Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by टारझन on Wed, 12/17/2008 - 15:04
  • Log in or register to post comments
  • 21270 views

प्रतिक्रिया

Submitted by सखाराम_गटणे™ on Wed, 12/17/2008 - 15:18

Permalink

८. फारच

८. फारच ज्वलंत काथ्याकुट आहे ---- सखाराम गटणे
  • Log in or register to post comments

Submitted by अघळ पघळ on Sun, 12/21/2008 - 03:39

In reply to ८. फारच by सखाराम_गटणे™

Permalink

पेश्शल प्रतिसाद

टार्‍या ह्या टेंप्लेटमध्ये एक प्रतिसाद खास क्रांतीकारक फॅन क्लब साठी ऍड कर 'मला तुमची कीव वाटते' :D अघळ पघळ
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Wed, 12/17/2008 - 15:12

Permalink

या

या धाग्याचे लेखकांनी माझ्या मनातील भावनांनाच शब्द रुप दिले आहे. (हा पण वरच्या यादीत वाढव रे) -- अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments

Submitted by मनस्वी on Wed, 12/17/2008 - 15:25

Permalink

:))

५. मनतरंग निर्माण झाले
Image removed. मिपा कट्ट्याच्या खाद्यपदार्थांच्या फोटोंचे आणि इतर पाककृतींच्या प्रतिक्रिया?? १. जळवा, जळवा आम्हाला. २. बादलीभर लाळ गळली. ३. आता पुढच्या रविवारी हाच बेत. ४. चला विकांताचा बेत पक्का झाला.
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Wed, 12/17/2008 - 15:30

In reply to :)) by मनस्वी

Permalink

आई गं ......

पाककृती विभाग विभाग सटकलाच की ... च्यायला ह्या बॉस(बौस) च्या फोन मुळे ना ... वाट लागली
  • Log in or register to post comments

Submitted by मनस्वी on Wed, 12/17/2008 - 18:26

In reply to :)) by मनस्वी

Permalink

:)) ---

कुठेही चालणारा - येउ द्या अजून! ------------------------------------------ प्रतिसादावर प्रतिक्रिया - यावर एक झक्कास पैकी लेख येऊ द्यात! ------------------------------------------ इतर : १. जे ठ्या: करुन कॉफी उडवलीये, पार नाकातोंडातून कॉफीचे नळ वाहिले राव!!!!! २. 'अबक पदार्थ' एकदा खाऊन पाहिला पाहिजे बर्रका! ३. एका छानश्या पाककृतीबद्दल आभारी आहे. ४. आधी मस्त कृती देता आणि नंतर त्याहूनही मस्त फोटो! ५. पाककृतीतले बारकावे आणि फोटो के व ळ अ प्र ति म! ६. असे फोटो देऊन लई लई अन्याय करता बॉ आमच्यासारख्यांवर ७. अगदी मनातलं बोललात ८. लगे रहो! कविता फारच आवडली !!! ९. विडंबनाच्या अंगाने जात आहे, अशी पुसटशी शंका येतीये.. १०. तुम्ही तर कमालच केलीत! ११. छप्परफाड.... १२. डोळ्यासमोर अगदि प्रसंग उभा रहिला! अतिशय सुंदर! १३. आपल्या प्रतिभेला दंडवत. ------------------------------------------
  • Log in or register to post comments

Submitted by मनस्वी on Wed, 12/17/2008 - 18:32

In reply to :)) by मनस्वी

Permalink

:))

स्वगत : निम्म्यात वाचायचं सोडलं नाय तर माझाच भुगा झाला असता लेखकमोहोदय , आज आपण एक उच्च प्रतिचे लेखक आहाते हे मान्य करावे लागेल
Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by मिंटी on Wed, 12/17/2008 - 15:23

Permalink

:))

:)) >>५. मनतरंग निर्माण झाले :))
  • Log in or register to post comments

Submitted by अनिल हटेला on Wed, 12/17/2008 - 15:26

Permalink

हा हा हा !!

भावना पोचल्या ... (कोण ही भावना आणी कुठे पोचली ,ते विचारू नये...) :-D बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

Submitted by मृगनयनी on Wed, 12/17/2008 - 17:18

Permalink

मस्तच रे

मस्तच रे टार्‍या.... तू फारच मणावर घेतलय.. बॉ...... हे जाणवते..... :) बाकी मला "विभाग ४ "चे टायटल अंमळ जास्त आवडले / आवडते / आवडेल.. ;) २. पहिलं आणि पाचवं कडवं भयंकर आवडलं ३. सुंदर आहे कविता , फारच भावनिक ४. कविता एखाद्या बैठकीत लिहीलीये वाटतं ५. मनतरंग निर्माण झाले बाकी ... हैबतरावाचं ... अयमीन त्याच्या म्हशीचे काय होतंय... ते व्य नि ने कळव बरं..... अर्थात च ज्या पर्यायाला सर्वांत जास्त वोट्स... तेच होणार....नै का :-? :)
  • Log in or register to post comments

Submitted by मृगनयनी on Wed, 12/17/2008 - 17:14

Permalink

मस्त!

९. हृदय हेलकाऊन टाकणारा लेख .. डोक्यात मुंग्या, पायात कुत्रु, खांद्यावर मुंगळे आले वगैरे वगैरे =)) २. तिसरा, पाचवा, पंचविसावा, त्रेपन्नावा आणी ९२वा फोटू झकास आला आहे ... (हल्ली एवढे फोटू असतात , तरी पब्लिक फोटू चा लंबर कसा लक्षात ठेवतं हे न कळलेलं कोडं आहे .. मात्र प्रतिसाद देताना तो विचार करू नये, लेखकाला मात्र कोणताही फोटू आवडल्याचं समाधान भेटतं ) सिम्पल लॉजिक! व्हेरी नाईस!!
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Wed, 12/17/2008 - 15:37

Permalink

आमची पण थोडी भर

१) आपला लेख वाचला आणी सुन्न झालो / ले २) आपले विचार वाचले आणी फलना फलाना गुर्जी / आजोबा / तात्या /आत्या ची आठवण झाली ३) अशाच प्रकारे आपल्या बरोबर घडलेला किस्सा प्रतिसाद म्हणुन लिहिणे ४) सुचना देणे :- १) ह्या लेखाची / कौलाची खरच गरज होती का ? २) हे जे अशा अशा पद्धतिने लिहिले आहे ते तशा तशा पद्धतीने अजुन प्रभावी झाले असते. ५) भावना पोचल्या ६) तुम्ही काय लिहिले आहे ते तुम्हाला तरी कळाले आहे का ? ७) हा विषयच मुळात अवांतर आहे आत्ता येव्हडयाच सुचल्या आहेत ! अवांतरद्वेष्टा |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य
  • Log in or register to post comments

Submitted by भडकमकर मास्तर on Wed, 12/17/2008 - 15:45

Permalink

१)हा धागा

१)हा धागा अत्यंत "तम्मा तम्मा लोगे" आहे असं माझं मत आहे " मी खूप एन्जॉय केला. २) हे जे अशा अशा पद्धतिने लिहिले आहे ते तशा तशा पद्धतीने अजुन प्रभावी झाले असते. मलाही असेच वाटते. +१ मी आपणाशी सहमत आहे. ३.अगदी चित्रदर्शी लेखन. आता स्क्रीनप्ले लिहायला घ्या तुम्ही. ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Wed, 12/17/2008 - 16:06

Permalink

वाहवा

लेख छानच आहे. प्रत्येक उपाय एका मोठ्या प्रतिसादाचा धनी मला भिती वाटतीय की श्री छोटा डॉन याला प्रतिसाद देताना मिपाची बँडविड्थ बोंबलणार. ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Wed, 12/17/2008 - 16:10

In reply to वाहवा by सहज

Permalink

मला भिती

मला भिती वाटतीय की श्री छोटा डॉन याला प्रतिसाद देताना मिपाची बँडविड्थ बोंबलणार. माझे परममित्र आणि स्नेही श्री छोटा डॉण यांचा व्यक्तिगत उल्लेख करून आणि त्यांच्याविषयी चार शब्द आत्मीयतेने बोलल्यामुळे मला अगदी भरून का काय ते आलं! मूळ "लेखा"ला प्रतिक्रिया (आणि त्यात भर रे टारू) ... (नि:शब्द)
  • Log in or register to post comments

Submitted by छोटा डॉन on Wed, 12/17/2008 - 16:23

In reply to वाहवा by सहज

Permalink

आई आई ग्गं ...

लेख उत्तम जमला आहे. पुलेशु ... >>मला भिती वाटतीय की श्री छोटा डॉन याला प्रतिसाद देताना मिपाची बँडविड्थ बोंबलणार. च्यामारी, आम्हालाच टोला का ? बरं बरं, आज दाखवुन देतो की मोठ्ठा प्रतिसाद काय असतो ते ... सध्या जरा गडाबडीत आहे, एकदा मॅनेजर कटला की मग आम्ही आहोतच. तुर्तास एवढेच. ------ ( अतिच अवांतर ) छोटा डॉन
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on Wed, 12/17/2008 - 16:14

Permalink

क्रिप्टीक

क्रिप्टीक. कळला नाही. तुमच्या खानदानात सर्व जण क्रिप्टीक का? बरचसा कळला नाही. क्षयझ विषयाबद्दल व्यंनि मधुन बोलुया. विदा द्या. अमुक एक साल टरनींग पॉइंट होते लेखकाच्या मते. खुलासा व्हावा.
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Wed, 12/17/2008 - 18:00

In reply to क्रिप्टीक by विनायक प्रभू

Permalink

:)

