Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by विकास on Wed, 08/26/2015 - 01:55
आप बद्दल आता अजून काही बोलायचे राहीले नाही असे वाटत असतानाच अचानक दोन गोष्टी नव्याने आल्यात. एक प्रत्यक्ष आणि दुसरी किमान वरकरणी अप्रत्यक्ष... दुसरी अधिक गंभीर आहे. दिल्लीत एका मुलीने एका मुलाविरोधात विनयभंगाची तक्रार केली आणि त्यावरून मोठा गदारोळ झाला, त्या मुलाला अटक देखील झाली, जरी त्याला आता जामिनावर सोडले असले तरी. त्यावरून टाईम्स नाऊ वगैरेने आकांडतांडव करत जनतेच्या भावना (त्या मुला विरोधात) भडकवण्याचे काम केले आहे असे देखील दिसत आहे. मात्र नंतर जे बाहेर आले ते वेगळेच होते. एका वयाने मोठी दिसत असलेल्या एका व्यक्तीने "आंखो देखा हाल" सांगितला त्याप्रमाणे तो मुलगा तिच्या जवळ देखील गेला नाही. आणि ती मुलगी मात्र आरडाओरडा करत होती. त्याला त्या मुलीची अथवा मुलाची ओळख नव्हती. त्याने झी टिव्हीवर दिलेल्या मुलाखतीत जे शेवटी म्हणले ते महत्वाचे वाटले... असे जर खोटे मुली बोलू लागल्या आणि ते प्रकाशात आले तर नंतर जेंव्हा खरेच एखादीस गरज असेल तेंव्हा जनता विश्वास ठेवणार नाही आणि दुर्लक्ष करेल... अर्थात त्याचे या आप समर्थकांना काय पडलेय? दुसरा भाग जास्त महत्वाचा आणि गंभीर वाटतो. गुजरातेत विशीच्या सुरवातीत असलेल्या एका युवकाने हार्दीक पटेल याने पटेल-पाटीदार समाजाला ओबिसी घोषित करून राखीव जागा मिळाव्यात म्हणून आंदोलन सुरू केले आहे. त्यातून थोडा भडका उडालेला आहेच पण तो अजून मोठा होण्याची शक्यता आहे. पण त्याचे त्याला काही नाही. वरकरणी तो भाजपाला पुढच्या निवडणुकात हराल असा दम देत आहे. हे प्रकरण अधिक गंभीर अशा साठी आहे कारण "भाजपाचे" म्हणून सरकारला ब्लॅकमेल करत असताना जनतेला आणि अगदी एका विशिष्ठ पटेल समाजाला देखील वेठीला धरणे चालू आहे. हे खचीतच योग्य नाही. पण कोण आहे हा हार्दीक पटेल? जेंव्हा जरा शोधले तेंव्हा त्याचे पान २०१४ चे ट्विटरचे अकाउंट मिळाले आणि त्यात त्याने केलेले आपचे समर्थन देखील दिसले...खालील दोन ट्वीट्स या प्रातिनिधीक आहेत.

सपने सच होगे आम आदमी पार्टी को लाना

— Hardik Patel Patidar (@ca34581e6d09443) April 27, 2014

Gujarat AAM AADMI PARTY Conviner Shukhadev Patel Pe Humla Huva. Dekhiye Yeh He Aam aadmi ki Halat... Yeh bhajap ki kartut he....

— Hardik Patel Patidar (@ca34581e6d09443) April 3, 2014
यातून एक गोष्ट स्पष्ट आहे, या सगळ्या आंदोलना मागचा बोलविता धनी वेगळाच आहे आणि अर्थातच तो धनी इतर कोणी नसून साक्षात अरविंद केजरीवाल आणि आप असावेत असेच यावरून दिसत आहे. ज्या पध्द्तीने यांचे "आप-मतलबी" राजकारण आता जनतेत जातीवरून फूट पाडण्याचा आणि भडका उडवण्याचा प्रयत्न करत आहे ते बघता सत्तेसाठी देश फोडायला पण आम्ही मागेपुढे बघणार नाही हा हीन उद्देश दिसत आहे.
  • Log in or register to post comments
  • 33734 views

प्रतिक्रिया

Submitted by प्यारे१ on Wed, 08/26/2015 - 02:06

Permalink

तरीच! हे अचानक से उभरा हुआ

तरीच! हे अचानक से उभरा हुआ नेतृत्व कुठून आलं याचा विचार करत होतोच. जनतेचं समर्थन जोरात आहे असं सध्या तरी दिसतंय. आज केजरी अचानक मोदीजींची स्वप्नं पूर्ण करु म्हणताना आश्चर्य वाटत च होतं. म्हटलं या महानुभावाला काय झालं? इकडे नॉन स्ट्राइकर ला जाऊन हार्दिक पटेल ला स्ट्राइक दिला गेलाय तर....!
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on Wed, 08/26/2015 - 03:26

Permalink

IBN

IBN च्या बातमीत अखेरीस म्हंटलं होतं: Hardik is inspired by Delhi chief minister Arvind Kejriwal. आणि हा एक फोटो ज्यामध्ये म्हणे कदाचित हार्दिक पटेल गुजरात भेटीत केजरीवालबरोबर त्यांचा चालक म्हणून गाडीत एकत्र आहे: Image removed. अहमदाबाद, सुरत, बडोदा येथील बर्‍याच विभागांत मोठ्या प्रमाणावर खाजगी वाहने आणि बसेस जाळपोळींना सुरूवात झाली आहे. उघड-उघड संघर्ष पोलीस आणि जनता (यात बरेचसे पाटीदार सामील आहेत असं दिसतं आहे) यांत होतांना दिसतो आहे. आप / केजरीवाल यांचा पाठिंबा असो वा नसो, पण समाजाला आंदोलनासाठी प्रोत्साहित करू शकणारा, पण त्याच समाजाला हिंसेपासून मात्र नियंत्रित / परावृत्त करण्याची क्षमता नसणारा आणखी एक नेता जन्माला येतांना दिसतो आहे ही खेदाची गोष्ट आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by गुलाम on Wed, 08/26/2015 - 04:51

Permalink

आप ला सिंगल आऊट करायचं कारण कळलं नाही.

आप ला सिंगल आऊट करायचं कारण कळलं नाही. असेल तो हार्दीक पटेल आपचा समर्थक किंवा अगदी कार्यकर्ता देखील. मला एकदम डाव्या लोकांची भाषा आठवली. ते लोक पण असंच बोलतात - "अरे तो चक्क संघाचा माणूस आहे!!!" अरे?? संघाचा माणूस असणं काही गुन्हा आहे का? थोडक्यात जरी तुम्हाला (आणि मला देखील) केजरीवाल आणि आप आवडत नसली तरी आपचा माणूस असणे काही गुन्हा नाही. इन फॅक्ट भाजपविरोधी विचारसरणीचा मर्यादीत अवकाश बघता ते साहजिकच आहे. दुसरा मुद्दा फुटीचे राजकारण करण्याचा तर ते कोण नाही करत (याचा अर्थ म्हणून आप ने ते करावे असा नाही). फारतर आप पण बाकी राजकीय पक्षांसारखीच निघाला असं म्हणता येईल. पण ते आधीच सिद्ध झाले नाहीये का? फुटीचे राजकारण हे तर भारतीय लोकशाहीचे दुर्दैवी व्यवच्छेदक लक्षणच बनले आहे. 'धर्मनिरपेक्ष' काँग्रेसी पार्टी पण तेच करतात आणि 'जातीयवादी' भाजप वाले पण तेच करतात. जोपर्यंत समाज असल्या जातीय अस्मितांना बळी पडून यांना मते देत राहील तोपर्यंत हे पक्ष त्याचा फायदा उठवणारच. त्यात दोष या पक्षांपेक्षा जास्त समाजाचा आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Wed, 08/26/2015 - 08:09

In reply to आप ला सिंगल आऊट करायचं कारण कळलं नाही. by गुलाम

Permalink

मुद्दा

केजरीवाल आणि आप आवडत नसली तरी आपचा माणूस असणे काही गुन्हा नाही. अजिबात गुन्हा नाही. मी देखील तसे म्हणत नाही. मात्र हे प्रकरण भडकवले जात असताना तो भडकवणारा आप समर्थक असला तर नक्कीच धुरामागे आग कुठली आहे असा प्रश्न पडतो. तोच येथे देखील पडत आहे. फुटीचे राजकारण हे तर भारतीय लोकशाहीचे दुर्दैवी व्यवच्छेदक लक्षणच बनले आहे. सहमतच. तसे करणार्‍या कुणाचेही समर्थन करू नये. मात्र जातीयवाद वर उफाळण्याचा प्रकार १९८०च्या दशकाच्या शेवटी व्हि पि सिंग यांनी केला आणि त्यानंतर त्याची चेन रिअ‍ॅक्शन चालू झाली. केजरीवाल हे विविध पद्धतीने व्हि पि सिंग यांची (अजून) बिघडवून वाढवलेली आवृत्ती आहे अशी अनेकदा काळजी वाटते. महाराष्ट्रात पण काही म्होरक्यांमुळे गेल्या काही वर्षात जातीयता वाढत गेली. त्याचे परीणाम शेवटी सगळ्यांणाच भोगायला लागणार हे वास्तव आहे... असो.
  • Log in or register to post comments

Submitted by गुलाम on Wed, 08/26/2015 - 11:46

In reply to मुद्दा by विकास

Permalink

सहमत आहे

जातीयवाद वर उफाळण्याचा प्रकार १९८०च्या दशकाच्या शेवटी व्हि पि सिंग यांनी केला
भलेही आरक्षणाचा मुळ हेतु सामाजिक न्याय प्रस्थापित करणं असला तरी त्यामुळे एक प्रकारे जातीयवादाला प्रोत्साहन देखील मिळाले आहे, हे नाकारता येणार नाही. ही एक प्रकारची विसंगतीच म्हणावी लागेल. आणि त्या विसंगतीचा फायदा उठवणारे लोकही आपल्याकडे भरपुर आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by पगला गजोधर on Wed, 08/26/2015 - 09:45

In reply to आप ला सिंगल आऊट करायचं कारण कळलं नाही. by गुलाम

Permalink

अतिशय मुद्देसूद प्रतिक्रिया

त्याला पुरवणी म्हणून माझे मुद्दे १. गुजरातेत विरोधी पक्ष अतिशय दुर्बल आहे गेली १५ वर्षे (माझ्या शेजारी भक्तगणातील ऐकला विचारूनच लिहितोय) त्यामुळे त्यांचा या आंदोलनामागे हात आहे फे म्हणणे हास्यास्पद. २. हार्दिक स्वतः बि जे पी आमदार आहे, त्याच्या मागे प्रवीण तोगाडिया व संजय जोशी आहेत असे ऐकण्यात आले. प्रवीण तोगडिया म्हणजे दोन धर्मात तणाव निर्माण करणारे एक्स्पर्ट, वि हिं प नेते, आता सत्ता मिळाल्यामुळे नेतृत्वाला त्यांचा फारसा उपयोग नाही, त्यामुळे ते केंद्रीय पदावरील नेत्याला उपद्रव मुल्य दाखवत असावेत. संजय जोशी हे संघाचे प्रचारक, व प्रचारकाची सर्व बंधने त्यामुळे त्यांना सार्वजनिक जीवनात अमलात आणणे बाध्य होते, पण त्यांचे गुजरातेतील पक्षांतर्गत एका नेत्याशी स्पर्धा होती, त्या नेत्याने संजयजी जोशी यांची एका महिलेबारोबरची बेडरूम मधली निर्वस्त्र अवस्थेतील पूर्ण कामक्रीडा सी डी वर स्टिंग करून जाहीर केल्यामुळे, ते पक्षात वाळीत टाकल्या सारखे मागे गेले, (त्यांना पूर्व महाराष्ट्रातील एक अवजड व वजनदार बि जे पी खासदाराने आपल्या पंखाखाली घेतले आहे सध्या) ३. महाराष्ट्रात मराठा आरक्षणामुळे काही पक्षांवर बि जे पी ने, त्यांना जातीयवादी म्हणून टीका केलेली, व काही धुडगूस घालणाऱ्या संघटनांशी असणाऱ्या संबधावर बोट ठेवले होते, पण आता त्यांच्याच राज्यात अशी चळवळ उभी राहिल्यामुळे, त्यांचा नाईलाज होत असावा म्हणून दुसरीकडे बोट दाखवण्यात येत असावे. ऐक गोष्ट आता त्यानिम्मित्ताने सिद्ध होतेय जातीयवादी तर सर्वच पक्षात आहे, अजून ऐक साम्य, इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्याची घोषणा व आरक्षण अश्या मुद्द्यावर सत्ता मिळवणे वा टिकवणे , तर तीथे पटेलांचा भव्य पुतळा उभारण्याची घोषणा व आरक्षण अश्या मुद्द्यावर सत्ता मिळवणे वा टिकवणे, असे खेळ चालवले जात आहे. *ही माझी वैयक्तिक मते आहेत.तुम्हाला पटेल न पटेल ….
  • Log in or register to post comments

Submitted by खेडूत on Wed, 08/26/2015 - 10:21

In reply to अतिशय मुद्देसूद प्रतिक्रिया by पगला गजोधर

Permalink

हार्दिक स्वतः बि जे पी आमदार

हार्दिक स्वतः बि जे पी आमदार आहे
तो २२ वयाचा आहे असं ऐकलंय. Article 84 (b) of Constitution of India provides that the minimum age for becoming a candidate for Lok Sabha election shall be 25 years. Similar provision exists for a candidate to the Legislative Assemblies vide Article 173 (b) of the Constitution read with Sec. 36 (2) of the R. P. Act, 1950.
  • Log in or register to post comments

Submitted by पगला गजोधर on Wed, 08/26/2015 - 10:39

In reply to हार्दिक स्वतः बि जे पी आमदार by खेडूत

Permalink

मला अत्यंत खेद आहे

मी हार्दिक पटेल बी जे पी आमदार असल्याच्या दावा केला तो चुकीचा असून, मला त्याचा अत्यंत खेद आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by रमेश आठवले on Wed, 08/26/2015 - 06:10

