Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by अभिरत भिरभि-या on Fri, 11/21/2008 - 10:49
  • Log in or register to post comments
  • 10716 views

Book traversal links for फोनवर पलिकडे कोणीतरी ! (भाग २) (अंतिम)

  • ‹ फोनवर पलिकडे कोणीतरी ! (भाग १)
  • Up

प्रतिक्रिया

Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Fri, 11/21/2008 - 10:59

Permalink

शेवट असा

शेवट असा होईल असे वाटले नव्हते !!! :( वाईट वाटले वाचुन.... माणसाच मन त्याला स्वस्थ बसुन देत नाही हेच खरं !!! मदनबाण..... हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर. बॅ.वि.दा.सावरकर
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्तसुनीत on Fri, 11/21/2008 - 11:10

Permalink

रोचक

कथा रोचक वाटली. तिची मांड्णी उत्कंठावर्धक वाटली. पु. ले.शु.
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळचिखलू on Fri, 11/21/2008 - 11:12

Permalink

निशब्द॑....

....... - (अस्वस्थ ) चिखलू
  • Log in or register to post comments

Submitted by नंदन on Fri, 11/21/2008 - 11:29

Permalink

शेवट

कथा आवडली. शेवट असा होईलसे वाटले नव्हते. देशमुख जाताना मरणओझे देऊन गेले म्हणावं लागेल.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Fri, 11/21/2008 - 11:33

In reply to शेवट by नंदन

Permalink

कथा आवडली.

कथा आवडली. शेवट असा होईलसे वाटले नव्हते. देशमुख जाताना मरणओझे देऊन गेले म्हणावं लागेल. असेच म्हणते.
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Fri, 11/21/2008 - 11:38

In reply to शेवट by नंदन

Permalink

....

....
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Fri, 11/21/2008 - 11:41

In reply to शेवट by नंदन

Permalink

नंदनशी

नंदनशी सहमत.
  • Log in or register to post comments

Submitted by घाटावरचे भट on Fri, 11/21/2008 - 11:51

In reply to नंदनशी by यशोधरा

Permalink

+१

वरील सर्वांशी सहमत...
  • Log in or register to post comments

Submitted by सर्किट (verified= न पडताळणी केलेला) on Fri, 11/21/2008 - 11:45

Permalink

अनिवासी भारतीयांचे अपयश

सर्वसाधारणतः ह्या कथेचे विश्लेषण केल्यास, भारतीय वृद्ध जोडप्यांची मुले सध्या अनिवासी भारतीय झाल्याने, त्यांच्या वृद्ध आईबापांच्या आत्महत्येस कारणीभूत झाली आहेत, असे दिसून येईल. आमच्या सोसायटीतील अनेक मुले-मुली अमेरिकेला निघून गेल्याने त्यांच्या म्हातार्‍यांची काळजी हल्ली आम्हाला घ्यावी लागते, हे आपल्याला माहितीच असेल. -- सर्किट अभ्यंकर अथवा सर्किट चेंगट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
  • Log in or register to post comments

Submitted by अभिरत भिरभि-या on Fri, 11/21/2008 - 12:00

In reply to अनिवासी भारतीयांचे अपयश by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

Permalink

कथा

डीसक्लेमर कथा मि.पा. वरील कोणत्याही वादाशी संबधित नाही. एक स्वतंत्र कलाकृती समजावी. तब्बल आठवडाभरापूर्वी मी ही कथा रुपांतरित करणे सुरु केले होते; कोणत्याही वादापूर्वी :)
  • Log in or register to post comments

Submitted by सर्किट (verified= न पडताळणी केलेला) on Fri, 11/21/2008 - 12:05

In reply to कथा by अभिरत भिरभि-या

Permalink

असे बरेचदा होते

भिरभिर्‍या, असे बरेचदा होते. कुठलेही वाद निर्माण होण्यापूर्वी अनेकदा, (मिसळपावावरील जुने लेखन पाहिल्यास, सुमारे ६ महिन्यांपूर्वी ह्या विषयावरील प्रतिसाद सापडतील, वाद नंतर निर्माण झाले) असे आपल्या डोक्यात राहते. आणि नंतर लिहिताना मेंदूतील झोपलेल्या पेशी कधी जागृत होतील ते काही सांगता येत नाही. आनंदाची बाब अशी, की मी स्वतः अनिवासी भारतीय असूनही माझे आई-वडील आनंदित आहेत. हे महत्त्वाचे, नाही का ? अरे हो, भाषांतर छान झाले आहे, हे लिहायचे विसरलोच. -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
  • Log in or register to post comments

Submitted by अभिरत भिरभि-या on Fri, 11/21/2008 - 11:52

Permalink

याचमुळे

>> शेवट असा होईलसे वाटले नव्हते. खरे तर याचमुळे कथा निवडली.
  • Log in or register to post comments

Submitted by रामपुरी on Fri, 11/21/2008 - 12:01

Permalink

...

नि:शब्द.......
  • Log in or register to post comments

Submitted by अनिल हटेला on Fri, 11/21/2008 - 15:27

Permalink

भिर भ-या

भिर भ-या !! सही जमलये भाषांतर.... शेवट चटका लाउन गेला...... पू ले शु...... बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

Submitted by गजानन (verified= न पडताळणी केलेला) on Fri, 11/21/2008 - 15:48

Permalink

चटका बसला

चटका बसवणारी कथा होती. व्रूद्धान्च्या आयुश्याचे पहा कसे असते. कठीण परिस्थीति आहे सद्धया.
  • Log in or register to post comments

Submitted by लिखाळ on Fri, 11/21/2008 - 16:30

Permalink

वेगळीच कथा

वेगळीच कथा आणि छान अनुवाद. पुलेशु -- लिखाळ.
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on Fri, 11/21/2008 - 17:23

Permalink

सुंदर

रुपांतर सुंदरच आहे.. चपखल शब्दप्रयोग! अभिनंदन बाकी मुळ कथेतही मुलगा परदेशी जातो का मुंबईला? (नव्या देवदासात कसं मुंबईचं अमेरिका केलं आहे तसं ;)) -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments

Submitted by अभिरत भिरभि-या on Fri, 11/21/2008 - 17:38

In reply to सुंदर by ऋषिकेश

Permalink

ह्म्म

आपट्यांचा मुलगा ( वरिजनल नाव राधाकांत) कुठे जातो याचा मुळ कथेत उल्लेख नाही. पण देशमुखांप्रमाणेच परदेशी जातो असे अभिप्रेत दिसते. मुळ कथेत झोपेच्या गोळ्या प्रमाणाबाहेर खाऊन आपटे कसे मरतात याचे वर्णन आहे. मी ते अध्याहृत ठेवणे पसंत केले. "सिरियल वा चेन सुसाईड" ( आत्महत्या शृखंला) हा पैलू मुळ कथेपेक्षा येथे जास्त अधोरेखित केलाय.
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on Fri, 11/21/2008 - 22:28

In reply to ह्म्म by अभिरत भिरभि-या

Permalink

वा! अकृत्रिम रुपांतर!

मुळ कथेत झोपेच्या गोळ्या प्रमाणाबाहेर खाऊन आपटे कसे मरतात याचे वर्णन आहे. मी ते अध्याहृत ठेवणे पसंत केले.
हे केलेत ते बरे केलेत.. त्यामुळे या कथेत योग्य भाव अधोरेखीत करण्यात यशस्वी झालातसे वाटते. :) -(भावपूर्ण) ऋषिकेश
  • Log in or register to post comments

Submitted by शितल on Fri, 11/21/2008 - 18:17

Permalink

छान.

खुपच सुंदर अनुवाद. असेच सुंदर अनुवादित कथा आम्हा मिपाकरांना वाचायला द्या. :)
  • Log in or register to post comments

Submitted by सुनील on Fri, 11/21/2008 - 18:29

Permalink

सुन्न

सुन्न करणारी कथा. म्हातारपणातील एकलेपणा मग तो कोणत्याही कारणांमुळे येवो, भयाणच असावा! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

Submitted by ललिता on Fri, 11/21/2008 - 19:00

Permalink

कठिण!

कुठेही जगाच्या पाठीवर जा, म्हातारपण कठिण आहे हे त्रिकालाबाधित दाहक सत्य आहे!
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Fri, 11/21/2008 - 19:40

Permalink

कथा आवडली.

शेवट असा असेल वाटले नाही. रेवती
  • Log in or register to post comments

Submitted by वेताळ on Fri, 11/21/2008 - 20:30

Permalink

अभिरत राव छान

निदान एकदा तरी आपला विचार जुळला.म्हातारपणी रिकामे पेन्शनी आयुष्य जगण्यापेक्षा स्वःताला काहितरी कामात गुंतवुन घेणे चांगले. पण प्रत्येक माणसाची वृध्दापकाळी मनस्थिती कशी असेल हे काही सांगता येत नाही. पंरतु ह्या आठवड्यात दोन म्हातारयाची तुलना कराविशी वाटते. एक म्हातारा धनगर (ऋषिकेश- दोन धनगर) व एक तुमचे आपटे .धनगर थकला असुन देखिल मनाने हिरवा आहे.पैसा नसुनही मनाने श्रीमंत आहे.९०वयाचा असुनही तरुण पोरांचा उत्साह त्यात ठासुन भरला आहे.त्या उलट आपटे व देशमुख व्यवहारी जगात खुप चांगले आयुष्य जगुन देखिल त्याना आपले म्हातारपन खायला उटले आहे. दोन्ही लेख नीट वाचले तरी आपल्याला असे का घडले ह्याचे उत्तर नक्की मिळेल. जग झपाट्याने बदलत आहे. आज जगाचे वैश्विक खेड्यात रुपातंर झाले आहे व प्रत्येक घराचे रुपातंर एका मोठ्या अपार्टमेंट मध्ये झाले आहे.घरे जवळ आली पण माणसे दुर गेली आहेत.धनगर मुक्त निसर्गात राहिल्यामुळे त्याला कसे जगायचे व कुणासाठी हे नेमके ठाऊक आहे. पण सिंमेटच्या जंगलात राहणारयाना त्याचे घर एक तुंरुग झाला आहे.व त्यातुन सुटका म्हणजे फक्त मृत्यु हेच उत्तर वाटते.शेवटी प्रत्येक जण आपआपल्या प्रश्नाचे उत्तर आपआपल्या मार्गाने मिळवायचा प्रयत्न करतो. तेच त्याच्यासाठी सत्य असते. कथा खुप छान आणि अंर्तमुख करायला लावणारी आहे. कथे बद्दल अभिरत तुम्हाला धन्यवाद. वेताळ
  • Log in or register to post comments

Submitted by अभिरत भिरभि-या on Fri, 11/21/2008 - 20:41

In reply to अभिरत राव छान by वेताळ

Permalink

टाळ्या

धनगर मुक्त निसर्गात राहिल्यामुळे त्याला कसे जगायचे व कुणासाठी हे नेमके ठाऊक आहे. पण सिंमेटच्या जंगलात राहणारयाना त्याचे घर एक तुंरुग झाला आहे.व त्यातुन सुटका म्हणजे फक्त मृत्यु हेच उत्तर वाटते.शेवटी प्रत्येक जण आपआपल्या प्रश्नाचे उत्तर आपआपल्या मार्गाने मिळवायचा प्रयत्न करतो. तेच त्याच्यासाठी सत्य असते. एकेका अक्षराशी सहमत ! इतकी भरभरुन व सुरेख प्रतिक्रिया दिल्याबद्दल मनापासून आभार. अशी एखादी सुंदर प्रतिक्रिया लेखाच्या सौंदर्य दुणावते. झटपट जगात थोडे मनाविरुद्ध झाले तर हताश निराश होण्याचे प्रमाण वाढलेय म्हणतात. सहनशीलता / सबुरी आज कधी नव्हती तितकी गरजेची आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on Fri, 11/21/2008 - 22:26

In reply to टाळ्या by अभिरत भिरभि-या

Permalink

सहमत

धनगर मुक्त निसर्गात राहिल्यामुळे त्याला कसे जगायचे व कुणासाठी हे नेमके ठाऊक आहे. पण सिंमेटच्या जंगलात राहणारयाना त्याचे घर एक तुंरुग झाला आहे.व त्यातुन सुटका म्हणजे फक्त मृत्यु हेच उत्तर वाटते.शेवटी प्रत्येक जण आपआपल्या प्रश्नाचे उत्तर आपआपल्या मार्गाने मिळवायचा प्रयत्न करतो. तेच त्याच्यासाठी सत्य असते.
वेताळभाऊ, अप्रतिम सांगड आणि मस्त प्रतिक्रिया! :)
अशी एखादी सुंदर प्रतिक्रिया लेखाच्या सौंदर्य दुणावते.
+१ -(तरूण :) ) ऋषिकेश
  • Log in or register to post comments

Submitted by अभिज्ञ on Fri, 11/21/2008 - 20:45

Permalink

अभिनंदन.

अभिरत, आपण इतर भाषेतील उत्तम कथांचे छानसे भाषांतर इथे देत आहात हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. त्याबद्दल आपले अभिनंदन. कथाबीज नकाराकडे झुकणारे असले तरि अंतर्मुख करणारे आहे. भाषांतराबद्दल धन्यवाद. अभिज्ञ.
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Fri, 11/21/2008 - 20:56

Permalink

मस्तच

मस्तच कथा. खूप दिवसांनी इतकी सशक्त कथा वाचायला मिळाली. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by अनंत छंदी on Fri, 11/21/2008 - 21:03

Permalink

.......

मित्रा... तोडलंस!!, सुंदर अनुवाद, तुला सलाम!!
  • Log in or register to post comments

Submitted by भाग्यश्री on Fri, 11/21/2008 - 22:04

Permalink

एकतर

एकतर अनुवाद अजिबात वाटला नाही.. आणि 'शेवट' अगदी रूतला .. :( असा शेवट असायला नको होता.. पण कथा आहे त्यामुळे ठीके.. :) तुम्ही भाषांतरही सुंदर केलंय.. गुंग होऊन वाचत होते मी.. http://bhagyashreee.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by अभिरत भिरभि-या on Sat, 11/22/2008 - 10:07

Permalink

धन्यु :)

सगळ्याच प्रतिक्रिया कौतुक करणार्‍या आहेत. ठ्यांकू ! :) राव, एखादी जळजळीत प्रतिक्रिया पण द्या की. का गाडी 'चौपाटी'ला नेल्यावरच देणार ;) अभिरत ..
  • Log in or register to post comments

Submitted by शक्तिमान on Sun, 11/23/2008 - 14:13

Permalink

या पाच

या पाच दांपत्यांना एकमेकांशी संपर्क साधून आपले एकटेपण दूर करता आले असते.
  • Log in or register to post comments

Submitted by इनोबा म्हणे on Sun, 11/23/2008 - 17:56

In reply to या पाच by शक्तिमान

Permalink

हो ना!

आणि प्रभात रोडची बहूतेक म्हातारी मंडळी चालवतात तसा एखादा घरगुती क्लब चालवून पत्ते कुटत टायमपास करता आला असता ना राव! :) कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Sun, 11/23/2008 - 17:49

Permalink

दुसरा भाग वाचला!

रुपांतरित कथा आहे हे सांगितलेस म्हणून खरे वाटले इतकी ती आपलीशी करुन टाकली आहेस! अभिनंदन!! एकलेपणातून आलेले दु:सह जिणे ह्याला बर्‍याचप्रमाणात ती माणसेच कारणीभूत असतात असे माझे मत आहे. मुले दूरदेशी/गावी जाणे किंवा तिथेच असणे ह्याने फार मोठा फरक पडतो असे नाही. वयापरत्वे येणारे म्हातारपण काही एकाएकी येत नाही. आयुष्याच्या संध्याकाळी हळूहळू घटत जाणारी ताकद, रोडावत जाणारा जनसंपर्क, विरत जाणारे नातेसंबंध हे तुमच्या आर्थिक संपन्नतेवर मात करतात. मनाचे सत्त्व संपुष्टात येणे ही मरणाकडे वाटचाल असते. मनाची शक्ती कशी टिकेल, आपण लोकांत कसे मिसळून राहू शकू, आपली मदत कशी होऊ शकेल, इतरांशी मनाने जमवून घेणे कसे साध्य होईल ह्याच विचार प्रत्येकाने प्रौढवयात का होईना करुन ठेवायला हवा. हट्टाग्रह, दुराग्रह कमी करणे. विनाकारण सल्ले देण्याचा स्वभाव कमी करणे इ. असो विषय मोठा आहे. एक लेखच होईल! चतुरंग
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com