मातृभक्ति आणि मराठे

raudransh_27's picture
raudransh_27 in काथ्याकूट
19 Aug 2015 - 12:00 am
गाभा: 

या भूमि तील मातृभक्ति, मातृप्रेम वादातीत आहे
मातृ देवो भव: पितृ देवो भव: अतिथि देवो भव:
असे म्हणताना प्रथम आईला दैवतसमान म्हटले आहे

महाराष्ट्राचा सुर्वणकाल, शतके ज्यांनी इथे राज्य केले असे "सातवाहन" त्यांचा सर्वात पराक्रमी राजा "गौतमीपुञ सातकर्णी " स्वतःच्या नावापुढे आईचे नाव लावतो
श्रञियकुलावतंस छञपती शिवराय यांच्या बालपणापासुन आयुष्याच्या प्रत्येक कालात त्यांच्या आईचा -जिजाऊ माँसाहेब- प्रभाव त्यांच्यावर आढळतो. शिवरायानां स्वतंञ राष्ट्र निर्माण करण्याची प्रेरणा, मार्गदर्शन, पाठिंबा आणि स्वातंञ्यदिनानतंरच ज्यानी श्वास सोडले त्या माँसाहेब छ.शिवरायांबरोबर तमाम मराठ्यानां वंदनीय
भारतीय ब्रिटिशविरोधी स्वातंञ लढा वाचल्यावर एवढे लश्रात येते की मातृभूमिसाठी लढण्यात आघाडीवर होते महाराष्ट्र आणि बंगाल.. क्रांतीकुलावतंस मराठे हसतहसत मातृभूमिसाठी मृत्युला सामोरे गेले
परवापरवा पन्हाळा-पावनखिंड पदभ्रमण करताना माझे मिञ एका हातात भगवा अन् एका हातात तिरंगा घेऊन होते
माझ्या जवळच्या मिञाने Group Discussion च्या वेळी मांडलेला एक मुद्दा मला आजही आठवतो, तो म्हणत होता की मी Love marriage ला फक्त एकाच मुद्दा्यावर समर्थन करतो की Love marriage मध्ये मी ठामपणे आधीच सांगु शकेन की ती माझ्या आईची काळजी घेईल
माझे अनेक मिञ फक्त आईच्या समाधानासाठी देवळात जातात (मी धरुन)
(Partially atheist )

जगप्रसिध्द MAXIM GORKY, साने गुरुजी सारखी मोठी माणसे जगभरात मातृप्रेमाचा जयजयकार करत आजही दिसतात.. राष्ट्रवादाचा (Nationalism) चा उदय पण मातृभुमिप्रेमातुनच.. जगातल्या प्रत्येक प्रांतात मातृभक्ति आढळते..
पण
मराठ्यांची मातृभक्ति वादातीतच , इथे जन्मला की प्रत्येक मानव दोन्ही आईंसाठी मातृभक्ति By default

मातृभक्ति हा मराठ्यांसाठी फक्त शब्द नाही, ही एक विचारधारा आहे.. हा एक Religion आहे.. ही एक Lifestyle जीवनशैली आहे.. ही अशी स्वंयभु संकल्पना आहे in that we believes.

जय जिजाऊ, जय शिवराय
_/\_

(लहानपासुन ज्या विचारधारेवर विश्वास ठेवतो त्याला प्रचंड विसंगत वाक्यांमुळे, आरोपांच्या विरोधी, आम्हाला शुद्र दाखवणार्या स्वंयघोषित महान विचारधारेमुळे हा लेखनपंप्रच.
हे कादंबरीकार महाशय म्हणतात की "प्रसंगी मराठे आईला विकायला कमी करत नसत"
सभासद बखर, बेंद्रे, JN Sarkar, Grand duff , मुघल दरबार पञे, कुरुंदकर, राजवाडे, देशमुख आणि सांळुखे सर ईत्यादी इतिहासअभ्यासकाचीं थोडीफार पाने वाचलीत, सगळ्या ९६ कुळाचां पण नाही माहिती, जेवढे थोडेफार माहितेय त्याततरी "मराठे आई विकायला कमी करत नसत " असे एकही उदाहरण आढळले नाही... आजोबाअंधअनुयायीनीं काही माहिती असल्यास सांगावे, नाहीतर तुमच्या एकांगी लेखनाच्या विश्लेशणाला सरळ ब्राह्मणद्वेषी किंवा ब्रिगेडी सांगुन नेहमीप्रमाणे उत्तर न देता स्वतःची लाल म्हणुन पळ काढावा.. )

प्रतिक्रिया

अभ्या..'s picture

19 Aug 2015 - 12:15 am | अभ्या..

जय भवानी, जय शिवराय..
.
.
एक अगदी पक्के सांगतो. आमच्या जेप्याला निदान ५ वेळा तरी या धाग्यावर यावे लागणार.
.
.
आई राजा उदे उदे.
सदानंदीचा उदे उदे.
येलकोट येळकोट घे.

श्रीरंग_जोशी's picture

19 Aug 2015 - 12:22 am | श्रीरंग_जोशी

कृपया हा लेख वाचावा - राजा शिवछत्रपती आणि आक्षेप!.

शेवटच्या परिच्छेदात उपस्थित केलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळू शकेल.

तात्पुरता मराठे हा शब्द बाजुला ठेवा, "आई विकत असत " याला कोणीच समर्थन करणार नाही.

श्रीरंग_जोशी's picture

19 Aug 2015 - 12:49 am | श्रीरंग_जोशी

१६३० सालचा दुष्काळ इतका भयंकर होता की मरण पावलेल्या माणसांचे मांस खाऊन काही लोकांना गुजराण करावे लागले.

अशा परिस्थितीचे वर्णन करताना असा उल्लेख उपमा अलंकाराचा प्रयोग असू शकतो. सदर लेखन ५० वर्षांहून अधिक काळापूर्वी झालेले असल्याने तेव्हा वापरली गेलेली भाषा आज आपल्याला रुचेलच असे नाही.

हे माझे अंदाज आहेत हे पुन्हा एकदा लिहितो.

श्रीरंग_जोशी's picture

19 Aug 2015 - 12:29 am | श्रीरंग_जोशी

मिपाकर राजघराणं यांचा विज्ञानाच्या चष्म्यातून जाती हा लेख वाचावा ही विनंती.

अरे किती खोटं बोलावं. शेती असो घरची म्हातारी. तिचं पार पोतेरं करणारी शहाण्णव कुळी बघितली आहेत. लाज वाटायला हवी यांना.

संदीप डांगे's picture

19 Aug 2015 - 2:09 am | संदीप डांगे

काय खोटं आहे हो यात. त्यांनी स्पष्ट म्हटलंय विचारधारा आहे म्हणून. विचारधारा. जरा विचार करा अर्धवटराव!

अर्धवटराव's picture

19 Aug 2015 - 2:14 am | अर्धवटराव

विचारधारा = विचारांना धारेवर धरा असं ब्रीगेडी समीकरण आमच्या लक्षातच आलं नाहि.

प्यारे१'s picture

19 Aug 2015 - 2:23 am | प्यारे१

as in विषाचा अणू= विष्णु?
खेडेकरांच्या की कुणाच्या एका पुस्तकात आहे असं मुक्ताफळ (एका आसनानंतर मुक्त झाल्यानंतर येणारं फळ अशी फोड़ असेल)

पिलीयन रायडर's picture

19 Aug 2015 - 2:54 am | पिलीयन रायडर

धन्य!!!!

बादवे.. ते ब्राम्हण पुरुषांबद्दल काय वाट्टेल ते लिहीलं होतं मध्ये एकांनी.. त्याबद्दल पण आपली विचारमौक्तिकं येणार का?

(पण खरंच.. त्या पुस्तकावर खटला भरला का हो? काय झालं त्याचं खरं पुढे..?)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

19 Aug 2015 - 7:48 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

अच्चे अलचणींमदे टाकनाले प्लश्ण नै टाकायचे बॉ!! उगीच विचार करायला लागेला ना.

कपिलमुनी's picture

19 Aug 2015 - 1:37 pm | कपिलमुनी

खेडेकरावर खटला भरला गेला आणि त्यामध्ये त्याने विनाशर्त माफी मागून ही पुस्तके मागे घेतली.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

19 Aug 2015 - 7:34 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

श्रञियकुलावतंस छञपती शिवराय यांच्या बालपणापासुन आयुष्याच्या प्रत्येक कालात त्यांच्या आईचा -जिजाऊ माँसाहेब- प्रभाव त्यांच्यावर आढळतो. शिवरायानां स्वतंञ राष्ट्र निर्माण करण्याची प्रेरणा, मार्गदर्शन, पाठिंबा आणि स्वातंञ्यदिनानतंरच ज्यानी श्वास सोडले त्या माँसाहेब छ.शिवरायांबरोबर तमाम मराठ्यानां वंदनीय

कंचा स्वातंत्र्यदिन मनायचा पावनं? मराठ्यांना वंदनीय? आँ, आम्हालापण वंदनियच आहेत कि हो. नै म्हणजे स्पेसिफिक जातीचा उल्लेख केलाय म्हणुन विचारतोय.

भारतीय ब्रिटिशविरोधी स्वातंञ लढा वाचल्यावर एवढे लश्रात येते की मातृभूमिसाठी लढण्यात आघाडीवर होते महाराष्ट्र आणि बंगाल.. क्रांतीकुलावतंस मराठे हसतहसत मातृभूमिसाठी मृत्युला सामोरे गेले

सगळ्याच जातीधर्मातले लोक्स हसत हसत मृत्युला सामोरे गेलेत. फक्त मराठेचं गेलेत असा काही विदा आहे का तुमच्याकडे? असेल तर द्या. का आम्ही इतिहास (बि)घडवतो असा अहंभाव कशाला पाहिजे.

परवापरवा पन्हाळा-पावनखिंड पदभ्रमण करताना माझे मिञ एका हातात भगवा अन् एका हातात तिरंगा घेऊन होते
माझ्या जवळच्या मिञाने Group Discussion च्या वेळी मांडलेला एक मुद्दा मला आजही आठवतो, तो म्हणत होता की मी Love marriage ला फक्त एकाच मुद्दा्यावर समर्थन करतो की Love marriage मध्ये मी ठामपणे आधीच सांगु शकेन की ती माझ्या आईची काळजी घेईल
माझे अनेक मिञ फक्त आईच्या समाधानासाठी देवळात जातात (मी धरुन)
(Partially atheist )

नेमका मुद्दा काय आहे? तुम्ही तिकडे एका हातात भगवा आणि दुसर्‍या हातामधे तिरंगा घेउन गेला होतात हा? लव्ह मॅरेज आणि इतिहास? का फक्त आईची काळजी? त्या एका विशिष्ट संंघटनेमधे बापाला वार्‍यावर सोडुन देतात काय? असेल बाबा. थोर लोकं ती. नव्या प्रथा असतील बॉ!!

जगप्रसिध्द MAXIM GORKY, साने गुरुजी सारखी मोठी माणसे जगभरात मातृप्रेमाचा जयजयकार करत आजही दिसतात.. राष्ट्रवादाचा (Nationalism) चा उदय पण मातृभुमिप्रेमातुनच.. जगातल्या प्रत्येक प्रांतात मातृभक्ति आढळते..

परत तेचं. बापाला आरक्षण द्यायला पायजे का काय बापप्रेम, बापभक्ती वगैरेंसाठी. कारण माझा मित्रपरिवार चओफेर पसरलेला आहे. त्यांच्यामधे तर बापाला प्रेम, आदर वगैरे देतात. फक्त आईवर भक्ती करणारी हि पिलावळ कुठली म्हणायची? साने गुरुजींचा एकेरी उल्लेख?

लहानपासुन ज्या विचारधारेवर विश्वास ठेवतो त्याला प्रचंड विसंगत वाक्यांमुळे, आरोपांच्या विरोधी, आम्हाला शुद्र दाखवणार्या स्वंयघोषित महान विचारधारेमुळे हा लेखनपंप्रच.
हे कादंबरीकार महाशय म्हणतात की "प्रसंगी मराठे आईला विकायला कमी करत नसत"

त्या विचारधारेची अनेक पारायणं झालेली आहेत. काय हो नेमका असा उल्लेख कुठे आहे? न्युनगंडाचे (होल वर्ल्ड इझ प्लॉटिंग अगेन्स्ट मी टैप) बळी एवढचं म्हणेन. किंवा अपराधी भावनेचे. (तसं नसावं हि अपेक्षा).
शुद्र? आँ. वर्णव्यवस्था जिवंत ठेवायचं समर्थन जेवढं मनुस्मृतीमधुन झालं नसेल तेवढं हे न्युनगंडाचे बळी पडलेले विचारजंत करत असतात नेहेमी त्याला काय करणार फाट्यावर नेउन मारणं सोडुन.

आजोबाअंधअनुयायीनीं

मुकबधिरअंधअपंगपॅरॅलिटिकशुद्धयझथुंकीझेलब्रिगेडअनुयायींच्या लिखाणाला वाचत असाल तर असे प्रश्ण पडणारचं त्यात नवल काय?

तुमच्या एकांगी लेखनाच्या विश्लेशणाला सरळ ब्राह्मणद्वेषी किंवा ब्रिगेडी सांगुन नेहमीप्रमाणे उत्तर न देता स्वतःची लाल म्हणुन पळ काढावा.. )

कोणाची कुठल्या रंगाची असावी हा ज्याचा त्याचा प्रश्ण आहे. आणि हो आपला ब्राहमणद्वेष आणि ब्रिगेड** वृत्ती लपत नाही तुमच्या "बुरख्या"मधे. सद्ध्याचा बुरखा लहान आहे बराचं चेहेरा झाकला की बुड उघडं पडतय आणि वाईस वर्सा.

जेपी बरचं सामानं काढ रे सत्काराला. चार पोकळ बांबु पण काढ ष्टॉकमधुन. इथे अजुन मंडळी येणार ओकारी करायला.

क्षत्रियकुलावतंस गोब्राहमणप्रतिपालक शिवाजी महाराज कि जय, वीरमाता जिजाउआई की जय, हिर्‍याला पैलु पाडणारे गुरु दादोजी कोंडदेव की जय.

(धरलाकीहाणपळालाकीसोडकुत्रा ब्रिगेड अध्यक्ष) -कॅजॅस्पॅ-

पिलीयन रायडर's picture

19 Aug 2015 - 7:38 am | पिलीयन रायडर

तुम्ही लिहीलय खरं... पण समजण्यासाठी अक्कल असावी लागते त्याचं काय?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

19 Aug 2015 - 7:46 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

त्यांच्या संघटनेमधे बरेचं "हुश्शार आणि थोर विचारजंत" लोक्स आहेत की. =))

उगा काहितरीच's picture

19 Aug 2015 - 10:37 am | उगा काहितरीच

कॅजॅस्पॅ यांचा प्रतिसाद आवडला आहे .

अनिरुद्ध.वैद्य's picture

19 Aug 2015 - 1:46 pm | अनिरुद्ध.वैद्य

लिहितात होय? वाचणार कधी ... आणि रिप्लाय कधी करतील ? तोपर्यत पुढच्या वर्षीचा महाराष्ट्र भूषण जाहीर झाला असेल ...

येक नंबर रे कॅप्टन

अजया's picture

19 Aug 2015 - 8:37 am | अजया

जियो चिमणराव! तुमच्या ब्रिगेडमध्ये मला स्थाण द्यावे!!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

19 Aug 2015 - 12:52 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

स्वागत आहे आमच्या ब्रिगेडमधे. आमचे भांडार अधिकारी श्री.श्री. जे.पी. ह्यांच्याकडुन लाठ्याकाठ्या आणि बाग्बाण घेउन ठेवा. =))

खटपट्या's picture

19 Aug 2015 - 9:00 am | खटपट्या

सगळ्या ९६ कुळाचां पण नाही माहिती, जेवढे थोडेफार माहितेय त्याततरी "मराठे आई विकायला कमी करत नसत " असे एकही उदाहरण आढळले नाही

हे सर्व मराठा मतांच्या ध्रुवीकरणासाठी चालू आहे असे दीसतेय. मराठाच काय कोणीही आपली आई विकायला तयार होणार नाही.
उगाच लोकांची माथी भडकवायची आणि आपला कार्यभाग साधायचा.

फाट्यावर मारुन पुढे चला...

अनिरुद्ध.वैद्य's picture

19 Aug 2015 - 1:52 pm | अनिरुद्ध.वैद्य

निवडणुका ४ वर्षांनी हायेती की.

raudransh_27's picture

19 Aug 2015 - 3:15 pm | raudransh_27

मताचं राजकारण सुरुय हे स्पष्टच दिसतेय, जे राज ठाकरे वर्ष बोलत नाही ते अचानक ५,५ मुलाखती देतात.. अजित पवार लोकांकडुन विरोध होतोय लश्रात येताच वाक्ये फिरवतात..
राज्य सरकारचे मंत्री पुढे येत नाहीत.. खंत म्हणजे छ.शिवाजी नावाचा विचार यात लुब्ध होतोय.. दोन्ही बाजुची वैचारिक गुलामगिरी पाहुन किव वाटते..
यावर इतिहासअभ्यासकाचीं जाहीर चर्चा व्हायला हवी होती.. सांस्कृतिक मंञालयाने सर्वाने बोलवुन इतिहासकाराचीं समिती वगैरे स्थापन करायला हवी होती.. तसेही मागच्या चर्चावैळी दिसुन आले बमुपु इ कुठे येत नाहीत.. यांना नुसते वाद चिघळत ठेवायच असतात.. संशोधन मडंळावर कागदपञे जाळुन करुन शेवटी शिवरायाचंचेच नुकसान होतेय.
आम्हाला शिवरायानांबद्दल आदर आहे माँसाहेब वंदनीय आहेत असे म्हणायचे नुसते अन् बदनामी करण्याची पाठराखण सरासर सुरुय.. कोणीही आईची बदनामी सहन करणार नाही, मी माझ्या वरच्या प्रतिसादातच म्हटलेय
तात्पुरता मराठे हा शब्द बाजुला ठेवा, "आई विकत असत " याला कोणीच समर्थन करणार नाही.

पैसा's picture

19 Aug 2015 - 3:19 pm | पैसा

त्या उतार्‍याची स्कॅन कॉपी द्या बघू इथे. आणि मातेची पूजा करताय ना, मग मातृभाषेवरचे अत्याचार आधी बंद करा.

प्रथमत आपण अनमोल विचार मांडण्यापुर्वी (अजुन) एकदा वाचावे ही विनंती..शिवरायांच्या तोंडी वडिलानी धीर सोडु नये bla bla वाक्ये अजुनही तुम्हाला ठीक वाटलीत तर मी काही करु शकत नाही..
राहिला भाग मराठीचा, माझ्या कळफलकावर अनेक अश्रर सापडत नाहीत उदा. Dyaneshwar सारखे शब्द टाईप करताना अडचण येते.. आतंरजालावर मराठी टाईप करताना अडचणी येतात हे सगळ्यानां ठाऊक आहे. काही लोक उगाच मराठी भाषा खतरे में है असा आव आणतात. ककट्टर लोकानां मुद्दापेश्र काना वेलाटीं व्याकरण याचीच लय काळजी

बॅटमॅन's picture

19 Aug 2015 - 4:08 pm | बॅटमॅन

अश्रर = क्ष सारखे अक्षर लिहिता येत नाही, इतकेच नव्हे तर Dyaneshwar वगैरे स्पेलिंग इंग्लिशमध्येही चुकीची लिहिली जातात.

बाकी

ककट्टर लोकानां मुद्दापेश्र काना वेलाटीं व्याकरण याचीच लय काळजी

तुम्ही त्या तोतर्‍या शारुकचे अनुयायी आहात हा साक्षात्कार झाला आत्ताच. 'ककट्टर' वगैरे वाचून. ब्रिगेडी शाळेत मराठी शिकवतात की बाहुबली पिच्चरमधली कालकेय दैत्यांची किलिकिली भाषा?