Permalink

काही मुद्दे

१. ज्या कॉलेज विद्यार्थिनी बाबत चर्चा सुरु झाली आहे तिचे नाव आहे जसलीन कौर. तीने दिलील्या मुलाखतीवरून ती खरे सांगत आहे असे मला वाटले. http://www.ndtv.com/video/player/news/woman-shames-abuser-on-social-media-says-20-witnesses-didn-t-help/380159 २. गुजरात मधील पटेल समाज खूप संघटीत,धनवान आणि भाजपा समर्थक आहे. त्या समाजाला, एका होतकरू तरुणाला हाताशी धरून, एवढ्या मोठ्या प्रमाणात एकत्र करून भाजपाचे स्थानिक सरकारच्या विरुद्ध उभे करण्या साठी लागणारी ताकद केजरीवाल मध्ये आज आहे असे मला वाटत नाही . गुजरात सरकार मध्ये इतर पटेल मंत्री आहेत. त्यांच्यातील एक तर अंबानी बंधूंचा जवळचा नातेवाईक आहे. राज्यात इतर ही मान्यवर पटेल नेते आहेत. त्यांच्या पैकी कोणीतरी, आनंदी बेन पटेल यांच्या मुख्य मंत्री पदाचा अभिलाषी असणारा, या आंदोलनाचा बोलविता धनी असल्याची शक्यता नाकारता येत नाही. ३. मी पाहिलेल्या इतर फोटोतील हार्दिक पटेल कार मधील व्यक्ति पेक्षा जरा बुटका आहे आणि तो चष्मा लावत नाही. कारमधील केजरीवाल यांच्या जवळ बसलेली व्यक्ति कोण याची शहा निशा करावयास हवी.
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Wed, 08/26/2015 - 07:56

In reply to काही मुद्दे by रमेश आठवले

Permalink

चित्रफित

विद्यार्थिनीच्या केस संदर्भात ही चित्रफीत बघा. भाजपाचे स्थानिक सरकारच्या विरुद्ध उभे करण्या साठी लागणारी ताकद केजरीवाल मध्ये आज आहे असे मला वाटत नाही . म्हणूनच हे प्यादे तयार केले आहे आणि ज्याने पब्लीकला भडकवता येईल असा मुद्दा तयार केला आहे असे म्हणायला जागा आहे. कारमधील केजरीवाल यांच्या जवळ बसलेली व्यक्ति कोण याची शहा निशा करावयास हवी. सहमत.
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवटराव on Wed, 08/26/2015 - 09:34

In reply to काही मुद्दे by रमेश आठवले

Permalink

ताकद केजरीवाल मध्ये आज आहे असे मला वाटत नाही

म्हणजे आप/केजरीवाल आंतरराष्ट्रीय राजकारणातलं प्यादं आहे असं म्हणताहात कि काय ?? ;)
  • Log in or register to post comments

Submitted by गॅरी ट्रुमन on Wed, 08/26/2015 - 10:36

In reply to ताकद केजरीवाल मध्ये आज आहे असे मला वाटत नाही by अर्धवटराव

Permalink

केजरीवालची ताकद

ताकद केजरीवाल मध्ये आज आहे असे मला वाटत नाही
२०११ पूर्वी अण्णा हजारे हे नाव कोणी ऐकले होते का?तरी दिल्लीमध्ये हजारो लोक खेचलेच की त्यांनी आणि देशभरात लाखो लोक रस्त्यावर आणलेच की त्यांनी. अण्णांच्या उपोषण नामक तमाशामागचा ब्रेन केजरीवालच होता हे सर्वांनाच माहित आहे.वरकरणी ताकद नाही असे वाटू शकते पण आतून नक्की काय डाव हा गृहस्थ खेळेल हे सांगता येत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by गॅरी ट्रुमन on Wed, 08/26/2015 - 10:38

In reply to केजरीवालची ताकद by गॅरी ट्रुमन

Permalink

सुधारणा

२०११ पूर्वी अण्णा हजारे हे नाव कोणी ऐकले होते का?
हे वाक्य "२०११ पूर्वी अण्णा हजारे हे नाव महाराष्ट्राबाहेर कोणी ऐकले होते का?" असे हवे.
  • Log in or register to post comments

Submitted by रमेश आठवले on Wed, 08/26/2015 - 20:51

In reply to केजरीवालची ताकद by गॅरी ट्रुमन

Permalink

फक्त ५५ दिवस

ही पटेलांची एवढी मोठी चळवळ फक्त ५५ दिवसात उभी करण्यात आली. त्या काळात केजरीवाल हे दिल्लीत केंद्र सरकार, भाजप आणि नायब राज्यपाल यांच्या विरुद्ध रोज नव्या काड्या करण्यात व्यस्त होते.दिल्ली विधान सभेचे अधिवेशन हि या काळात झाले. केजरीवाल स्वत: एवढ्यात गुजरात मध्ये गेले नाहित. म्हणून मला असे वाटते कि या आंदोलनाचा बोलविता धनी कोणीतरी दुसरा आहे . प्रवीण तोगडिया पटेल आहेत आणि न्यायालयाच्या आदेशानुसार सरकारने अतिक्रमण केलेली देवळे पाडली म्हणून ते मोदींच्या वेळे पासून नाराज आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Wed, 08/26/2015 - 21:17

In reply to फक्त ५५ दिवस by रमेश आठवले

Permalink

शक्यता

प्रवीण तोगडिया पटेल आहेत आणि न्यायालयाच्या आदेशानुसार सरकारने अतिक्रमण केलेली देवळे पाडली म्हणून ते मोदींच्या वेळे पासून नाराज आहेत. ही शक्यता देखील नाकारता येत नाही. मात्र त्यातून तोगाडीयांना काही फायदा होईल असे वाटत नाही. एके हे कितीही दिल्लीत व्यस्त असले तरी ते चाणाक्ष व्यक्तिमत्व आहे. मात्र ज्या पद्धतीने ते त्याचा वापर करत आहेत त्यामुळे त्याला चाणाक्ष पेक्षा कावेबाज म्हणावे लागत आहे. राजकारणात स्वपक्षिय आणि अगदी स्वतःला महत्व मिळवण्याची महत्वाकांक्षा ठेवली म्हणून बिघडत नाही. त्यांच्या implementation च्या पध्दती वेगळ्या असल्या म्हणून हरकत नाही. मात्र त्या ज्या काही आहेत त्या सुरवातीपासूनच मारक वाटत होत्या आता त्या अधिक मारक वाटत आहेत. आणि टोकाची महत्वाकांक्षा सोडल्यास या माणसाकडे काही नाही असे वाटू लागते. असो.
  • Log in or register to post comments

Submitted by रमेश आठवले on Wed, 08/26/2015 - 22:39

In reply to शक्यता by विकास

Permalink

Ingenious fraud

नुकतेच निवृत्त न्यायाधीश काटजू यांनी एके यांचे वर्णन Ingenious fraud असे केले आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Wed, 08/26/2015 - 23:36

In reply to Ingenious fraud by रमेश आठवले

Permalink

कसे मान्य करू? ;)

नुकतेच निवृत्त न्यायाधीश काटजू यांनी एके यांचे वर्णन Ingenious fraud असे केले आहे. एका अर्थी या त्यांच्या निरीक्षणाशी सहमत आहे. पण त्यांची आत्तापर्यंतची ए़कूणच सगळी वक्तव्ये बघता, त्यांच्याशी सहमती दाखवणे अवघड जात आहे. :( ;)
  • Log in or register to post comments

Submitted by उगा काहितरीच on Wed, 08/26/2015 - 10:33

Permalink

पूर्ण व्हिडीओ पाहिला.

पूर्ण व्हिडीओ पाहिला.
  • Log in or register to post comments

Submitted by दत्ता जोशी on Wed, 08/26/2015 - 11:14

Permalink

२०११ पूर्वी अण्णा हजारे हे नाव कोणी ऐकले होते का?

यावर काहीच लिहिण्यासारखा नाही आणि लिहिणार नव्हतो पण हा धागा म्हणजे "काहीही हं श्री..." किताबास पात्र आहे नक्की . <<<२०११ पूर्वी अण्णा हजारे हे नाव कोणी ऐकले होते का?>>> धन्य आहे....! <<<<अण्णांच्या उपोषण नामक तमाशामागचा ब्रेन केजरीवालच होता हे सर्वांनाच माहित आहे.>>>> अजून धन्य आहे. भ्रष्टाचार विरोधी सूर लावून कोन्ग्रेस विरोधी वातावरण तापाव्ण्यास उत्सुक असलेल्या भाज्पियांनी सुरवातीला जवळीक साधायचा प्रयत्न केला होता हो पण ......हाय ....अण्णांनी जवळ फिरकू नाही दिले. मग वि के सिंग सारखी माणसे आंदोलनात उतरविली गेली.... किरण बेदींना मधाचे बोट दाखवले गेले V K सिंघ आणि किरण बेदी चे करविते, बोलाविते धनी कोण होते बरं? ..जन लोकपाल बिलाला पाठींबा देण्याच्या वेळी कोन्ग्रेस जवळची वाटली. आता पक्षाला RTI लागू करू नका म्हणून घोषा सुरु आहे अशी बातमी वाचली परवाच.
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Wed, 08/26/2015 - 22:55

Permalink

वैताग आहे

स्वार्थासाठी हे कोणीही काहीही करू शकतात. :(
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on गुरुवार, 08/27/2015 - 00:22

Permalink

हार्दिक पटेलच्या आंदोलनामागे

हार्दिक पटेलच्या आंदोलनामागे आआप आहे असे वाटत नाही. मुळात केजरीवाल किंवा आआपची दिल्लीबाहेरील ताकद नगण्य आहे. केजरीवालांचा हार्दिकला पाठिंबा असू शकेल, परंतु दिल्लीपासून बाहेर गुजरातमध्ये त्याच्यामागे इतकी प्रचंड जनता उभी करणे हे केजरीवालांच्या चहाचा कप नाही. पण मग इतके मोठे आंदोलन उभे कसे राहिले असावे? गेल्या २-३ दशकांपासून गुजरातेतील पटेल समाज अस्वस्थ आहे. महाराष्ट्रात मराठा समाजाचे जे प्राबल्य आहे तसेच पटेलांचे प्राबल्य गुजरातमध्ये सुरवातीपासून होते. १९८० च्या दशकात कॉंग्रेसच्या माधवसिंह सोळंकींनी पटेलांना बाजूला सारून खाम (क्षत्रिय + हरिजन + आदिवासी + मुस्लिम) यांची एकत्रित मोट बांधून पटेलांना राजकारणातून काहीसे हद्दपार केले. त्यानंतर १९९०-१९९४ या काळात चिमणभाई पटेल मुख्यमंत्री होते व नंतर १९९५ मध्ये केशुभाई पटेल मुख्यमंत्री झाल्यावर पुन्हा एकदा गुजरातच्या राजकारणात पटेलांचे वर्चस्व निर्माण झाले. १९९५ मध्ये शंकरसिंग वाघेलांनी बंड करून केशुभाईंना पायउतार होण्यास लावले परंतु १९९८ मध्ये पुन्हा एकदा बहुमत मिळवून केशुभाई पटेल मुख्यमंत्री झाले. परंतु २००१ च्या भूजच्या भुकंपानंतर केशुभाईंनी परिस्थिती नीट हाताळली नाही आणि त्यामुळे २-३ पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाल्याने केशुभाईंना हटवून त्या जागी मोदी आले. सलग साडेबारा वर्षे मुख्यमंत्री राहिल्यावर मोदी दिल्लीत गेले व त्यांच्या जागी आनंदीबाई पटेल मुख्यमंत्री झाल्या. त्या जरी पटेल असल्या तरी त्या मोदींच्याच छायेत सरकार चालवितात असे पटेलांना वाटते. एकंदरीत राजकारणात काहीशी पिछेहाट झाल्याने पटेल समाज फारसा आनंदी नाही. सध्या गुजरात मंत्रीमंडळात ७ पटेल आहेत व १८२ आमदारांमध्ये ४० पटेल आहेत. तरीसुद्धा राजकारणातील आपले प्राबल्य व दबदबा कमी झाल्याची पटेलांची समजूत झाली आहे. विशेषतः २००१ पासून पटेलांचा असंतोष वाढायला लागला आणि आता तो बाहेर येऊ लागला आहे. आपल्याला सत्तेत पुरेसे स्थान नाही अशी पटेलांची समजूत झाली आहे. त्याचेच दृश्य स्वरूप म्हणजे हे आंदोलन आहे. सत्तेत आपला अधिकाधिक वाटा असावा व सर्व मोक्याची सत्तापदे आपल्याकडे असावीत या जाणिवेतून हे आंदोलन सुरू झाले आहे. राखीव जागा हे केवळ निमित्त आहे. भविष्यात महाराष्ट्र कदाचित याचे दिशेने जाईल. २०१४ च्या निवडणुकीनंतर सत्ता गेल्याने मराठा समाज अस्वस्थ आहे. बाबासाहेब पुरंदर्‍यांच्या पुरस्काराला विरोध हा त्यातूनच आलेला आहे. सत्ता हातातून गेलीच परंतु मुख्यमंत्रीपदी ब्राह्मण बसल्याने मराठा नेत्यांची चिडचिड होत आहे. त्यात भर म्हणून उच्च न्यायालयाने मराठा जातीला दिलेल्या राखीव जागांचा निर्णय रद्द केला. यापुढील काळात मराठा वि. ब्राह्मण हा संघर्ष अजून वाढण्याची शक्यता आहे. मनोहर जोशींप्रमाणेच फडणवीस देखील आपली ५ वर्षांची कारकीर्द पूर्ण करू शकणार नाहीत असा माझा अंदाज आहे. भविष्यात भाजपला त्यांच्या जागी एखादा मराठा आमदार आणावा लागेल. यदाकदाचित फडणविसांनी ५ वर्षे पूर्ण करून २०१९ मध्ये पुन्हा बहुमत मिळवून दुसर्‍यांदा मुख्यमंत्री झाले तर पटेलांप्रमाणेच मराठा समाज संघर्षासाठी रस्त्यावर उतरेल. मोदींनी महाराष्ट्राप्रमाणेच हरयानात बिगरजाट व्यक्तीला मुख्यमंत्री केले तर झारखंडमध्ये बिगर आदिवासी व्यक्तीला मुख्यमंत्रीपदी बसविले. या दोन्ही राज्यात कालांतराने जाट आणि आदिवासी नेत्यांचा असंतोष उफाळून वर येण्याची शक्यता आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on गुरुवार, 08/27/2015 - 00:47

In reply to हार्दिक पटेलच्या आंदोलनामागे by श्रीगुरुजी

Permalink

एव्हढा उशीर कशाला?

