जगावं की मरावं हा एकच सवाल... कराव्या या वैद्यकीय चाचण्या, की फेकुन द्यावं हे........
माझा थोडेफार आकलन आणि अनुभवाचा विषय सोडुन येथे लिहिण्याची ही पहिलीच वेळ, सहाजिकच येथे भर माहिती 'शेअर' करण्याऐवजी माहिती गोळा करणे, शंका निरसन करुन घेणे यावर आहे ( कोण रे ते तिकडे हुश्श्श...म्हणाले??)
समजायला लागल्यापासुन मी दरवर्षी सर्वसामन्य स्वरुपाच्या वैद्यकीय चाचण्या करुन घेत आलो आहे. याशिवाय कुटुंबातील अनेक सद्स्याच्या आवश्यक चाचण्यांही वेळप्रसंगी होतच असतात. चाचण्याचे बाकीचे स्वरुप काहीसे तेच असले तरीही गेले काही वर्षे व्हीटॅमिन B12 वा D3 या चाचण्या करुन घेण्यावर भर आहे असे दिसते...संशयास जागा महणजे नेमक्या याच चाचण्या अन्य नियमित चाचण्यांच्या तुलनेने महागही आहेत.
गेले अनेक वर्षांत आमच्या कोणातही न आढळ्लेल्या ही B12 वा D3 ची कमतरता हल्ली वारंवार अधोरेखित होते. एवढेच काय मी केलेल्या चर्चे अंती अनेक लोकांना हाच अनुभव आला आहे असे समजते. माझ्या परिचित एक डॉक्टरांच्या मते ह्या तपासणीऐवजी सरळ B12 वा D3 कमतरतेव्र्रेल गोळ्या घेतलेल्या उत्तम, तसेही ही व्हिटॅमिन्स अतिरिक्त स्वरुपांत शरिरात साठुन रहात नाहीत मग एकदा ही 'टेंडन्सी' माहित झाल्यावर या टेस्ट्वारी अनावश्य्क पैसे का घालवावे?? असा त्यांचा दृष्टिकोण आहे.
एकीकेदे सर्वसामान्य तपासण्यांच्या यादीत ही 'घुसखोरी' म्हणावी तो दुसरीकडे अनेक डायग्नोस्टीक सेंटर्सनी प्रचंड जाहिरातबाजी करुन व अगदी MLM सारख्या पद्धती वापरुन 'Preventive Checkup' ची अनेक पॅकेजेस विकण्याचा तडाखा लावला आहे. टोमोग्राफी, ॲजिओग्राफी, M.R.I, कॅरोटिड आर्ट्रीलरी सारखी नावे ( काही चुकले असल्यास माफी असावी) तोंडावर फेकुन हे मार्केटिग एजंटस (जे बहुतेकदा नॉन मेडीको असतात) समोरच्याला आधी गांगरवतात, नंतर घाबरवतात आनि मग आम्ही हे सारे ईतरांपेक्षा कसे स्वस्त देतो असे सागुंन 30/35 हजाराचे 'Preventive Checkup' पॅकेज त्याच्या गळ्यात मारतात..
ठराविक काळाने आपले मेडिकल चेक-अप करायलाच हवे यात अजिबात दुमत नाही मात्र एखाद्या विषयातील कोणतीही प्राथमिक तपासणी (उदा ECG) न करता थेट डॉप्लर वा ॲजियोग्राफी करणे कितपत आवश्यक आहे??
मागे एकदा मी या वैद्यकिय चाचण्यांसंदर्भात एक लेख ( बहुधा पुण्यातील डॉ. अनंत फडके यांचा, पण खात्री नाही) वाचला होता ज्यांत यतील कोणतीच चाचणी 100% अचुक नसते व अगदी ठणठणीत, निरोगी अशा 100 लोकांच्या ह्या चाचण्या केल्यास त्यातील काही निरोगी लोकांच्या reports मध्येही अनियमितता दिसुन येतील.... असा काहीसा युक्तीवाद होता.
असो. येथील डॉ खरे आणि वैद्यकिय विषयांतील अन्य तज्ज्ञ् (हा शब्द असाच का लिहितात??) माझे गैरसमज दुर करतील आशी आशा बाळगतो.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
बरे झाले आपण हा विषय चर्चेला
अनेक आरोग्य पुरवण्या
इतका काही गहन प्रश्न नाही
..
"निष्कारण रेग्युलर टेस्टींगची
जोपर्यंत काही होत नाही
सहमत आहे.A stitch in time
व्हिटॅमिन डि हे कॅल्शिअमच्या
समाजात इतर सर्व गोष्टींचे
एका टोकाला लोक दरवर्षी हौसेने
माझ्या मते खरी मेख ही आहे :
त्यामुळेच मी म्हटलंय की तुमची
धन्यवाद डॉक्टर,
I also have this same
One important point here is,
डि ३ कमी आहे तर सप्लिमेंट
अगं हो.. सप्लिमेंट्स घ्यायला
पि रा ताई
योगायोगाने आत्ताच बाजारातून
बाजारीकरण इथेही झालं आहे
रोचक धागा...
मुवी
संध्याकाळी २ तास फिरणे.>> ते कुठ फिरायचे तेवढ सांगा बुवा
सर्वाचेच त्यातही डॉ. खरे व
कोणत्याही वेळातल्या
माझं निरीक्षण असे आहे की
कोणत्याही वेळातल्या सूर्यप्रकाशाने डि ३ मिळत नाही,
ह्या निमित्ताने कुणी D3 and
Most of the natural sources
लहानपणी दुधात टाकायचे एक
शार्कोफेरॉल = शार्क लिव्हर
हो, पण मग ते खावं की खाउ नये?
इट्स नॉन-व्हेज.
आपली एक केस
व्हीटामिन डि३ आणी भारतीय !
सहमत.
व्वा...अतिशय अभ्यासपुर्ण
काही मिथकं --
कोवळ्या ऊन्हात बसल्यास शरिरात
डॉ खरे,
मार्मिक,
चला...म्हणजे कधीकाळी
भारतात डायबेटीसचे जास्त रोगी दिसतात
I WOULD RATHER BE A
धन्यवाद डॉक्टर, अशाच आशयाच्या
भागवत साहेब
वा! क्या बात है!
केंव्हाही या. मी रिकामाच असतो
धन्यवाद...आपला दृष्टिकोण
छातीत दुखत असेल तर उगाच तर्क