बेफाम बोलण्यात पह्यला माझा नंबर

माहितगार's picture
माहितगार in जे न देखे रवी...
21 Aug 2015 - 11:55 am

बेफाम बोलण्यात, माझा नंबर पह्यला !
नकोत संदर्भ, नको पुरावे, तर्कविवेक नकोच नको,
माझा नंबर पह्यला !
बेछूट लिहिण्यात, माझा नंबर पह्यला !
शंका काढलीस तर आरोप करेन
जखमी असशील तर दोष तुझाच धरेन
माझा नंबर पह्यला !
बे रोकटोक बोलण्यात माझा नंबर पह्यला
माझा विरोध म्हणजे तुझेच चूक, वादविवाद हवा कशाला
एक माझे अन शांती मिळव
माझा नंबर पह्यला !
सेंसॉर करण्यात गचांडी धरण्यात माझा नंबर पह्यला
बातमीत येईन, सत्ता घेईन
सगळे म्हणतात बघ मलाच बरोबर
माझा नंबर पह्यला !
बेफाम बोलण्यात, माझा नंबर पह्यला !

प्रेम कविताफ्री स्टाइलमराठीचे श्लोकमुक्त कविताप्रेमकाव्यविडंबन

प्रतिक्रिया

प्यारे१'s picture

21 Aug 2015 - 12:15 pm | प्यारे१

आता याचं काय करायचंय? सगळे शब्द आणि अर्थ तुम्हाला माहिती असणार बहुतेक! (ह.घ्या)

बाकी नमो नमो सुद्धा म्हणावंसं वाटतंय.
आणि मी मी सुद्धा.
एका रागाचं नाव आठवलं तरी उगाच का मारवून घ्या म्हणून गप्प बसतो.

माहितगार's picture

21 Aug 2015 - 12:46 pm | माहितगार

शेवटची ओळ ओळखा पाहू मी कोण ? लिहिण्याचा विचार होता, पण पहिल नाव माहितगारचच येईल म्हणून मोह टाळला :)

नाव आडनाव's picture

21 Aug 2015 - 12:47 pm | नाव आडनाव

मस्तं :)

स्वामी संकेतानंद's picture

21 Aug 2015 - 12:56 pm | स्वामी संकेतानंद

हीहीही

(दिल्लीकर) स्वामी

पैसा's picture

21 Aug 2015 - 9:55 pm | पैसा

तुम्ही दिल्लीकर लोक संकटांना बोलावून घेता! "आ बैल मुझे मार!"

पगला गजोधर's picture

21 Aug 2015 - 1:29 pm | पगला गजोधर

सत्यवचन !

माहितगार's picture

21 Aug 2015 - 1:33 pm | माहितगार

माहितगारचा नंबर पह्यला असल्याचे स्विकारल्या बद्दल आभारी आहे :)

जव्हेरगंज's picture

21 Aug 2015 - 7:51 pm | जव्हेरगंज

कोणाड्यात उभी हिंदमाता...

जडभरत's picture

21 Aug 2015 - 10:09 pm | जडभरत

ते व्हिंदमाता असतं!!!

श्रीरंग_जोशी's picture

21 Aug 2015 - 8:17 pm | श्रीरंग_जोशी

काव्यमय भाष्य आवडले

बादवे 'बे रोकटोक' हे बेरोखठोख असे असायला हवे होते का?

पैसा's picture

21 Aug 2015 - 9:53 pm | पैसा

तो हिंदी शब्द वापरलाय त्यांनी. अर्थ "विनाअडथळा"

श्रीरंग_जोशी's picture

21 Aug 2015 - 10:01 pm | श्रीरंग_जोशी

रोखठोख ने अर्थ पूर्ण बदलून जाईल.

रोकटोक हा हिंदी शब्द प्रथमच वाचला. 'रोका उसे टोका उसे' असा संवाद बहुधा मेरे यार की शादी हैं या चित्रपटात होता :-).

अत्रुप्त आत्मा's picture

21 Aug 2015 - 11:47 pm | अत्रुप्त आत्मा

काय ल्हिलय..आयला! ;)

मदनबाण's picture

22 Aug 2015 - 9:25 am | मदनबाण

झकास्स्स्स... :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Yasmine - Khodny W Rooh / ياسمين - خدني وروح