारांच्या, पार्श्वभूमीच्या, वयाच्या लोकांकडून उत्तरं मिळतील तेवढं उत्तम.
  • Log in or register to post comments

Submitted by उपयोजक on गुरुवार, 01/21/2016 - 06:47

Permalink

विषय खमंग

विषय खमंग.प्रतिसाद भरपुर!!
  • Log in or register to post comments

Submitted by चलत मुसाफिर on गुरुवार, 01/21/2016 - 07:46

Permalink

धन्यवाद

फॉर्म भरला. प्रश्नांची निवड अगदी विचारपूर्वक करण्यात आली आहे. धन्यवाद. सूचना: सर्वेक्षणात खालील प्रश्न सामील केला जावा. "जर आपल्या मित्रवर्गात, संबंधीयांमध्ये किंवा नात्यात कुणी पॉर्न कलाकार आहे असे कळले तर आपल्या भावना काय असतील?"
  • Log in or register to post comments

Submitted by सुदिप खेडगिकर on गुरुवार, 01/21/2016 - 11:07

In reply to धन्यवाद by चलत मुसाफिर

Permalink

हा आतिशय महत्वाचा प्रश्न होवु शकतो.....

माझी एखादी मैत्रिण जर पोर्न कलाकार असेल तर माझी तिच्याकडे पाहन्याची नजर नक्किच बदलु शकते. अर्थात पोर्न आणि त्या सम्बन्धिचि महती आणि माहिती यामधे खूप तफावत आहे म्हणुन पण हा बदल असु शकतो
  • Log in or register to post comments

Submitted by चलत मुसाफिर on Fri, 01/22/2016 - 07:11

In reply to हा आतिशय महत्वाचा प्रश्न होवु शकतो..... by सुदिप खेडगिकर

Permalink

एकांगी

मैत्रीणच का? पॉर्न कलाकार पुरुषही असू शकतो.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on गुरुवार, 01/21/2016 - 08:25

Permalink

मस्त रे !

सर्वेक्षणात भाग घेत आहे. खरं बै ! अदितीचा स्वभाव. कोणत्याही कोनाड्या कानाड्या शिवाय थेट विचार करनं आणि तो विचार मांडनं याचं मला नेहमीच कौतुक वाटलं आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by भंकस बाबा on गुरुवार, 01/21/2016 - 08:35

Permalink

भरला

भरला एकदाचा ,
  • Log in or register to post comments

Submitted by काकासाहेब केंजळे on गुरुवार, 01/21/2016 - 10:02

Permalink

भरला फॉर्म ,

भरला फॉर्म ,
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on गुरुवार, 01/21/2016 - 10:42

Permalink

हे सर्वेक्षण एका विशिष्ट

हे सर्वेक्षण एका विशिष्ट गटापुरते( नेतीझन) मर्यादित राहील ज्यांना पोर्नची "सहज" उपलब्धता आहे त्यामुळे हे सर्वेक्षण एकांगी असेल अशी भीती वाटते. याच्या आयोजकांनी हि शक्यता गृहीत धरली असावी अशी आशा करतो.
  • Log in or register to post comments

Submitted by वामन देशमुख on गुरुवार, 01/21/2016 - 11:14

Permalink

कौल तोकडा आणि फसवा नसावा

या धाग्यावरून या कौलाच्या प्रयत्नाची आणि प्रभाकर पेठकरांच्या या प्रतिसादाची आठवण झाली. धर्मश्रद्धा जोखू पाहणारा कौल किती तोकडा आणि फसवा असू शकतो याची त्या चर्चेतून जाणीव झाली होती. पोर्न बद्धलचा कौल तसाच तोकडा आणि फसवा असू नये असं वाटतं.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रदीप साळुंखे on गुरुवार, 01/21/2016 - 14:22

Permalink

भाग घेवून आलो.

शेवटी मी एक अशा प्रकारची प्रतिक्रिया दिली ती अशी : पाॅर्न पाहिल्याने व्यक्ती उत्तेजित होते आणि भावनांवरचा ताबा जर सुटला तर ती व्यक्ती गुन्हा करू शकते.सर्वच पाॅर्न पाहणारे मनाने परिपक्व नसतात,त्यामुळे मनाचा समतोल ढळलेल्या विकृत मनोवृत्तीच्या लोकांकडून पाॅर्न पाहिल्यामुळे अपराध घडू शकतात/किंवा अपराध करण्यास उत्तेजना मिळू शकते.
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on गुरुवार, 01/21/2016 - 14:30

Permalink

छान सर्वेक्षण.

छान सर्वेक्षण. हा धागा इथे असल्याने सर्वेक्षणाचे निकाल ऐसीबरोबरच येथेसुद्धा प्रसिद्ध करावेत असे सुचवतो.
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on Sat, 01/23/2016 - 09:19

In reply to छान सर्वेक्षण. by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

होय

ती कौले इथल्या बाजारातही ठेवावीत फक्त तिकडे नको. मिपा गाववाला नाखु
  • Log in or register to post comments

Submitted by पगला गजोधर on गुरुवार, 01/21/2016 - 14:32

Permalink

भरला फॉर्म ,

""पॉर्न वाचण्या/बघण्यासाठी किमान वयोमर्यादा काय असावी?"" here I have assumed, Porn includes Sex Education also...
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on गुरुवार, 01/21/2016 - 14:58

Permalink

हा विदा कोण जमा करते आहे? कसा

हा विदा कोण जमा करते आहे? कसा वापर होणार आहे? कोणाचा सहभाग आहे?
  • Log in or register to post comments

Submitted by आदिजोशी on Fri, 01/22/2016 - 18:27

In reply to हा विदा कोण जमा करते आहे? कसा by यशोधरा

Permalink

ह्या प्रश्नांची उत्तरं आली की

ह्या प्रश्नांची उत्तरं आली की लगेच फॉर्म भरण्यात येईल.
  • Log in or register to post comments

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on Fri, 01/22/2016 - 19:42

In reply to ता. क.: अशा बातम्या by संदीप डांगे

Permalink

संपादक मंडळ.

संपादक मंडळ. वरच्या दोन्ही प्रतिसादांमधुन अ‍ॅडल्ट वेबसाईट्सची नावं काढुन टाकावीत. त्याजागी समांतर वाक्यरचनेचा प्रयोग करावा.
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Fri, 01/22/2016 - 19:47

In reply to संपादक मंडळ. by कॅप्टन जॅक स्पॅरो

Permalink

का बुवा?

का बुवा?
  • Log in or register to post comments

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on Fri, 01/22/2016 - 19:50

In reply to का बुवा? by संदीप डांगे

Permalink

तुमच्या प्रतिक्रियेचा उद्देश

तुमच्या प्रतिक्रियेचा उद्देश हि माहिती पद्धतशीरपणे पसरवली जातेय असा होता. त्या वेबसाईटचं नावं इथे लिहुन इथल्या अजुन चारचौघांमधे हि माहिती पसरवण्यात काय पाँईंट आहे?
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Fri, 01/22/2016 - 20:03

In reply to तुमच्या प्रतिक्रियेचा उद्देश by कॅप्टन जॅक स्पॅरो

Permalink

जॅकभाउ, इथल्या सदस्यांना सर्व

जॅकभाउ, इथल्या सदस्यांना सर्व माहित आहे असे गृहित धरून प्रतिसाद टाकलाय. तुम्ही म्हणताय तसे खरेच होत असेल तर काढून टाका...
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Sun, 01/24/2016 - 19:58

In reply to जॅकभाउ, इथल्या सदस्यांना सर्व by संदीप डांगे

Permalink

मला व्य नि करा.

वीच इज द बेष्ट फ़ाइव्ह पोर्न साइट्स असं गूगलला सर्च केलं आणि तिथे संदेश आला आहे 'की 'सॉरी याबाबतीत आम्ही आपल्याला काही मदत करू शकत नाही " आपल्याला माहिती असलेल्या सायटीची नावं मला सेंडवा. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Sun, 01/24/2016 - 20:02

In reply to मला व्य नि करा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

प्राडॉ, यु टू !? ;) :)

प्राडॉ, यु टू !? ;) :)
  • Log in or register to post comments

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on Sun, 01/24/2016 - 20:11

In reply to मला व्य नि करा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

लोल प्रतिसाद. डांगेण्णा

लोल प्रतिसाद. डांगेण्णा गारठले असतील भर नाशकात तुमच्याकडुन असा प्रतिसाद आलेला पाहुन.
  • Log in or register to post comments

Submitted by सायकलस्वार on Fri, 01/22/2016 - 19:37

In reply to सध्या पोर्न-हब-डॉट-कॉम ची by संदीप डांगे

Permalink

भारतीयांना पद्धतशीरपणे पोर्न

भारतीयांना पद्धतशीरपणे पोर्न-गिर्‍हाईक बनवण्याच्या हालचाली आहेत
हसून हसून फुप्फुसं दुखायला लागली!... प्लीज प्लीज आवराच!!!
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Fri, 01/22/2016 - 19:46

In reply to भारतीयांना पद्धतशीरपणे पोर्न by सायकलस्वार

Permalink

हसण्यासाठीच टाकला प्रतिसाद,

हसण्यासाठीच टाकला प्रतिसाद, तुम्हाला काय वाटलं काका? :-))
  • Log in or register to post comments

Submitted by गुलाम on गुरुवार, 01/21/2016 - 18:02

Permalink

"तुम्ही विवाहीत आहात का?" हा

"तुम्ही विवाहीत आहात का?" हा प्रश्न हवा होता असं वाटतं.
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on गुरुवार, 01/21/2016 - 18:08

Permalink

घरी जाऊन करतो, पण विदा कोण

घरी जाऊन करतो, पण विदा कोण जमा करतं आहे? आणि विदा मिळाल्यानंतर 'आपण समाज म्हणून कसा विचार करतो ' एवढंच जाणून घेणं अभिप्रेत आहे की आणखी काही?
  • Log in or register to post comments

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on गुरुवार, 01/21/2016 - 18:45

Permalink

ह्या गोळा केलेल्या विद्याचं

ह्या गोळा केलेल्या विद्याचं पुढे काय केलं जाणारे? घरी गेलो की विदा फॉर्म भरेन बघुन.
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on गुरुवार, 01/21/2016 - 23:39

Permalink

काही स्पष्टीकरणं.

हे सर्वेक्षण एका विशिष्ट गटापुरते( नेतीझन) मर्यादित राहील ज्यांना पोर्नची "सहज" उपलब्धता आहे त्यामुळे हे सर्वेक्षण एकांगी असेल अशी भीती वाटते.
या मर्यादेची जाणीव आहे. त्यामुळे हे निकाल ठराविक आर्थिक वर्गातल्या लोकांची मतं असतील, ज्यांना इंटरनेटवर 'उनाडायला' वेळ असतो, याची कल्पना आहे.
हा धागा इथे असल्याने सर्वेक्षणाचे निकाल ऐसीबरोबरच येथेसुद्धा प्रसिद्ध करावेत असे सुचवतो.
होय अर्थातच. ज्या संस्थळांवर हा धागा प्रकाशित केला आहे तिथे सगळीकडेच, यातून काय समजलं, असा धागा काढेन. (फक्त ते सगळं समजून घ्यायला वेळ लागेल त्यामुळे एप्रिल-मे असे दोन महिने लागतील असं गृहित धरून लिहिलं आहे.) ही मूळ कल्पना माझी आहे; आणि त्यात ऋषिकेश आणि मेघना भुस्कुटे कमी-अधिक प्रमाणात मदत करत आहेत. डेटा अनालिसिससाठी ऋषिकेश मदत करणार आहे. पण मुख्य जबाबदारी माझी. हा गूगल फॉर्म व्हॉट्सअॅप, फेसबुक इथे फिरला तर त्या लोकांपर्यंत पुन्हा पोहोचणं बरंच कठीण होईल. म्हणून फॉर्ममध्ये ऐसीचा उल्लेख आहे.
'आपण समाज म्हणून कसा विचार करतो '
यातले काही कंगोरे - १. पॉर्न बघणाऱ्यांतल्या किती लोकांना 'व्यसन' लागतं किंवा त्याच्या जवळ जाता येईल असं काही दिसतं हा एक प्रश्न मला पडला आहे. (माझा अंदाज - फार नगण्य प्रमाणात लोकांना व्यसन लागत असावं. अंदाज करणं एका ठराविक मर्यादेपर्यंत ठीकच, पण माहिती गोळा करता आली तर बघावी.) २. उदाहरणार्थ सध्या मी एक पुस्तक वाचत आहे - The Feminist Porn Book. ही अँथॉलॉजी आहे. यात काही पॉर्नोग्राफर्सनी लिहिलेलं आहे. एकीने लिहिलंय, ती पुरुष म्हणून जन्माला आली, पॉर्नमध्ये काम करून पैसे मिळवून सेक्स रीअसाईनमेंट सर्जरी करून घेतली. तेव्हा तिला वाटत होतं की आपल्याला जे बघावंसं वाटतं ते पॉर्न अस्तित्वातच नाही. म्हणून पॉर्न-अॅक्टर ते पॉर्न-निर्माती/दिग्दर्शक असा तिचा प्रवास झाला. आणखी एक आहे तो ट्रान्सजेंडर, कृष्णवर्णीय, (आता) स्त्री मानसोपचारतज्ञाचा. तिने नोंद केल्ये की तिच्या दोन 'पेशंट्स' लेस्बियन जोडीदार होत्या. त्या दोघींच्याही वेगवेगळ्या फँटसीज होत्या आणि दोघींनाही दुसरीच्या फँटसीबद्दल आक्षेप होता; हे जमणार नाही, यामुळे आनंद मिळणार नाही, असं. तज्ज्ञाने या दोघींना एकमेकींच्या फँटस्या दर्शवणारं पॉर्न बघायला सांगितलं. ते बघून "यातूनही आपल्याला आनंद मिळेल" हे दोघींनीही मान्य केलं. त्यांचं आपसांत प्रेम होतंच, पण शारीर संबंधांची प्रत सुधारल्यामुळे प्रेम आणि नातेसंबंधांची प्रतही वाढली. एक लेख आहे तो स्वतःला जेंडरक्विअर म्हणणाऱ्या व्यक्तीचा. या व्यक्तीचा उल्लेख ती/तो असा होऊ नये असं म्हणणं आहे. या व्यक्तीला कधी पुरुष, कधी स्त्री असल्याप्रमाणे लैंगिक संबंध ठेवायचे असतात. याला तरल-लैंगिकता म्हणतात. (हे पुस्तक वाचताना मराठी भाषेत एवढे शब्दच नाहीत याबद्दल फार गंड येतो. ट्रान्सजेंडर याला शब्द काय, मला माहीत नाही. या संदर्भात बोलताना सिसजेंडर असाही शब्द येतो; मराठीत असे शब्द वापरात नाहीतच.) ३. खोऱ्याने उपलब्ध असलेलं पॉर्न हे स्ट्रेट पुरुषांच्या उपभोगासाठी बनवलेलं असतं हे मला पॉर्न बघितल्यापासून लक्षात आलं. गे पुरुषांसाठीही नसतं असं नाही. फेमिनिस्ट पॉर्न हा प्रकार गेल्या काही वर्षांतच साईट्सवर दिसायला लागला. स्त्रिया मोठ्या प्रमाणावर गे पॉर्न पाहतात अशी नोंद सर्व्हेंमधून होते. ४. हेटरोनॉरमेटीव्ह वगळता इतर लोक, जे हेटरोसेक्शुअलही असू शकतात, त्यांना संस्कारांमुळे, भीडेमुळे, आपल्या फँटस्या म्हणजे विकार वाटू शकतात. उदाहरणार्थ - S/M. ५. माणसांच्या फँटसीज फार विचित्र असू शकतात. मास्टर्स आणि जॉन्सन नोंदवतात की काही स्त्रियांना स्वतःवर बलात्काराची फँटसी असते; प्रत्यक्षात तो व्हावा असं नव्हे, तर अशा कल्पनांनी त्यांना ऑरगॅझमचा आनंद मिळतो. या फँटस्या पॉर्नमधून पुरवल्या जाऊ शकतात. म्हणून या सर्व्हेत काही प्रश्न असे आहेत - तुम्ही प्रत्यक्षात ज्या लैंगिक क्रिया करता त्याच बघता का? तुम्हाला ज्या प्रकारचं पॉर्न बघायचं असतं ते सहज उपलब्ध होतं का? ठराविक प्रकारचे प्रश्न हवेत, हा आक्षेपही मान्य आहे. पण माझं आकलन, माझी मर्यादा आणि उत्तरं द्यायला लोकांना फार वेळ लागू नये ही मर्यादा बाळगून अनेक प्रश्न बासनात ठेवले आहेत. या सर्वेक्षणातून काही रोचक, नवीन किंवा प्रेरणादायक (किंवा माझ्या चुका) सापडलं तर कोणी अभ्यासक यात अधिक वेळ घालवून आणखी महत्त्वाचं काही देऊ शकतील असं मला वाटतं. किंवा तसा आशावाद आहे. --- लैंगिकतेबद्दल मास्टर्स आणि जॉन्सन यांचं एक उद्धृत देण्याचा मोह आवरत नाही - "There is no sexual value system that is right for everyone and no single moral code is indisputably correct and universally applicable." --- उत्तरं देणाऱ्या सगळ्यांचे मनापासून आभार. आणि प्रश्न विचारणाऱ्याबद्दलही विशेष आभार. कारण त्यातून मी ज्या गोष्टी गृहित धरून धागा काढला त्यांचंही स्पष्टीकरण लिहिता येतं.
  • Log in or register to post comments

Submitted by गुलाम on Fri, 01/22/2016 - 13:37

In reply to काही स्पष्टीकरणं. by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

सुंदर प्रतिसाद!!!

सुंदर प्रतिसाद!!!
"There is no sexual value system that is right for everyone and no single moral code is indisputably correct and universally applicable."
या वाक्यातील "sexual" हा शब्द वगळून देखील वाक्य परफेक्ट वाटतंय.
  • Log in or register to post comments

Submitted by विवेक ठाकूर on Sat, 01/23/2016 - 12:59

In reply to काही स्पष्टीकरणं. by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

उगीच वेळ वाया घालवणं आहे

ओशोंचं एक सुरेख वाक्य आहे `कल्पनाको एक खिलौना करके जानो तो उसके साथ खेलनेका मजा है. लेकीन अपनी इच्छाको कल्पनापे कभी मत सवार होने देना' जे आहे ते उपभोगता येतं, कल्पना हा नुसता टाइमपास आहे आणि प्रणयात तर, फँटसी आहे त्याची मजा घालवण्याचं सगळ्यात मोठं काम करते. तस्मात, हा सर्वे, विदा, त्याचे निष्कर्श हे सगळं निष्कारण वेळ वाया घालवणं आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by आदूबाळ on Sat, 01/23/2016 - 17:29

In reply to उगीच वेळ वाया घालवणं आहे by विवेक ठाकूर

Permalink

ओके सर. निष्कारण वेळ वाया

ओके सर. निष्कारण वेळ वाया घालवणं काय आहे हे नीटच समजलं. आता वेळेचा सदुपयोग करण्यासाठी काय स्कीम आहे याचं मार्गदर्शन करावं ही न० वि०
  • Log in or register to post comments

Submitted by विवेक ठाकूर on Sun, 01/24/2016 - 00:33

In reply to ओके सर. निष्कारण वेळ वाया by आदूबाळ

Permalink

कल्पना उपभोगता येत नाही

पॉर्न पाहात असाल तर त्याची मजा घ्या आणि विसरुन जा. त्यातून फँटसीज वगैरे काही निर्माण करु नका. ते एखादा हिंदी सिनेमा पाहून एकावेळी दहा जणांना लोळवण्याची कल्पना करण्यासारखं आहे. पॉर्न फक्त उत्तेजना देऊ शकतो, प्रत्यक्षात मात्र आहे तेच उपभोगता येतं; दुसरी काहीही शक्यता नाही. खरं तर पॉर्न निव्वळ उत्तेजनेसाठी आहे, इट इज जस्ट द फर्स्ट स्टेप. ज्याला उपभोगता येतं त्याला उत्तेजना स्वाभाविकपणे येते. आणि जिथे प्रणय हा दोघांसाठी एकमेकांना सुख देण्याचा, एकमेकांचा सहवास एंजॉय करण्याचा, एकमेकांप्रती कृतज्ञ होण्याचा सोहळा आहे तिथे तर नुसता स्पर्शच कमालीचा उत्तेजक असतो. माणसाचं सत्तर ते पंच्यहत्तर टक्के ग्रहण डोळ्यांनी आहे, आणि सात ते दहा टक्के श्रवणातून आहे त्यामुळे पॉर्नची चलती आहे. उरलेल्या पंधरा टक्क्यात गंध, स्वाद आणि स्पर्श या ग्रहण क्षमता आहेत. प्रणयात मात्र नव्वद टक्के स्पर्श, आणि उरलेल्या दहा टक्क्यात गंध आणि श्रवण आहेत. तिथे दृष्टी आणि स्वाद यांना जवळ जवळ शून्य महत्त्व आहे. तस्मात, पॉर्न हा फार तर अ‍ॅडल्ट सिनेमा पाहण्या इतपत उपयोगी आहे. ज्या युगुलाला खरा प्रणय भोगायचा आहे त्यांना पारस्पारिक प्रेम, एकमेकांना सुख देण्याची भावना आणि एकमेकांच्या सहवासाची आणि स्पर्शाची मोहिनी ही परिमाणं उपभोगाची किमया घडवतात. अशा युगुलांसाठी पॉर्न फक्त मेंटल मॅस्ट्युबरेशन आहे. एखादे वेळी मजा म्हणून ठीक पण प्रत्यक्षात निरुपयोगी .
  • Log in or register to post comments

Submitted by अविनाश लोंढे. on Sun, 01/24/2016 - 00:51

In reply to कल्पना उपभोगता येत नाही by विवेक ठाकूर

Permalink

प्रत्येक्षात अनुभव घेतल्याशिवाय

प्रत्येक्षात अनुभव घेतल्याशिवाय fantacy अन reality मध्ये तुलना करणे व्यर्थ आहे , असं नाही का वाटत तुम्हाला ?
  • Log in or register to post comments

Submitted by विवेक ठाकूर on Sun, 01/24/2016 - 01:01

In reply to प्रत्येक्षात अनुभव घेतल्याशिवाय by अविनाश लोंढे.

Permalink

फँटसी ही मेंटल आणि रिअ‍ॅलिटी ही अ‍ॅकच्युल आहे

त्यामुळे अशी तुलना उघड आहे. प्रणयात तुमची शंभर टक्के उपस्थितीच तर उपभोगाची खुमारी वाढवते. तिथे फँटसी आली की प्रत्यक्ष आणि कल्पना यांच्या फारकतीमुळे तुम्ही डिवाइड होता आणि प्रत्यक्षाची वाट लागते.
  • Log in or register to post comments
Profile picture for user गामा पैलवान

Submitted by गामा पैलवान on Sun, 01/24/2016 - 03:22

In reply to कल्पना उपभोगता येत नाही by विवेक ठाकूर

Permalink

सहमत आहे.

विवेक ठाकूर, तुमच्या नावाला शोभेल असा विवेकी प्रतिसाद आहे ! :-) उत्तानचित्रे पाहणे म्हणजे क्षुधावर्धक सेवन करण्यासारखे आहे. केव्हातरी एकदोन वेळा मजा म्हणून ठीक आहे. नेहमी घेण्यात अर्थ नाही. जेवण आणि क्षुधावर्धक यांत फरक करायलाच पाहिजे. सडकून भूक लागण्यासाठी व्यायाम वा अंगमेहनत करायला हवी. निव्वळ क्षुधावर्धकावर अवलंबून राहणे बरोबर नाही. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

Submitted by साती on Sun, 01/24/2016 - 08:24

In reply to कल्पना उपभोगता येत नाही by विवेक ठाकूर

Permalink

प्रतिसाद आवडला.

प्रतिसाद आवडला.
  • Log in or register to post comments

Submitted by आदूबाळ on Sun, 01/24/2016 - 17:18

In reply to कल्पना उपभोगता येत नाही by विवेक ठाकूर

Permalink

जीवन : साहित्य :: लैंगिक

जीवन : साहित्य :: लैंगिक क्रिया : पॉर्न असं मला वाटतं.
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Sun, 01/24/2016 - 19:55

In reply to कल्पना उपभोगता येत नाही by विवेक ठाकूर

Permalink

हे प्रिस्क्रिप्शन नाही. वर्णन आहे.

पॉर्न पाहात असाल तर त्याची मजा घ्या आणि विसरुन जा. त्यातून फँटसीज वगैरे काही निर्माण करु नका.
फँटस्या बघण्याची इच्छा नसताना फँटस्या बघायला लागल्यामुळे किंवा फँटस्या बघून गंड निर्माण झाल्यामुळे लोकांना त्रास होतो याबद्दल शंका नाही. पण वयोपरत्त्वे किंवा इतर काही कारणांमुळे लैंगिक क्रिया करतानाही पाट्या टाकणाऱ्या लोकांना पॉर्नमधून फँटसीज सुचून पाट्या टाकणं कमी/बंद होतं असं सेक्सॉलॉजिस्ट्स नोंदवतात. तेव्हा असा सरसकट सल्ला देणं शक्य नाही. बाकी टक्केवारी कुठून काढली, काय-कसं हे काही विचारत नाही.
एखादे वेळी मजा म्हणून ठीक पण प्रत्यक्षात निरुपयोगी .
मजा आली तरीही निरुपयोगी, हे कसं हे मला समजलं नाही. सांगितलं नाहीत तरीही चालेल.
  • Log in or register to post comments

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on Sun, 01/24/2016 - 20:17

In reply to हे प्रिस्क्रिप्शन नाही. वर्णन आहे. by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

५ च्या टप्प्यात वयोगट केले

५ च्या टप्प्यात वयोगट केले असते तर अधिक चांगलं झालं असतं. नारायणदत्त तिवारींच्या वयापरंतचे.
  • Log in or register to post comments

Submitted by विवेक ठाकूर on Sun, 01/24/2016 - 22:18

In reply to हे प्रिस्क्रिप्शन नाही. वर्णन आहे. by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

काहीही!

पाट्या टाकणाऱ्या लोकांना पॉर्नमधून फँटसीज सुचून पाट्या टाकणं कमी/बंद होतं असं सेक्सॉलॉजिस्ट्स नोंदवतात. प्रणय म्हणजे पाट्या टाकणं आहे? बहुदा तुम्हाला कल्पना नाही. प्रणय हा फक्त मानवाला, जननाची गरज नसतांना सुद्धा, परमोच्च सुख देईल असा विकल्प आहे. प्रणयामुळे प्रेमी युगुलातला अनुबंध वृद्धींगत होत जातो. ती एकमेकांना सर्वात निकटतम नेणारी प्रक्रिया आहे. प्रणय, प्रेमींना अनिर्बंध होऊन एकमेकांना आपल्या साथीदारासमोर, केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिकदृष्ट्याही, सर्वस्वी विवस्त्र करु शकणारी महत्तम घटना आहे. उत्तम प्रणयी नातं असलेल्या युगुलाचं वैवाहिकच नव्हे तर इतर जीवनही तृप्त आणि मजेचं होतं. त्यांच्यातला संघर्ष न्यूनतम होतो. प्रणय ही एकमेव घटना दोघांना समत्त्वात आणून आनंद देते म्हणून तर त्याला सम-भोग म्हटलंय. पॉर्नमधल्या फँटसीजनी पाट्या टाकणं कमी करण्याचा दृष्टीकोन चुकीचा आहे. एकमेकात प्रेम असेल तर प्रत्येक प्रणय हा दरवेळी, एकमेकांच्या संगतीनं फुलवलेला महोत्सव असतो. तो इतका प्रत्यक्ष आणि उत्कट असतो की त्याला कोणत्याही फँटसीची गरज नसते. तो फँटसीच्या कित्येक पटीनं सुखद असतो. बाकी टक्केवारी कुठून काढली, काय-कसं हे काही विचारत नाही. अनुभवाला टक्केवारी लागत नाही, तो सिद्धच असतो. चुकीच्या कल्पनांना प्रॉप्सची गरज असते. मजा आली तरीही निरुपयोगी, हे कसं हे मला समजलं नाही. सांगितलं नाहीत तरीही चालेल आता इतकं सांगितलंय तर हे सुद्धा सांगतो. एखादे वेळी प्रत्यक्ष प्रणयाची शक्यता नसेल त्या वेळी टाइमपास म्हणून पॉर्न पाहाणं मजेचं आहे इतकंच. पण पॉर्न पाहून प्रणयाची मजा घेता येत नाही, ते काल्पनिक मैथुन आहे. आणि ज्यांना खरा प्रणय कळला (जे पाट्या टाकत नाहीत) त्यांना तर एकमेकांचा सहवासच ऐनवेळी इतकं काही सुचवून जातो की त्यांच्यासाठी पॉर्न आणि फँटसीज निरर्थक आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Sun, 01/24/2016 - 22:25

In reply to काहीही! by विवेक ठाकूर

Permalink

+१००००००

जियो मेरे लाल! शब्दा शब्दाशी सहमत!
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Sun, 01/24/2016 - 23:08

In reply to काहीही! by विवेक ठाकूर

Permalink

पटलं नाय हं !

प्रणय कितीही फुलवायचा म्हटला तरी वया बियाचं काही गोष्ट आहे की नै ? वय वर्ष ३० चा प्रणय, वय वर्ष ४५ चा प्रणय, वय वर्ष ५५ चा प्रणय, वयवर्ष ७० चा प्रणय, इच्छा लाख असल्या तरी परिस्थिती, मानसिक अवस्था, शारीरिक अवस्था , याचा काही विचार करायला नको ? -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Sun, 01/24/2016 - 23:30

In reply to पटलं नाय हं ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

ज्यांना खरा प्रणय कळला

ज्यांना खरा प्रणय कळला प्राडॉ., क्या आप ये मिस कर गये...?
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Mon, 01/25/2016 - 10:44

In reply to ज्यांना खरा प्रणय कळला by संदीप डांगे

Permalink

आवं असं काय करता.

प्रणय ज्यांना कळलाय त्यांच्यासाठी काही प्रश्न नाही आणि प्रश्न नसतो पण प्रणय कळला आहे, म्हणून पॉर्न पाहु नये असं कही असतं का ? फायदा तोटा हा दुसरा भाग आहे, इतकेच म्हणतो. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by विवेक ठाकूर on Sun, 01/24/2016 - 23:32

In reply to पटलं नाय हं ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

सर आता यावर प्रबंध लिहावा लागेल

जर सुरूवातीपासून आपल्या जोडीदाराशी मनमोकळी रिलेशनशीप असेल तर वयानुरूप सगळ्या फँटसीज तुम्ही उपभोगलेल्या असतात. त्यामुळे पॉर्न पाहून तुम्हाला काही जगावेगळं मिळत किंवा सुचत नाही . वाढत्या वयाबरोबर प्रणयाचे रंग आणखी गहिरे होत जातात. त्यातला ओढण्याचा भाग तर केंव्हाच शून्य झालेला असतो. एकमेकाला सांभाळत, आत्तापर्यंत भोगलेल्या आयुष्यात मिळालेल्या एकमेकांच्या साथीप्रती कृतज्ञ होत रंगवलेला प्रणय हा पॉर्नसारख्या उथळ गोष्टीत चित्रित सुद्धा होऊ शकत नाही . तो तुमचा अत्यंत व्यक्तिगत अनुभव असतो .
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Mon, 01/25/2016 - 10:48

In reply to सर आता यावर प्रबंध लिहावा लागेल by विवेक ठाकूर

Permalink

बस आता.....

प्रबंध लिहू नका. असा विषय आला की तुम्ही लिहायला आवरत नाही. थांबा आता. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com