मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

छायाचित्रणकला स्पर्धा क्र.१५: कृषि: निकाल

साहित्य संपादक · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार

नमस्कार मंडळी,

छायाचित्रणकला स्पर्धेच्या १५व्या भागाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. यंदा प्रथमच प्रवेशिकांबरोबर स्पर्धकांची नावे प्रकाशित केली गेली नाहीत. नव्या पद्धतीला सर्व स्पर्धकांचे उत्तम सहकार्य लाभले. त्याकरिता सर्व स्पर्धकांना विशेष धन्यवाद. तसेच ज्यांच्या सहभागाशिवाय स्पर्धा अपूर्ण आहे त्या मतदात्यांनाही अनेक धन्यवाद.

तृतीय क्रमांक मिळाला आहे, पॉइंट ब्लँक यांच्या कर्नाटकातील मद्दूर येथे टिपलेल्या भातशेतीच्या छायाचित्राला.

द्वितीय क्रमांक मिळाला आहे बोका यांच्या मध्य प्रदेशातील एका खेड्यात सुरू असलेली शेतीची कामे या छायाचित्राला.

अन प्रथम क्रमांक मिळाला आहे मार्मिक गोडसे यांच्या तळपत्या उन्हात कांद्याला पाणी देणार्‍या शेतकर्‍याच्या छायाचित्राला.

सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन.

आपणांस कळविण्यात आनंद होत आहे की आगामी छायाचित्रण कला स्पर्धा मिपाकर सर्वसाक्षी आयोजित करणार आहेत.


वाचन 14403 प्रतिक्रिया 36