प्रभुजी, आपल्या प्रतिक्रीयेबद्दल आभार, "टार्‍या उगाच्च " अवांतर : वरिल प्रतिक्रीयांसाठी एक नविन विभाग पाडायला हवा "क्रिप्टोग्राम" म्हणून ... तिथे आपण सांगितलेल्या प्रतिक्रीयांचा पाऊस पडेल ~!~ -टारायक महाप्रभू क्रिप्ट अफ्रिकाना
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on Wed, 12/17/2008 - 18:04

In reply to :) by टारझन

Permalink

गाव

क्रिप्टोगाव रे
  • Log in or register to post comments

Submitted by लिखाळ on Wed, 12/17/2008 - 18:16

In reply to क्रिप्टीक by विनायक प्रभू

Permalink

तुमचा

तुमचा प्रतिसाद वाचून डोके सुन्न झाले. काय अवांतर प्रतिसाद लिहावा तेच कळत नाही. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments

Submitted by वाहीदा on Wed, 12/17/2008 - 16:21

Permalink

तुला सगल्याणची छान Wicket घेता येते हे नकी !

~ वाहीदा
  • Log in or register to post comments

Submitted by मनस्वी on Wed, 12/17/2008 - 16:42

In reply to तुला सगल्याणची छान Wicket घेता येते हे नकी ! by वाहीदा

Permalink

हे छान!

> तुला सगल्याणची छान Wicket घेता येते हे नकी ! + १ पण वुकेट पेक्षा 'त्रिफळा उडवतोस' कसे वाटेल?
  • Log in or register to post comments

Submitted by सखाराम_गटणे™ on Wed, 12/17/2008 - 16:43

In reply to हे छान! by मनस्वी

Permalink

२

+१ वाह वाह, छानच आहे, आवडले पुप्र शु ---- सखाराम गटणे
  • Log in or register to post comments

Submitted by घाटावरचे भट on गुरुवार, 12/18/2008 - 02:51

In reply to हे छान! by मनस्वी

Permalink

टार्‍या,

टार्‍या, जास्त त्रिफळा इकडे तिकडे उडवू नकोस रे...सगळ्यांनाच त्याची गरज नसते. --घाटावरचे (मठ्ठ) भट आम्ही मठ्ठ असल्याकारणाने आम्हांस मराठीखेरीज इतर भाषा समजत नाहीत. क्षमस्व.
  • Log in or register to post comments

Submitted by सुनील on Wed, 12/17/2008 - 17:10

Permalink

+१

लै भारी. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

Submitted by लिखाळ on Wed, 12/17/2008 - 17:30

Permalink

पुन्हा

पुन्हा पुन्हा वाचावा असा लेख आणि तितक्याच वाचनीय प्रतिक्रिया. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Wed, 12/17/2008 - 17:32

In reply to पुन्हा by लिखाळ

Permalink

वाचनखूण

वाचनखूण साठवलेली आहे!
  • Log in or register to post comments

Submitted by आजानुकर्ण on Wed, 12/17/2008 - 17:35

In reply to वाचनखूण by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

जिंदादिली

काय टारझन, सभ्य सुसंस्कृत वाचकांना हा लेख(/चर्चाविषय/कविता/पाककृती) आवडलेली दिसत नाही. सुतकबितक आहे वाटतं. या लेखाला इतरत्र आलेल्या प्रतिक्रिया पाहिल्या की मिपाकरांच्या जिंदादिलीचा अभिमान वाटतो. आपला, (अभिमानी) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments

Submitted by लिखाळ on Wed, 12/17/2008 - 18:13

In reply to जिंदादिली by आजानुकर्ण

Permalink

ह्म्म !

ह्म्म ! म्हणजे तुम्ही इतरत्र जाता तर ! -- (बाणेदार)लिखाळ.
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Wed, 12/17/2008 - 18:00

Permalink

आम्ही फक्त

आम्ही फक्त आमच्या लेखांवर प्रतिक्रिया देणार्‍यांच्या लेखालाच प्रतिक्रिया देतो. क्षमस्व ! |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Wed, 12/17/2008 - 18:06

Permalink

फक्त वादविवाद होणार्‍या काथ्याकूटासाठीच ...

सभासद अमुकतमुक यांस, आपल्या सकारात्मक प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. किंबहुना आपल्या अनेक विषयावरील शोधपुर्ण लिखाणामुळे मी या साईटवर पुरावा देण्याच्यासाठी उद्युक्त झालो(/ले).अन्यथा तेच तेच लिहून मला कंटाळा आला आहे. अशा शोधकार्यासाठी प्रसिद्ध संशोधिला डॉ. कु. चंद्रिका कोपरखळे यांनी नेहमीच तयारी दर्शवली आहे. त्यांचे तसे एक लेखी इमेलचे पत्रही श्री. उजेड पाडणारे यांचेकडे आहे. असो. आज इतकेच. तरीही आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार. -- टदिटी टटकर (अवांतरः या प्रतिक्रियेसाठी मिपाचा थोडा अभ्यास करावा लागला.)
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Wed, 12/17/2008 - 18:31

In reply to फक्त वादविवाद होणार्‍या काथ्याकूटासाठीच ... by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

के व ळ अ प्र

के व ळ अ प्र ति म ! शब्द संपले !!!! =)) =)) =))
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय on Wed, 12/17/2008 - 21:17

In reply to फक्त वादविवाद होणार्‍या काथ्याकूटासाठीच ... by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

७. ह्या प्रतिसादात

७. ह्या प्रतिसादात आम्हाला धनंजय दिसले
  • Log in or register to post comments

Submitted by लिखाळ on Wed, 12/17/2008 - 18:17

Permalink

का कोण

का कोण जाणे टचकन डोळ्यात पाणी आले. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Wed, 12/17/2008 - 18:24

In reply to का कोण by लिखाळ

Permalink

का कोण

का कोण जाणे टचकन डोळ्यात पाणी आले. रुमाल हवाय का बादली? (अजिबात ह.घेऊ नका, बजावून ठेवते)
  • Log in or register to post comments

Submitted by लिखाळ on Wed, 12/17/2008 - 18:48

In reply to का कोण by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

> रुमाल

> रुमाल हवाय का बादली? (अजिबात ह.घेऊ नका, बजावून ठेवते) < तुम्ही माझ्या भावना दुखवत आहात. मला हे अजीबात आवडले नाही. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Wed, 12/17/2008 - 19:26

In reply to > रुमाल by लिखाळ

Permalink

> रुमाल

> रुमाल हवाय का बादली? (अजिबात ह.घेऊ नका, बजावून ठेवते) < तुम्ही माझ्या भावना दुखवत आहात. मला हे अजीबात आवडले नाही. १. अहो, लोकांना प्यायला पाणी मिळत नाही, तुम्ही टीपं कसली गाळताय? २. पुन्हा २६ जुलै होऊ नये म्हणून आधीच सोय करुन ठेवते. ३. ऑफिस-प्लँटला पाणी घालायचंच आहे, त्यासाठी उठायला नको म्हणून विचारलं. ४. भावना कशा असतात, त्या दुखतात तर डॉक्टरला विचार ने!
  • Log in or register to post comments

Submitted by लिखाळ on Wed, 12/17/2008 - 19:35

In reply to > रुमाल by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

पुन्हा

पुन्हा तेच. लोकांना पाणी मिळायचा आणि माझ्या डोळ्यात लेख वाचून पाणी यायचा काय संबंध ते स्पष्ट करा. २६ जुलैला असाच लेख प्रकाशित झाला होता का? मराठी संकेतस्थळावर ऑफिस-प्लँट असे इंग्रजी शब्द चांगले वाटत नाहीत. डॉक्टरकडे जायचे की नाही ते माझे मी पाहून घेईन. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments

Submitted by लिखाळ on Wed, 12/17/2008 - 18:51

Permalink

कलादालनात

कलादालनातील प्रतिक्रियांबद्दल अधिक माहितीसाठी वाचा कॉफिचा कप -- लिखाळ.
  • Log in or register to post comments

Submitted by ब्रिटिश on Wed, 12/17/2008 - 19:50

Permalink

दादुस

दादुस , झोडलस सगल्याना तोडलस सगल्याना फोडलस सगल्याना मोडलस सगल्याना साला हिकर आलास त लगनाचा बार उडवुन टाक. बरा होशील, (हलूहलु झे) मिथुन काशिनाथ भोईर (जल्ला सगला काय नावानच हाय)
  • Log in or register to post comments

Submitted by कुंदन on Wed, 12/17/2008 - 21:26

Permalink

अवांतर प्रतिसादांवर अजुन एक प्रतिसाद.....

