✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

१) एका खेळियाने - लिएंडर पेस

ज
जे.पी.मॉर्गन यांनी
Tue, 05/18/2010 - 20:00  ·  लेख
लेख

Book traversal links for १) एका खेळियाने - लिएंडर पेस

  • ‹ नवीन लेखमालिका - पह्यलं नमन !
  • Up
  • २) एका खेळियाने - जेसी जैसा कोई नहीं ! ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
38436 वाचन

💬 प्रतिसाद (44)

प्रतिक्रिया

जबरदस्त लेख

संदीप चित्रे
Tue, 05/18/2010 - 20:10 नवीन
लिएंडरबद्दल खूप चांगली माहिती मिळाली आणि त्याच्या कारकिर्दीचा आढावाही आवडला. पुलेशु मॉर्गन --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com
  • Log in or register to post comments

वाचतोय..

नरेश_
Tue, 05/18/2010 - 20:15 नवीन
क्रीडाविषयक लेखनात तुमचा हातखंडा आहे असे दिसते. पु.ले.शुभेच्छा ! इतरांनी खोटं बोललेलं मला मुळीच खपत नाही ;)
  • Log in or register to post comments

लै भारी ...

छोटा डॉन
Tue, 05/18/2010 - 20:22 नवीन
मॉर्गन , आपल्या किर्तीला जागलात तुम्ही. एकदम तुफान लेख झाला आहे ... पुढील लेखनास शुभेच्छा !!! लवकर येऊद्यात , वाट पहातो आहे ... अवांतर : आमच्या काही फर्माईशी : १. मेस्सी / ड्रोग्बा / रोनाल्डो / जॉन टेरी / पाब्लो माल्दिनी / लिजंडरी बेकहॅम २. मायकल फेल्प्स ३. शुमाकर / मास्सा / ओलेन्सो ४. विल्यम्स भगिनी ५. टायगर वुड्स ६. हुसैन बोल्ट / मॉरिस ग्रीन ------ छोटा डॉन आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता ! उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !
  • Log in or register to post comments

+ १

अनिल हटेला
Wed, 05/19/2010 - 23:11 नवीन
अजुन एक फरमाईश Image removed. स्टेफी ग्राफ :D बैलोबा चायनीजकर !!!उर्फ.. АНИЛ ХАТЕЛА :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

+१

भिडू
गुरुवार, 05/20/2010 - 07:27 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिल हटेला

मॉर्गन

Dhananjay Borgaonkar
Tue, 05/18/2010 - 20:27 नवीन
मॉर्गन साहेब याआधी मे पेस वर एवढा चांगला लेख आजिबात वाचला नव्हता. केवळ अप्रतिम =D> =D> पुढील लेखाची वाट बघतो आहे.
  • Log in or register to post comments

प्रस्तावन

गणपा
Tue, 05/18/2010 - 20:43 नवीन
प्रस्तावनेच्या लेखातच जोखल होत की ही मालीका साधी सुधी असणार नाही. आणि मॉर्गन आमच्या या विश्वासाला तुम्ही तडा नाही दिलात. एक सर्वांग सुंदर लेख वाचायला मिळाला. धन्यवाद. लिएंडर बद्दल वाचलेल्या लेखांवरील आजवरचा उत्कृष्ट लेख.
  • Log in or register to post comments

जबरा लेख

मेघवेडा
Tue, 05/18/2010 - 20:44 नवीन
जबरा लेख रे जेपी!! क ड क!! =D> =D> =D> ९८ साली पायलट पेन इंटरनॅशनल ओपन मध्ये, आयुष्यात पहिल्यांदाच पीट सॅम्प्रसविरुद्ध खेळताना या आपल्या पेसने सॅम्प्रसला ६-३, ६-४ अशी धूळ चारली होती ती घटना आठवली!! मस्त मस्त मस्तच!! सॅम्प्रस, शूमाकर, रॉसी, आर्मस्ट्राँग या दिग्गजांचा समावेश लेखमालेत असेलच अशी आशा आहे!! येऊ द्या!! -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
  • Log in or register to post comments

जे पी , लेख उत्तम झालाय...आवडला.

