Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by रातराणी on गुरुवार, 09/24/2015 - 13:23
हल्ली कमीच झालंय तस तुझी आठवण येणं, ओसरत आहे हळू हळू हळव्या समुद्राच उधाण हल्ली कमीच झालंय तस रात्र रात्र तळमळणं, मला बघून अंधारानेही कमी केलंय उसासे सोडणं. हल्ली कमीच झालंय आता मला मोग-याने खुणावणं, त्यालाही झालंय सवयीचं झुरत झुरत गळून जाणं. हल्ली कमीच झालंय स्वप्नांनी डोळ्यात गर्दी करणं, मलाच कसं नाही जमलं असं वेळीच शहाणं होणं. हल्ली कमीच केलंय मी माझ्याच मनाच ऐकणं, तुझ्याकडे तरी आलंय का रे माझं टिपूर चांदणं? (नाव सुचलंच नाही कवितेला.)

Submitted by वेल्लाभट on गुरुवार, 09/24/2015 - 14:07

Permalink

पहिल्याच कडव्यात यमकाचा घोळ

पहिल्याच कडव्यात यमकाचा घोळ झालाय. बाकी काव्यातले भाव उत्तम.
  • Log in or register to post comments

Submitted by चांदणे संदीप on गुरुवार, 09/24/2015 - 14:15

In reply to पहिल्याच कडव्यात यमकाचा घोळ by वेल्लाभट

Permalink

+१

अगदी हेच वाटले मलाही!
  • Log in or register to post comments

Submitted by सस्नेह on गुरुवार, 09/24/2015 - 14:41

In reply to पहिल्याच कडव्यात यमकाचा घोळ by वेल्लाभट

Permalink

कविता मस्त.

हल्ली कमीच झालंय तस तुझी आठवण येणं, ओसरत चाललं आहे हळव्या समुद्राचं उधाण.
असे चालेल का ? ..कविता मस्त. 'विखुरलेलं चांदणं' हे नाव चालेल का ?
  • Log in or register to post comments

Submitted by रातराणी on गुरुवार, 09/24/2015 - 18:11

In reply to कविता मस्त. by सस्नेह

Permalink

अर्रर घोळ घातला का मी!

अर्रर घोळ घातला का मी! ताई शीर्षक आणि बदल दोन्ही आवडले हळवा + समुद्र + उधाण हे कोम्बिनेश्न्च जबरा आहे!
  • Log in or register to post comments

Submitted by मांत्रिक on गुरुवार, 09/24/2015 - 14:23

Permalink

उधाणलेल्या समुद्राला आता हळू

उधाणलेल्या समुद्राला आता हळू हळू भान येणं असं केलं तर? बाकी १ नं.
  • Log in or register to post comments

Submitted by रातराणी on गुरुवार, 09/24/2015 - 18:16

In reply to उधाणलेल्या समुद्राला आता हळू by मांत्रिक

Permalink

धन्यवाद! हाही बदल छानच आहे!

धन्यवाद! हाही बदल छानच आहे!
  • Log in or register to post comments

Submitted by एस on Sat, 09/26/2015 - 14:26

In reply to उधाणलेल्या समुद्राला आता हळू by मांत्रिक

Permalink

+१

उधाणलेल्या समुद्राला आता हळू हळू भान येणं
माझ्यामते असेच हवे होते. यमकही जुळेल आणि चेतनगुणोक्ती अलंकारामुळे काव्यात्मकता आणखी वाढेल. क्रियापदाच्या शेवटच्या अक्षराची मात्रा लुप्त दाखवायचा असल्यास तिथे अनुस्वार देतात. उदा. येणे/येणं. ह्याला अपवाद म्हणजे कर्तरी प्रयोगात कर्ता स्त्रीलिंगी असेल तर शेवटची मात्रा लुप्त होत नाही. उदा.ती आंबा खाते. इथे 'खाते' चं 'खातं' होत नाही. हा नियम काही विशेषणांनाही लागू पडतो. उदा. कसेबसे/कसंबसं. ह्यामुळेच येणं आणि उधाण हे यमकात बसत नाही. त्याऐवजी उधाणणं असे क्रियापद वापरले तरी चालू शकेल.
  • Log in or register to post comments

Submitted by निनाव on गुरुवार, 09/24/2015 - 20:25

Permalink

Surekh.

Kavita khoop aavadli. Chhaanach vtakta jhaale aahe.
  • Log in or register to post comments

Submitted by विवेकपटाईत on गुरुवार, 09/24/2015 - 20:52

Permalink

कविता आवडली

कविता आवडली
  • Log in or register to post comments

Submitted by रातराणी on गुरुवार, 09/24/2015 - 23:22

Permalink

धन्यवाद!

धन्यवाद! मला बदल करून देतील का कुणी सासं पहिल्या कडव्याची दूसरी ओळ ओसरत आहे हळू हळू हळव्या समुद्राच उधाण अशी करायची आहे आणि शिर्षक विखुरलेल चांदण द्यायच आहे. स्नेहाताई खूप खूप आभार इतके छान बदल सुचवल्याबद्दल!
  • Log in or register to post comments

Submitted by वेल्लाभट on Fri, 09/25/2015 - 00:10

In reply to धन्यवाद! by रातराणी

Permalink

डन

डन
  • Log in or register to post comments

Submitted by रातराणी on Fri, 09/25/2015 - 00:06

Permalink

अरे वा! कुणी बदललं? मनापासून

अरे वा! कुणी बदललं? मनापासून धन्यवाद सा सं !
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Fri, 09/25/2015 - 01:15

In reply to अरे वा! कुणी बदललं? मनापासून by रातराणी

Permalink

सा सं ना पावर नाय म्हनतेत. हे

सा सं ना पावर नाय म्हनतेत. हे काम त्याच संपादिकेचं दिसतंय ज्यांनी चांदणं बिखरवलं आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by एस on Fri, 09/25/2015 - 01:21

In reply to सा सं ना पावर नाय म्हनतेत. हे by प्यारे१

Permalink

'डन'

एक मजला सोडून वरती बघा की!
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Fri, 09/25/2015 - 02:06

In reply to 'डन' by एस

Permalink

मायला. आय माय स्वारी बरका.

मायला. आय माय स्वारी बरका. कोण सं, कोण सा सं, कोण स्व सं आणि कोण काय करतंय काही कळत नाही राव.
  • Log in or register to post comments

Submitted by एक एकटा एकटाच on Fri, 09/25/2015 - 00:16

Permalink

सुरेख रचना

सुरेख रचना
  • Log in or register to post comments

Submitted by मनीषा on Tue, 10/06/2015 - 14:27

Permalink

सुंदर !

सुंदर !
  • Log in or register to post comments

Submitted by माहीराज on Fri, 10/09/2015 - 18:01

Permalink

हल्ली कमीच झालंय तस तुझी आठवण

हल्ली कमीच झालंय तस तुझी आठवण येणं, तुझ्या स्वप्नातलं माझं ते तुझ्यात हरवुन जाणं.. हे कसं वाटतंय. .
  • Log in or register to post comments

Submitted by रातराणी on Sat, 10/10/2015 - 01:46

In reply to हल्ली कमीच झालंय तस तुझी आठवण by माहीराज

Permalink

मस्त!

मस्त!
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Sat, 10/10/2015 - 01:49

Permalink

वा! छान कविता.

वा! छान कविता.
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 6605 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com