पैसा's picture

19 Aug 2015 - 4:39 pm | पैसा

म्हणूनच तुम्ही स्कॅन कॉपी द्या सांगतेय. वर कपिलमुनीनी उतारा दिलाय तो अजून १० वेळा वाचा. मग आता अजून कुठे आक्षेपार्ह काही म्हणताय त्याची स्कॅन कॉपी इथे द्या. तुमच्या म्हणण्याला आधार म्हणून काय ते पुरावे दिलेत तर इथे तुमचे नक्कीच ऐकून घेऊ. मात्र हातात कीबोर्ड आहे म्हणून टाईप करत सुटायला मिपा हे कोणाचेही मुखपत्र नाही.

मी अँड्रॉईड आणि विंडोज मोबाईल, टॅब, लॅपटॉप, पीसी सगळ्या प्रकारांच्या कीबोर्डवरून मिपावर फार काय इतर आंतरजालावर लिहिते. मला कधीही कोणत्याही अक्षराला प्रॉब्लेम येत नाही. मिपावर अडचण येण्याचा तर सवालच नाही. मिपावर लिहिण्यापूर्वी इथे जी मदत पाने आहेत ती आधी वाचा आणि मगच टाईप करायला सुरुवात करा.

पिलीयन रायडर's picture

19 Aug 2015 - 4:44 pm | पिलीयन रायडर

हे असले फालतु प्रतिसाद द्यायला वेळ आहे. पुरावे द्यायला नाही ना?

शुद्धलेखन सोडा, स्वतःचा लेख (किंवा जे काही लिहायचा प्रयत्न केलाय ते..) वाचलात का एकदातरी? कळतंय का काय लिहीलय नक्की?

अत्रुप्त आत्मा's picture

19 Aug 2015 - 5:13 pm | अत्रुप्त आत्मा

@प्रथमत आपण अनमोल विचार मांडण्यापुर्वी (अजुन) एकदा वाचावे ही विनंती..शिवरायांच्या तोंडी वडिलानी धीर सोडु नये bla bla वाक्ये अजुनही तुम्हाला ठीक वाटलीत तर मी काही करु शकत नाही.. >>> तुम्हाला आलेल्या अ'काली दीर्घजीवी मतिमंदत्वाच्या तळातून अकलेचे अंकूर फुटून तुमच्या बुद्धिवादाला.. प्रतिभा संपन्नतेची झळाळी येवो ..असे अशुभाशिष देऊन..मी माझे ते वीस शब्द संपवितो.

वेल्लाभट's picture

21 Aug 2015 - 3:43 pm | वेल्लाभट

काय आहे माहित्ये का,

आपल्याला येत नाही ती गोष्ट महत्वाचीच नाही असा आग्रही युक्तिवाद करणारे अनेक जण दिसू लागलेत आता.

कान्हा, मात्रा, वेलांटी (हेही शब्द तुम्ही नीट लिहिलेले नाहीत) हे सगळं महत्वाचं आहेच मराठी भाषेत.

चव्हाणातला 'च' हवाच का? असं विचारल्यावर मंचावरच्या त्या नेत्याची वाचा खुंटली होती. तसंच आहे हे.

तुम्हाला येत नसेल तर मिपावर मदत करायला अनेक जण आहेत. पण माझंच बरोबर असं म्हणणं असेल तर मग अनेकच जण आहेत. :)

बाकी तुमचं ज्ञान (बघा हं ज्ञ लिहिला) अगाध आहे !

शिवरायांच्या तोंडी वडिलानी धीर सोडु नये bla bla वाक्ये अजुनही तुम्हाला ठीक वाटलीत तर मी काही करु शकत नाही..

आधी जाऊन मराठीची शिकवणी लावा. माझ्याकडे आलात तरी चालेल. तुम्हाला वडील या शब्दाचा काय अर्थ अभिप्रेत आहे?
आणि तुमची शिकवणी पूर्ण झाली का रा.रा. खेडेकर आणि रा.रा. साळुंखेंना तुमच्याकडे शिकवणी लावायला लावा.

आयला कुठून कुठून येतात देव जाणे!

कपिलमुनी's picture

19 Aug 2015 - 3:22 pm | कपिलमुनी

माझ्याकडील आवृत्ती २००१ मधील आहे. १४ वर्ष जुनी. या आवृत्तीत पृष्ठ क्रमांक ८३ वरच नेमके काय म्हटले आहे हे पाहुयात:

"ती असंतुष्ट होती. जहागीरदारांची आणि सरदारांची तिला चीड येई. यांना स्वाभिमान नाही, कुळाशीलाची चाड नाही, बेअब्रुची चीड नाही. मोठेपणासाठी स्वत:ची आईसुद्धा विकायला कमी करणार नाहीत हे लाचार, स्वार्थी, गुलाम. पुरुष कसले हे? देव, देश आणि धर्म प्रतिपाळील तोच पुरुष!"

दोन्ही उद्घ्रुते शांतपणे पडताळुन पहा. पुरंदरेंच्या पुस्तकात या विधानात मुळात ’मराठा’ शब्दच नाही हे सहज लक्षात येईल. हा शब्द कोठुन आणला? हे विधान करतांना लेखकाने तत्कालीन महाराष्ट्रातील अनागोंदी चितारत हे विधान केले आहे हे सलग वाचले तर स्पष्ट दिसते. सरदार-जहागिरदार फक्त मराठा होते कि काय? मुरारपंत जोगदेव सरदार नव्हता काय? तो कोण होता? वरील विधान सरसकट सर्वच महाराष्ट्री जहागिरदार-सरदारांबाबत आहे, त्यात ब्राह्मणाला सुटका दिली आहे असे दिसते आहे काय?

दुसरे महत्वाचे असे कि पुरंदरेंनी मराठा हा शब्द पुस्तकात मराठी माणुस म्हणुन वापरला आहे. जात म्हणून नाही. जेथे जेथे जात अनुस्युत आहे तेथे काय म्हटले आहे तेही पाहुयात:

"क्षत्रीय मराठ्यांच्या तलवारी आणि ब्राह्मण मराठ्यांच्या लेखण्या सुलतानांच्या सेवेंत दासींबटकींच्या अदबीने आणी नेकीने रमल्या होत्या." (पान ५५). विधान स्वयंस्पष्ट आहे. येथे मराठा जातीचा जसा उल्लेख आहे तसेच ब्राह्मणांचाही आहे. अन्यत्र मराठा जात ही कुळवंत अथवा शहाण्णव कुळी या विशेषणासहित उल्लेखली आहे. दोहोंना सारखेच झोडपले आहे असे स्पष्ट दिसेल.

मराठा जातीविषयी येणारा अजुन एक उल्लेख पहा, : "आणि या मंडळींना ओळखलत का? हे त्र्यंबकजीराजे भोसले, हे जिवाजीराजे भोसले, हे बाळाजीराजे भोसले, हे परसोजीराजे भोसले. ही खाशी खाशी भोसले मंडळी महाराजांच्या रक्ताची भाऊबंद होती.........पण काय लिहायचे आता?" (पान ३५८)

संजय सोनवणी यांच्या ब्लॉग पोस्टमधून साभार

काळा पहाड's picture

22 Aug 2015 - 7:41 pm | काळा पहाड

"ती असंतुष्ट होती. जहागीरदारांची आणि सरदारांची तिला चीड येई. यांना स्वाभिमान नाही, कुळाशीलाची चाड नाही, बेअब्रुची चीड नाही. मोठेपणासाठी स्वत:ची आईसुद्धा विकायला कमी करणार नाहीत हे लाचार, स्वार्थी, गुलाम. पुरुष कसले हे? देव, देश आणि धर्म प्रतिपाळील तोच पुरुष!"

हं आत्ता कळलं. मग राग येणारच ना हो या रडत राऊत ना! यांच्या सारख्यांच्या बद्दलच तर लिहिलंय पुरंदरेंनी!! "स्वाभिमान नाही, कुळाशीलाची चाड नाही, बेअब्रुची चीड नाही" म्हटल्यावर यांची ट्यूब पेटली.. स्वतःबद्दलच लिहिलंय म्हणून.

कपिलमुनी's picture

19 Aug 2015 - 3:23 pm | कपिलमुनी

ध्याच्या वादात आक्षेपार्ह मानले गेलेले अंतराने येणारे वाक्य म्हणजे, "ब-या, नीटस, गो-या जातीवंत कुणबिणी" बाजारांत सहज ’पंचविस होनांस पांच’ विकत मिळत होत्या." हे होय.

कुणबी आणि मराठे एकच असल्याने हे विधान मराठा पुरुषांची बदनामी करणारे आहे असे म्हटले जाते. वरकरणी पाहता ते खरेही वाटेल. अर्थात या वाक्याआधीचे ब्राह्मणांबाबतचे उद्वेग कसे व्यक्त झाले आहेत हे आपण थोडक्यात पाहिले.

१६३० च्या प्रलयंकारी दुष्काळात ’पुरुष बायका-मुलांना टाकुन जात होते. स्त्रिया, स्वता:ला गुलाम म्हणून विकून घेत. आया बालकांची विक्री करीत." असे हृदयद्रावक वर्णण डच व्यापारी व्ह्यन ट्विस्टने करुन ठेवले आहे. या दुष्काळाची वर्णने तुकाराम महाराज, रामदास, परमानंद यांनीसुद्धा करुन ठेवली आहेत. तुकोबांचे तर नुसते दिवाळे निघाले नाही तर पत्नी व मुलही गमवावे लागले. या दु:ष्काळात होनाजी निबरे नांवाच्या गृहस्थाने घर व जमीन २५ होनास विकली असे पत्रसारसंग्रह ३२९ मद्धे नमुद आहे. अशी त्याकाळातील अगणित उदाहरणे आहेत. इअतकी कि माणुस मृत माणसाला खात होता. (वरील माहितीसाठी संदर्भ: मराठे आणि महाराष्ट्र, ले. अ. रा. कुलकर्णी, पान १०८ ते ११६) आणि पुरंदरेंचे विवेचन नेमके १६२९-३० या काळातील स्थितीचे आहे. दुष्काळातील आहे.

पुरंदरेंनी कुणबिण शब्द वापरला आहे आणि कुणब्याची बायको अथवा मुलगी म्हणजे कुणबीण असा अर्थ येथे घेतला गेलेला दिसतो. त्यामुळे वितंड आहे. मराठा म्हणजे कुणबी हे सध्या समीकरण तेजीत असल्याने पुरंदरेंनी मराठा बायकांची बदनामी केली असा समज होने स्वाभाविक आहे.

पण वास्तव काय आहे?

कुणबीन म्हणजे कुणब्याची बायको-पोर तर बटकी कोण होती? ती कोणाची बायको-पोर होती?

कुणबीण हा रखेली या शब्दाचा प्रतिशब्द होता. कुणब्याची बायको म्हणून तत्कालीन स्थितीत तो अभिप्रेतही नव्हता. याचे शिवकालापासुन, खुद्द शिअवरायांच्या पत्रांतील पुराव्वे उपलब्ध आहेत. बटकी म्हणजे घरकामासाठी राबणारी. कुणबीन म्हणजे कुणब्याची बायको/पोर नव्हे तर एखाद्या माणसाची विक्रय झालेली शय्यासोबतीन. भावीण या शब्दाचा अर्थ भावेंची बायको असा होत नाही तसेच हे आहे. दोन्ही सर्वस्वी वेगळ्या संज्ञा आहेत. यात लग्न अभिप्रेत नाही. ब्रिटिश काळ येईपर्यंत, स्त्रीयांची खरेदी/विक्री थांबेपर्यंत ही प्रथा होती. कुणबीन म्हणजे कुणब्याची बायको असा अर्थ नसुन रोमन व बायबल काळापासुन चालत आलेल्या ल्यटिन "Concubine" या शब्दाचा तो मराठी अपभ्रंश आहे. या शब्दाचा इंग्रजी डिक्शनरीतील अर्थ आहे "a woman who cohabits with a man to whom she is not legally married, especially one regarded as socially or sexually subservient; mistress.". थोडक्यात ठेवलेली बाई. मग ती विकत घेतलेली असेल वा ती स्वेच्छेने राहत असेल. याचा कुणबी जातीशी संबंध जोडणारे व कुणबी समाजाची स्वत:हुन बदनामी करुन घेणारे किती मुर्ख?

जसा बटकीन या शब्दाचा जातीय अर्थ नाही तसाच कुणबिण या शब्दाचाही जातीय अर्थ नाही. कुणबिणी आणि बटकिणींचे क्रय-विक्रय हा महाराष्ट्रातील (अन्यत्र वेगळ्या नांवांनी) सुरु असलेला फार जुना व्यवसाय आहे. पेशवे काळातही शनिवार वाड्यासमोर कुणबिण-बटकिणींचे बाजार भरत व पाच रुपये ते ऐंशी रुपये दराने त्यांची खरेदी होत असे अशा नोंदी उपलब्ध आहेत. आणि या विकावु स्त्रीया कुणबाऊ समाजाच्या असत असे नव्हे तर बव्हंशी सर्वच जातीतील असत. अशा सर्व स्त्रीयांना कुणबीन अशी संज्ञा होती. यामद्धे एकजातीयता शोधणे अनैतिहासिक आहे. किंबहुना हा वेगळाच वर्ग होता ज्यात कोणत्याही जात/धर्माची स्त्री असु शके.

पैसा's picture

19 Aug 2015 - 3:28 pm | पैसा

आम्ही आपले लेखकाकडे उतारे मागतोय, का की तो निदान त्या निमित्ताने तरी तिथे काय लिहिलंय ते वाचेल! आणि तू दु.दु. कुठला! सरळ अशी हवा काढून टाकतोस?

यशोधरा's picture

19 Aug 2015 - 8:01 pm | यशोधरा

नै तर काय! अगदीच दु दु!!

बॅटमॅन's picture

19 Aug 2015 - 3:32 pm | बॅटमॅन

कुणबीण हा शब्द Concubine वरून आलाय असे म्हणण्यास काहीही पुरावा नाही. कुणबीण, कसबीण असे शब्द पूर्वीच्या काळी वापरात होते. जसे सर्व युरोपियन फॉरेनर लोकांना फिरंगी म्हटले जायचे त्यातलाच हा प्रकार आहे. फिरंगी हा शब्द अरबी-फारसी असून त्याचा मूळ अर्थ फ्रँकिश टोळ्यांमधील लोक, फ्रँक असा आहे. ते म्हणजेच आजच्या फ्रेंचांचे पूर्वज होत. फ्रँक शब्दाचाच तो अपभ्रंश आहे.

तोच प्रकार कुणबीण या शब्दाचाही आहे. साधारण नीचजातीतली रखेल स्त्री असा त्याचा अर्थ आहे. निव्वळ उच्चारसाधर्म्यामुळे तसे कनेक्शन लावण्यात कै अर्थ नाय.

विनालग्न एखाद्या संग करणारी "कुणबीण" हा शब्द "कुळहीन/कुलहीन" (कुल्टा) या शब्दाशी साधर्म्य दाखवतो ना ? (एक सहज विचार … विदा नाही )

बॅटमॅन's picture

19 Aug 2015 - 3:46 pm | बॅटमॅन

अर्थदृष्ट्या हो, पण कॉजल कनेक्शन दिसत नाही.

कपिलमुनी's picture

19 Aug 2015 - 4:01 pm | कपिलमुनी

तोच प्रकार कुणबीण या शब्दाचाही आहे. साधारण नीचजातीतली रखेल स्त्री असा त्याचा अर्थ आहे.

सोनवणींनी बघुधा पु.ना. कनेक्शन लावले असावे.
बाकी या अर्थानुसार तो शब्द योग्य आहे . पूर्वी मराठा समाज कुणबी समाजासोबत लग्न व्यवहार टाळायचा. पण सध्या कुणबी समाजास आरक्षण आहे त्यामुळे बरेचजण कुणबी जात लावून घेताना दिसत आहेत.
शिक्षण नोकरीसाठी कुणबी आणि व्यवहारासाठी ९६ कुळी असा दुटप्पीपणा काही स्वार्थी लोक करत आहेत.
त्यामुळे अचानक ब्रिगेडी लोकांना कुणबीण हा शब्द आक्षेपार्ह वाटू लागला आहे.

बाकी आई किंवा बहीणी पोटच्या मुली ,मुले विकणे / मारणे तेव्हाही चालू होते आणि आत्ताही सर्वत्र चालू आहे.

बॅटमॅन's picture

19 Aug 2015 - 4:08 pm | बॅटमॅन

यग्जाक्टली!!!

किसन शिंदे's picture

19 Aug 2015 - 10:14 am | किसन शिंदे

कमाल आहे ब्वॉ! एवढे उच्चशिक्षित(?) लोक सुद्धा असे अडाण्यासारखे कसे काय वागू शकतात याचे आश्चर्य वाटतेय.

जेपी's picture

19 Aug 2015 - 10:21 am | जेपी

खालील शब्दांचे 100 वेळेस शुद्धलेखन करा.बाकीचा लेख नंतर पाहु.
पुञ = पुत्र,
क्षञिय = क्षत्रिय,
छञपती = छत्रपती,
मिञ = मित्र,
पञे = पत्रे,
नीट लिहायच. वर अभ्या..ने शब्द दिलाय त्याप्रमाणे 5 वेळेस येईन तासायला.

इतक्या ठिकाणी 'प्रतिष्ठाण' असे लिहिलेले वाचुन तोच योग्य शब्द आणी 'प्रतिष्ठान' हा चुकीचा असे वाटु लागलेला...

प्यारे१'s picture

21 Aug 2015 - 3:37 pm | प्यारे१

प्रश्ण च नाही.
(अनेक आडनावाने ब्राह्मण लोकांकडून प्र'श्ण' असा चुकीचा उच्चार ऐकला आहे.)

सहमत. इतकेच नव्हे तर बरेचजण ब्रह्म चा उच्चार ब्रम्ह, चिह्न चा उच्चार चिन्ह, प्रह्लाद चा उच्चार प्रल्हाद असे करतात. ह्रस्व चा उच्चार र्‍हस्व असा करणे हे अजूनेक उदा.

इरसाल's picture

21 Aug 2015 - 3:04 pm | इरसाल

दिक्शनरी छापायलाय काय बे ! (सुशिक्तानी ते डि क्शनरी असे वाचावे.....भेंडी हाय काय त्यात)
तुम्ही चालु द्याहो, ह्या टारगटांकडे ल्कश नका देऊ.

नीलमोहर's picture

19 Aug 2015 - 11:34 am | नीलमोहर

लोकांना काय मिळतं जात-पातीच्या राजकारणावरून रिकाम्या चर्चा करून?
परत म्हणतात आपला देश प्रगती का करत नाही,
तेवढा वेळ इतर विधायक कामांना दिला तर तेही होईल.

जग कुठे चाललंय,आपण कुठे आहोत,काय करतोय,
कोणालाच हे प्रश्न का पडत नाहीत.

पैसा's picture

19 Aug 2015 - 12:07 pm | पैसा

प्रसंगी मराठे आईला विकायला कमी करत नसत

हे वाक्य नेमके कोणी कोणास म्हटले? कोणत्या प्रसंगी? कोणत्या पुस्तकात? कोणत्या संदर्भात? कोणत्या विषयाबद्दल बोलताना?

पैसा's picture

19 Aug 2015 - 12:09 pm | पैसा

त्र अक्षर तुम्ही प्रत्येक ठिकाणी ञ असं लिहिलंय. त्या शब्दांचा उच्चार करताना जीभ वळून गेली. हे नक्की मी समजते तेच शब्द आहेत का दुसर्‍या कुठच्या भाषेतले शब्द आहेत?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

19 Aug 2015 - 12:36 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

सूद्दलेकणाच्या चूका दाकऊ णका. ते मोरचा घेऊण येतिल!!

सस्नेह's picture

19 Aug 2015 - 12:45 pm | सस्नेह

तुम्ही काय लिवलंय ते तुम्हाला तरी कळलं आहे अशी तुमची खात्री आहे का ?
असल्यास आपली धन्य __/\__

ज्यांना छत्रपती हा शब्द धड शुद्ध लिहिता येत नाही त्यांची बडबड ती काय सीरियसलि घ्यायची? हे लोक एरवी साडेतीन टक्केवाल्यांची भाषा म्हणून संस्कृतला शिव्याच घालतात. कशाला सांगता मग छात्या पुढे करकरून संभाजीराजांनी बुधभूषणम् हे संस्कृत काव्य लिहिल्याचे ???? यातल्या एकालाही धड संस्कॄत हा शब्दही लिहिता येईल किंवा नाही याबद्दल शंकाच आहे.

जशी शुद्धलेखनाची बोंब आहे तशीच विचारशुद्धता, तर्कशुद्धतेचीही बोंबच आहे. एकुणात शुद्धता या संकल्पनेशीच ज्यांचे वैर आहे त्यांना काय सीरियसलि घ्यायचे. महापुरुषांचा वारसा सांगणार्‍या या टिनपाटांना त्यांची जागा जनतेने दाखवूनच दिली पाहिजे.

अभ्या..'s picture

19 Aug 2015 - 1:39 pm | अभ्या..

ए जिगर .
हान.

फुलथ्रॉटल जिनियस's picture

19 Aug 2015 - 5:55 pm | फुलथ्रॉटल जिनियस

संस्कृतचा उदोउदो करणार्यांना तरी कुठे संस्कृत येते? चार पाच आरत्या,दोन तीन श्लोक पाठ असणारे संस्कृत संस्कृत करतात तेव्हा खूप. गंमत वाटते.

बॅटमॅन's picture

19 Aug 2015 - 6:09 pm | बॅटमॅन

एतदपि सत्यं किन्तु "अकरणान्मन्दकरणं श्रेयः" इति उक्ति: श्रुता किल भवता? अज्ञानगर्वस्तु ब्रिगेडानुयायिनां स्थायीभावोऽस्तीति मे मति:| भवतोऽज्ञानं दॄष्ट्वा रञ्जितोऽस्मि मुहुर्मुहु:| भवान्सदैवास्मान् रञ्जयतु |

अपि च- ये जना: लेखने 'त्र-ञ-'यो: अपि पार्थक्यं न जानन्ति तान्प्रति को यत्नः???? :)

संदीप डांगे's picture

19 Aug 2015 - 6:16 pm | संदीप डांगे

आमचं संस्क्रुत कच्चंय मनुन आमी संस्क्रुतचा उदो उदो नाय करत, पण वरच्या पर्तेसादाचा आमच्या मते येकच अर्थ हायः
.
.
.
"ह्या ब्याट्याला कोणीतरी धरून हाणा रे"

पैसा's picture

19 Aug 2015 - 6:35 pm | पैसा

साधु: साधु:| भो: वल्गुदशास्त्री महोदय, सत्यं अवदत् त्वया|

अनिरुद्ध.वैद्य's picture

19 Aug 2015 - 7:38 pm | अनिरुद्ध.वैद्य

बॅटमॅन ह्यांचा सिक्सार ... चेंडू पार स्टेडीअमच्या बाहेर!!!

बाकी संस्कृत न शिकता आल्याची अजूनही खंत असल्याचे प्रामाणिकपणे कबूल!

आंतरजालावर कुठेशिक आहे का शिकण्याची सोय?

और ये लगाया बॅटमॅनने छक्का, फुलथ्रॉटल जिनियस हो गये हक्का बक्का..

फुलथ्रॉटल जिनियस यांचा चुकीच्या माणसाला टोला हाणायचा प्रयत्न मस्त फसला आहे..

बॅटमॅन भौ _/\_

अद्द्या's picture

20 Aug 2015 - 9:11 pm | अद्द्या

दादा

कशाला एवढा त्रास करून घेतोय . . (ते सगळं टंकायचा )

ह्या यडझव्या डी ग्रेडींची बौद्धिक लायकी नाही , हे सगळं समजायची . किंवा एकुणात काहीही समजून घ्यायची .

पण असो .

हा सिक्सर पार अगदी गावाच्या बाहेर मारलेला आहे .

दंडवत

प्रदीप साळुंखे's picture

19 Aug 2015 - 2:41 pm | प्रदीप साळुंखे

मिपावर सगळे 'भट'च आहेत कि काय? बहुतेक प्रतिक्रिया वाचून तसेच वाटते.

(भट=विद्वान,असे म्हणायचे आहे, कृपया चिडू नका)

पैसा's picture

19 Aug 2015 - 2:52 pm | पैसा

अय्या, हो?

प्यारे१'s picture

19 Aug 2015 - 3:06 pm | प्यारे१

आता आता येऊ लागलेत.

आपलं स्वागत आहे. :)

संजय पाटिल's picture

19 Aug 2015 - 5:09 pm | संजय पाटिल

(भट=विद्वान,असे म्हणायचे आहे, कृपया चिडू नका)
लोल....

अनिरुद्ध.वैद्य's picture

19 Aug 2015 - 8:02 pm | अनिरुद्ध.वैद्य

भट=विद्वान,असे म्हणायचे आहे

>>

मला चुकून महेश भट का आठवले कुणास ठाऊक.

प्रदीप साळुंखे's picture

19 Aug 2015 - 9:28 pm | प्रदीप साळुंखे

साहजिकच आहे.तुम्हाला महेश भट च आठवणार.

प्यारे१'s picture

20 Aug 2015 - 12:13 am | प्यारे१

साळुंखे, मी बहुजन समाजातला आहे. माझ्या एका चुलत बहिणीनं मराठा मुलाशी आणि एका मावसबहिणीनं ब्राह्मण मुलाशी लग्न केलंय. सगळे व्यवस्थित जा ये खा पि करतात.
तुमचा नक्की काय आक्षेप आहे? आपण भट म्हणजे विद्वान या अर्थानं नाही म्हणालात हे तुम्हालाही माहिती आहे.

वेळ प्रसंगी मी आमच्या जातीला, मराठ्यांना आणि बामणाना पण श्या देतो. खातो पण. भरपूर मुस्लिम, अनेक आणखी जातीतले धर्मातलेही मित्र मैत्रिणी आहेत.

तुमचा नक्की काय आक्षेप आहे????

नाखु's picture

20 Aug 2015 - 2:46 pm | नाखु

ओ.ह.

माफ करा आ.ह. यांचे नक्की कोण आहेत त्याची चव्कशी करा जरा !!! बाकी रुमाल टाकून आहे. चार जागा पकडून ठेवणे शेंगा-कणसं घेऊन येतो.

चिर्कूट चिमण मेंबर

अनिरुद्ध.वैद्य's picture

20 Aug 2015 - 2:54 pm | अनिरुद्ध.वैद्य

मग अजून कोणी आठवायला हवे होते?

स्रुजा's picture

19 Aug 2015 - 10:45 pm | स्रुजा

मी या धाग्याला फाट्यावर मारणार होते. तुमच्या या एका प्रतिक्रियेत तो विचार बदलायचं सामर्थ्य आहे. अभिनंदन !! भट म्हणजे विद्वान हे मान्य आहे का? बर्र !!!

llपुण्याचे पेशवेll's picture

19 Aug 2015 - 2:58 pm | llपुण्याचे पेशवेll

ऐका जरा.
तीय ब्रिटिशविरोधी स्वातंञ लढा वाचल्यावर एवढे लश्रात येते की मातृभूमिसाठी लढण्यात आघाडीवर होते महाराष्ट्र आणि बंगाल.. क्रांतीकुलावतंस मराठे हसतहसत मातृभूमिसाठी मृत्युला सामोरे गेले
याच्यामधले किती ९६के होते हो? आणि राहीलच तर जे हसत हसत मृत्यूला सामोरे गेले त्यात किती तुमचे साडेतीन टक्के वाले होते होते मोजा बरे जरा.
अहो कमीत कमी उदाहरणे तरी आपल्या स्वतःच्या मुद्द्याला मारणार नाहीत अशी निवडायची हो.

कपिलमुनी's picture

19 Aug 2015 - 3:00 pm | कपिलमुनी

लेखक महाशय काडी टाकून गेले आहेत.
आपण बसलोय लेखण्या ताणत :)

अनिरुद्ध.वैद्य's picture

19 Aug 2015 - 5:58 pm | अनिरुद्ध.वैद्य

दुर्लक्ष करणे! आता लेखक सांगत फिरत असतील कसा ५० लोकांना नडलो ते :D

प्रदीप साळुंखे's picture

19 Aug 2015 - 3:09 pm | प्रदीप साळुंखे

मी नाही ओ वर पहा

आयला अजून कोनीच कसे आले नाय वो?
त्या भट बाबा पुरंदरेला॑ दिलेला पुरस्कार परत घेतला पाहिजे. (आता देऊन झालाय म्हणजे बोलायला मोकळे)
दादू कोंडदेवाचे नाव इतिहासातून पुसून टाकले पाहिजे.. त्या जेम्स लेन ला मसाला पुरवतो म्हणजे काय?
त्या जातीयवादी कादंबरीवर बंदी घातली पाहिजे.. शिवरायांची/मासाहेबांची बदनामी केली म्हणजे काय? मग त्या वाक्यांचा मागचा पुढचा संदर्भ काहीही असो.
शिवरायांच्या आईबद्दल घाणेरडी(?) वाक्य काढणार्‍याची जीभ मुळापासून उपटली पाहिजे (आमच्या आईवडिलांना आम्ही कुत्र्याची देखील किम्मत देत नसलो तरीही)

असो. मला एकच प्रश्न, भर दरबारात कोण तो भूषण "शिवबा न होते तो सुन्नत सबकी होती" असे काहीबाही बरळतो, आणि महराजांचे अष्टप्रधान मंडळ गप्प बसते म्हणजे काय? त्यांंना महाराजांचा धर्मनिरपेक्ष स्वभाव माहीत नव्हता काय? तिथल्या तिथे त्या भूषणला चेचला नाही म्हणून ही भाटांची पिलावळ सोकावलीय.

आदूबाळ's picture

19 Aug 2015 - 3:51 pm | आदूबाळ

The 8 Stages of Genocide
http://www.genocidewatch.org/aboutgenocide/8stagesofgenocide.html

कोणत्या पायरीवर आहोत आत्ता आपण? पाच (Polarization) संपवून सहा (Preparation)?

कपिलमुनी's picture

19 Aug 2015 - 4:03 pm | कपिलमुनी

जे ज्यूंचा झाला तेच होणार आहे.
फक्त कधी ? हा प्रश्न आहे.
ट्रिगर इव्हेंट काय असेल ?
मध्ये शरद पवारावर हल्ला झाला तो व्यक्ती जर ब्राह्मण असता तर पुन्हा १९४८ रीपीट झाले असते.

मला नाय वाटत तसं काही होईल म्हणून.

१९४८ ला देखील काय झाले म्हणे? किती ब्राह्मणांचे शिरकाण करण्यात आले? घरे जाळली हे खरे, पण किती लोकांना मारले? तेव्हा जे झाले खूप वाईट झाले, पण त्याला जिनोसाईड म्हणणे म्हणजे जिनोसाईड या कल्पनेवरच विनोद केल्यापैकी आहे.

ब्राह्मणविरोधी १९४८ चे जे दंगे झाले ते देशभर झाले का?
महाराष्ट्रातही पश्चिम महाराष्ट्र सोडून कुठे झाले?
पश्चिम महाराष्ट्रातही जास्त प्रमाण कुठे होते?
जिथे दंगे झाले तिथे वित्तहानी किती आणि जीवितहानी किती झाली?
लोकांचे ब्राह्मणांशी दंग्यांनंतरचे वर्तन कसे होते?

याचा जरा अदमास घ्या अशी विनंती आहे. त्याचा अदमास घेऊन जर पाहिले तर ज्यूंच्या शिरकाणाशी तुलना करणे म्हणजे काय म्हणावे हे कळत नाही.

आणि हो, हे टाकायचे राहिलेचः

(नॉनसेकुलर ब्राह्मण) बॅटमॅन.

कपिलमुनी's picture

19 Aug 2015 - 4:38 pm | कपिलमुनी

१९४८ ला सामाजिक वातावरण आजएवढे प्रदूषित नव्हते.
मिडिया , सोशल मिडियामुळे बातम्या , अफवांचा वेग प्रचंड वाढला आहे. शहानिशा न करता त्यावर लोकं विश्वास ठेवतात आणि रीअ‍ॅक्ट होतात ( विटंबनेच्या अफवेवरून अशाच दंगली झाल्या आहेत)
१९४८ ला सर्वसाधारंण लोका हिंसक नव्हती त्यामुळे बर्‍याच ठिकाणी घरे जाळाली तरी आतल्या लोकांना बाहेर काढले होते पण काही ठिकाणी सामूहिक शिरकाण झाले होते. सुदैवाने त्यांना सरकारी सपोर्ट नव्ह्ता ( जो शिख हत्याकांडामध्ये होता)
सध्या जमाव जमला की हिंसक आणि क्रूर होतो. अगदी पाकीटमारापासून ते रस्त्यावरच्या गाडीचा धक्का लागल्यानंतरचा खून अशी उदाहरणे आहेत. हा वाढता हिंसकपणा पाहिला तर जिनोसाईडची भिती वाटणे साहजिक आहे . आज किंवा नजीकच्या काळात नाही किंवा ज्यूंएवढे मोठे नाही . पण समाजकंटकांना एखादा मोठा ट्रिगर ( हत्या ई.) मिळाला तर जिनोसाईडची छोटी आवृत्ती घडू शकते .

बॅटमॅन's picture

19 Aug 2015 - 4:44 pm | बॅटमॅन

ह्या बाकी खरा.

तेव्हापेक्षा आजचे वातावरण खूप जास्ती प्रदूषित झालेले आहे. कदाचित होईलही (न होवो).

बायदवे, १९४८ साली शिरकाण कुठे झाले हे सांगू शकाल कय?

कपिलमुनी's picture

19 Aug 2015 - 5:00 pm | कपिलमुनी

व्यनि केला आहे

मुनीवर माझे व्यवसायानिमित्त एक छोटेसे निरिक्षण आहे. कदाचित तो बदलत्या समाजमनाचा आरसा असावा.
ग्रुप्स, प्रतिष्ठाने, मंडळे, संस्था, सेवाभावी संस्था, संघटना आधीपासुन असायच्या. आता त्यांची बेसुमार पैदास झालीय ते सोडा पण पुर्वीच्या मंडळांचे संस्थांचे लोगो सुर्योदय, पणती, दिवा, मदतीचे हात, सुर्य, मंगलचिन्हे असे असायचे. आताच्या कुठल्याही ग्रुपला वाघ, सिंव्ह, तलवारी, बंदुका, जाळ, क्वचित कवट्या असेच लोगो लागतात.
महाभारतकालीन वाघसिंह शौर्याचे प्रतिक म्हणून वापरत असत पण आजच्या जमान्यात फालतू फालतू लोकांची अन संघटनांची ती युध्द्जन्य चिन्हे पाहून कीव येते.

बॅटमॅन's picture

19 Aug 2015 - 5:39 pm | बॅटमॅन

खल्लास निरीक्षण!

अत्रुप्त आत्मा's picture

19 Aug 2015 - 5:50 pm | अत्रुप्त आत्मा

+१

वर ही सिम्बॉल्स असली तरी त्यामागे..हल्लीचे तयार झालेले निरनिराळे ग्रुप्स असतात. पुण्यातली दहिहंडीची पोस्टर्स पाहिली तरी समजतं लगेच. बेकारी,निरुत्साह या समस्येत असलेली वय १५ ते २२ गटातली पोरं या ग्रुप्स मधे बेसुमार भरती होत आहेत.

अभ्या परफेक्ट निरीक्षण! लोगो एकूणच मानसिकता व्यक्त करणारे आहेत!

कोमल's picture

19 Aug 2015 - 8:21 pm | कोमल

बेकारी,निरुत्साह

+१

आणि यांचे फ्लेक्सांवरचे हावभाव युद्ध जिंकून आल्या सारखे असतात ते वेगळेच!!!

समीरसूर's picture

20 Aug 2015 - 3:06 pm | समीरसूर

जबरदस्त निरीक्षण! अगदी खरे आहे. एकंदरीत झुंडशाही वाढलेली आहे हे खरे.

आणि डोक्यात जातात ती अशी वाक्ये:

नाद करायचा नाय...
बघतोस काय? मुजरा कर!
सिंहाच्या जबड्यात घालुनि हात, मोजीन दात, ही जात मराठ्याची! (सिंहाचे दात जबड्यात हात वगैरे घालून का मोजायचे ह्या प्रश्नाचं मला अजून उत्तर मिळालेलं नाही. थोडं वाचन केलं तरी सहज कळेल. हे पद्धतशीरपणे जातीय तेढ वाढवण्याचे, वर्चस्व गाजवण्याचे प्रयत्न! ब्रिगेडधर्म!)
राजे/दादा तुम्हीच! (पण काय?)

दहशत घालून मोठेपण मान्य करायला लावण्याचं हे तंत्र खूप धोकादायक आहे. हे ब्रेंडिंग सुरु झालं आणि आपल्या समाजाचा पोत बिघडला. आता तो दुरुस्त होणं कठीण आहे.

कहर's picture

20 Aug 2015 - 3:17 pm | कहर

भले

सिंहाच्या जबड्यात घालुनि हात, मोजीन दात, ही जात मराठ्याची

हाच तर प्रयत्न होता. स्वताला संभाजी समजून सिंह शिवशाहिरांच्या पुरस्काराला हात घालायला निघाले …. पण दात राहिले बाजूला हात बाहेर आल्यावर मोजणारी बोटे सुद्धा हातावर उरली नाहीत की. संभाजीचा आव आणणारा शास्ताखान निघाला म्हणायचे

सिंहाच्या जबड्यात घालुनि हात, मोजीन दात, ही जात मराठ्याची! (सिंहाचे दात जबड्यात हात वगैरे घालून का मोजायचे ह्या प्रश्नाचं मला अजून उत्तर मिळालेलं नाही.

आणि मजा म्हणजे ही कन्सेप्ट सर्वांत अगोदर शाकुंतल नामक नाटकात सांगितलेली आहे. त्याहूनही मजा म्हणजे हे नाटक साडेतीन टक्केवाल्यांच्या भाषेत लिहिलेलं आहे. तेव्हा ज्यांच्या विरुद्ध दंड थोपटायचे त्यांच्याच कल्पना चोरायच्या म्हणजे किती बुद्धिदारिद्र्य असेल पहा तुम्हीच.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

20 Aug 2015 - 7:51 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

अरे गंमतीची गोष्ट म्हणजे सिंहाच्या जबड्यात घालुनी हात मोजती दातवाली मंडळी जेव्हा चुकुन घरी येतात तेव्हा कुत्रा मोकळा आहे का बांधलेला आहे ह्याची खात्री केल्याशिवाय गेटला पण हात लावत नाहित. =))

बॅटमॅन's picture

20 Aug 2015 - 7:54 pm | बॅटमॅन

ठ्ठो =)) =)) =))

प्यारे१'s picture

20 Aug 2015 - 8:29 pm | प्यारे१

ते कुत्र्याचे सोनेरी पट्टे वडलोपार्जित जमिनी (काळी आई) विकून गळ्यात मिरवत असतात....!

सरसकटीकरण नाही करत पण बर्‍याच केसेस पाहिल्यात.
सॉरी मालोजीराव, गॉगल्या आणि इतर लोक...

माहितगार's picture

19 Aug 2015 - 7:14 pm | माहितगार

सुदैवाने त्यांना सरकारी सपोर्ट नव्ह्ता ( जो शिख हत्याकांडामध्ये होता)

या धाग्यावरची बाकी चर्चा खरेच माहित नाही ब्याटमनरावांचे प्रतिसाद फॉलेकरत या प्रतिसादा पर्यंत पोहोचलो. या धागा चर्चेत शीख समाजाचा संबंध कोणता आणि कसा लावला जातो आहे ? शिख हत्याकांडामध्ये होता म्हणजे कोणते ? अफगाणीस्तानातले का नॉर्थवेस्ट फ्रंटीयरचे ? आणि त्यात सरकारी सपोर्ट या साठी कोणते संदर्भ आहेत ? शिख हत्याकांडास सरकारी सपोर्ट यातून प्रतिसाद कर्त्यास काय ध्वनीत करावयाचे आहे ?

sandarbha hava

संदीप डांगे's picture

19 Aug 2015 - 7:27 pm | संदीप डांगे

३१ ऑक्टोबर १९८४ बद्दल बोलत आहेत दादा ते.

पगला गजोधर's picture

19 Aug 2015 - 5:02 pm | पगला गजोधर

ऐला मी तिकडे कथेच्या जिलब्या पाडू राहिलोय, तिथे कोन फिरकत पण नाही आणि प्रतिक्रिया पण देत नाही.
थांबा आता मी पण एक कॉन्ट्रोव्हरशीअल का. कु. धागा काढतोच…

होबासराव's picture

25 Aug 2015 - 6:18 pm | होबासराव

मस्त...पटेश. तसा हि आज सेक्युलरीझम चा जो अर्थ आहे त्यामानाने आम्हि नॉन-सेक्युलरच बरे.

नाव आडनाव's picture

19 Aug 2015 - 4:39 pm | नाव आडनाव

या प्रतिसादासाठी धन्यवाद.

अभिजितमोहोळकर's picture

21 Aug 2015 - 11:37 am | अभिजितमोहोळकर

ज्यूं चे भयानक हाल झाले आणि अणि महा पाशवी निर्दयी शिरकाण झालं. तेव्हढं काही १९४८ ला झालं नव्हंत. गावगुंडांनी तेंव्हा हात धुवून घेतले हे मात्रं खरं. अर्थातच परिणाम फारच मोठे झाले हे मान्य पण ज्यूं च्या अत्याचारांशी तुलना योग्य नाही.

अनिरुद्ध.वैद्य's picture

19 Aug 2015 - 6:15 pm | अनिरुद्ध.वैद्य

त्यांनी तर संघ पण टाकलाय हो राजे हो ..

Genocide is always organized, usually by the state, often using militias to provide deniability of state responsibility (the Janjaweed in Darfur.) Sometimes organization is informal (Hindu mobs led by local RSS militants) or decentralized (terrorist groups.)

तरीपण, मला वाटते आपण लेव्हल ६ कधीच गाठलीय.

होबासराव's picture

25 Aug 2015 - 6:19 pm | होबासराव

ळॉळ =))

तुडतुडी's picture

19 Aug 2015 - 4:07 pm | तुडतुडी

प्रसंगी मराठे आईला विकायला कमी करत नसत>>
मराठे म्हणजे मराठी माणसं असा उल्लेख असावा . शिवपूर्व काळाची भयाण परिस्थिती लक्षात घेतली तर छोट्या छोट्या वतनांसाठी, थोड्या पैशांसाठी अत्यंत लाचार होणारे लोक असं करतहि असतील कदाचित .

अनिरुद्ध.वैद्य's picture

19 Aug 2015 - 6:18 pm | अनिरुद्ध.वैद्य

इतर ठिकाणचा मराठे क्षत्रिय किंवा मराठा ब्राम्हण असा पोटभेद सोयीस्कर विसरतात मंडळी ...

जयंत कुलकर्णी's picture

19 Aug 2015 - 4:12 pm | जयंत कुलकर्णी

हेच टाकायला येणार होतो...धन्यवाद ! खेडेकरांनी भारतातील प्रत्येक ब्राह्मणास ठार करु अशी धमकी दिलेली याप्रसंगी आठवत आहे... त्यांच्या पुस्तकातील इतर अनेक धमक्या नेटवर सापडतील बहुदा....

अनिरुद्ध.वैद्य's picture

19 Aug 2015 - 6:08 pm | अनिरुद्ध.वैद्य

प्रत्येक ब्राह्मणास नव्हे काही ... ब्राह्मण पुरुषांना ...

ओह येस..नेहमीची मेथडॉलॉजी हो. पुरुषांना ठार मारा आणि बायका आपसात वाटून घ्या. नवा पार्ट इतकाच की इतके सगळे करूनच्या करून बहुजनांचे कैवारी असल्याचे मिरवून घ्यायचे.

अनिरुद्ध.वैद्य's picture

19 Aug 2015 - 6:16 pm | अनिरुद्ध.वैद्य

तसलेच काहीसे.

विवेकपटाईत's picture

19 Aug 2015 - 6:10 pm | विवेकपटाईत

पुरंदरे यांचे लेखन वाचल्याशिवाय लिहिलेला हा लेख आहे. बाकी महाराष्ट्रात खरोखरच कुणी मराठी आहे का? बाकी सत्य एकच आहे, पुरंदरे मुळे लोकांना शिवाजी माहित झाला. (माननीय नेहरू यांचे शिवाजी आणि मराठ्यांबाबत काय विचार होते, एकदा तपासून पहा) पुरंदरे नसते तर सेकुलर सरकारने शिवाजीचा धडा हि शाळेत शिकविला नसता. संभाजी ब्रिगेडने पुरंदरे यांचे आभार मानले पाहिजे. (जर ते शिवाजी राजेना आपला राजा मानीत असतील तर). बाकी लोकसभेचा पराभव साहेबाना अजून पचला नाही आहे, गादी विना त्यांची अवस्था बिकट झाली आहे.

पुरंदरे मुळे लोकांना शिवाजी माहित झाला.

साहेब उगा काहीही बोलू नका. बाबासाहेबांचे कार्य महान आहे पण शिवाजीमहाराजांची स्मृती त्यांच्याही अगोदर खूप जणांनी गाजवलेली आहे. बाबासाहेबांपायी बाकीच्यांचा अपमान करू नका.

शब्दबम्बाळ's picture

19 Aug 2015 - 7:53 pm | शब्दबम्बाळ

पटाईत साहेबांच्या प्रतिसादातला शिवाजीमहाराजांचा एकेरी उल्लेख खटकला हे नमूद करतो!
शेवटी ज्याची त्याची मर्जी, त्याने महाराजांचे कर्तुत्व काही कमी होणार नाही पण
"पुरंदरे यांचे लेखन वाचल्याशिवाय लिहिलेला हा लेख आहे" या वाक्यात आपण पुरंदरेंना आदराने संबोधित करू शकता ते राजांच्या बाबतीतही फारसे अवघड नसावे असे वाटते!

बाकी आप तो भावानावो में बह गये!!

असाच एका धाग्यावर कोणीतरी "पुरंदरे यांचा अपमान म्हणजे शिवाजी महाराजांचा अपमान" असे लिहिलेले वाचले!
अरे काय चाललंय, म्हणजे एखाद्याला मोठ्ठ दाखवायचं म्हणून काहीही बोलायचं?

अशी सुद्धा मा. पुरंदरे यांना अशा प्रकारे ओळख देण्याची काही गरज नाहीये! महाराष्ट्र त्यांना शिवचरित्रकार म्हणून आधीपासूनच असाही ओळखतोच.

दोन्ही बाजूंना हे टोक किंवा ते टोक एवढाच पाहायला मिळतंय! अवघड आहे!

अहो ज्ञानेश्वरीमुळे गीतेचे ज्ञान अगदी तळागाळातल्या सामान्य जनतेपर्यंत पोचले अशा अर्थाचे वाक्य आहे ते . गीता आधीपासून होतीच की.
छत्रपतींच्या बद्दल अनेक बखरी आणि लेखन उपलब्ध होते मान्य पण सामान्य जनमानसात किती पोचले होते ? पेशव्यांच्या कारकिर्दीबद्दल पण अनेक साहित्य उपलब्ध आहे पण सामान्य लोकांना माहिती किती आहे? अशा अर्थाने

पुरंदरे मुळे लोकांना छत्रपतीं माहित झाला.

बॅटमॅन's picture

20 Aug 2015 - 7:37 pm | बॅटमॅन

नाही, तेही चूक आहे. बाबासाहेबांच्या अगोदर ललित लेखन किंवा काव्यनाटक वगैरे रूपांनी शिवचरित्र भरपूर तळागाळात पोहोचले होते. शिवचरित्रविषयक कादंबर्‍या किंवा नाटक वगैरेंना तुफान पॉप्युलॅरिटी अगोदरपासूनच होती. सामान्य जनमानसात शिवचरित्र पुष्कळ पोहोचले होते.

वाच्यार्थानं चरित्र म्हणता यावे असे पाहिले मराठी शिवचरित्र केळुसकर यांनी लिहिलेले होते ना?

येस आय थिंक. तरी जरा पाहतो कै अजून कोणी असेल तर.

अस्वस्थामा's picture

20 Aug 2015 - 8:46 pm | अस्वस्थामा

नक्की कुठे जाऊन पाहून येतोस रे तू.. ?? ;)
(नै येताना बोचकंच आणतोस म्हणून विचारतोय.)

याच्या तळघरात "दि लायब्ररीयन " सारखी एखादी गुप्त आणि मोठी एखादी लायब्ररी असेल . .

कहर's picture

21 Aug 2015 - 9:09 am | कहर

लोळ...
खरेच तसे काही असल्यास बघायला आवडेल

हायला या ब्रिगेडी लो़कांमुळे विवेकवादी सच्चे मराठे फुकटचे बदनाम होतायत..

कैलासवासी सोन्याबापु's picture

20 Aug 2015 - 2:10 pm | कैलासवासी सोन्याबापु

कश्यात काय अन फाटक्यात पाय!! ह्यांची मर्दुमकी ब्राह्मण पुरुष मारा ते एड्स चे विषाणु असतात वगैरे इतपत असते त्याच्यापुढे नाही! उगाच धागा उघडला भाऊ!!

आदूबाळ's picture

20 Aug 2015 - 2:39 pm | आदूबाळ

http://www.genocidewatch.org/aboutgenocide/8stagesofgenocide.html

3. DEHUMANIZATION:
One group denies the humanity of the other group. Members of it are equated with animals, vermin, insects or diseases. Dehumanization overcomes the normal human revulsion against murder. At this stage, hate propaganda in print and on hate radios is used to vilify the victim group.

तुडतुडी's picture

20 Aug 2015 - 2:12 pm | तुडतुडी

"शिवबा न होते तो सुन्नत सबकी होती" असे काहीबाही बरळतो, आणि महराजांचे अष्टप्रधान मंडळ गप्प बसते म्हणजे काय?>>>
मग ? हे विधान चूक आहे काय ? महाराज धर्मनिरपेक्ष होते हे निर्विवाद सत्य आहे . त्यांच्या सैन्यात अनेक इतर धर्मीय लोक होते . आग्र्याला असताना
महाराजांचा एकनिष्ठ सेवक मदारी मेहतर त्यांच्यासोबत होता . पण हिंदुस्थानवर राज्य करणारे त्यावेळचे राज्यकर्ते धर्मनिरपेक्ष नवते ना . शिवपुर्वकालीन
हिंदूंची स्थिती आणि हिंदवी स्वराज्य स्थापन झाल्यानंतर ची स्थिती ह्यात जमीन अस्मानाचा फरक आहे . तेव्हा शिवाजी महाराज नसते तर कलशाने उच्चारलेलं वाक्य सत्य सुधा होऊ शकलं असतं .

ओ आक्का, उपरोधात्मक प्रतिसाद आहे तो.
कुल्फि खा आणि थंड व्हा!

खटपट्या's picture

20 Aug 2015 - 3:15 pm | खटपट्या

शतका बद्दल धागाकर्त्याला शिवचरित्राचे सर्व खंड देउन सत्कार करण्यात येत आहे.

मिपा पडीक सत्कार समीती.
अध्यक्ष - जेपी
उपाध्यक्ष - नाखू (नाखू यांचा सद्याचा पत्ता माहीत नाही)
बाकी सगळे मिपा पडीक कार्यकर्ते

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

20 Aug 2015 - 8:04 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

थोडासा उचित बदल सुचवतो.

शतका बद्दल धागाकर्त्याला बाबासाहेब पुरंदरे लिखित शिवचरित्राच्या प्रत्येक आवृत्तीची एक एक प्रत देउन सत्कार करणेत येत आहे.

तसचं जाती/वंशश्रेष्ठत्वाची जी काविळ झालेली आहे त्यामधुन सदर महाशय लौकर बरे व्हावेत ह्यासाठी सद्ध्याचे लोकप्रिय आद्यदैवत जयदेवा जयदेवा खंडेरायाला प्रार्थना करण्यात येत आहे.

-सर हेपीतेखा जेपी-
(अध्यक्ष,अखिलमिपापडिकसत्कारसमिती)

-श्री.श्री.बॅटुकराजे गॉथमहळ्ळीकर-
(-संस्थापक व अध्यक्ष, रोचकऐतिहासिकसंदर्भसमिती, मिपावाडी)

-कॅजॅस्पॅ-
(अध्यक्ष,धरलाकीहाणपळलाकीसोडकुत्रा ब्रिगेड)

आणि असंख्य कार्यकर्ते.

खटपट्या's picture

20 Aug 2015 - 8:13 pm | खटपट्या

चालतंय :)

कपिलमुनी's picture

20 Aug 2015 - 8:16 pm | कपिलमुनी

संन्यासाचा तेवढा लक्षात ठेवा,

अस्वस्थामा's picture

20 Aug 2015 - 8:52 pm | अस्वस्थामा

खिक्क..
टका ने बगा कसा आगदी मनावर घेतलाय.. ;)

परश्या's picture

21 Aug 2015 - 10:24 am | परश्या

मातृगौत्र निदर्शक नांव धारण करणारा गौतमीपुत्र सातकर्णी हा काही पहिला राजा नाही. असे मातृगौत्र निदर्शक नांव धारण करण्याची प्रथा/पद्धत त्यापुर्वीही म्हणजे अगदी वैदिक काळापासुन प्रचलित होती. बहुपत्नीत्वाची पद्धत अस्तित्वात असलेल्या समाजात विशिष्ट राणीपासून झालेली मुले इतर राण्यांच्या मुलांपासून वेगळी अशी ओळखता यावीत यासाठीची ती परंपरा होती. ही पद्धत केवळ राजघराण्यापुरतीच मर्यादित नसून सामान्य जनतेतही अशी नावे अस्तित्वात होती. इथे मातेबद्दल आदर वगैरे सुचविण्यासाठी गौतमीपुत्र सातकर्णी ने हे नाव धारण केलेले दिसत नाही.

….बादवे….. सातकर्णी (घराणे) हे क्षत्रिय घराणे नसून ब्राह्मण घराणे होते.

संदर्भ – महाराष्ट्र राज्य गॅझेटिअर , इतिहास : प्राचीन काळ (खंड १) पान क्र. १६५ व ४८५

अर्धवटराव's picture

21 Aug 2015 - 11:24 am | अर्धवटराव

आयडी बदलला कि काय ???

प्रचेतस's picture

21 Aug 2015 - 11:43 am | प्रचेतस

नाही हो.

बाकी सातवाहन ब्राह्मण होते का क्षत्रिय हा विवाद्य विषय आहे.
हा संपूर्ण डोलारा गौतमीपुत्राच्या नासिक शिलालेखातील 'एक ब्राह्मणनस' (एक ब्राह्मण) ह्या शब्दावर आधारित आहे.
ह्या व्यतिरीक्त सातवाहन हे ब्राह्मण अथवा क्षत्रिय असल्याचा कुठलाही पुरातत्वीय उल्लेख नाही.

परश्या's picture

21 Aug 2015 - 12:58 pm | परश्या

असहमत...

नाशिक शिलालेखात ’एक ब्राह्मणनस’(एक ब्राह्मण)(दुरूस्ती : मुळ शब्द ’एक बम्हण’ (एक ब्राह्मण) असा आहे.) ह्या शब्दाच्या आधी देखील एक शब्द आहे. ’खतिय दप मान मदण’ म्हणजे क्षत्रियांचा अहंकार चिरडणारा. आणि हा शिलालेख गौतमीपुत्राचा नसून त्याचा मुलगा ’वासिष्ठीपुत्र पुलुमावी’ ( अर्थात अनेक राण्यांपैकी एक वासिष्ठी या राणीचा पुत्र ) याच्या राजवटीतील आहे.

मूळ प्राकृत शब्द एकबम्हणस असा आहे.

एककुसस एकधनुधरस एकसूरस एकबम्हणस रामकेसवाजुनभीमसेनतुलपरकमस

बाकी हा शिलालेख पुळुमावीने कोरुन घेतलेला असली तरी लेखाचा उद्देश हा पुळुवामीच्या आजीने (आणि गौतमीपुत्राच्या आईने) हे लेणे धर्मकार्यार्थ कोरवून घेतले हे नमूद करण्याचा आहे.

स्वामी संकेतानंद's picture

21 Aug 2015 - 12:18 pm | स्वामी संकेतानंद

फ़ालतू धागा. पूर्ण वाचायच्या भानगडीत पडलो नाही. छत्रपती व्यवस्थित लिहीणे तरी शिकून घ्यावे किमान.

तुडतुडी's picture

21 Aug 2015 - 1:25 pm | तुडतुडी

प्यारे१ बरं .
नीलमोहर मलाही तो प्रश्न पडतो . भूछत्रासारख्या गल्लीबोळात उगवलेल्या संघटनांनी उच्छाद मांडलाय नुसता . आक्षेप घेणार्यांनी स्वतः कधीही आक्षेप घेतल्या जाणार्या गोष्टीचा इतिहास वाचलेला नसतो . वाहणार्या गंगेत हात धुवून घ्यायचा म्हणून गावगुंड काहीतरी धुडगूस घालत बसतात .

आणि लई झालं आता . एकाच विषयावर किती धागे आलेत ओ . दुसरं कैतरी लिवा आता . इनोदी , भयकथा वगेरे

कपिलमुनी's picture

21 Aug 2015 - 2:47 pm | कपिलमुनी

हे कादंबरीकार महाशय म्हणतात की "प्रसंगी मराठे आईला विकायला कमी करत नसत"

यावरून बाबासाहेब पुरंदरेंना शिव्या घालणार्यांनी या अभंगावर कधी टिप्पणी केलेली आठवत नाही .

झविली महारे । त्याची व्याली असे पोरे ॥
करी संतांच मत्सर । कोपे उभारोनी कर ॥
बीज तैसे फळ । वरी आले अमंगळ ॥
तुका म्हणे ठावे । ऐसे झाले अनुभवे ॥

हा सारासार ब्रह्मणी कावा आहे. हा अभंग प्रक्षिप्त आहे. तुम्हाला कळत नाही का? बहुजन तुकोबा असे काही लिहिणे शक्यच नाही. तुकोबांना मारल्यावर त्यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी कोणीतरी हा अभंग त्यांच्या गाथेत घुसडला आहे.

अंतरा आनंद's picture

26 Aug 2015 - 12:19 pm | अंतरा आनंद

मुख्य मुद्द्यावर जे रणकंदन चाललंय ते चालू द्या. पण

Love marriage ला फक्त एकाच मुद्दा्यावर समर्थन करतो की Love marriage मध्ये मी ठामपणे आधीच सांगु शकेन की ती माझ्या आईची काळजी घेईल

याबद्द्ल ... हा दिव्य मुलगा "तिच्या आईची काळजी घेईन" असं ठामपणे सांगणार का?

पैसा's picture

26 Aug 2015 - 12:21 pm | पैसा

:D

प्यारे१'s picture

26 Aug 2015 - 12:45 pm | प्यारे१

तिच्या आईवर अवलंबून असावं.
-राजकुमार हेमामालिनी कमलाहासन पद्मिनी कोल्हापुरे चा कुठला रे तो चित्रपट??????

संजय पाटिल's picture

26 Aug 2015 - 4:28 pm | संजय पाटिल

पहेली का?

प्यारे१'s picture

26 Aug 2015 - 4:37 pm | प्यारे१

बहुतेक.
आईवर मुलगा आणि मुलीवर बाप प्रेम करतात आणि लग्न करतात. गुत्ताडा सगळा.