✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

पॅरिस मधली चीनी झुंड - एक अनुभव !

अ
अत्रन्गि पाउस यांनी
Sun, 05/24/2015 - 03:48  ·  लेख
लेख
सध्या मुक्काम पॅरिस मध्ये एका ४ तारांकित हाटेलात ...जिथे राहतोय तिथे परवा एक मोठ्ठी बस भरून चीनी जोडपी एकूण ४०-५० लोक आले ... निर्विकार चेहेर्याने चीनी भाषेत कलकल करत सगळे चेकीन करून आपापल्या खोल्यात गेले ... दुसऱ्या दिवशी ब्रेकफास्ट ला गेलो तर ..हे संपलेले ते संपलेले ..वैतागून जे होते ते कसे बसे थोडेसे खाऊन ऑफिस ला जातांना तिथल्या व्यवस्थापिकेला कुरकुर केली कि बाकीचे ठीक आहे पण क्रोसेंत संपू कसे शकतात ...तर ती खजील होऊन माफी मागू लागली आणि म्हणाली कि आमचे इतके मोठे हॉटेल आहे कि आम्ही नेहेमी पुरेसा साठा ठेवतो पण ह्या चीनी झुंडीने (झुंडीने हा माझा शब्द ) इतके अपरिमित खाल्ले कि आम्ही पुरे पडू शकलो नाही ... उद्या आम्ही अजून काळजी घेऊ ... आजच्या ब्रेकफास्ट चे पैसे सुद्धा परत करू .. ह्या अनुभवावर आज सकाळी गेलो तर ती चीनी झुंड खातांना बघायला मिळाली ... दुष्काळातून आल्या सारखे तुटून पडत होते ...अर्धा तास सगळा ब्रेकफास्ट हॉल काबीज केलेला ...आम्ही ३ जण वाट बघतोय रिकामे टेबल मिळण्याची आणि तुटपुंजे गोरे कस्टमर्स भेदरल्या सारखे वावरताहेत खातांना ... आमचा नंबर आला...आम्ही बसलो व ब्रेकफास्ट सुरु करतोय तेवढ्यात २ टेबले पलीकडल्या चीनी कुटुंबातली एक बाई आली आणि आमच्या टेबल वरचा एक एक्स्ट्रा कप बशी व ग्लास सरळ उचलून चालायला लागली ...म्हटले ..असू देत नैतरी आम्ही ३ जणच होतो ... माझ्या समोरचा माझा कलीग काही घ्यायला उठला ..तितक्यात त्याच कुटुंबातला एक चीनी पुरुष उठून पुन्हा आमच्या टेबल पाशी आला आणि त्या कलीगचा पेपर टिश्यू घेऊन जायला लागला .. काय होतंय मला क्षणभर कळेच ना ...पण मग लक्षात आल्यावर मी जवळ जवळ ओरडलोच ...कि हे काय चाललंय ..ठेवा तो टिश्यू जागे वर ..त्यावर अत्यंत मक्ख पणे त्याने तो पुन्हा ठेवला ...माझे तिरकस टोमणे ..इंग्लिश काळात नाहीये असा आव आणत पुन्हा जागेवर जाऊन बसला ... पण केवळ मोठी झुंड आणि बहुधा कमालीचा एकोपा असलेली अशी घेऊन जगभर दादागिरी दाखवणे हे आता चीनी सामान्य माणूसही करू लागलाय कि काय अशी शंका यावी असा हा अनुभव .. आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वीकारले गेलेले वागण्या बोलण्याचे प्रचलित संकेत बेदरकार पणे धुडकावून लाऊन पुन्हा आपण त्या गावचेच नव्हे हे असे दाखवणे ह्याने तो हॉटेल स्टाफ सुद्धा वैतागला होता ... हे असे जर हे सामान्य लोक्स वागत असतील तर वरिष्ठ पातळीवरचे राजकारणी मुत्सद्दी किती कोडगे आणि स्वार्थी असतील असा विचार आला ... ह्यांना कसे हाताळले पाहिजे ??
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
14138 वाचन

💬 प्रतिसाद (62)

प्रतिक्रिया

रांगेत उभे राहणे हा उत्तर

नगरीनिरंजन
Mon, 05/25/2015 - 04:02 नवीन
रांगेत उभे राहणे हा उत्तर भारतीयांना अपमान वाटतो असे वाटते. इथेही आले की सतत रांग तोडून पुढे घुसायचा प्रयत्न असतो. किंबहुना रांग लागलेली आहे ते त्यांना दिसतच नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप

अगदी मान्य. आणि रांगेत उभे

खटपट्या
Mon, 05/25/2015 - 08:15 नवीन
अगदी मान्य. आणि रांगेत उभे राहील्यावर अंगाला खेटायची काहीही गरज नसताना लोकल ट्रेनमधे उभे राहील्यासारखे उभे राहतात. लय राग येतो अश्या लोकांचा. आणि आपण जर मधे थोडी जागा सोडून उभे राहीलो तर मधेच येउन उभे राहणारे महाभागही आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

दुसर्याच्या त्तेबला वरील वस्तू उचलणे

सांगलीचा भडंग
Mon, 05/25/2015 - 02:37 नवीन
दुसर्याच्या त्तेबला वरील वस्तू उचलणे चुकीचेच आहे पण बाकीचे मुद्दे बघितले कि सरसाकटीकरण करून चीनी लोकांना झोडपले आहे असे वाटत आहे . चीनी लोक दुश्मन आहेत भारतीयांचे पण उगाच झोडपणे बरे नव्हे ( हलकेच घ्या ) वरील कुठल्यातरी प्रतिसादामध्ये हॉटेल ची पण चूक असेल त्यांना अनुभव नसेल हा तो मुद्दा मांडला आहे तो जास्त बरोबर वाटतो
  • Log in or register to post comments

असाच अजुन एक त्रास आहे तो

सर्वसामान्य
Mon, 05/25/2015 - 07:37 नवीन
असाच अजुन एक त्रास आहे तो मत्स्यालयतल्या प्रत्येक माशाबरोबर आपला फोटो आलाच पहिजे अश्या लोकांचा. यात चिन्यांबरोबर भारतीय पण आले.
  • Log in or register to post comments

आशियायी लोक

राही
Mon, 05/25/2015 - 12:58 नवीन
बहुतेक सर्व आशियायी देशांचे नागरिक बाहेर शिस्तीत वागतात, अगदी पाकिस्तानीसुद्धा ; अपवाद फक्त भारत, चीन, बांगलादेश आणि थोडाफार कोरियन लोकांचा असे आमच्या मर्यादित परदेश प्रवासात जाणवले. भारतीय लोक तर विमानात चढतानाच्या क्षणापासूनच बेशिस्त वर्तन सुरू करतात. खरे तर आसनक्रमांक पुकारले जात असताना त्याप्रमाणे रांगेत पुढे सरकले तर सगळ्यांचा त्रास वाचतो. पण नाही. त्यात मोठमोठ्याने बोलणे. त्यामुळे कोणते क्रमांक पुकारले जात आहेत तेही ऐकू येत नाही. विमानात भारतीय अधिक प्रमाणात असले तर रेस्ट-रूमची अवस्था भयानक असते. जेवण झाल्यावर उरलेले अन्न आणि ट्रे कर्मचारी येण्याची वाट न बघता खुर्चीखाली दडपलेले मी पाहिले आहे. तसेच हॉटेल्समध्ये जेवण वाढून घेताना प्रचंड घाई, गडबड, सांडलवंड असते. कित्येक लोक जेवण ठेवलेल्या ठिकाणीच उभ्या उभ्या खायला सुरुवात करतात कारण टेबलावर बसले तर अन्न पुन्हा आणण्यासाठी काऊंटरपर्यंत चालावे लागते म्हणून. अन्नाच्या प्रत्येक प्रकाराशेजारी एका छोट्या प्लेटमध्ये तो पदार्थ वाढून घेण्यासाठी योग्य चमचा/चिमटा ठेवलेला असतो. पण कित्येक लोक एका पदार्थाचा चमचा दुसर्‍या पदार्थाला वापरतात. मग कधी कधी चमचे प्लेटमध्ये न राहाता एकाच भांड्यात दोन दोन होतात. एकदा तर प्लेटमध्ये चमचा न दिसल्याने त्या प्लेटनेच भाताचा एक प्रकार उपसून घेतलेला आणि प्लेट भांड्यात तशीच ठेवलेली पाहिली आहे. हॉटेलमध्ये दूधभुकटी-चहा-साखरेच्याया पुड्या, साबण, शाम्पू, क्लेन्सिंग मिल्क, टिश्यूज़, अगदी टॉय्लेट-रोल्स सुद्धा पळवतात. ह्या रोल्सचा आपणा भारतीयांना काय उपयोग, तर म्हणे पाणी वापरल्यानंतर हात कोरडे करायला उपयोगी पडतात! आणि यावर एका मारवाडी गृहस्थांचे लॉजिक असे की आपण इतके पैसे देतो तर त्याच्यात हे सर्व समाविष्टच असते. हॉटेल सोडताना खोलीची दैना झालेली असते. बाथरूममध्ये, वॉश-बेसिनवर पाणी पसरलेले, शॉवरच्या खोलीतून पाण्याचे लोट बाहेर येत असलेले, वगैरे. ओले बाथ टॉवल्स बेडवर पसरलेले तर नेहमीचेच. आणि कोणीही चादरी, ब्लँकेट्स वगैरे घडी करून ठेवीत नाही. खरे तर हे आपल्याच फायद्याचे, कारण फोन घड्याळ अशी एखादी वस्तू अंथरुणात राहिली तर तिथेच लक्षात येते. पण वृत्ती अशी की हे काम तर स्टाफचे. त्यांना त्यासाठी पगार मिळतो, ते आपण कशाला करायचे? कितीतरी किस्से आहेत. बोट-राइड असेल तर ती संपल्यावर धक्क्यापाशी सर्वांनी एकदम उठून होडीतून बाहेर पडण्याच्या पॉइंटपाशी गर्दी करायची. रस्त्यावर चालताना आपल्याच नादात इतरांची फिकीर न करता चालायचे, कुठल्याही रांगेमध्ये पुढच्याला अगदी खेटून उभे राहायचे, मध्येच एखादा भारतीय माणूस रांग सोडून दीडफूटभर बाहेर उभा राहातो आणि त्याच्या मागचे जर भारतीय असतील तर तेही त्याच्यामागे तशीच वाकडी रांग लावतात. न्यू यॉर्कच्या भुयारी रेल्वेत भारतीय लोक धक्काबुक्की करतात किंवा आडदांडपणे घुसतात-उतरतात. लिफ्टमध्ये शिरताना, बाहेर पडतानाही तसेच. सरकत्या जिन्यावर एका बाजूने काही लोक पायर्‍या चढून वर जाणारे असतात त्यांच्यासाठी ती जागा मोकळी असते. पण भारतीय माणसे तिथे उभी असतात. आपल्यामागे माणसे खोळंबली आहेत हे त्यांच्या गावीही नसते.असो. लिहिण्यासारखे खूप आहे.
  • Log in or register to post comments

अगदी बरोबर

अत्रन्गि पाउस
Tue, 05/26/2015 - 01:28 नवीन
कुठलीही गोष्ट कुठल्याहि मार्गाने का होईना पण 'वसूल' झालीच पाहिजे हि वृत्ती फार चमत्कारिक आहे ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही

रच्याकने ने पाच अमेरिकन जेवढे

माझीही शॅम्पेन
Wed, 05/27/2015 - 13:47 नवीन
रच्याकने ने पाच अमेरिकन जेवढे सफाईदार पणे खातात तेवढे दहा चायनीज लोक अ-सफाईदार पणे खाउ शकत नाहीत असो पण माझा ही एक रिओ मधील विमान-तळावर असाच भयानक अनुभव आहे , त्याबद्दल नंतर कधीतरी
  • Log in or register to post comments

सांगा हो

काळा पहाड
Wed, 05/27/2015 - 14:32 नवीन
सांगा हो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माझीही शॅम्पेन

सगळ्याच बाबतीत अमेरिकन

नगरीनिरंजन
Wed, 05/27/2015 - 17:41 नवीन
सगळ्याच बाबतीत अमेरिकन लोकांची वखवख खूप जास्त आहे. किस्सा जरुर सांगावा ही विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माझीही शॅम्पेन