पुढिल प्रतिसादासाठी शुभेच्छा!!!
  • Log in or register to post comments

Submitted by छोटा डॉन on Wed, 12/17/2008 - 22:39

Permalink

यशस्वी प्रतिसादकर्ता होण्यासाठी काय करावे ... भाग १

आमचे (अवांतर ) परममित्र टारुसाहेब ह्यांनी एका चांगल्या विषयाला तोंड फोडले आहे. बर्‍याच दिवसापासुन मी "लंबेचौडे, दिर्घ म्हणजे थोडक्यात सहजरावांच्या भाषेत मिपाच्या बँडविड्थचा बँड वाजवणारे प्रतिसाद कसे लिहावेत" ह्यासंबंधीच्या मार्गदर्शनपर लेखाची तयारी करत होतो पण आता त्यातले बहुसंख्य मुद्दे याच लेखात संक्षेपाने आल्याने आता तो लेख टाकण्यातली हवा निघुन गेली आहे. त्याबद्दल टारुसाहेबांचे ( अवांतर ) हाबिणंदण व त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा ...! असो. आधीच मी मान्य करतो की मी टारुशी " +१, सहमत आहे" , त्याबाबतीत शंका नसावी. असो. तर आता मिपावरचा यशस्वी प्रतिसादकर्ता होण्यासाठी काय करावे ह्यासाठी काही टिप्स ...(मी टिप्स देऊ शकतो ह्याचाच अर्थ मी मिपवारचा यशस्वी प्रतिसादकर्ता आहे हे सुज्ञांच्या लक्षात आलेच असेल, ज्यांना हे मान्य नाही ते हे विधान त्यांना झालेल्या "जळजळीतुन" आले आहे हे आम्ही इथे स्पष्टपणे नमुद करु इच्छितो. ) १. काथ्याकुट : आजकाल ह्या विभागाला फार चलती आहे, सगळ्यात जास्त प्रतिसाद खेचणार्‍या विभागामधला हा एक विभाग, ह्या साहित्यला प्रतिसाद न देण्याची घोडचुक करणे म्हणजे "दैव आलेय द्यायला आणि कर्म नाही घ्यायला" असा प्रकार आहे. तेव्हा ह्याला जरुर प्रतिसाद द्यावा. ह्याचे पण २ प्रकार पडतात, पहिला प्रकार म्हणजे उगाच १-२ ओळीत काहीतरी खरडुन मग कोंबड्या झुंझवण्याची मजा पहात बसणारा प्रकार. मग विषय काहीही असला तरी तो मात्र ज्वलंत, धगधगता, व्यवस्थीत चिरफाड करता येईल असे असला म्हणजे आपले काम सोपे होते. आपण पहिल्या ५-६ प्रतिसादांची वाट पहायची, आपोआपच त्यात आरामत २ विरोधी सुर नक्की निघतात, मग १०-२०-३० / छापा-काटा करुन आपण कोणत्या बाजुला आहेत हे ठरवावे, एकदा का हा निर्णय झाला मग कसली भिती नाही. मात्र बाजु निवडताना आप्ले विरोधक जास्त असतील ही काळजी घ्यायला हवी. सुरवात करतानाच एखाद्या आधीच पडलेल्या आपल्या विरोधी प्रतिसादातले एखादे वाक्य निवडुन त्याला लगेच "स्पष्ट असहमत, हे वास्तवीक असे पाहिजे " ह्या अर्थाचा प्रतिसाद द्यावा. उदा : जर चर्चा "निवासी /अनिवासी " असेल तर तत्काळ "आम्हाला आमचा देश प्यारा, भाकरीसाठी परकीयांपुढे शेपटी हलवणे आम्हाला मान्य नाही" ह्या अर्थाचे वाक्य ठोकुन द्यावे, मात्र हे करत असताना आपण हा प्रतिसाद "अमेरिका, युरोप, युके" इथे ऑफीसात बसुन लिहीत नाही ना ह्याची मात्र खात्री करुन घ्यावी, उगाच ४ लोकात शोभा होते ना. एकदा का हे जमले की आपोआपच "विरोधी प्रतिसादांचे आग्यामोहळ" अंगावर धावुन येते, तुम्ही जास्त काही करु नका, ओच तोच मुद्दा वेगवेगळ्या शब्दात मांडत रहा, म्हणजे असे की " आम्ही भारतातच राहुन मीठ भाकरी खाऊ, तुमचा पिझ्झा / पाश्ता तुम्हाला लखलाभ होवो किंवा म्हातार्‍या आईवडीलांची काळजी घेणे हे मला हिरव्या नोटांपेक्षा जास्त महत्वाचे वाटते किंवा तुमच्या प्रासादापेक्षा माझी झोपडीच मला प्रिय वगैरे वगैरे " असे प्रतिसाद टाकावेत. लोक अजुन खवळुन उठुन पानपानभर प्रतिसाद खरडतात, मग हळुच कुणाच्यातरी "ग्रीनकार्डावर टिका " करणारे पिल्लु सोडु द्यावे, चर्चा अजुन भडकते व लोक पुढे तुम्ही अजुन काय खरडतात / दिवे लावताय ह्याची वाट पाहतात ... खुप कंटाळा आला की मग शेवटी " छ्या, काहीपण म्हणा पण आपल्या देशातच चिंग होऊस्तोवर बिअर पिऊन मग गाड्यावरची भुर्जी खाण्याची मजा काही औरच.... " असा प्रतिसाद टाकुन द्यावा, अजुन ज्वाळा भडकतात ... लोक जर वैतागुन वैयक्तीक खरडी / व्यनी टाकु लागले तर शेवटी " माझ्याकडुन मी थांबतो, ह्यापुढे कसल्याही प्रश्नाला उत्तर द्यायला मी बांधील नाही " असा समारोप करावा. पण ह्या समारोपातच " जय हिंद, जय महाराष्ट्र " सारखी घोषणा टाकुन आपले देशप्रेम पुन्हा एकदा सिद्ध करण्याची संधी दवडु नये. हा हा म्हणता तुम्ही "वाद विवादातले प्रसिद्ध प्रतिसादकर्ते" होऊन जाल ... आता दुसरा प्रकार म्हणजे "नमनालाच २ पाने भरतील एवढे लिखाण टाकुन काथ्याकुट", ह्यात जरा मुद्दे स्पष्ट असल्याने आपल्याला वाव कमी मिळतो पण यासाठी हार मानायची गरज नाही. शक्यतो लेख पुर्ण वाचु नये, वाचुन त्यातले जास्त काही कळेल असेही नाही. फक्त गाठीला असावेत म्हणुन २-४ मुद्दे नजरेखालुन घालुन ठेवावेत. जर चर्चा "राजकारण" ह्यावर असेल तर त्वरेने "छ्या, राजकारण म्हणजे गटार" असे जाहीर करुन मोकळे व्हावे. मग सर्वात प्रथम ( जीव तोडुन २ पानं लेख खरडलेला ) लेखक भडकतो व मग बाकीचे, त्यांना व्यवस्थीत अंगावर येऊ द्यावे, मग पुन्हा एकदा "राजकारण्यांची औकाद, पक्षाचा इतिहास, नेतृत्व " ह्याविषयी एखादे आक्षेपार्ह्य वाक्य सोडुन द्यावे. म्हणजे " राहुल गांधीची अजुन पात्रता नाही / काँग्रेसमध्ये घराणेशाही सोडुन अजुन काय आहे दुसरे / बीजेपीने हिंदुत्व मुद्दा सोडुन द्यावा / राज ठाकरेने परतुनी घरट्याकडे जावे " असा सुर काढावा म्हणजे ह्याचा बाजुचे व विरोधकांचे पुन्हा ह्यावर जुंपते. तुम्ही मात्र शांत रहा, जमल्यास गुगलुन काही मिळाल्यास अजुन काही "जळजळीत सापडल्यास " ते "चु.भु.द्या.घ्या." ह्या टीपेसकट टाकुन द्यावे. चर्चा रंगत जाते ... लोकांना जरी चर्चा लक्षात राहिली नाही तरी "उलटसुलट / भडखाऊ / आक्रस्ताळी " विधाने करणारे तुम्ही जरुर लक्षात राहता व हा हा म्हणता तुमचा "वितंडवादी भांडखोर प्रतिसादकर्ता " म्हणुन लौकीक वाढु लागतो. ***** २. काव्यविभाग : ह्यात प्रतिसाद देण्याआधी २ शक्यता विचारात घ्याव्यात. पहिली म्हणजे तुम्हाला काव्य कळते का ? ह्याचे उत्तर होय असल्यास कधीही पहिला प्रतिसाद "कविता आवडली" असा चुकुनही टाकु नये, मग तुमच्या काव्य समजण्याचा काय घंटा उपयोग ? त्याऐवजी चुका शोधण्याचा प्रयत्न करीत रहा, म्हणजे उदा. तुम्ही " आशय उत्तम आहे पण वॄत्तात / मात्रेत मार खाल्लात, शेवटच्या २ कडव्यात जरासा तोल ढासळला , चांगला प्रयत्न आहे पुढील प्रयत्नास शुभेच्छा, थोडीशी भडक वाटते आहे, यमक जुळवण्याचा नादात कवितेचा गाभा ढासळला , जर अलाण्या फलाण्याच्या जागी फलाणे फलाणे टाकले तर जमुन जाईल , आशय व्यवस्थीत समजला नाही, फारच विस्कळीत वाटली " ह्यापैकी एखादी प्रतिक्रीया पुन्हा एकदा १०-२०-३० करुन टाकुन द्यावी. मात्र नक्की काय करायला हवे हे "गुलदस्त्यात" राहु द्यावे, स्पष्टपणे सल्ला मुळीच देऊ नये. तुम्ही फारच पट्टीचे असाल तर मात्र त्याच धाग्यात उत्तर देताना लगेच " प्रति कविता " रचुन दाखवावी व वरुन "हे जमते का पहा " असे ठेऊन द्यावे. मग मात्र "प्रतिभेला सलाम, तोडलतं, खल्लास " असे प्रतिसाद मुळ कवितेला यायच्या ऐवकी तुम्हालाच येतात व हा हा म्हणता तुम्ही "काव्य ह्या प्रांतातले दादा/अधिकारी " म्हणुन ओळखले जाऊ शकता. असो. आता दुसरा प्रकार म्हणजे तुम्हाला काव्यातले काहीही कळत नाही, तुम्ही चक्क माठ आहात तर काय करावे. सर्वात प्रथम जी येईल त्या कवितेला वर टारझन म्हणतो तसे प्रतिसाद देत सुटावे पण ह्यात एक गोम आहे, इथे प्रत्येक प्रतिसादात " आम्हाला काव्यतले काहीही कळत नाही जे जगजाहीर आहे / आयला, आम्हाला कविता करायला फतरे जमत नाही / ज्या दिवशी कविता करत येईल त्यादिवशी मारुतीला २१ नारळं वाढवीन " हे पालुपद जोडुन द्यावे. मात्र तुम्हाला काव्यातले कळत नसुन तुम्ही असे प्रतिसाद कसे देता असा प्रश्नाल्यास सोईस्कर मौन पाळावे. मधुन आधुन "कवितेल दुरुस्त्या" सुचवाव्यात, म्हणजे जसे की "ढळले च्या जागी कोसळले किंवा कळले कसे होईल ? / धावती गाढवे च्या जागी ...... जाऊ द्या, बोलण्यासारखे नाही ते " असे विचारत रहावे. तुमचे चुक आहे तुम्हालाही माहित असते पण कवी / कवयत्री मात्र जाम खुष होऊन स्पष्टीकरण वगैरे देतात व तुम्हाला भाव मिळतो, लगेच त्यांचे आभार मानुन मोकळे व्हावे. तुम्हाला काय व किती कळले ही बाब आधीही महत्वाची नव्हती व आताही नाही, आपले अस्तिस्व जानणुन दिल्याशी मतलब. जर तुम्ही पुधच्या यत्तीतले असाल तर "खरडवह्यातुन" ह्या कवितेबाबत कवीशी "चर्चा" सुद्धा करु शकता, मात्र त्यासाठी थोडी हिंमत व थोडा अर्धवटपणाचा आव मात्र आणावा लागेल. ह्यातुन तुम्ही त्या कवी / कवियत्रीच्या "बडी लिस्ट / गुड लिस्ट " मध्ये सुद्धा शिरकाव करु शकता ... तर कविता कळो अथवा न कळो प्रतिसाद हा दिलाच पाहिजे ... असो. ( विस्ताराच्या भयाने इथेच थांबतो. बाकीचे पुढ्च्या भागात ... धन्यवाद ...! ) प्रतिसाद क्रमश : ( नियमाप्रमाणे ) अवांतर : मुळ लेखापेक्षा प्रतिसाद मोठ्ठा झाला काय ? बोंबलतेय आता पब्लिक ( नियमाप्रमाणेच ) अति-अवांतर : काय सहजशेठ, कसे काय ? सर्व काही क्षेम ना ? ------ छोटा डॉन
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Wed, 12/17/2008 - 22:46

In reply to यशस्वी प्रतिसादकर्ता होण्यासाठी काय करावे ... भाग १ by छोटा डॉन

Permalink

मित्रा

मित्रा तोडलस , जिंकलस... आणखीन काय काय असते ना ते केलेस... -- अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Wed, 12/17/2008 - 23:39

In reply to मित्रा by अवलिया

Permalink

डॉन म्हाराज...

उदा : जर चर्चा "निवासी /अनिवासी " असेल तर तत्काळ "आम्हाला आमचा देश प्यारा, भाकरीसाठी परकीयांपुढे शेपटी हलवणे आम्हाला मान्य नाही" .....एकदा का हे जमले की आपोआपच "विरोधी प्रतिसादांचे आग्यामोहळ" अंगावर धावुन येते, ....." आम्ही भारतातच राहुन मीठ भाकरी खाऊ, तुमचा पिझ्झा / पाश्ता तुम्हाला लखलाभ होवो किंवा म्हातार्‍या आईवडीलांची काळजी घेणे हे मला हिरव्या नोटांपेक्षा जास्त महत्वाचे वाटते किंवा तुमच्या प्रासादापेक्षा माझी झोपडीच मला प्रिय वगैरे वगैरे " ....... "ग्रीनकार्डावर टिका " करणारे पिल्लु सोडु द्यावे, चर्चा अजुन भडकते व लोक पुढे तुम्ही अजुन काय खरडतात / दिवे लावताय ह्याची वाट पाहतात ... ..... मजा काही औरच.... " असा प्रतिसाद टाकुन द्यावा, अजुन ज्वाळा भडकतात ... .....पण ह्या समारोपातच " जय हिंद, जय महाराष्ट्र " सारखी घोषणा टाकुन आपले देशप्रेम पुन्हा एकदा सिद्ध करण्याची संधी दवडु नये. हा हा म्हणता तुम्ही "वाद विवादातले प्रसिद्ध प्रतिसादकर्ते" होऊन जाल ... हे सगळे मुद्दे अगदी मस्त घेतले आहेस. जसे काही माझ्याच मनातुन उचलले. लेखन कौशल्य आणि वादप्रभु्त्व सिद्ध करणा-या नपुंसक आणि वांझोट्या चर्चांसाठी तसेच फावल्या वेळची करमणुक हेच एकमेव उद्दिष्ट असलेल्या चर्चांसाठी याचा फार छान उपयोग होतो. फक्त याचा तोटा असा होतो, की तुम्ही खरेच असे आहात असे समजुन लोक तुमच्याकडे तुम्ही घाउक द्वेष करणारे आहात असे समजतात व तुम्हाला टाळतात किंवा टाळु शकतात. हे होवु द्यायचे नसेल तर काय करावे किंवा केले पाहिजे या विचारात मी सध्या आहे. अर्थातच तुला काही सुचत असेल तर कळव. -- अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments

Submitted by छोटा डॉन on Wed, 12/17/2008 - 23:42

In reply to डॉन म्हाराज... by अवलिया

Permalink

तुम्ही बरोबर आहात नाना ...

