Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by प्राजु on Mon, 12/22/2008 - 07:22
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Mon, 12/22/2008 - 07:38

Permalink

ज बरद

ज बर द स्त.....:) (देवकी नंदन भक्त) मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -
  • Log in or register to post comments

Submitted by मनीषा on Mon, 12/22/2008 - 07:43

Permalink

अरे वा !

गीत माधुरी, श्याम बासरी सूर आसावरी, छेडीत ये शुभ्र मोगरी, कृष्ण मंजिरी रंग शर्वरी, खुलवित ये.. ..................हे खूप आवडलं
  • Log in or register to post comments

Submitted by बट्टू on Mon, 12/22/2008 - 07:53

Permalink

कविता

कविता आवदली.
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Mon, 12/22/2008 - 08:12

Permalink

गीत

गीत माधुरी, श्याम बासरी सूर आसावरी, छेडीत ये शुभ्र मोगरी, कृष्ण मंजिरी रंग शर्वरी, खुलवित ये.. क्या बात है! शब्दसौंदर्याने नटलेली एक सुरेख कविता..! तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Mon, 12/22/2008 - 09:05

Permalink

छान, आवडली

छान, आवडली कविता.
  • Log in or register to post comments

Submitted by रामदास on Mon, 12/22/2008 - 09:24

Permalink

मार्गशिर्षाच्या गुरुवारी

लक्ष्मी पूजनात हीच आरती म्हणावी काय ?
  • Log in or register to post comments

Submitted by दत्ता काळे on Mon, 12/22/2008 - 12:24

Permalink

सुंदर कविता

प्रत्येक कडवं खूप सुंदर बांधलय. ग्रेट रण चंडीका, मुंड मुंडीका दैत्य दंडीका, जिंकूनी ये जगतकारिणी, गर्भ धारिणी, दु:ख सोषिणी, होऊन ये आणि गीत माधुरी, श्याम बासरी सूर आसावरी, छेडीत ये शुभ्र मोगरी, कृष्ण मंजिरी रंग शर्वरी, खुलवित ये.. केवळ अप्रतिम
  • Log in or register to post comments

Submitted by स्मिता श्रीपाद on Mon, 12/22/2008 - 14:06

Permalink

सुरेख...

किती सुरेख आहे कविता..आणि प्रत्येक शब्द अर्थपूर्ण आहे... मला हे जास्त आवडलं :- गीत माधुरी, श्याम बासरी सूर आसावरी, छेडीत ये शुभ्र मोगरी, कृष्ण मंजिरी रंग शर्वरी, खुलवित ये.. -स्मिता
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Mon, 12/22/2008 - 14:26

Permalink

मस्तच --

मस्तच -- अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments

Submitted by मृगनयनी on Mon, 12/22/2008 - 14:47

Permalink

अलका, अचला,

अलका, अचला, कोमल गंधा अभिसारीका झळकत ये विश्वस्वरूपा, दुर्गा, अंबा अग्निशलाका तळपत ये !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! केवळ अप्रतिम! चाल हंसिनी, रूप कामिनी विश्वमोहीनी , सजून ये गजगामिनी, दिप्ती दामिनी चंचल हरिणी, बनून ये मस्तच! शब्द नाहीत गं प्राजु.. .. .. खूप सुन्दर वर्णन आहे, देवीचे... मनातले पवित्र भाव आपोआप जागृत झाले. :)
  • Log in or register to post comments

Submitted by चेतन on Mon, 12/22/2008 - 17:17

Permalink

मस्त

सुरेख झालेय कविता सगळिच कडवी आवडली एक शंका दु:ख सोषिणी, होऊन ये मध्ये सोषिणी हा शब्द बरोबर आहे का? (मला माहिते मिपावर शुध्दलेखनाचे नियम नाहीत) पण शोषण किंवा सोसणे हे दोन वेगळे शब्द आहेत. सोषिणी चा अर्थ काय होतो? चेतन
  • Log in or register to post comments

Submitted by सुवर्णमयी on Mon, 12/22/2008 - 17:29

Permalink

छान

प्राजु, कविता आवडली
  • Log in or register to post comments

Submitted by शितल on Mon, 12/22/2008 - 18:25

Permalink

मस्तच.

प्राजु, कविता खुप आवडली.. :) मन मंदिराय... ह्या गाणाच्या चालीवर म्हणुन बघ.. कसे फिट बसते ते. :)
  • Log in or register to post comments

Submitted by लिखाळ on Mon, 12/22/2008 - 18:43

Permalink

वा .. कविता

वा .. कविता छान आहे. आवडली. -- लिखाळ. 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Mon, 12/22/2008 - 21:03

Permalink

धन्यवाद..

सर्वांचे मनापासून आभार.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by राघव on Tue, 12/23/2008 - 12:48

Permalink

नेहमीप्रम

नेहमीप्रमाणेच सुंदर कविता! :) मुमुक्षु
  • Log in or register to post comments

Submitted by उपटसुंभ on Tue, 12/23/2008 - 15:00

Permalink

सुंदर..!

सुंदर..! :)
  • Log in or register to post comments

Submitted by मिना भास्कर on Wed, 12/24/2008 - 20:39

Permalink

व्वा वामा या नावाचा अर्थ माहित नव्हता .

व्वा, प्राजू, कविता सुन्दर करतेस. तुला जी मेल ची ऍलर्जी आहे का? :W :W
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Wed, 12/24/2008 - 22:13

Permalink

सुंदर कविता!

अतिशय शब्दसमृद्ध काव्याबद्दल अभिनंदन! चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by शाल्मली on Wed, 12/24/2008 - 22:13

Permalink

खूपच छान

प्राजु, कविता फारच आवडली वाचताना कवितेचा ठेका मस्त वाटतो आहे. गीत माधुरी, श्याम बासरी सूर आसावरी, छेडीत ये शुभ्र मोगरी, कृष्ण मंजिरी रंग शर्वरी, खुलवित ये.. हे कडवं विशेष आवडले. --शाल्मली.
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय on गुरुवार, 12/25/2008 - 00:21

Permalink

झोकदार!

डमडमत डमरू ये खणखणत शूळ ये... तशा झोकाची कविता आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on गुरुवार, 12/25/2008 - 01:14

Permalink

सुंदर...

सुंदर... बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

Submitted by घाटावरचे भट on गुरुवार, 12/25/2008 - 01:19

Permalink

छान

छान कविता....
  • Log in or register to post comments

Submitted by शेणगोळा on गुरुवार, 12/25/2008 - 01:29

Permalink

देवीचे

देवीचे स्त्रोत्रच वाचतो आहे असे वाटले. एक प्रासादिक आणि शुचिर्भूत काव्य वाचल्याचा आनंद मिळाला. गणेशरुपाबद्दल असेच काही लिहाल का? सर्वांचाच लाडका, शेणगोळा.
  • Log in or register to post comments

Submitted by जयेश माधव on गुरुवार, 12/25/2008 - 19:02

Permalink

खुपच

खुपच छान!! जयेश माधव
  • Log in or register to post comments

Submitted by मीनल on गुरुवार, 12/25/2008 - 19:35

Permalink

अर्थपूर्ण ,अप्रतिम काव्य

वामा चा अर्थ सांगितल्याबद्दल आभार.माझ्यासारख्या अज्ञानी लोकांकडून येणारे प्रश्न टळले. कविता वाचल्यावर कुसुमाग्रजांच्या काही काव्यपंक्तींची आठवण झाली. म्हणजे लेखनाचा प्रकार! पण `वामा`ही कविता वेगळ्या अर्थाची आहे. ब-याचदा स्त्री म्हणजे `अबला` समजली जाते. पुरूषप्रधान भारतात स्त्री भ्रूण हत्येचे प्रमाण जास्त आहे. त्या पार्श्वभूमीवर ही कवीता `स्त्री`ला आमंत्रण देणारी आहे. कवयित्री आग्रहाने तीला बोलावते आहे.``तू ये.`` ``तू तशी आहेसच.नसशील तर तू अशी अशी बनून ये.`` : : कशी ?????????? : : अवनी ( ही पण स्त्री च बरं का!)जशी क्षितीजातर्फे उंच असाध्य अश्या ही आकाशाशी नाते जोडते तशी तू नाती जोडणारी /जपणारी होऊन ये.तूझ्या जन्माने विविध नाती जोडली जाणार आहे. तू बहिण होशिल.त्याच बरोबर नविन जन्म देणारी माता ही होशील.विविध नाते, स्नेह संबंध तू जोडत ये. दूष्ट दानवांचा नाश करणा-या दूर्गा,अंबा ,लक्ष्मी, चंडिका यासारख्या शौर्यवान शक्तीशाली स्त्री सारखी तू विजयी होऊन (दामिनीसारखी )विजेसारखी लखलखत ये. दूर्गुणांचा अंत करण्याच सामर्थ्य तूझ्यातही आहे. पण त्याच बरोबर तू नाजूकश्या प्रेमाने गंधित होऊन कोमलतेने अलगद ये. तू तूझा बालिशपणा सोडू नकोस. चंचल हरिणीसारखी अवखळ होऊन ये.येथे विरोधाभास उत्तम साधला आहे. अजून असे काही विरोधाभास आहे पहा.--- सजून धजून सुंदर रूप घेऊन त्या रूपाचा संपूर्ण जणिवेने या सर्व जगाला मोहीत करण्यासाठी तू गर्वाने ये.पण (लीन रुजूता, मूक नम्रता---) उन्मत्त होऊ नकोस.लीनता /नम्रपणा मात्र सोडू नकोस. मुंड मुंडिका म्हणजेच मारणारी . आणि गर्भ धारिणी म्हणजे जन्म देणारी .येथे ही उत्तम विरोधाभास आहे. आपले शरीर अर्पून त्या त्यागाने आनंदाची (सरिता)नदी तू फुलवत ये. गर्भधारण करण्याची तूझी क्षमता आहे. पण जग निर्माण करताना त्यात दु:ख सोसण्याच्या तयारीनिशी ये. तनु अर्पिता--आपण देवाला फुल, नैवेद्द वगैरे अर्पण करतो तेव्हा ज्याला अर्पण करतो त्याच्या बद्दल प्रेम ,आदर आणि श्रध्दा असते.इथे शरीराचा उल्लेख करतानाही अर्पिता ह्या शब्दामुळे तेच पावित्र्य राखलेले दिसते आहे. दु:ख सोषिणी--- जीव निर्माण करताना होणा-या वेदनांची कल्पना तुला आहे. ती सहन करण्याची ताकद तुझ्यात आहेच.त्या ताकदीने ये. मौक्तिक मुक्ता, रूप कांचना सुवर्णलता उमलत ये येथे सुवर्ण लतिका अधिक शोभले असत असं वाटत. पहाट जशी नवी आशा ,उमेद ,उत्साह घेऊन येते तशीच तू `सारे जिवनरंग खुलवत ये `अशी आर्जव शेवटी केली आहे.. इथे `आसावरी `या चार अक्षरांच्या शब्दापेक्षा तीन अक्षरी शब्द ठेक्यात अधिक चांगला बसला असता. ही जी वामा आहे ती सच्ची आहे.सच्ची म्हणजे खरी खुरी.आपल्या आजबाजूला आईमधे, बहिणीमधे, प्रेयसीमधे ,पत्नीमधे ,लेकी मधे आपण पाहिलेली आहे. त्यामुळे कुठेही अतिरंजिकता, अतिरेक वाटत नाही.खरी वाटते. नव्हे ,नव्हे आहेच. या आमंत्रणात जिला आमंत्रित केले आही ती देवी /देवताच असायला हवी असे नाही. प्रत्येक स्त्रीच तशी असते. अशी खात्री कवयित्रीला आहे असे स्पष्ट होते आहे. प्रत्येक शब्दात सकारत्मकता आहे. नकरात्मक शब्दांचा कधीही वापर केलेला नाही. अनुरूप उदाहरणांचा अचूक उपयोग केला आहे. 'उपमान' म्हणजे ज्याची उपमा दिली जाते ते, आणि 'उपमेय' म्हणजे ज्याला ती दिली जाते ते. अभिसारिका,अग्निशलाका,सुवर्णलता,हंसिनी,कामिनी,गजगामिनी, दिप्ती, दामिनी,सरीता,हरिणी,आसावरी, बासरी , मोगरी,मंजिरी,शर्वरी अशी सर्वच्या सर्व स्त्री वाचक उपमान आहेत.वामा हे उपमेय ही स्त्रीलिंगी. म्हणूनच एकमे़कांशी अनुरूप आहेत. शब्द, रूपक, प्रतीक आणि प्रतिमा यांचा उत्तम मेळ जमून अर्थपूर्ण अप्रतिम काव्य तयार झाले आहे. मीनल.
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on गुरुवार, 12/25/2008 - 21:11

Permalink

मीनल..

बापरे... मला अपेक्षित असलेला अर्थ तू लिहिला आहेस या कवितेचा. हे काही देवीचे स्तवन नाहिये.. ही केवळ आणि केवळ स्त्रीला उद्देशून.. तिच्या रूपांचं वर्णन इथे केलं आहे. त्यात मग आई, बहिण, कामिनी, बायको, देवी... मैत्रीण.. सगळीच रूपं आली. खूप खूप आभारी आहे मी तुझी. तू माझ्या कवितेला वाचक फ्रेंडली केलस असं म्हणेन मी. धन्यवाद. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Fri, 12/26/2008 - 07:45

In reply to मीनल.. by प्राजु

Permalink

असेच

मीनलताईंनी खुपच छान समजावुन दिली कविता. या काव्याला एखादी शास्त्रिय संगीतातील चाल लावुन कथ्थक नृत्य बसवायला संधी आहे असे वाटते.
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Fri, 12/26/2008 - 03:36

Permalink

स्त्रीची

सगळी रूपे कवितेत छान दाखविली आहेस. आरतीची चाल लावता येइल का? असे वाटले. रेवती
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 5724 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com