अगदि अगदि खरय हे चिनी लोक

इशा१२३
Wed, 05/27/2015 - 14:54 नवीन
अगदि अगदि खरय हे चिनी लोक भयंकर उच्छाद आणतात अनेक अनुभव घेतलेत.सगळ्यात त्रासदायक प्रकार त्यांचे फोटो प्रेम.वर मधुरा म्हणालीये तस वाट्टेल तसे अन वाट्टेल तेवढे बेशिस्तपणे फोटो काढणे. तीन वर्षांपुर्वी आग्रा किल्ल्याला भेट दिली होती त्यावेळेस हा अनुभव फारच आला.प्रत्येक ठिकाणचे फोटो काढत होते हे लोक.हे एवढ्या मोठ्या लेन्स असलेले कॅमेरे आणि आजुबाजुला कोणी आहे तेहि फोटो काढताहेत याचे जराहि भान ठेवत न्हवते.आधी त्या ठिकाणाचा फोटो,मग स्वःता उभे राहुन,मग जोडिदाराचा,मोबाइलने,सेल्फि सगळे होईपर्यंत आपण वाट पाहायची अर्थात तिथेहि उत्तर भारतीय मधे घुसुन फोटो काढणारच.१०-१२ जण होते पण वैताग आणला होता.मुलहि कंटाळली.पण तरी थोडक्यात निभावले म्हणायचे कारण किल्ला बघुन बाहेर पडताना परत ५०-६० लोकांचा एक मोठ्ठा चिनी जथ्था पाहिला आणि आम्हि एकमेकांकडे बघुन सुटल्याचा भाव चेहर्यावर पाहिला. तिच स्थिती परदेशातहि अनुभवलीये.खाण्यावर तुटुन पडणे.कोणाचीहि पर्वा न करता वागणे.वाईट्ट. पण वाईट याचे वाटते कि बेशिस्त वागण्याचे,परदेशात(देशातहि)लाज वाटेल असे वागणे.टुर लिडरचे न ऐकणे,सार्वजनिक टॉयलेटमधे रांग मोडुन घुसणे हे प्रकार आपले देशबाधव,भगिनीहि करतात.कुणाला नाव ठेवायची?
  • Log in or register to post comments

रांग मोडण्याचे अनुभव तर जौ दे

रेवती
Wed, 05/27/2015 - 18:46 नवीन
रांग मोडण्याचे अनुभव तर जौ दे! किती सांगायचे! आम्ही काय मूर्ख म्हणून उभे आहोत का इथे? तर हो, तुम्ही मूर्ख आहात म्हणूनच रांगेत आहात, शहाणे असता तर कधीच स्पेश्शल नंबर मिळाला असता ना! रांग मोडण्यात सिनियर शिट्टीजन बरेच असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इशा१२३

व्वा!

प्रदीप
गुरुवार, 05/28/2015 - 09:25 नवीन
आपण बहुधा अभारतीय दिसता, तरीही मराठी संस्कृति व भाषा प्रेमापोटी शिकून इथे मराठीतून लिहीत आहात. अथवा, आपण मूळच्या भारतीय व मराठी आहात (ethnic Indian) पण परदेशातच जन्मलेल्या व वाढलेल्या. म्हणजे, आपण भारतात कधीही आला नसाव्यात, तिथल्या वागणूकीचा आपण कधीही अनुभव घेतला नसावात असे दिसते. पण एक भारतीय म्हणून, तिथल्या समाजात अनेक पावसाळे काढलेला, आता गेली काही दशके परदेशात असलेला तरीही नित्यनेमाने भारतात जाऊन तेथील अनुभव घेत असलेला म्हणून मी सांगू इच्छितो की आम्ही भारतीय रांगा मोडणे हे अगदी अंगवळणी पडलेले, किंबहुना रांग ही संकल्पना (म्हणजे concept) अजिबात माहित नसलेले आहोत. अलिकडेच WeChat ह्या सुप्रसिद्ध चिनी साईटीवरील एका फोरममधे चिनी लोक, भारतीयांबद्दल, इथे आपण त्यांच्याबद्दल करताहात, तीच नेमकी तक्रार करत होते. तेव्हा मी त्यांना ठणकावून सांगितले की 'दुसर्‍याच्या डोळ्यातील कुसळ पहाण्याच्या अगोदर, स्वतःच्या डोळ्यातील मुसळ पहा, भाईयों!'
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
  • «
  • ‹
  • 1
  • 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

नवीन सदस्य

  • सदस्य: Ramgude Prakas…
    नोंदणी: Sun, 03/22/2026 - 16:44
  • सदस्य: kalash११
    नोंदणी: Sat, 03/21/2026 - 23:00
  • सदस्य: newexploring2020
    नोंदणी: Sat, 03/21/2026 - 22:15
  • सदस्य: अकोलेकर
    नोंदणी: Sat, 03/21/2026 - 18:00
  • सदस्य: राजा स्वामी
    नोंदणी: Sat, 03/21/2026 - 12:15
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा