पुणे विमानतळाजवळील लोहगाव आता ग्रामीण चेहरामोहरा बदलून काँक्रीटचे जंगल होऊ घातले आहे. सद्ध्या जो काही निसर्ग आणि ग्रामीण भाग शिल्लक आहे, तो मी रेखाटला आहे.
गुहागर बिच..
घरातील खिडकीतून...
बाजारात वॉटर कलर पेन्सिल मिळतात. आधी कोरड्या पेन्सिलले रंगवायचे आणि त्यानंतर ब्रश पाण्यात बुडवून रंग हवा तिथे पसरवायचा. रेग्युलर वॉटर पेंटींगपेक्षा वॉटर कलर पेन्सिल वापरून पेंटींग करणे सोपे आहे.
रेग्युलर वॉटर पेंटींगपेक्षा वॉटर कलर पेन्सिल वापरून पेंटींग करणे सोपे आहे.
हायला, हे माहीत नव्हतं. ही आयडीया मस्त आहे. वापरून बघायला पाहीजे. धन्स हो देवानू.
व्वा. अतिशय आवडली चित्रे. खरेतर तुमच्या मधुबाला वगैरेंच्या चित्रांपेक्षा ही खूप सरस आहेत.
एक सल्ला: घरे, भिंती, झाडे आणि जमीन यांच्या मधली रेखा जास्त ठळक रेखाटू नये, म्हणजे जमीन आणि त्यातून उगवलेली झाडे वा त्यावर बांधलेली घरे, भिंती यातील दुरावा नष्ट होतो, आणि चित्रात एक प्रकारची समरसता येते.
या माध्यमात David Gentleman याची अतिशय सुरेख चित्रे असलेली पुस्तके उपलब्ध आहेत. ती जरूर बघावीत.
डेव्हिड जंटलमन यांचे एक चित्रः
तुम्ही वापरलेल्या माध्यमातील एक चित्र (कुणाचे आहे, ठाऊक नाही, कॉपीराईटेड आहे वाटते, तरी देतो आहे)
पुढील चित्रांसाठी शुभेच्छा.
तुम्ही सुचविलेल्या सुचनांमुळे नक्कीच सुधारणा होईल. पुढील चित्रांमध्ये अमलात आणण्याचा प्रयत्न करेन.
David Gentleman यांची चित्रे सुंदर दिसताहेत. तसेच तुम्ही दाखवलेले दुसरे चित्र अप्रतिम आहे.
पुन्हा एकदा आपणास धन्यवाद.
चित्रे फारच आवडली.फोटोग्राफीपेक्षाही चित्रमाध्यम फार प्रभावी असते याचे उदाहरण."मला असे दिसले"हे पोहोचले.तो डोंगर आणि त्यावरचे देऊळ तुमच्या मनात लहानपणापासून नाते बनून राहिले आहे का?फोटोसारखी चित्रे यावीत अशी खटपट केली नाहीत हे मनास भावले.
डोंगर आणि त्यावरचे देऊळ तुमच्या मनात लहानपणापासून नाते बनून राहिले आहे का
तुम्ही बरोबर ओळखलेत. डोंगरावर लांबून दिसणारे देऊळ मला लहानपणापासून आकर्षक वाटत आले आहे.
उपयुक्त सुचना आहे. टेकडीची आउटलाईन लाईट असती तर वर चित्रगुप्त साहेबांनी सुचविल्याप्रमाणे चित्रात अजून समरसता आली असती.टेकडी आणि आकाश एकमेकांत मिसळून गेले असते.
अशाच उप्युक्त सुचना येऊ द्यात. जाणकारांच्या प्रतिक्रियांमुळे आपण कुठे चुकतो आणि कुठे सुधारणा करू शकतो याची कल्पना येते. धन्यवाद.
सगळीच चित्रे अतिशय सुंदर व अप्रतिम !
तिसरे रंगरेखाटन विशेष आवडले.
पिसारलेले झाड, कौलारू बैठी घरे, त्यांच्या लालसर झालेल्या भिंती, कुंपणाचे दगड हे सर्व खासच !
अशी अप्रतिम चित्रे " चांदोबा" मध्ये पहायचो, त्याची आठवण झाली.
रेषाचित्रान्मध्ये उन्हाचा आभास सुंदर आहे.
कथा, कादंबरी अथवा दिवाळी अंकासाठी तुमची चित्रे चपखल आहेत.
तुमच्या सारख्या कलाकारान्मुळे मिपा चे कलादालन समृध्द होतेय !
तुमच्या प्रतिसादावरून असे दिसतेय की तुम्ही मुरलेले चित्रकार असावेत.
मिपा चे कलादालन समृध्द होण्यासाठी आपला पण हातभार लागला तर आनंदच आहे.
आम्हाला पण दाखवा ना तुमचे कौशल्य.
सर्व चित्र मस्त आहेत एकदम.. कित्येक वेळ बघत होतो फक्त... मस्तच..
तिसर्या चित्रातील वाहणार्या वार्याच्या फील खुप आवडला..
तरीही सर्वच सुंदर.. पुन्हा पुन्हा पहावी अशी..
एक काय चिक्कार चहा पाजीन .. मल पण द्या की फ्रेम करायला चित्र
चित्रे रेखाटण्यातील कलेचा गंध नाही. पण पाहायला नक्कीच आवडतात.
वरील सर्व चित्रे आवडली पण का कोण जाणे थेट काळजाला भिडली नाही. का ते सांगता येत नाही आणि माझा तो अधिकारही नाही. पण श्री. चित्रगुप्त ह्यांनी दिलेले सल्ले वाचता वाटले कदाचित तेच कारण असावे. असो.
तुमच्या हाती नक्कीच कला आहे. चित्रगुप्त साहेबांसारखे मार्गदर्शक लाभले तर त्या कलेचे चिज होईल ह्यात तिळमात्र शंका नाही.
प्रतिक्रिया
सुरेख... :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Internet of Things The Internet of Things Is Far Bigger Than Anyone Realizes { Part 1} The Internet of Things Is Far Bigger Than Anyone Realizes { Part 2} What does Verizon's AOL buy have to do with the internet of things? Samsung takes another step into Internet of Things Samsung's Artik platform aims to jump-start the Internet of Thingsमस्त
छान! रंगीत चित्रांचं मिडीयम
मेडीयम पेंसिल वॉटर कलर आहे.
कशाने? जलरंग का?
वॉटर कलर पेन्सिलने रंगविले आहे
हायला! धन्यवाद.
रेग्युलर वॉटर पेंटींगपेक्षा
रेग्युलर वॉटर पेंटींगपेक्षा वॉटर कलर पेन्सिल वापरून पेंटींग करणे सोपे आहे.हायला, हे माहीत नव्हतं. ही आयडीया मस्त आहे. वापरून बघायला पाहीजे. धन्स हो देवानू.सुंदर !
व्वा. अतिशय आवडली चित्रे.
दुसरं चित्रं एक नंबर आहे.
धन्यवाद चित्रगुप्तजी.
आहा
फारच छान!
कय बोलतसं ?
जरूर..
हात्तिच्या
कधी पण.
सुरेख
सर्व चित्रे छान आहेत.
डबल प्र मुळे
चित्रे फारच आवडली
धन्यवाद.
अप्रतिम
मस्तच!
सहमत.
हातात मज्या आहे तुम्च्या :)
सगळीच चित्रे अतिशय सुंदर व
अगदी हेच म्हणतो
थँक यु चौ.को.साहेब.
ताम्बेसाहेब
व्वा ! झकासच की !
वाह!
चित्रे आवडली.
सुरेख चित्रे. आवडली.
अतिशय सुरेख चित्रे.
कमाल कला आहे हो तुमच्या हातात
चालेल :-)
सर्व चित्र मस्त आहेत एकदम..
करा की फ्रेम. नो प्रॉब्लेम.
आवडली.
धन्यवाद पेठकरसाहेब.
सगळीच
सुरेख चित्रे, खूप आवडली.
सर्वांना धन्यवाद.
छान चित्रं आहेत.
छान कला आहे हो हातात! सुंदर
वा
क्या बात है!!!!! :)
खुपच सुंदर आहेत निसर्गचित्रे
Pagination