प्रभो
Tue, 05/18/2010 - 20:57 नवीन
जे पी , लेख उत्तम झालाय...आवडला. एक गोष्ट खटकली, ती खेळा खेळातली तुलना. शारिरीक दृष्ट्या चेस हा च्यालेंजींग नसेल पण तोही एक खेळच आहे, असे माझे मत आहे.आणी माझ्या मते सध्या भारताचे जेवढे अंतरराष्ट्रीय टेनीस खेळाडू (पहिल्या २५० मधे) नसतील तेवढे ग्रँडमास्टर्स आहेत... :) तुझ्यासारख्या एका सुंदर क्रिडालेखकाने हे Discrimination करू नये असे मला वाटते. (चु भु दे घे)
  • Log in or register to post comments

लॉक कर दिया ...

छोटा डॉन
Tue, 05/18/2010 - 21:03 नवीन
अरे प्रभ्या तुझे म्हणणे आता कळाले आहे ? पण म्हणुन हा प्रतिसाद किती वेळा एडिट करणार ? ;) असो, आता लॉक केला आहे, उगाच हुलिगन्ससारखे नको वागुस. अवांतर : कदाचित 'चेस' आणि 'सॉकर, क्रिकेट, हॉकी' यासारखे खेळ ह्यांची 'स्पोर्ट्स' ह्या एकाच गटात तुलना सुयोग्य नसावी असे मला वैयक्तिकरित्या वाटते. अर्थात सर्वांनाच पटतील अशी सुयोग्य कारणे देणे माझ्या अवाक्याबाहेरचे काम असले तरी ' शारिरीक क्षमता, क्षणाक्षणाला बदलणारी परिस्थिती, कमालीचे रिफेक्ल्सेस , विचार करायला अतिशय कमी संधी ( फुटबॉलमध्ये जेव्हा एखादा विंगर स्ट्रायकरकडे क्रॉस देतो तेव्हा त्याच्याकडे १ सेकंद सुद्ध नसतो विचार करायला, शिवाय समोर गोली आणि डिफेंडरचे कडे असतेच, ऑफसाईडचा धोका नेहमीचाच .. ) ' आदी बाबींमुळे ह्या इतर प्रकारांमध्ये चेसपेक्षा 'स्पोर्टिव्हनेस' जरा जास्तच असावा असे वाटते. असो. ------ छोटा डॉन आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता ! उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

>>अरे

प्रभो
Tue, 05/18/2010 - 21:12 नवीन
>>अरे प्रभ्या तुझे म्हणणे आता कळाले आहे ? '?' चे प्रायोजन समजले नाही. >>पण म्हणुन हा प्रतिसाद किती वेळा एडिट करणार ? Wink माझी वाक्यरचना चुकीची वाटत होती, म्हणून २ वेळा केला.. >>असो, आता लॉक केला आहे, उगाच हुलिगन्ससारखे नको वागुस. सही जवाब...क्रिकेट नंतर फुटबॉल हा आवडता 'स्पोर्ट' असल्याने थोडा परिणाम होणारच. >>अवांतर : कदाचित 'चेस' आणि 'सॉकर, क्रिकेट, हॉकी' यासारखे खेळ ह्यांची 'स्पोर्ट्स' ह्या एकाच गटात तुलना सुयोग्य नसावी असे मला वैयक्तिकरित्या वाटते. अर्थात सर्वांनाच पटतील अशी सुयोग्य कारणे देणे माझ्या अवाक्याबाहेरचे काम असले तरी ' शारिरीक क्षमता, क्षणाक्षणाला बदलणारी परिस्थिती, कमालीचे रिफेक्ल्सेस , विचार करायला अतिशय कमी संधी ( फुटबॉलमध्ये जेव्हा एखादा विंगर स्ट्रायकरकडे क्रॉस देतो तेव्हा त्याच्याकडे १ सेकंद सुद्ध नसतो विचार करायला, शिवाय समोर गोली आणि डिफेंडरचे कडे असतेच, ऑफसाईडचा धोका नेहमीचाच .. ) ' आदी बाबींमुळे ह्या इतर प्रकारांमध्ये चेसपेक्षा 'स्पोर्टिव्हनेस' जरा जास्तच असावा असे वाटते. असो.>> डॉनरावांशी बाडीस. अवांतरः विचार करून खेळ करणारा शत्रू हा समोरासमोर लढणार्‍या पेक्षा जास्त खरतरनाक असतो, असे माझे मत आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

+१ / असो.