यदाकदाचित फडणविसांनी ५ वर्षे पूर्ण करून २०१९ मध्ये पुन्हा बहुमत मिळवून दुसर्‍यांदा मुख्यमंत्री झाले तर पटेलांप्रमाणेच मराठा समाज संघर्षासाठी रस्त्यावर उतरेल. एव्हढा उशीर कशाला? मराठा, धनगर आणि मुस्लिम समाजाला येत्या १५ दिवसांत आरक्षण न मिळाल्यास राज्यात गुजरातप्रमाणेच जनक्षोभ उसळेल, असा इशारा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी बुधवारी दिला. बाकी तुमच्या (आणि इतर काहींच्या) प्रतिसादातले तर्क मान्य आहे की, "परंतु दिल्लीपासून बाहेर गुजरातमध्ये त्याच्यामागे इतकी प्रचंड जनता उभी करणे हे केजरीवालांच्या चहाचा कप नाही." तसे मी म्हणलेले देखील नाही. म्हणूनच त्यांच्यासारखे अ‍ॅनार्कीस्ट हे बोलवते धनी होऊन प्रत्यक्षात नामानिराळे होतात. एकदा का प्रकरण हाताबाहेर गेले की मग जनतेचे तारणहार म्हणून स्वारी प्रत्यक्षात येईल. India Against Corruption ला अचानक एव्हढे यश कसे मिळू शकले? तसाच काहीसा हा प्रकार आहे, असे मला वाटते. फरक इतकाच, India Against Corruption चळवळीतल्या मागण्या व्यावहारीक वाटल्या नव्हत्या, पण तरी देखील त्या मान्य झाल्या असत्या तर फरक पडला नसता. पण येथे नुसते व्यावहारीकतेचा प्रश्न नाही सामाजीक ऐक्याचा प्रश्न आहे, म्हणून हे प्रकरण गंभीर आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by उगा काहितरीच on गुरुवार, 08/27/2015 - 00:47

In reply to हार्दिक पटेलच्या आंदोलनामागे by श्रीगुरुजी

Permalink

खरंच परिस्थिती वाईट आहे मग !

खरंच परिस्थिती वाईट आहे मग !
  • Log in or register to post comments

Submitted by माईसाहेब कुरसूंदीकर on गुरुवार, 08/27/2015 - 09:59

Permalink

ह्या

ह्या आंदोलनामागे केजरीवाल आहेत म्हणणार्या मंडळीना कोपरापासून नमस्कार आम्हा दोघांचा. सध्याच्या मुख्यमंत्री आनण्दीबेन प्रभावशून्य आहेत असे ऐकले आहे.त्यांना संकटात आणून आपले ईप्सित साध्य करायचे असा गुजरात भाजपामधील काहींचा डाव असावा असे ह्यांचे म्हणणे.
  • Log in or register to post comments

Submitted by दत्ता जोशी on गुरुवार, 08/27/2015 - 11:44

Permalink

वाट पाहतोय

वन रेंक वन पेन्शन आंदोलनामागेपण केजारीवालाच आहेत. महाराष्ट्रात पडलेल्या दुष्काळ आणि नागपूरच्या पुरामागेही केजारीवालांचेच राजकारण आहे. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यासाठी केजरीवालच प्रवृत्त करत आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Fri, 08/28/2015 - 13:20

Permalink

>>> दिल्लीत एका मुलीने एका

>>> दिल्लीत एका मुलीने एका मुलाविरोधात विनयभंगाची तक्रार केली आणि त्यावरून मोठा गदारोळ झाला, झी वाले त्या मुलीच्या घरी गेले होते व तिला या प्रकरणाच्या साक्षीदाराच्या समोरासमोर येऊन बोलण्यास सांगितल्यावर तिने साक्षीदाराच्या समोर येण्यास नकार दिला. दरम्यान त्या मुलीचे कौतुक करणार्‍या सोनाक्षी सिन्हाने आता त्या तरूणाची माफी मागितली आहे. पराचा कावळा करणे हे आआपवाल्यांचे व्यवच्छेदक लक्षण आहे. यापूर्वी राखी बिडला, अलका लांबा, दिलीप पांडे आणि दस्तुरखुद्द केजरीवाल यांचा असाच खोटेपणा उघडकीला आला होता. याबाबतीतही तसेच होताना दिसतेय. रस्त्यात झालेली किरकोळ बाचाबाचीसाठी विनयभंगाचा आरोप करून त्या मुलीला नक्की काय मिळाले? http://zeenews.india.com/news/videos/top-stories/sonakshi-sinha-apologizes-to-sarabjit-accused-in-tilak-nagar-case_1663975.html
  • Log in or register to post comments

Submitted by गॅरी ट्रुमन on Fri, 08/28/2015 - 13:41

In reply to >>> दिल्लीत एका मुलीने एका by श्रीगुरुजी

Permalink

+१०००००

पराचा कावळा करणे हे आआपवाल्यांचे व्यवच्छेदक लक्षण आहे.
+१०००००. या जसलीन कौरचे स्टेटस मी पण फेसबुकवर काही मिनिटांसाठी शेअर केले होते.कुतूहल म्हणून मी तिची फेसबुक भिंत पाहिली त्यावरून ती आआपवाली होती हे समजलेच. आआपवाले म्हटल्यावर खोटे बोलणे, रेटून बोलणे, पराचा कावळा करणे, राईचा पर्वत करणे इत्यादी इत्यादी सगळे आलेच.त्यामुळे ताबडतोब मी ते शेअर केलेले स्टेटस डिलीट केले.बाकी कोणावरही विश्वास ठेवता येईल पण आआपवाल्यांवर मला तरी विश्वास ठेवता येणारच नाही. त्या रोहतकच्या दोन बहिणी, ही जसलीन कौर इत्यादी प्रकरणे स्त्रियांनाच हानी पोहोचवत आहेत हे त्यांना कळत नाही का? उद्या खरोखरच कोणी एखाद्या मुलीला/स्त्रीला त्रास देत असेल आणि त्याविरूध्द त्यांनी काही लिहिले तर त्यावर विश्वास ठेवला जायचे प्रमाण कमी होईल.अर्थात आआपवाल्यांना अशा गोष्टींची काही पडली असेल असे वाटत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by अस्वस्थामा on Fri, 08/28/2015 - 15:02

In reply to +१००००० by गॅरी ट्रुमन

Permalink

त्या रोहतकच्या दोन बहिणी, ही

त्या रोहतकच्या दोन बहिणी, ही जसलीन कौर इत्यादी प्रकरणे स्त्रियांनाच हानी पोहोचवत आहेत हे त्यांना कळत नाही का? उद्या खरोखरच कोणी एखाद्या मुलीला/स्त्रीला त्रास देत असेल आणि त्याविरूध्द त्यांनी काही लिहिले तर त्यावर विश्वास ठेवला जायचे प्रमाण कमी होईल.
हे अगदी सहमत. आणि सर्वांनीच खासकरुन इतर मुलींनी/स्त्रियांनी याचा जोरदार निषेध करायला हवा असं वाटतं.
  • Log in or register to post comments

Submitted by रमेश आठवले on Fri, 08/28/2015 - 21:22

In reply to >>> दिल्लीत एका मुलीने एका by श्रीगुरुजी

Permalink

वाट पाहू या

मिडीया ट्रायल दोन्ही बाजूने झाली. आता पोलिस आणि कोर्ट काय म्हणतात हे पाहणे गरजेचे झाले आहे .
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Fri, 08/28/2015 - 18:40

Permalink

खोटेपणा...

केजरीवाल कसे सहज दिशाभूल करू शकतात (आणि माध्यमे मदत करतात) याचे एक उदाहरण. त्यांनी आज खालील ट्वीट केले...

Congrats. NDMC jst now decided to rename Aurangzeb Road to APJ Abdul Kalam Road

— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) August 28, 2015
त्यावर एनडीटिव्हीने खालील News alert प्रसारीत केला: "Delhi's Aurangzeb Road to be named after former president APJ Abdul Kalam, tweets Chief Minister Arvind Kejriwal" आता हे वाचून मला देखील वाटले की अरविंदरावांनी काहीतरी (भले पोटापाण्याचे नाही पण) काम केले. नंतर जेंव्हा मित्राने प्रतिप्रश्न विचारला तेंव्हा शोधायला लागलो आणि मग उत्तर मिळाले की हा निर्णय घेण्यात त्यांचा काही हातभार लागलेला नाही. पण अशा प्रकारे सगळ्यात पहील्यांदा ट्वीट केले की पब्लीकला वाटावे की त्यांनीच निर्णय घेतला. ते अधिक वाटण्यासाठी एनडीटिव्ही आहेच मदतीला. असो.
  • Log in or register to post comments
Profile picture for user नांदेडीअन

Submitted by नांदेडीअन on Fri, 08/28/2015 - 20:46

In reply to खोटेपणा... by विकास

Permalink

ट्विटमध्ये सरळ सरळ उल्लेख आहे

ट्विटमध्ये सरळ सरळ उल्लेख आहे NDMC चा. मग क्रेडिट घेण्याचा प्रश्न येतोच कुठे ?
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Fri, 08/28/2015 - 23:25

In reply to ट्विटमध्ये सरळ सरळ उल्लेख आहे by नांदेडीअन

Permalink

तुम्हाला विकास यांचा प्रतिसाद

तुम्हाला विकास यांचा प्रतिसाद समजलेला नाही.
  • Log in or register to post comments
Profile picture for user नांदेडीअन

Submitted by नांदेडीअन on Fri, 08/28/2015 - 20:47

Permalink

तो ड्रायव्हर म्हणून टाकलेला

तो ड्रायव्हर म्हणून टाकलेला फोटो आप कार्यकर्ता रोहित पांडेचा आहे, हार्दिक पटेलचा नाही.
  • Log in or register to post comments
Profile picture for user नांदेडीअन

Submitted by नांदेडीअन on Fri, 08/28/2015 - 20:47

Permalink

गेल्या काही दिवसांत हार्दिक

गेल्या काही दिवसांत हार्दिक पटेलबद्दल आपण बरेच ऎकले आणि वाचले असेल. याच घटनेशी संबंधित मी काही गोष्टी नोटिस केल्यात, त्या अशा.... १. हा हार्दिक पटेल त्याच्या रॅलीमध्ये लाखोंची गर्दी जमवतो आणि गुजरात सरकारला त्याचा काहीच पत्ता लागत नाही. (यावर विश्वास बसतो तुमचा ?) २. लोकसभेच्या निकालाच्यावेळी याने याच्या फेसबुक प्रोफाईलवर लिहिले होते, "कॉंग्रेस का खेल खत्म, अब की बार हिंदुत्व की धाक ।" ३. हा हार्दिक पटेल स्वतःसोबत बंदूक ठेवून प्रवीण तोगडीया यांच्यासोबत फोटो काढून घेऊ शकतो. ४. हा हार्दिक पटेल भाजपाच्या एका राष्ट्रीय उपाध्यक्षांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेऊ शकतो. ५. या हार्दिक पटेलच्या फक्त दोन मागण्या आहेत, एक तर आम्हाला आरक्षण द्या, नाहीतर सगळ्यांचे आरक्षण काढून टाका. (दुसर्‍या मागणीमुळे दाल में कुछ काला है असे वाटत नाहीये तुम्हाला ?) ६. माझ्या वाचण्यात जेवढे आले आहे, त्यानुसार पाटीदार पटेल हा समाज मुळीच ‘मागासलेला’ नाहीये, उलट सगळ्यात संपन्न समाजापैकी एक आहे. ७. भक्तांच्या म्हणण्यानुसार गुजरात हे जगातले सगळ्यात विकसित राज्य आहे, पण त्याच राज्याच्या विकासाच्या फुग्याला हा टाचणी लावतोय. ८. त्याच्या रॅलीनंतर जी दगडफेक आणि जाळपोळ झाली, ती भारतातल्या कोणत्या पक्षाची मोडस ऑपरेंडी आहे हे सगळ्यांना माहित आहे. ९. स्वतः गुजरात पोलिस लोकांच्या गाड्यांची तोडफोड करत आहेत. आता दहावा आणि शेवटचा, पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा... १०. वर लिहिलेले सगळे मुद्दे विसरून जा. आता थोडे पाणी पिऊन या, त्यानंतर आम आदमी पार्टी आणि केजरीवालला मन भरून शिव्या घाला. काय करणार, अच्छे दिनांचे फ्रस्ट्रेशन कुठेतरी काढावे लागेलच ना !
  • Log in or register to post comments

Submitted by जव्हेरगंज on Fri, 08/28/2015 - 21:41

In reply to गेल्या काही दिवसांत हार्दिक by नांदेडीअन

Permalink

आता दहावा आणि शेवटचा, पण

आता दहावा आणि शेवटचा, पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा...>>>>>> हा हा हा ...
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Fri, 08/28/2015 - 23:24

In reply to गेल्या काही दिवसांत हार्दिक by नांदेडीअन

Permalink

१. हा हार्दिक पटेल त्याच्या

१. हा हार्दिक पटेल त्याच्या रॅलीमध्ये लाखोंची गर्दी जमवतो आणि गुजरात सरकारला त्याचा काहीच पत्ता लागत नाही. (यावर विश्वास बसतो तुमचा ?)
गुजरात सरकारला त्याचा काहीच पत्ता नव्हता हे कोणी सांगितलं? केजरीवालांनी?
२. लोकसभेच्या निकालाच्यावेळी याने याच्या फेसबुक प्रोफाईलवर लिहिले होते, "कॉंग्रेस का खेल खत्म, अब की बार हिंदुत्व की धाक ।"
हे कोणी सांगितलं? केजरीवालांनी?
३. हा हार्दिक पटेल स्वतःसोबत बंदूक ठेवून प्रवीण तोगडीया यांच्यासोबत फोटो काढून घेऊ शकतो.
फोटो शेअर करा.
४. हा हार्दिक पटेल भाजपाच्या एका राष्ट्रीय उपाध्यक्षांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेऊ शकतो.
भाजपचे अनेक राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत (उदा. विनय सहस्त्रबुद्दे, श्याम जाजू). त्यांची कोणीही, कोठेही भेट घेऊ शकतो.
५. या हार्दिक पटेलच्या फक्त दोन मागण्या आहेत, एक तर आम्हाला आरक्षण द्या, नाहीतर सगळ्यांचे आरक्षण काढून टाका. (दुसर्‍या मागणीमुळे दाल में कुछ काला है असे वाटत नाहीये तुम्हाला ?)
नाही.
६. माझ्या वाचण्यात जेवढे आले आहे, त्यानुसार पाटीदार पटेल हा समाज मुळीच ‘मागासलेला’ नाहीये, उलट सगळ्यात संपन्न समाजापैकी एक आहे.
असेल.
७. भक्तांच्या म्हणण्यानुसार गुजरात हे जगातले सगळ्यात विकसित राज्य आहे, पण त्याच राज्याच्या विकासाच्या फुग्याला हा टाचणी लावतोय.
असे कोणीही म्हणत नाही. गुजरात हे जगातले सगळ्यात विकसित राज्य आहे असे दस्तुरखुद्द मोदीसुद्धा कधीही म्हणाले नव्हते. कधीतरी फेकाफेकी थांबवा. आआपचे समर्थन करायचे म्हणजे खोटे बोललेच पाहिजे का? फक्त गुजरात नव्हे, तर कोणत्याही राज्यात कोणत्याही प्रकारचे आंदोलन झाले तरी त्या राज्याच्या विकासावर परीणाम होतोच.
८. त्याच्या रॅलीनंतर जी दगडफेक आणि जाळपोळ झाली, ती भारतातल्या कोणत्या पक्षाची मोडस ऑपरेंडी आहे हे सगळ्यांना माहित आहे.
बरोबर. ही मोड्यूस ऑपरेंडी आम आदमी पक्षाची आहे. गतवर्षी निवडणुक आयोगाने निवडणुका जाहीर करून आचारसंहिता लागू केल्यानंतर सुद्धा तुमचे केजरीवाल गुजरातमध्ये निवडणुक आयोगाची परवानगी नसताना सुद्धा रॅली काढायचा हट्ट धरून बसले होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांना अटकाव केल्यावर दिल्लीतील आशुतोष आआपच्या गुंडांची टोळी घेऊन व बरोबर दगडधोंडे व लाठ्याकाठ्या घेऊन दिल्लीतील भाजपच्या कार्यालयावर गेला आणि तिथे जाऊन त्यांनी भाजपच्या कार्यालयावर हल्ला चढवून दगडफेक करून लाठ्याकाठ्यांनी मारहाण केली हे तुम्ही सोयिस्कररित्या विसरलेले दिसता.
९. स्वतः गुजरात पोलिस लोकांच्या गाड्यांची तोडफोड करत आहेत.
कधी आणि कोणाच्या आणि किती गाड्यांची तोडफोड केली?
१०. वर लिहिलेले सगळे मुद्दे विसरून जा. आता थोडे पाणी पिऊन या, त्यानंतर आम आदमी पार्टी आणि केजरीवालला मन भरून शिव्या घाला. काय करणार, अच्छे दिनांचे फ्रस्ट्रेशन कुठेतरी काढावे लागेलच ना !
आम्हाला अच्छे दिन किंवा इतर कशाचेही फ्रस्ट्रेशन नाही. फ्रस्ट्रेशन मोदीविरोधकांनाच आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on Sat, 08/29/2015 - 00:10

In reply to १. हा हार्दिक पटेल त्याच्या by श्रीगुरुजी

Permalink

३.

Image removed. बाकी नेहमीचेच आहे. नवीन धागा का काढला असा प्रश्न पडलाय?
  • Log in or register to post comments

Submitted by नाव आडनाव on Sat, 08/29/2015 - 09:23

In reply to ३. by कपिलमुनी

Permalink

अजून एक फोटो (आणि बातमी)http:

अजून एक फोटो (आणि बातमी) http://maharashtratimes.indiatimes.com/nation/balasaheb-thackeray-is-my-idol-says-hardik-patel/articleshow/48707764.cms
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Sat, 08/29/2015 - 13:53

In reply to अजून एक फोटो (आणि बातमी)http: by नाव आडनाव

Permalink

प्रवीण तोगडिया यांच्यासोबत

प्
रवीण तोगडिया यांच्यासोबत असलेल्या फोटोमध्ये विशेष काही नसल्याचं हार्दिक म्हणाला. 'तोगडियांशी माझं रक्ताचं नातं नाही. तोगडिया हेदेखील आमच्याप्रमाणंच समाजाच्या संरक्षणाचं काम करतात. त्यांची स्वत:ची अशी एक भूमिका आहे आणि त्यांची भेट घेण्यात गैर काहीच नाही,' असं तो म्हणाला. 'केजरीवालांशी तर मला काहीच घेणंदेणं नाही,' असं त्यानं स्पष्ट केलं. हार्दिकजवळ असलेल्या बंदुकीबाबत तो म्हणाला, 'माझ्याकडं बंदुकीचा परवाना आहे. गेल्या वर्षीच तो मला मिळाला. मी अनेकदा एकटाच फिरतो. कोणीही मदतीची हाक दिली की समाजाच्या रक्षणासाठी धावतो. त्यामुळं बंदूक ठेवावीच लागते.' राजकीय पक्ष काढणार का, या प्रश्नावर हार्दिकनं नकारार्थी उत्तर दिलं. 'सरदार वल्लभभाई पटेल आणि बाळासाहेब ठाकरे हे माझा आदर्श आहेत. मात्र, राजकीय पक्ष स्थापन करण्याचा किंवा कोणत्याही राजकीय पक्षात जाण्याचा माझा विचार नाही. माझ्या हातात रिमोट कंट्रोल असताना त्याची गरज काय?,' असा सवाल त्यानं केला.
वरील विचार पुरेसे बोलके आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Sat, 08/29/2015 - 13:49

In reply to ३. by कपिलमुनी

Permalink

यातून काय सिद्ध होतंय?

यातून काय सिद्ध होतंय?
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on Sat, 08/29/2015 - 15:24

In reply to यातून काय सिद्ध होतंय? by श्रीगुरुजी

Permalink

तुम्हीच फोटो मागितला होता

३. हा हार्दिक पटेल स्वतःसोबत बंदूक ठेवून प्रवीण तोगडीया यांच्यासोबत फोटो काढून घेऊ शकतो. फोटो शेअर करा.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Sat, 08/29/2015 - 15:30

In reply to तुम्हीच फोटो मागितला होता by कपिलमुनी

Permalink

हो, पण त्यातून काय सिद्ध

हो, पण त्यातून काय सिद्ध होतंय? किंवा काय सिद्ध करण्याचा प्रयत्न चाललाय?
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on Sat, 08/29/2015 - 15:40

In reply to हो, पण त्यातून काय सिद्ध by श्रीगुरुजी

Permalink

फोटो मागितला होता

तो दिला
या सगळ्या आंदोलना मागचा बोलविता धनी वेगळाच आहे आणि अर्थातच तो धनी इतर कोणी नसून साक्षात अरविंद केजरीवाल आणि आप असावेत असेच यावरून दिसत आहे.
१-२ ट्वीट किंवा फोटोमुळे हार्दिक आणि केजरीवालचा संबंध जोडला जात आहे किंवा आंदोलनचा संबंध जोडला जात आहे ते चुकीचे आहे , हार्दिक पटेलचे सर्व विचारधारेच्या लोकोसोबत फोटो किंवा सोशल स्टेटस आहेत
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Sat, 08/29/2015 - 15:44

In reply to फोटो मागितला होता by कपिलमुनी

Permalink

मी हार्दिक आणि केजरीवालांचा

मी हार्दिक आणि केजरीवालांचा संबंध कधीच जोडला नव्हता. माझ्या सर्वात पहिल्या प्रतिसादात देखील मी हेच म्हटले आहे. परंतु तुम्ही लिहिल्याप्रमाणे काही जण १-२ ट्विट किंवा फोटोंमुळे हार्दिक व भाजपचा संबंध जोडू पहात आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on Sat, 08/29/2015 - 15:57

In reply to मी हार्दिक आणि केजरीवालांचा by श्रीगुरुजी

Permalink

संबंध

आंदोलन आणि केजरीवालचा धागाकर्त्याने संबंध जोडला होता. नंतर केजरीवाल म्हणजे घरचा कार्य म्हणून तुम्हीच सगळा अंगावर ओढलेत
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Sat, 08/29/2015 - 17:58

In reply to संबंध by कपिलमुनी

Permalink

मी काहीच अंगावर ओढून घेतलं

मी काहीच अंगावर ओढून घेतलं नाही. केजरीवाल या आंदोलनामागे नसणार कारण गुजरातमध्ये त्यांची तेवढी ताकद नाही हे मी माझ्या पहिल्याच प्रतिसादात लिहिले होते. परंतु नंतर इथल्या एका अंध आआप भक्ताने लेख स्वत:च्या अंगावर ओढून घेऊन एक भलीमोठी यादी देऊन हार्दिक व भाजपचा नसलेला संबंध जोडण्याचा प्रयत्न केला.
  • Log in or register to post comments

Submitted by अभिजित - १ on Fri, 08/28/2015 - 21:52

Permalink

कांदाधोरणात "पानिपत'!

कांदाधोरणात "पानिपत'! - विजय गायकवाड - सकाळ वृत्तसेवा शुक्रवार, 28 ऑगस्ट 2015 - 01:00 AM IST मुंबई - कांद्याच्या महागाईची झळ गल्लीपासून दिल्लीपर्यंत बसत असली, तरी देशातील सर्वांत मोठा उत्पादक असलेल्या महाराष्ट्राचे दिल्लीसारख्या लहान राज्याने पानिपत केल्याचे स्पष्ट झाले आहे. एप्रिलमध्ये कांदा संकटाची चाहूल लागलेल्या दिल्लीने महाराष्ट्रातून आगाऊ कांदा खरेदी केल्याने दिल्लीकर आजही कांद्याची "स्वस्ताई‘ अनुभवत आहेत अवकाळी पाऊस आणि दुष्काळी संकटामुळे कांद्याचे यंदा वांदे होणार असल्याचे स्पष्ट संकेत अनेक संस्थांनी दिले होते. कांदा महागाईचा परिणाम भोगलेल्या दिल्ली सरकारला याची जाणीव वर्षाच्या सुरुवातीलाच झाली होती. त्यामुळे दिल्लीतील "लघु कृषक कृषि व्यापार संघ‘ (SFAC) या सरकारी संस्थेद्वारे एप्रिल- मेमध्ये महाराष्ट्रात येऊन कांदाखरेदी करण्यात आली. "एसएफएसी‘च्या खरेदीमुळे त्या वेळी प्रतिकिलो 16 रुपये असलेला भाव 21 रुपयांपर्यंत गेला. दिल्ली सरकारच्या या खरेदीचा लाभ राज्यातील अनेक कांदा उत्पादक शेतकऱ्यांनाही झाला. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निर्देशावरून ही खरेदी झाल्याचे सांगण्यात येते. विशेष म्हणजे कांदा साठवणुकीची समस्या असलेल्या काही कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या कांदाचाळीच खरेदी करून अधिग्रहित करण्यात आल्या होत्या. "गो फॉर फ्रेश‘ आणि एका शेतकरी उत्पादक कंपनीच्या सहकार्याने एप्रिल-मेमध्ये झालेली कांदाखरेदी अजूनही टप्प्याटप्प्याने दिल्लीकडे रवाना केली जात आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on Fri, 08/28/2015 - 23:37

In reply to कांदाधोरणात "पानिपत'! by अभिजित - १

Permalink

हा दिल्ली राज्य सरकारचा नाही तर केंद्र सरकारचा आदेश असावा

महाराष्ट्र टाईम्स मधील या वृत्तानुसार अशी कांदा-खरेदी हा दिल्ली राज्य सरकारचा नाही तर केंद्र सरकारचा आदेश होता.
  • Log in or register to post comments

Submitted by अभिजित - १ on Sat, 08/29/2015 - 16:45

In reply to हा दिल्ली राज्य सरकारचा नाही तर केंद्र सरकारचा आदेश असावा by बहुगुणी

Permalink

तुम्ही बातमी वाचली का लिंक

तुम्ही बातमी वाचली का लिंक मधली ? ती कांदा पावडर , सुकी पात या विषयी आहे. मी वर दिलेल्या बातमी तील कांदा खरेदीशी काहीही संबध नाही याचा.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Fri, 08/28/2015 - 23:27

Permalink

बादवे, अलिकडे केजरीवाल मफलर

बादवे, अलिकडे केजरीवाल मफलर वापरताना दिसत नाहीत. खोकणेही बंद झालेले दिसते. परंतु बाकी सर्व गोष्टी पूर्वीच्या दुप्पट जोमाने सुरू आहेत.
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com