नपुंसक आणि वांझोट्या चर्चांसाठी तसेच फावल्या वेळची करमणुक हेच एकमेव उद्दिष्ट असलेल्या चर्चांसाठी याचा फार छान उपयोग होतो.
अगदी अचुक ... केवळ करमणुक हेच उद्दिष्ट मानुन मी "ह्याचा" समावेश केला, बाकी माझ्याही मनात तसे काही नाहीच. केवळ "गमजा" हेच उद्दिष्ट ... असो.
की तुम्ही खरेच असे आहात असे समजुन लोक तुमच्याकडे तुम्ही घाउक द्वेष करणारे आहात असे समजतात व तुम्हाला टाळतात.
असे काही नाही हो नाना, कोण म्हणतो असे ? सर्व काही क्षणिक हो, कोनीही सिरीअस घेत नाही ...
हे होवु द्यायचे नसेल तर काय करावे या विचारात मी सध्या आहे. तुला काही सुचत असेल तर कळव.
अगदी नक्की कळवीन ... विचार करुन उद्या लिहतो, आता ( भारतात झोपायला ) खुप उशीर झाला आहे ... पण चांगली आयडीया दिलीत, ह्यावरही जरुर लिहावे असे ठरवतो ... ------ छोटा डॉन
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Wed, 12/17/2008 - 23:03

In reply to यशस्वी प्रतिसादकर्ता होण्यासाठी काय करावे ... भाग १ by छोटा डॉन

Permalink

आगं बाबो

बैंडविड्थ बोंबलणे कशास्नी म्हंत्यात त्ये कळाले !! बाकी काय बोलावे .... डाण्याने राहिलेली कसर "शब्दशः" पुर्ण केलेली आहे... काथ्याकुटातल्या कुटनिती (ज्या आम्हाला माहितीच नव्हत्या) परफेक्ट बाहेर पडल्यात ... डाण्याच्या आणखिन एका तडाखेबंद प्रतिसादा करता टाळ्या Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed. शब्दकोष रिता झाला आहे !!! - (छोडा डॉण समर्थक) टारडॉण
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Wed, 12/17/2008 - 23:11

In reply to आगं बाबो by टारझन

Permalink

काथ्याकुट

काथ्याकुटातल्या कुटनिती (ज्या आम्हाला माहितीच नव्हत्या) परफेक्ट बाहेर पडल्यात ... असे लिहुन टारझन महाराजांनी आपल्या गाढ विद्वत्ता असुन सुद्धा अंगी असलेल्या विनय की नम्रतेचे जे दर्शन घडवले आहे ते पाहुन अतिशय बरे वाटले काय हो चतुरंगशेट बरोबर आहे ना मी काय म्हणतो ते... गेले वाटते म्हणजे भासमान मधे हो... तुम्हाला काय वाटले? -- अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल नावाचा बैल on गुरुवार, 12/18/2008 - 00:36

In reply to काथ्याकुट by अवलिया

Permalink

" आम्ही

" आम्ही भारतातच राहुन मीठ भाकरी खाऊ, तुमचा पिझ्झा / पाश्ता तुम्हाला लखलाभ होवो किंवा म्हातार्‍या आईवडीलांची काळजी घेणे हे मला हिरव्या नोटांपेक्षा जास्त महत्वाचे वाटते किंवा तुमच्या प्रासादापेक्षा माझी झोपडीच मला प्रिय वगैरे वगैरे " हाण तिच्याआयला!! डानराव जहबहर्याच!!! नानासाहेब, खाई त्याला खवखवे ही म्हण माहित आहे का हो? ;) आपला (म्हणीप्रेमी) बैलोबा
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on गुरुवार, 12/18/2008 - 10:51

In reply to " आम्ही by धमाल नावाचा बैल

Permalink

हो

आणि अति शहाणा त्याचा बैल रिकामा (राहुन धमाल करतो) ही पण म्हण माहित आहे :) -- अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments

Submitted by छोटा डॉन on Wed, 12/17/2008 - 23:12

In reply to आगं बाबो by टारझन

Permalink

स्पष्ट असहमत ...

>> .... डाण्याने राहिलेली कसर "शब्दशः" पुर्ण केलेली आहे... असहमत ..! "पुर्ण केली " ह्या शब्दाला माझा आक्षेप आहे, आम्ही तेथे "क्रमशः" असे स्पष्ट लिहले आहे. असो. तुमचे ज्ञान व वाचन अर्धवट / अपुरे असल्याने ह्यापुढे तुमच्याशी वाद घालायची माझी इच्छा नाही तसेही ह्यापुढील तुमच्या कसल्याही प्रश्नाला उत्तर देण्यास मी बांधील नाही. ( हे भांडण नाही, उलट ह्यातुनच आम्ही तुम्हाला अजुन वाद घालण्याची एक युक्ती जाता जाता शिकवली हे ध्यानात आलेच असेल. असो. ) ------ छोटा डॉन
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com