छोटा डॉन
Tue, 05/18/2010 - 21:25 नवीन
>>'?' चे प्रायोजन समजले नाही. च्यायला, ते चुकुन पडले रे. आजकाल माझे जरा 'वय झाले असल्याने' अशा चुका होतात कधीकधी, माफी असावी. असो. >>अवांतरः विचार करून खेळ करणारा शत्रू हा समोरासमोर लढणार्‍या पेक्षा जास्त खरतरनाक असतो, असे माझे मत आहे... +१, हे ही मान्य, सहमत ! पण हे पण सापेक्ष आहे, एखादा भयंकर ताकद असलेला बलदंड खेडाळु समोर असेल तर त्याने अविचारानेही बेधडक मारलेली मुसंडीही घातक ठरते म्हणा. आता हेच पहा ना. अगदी सावध खे़ळ, मेन टु मॅन मार्किंग, सेंटर फॉर्वर्डला लॉक अशी 'विचार करुन खेळणारे' कोरियन्स जरी लै भारी असले तरी समोर धसमुसळा खेळ करणारे अर्जेंटिनावाले आले की कसा गेम होतो ते. अर्थात हे सर्व त्या त्या परिस्थितीवर अवलंबुन असते म्हणा :) ------ छोटा डॉन आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता ! उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

प्रभो, अरे

जे.पी.मॉर्गन
Wed, 05/19/2010 - 10:54 नवीन
प्रभो, अरे मी फक्त बुद्धिबळ हा "स्पोर्ट"च्या डेफिनेशनमध्ये बसत नाही इतकंच म्हटलं. मला व्यक्तिशः चेस मधलं विशेष काही कळत नसलं तरी चेस खेळणार्‍यांबद्दल मला अतीव आदरच आहे. तेव्हा डिस्क्रिमिनेशन चा माझा अजिबात उद्देश नाही. प्रत्येक खेळाची गरज वेगळी असते. अगदी टायसनला सुद्धा स्पिनरला सिक्स मारायला सांगितली तरी खूप प्रॅक्टिस करून देखील त्याला जमेलच असं नाही. खेळा-खेळात भेदभाव करण्यात अर्थ नाही. "क्रिकेट कसला खेळ लेको? फुटबॉलमध्ये बघा कसं दीड तासात घामटं निघतं" म्हणण्यात काही हशील नाही. क्रिकेट तुम्हाला कोणी १.५ तास खेळायला सांगत नाही. पाच दिवस जे काँसन्ट्रेशन आणि जी चिकाटी क्रिकेटमध्ये लागते ती फुटबॉलमध्ये लागते का? अगदी कॅरम किंवा ब्रिज सारखे बैठे खेळ खेळणार्‍यांबद्दल देखील मी हेच म्हणीन. पण माझ्या मनात अजिबात डिस्क्रिमिनेशन नव्हतं. तसं ध्वनित होत असल्यास क्षमस्व! :-) जे पी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

उत्तम

मदनबाण
Tue, 05/18/2010 - 21:00 नवीन
उत्तम माहिती,सुंदर लेख... :) मदनबाण..... “control oil and you control nations; control food and you control the people”. Henry Kissinger
  • Log in or register to post comments

अपेक्षांना जागणारी सुरूवात

बहुगुणी
Tue, 05/18/2010 - 21:16 नवीन
'एका खेळीयाने' चं पहिलं पुष्प आवडलं! सुरूवात करायला भारतीय लिअँडर पेस निवडलात हेही छानच. आता पुढील भागात बिलियर्ड्स मध्ये अशीच देशव्यापी आपलेपणाची भावना निर्माण करणारा, आणि तब्बल आठ world titles जिंकणारा गीत सेठी याच्याविषयीही तुमच्या खास शैलीत वाचायला आवडेल. जाता जाता: गीत सेठी ने लिअँडर पेस च्या 'ऑलिंपिक मोमेन्ट' विषयी इथे केलेली टिप्पणी प्रासंगिक आहे. http://www.tubaah.com/embed.php?video_id=33916 आणि हो- तुमच्या लिखाणाचं संकलन करून उत्तम पुस्तक होईल हे बर्‍याच जणांनी या आधी सांगितलंच आहे, तेंव्हा प्रकाशनाचं जरा मनावर घ्या!
  • Log in or register to post comments

+१

मुक्तसुनीत
Tue, 05/18/2010 - 21:21 नवीन
हेच म्हणतो. प्रेरणादायी लिखाण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

+२

सहज
Wed, 05/19/2010 - 07:34 नवीन
आणि हो- तुमच्या लिखाणाचं संकलन करून उत्तम पुस्तक होईल हे बर्‍याच जणांनी या आधी सांगितलंच आहे, तेंव्हा प्रकाशनाचं जरा मनावर घ्या हेच म्हणतो. प्रेरणादायी लिखाण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

अहाहा...

भारद्वाज
Tue, 05/18/2010 - 23:12 नवीन
अहाहा....पुढे अजून काय काय पर्वणी आहे हे या पहिल्या लेखवरूनच लक्षात आले आहे. मस्त मस्त मस्त मस्त.
  • Log in or register to post comments

एस लेख

बेसनलाडू
Tue, 05/18/2010 - 23:19 नवीन
एस पेस सारखाच हा एस लेख लिहून लेखमालेची उत्तम सुरुवात केली आहेत. पुढील लेख वाचण्याची उत्सुकता खूप वाढली आहे. (क्रीडोत्सुक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

सुरवात

ऋषिकेश
Tue, 05/18/2010 - 23:35 नवीन
सुरवात उत्तम आता पुढील लेखांत तुलनेने अनोळखी परंतु निष्णात खेळियांची माहिती मिळेल अशी अपेक्षा करतो. ऋषिकेश ------------------ इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.
  • Log in or register to post comments

मस्त लेख.

राघव
Tue, 05/18/2010 - 23:37 नवीन
खूप आवडले. पुढल्या लेखाची वाट बघतोय :) राघव
  • Log in or register to post comments

वाचत आहे.

स्वाती२
Wed, 05/19/2010 - 03:49 नवीन
वाचत आहे.
  • Log in or register to post comments

मस्त झाला

सनविवि
Wed, 05/19/2010 - 11:02 नवीन
मस्त झाला आहे लेख. पुढचा भाग भूपती वर लिहावा अशी फर्माईश!
  • Log in or register to post comments

वा वा

निखिल देशपांडे
Wed, 05/19/2010 - 11:10 नवीन
वा वा मॉर्गन साहेब जोरदार सुरवात पेस पासुन सुरवात कराल असे वाटलेच नव्हते. आणि ईतका डीटेल्ल लेख वाचुन जाम मजा आली... काही काही वाक्ये तर जुन्या आठवणी जागा करुन गेल्या....
....... आणि प्रत्येक भारतीय क्रीडा षौकीनाच्या मनात घर करून राहिलेली पेस-भूपतिची "चेस्ट-थंप" !!!!
येस... हे कसे विसरणार???? बाकी पेस च्या डेविस कप मधल्या खेळा बद्दल तर बोलुच नये... डेविस कप मधे गोरान ईवान्सेविक ला भारतात हरवलेली मॅच आठवली. डेविस कप मधे खेळताना पेस च्या तीनही मॅचेस म्हणसे सिंगल्स, ड्बल्स आणि रिवर्स सिंगल्स असो याकडे नक्कीच नजर लावुन असायचो..
हा तुम्ही विल्यम्स भगिनी असलात तर गोष्ट वेगळी ! निवांतपणे ग्रँडस्लॅमचं डबल्स टायटल जिंकतात आणि पुन्हा सिंगल्सच्या फायनल मध्ये बहिणी-बहिणी समोरासमोर उभ्या! आमचा फेडरर बिचारा नाजुक दिसतो दोघींपुढे !
=)) =)) =)) =)) =)) हे वाक्य जामच आवडले... खरे आहे विल्यम्स भगीनींनी वुमन्स टेनिसचा गेम बदलुन टाकलाय. निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
  • Log in or register to post comments

विल्यम्स भगीनी...

मनिष
Wed, 05/19/2010 - 11:24 नवीन
विल्यम्स भगीनींना वुमेन्स/मेन्स अशा कॅटॅगरीत टाकण्याऐवजी त्यांच्यासाठी एखादी वेगळी कॅटेगरी निर्माण करावी असे वाटते! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निखिल देशपांडे

बाकीच्या गोर्‍या

जे.पी.मॉर्गन
Wed, 05/19/2010 - 12:24 नवीन
बाकीच्या गोर्‍या आणि दिसायला चांगल्या असतात म्हणून... पण त्यांची सुद्धा उंची विल्यम्स भगिनींपेक्षा कमी नसते ! अगदी त्यांच्यासारखे "पिळदार बाहू" नसले तरी अ‍ॅमेली मॉरेस्मो, डिमेंटियेवा वगैरे सुद्धा काही कमी नाहीत :)) जे पी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिष

पिळदार बाहू वगैरे

बेसनलाडू
Wed, 05/19/2010 - 22:58 नवीन
अगदी त्यांच्यासारखे "पिळदार बाहू" नसले तरी अ‍ॅमेली मॉरेस्मो, डिमेंटियेवा वगैरे सुद्धा काही कमी नाहीत झालंच तर लिन्ड्झी डेवनपोर्ट, मेरी पिअर्स, अरांता सॅन्चेझ विकारिओ वगैरे :) (स्मरणशील)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जे.पी.मॉर्गन

छान लेख.

llपुण्याचे पेशवेll
Wed, 05/19/2010 - 11:34 नवीन
छान लेख. लिअँडरचे डेव्हीसचे रेकॉर्ड मला माहीत नव्हते. खरोखरच नेत्रदीपक आहे रेकॉर्ड. असे ११ लिएंडर मिळाले ना तर आपण केवळ त्यांच्या देशभक्तीच्या आणि इच्छाशक्तीच्या जोरावर फुटबॉलचा वर्ल्डकप देखील जिंकून सहमत सहमत सहमत. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Phoenix
  • Log in or register to post comments

अप्रतिम

सुमीत भातखंडे
Wed, 05/19/2010 - 11:57 नवीन
अप्रतिम लेख =D>
  • Log in or register to post comments

वा.. वा..

ज्ञानेश...
Wed, 05/19/2010 - 13:35 नवीन
मॉर्गनराव, "दिल खुश" करणारे लेख असतात तुमचे ! मला तर वाटतं की भारतीय क्रिकेट संघात १३वा खेळाडू म्हणून लिएंडरला प्रत्येक दौर्‍यावर घ्यावं.... भारतासाठी खेळणं काय असतं हे बाकीच्यांना त्याच्याकडे बघून समजेल या वाक्याशी हजार वेळा सहमत !
  • Log in or register to post comments

अप्रतिम

झकासराव
Wed, 05/19/2010 - 14:14 नवीन
अप्रतिम लेख :) ओलिम्पिकमध्ये कास्यपदक जिंकल्यानंतर जेव्हा राष्ट्रगीत वाजत होत तेव्हा भावनाविवश झालेला पेस मलाहि धुसर धुसर दिसत होता. लेखमाला भारी रंगणार :)
  • Log in or register to post comments

व्वा !! आता

टारझन
Wed, 05/19/2010 - 23:34 नवीन
व्वा !! आता टेणिसपटु दिया मिर्झावर सुद्धा एक विस्ट्रुत लेख येऊन्स द्या साहेब .. :) - टि पी टार्झन
  • Log in or register to post comments

दिया की सानिया?

बेसनलाडू
Wed, 05/19/2010 - 23:40 नवीन
दिया ही आमची "वन ऑफ द" लाडकी (अभिनेत्री) आहे. ती टेनिसपटू कधी बरे झाली? (दिवाप्रेमी)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

उत्तम

नंदन
गुरुवार, 05/20/2010 - 07:57 नवीन
लेख. पेसच्या 'प्रयत्ने वाळूचे...' अशा जिगरबाज खेळाच्या शैलीचं हे एक छोटेखानी उदाहरण.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

अ श क्य !

जे.पी.मॉर्गन
गुरुवार, 05/20/2010 - 10:37 नवीन
काय शॉट आहे रे नंदन !!!! दूर जाणारा आणि मागे गेलेला आणि त्यात बॅकहँड. खरं आहे... असे "क्रेझी" फटके पेसच मारू जाणे ! जे पी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

मालक,

टुकुल
गुरुवार, 05/20/2010 - 12:23 नवीन
मालक, तुम्ही लिहित रहा आणी आम्ही फक्त मंत्रमुग्ध होवुन वाचत राहतो. पेस बद्दल एवढा चांगला लेख आधी कधी वाचला नव्हता. --टुकुल
  • Log in or register to post comments

परवा लिएंडर पेस १६व्यांदा

श्रीरंग
Wed, 07/15/2015 - 01:04 नवीन
परवा लिएंडर पेस १६व्यांदा ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकला, आणी या अतीशय सुंदर लेखाची आठवण आली. १९९० साली जेव्हा फेडरर आणी जोकोविचचे प्रशिक्षक विंबल्डनच्या अंतिम फेरीत खेळत होते, तेव्हा पेसनी आपला पहिला वहिला विंबल्डन किताब (जुनीयर) जिंकला. खरोखर, भारतातील आजवरचा सर्वश्रेष्ठ खेळाडू.
  • Log in or register to post comments

दिल से

अमोल मेंढे
Wed, 07/15/2015 - 10:28 नवीन
भारतीय क्रिकेट संघात १३वा खेळाडू म्हणून लिएंडरला प्रत्येक दौर्‍यावर घ्यावं.... भारतासाठी खेळणं काय असतं हे बाकीच्यांना त्याच्याकडे बघून समजेल !
१००% सहमत
  • Log in or register to post comments

आठवण

सिरुसेरि
Wed, 07/15/2015 - 15:49 नवीन
अभ्यासपुर्ण लेख . यावरुन सहज जिम कुरिअर या टेनीसपटूची आठवण झाली . त्याचा टेनीसविश्वात झालेला उदय , अचानक बरीच विजेतेपदे मिळवणे व तसेच लुप्त होणेही अचानक .
  • Log in or register to post comments

माझ्या एका अतिशय आवडत्या

अभिजीत अवलिया
Wed, 07/15/2015 - 16:13 नवीन
माझ्या एका अतिशय आवडत्या खेळाडूची माहिती देणारा इतका उत्तम लेख लिहिल्याबद्दल अतिशय आभार.
  • Log in or register to post comments

परत वाचला

मी-सौरभ
Wed, 07/15/2015 - 19:00 नवीन
आवडेश...
  • Log in or register to post comments

अप्रतिम लेख :)

अविनाश पांढरकर
गुरुवार, 07/16/2015 - 04:35 नवीन
पेस बद्दल एवढा चांगला लेख आधी कधी वाचला नव्हता
  • Log in or register to post comments

उत्तम लेख

श्रीरंग_जोशी
गुरुवार, 07/16/2015 - 05:16 नवीन
मी लिएंडरबाबत मराठीत वाचलेल्या सर्वोत्तम लेखांपैकी एक. विम्बल्डनच्या नव्या विजेतेपदासाठी लिएंडरचे अभिनंदन.
  • Log in or register to post comments

अप्रतिम लेख!

चतुरंग
गुरुवार, 07/16/2015 - 06:08 नवीन
हा वाचायचा राहूनच गेला होता. खोदकामाबद्दल धन्यवाद! जेपी तुम्ही ही मालिका पुढे चालू ठेवा राव, फार उत्कंठावर्धक लिहिता. (विशीचा डायहार्ड फॅन असल्याने 'चेस हा स्पोर्ट नाही' असे वाचून काळजात कळ उठली पण तुमच्या लेखासाठी तुम्हाला एकडाव माफी! :) ) -चतुरंग
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा