Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by मुक्तसुनीत on गुरुवार, 11/20/2008 - 01:22
  • Log in or register to post comments
  • 32440 views

प्रतिक्रिया

Submitted by लिखाळ on गुरुवार, 11/20/2008 - 02:29

Permalink

चैत्र या

चैत्र या नव्या चांगल्या चित्रपटापदद्दल कळवलेत म्हणून आभार. चित्रपट लवकरच पहायला मिळेल अशी आशा असल्याने मधले वर्णन वाचले नाही. आपण आधीच तसे सूचित केल्याबद्दल आभार. चित्रपट पाहिला की येथे लिहिनच. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments

Submitted by आजानुकर्ण on Sat, 11/22/2008 - 02:34

In reply to चैत्र या by लिखाळ

Permalink

तपशीलातील चूक

हा प्रतिसाद येथे देण्याचे कारण तो पहिल्या पानावर राहावा एवढेच आहे. लिखाळ यांच्या वरील प्रतिसादाशी त्याचा संबंध नाही. आपला, (क्षमस्व) आजानुकर्ण
आधी म्हण्टल्याप्रमाणे, कथालेखक म्हणून आपल्या संपूर्ण शक्तिनिशी लिहिण्याचा काळ अजून यायचा होता. त्या काळातली ही कथा.
ही कथा जीएंनी कधी लिहिली आहे याचा तपशील माझ्याकडे सध्या उपलब्ध नसला तरी, कुसुमगुंजा हा जीएंच्या शेवटच्या संग्रहांपैकी एक असावा. ह्या संग्रहाचे कामही पुरूषोत्तम धाक्रस आणि आप्पा परचुरे यांनी केलेले आहे. असे लिहिण्याचे कारण हे की त्यावेळी जीएंनी [बिघडलेल्या तब्येतीमुळे(?)] या कामात सहभाग घेतला नव्हता. या संग्रहाचे व त्यातील कथांचे उल्लेख जीएंच्या पत्रांमध्येही फारसे नाहीत (म्हणजे तो बराच नवीन आहे.) कुसुमगुंजानंतर मला वाटते हातकणंगलेकरांनी संपादित केलेला डोहकाळिमा - ज्यात कोणत्याही नव्या कथा नाहीत - आणि सोनपावले - ज्या कथा बहुधा जीए गेल्यानंतरच प्रकाशित करण्यात / करता आल्या, हे दोनच स्वतंत्र कथासंग्रह आहेत. (बिम्मची बखर आणि मुग्धाची रंगीत गोष्ट बद्दल काहीच आठवत नाही.) 'सोनपावले'मधील कथा ह्या जीएंच्या सुरूवातीच्या कथा म्हणता येतील, त्या तशा जाणवतातही. कुसुमगुंजातील कथा ह्या तशा संपूर्ण (किंवा शक्तिनिशी वगैरे) आहेत. त्यात कोणताही नवखेपणा जाणवत नाही. विशेषतः 'निरोप' आणि 'एक मित्र एक कथा 'यांचा ह्या संग्रहातील समावेश पाहिला असता जीएंनी फार नंतर लिहिलेल्या या कथा आहेत हे स्पष्ट समजून येते. आपला, (जीएप्रेमी) आजानुकर्ण धाक्रस चू.भू.दे.घे.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्तसुनीत on Sat, 11/22/2008 - 02:36

In reply to तपशीलातील चूक by आजानुकर्ण

Permalink

थोडा धूसरपणा

"कुसुमगुंजा" हा शेवटी प्रसिद्ध झालेल्या पैकी एक ही खरी गोष्ट. पण कुसुमगुंजातील कथा, त्यांची भाषा , प्रकृती, त्यांचे विषय पहाता , "सोनपाऊले" सारख्याच याही संग्रहात त्यांच्या जुन्याच कथा प्रसिद्ध झालेल्या आहेत असे मला वाटते. माझ्या अंधुक आठवणीप्रमाणे तसे कुठेतरी वाचल्याचे मला स्मरते ; पण अर्थातच संदर्भ जवळ नाही. "निरोप" ही कथा , तुम्ही म्ह्ण्टल्याप्रमाणे एकदम म्च्युअर्ड आहे ; परंतु "एके मित्र एक कथा" किंवा "चैत्र" या सार्‍यावर जी एंच्या पूर्वायुष्याची छाया पडली आहे. एकूण या सगळ्या तेव्हापर्यंत असंपादित असलेल्या कथा होत्या ; त्यात नव्या-जुन्याचे मिश्रण असू शकते. पण "चैत्र" मधे कुठेच वर्षानुवर्षांनी ज्यांची लेखणी धारदार , जास्त जास्त गडद चित्रे रंगवाणारी बनली ते जी ए दिसत नाहीत. एकूण हा मामला थोडा धूसर बनला आहे .
  • Log in or register to post comments

Submitted by आजानुकर्ण on Sat, 11/22/2008 - 03:10

In reply to थोडा धूसरपणा by मुक्तसुनीत

Permalink

शक्य आहे.

'एक मित्र एक कथा'चा उल्लेख येथे करण्याचे कारण असे की या कथेत जीएंनी घेतलेल्या चित्रपटांची, दिग्दर्शकांची नावे ही तशी नवी आहेत. माझ्या अंदाजानुसार जीएंनी लेखन वयाच्या २०व्या वर्षाच्या आसपास सुरु केले. त्यावेळी हे चित्रपट (द लोनली रोड ऑन द पाईन??? वगैरे) आलेले नव्हते. कथेत असलेली लेखकांची, व पुस्तकांची नावे पाहता ते त्या वयात शक्यही नव्हते. (सुरूवातीला जीए बेळगांवला होते नंतर ते कर्नाटक विश्वविद्यालयात धारवाडला आले - ज्यानंतर त्यांचा ग्रंथालयांशी जवळचा संबंध आला. मात्र हा संग्रह असॉर्टेड स्वरुपाचा असला तरी सोनपावलेतील आणि कुसुमगुंजातील कथांमध्ये लक्षणीय फरक आहे हे नमूद करावेसे वाटते. अर्थात माझ्याकडे दोन्हीही कथासंग्रह आता उपलब्ध नाहीत त्यामुळे हे अंधारात तीर मारण्यासारखे आहे. आपला, (अनेक संकेतस्थळे एक सदस्य) आजानुकर्ण परंतु "एके मित्र एक कथा" किंवा "चैत्र" या सार्‍यावर जी एंच्या पूर्वायुष्याची छाया पडली आहे. मला नेमके आठवत नाही परंतु जीए एक वाक्य नेहमी लिहीत असत . मी एकच गोष्ट वारंवार सांगत आहे. मात्र प्रत्येक वेळी मी दुःखाच्या अधिक जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहे अशा आशयाचे ते काहीसे वाक्य होते. केवळ चैत्रच नव्हे तर कैरी, माणूस नावाचा बेटा, बऱ्याच प्रमाणावर राधी या कथाही पूर्वायुष्यावरच आधारित आहेत असे वाटते. मी फार जास्त बोलत आहे. कमीजास्त झाल्यास माफ करावे. आपला, (जीए कोळून प्यालेला) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्तसुनीत on Sat, 11/22/2008 - 03:12

In reply to शक्य आहे. by आजानुकर्ण

Permalink

मित्रा अजानुकर्णा !

मी फार जास्त बोलत आहे. कमीजास्त झाल्यास माफ करावे. अरे वर जे बोलतो आहेस त्याबद्दल नि तसे बोललास तर जितके बोलशील तितके कमी आहे रे ! :-)
  • Log in or register to post comments

Submitted by आजानुकर्ण on Sat, 11/22/2008 - 03:16

In reply to मित्रा अजानुकर्णा ! by मुक्तसुनीत

Permalink

धन्यवाद

आणि 'रात्र झाली गोकुळी'तील घर हे जीएंचे धारवाडमधले घर. तुतीमधील आबाही जीएंचे वैयक्तिक आयुष्य. आपला, (अवांतर) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्तसुनीत on Sat, 11/22/2008 - 03:19

In reply to धन्यवाद by आजानुकर्ण

Permalink

सीक्वेल

"कैरी" हा "तुती" या कथेचा दुसरा भाग मित्रा !
  • Log in or register to post comments

Submitted by आजानुकर्ण on Sat, 11/22/2008 - 03:25

In reply to सीक्वेल by मुक्तसुनीत

Permalink

बरोबर

तेच म्हणणार होतो. (गोड खायला मिळणार बघा आता). आरभाट आणि चिल्लर, कैरी, तुती आणि माणूस नावाचा बेटा हे शेजारी शेजारी ठेवले तर हत्तीला चाचपडणाऱ्यांसमोर एक संपूर्ण प्रतिमा उभी राहील. आपला (चिल्लर) आजानुकर्ण एक कूटप्रश्नः जीएंच्या कथांमधील नायकाचे नाव हे अनेकदा मधू-माधव असे असते व नायिकेचे कमल-कमळी असे हे लक्षात आले आहे का? आपला, (कर्ण म्हणे आता उरलो कोड्यांपुरता) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments

Submitted by कोलबेर on Sat, 11/22/2008 - 03:37

In reply to बरोबर by आजानुकर्ण

Permalink

बरोबर!

जीएंच्या कथांमधील नायकाचे नाव हे अनेकदा मधू-माधव असे असते व नायिकेचे कमल-कमळी असे हे लक्षात आले आहे का?
हे नव्हते लक्षात आले! त्याचबरोबर आई ही नेहमी अतिशय सात्विक साने गुरुजींच्या कथेप्रमाणे असते, बहीण बर्‍याचदा छळ सहन करते, वडील हतबल आणि बायको मात्र बदचलन असते.
  • Log in or register to post comments

Submitted by आजानुकर्ण on Sat, 11/22/2008 - 03:39

In reply to बरोबर! by कोलबेर

Permalink

हो.

जीएंचे आयुष्य पाहता यामागील कार्यकारणभाव समजण्यासारखा आहे. किंबहुना आई-बहीण-मावशी वगळता इतर सर्व बायकांचे त्यांनी जनरलायझेशन केले आहे आपला (निष्पक्ष) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments

Submitted by नंदन on Sat, 11/22/2008 - 04:22

In reply to शक्य आहे. by आजानुकर्ण

Permalink

ऑगस्ट स्ट्रिंडबर्ग

'शॅलो पीपल डिमांड व्हरायटी - बट आय हॅव बीन रायटिंग द सेम स्टोरी थ्रूआऊट माय लाईफ, इच टाईम ट्राइंग टू कट निअरर द एकिंग नर्व्ह' हे ते जीएंचे आवडते वाक्य. बाकी सोनपाऊले घरी आहे, एखादा संदर्भ हवा असेल तर शोधून सांगू शकेन.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

Submitted by सर्किट (verified= न पडताळणी केलेला) on Sat, 11/22/2008 - 04:25

In reply to ऑगस्ट स्ट्रिंडबर्ग by नंदन

Permalink

शॅलो पीपल

शॅलो पीपल डिमांड व्हरायटी मागे कुणीतरी आम्हालाही वैविध्यपूर्ण लिहिण्याचा आग्रह करीत होते. त्यावेळी जी एंचे हे वाक्य माहिती असते, तर ? -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
  • Log in or register to post comments

Submitted by आजानुकर्ण on Sat, 11/22/2008 - 05:16

In reply to ऑगस्ट स्ट्रिंडबर्ग by नंदन

Permalink

अगदी हेच ते.

नंदनशेठ ये हुई ना बात. हेच ते वाक्य. आमच्या दातात अडकलेली पेरूची बी काढण्यात नंदनशेठ नेहमी मार्गदर्शन करतात. 'सोनपाऊले' सोनपावले मध्ये शेवटी जीएंच्या समग्र साहित्याचा कालखंड दिला आहे. त्यात चैत्र बाबत काय म्हटले आहे? आपला, (सनावळी) आजानुकर्ण सोनपावले की सोनपाऊले? माझ्या मते सोनपावले.
  • Log in or register to post comments

Submitted by आजानुकर्ण on Sat, 11/22/2008 - 05:27

In reply to शक्य आहे. by आजानुकर्ण

Permalink

वरील यादीत

वरील यादीत जीएंच्या इतर कथाही देता येतीलच. पण यात लक्षणीय म्हणजे अंजन ही कथा. जीए फारसे कोणाशी बोलत नसत मात्र कॉलेजच्या एका शिपायाशी त्यांच्या नेहमी गप्पा होत असत. त्या गप्पा आणि जीएंचे स्वतःचे गूढकथांचे असलेले वाचन यावर आधारित असलेल्या अंजन या कथेचे नाव घ्यावेच लागेल. या शिपायाच्या व्यक्तीमत्त्वाबाबत 'उघडझाप' या पुस्तकात म.द.हातकणंगलेकर यांनी विस्ताराने लिहिले आहे. स्वतः जीएंनी स्मशानात व घरामध्ये काही प्रयोग केल्याचे/पाहिल्याचे वाचले आहे. आपला (जीएभक्त) म. द. आजानुकर्ण
  • Log in or register to post comments

Submitted by नंदन on Sat, 11/22/2008 - 09:40

In reply to वरील यादीत by आजानुकर्ण

Permalink

कालक्रम

'सोनपावले'च्या शेवटी दिलेल्या सूचीत सापडलेला जी.एं.च्या कथांचा आणि पुस्तकांचा प्रकाशनक्रम असा - निरोप - ५७ [पारवा] माणूस नावाचा बेटा - ५९ [हिरवे रावे] रात्र झाली गोकुळी - ५९ [पारवा] तुती - ६१ [हिरवे रावे] चैत्र -- ?? - मराठवाडा दिवाळी अंक [कुसुमगुंजा] राधी - ६५ [रक्तचंदन] अंजन - ६७/६८ [काजळमाया] कैरी - ७३ [पिंगळावेळ] एक मित्र एक कथा - ८७ [कुसुमगुंजा] डोहकाळिमा - ८७ अरभाट आणि चिल्लर - ८८ कुसुमगुंजा (कुसुम्बगुंजा हे अभिप्रेत नाव) - ८९ सोनपावले - ९१ * 'एक मित्र एक कथे'चा लेखनकाल सापडला नाही. १९८७ हे तिचे प्रकाशनवर्ष झाले. 'सोनपावले'च्या प्रस्तावनेत जी. एं.च्या कपाळवाटा आणि वहाणा सारख्या (तोवर) अप्रकाशित कथांचा उल्लेख आहे, परंतु या (एक मित्र एक कथा) कथेचा किंवा तिच्या लेखनकालाचा नाही. चैत्र आणि फेड या कथांचेही प्रकाशनवर्ष सूचीत दिलेले नाही, पण मराठवाडा दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेल्या जी.एं.च्या इतर कथांचा प्रकाशन कालावधी पाहता त्या ५९-६२ या कालावधीत प्रसिद्ध झाल्या असाव्यात, असा एक किरकोळ अंदाज बांधता येऊ शकेल. ** सोनपावलेतली सर्वात पहिली कथा (जुना कोट) १९४० सालातली (म्हणजे वयाच्या १७ व्या वर्षी लिहिलेली) आहे. आता 'चैत्र'मुळे लागलेला वैशाखवणवा विझल्यासारखा वाटतो आहे तेव्हा त्या कथेतले शेवटची २-३ वाक्ये उद्धृत करण्याचे धाडस करतो :). ऐन बहरात असलेल्या खांडेकरांचा जीएंच्या ह्या सुरूवातीच्या काळातल्या (कदाचित पहिल्या) कथेवर पडलेला स्पष्ट प्रभाव जाणवला, एवढेच ही वाक्ये येथे देण्यामागचे कारण. त्यांची पुढची वाटचाल, अर्थातच यापेक्षा पूर्ण निराळी आहे. (लताबाई आणि नूरजहाँ यांचे उदाहरण येथे समांतर ठरावे.) मी बाहेर पाहिले! लिंबाच्या साली उन्हात चमकत होत्या. जणो म्हणत होत्या, "बाबारे, जीवनसर्वस्व त्यागात आहे, स्वार्थात नव्हे." शीला आरशात पाहून कुंकू लावून घेत होती !!

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

Submitted by आजानुकर्ण on Sat, 11/22/2008 - 16:47

In reply to कालक्रम by नंदन

Permalink

धन्यवाद/खांडेकर

नंदनशेठ, कालक्रमाबद्दल धन्यवाद. एक मित्र एक कथा ही फार उशीराची आहे यात शंका नव्हतीच. चैत्रही बरीच नंतरची आहे. (जीएंच्या शब्दांत सांगायचे तर हिरवट दिवसांनंतरची) सोनपावलेतल्या खांडेकरी छापाबद्दल तुम्हाला माहितीच असेल की खांडेकरांच्या कथांचा सुरूवातीच्या काळात असलेला प्रभाव याबद्दल जीएंनी फार ठिकाणी लिहिले आहे. वैयक्तिक त्यांना खांडेकर प्रिय असले तरी त्यांची लेखनशैली-लेखन प्रिय नव्हते. त्याबाबतचे अनेक बोचरे, औपरोधिक सूचक उल्लेख कथांमध्ये तर "हरीभाऊंनी मराठी साहित्यात आणून टाकलेल्या सामाजिक गाठोड्यांचा शेवटचा फेरीवाला" असे थेट उल्लेख पत्रांमध्ये सापडतील. (अर्थात घरातील एखादा वयोवृद्ध, बुजुर्ग गृहस्थ असावा असे मला त्यांचे प्रेमळ अस्तित्तव वाटते असेही खांडेकरांबाबत जीएंनी म्हटलेले आहेच) लक्षणीय बाब म्हणजे सोनपावलेतील कथा जीए गेल्यानंतरच प्रकाशित करणे शक्य झाले. स्वतःचे काही कमअस्सल (तुलनात्मक अर्थाने - इतर कथांचा दर्जा पाहता यातील कथा नवख्या आहेत हे सहज कळते) प्रसिद्ध व्हावे हे त्यांनी मान्य केले नसते. आपला (तौलनिक) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्तसुनीत on गुरुवार, 11/20/2008 - 02:38

Permalink

डिवीडी

हा सिनेमा "आवर्तन" नावाच्या डीवीडी माध्यमातील दिवाळी अंकात आहे. डिव्हीडी विकत घ्यायची असल्यास "बहुगुणी" या अमेरिकास्थित सदस्यास संपर्क करावा. किंमत १५ डॉलर्स. "आवर्तन"बद्दल थोडे लिहायचे होतेच. कदाचित वेगळ्या धाग्यात लिहीन.
  • Log in or register to post comments

Submitted by सुवर्णमयी on गुरुवार, 11/20/2008 - 02:46

In reply to डिवीडी by मुक्तसुनीत

Permalink

डीवीडी माध्यमातील दिवाळी अंकात

आवर्तन बद्दल जरूर लिहा.
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on गुरुवार, 11/20/2008 - 12:44

In reply to डिवीडी by मुक्तसुनीत

Permalink

चैत्र...

खूप आधी वाचलेली होती, अर्थात आवडलेली होतीच. पुन्हा आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद. आता परत एकद वाचायची इच्छा होते आहे. मिळवून वाचली पाहिजे. जीएंच्या कथेवर आणि तो सुद्धा ३० मिनिटाचा लघुपट काढणे हे आव्हानात्मकच आहे. अमेरिकेबाहेर कसा बघता येईल हा चित्रपट? इथे खाली बर्‍याच लोकांची मूळ कथेबद्दलची मतं वाचली. एखाद्या कथेच्या आशयाबद्दल किंवा त्यात मांडलेल्या विचारांबद्दल वेगवेगळी मतं असू शकतात. पण जीएंच्या भाषेबद्दल, शब्दकळेबद्दल दुमत असायचे कारण नाही. वाचकाच्या मनाची पकड घेणारी, विलक्षण प्रवाही अशी भाषा मला तरी आवडते. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदयात्री on गुरुवार, 11/20/2008 - 16:14

In reply to चैत्र... by बिपिन कार्यकर्ते

Permalink

असेच म्हणतो

इथे खाली बर्‍याच लोकांची मूळ कथेबद्दलची मतं वाचली. एखाद्या कथेच्या आशयाबद्दल किंवा त्यात मांडलेल्या विचारांबद्दल वेगवेगळी मतं असू शकतात. पण जीएंच्या भाषेबद्दल, शब्दकळेबद्दल दुमत असायचे कारण नाही. वाचकाच्या मनाची पकड घेणारी, विलक्षण प्रवाही अशी भाषा मला तरी आवडते. असेच म्हणतो. सहमत. मुक्तसुनितांचे धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Submitted by समिधा on गुरुवार, 02/26/2009 - 10:12

In reply to चैत्र... by बिपिन कार्यकर्ते

Permalink

उपलब्ध

हा चित्रपट apalimarathi.com वर आहे .मी बघितला खरच सुंदर आहे. बिपीन भाऊ तुम्हाला हा चित्रपट बघता येइल.
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय on गुरुवार, 11/20/2008 - 02:41

Permalink

आभार

आईकडचे स्त्रीधनही गेले, हा बारीक तपशील चराचरा चिरून जातो. इतक्या कंगोर्‍यांचे कारुण्य वाचताना हालहाल करते.
  • Log in or register to post comments

Submitted by सुवर्णमयी on गुरुवार, 11/20/2008 - 02:45

Permalink

पहायला हवा

मुक्तसुनीत, मी ही कथा वाचलेली आहे. अतिशय छोट्या कथानकात खूप काही सांगण्याची कला.. जी ए यांच्या लेखनातील मार्मिकता वेगळी सांगायलाच नको. चित्रपट नक्की बघेन. (कोणतीही टोकाची, विकृत वाटेल इतपत वर्णनाची भूमिका न घेता जी ए यांनी ज्या काही मोजक्या कथा लिहिल्या असे मला वाटते... त्यापैकी ही एक कथा आहे.- त्यांच्या कथा पुन्हा पुन्हा वाचतांना काही तरी नवीन सापडते. त्यांच्या उपमा, रूपके, प्रतिमा यावर वेळा विचार करण्यात अनेकदा कथा बाजूला राहते असे सुद्धा होते. पण मला वाटते तसेच वाटावे असा माझा आग्रह नाही.. )
  • Log in or register to post comments

Submitted by आजानुकर्ण on गुरुवार, 11/20/2008 - 07:49

In reply to पहायला हवा by सुवर्णमयी

Permalink

कुसुमगुंजातील

कुसुमगुंजातील सर्वच कथा सटल आहेत. त्यातल्या त्यात 'एक मित्र एक कथा' मध्ये जीएंनी त्यांचे स्वतःचे पूर्वग्रह सुंदरपणे कथेत सादर केले आहेत. आपला, (अल्पाक्षरी) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments

Submitted by कोलबेर on गुरुवार, 11/20/2008 - 02:48

Permalink

सुरेख!

'चैत्र' आणि 'फेड' ह्या साधारण एकाच बॅकड्रॉपवरच्या दोन उत्कृष्ट कथा!! हा चित्रपट मिळवुन बघायलाच हवा!! मागे अमोल पालेकर कैरी वरती चित्रपट बनवणार म्हंटल्यावर अशीच उत्सुकता ताणली गेली होती. पण कैरीतील मूळ लहान मुलाचे पात्र बदलुन मुलगी घेतल्याने (ते वर्ष 'बालिका वर्ष' की असले काही असल्याने सरकार दरबारी पुरस्काराच्या अपेक्षेने केले होते म्हणे) पालेकरांविषयीचा आदर खूप कमी झाला आणि चित्रपट कधीच बघीतला नाही. चैत्र मात्र प्रॉमिसिंग वाटतो आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by सर्किट (verified= न पडताळणी केलेला) on गुरुवार, 11/20/2008 - 02:54

In reply to सुरेख! by कोलबेर

Permalink

कैरी

मुलाचे पात्र बदलून मुलीचे घेतले तरी कैरी हा एक सुंदर चित्रपट होता. अतुल कुलकर्णीचे काम अतिशय सुंदर होते त्यात. बघ एकदा. -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
  • Log in or register to post comments

Submitted by आजानुकर्ण on गुरुवार, 11/20/2008 - 07:38

In reply to कैरी by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

Permalink

फालतू

कैरी हा फालतू चित्रपट होता. कथेच्या एक हजारांशाच्या निम्मे सुद्धा चित्रपटात आले नव्हते. कैरी ही कदाचित पिंगळावेळ मधील (माझ्या मते स्वामी वगळता) जीएंची सर्वोत्कृष्ट कथा आहे. कथा वाचताना किती वेळा घसा चोंदला जातो हे सांगायला नको. पालेकरांचा कैरी पाहताना कितीदा असे वाटले बॉ. आपला (कैरीप्रेमी) जी.ए. आजानुकर्ण
  • Log in or register to post comments

Submitted by सर्किट (verified= न पडताळणी केलेला) on गुरुवार, 11/20/2008 - 12:01

In reply to फालतू by आजानुकर्ण

Permalink

मला

एखादी कथा चित्रीकरणासाठी योग्य असते, एखादी नसते. जी एंची कैरी वाचताना अनेकदा, ह्यावर चित्रपट कसा होईल, हा विचार मनात येऊन गेला. माझ्या अपेक्षेपेक्षा हा चित्रपट खूपच छान होता, म्हणून मला आवडला. तुम्ही ह चित्रपट बनवला असता तर कसा केला असता ? -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
  • Log in or register to post comments

Submitted by आजानुकर्ण on गुरुवार, 11/20/2008 - 19:06

In reply to मला by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

Permalink

नसता बनवला

जीएंच्या कथेवर चित्रपट बनवणे हे फारच अवघड काम आहे. मात्र कैरी शक्य नाही. (कदाचित राधी आणि बळी या कथांवर चित्रपट बनवता आला असता. तोदेखील कथेतील नाट्यमय प्रसंगांमुळे. मात्र तेदेखील बटबटीत झाले असते असे वाटते.) किंबहुना कैरीच्या चित्रपटरूपांतरासाठी अमोल पालेकरांची निवड ही जीएंनी मान्यता दिल्यानंतर झाली होती हे याबाबतीत नमूद करण्यासारखे आहे. जीएंचा चित्रपट या माध्यमाचा(ही) किती मोठा अभ्यास होता हे त्यांच्या पत्रांवरून कळेलच. जीएंनी त्यांच्या कथांमध्ये किंवा आत्मचरित्रमय वाटावे अशा 'आरभाट' मध्येही चित्रपटांबाबत फारसे लिहिलेले नाही. मात्र मुक्तसुनीत यांनी ज्या 'कुसुमगुंजा' संग्रहातील कथेबाबत येथे लिहिले आहे त्या संग्रहात असलेल्या 'एक मित्र एक कथा' या कथेत जीएंच्या चित्रपटप्रेमाची व या माध्यमातील बारकाव्यांच्या माहितीची एक झलक पाहायला मिळते. (मला वाटते जीएंची हातकणंगलेकर आणि आचवलांशी चित्रपटगृहातच ओळख झाली.) कैरीबाबत पालेकरांशी होत असलेल्या जीएंच्या पत्रव्यवहारात कैरीतील तुळसा या पात्राच्या व्यक्तीरेखेबद्दल एक प्रसंग आहे. (ज्यांनी कैरी वाचली नाही त्यांनी माफ करावे). चित्रपटाच्या पटकथेत तुळसाचा प्रवेश होतो तेव्हा अंगणात खेळत असलेल्या कथानायकाला ती 'काय रे काय करतोयेस' अशी विचारेल असे पालेकरांनी लिहिले होते. मूळ कथेत हा प्रसंग नाही. चित्रपट माध्यमाच्या संकेतांनुसार चित्रपट रटाळ होऊ द्यायचा नसेल म्हणून पालेकरांनी हा संवाद टाकला असावा. मात्र यावर जीएंनी नेमका आक्षेप घेतला आहे. एक तर तुळसाला त्या मुलाबद्दल काडीचेही प्रेम नाही. आणि पालेकरांच्या सांगितलेल्या संवादातून तिला मुलाबद्दल काहीतरी वाटत आहे हे सूचित होते. जे कथेच्या मूळ गाभ्याशी अप्रामाणिक आहे. तसाच प्रसंग बागेत मोर दिसतात तेव्हा. 'वो तो यूं आते है और चुटकीमे चले जाते है' हा प्रसंग फारच बाळबोध. अर्थात हे तर केवळ काहीच प्रसंग आहेत. कैरी चित्रपटाची प्रगती होत असताना जीए कदाचित शेवटचे आजारी पडले आणि सुदैवाने चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा ते नव्हतेच हीच काय ती एक चांगली गोष्ट असे उपरोधाने म्हणावेसे वाटते. शांताराम बापूंनी 'चानी'चे जे केले त्यापेक्षा थोडे कमी वाईट पालेकरांनी 'कैरी'चे केले असे म्हणता येईल. आपला, (चित्रपटसमीक्षक) आजानुकर्ण कणेकर
  • Log in or register to post comments

