Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by छत्रपति on Tue, 01/15/2008 - 16:37
  • Log in or register to post comments
  • 15596 views

प्रतिक्रिया

Submitted by बहुरंगी on Tue, 01/15/2008 - 16:47

Permalink

काथ्याकुट

छत्रपति, लई काथ्याकुट झालेला आहे या वाक्यांचा. पण दर वेळेला वाचताना हसु येतं. आपला, बहुरंगी मिसळे
  • Log in or register to post comments

Submitted by ब्रिटिश टिंग्या on Tue, 01/15/2008 - 17:26

Permalink

अजून १

येथे सर्व भाषांमध्ये 'झेरॉक्स' काढून मिळेल. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ.प्रसाद दाढे on Tue, 01/15/2008 - 18:02

Permalink

शस्त्र

काही वर्षा॑पूर्वी नारायण पेठेमधील 'अनामिका भेळ' ह्या दुकानामध्ये एक पाटी होती ज्यावर बर्‍याच (पण कॉमन) सूचना होत्या. त्यात सर्वात शेवटची सूचना एकदम डेडली होती. निदान भेळीच्या दुकानात विस॑गत वाटली. 'शब्द हे शस्त्र आहेत, जपून वापरावे'
  • Log in or register to post comments

Submitted by सुनील on Tue, 01/15/2008 - 18:40

Permalink

पुणेरी पाट्या

पुणेरी पाट्या हा एक स्वतंत्र विनोद विषय आहे, हे खरे! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

Submitted by दिनेश५७ on Wed, 01/16/2008 - 22:08

Permalink

आणखी एक

येथे न वाजलेल्या फटाक्यांना वाती लावून मिळतील....((((((
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Wed, 01/16/2008 - 23:54

Permalink

आणखी एक..

बँकेत काऊंटरवर : इथे तबल्याचा ठेका धरू नये.. - प्राजु.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रशांतकवळे on गुरुवार, 01/17/2008 - 14:25

Permalink

आणखीन एक - ओरीजनल

पुण्यातल्या एका चान्गल्या टेलर कडे शर्ट शिवायला गेलो होतो, तेव्हा त्याने एक पावती दिली, त्यावर लिहीले होते "ठरलेल्या तारखेला कपडे देण्याचा आम्ही कसोशीने प्रयत्न करतो, पण उशीर झाल्यास तक्रार चालणार नाही..." प्रशान्त
  • Log in or register to post comments

Submitted by भडकमकर मास्तर on गुरुवार, 01/17/2008 - 14:40

Permalink

एका खानावळीत.....( बहुतेक बादशाही बोर्डिंग हाउस मध्ये...)

येथील वाढप्यांशी सलगी करून त्यांना चिरीमिरी देऊ नये... त्यांना वेळच्या वेळी पगार दिला जातो.
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on गुरुवार, 01/17/2008 - 21:42

Permalink

बादशाही बोर्डिंगमधील सूचना

"काउंटरवर चौकशी करण्यापूर्वी बोर्डावरील सूचना वाचाव्यात." अवांतर - मी बादशाही बोर्डिंगचा दोनेक वर्षे (१९९०-९१) सभासद होतो . त्यावेळी तिथे एक व्यवस्थापक होते; काळी टोपी घातलेले, गोरे-गुलाबी, तुकतुकीत गृहस्थ; ते अत्यंत शिस्तीचे होते. पक्के पुणेकर. (आता ते आहेत की नाहीत कल्पना नाही.) एकदम आत येऊन कोणी त्यांच्याकडे चौकशी करायला लागला की ते काहीही न बोलता, चेहरा मख्ख ठेवून वरील पाटीकडे बोट करीत, आलेला माणूस वरमून जाई आणि तिथे जेवणासाठीच्या नंबरची वाट बघणार्‍यांमधे खसखस पिके! चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by झकासराव on गुरुवार, 01/17/2008 - 23:55

Permalink

पर्वतीच्या

पायथ्याला एका घरासमोर एक पाटी आहे. सुज्ञ व सुजाण नागरीकाना विनंती आहे की त्यानी गेट समोर वाहने लावु नयेत. बालगंधर्व येथे बर्‍याच पाट्या आहेत. एकदम पुणेरी आहेत त्या. पर्वतीवर एक कार्यालय आहे तिथे पाहिलेली पाटी. "हे कार्यालय आहे आत पाहण्यासारखे काही नाही" :) http://www.busybeescorp.com/puneripatya/ इथे बर्‍याचशा पुणेरी पाट्या पहायला मिळतील. अगदी साइटच्या सुरवाती पासुनच पाट्या आहेत :) तुम्हीही तिथे फोटो देवुन सहभागी होउ शकता.
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Fri, 01/18/2008 - 00:53

In reply to पर्वतीच्या by झकासराव

Permalink

दे दणादण!

झकासराव, जबरी दुवा दिलात. सॉलिड पाट्या आहेत! साईटवर वरच्या बाजूला येणारे मेसेजेस सुध्दा नामी आहेत. चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by सुधीर कांदळकर on Sat, 01/26/2008 - 09:21

In reply to पर्वतीच्या by झकासराव

Permalink

व्वा. मजा

आली. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Submitted by भडकमकर मास्तर on Fri, 01/18/2008 - 10:18

Permalink

@चतुरंग, मी

@चतुरंग, मी सुद्धा दोन वर्षे बादशाहीचं जेवण घेतलंय....१९९१ते ९३....त्या मालकांचं नाव बहुधा सहस्रबुद्धे असावं.....
  • Log in or register to post comments

Submitted by केशवसुमार on Sun, 01/27/2008 - 23:31

In reply to @चतुरंग, मी by भडकमकर मास्तर

Permalink

सहस्रबुद्धे

नाही.. बापट..बापट..... ते पाटिवर नावे लिहून घ्यायचे , पांढरी विजार आणि गुरू शर्ट.. आणि ते गल्ल्यावर बसायचे त्या ८० वर्षाच्या अजोबांच नाव विसरलो.. साने का काणे अस दोन आक्षरी एकारांत होते..
  • Log in or register to post comments

Submitted by धोंडोपंत on Sun, 01/27/2008 - 15:14

Permalink

अजून एक

ही पाटी पहा Image removed. आपला, (खल्लास) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
  • Log in or register to post comments

Submitted by केशवराव on Mon, 01/28/2008 - 12:14

In reply to अजून एक by धोंडोपंत

Permalink

पाटी अपलोड करणे......

मी. धोंडोपंत, आपण पुण्याचे काय?
  • Log in or register to post comments

Submitted by सुधारक on Sun, 01/27/2008 - 20:17

Permalink

पालिका पुरस्कृत पाटी

नविन विशेषण बघा स्वच्छ पुणे, सुंदर पुणे, महापौर पुणे
  • Log in or register to post comments

Submitted by धोंडोपंत on Tue, 01/29/2008 - 14:00

Permalink

बादशाही बोर्डींगच्या प्रवेशद्वारावरील पाटी

लोकहो, पुण्याच्या बादशाही बोर्डिंगच्या प्रवेशद्वारावर असलेली पाटी अशी आहे:- Image removed. आपला, (अचंबित) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
  • Log in or register to post comments

Submitted by धोंडोपंत on Tue, 01/29/2008 - 14:07

Permalink

पुणेरी जोश्यांच्या संकेतस्थळावरील पाटी

पुणेरी जोश्यांच्या संकेतस्थळावरील पाटी अशी:- Image removed. आपला, (अवाक्) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
  • Log in or register to post comments

Submitted by धोंडोपंत on Tue, 01/29/2008 - 14:15

Permalink

आजचा विचार

पुणेरी लोकांना "आजचा विचार" या सदराखाली रोज काहीतरी लिहायची सवय असते. विचारवंतच ते. अशाच एका बुद्धीमान विचारवंतांने लिहिलेल्या विचारांची ही पाटी. Image removed. आपला, (आश्चर्यचकित) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Tue, 01/29/2008 - 17:19

Permalink

पुणेरी पाट्या....

ह.ह.पु.वा. धन्य ते पुणे... काही पाट्या तर केवळ छायाचित्रे आहेत म्हणून त्या आहेत असे वाटले... नाही तर कोणी तोंडी सांगितले असते तर विश्वास बसला नसता... बिपिन.
  • Log in or register to post comments

Submitted by नेने on Tue, 01/29/2008 - 23:36

Permalink

पुणेरी पाट्या

बादशाहीमध्ये मीही नंबर लागायची वाट पहात होतो आणि पाट्या वाचीत होतो. वाचलेली शेवटची पाटी होती "आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये" !!!
  • Log in or register to post comments

Submitted by केशवसुमार on Wed, 01/30/2008 - 01:26

Permalink

अजून काही

पुणेरी पाट्या
  • Log in or register to post comments

Submitted by केशवसुमार on Wed, 01/30/2008 - 01:20

Permalink

अजून काही

Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com