Submitted by आजानुकर्ण on Sat, 11/22/2008 - 02:59

In reply to नसता बनवला by आजानुकर्ण

Permalink

कृपया

फक्त माझेच प्रतिसाद उडवण्याबरोबरच इतर हिणकस प्रतिसादही उडवावेत असे सफाईकामगारांना मी जाहीर आवाहन करतो. आपला (मिपावरचा पूर्वाश्रमीचा सफाईकामगार) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments

Submitted by कोलबेर on Sat, 11/22/2008 - 03:02

In reply to कृपया by आजानुकर्ण

Permalink

सहमत

तसेच माझ्या प्रतिसादात नक्की हिणकस (वैयक्तिक शेरेबाजी) काय होते ते देखिल इथले संपादक मंडळ कळवेल का?
  • Log in or register to post comments

Submitted by आजानुकर्ण on गुरुवार, 11/20/2008 - 07:44

In reply to सुरेख! by कोलबेर

Permalink

चैत्र, फेड आणि आणखी एक

ज्यामध्ये गावात सर्कस आलेली असते ती कथा. फार सुरेख. मात्र कुसुमगुंजा मधली पत्रातून उलगडणारी कथा आणि 'एक मित्र एक कथा' या अप्रतिम. कुसुमगुंजातील निरोप, आणि लाल डोळ्यांचा पक्षीही सुंदर. आपला, (समीक्षक) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments

Submitted by सर्किट (verified= न पडताळणी केलेला) on गुरुवार, 11/20/2008 - 02:48

Permalink

ही कथा

जी एंची मला अतिशय आवडणारी ही कथा. (मागे बहुधा संजोपरावांनी कुठेतरी टंकली होती.) चित्रपट पहायलाच हवा. सोनाली कुलकर्णी ही अतिशय गुणी अभिनेत्री आहे. -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्तसुनीत on गुरुवार, 11/20/2008 - 08:55

In reply to ही कथा by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

Permalink

दुवा

मागे बहुधा संजोपरावांनी "कुठेतरी" टंकली होती त्याचा दुवा.
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on गुरुवार, 11/20/2008 - 02:51

Permalink

मी जी.ए.वाचलेले नाहीत.

पण चित्रपट नक्कीच बघायचा आहे आणि त्यानंतर कथा वाचावी असे मनात आहे. चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by योगी९०० on गुरुवार, 11/20/2008 - 03:27

Permalink

एका मराठी मालिकेत बघीतली होती ही कथा

एका मराठी मालिकेत बघीतली होती ही कथा ..त्याला आता खुपच वर्ष झाली. अर्ध्या तासात नीटनेटकेपणाने ही कथा उभी केली होती. आईची भुमिका आशा काळेनी सशक्तपणाने साकारली होती. खादाडमाऊ
  • Log in or register to post comments

Submitted by नंदन on गुरुवार, 11/20/2008 - 04:51

Permalink

उत्तम

रसग्रहण. दूरदर्शनवर फार पूर्वी (१९९०-९२ चा सुमार असेल), उत्तम कथांचे चित्रीकरण करणारी एक मालिका लागायची. मोकाशींची 'आता आमोद सुनासि आले' आणि जी.एं.ची ही चैत्र कथा - खादाडमाऊ म्हणतात तसे - तेव्हा पाहिल्याचे आठवते. फक्त आईच्या भूमिकेत आशा काळे नव्हत्या, तर गोट्या मालिकेत गोट्याच्या आईची भूमिका करणारी अभिनेत्री होती.(स्मरणशक्ती दगा देत नसल्यास)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती दिनेश on गुरुवार, 11/20/2008 - 12:50

In reply to उत्तम by नंदन

Permalink

उत्तम..

गोट्या मालिकेत गोट्याच्या आईची भूमिका करणारी अभिनेत्री - मानसी मागीकर ? सुनीतराव, रसग्रहण आवडले. कथा खूप वर्षांपूर्वी वाचली होती पण आता हा चित्रपट मिळवून पहावाच लागणार असे दिसते आहे. स्वाती
  • Log in or register to post comments

Submitted by घाटावरचे भट on गुरुवार, 11/20/2008 - 14:52

In reply to उत्तम.. by स्वाती दिनेश

Permalink

>>गोट्या

>>गोट्या मालिकेत गोट्याच्या आईची भूमिका करणारी अभिनेत्री - मानसी मागीकर ? बरोबर.
  • Log in or register to post comments

Submitted by रामदास on गुरुवार, 11/20/2008 - 06:59

Permalink

मुक्तसुनीत

आभारी आहे. इकडे सिडी मिळाली तर नक्कीच बघेन हा चैत्रपट. अर्थात जी.एं.च्या गोष्टीवर सिनेमा बनवायचा हे एक मोठे आव्हानच. तीस मिनीटाची लांबी आहे म्हणजे कथेला जरापण धक्का न लावता बनवलेला असावा.
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on गुरुवार, 11/20/2008 - 22:01

In reply to मुक्तसुनीत by रामदास

Permalink

हेच म्हणते..

खूप छान परिक्षण लिहिले आहे. चित्रपट पहावाच लागेल असं वाटतं आहे.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on गुरुवार, 11/20/2008 - 07:33

Permalink

स्सही !!!

चित्रपट पाहणे जेव्हा होईल तेव्हा होईल. आपण मात्र डोळ्यासमोर चलचित्र उभे केले. कथेचे रसग्रहण आवडले. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on गुरुवार, 11/20/2008 - 07:34

Permalink

वि चि त्र!

गरीबी आली तरी मोठे सण करा, माणुस मेला तरी कळु द्यायचे नाही??/ व्हॉट क्रॅप?? हे म्हणजे १७ वर्षाच्या शरद्चंद्राने देवदास लिहावा व सगळ्यांनी वाहवा करावी तशीच बालीश कथा... असो. >आयुष्यात चालताना आपण शक्यतो चिखल टाळावा. शिवाय आपल्या साध्या चालण्याने इतरांवरही तो उडणार नाही याची काळजी घ्यावी. आणि म्हणे त्यांनी जी ए कोळुन प्यायला. त्यांना समजला. बी. एस. अवांतर - चैत्रपेक्षा, जुन्या काळातील कथानक असलेला वास्तुपुरुष मला तरी जास्त बरा वाटला. त्यातली आई योग्य ते व तसे संस्कार देउन मोठे करते मुलाला.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्तसुनीत on गुरुवार, 11/20/2008 - 08:23

In reply to वि चि त्र! by सहज

Permalink

रोचक अभिप्राय

सहजरावांचा अभिप्राय रोचक आहे. केवळ त्यांनी कथेच्या (त्यांना कळलेल्या) आशयाला "काय मल-सदृष !" असे वर्णिल्यामुळे मी हे म्हणत नाही ; तर माझा कथानक पोचवण्याचा प्रयत्न किती तोकडा होता हे त्यातून दिसले म्हंणून. जी एंच्याच भाषेत संगायचे तर एखाद्या अस्सल कथेचा सारांश देणे म्हणजे एखाद्या कुलवंत घोड्याचा किंवा अमीर खाँ साहेबांच्या एखाद्या ख्यालाचा सारांश देण्यासारखे आहे :-) असो. कुठल्याही नाटकृतीचा/कादंबरी/चित्रपट कृतीचा आस्वाद घेताना त्या काळाचा पर्स्पेक्टीव्ह असणे आवश्यक ठरते. "गरीबी आली तरी मोठे सण करा, माणुस मेला तरी क ळू द्यायचे नाही" वगैरे सारख्या गोष्टी आपल्याला आता क्रॅप वाटतात ; परंतु ही मूल्ये ७५ वर्षांपूर्वीची आहेत हे वाचक/प्रेक्षक लक्षात घेईल तर कदाचित त्याला त्या कृतीकडे किंचित जास्त सहानुभूतीने पहाताही येईल. असो. प्रामाणिक अभिप्रायाकरता मी माझ्या या मित्राचे विशेष आभार मानतो. (यात उपहास नाही. प्रामाणिक अभिप्राय दिला म्हणूनच विशेष आभार. पटले नसतानाही तोंडदेखले "साधु साधु" म्हणणे फार वाईट.)
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on गुरुवार, 11/20/2008 - 09:30

In reply to रोचक अभिप्राय by मुक्तसुनीत

Permalink

धन्यवाद

>माझा कथानक पोचवण्याचा प्रयत्न किती तोकडा होता हे त्यातून दिसले म्हंणून. असहमत. अजिबात नाही. मुक्तसुनित यांनी ओळख अतिशय छान करुन दिली आहे व तरी मला काही ते कथानक पसंत नाही पडले म्हणून व केवळ मुक्तसुनित यांनी लिहले आहे म्हणुन प्रतिसाद दिला. मुक्तसुनित "नकारात्मक" प्रतिसाद योग्यरित्या हाताळु शकतात हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. मराठी आंतरजालावर ह्याची नितांत गरज आहे. कर्णाने दुवा दिलेल्या "फेड" चे कथानक जास्त चांगले तरी ते फक्त चैत्रच्या तुलनेत असेच म्हणेन. अर्थात वैयक्तिक आवडीचा भाग मोठा. जे पटले नाही, ते का पटले नाही इतकेच सांगीतले. एखाद्याला आवडले नाही म्हणुन ती व्यक्तिच वाईट किंवा गाढव-गुळ हे वर्गीकरण स्वयंघोषीत समिक्षकाचे काम. आधी हाकलले तरी परत परत जादा प्रेक्षक दिसलेल्या घोळक्यात घुसुन टिमकी वाजवु पहाणारे बालिश पोर व त्याची भंपक मतं / आवड यांना देखील इथे वाव दिला जातो. हे मिपाचे वैशिष्ट्य. ...जास्त सहानुभूतीने पहाताही येईल. तेच तर चालू आहे. जुन्या गोष्टीच नव्हे तर नव्या चाळ्यांकडे देखील सहानुभूतीनेच पहावे लागते. :-)
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on गुरुवार, 11/20/2008 - 07:45

Permalink

आवर्तन डिव्हीडी

मंडळी, वरती उल्लेखलेल्या आवर्तन च्या २ डिव्हीडींचे सेट्स कोणाला अमेरिकेत हवे असल्यास मला व्य. नि. ने mailing address कळवा. पाठवायची व्यवस्था करेन.
  • Log in or register to post comments

Submitted by आजानुकर्ण on गुरुवार, 11/20/2008 - 07:52

Permalink

व्वा

आयुष्यात चालताना आपण शक्यतो चिखल टाळावा. शिवाय आपल्या साध्या चालण्याने इतरांवरही तो उडणार नाही याची काळजी घ्यावी. सुरेख. संस्कारांची खरी ओळख असणाऱ्या व्यक्तींना वरील वाक्यातील संवेदनशीलता आणि सुसंस्कृतपणा जाणवल्याशिवाय राहणार नाही. आपला, (सुसंस्कृत) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments

Submitted by कोलबेर on गुरुवार, 11/20/2008 - 08:21

In reply to व्वा by आजानुकर्ण

Permalink

अरेच्या!!

अरेच्या!! इथला बिरुटे सरांचा प्रतिसाद कुठे गेला?
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on गुरुवार, 11/20/2008 - 21:40

In reply to अरेच्या!! by कोलबेर

Permalink

हम्म :(

>>अरेच्या!! इथला बिरुटे सरांचा प्रतिसाद कुठे गेला? आमचा प्रतिसाद उडवलेला दिसतो. चलो, कोयी बात नही ! :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Fri, 11/21/2008 - 06:50

In reply to व्वा by आजानुकर्ण

Permalink

जीएंचे एक्सपर्ट...आणि मिपाचे संपादक :)

सुरेख. संस्कारांची खरी ओळख असणाऱ्या व्यक्तींना वरील वाक्यातील संवेदनशीलता आणि सुसंस्कृतपणा जाणवल्याशिवाय राहणार नाही. सहमत

अवांतर : जीए आणि जीएंच्या कथेंवर एक्सपर्ट लोकांच्या प्रतिसादाच्या प्रतीक्षेत

असा लिहिलेला माझा प्रतिसाद संपादकांनी उडवला. अर्थात हे विषयांतर असेल तर विषयाच्याच निमित्ताने याच चर्चेत इतर प्रतिसादात भरपूर विषयांतर आहे.सदरील प्रतिसाद ज्या संपादकांनी उडवला त्या संपादकांना माझाही जरासा खूलासा. :)

जीएंच्या बद्दल आणि जीएंच्या कथांवर मराठी संकेतस्थळांवर भरभरुन बोलणारे  मोजकी मंडळी आहेत त्यांना उद्देशून माझा प्रतिसाद होता. त्यांनी काही लिहावे याच उद्देशाने तसे लिहिले होते.  यात लपवण्यासारखे काही नाही, पण यात उडवण्यासारखे काय होते हे मला अजूनही कळले नाही.

संस्काराच्या निमित्ताने असे वाटले होते की, जीएंबद्दल असे म्हटल्या जाते की, 'अश्रद्धा' हा त्यांच्या जीवनाचा मूलाधार होता.याला काही लोक चिकित्सकपणाही म्हणतात. जीएंच्या कथांमधले वातावरण, पात्रांचे जीवन, जीवन जगण्याच्या माणसाच्या वेगवेगळा तर्‍हा, त्यांचे संघर्ष आणि त्यातून मानवी जीवनाचा एक अर्थ असे चित्र बर्‍याचदा जीएंच्या कथा वाचतांना दिसतो आणि जीएंना त्याच गोष्टीचे आकर्षण होते. आपल्या जे वाट्याला आले आहे, त्याला नियती जवाबदार आहे त्यापासून सूटका नाही  त्या दृष्टीने मी  'मधूच्या  आईकडे' पाहतो. "म्हणजे आपले बाबा गेले हे त्यांना कळू द्यायचे नव्हते होय ?" माणूस गेल्यानंतर गावातल्या लोकांना कळू नये, वगैरे, हे आपले वाचकांचे तर्क आहेत. लेखकाला ओढ आहे ती नियतीवादाची.  नियतीपुढे मानव शरण जातो. आपल्या नशिबातले चुकत  नाही. असा काहीसा बोध त्यांच्या कथा वाचतांना होत असतो, समाजविषयक चिंतन हा त्यांचा विषय कधीच नव्हता असा जीएंच्या एक फुटकळ वाचक (उपरोधाने लिहित नाही) म्हणून मला वाटते.

म्हणून जीएंबद्दलच्या एक्सपर्ट वाचकांची काही वेगवेगळी मते यानिमित्ताने यावे, असे वाटले होते. यात उडवण्यासारखे काय होते. असो, मिपाचालकांनी कोणत्याही संपादकाच्या लेखन/प्रतिसादाबद्दल कोणत्याच कार्यात कधीच कोणताच हस्तक्षेप केला नाही. एक संपादक म्हणूनही मीही काही विचारणार नाही. पण एक मिपाचा सदस्य म्हणून विचाराल तर त्यात उडवण्यासारखे काहीच नव्हते त्याबाबतीत लिहिण्या-बोलण्याचे 'सदस्य' म्हणून माझे स्वातंत्र्य आबाधित आहे. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com