Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by ज्योति अळवणी on Fri, 02/27/2015 - 13:38
चाकोरिबद्ध आयुष्य नकोय मला गर गर फिरणारा भोवरा.. बनुन बघायचय मला भरारणारा तो पतंग- त्याची ती उंची; वा-याशी दोस्ती काटाकाटीची मस्ती... वेगळच जगण अनुभवायचय मला! चाकोरिबद्ध आयुष्य नकोय मला! Born clerk... died clerk सगळेच असतात; वेगळा option click फ़क्त थोडेच करतात; त्या थोड्यांमद्धे रहायचय मला... चाकोरिबद्ध आयुष्य नकोय मला! White color job आपला फंडा नाय... कोप-यावरच्या पक्याचा रुबाबसुद्धा जमत नाय.. एक वेगळ आयुष्य जगायचय मला... काय अन् कस कोणी सुचवतय का ज़रा? I.A.S., I. P.S. किंवा एखादा BUSINESS, 10 वि, 12 वि च्या result मूळे आई बाबा expects... यासर्व अपेक्षांपासून दूर जायचय मला... चाकोरिबद्ध आयुष्य नकोय मला! झटपट यश... भरपूर प्रसिद्धि... 'डी' gang ची सर्वानाच भिती... करू का try थोड? चाकोरीच्या बाहेर येण... Visky अन् rum च्या सोबतित धुंद होण... कुणाशीतरी हे सगळ discuss करायचय मला.. चाकोरिबद्ध आयुष्य नकोय मला! नकोच जगुस चाकोरीबद्ध... आयुष्य जगावच धुंद धुंद... चल तुला करवते एक वेगळी सैर; चाकोरीच्या बाहेर उजाडलेली जशी एकच तिमिर! धुंद निसर्ग धुंद नशा... Canvasवर उतरवून रंग.. बदलून टाक दिशा. निशब्द गुंफा, बोलकी स्कल्पचर्स... Archaeology मधे आहेत चाकोरी बाहेरची features... जगाचा प्रवास कर; प्रवासाचा picture कर... दिसणा-या प्रत्येक आश्चर्याचा मनापासून आदर कर... हे सुद्धा वेगळच आहे; चाकोरी बाहेरचच् आहे... तू वेगळा विचार करतोयस; यातच आयुष्याच गमक आहे. कळतिये ग आई मला तुझ्या विचारांची दिशा... चाकोरी बाहेरच्या आयुष्याच्या तिमिराची नशा... माझ्यात सामावलेल्य़ा तुझ्या प्रतिबिम्बाला हलवणार नाही... चाकोरी बाहेरच्या आयुष्याला गालबोट लावणार नाही!!!

Submitted by एस on Fri, 02/27/2015 - 13:42

Permalink

आपला पास!

मिपावरच्या नवकवितेला कुठलेच बोट लावणार नाही
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Fri, 02/27/2015 - 15:28

In reply to आपला पास! by एस

Permalink

मी पण मी पण!!

मी पण मी पण!!
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Fri, 02/27/2015 - 16:46

In reply to आपला पास! by एस

Permalink

मग काय लावणार

मग काय लावणार :)
  • Log in or register to post comments

Submitted by एस on Fri, 02/27/2015 - 17:39

In reply to मग काय लावणार by टवाळ कार्टा

Permalink

संपादक असतो तर कात्री लावली

संपादक असतो तर कात्री लावली असती. आता नाहीये तर तुम्हीच सांगा, काय लावू?
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Fri, 02/27/2015 - 17:57

In reply to संपादक असतो तर कात्री लावली by एस

Permalink

अश्लिलता ही पहाणार्याच्या

अश्लिलता ही पहाणार्याच्या नजरेत असते :P मी बोटाच्या ऐवजी "नखाबद्दल" बोलत होतो :)
  • Log in or register to post comments

Submitted by जेपी on Fri, 02/27/2015 - 18:24

In reply to अश्लिलता ही पहाणार्याच्या by टवाळ कार्टा

Permalink

अश्लील>>>

अश्लील>>> या निमीत्त बोकिलांच्या शाळेतील झेंडेसर आठवुन राहिले.. चला अश्लील करुन येतो... =))
  • Log in or register to post comments

Submitted by जेपी on Fri, 02/27/2015 - 17:40

In reply to मग काय लावणार by टवाळ कार्टा

Permalink

मग काय लावणार>> ओठ

मग काय लावणार>> ओठ *mosking*
  • Log in or register to post comments

Submitted by वेल्लाभट on Fri, 02/27/2015 - 14:33

Permalink

भाव पोचलेत पण काव्य गडबडलंय

भाव पोचलेत पण काव्य गडबडलंय कुठेतरी चांगला प्रयत्न.
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Fri, 02/27/2015 - 15:33

Permalink

इतकेच नमूद करतो आणि रजा घेतो...

चाकोरीबाहेर जगू पाहणारांच्या जगण्याचीही एक चाकोरीबद्ध पद्धत होऊनच जाते.
  • Log in or register to post comments

Submitted by आदूबाळ on Fri, 02/27/2015 - 16:35

Permalink

कळतिये ग आई मला तुझ्या

कळतिये ग आई मला तुझ्या विचारांची दिशा... चाकोरी बाहेरच्या आयुष्याच्या तिमिराची नशा...
चाकोरीबाहेर तिमिर आहे तर जायचंच कशाला मुळात तिथे कडमडायला?
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Fri, 02/27/2015 - 16:46

In reply to कळतिये ग आई मला तुझ्या by आदूबाळ

Permalink

चल तुला करवते एक वेगळी सैर;

चल तुला करवते एक वेगळी सैर; चाकोरीच्या बाहेर उजाडलेली जशी एकच तिमिर! हे पाहिलंत का? अहो त्यांचं उजाडणारं तिमीर वेगळया ग्रहावरचं तिमिर असावं :)
  • Log in or register to post comments

Submitted by असंका on Fri, 02/27/2015 - 16:49

In reply to चल तुला करवते एक वेगळी सैर; by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

(काय दृष्टी आहे!!)

:-)) (काय दृष्टी आहे!!)
  • Log in or register to post comments

Submitted by चौकटराजा on Sat, 02/28/2015 - 14:12

In reply to (काय दृष्टी आहे!!) by असंका

Permalink

मी इथे नवा होतो तेंव्हा ...

मी इथे नवा होतो तेंव्हा कविच्या कल्पनेचा पतंग कितीही उडाला तरी वास्तवाची दोरी त्याला चुकविता येत नाही अशा अर्थाचे काही विचार इथे मांडताच मला बर्‍याच जणानी घेरले होते. आज त्याची आठवण झाली. बाय द वे त्यांच्यातील काही आजही मिपाचे सदस्य आहेत. ते आजही म्हणतील 'हो तिमीरही प्रकाशरूप असतो .. निदान तो कविला तरी तसा दिसला .. त्याला तुमचे चिकित्सक ऑब्जेक्शन काय म्हणून ? एका शब्दप्रभूचे ते सगळे पंखे होते म्हणा !
  • Log in or register to post comments

Submitted by असंका on Sat, 02/28/2015 - 14:22

In reply to मी इथे नवा होतो तेंव्हा ... by चौकटराजा

Permalink

साहेब काय मंजे कायच कळ्ळं नाय

साहेब काय मंजे कायच कळ्ळं नाय...जरा लिंक तरी द्या!!
  • Log in or register to post comments

Submitted by स्वप्नांची राणी on Sat, 02/28/2015 - 21:06

In reply to चल तुला करवते एक वेगळी सैर; by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

वेगळया ग्रहावरचं...?

अच्छा...? तरिच... Visky पण मग तिथेच मिळत असावी...
  • Log in or register to post comments

Submitted by अजया on Fri, 02/27/2015 - 17:50

Permalink

आईग्गं

आईग्गं =))
  • Log in or register to post comments

Submitted by अजया on Fri, 02/27/2015 - 17:54

Permalink

मी काय म्हणते ताई,जरा

मी काय म्हणते ताई,जरा विश्रांती घेत जा ना मधुन मधुन.दिसामाजी काहीतरी ते टंकावे असा काही नियम नाही इथे.
  • Log in or register to post comments

Submitted by मनीषा on Fri, 02/27/2015 - 18:40

In reply to मी काय म्हणते ताई,जरा by अजया

Permalink

असं नाही लिहायचं . त्यांन्ना

असं नाही लिहायचं . त्यांन्ना वाईट वाटत. आधीच्या कविता- धाग्यावर तसं सांगितलं आहे त्यान्नी . छान आहे कविता ... बरं का .
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Fri, 02/27/2015 - 18:53

In reply to मी काय म्हणते ताई,जरा by अजया

Permalink

अहो, दोष त्यांचा नाहीच्च

अहो, दोष त्यांचा नाहीच्च मुळ्ळी... दिसामाजी काहीतरी ते लिहावे । प्रसंगी अखंडित वाचीत जावे ॥ असं समर्थ म्हणून गेले आहेत, त्याचं त्या पालन करताहेत. बघा, बघा, अश्या प्रयोगाव्दारे फायदा होतो असा पुरावा आहे... पॅम बेकर नावाच्या मानसशास्त्रज्ञाने म्हणे एक प्रयोग केला. त्यात तिने मानसिक रोग्यांना रोज काही ना काही लिहायला लावले आणि असे दिसून आले की त्या रोग्यांची रोगप्रतिकारशक्ती एकदम वाढली. पण माझ्या मते हा संशोधन प्रकल्प अर्धवट राहीला आहे. कारण, त्यात ते लेखन रोज वाचणार्‍यांची काय हालत होईल याचे निरिक्षण केलेले नाही... (उदा. असले वाचून वाचकांची रोगप्रतिकारशक्ती किंवा इतर काही एकदम कमी होईल किंवा कसे ???) बघा, हा प्रयोगाचा दुसरा भाग करून विश्वविख्यात शास्त्रज्ञ बनायची मोठी संधी मिपाकरांकडे चालून आली आहे. +D
  • Log in or register to post comments

Submitted by विशाखा पाटील on Fri, 02/27/2015 - 19:15

In reply to अहो, दोष त्यांचा नाहीच्च by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

अस्स होय! मग ज्योती आळवणी ताई

अस्स होय! मग ज्योती आळवणी ताई पण पॅम बेकरच्याच शिष्य दिसतात. या रोज वाचकांना प्रतिसाद लिहायला लावतात ना. @ ज्योति आळवणी, मला तुमच्या कविता खूप आवडतात. तुम्ही रोज एक कविता टाकतच चला. तुम्हाला व्यनी केला तर चालेल का?
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Fri, 02/27/2015 - 18:45

Permalink

चाकोरीबद्ध कविता नसली तरी

चाकोरीबद्ध कविता नसली तरी आवडली.
  • Log in or register to post comments

Submitted by यसवायजी on Fri, 02/27/2015 - 18:54

Permalink

पैदास सीझनेबल आहे की वर्षभर

पैदास सीझनेबल आहे की वर्षभर चालूच राहणार? :D
  • Log in or register to post comments

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on Fri, 02/27/2015 - 19:05

Permalink

कविता खुप खुप आवडली. मराठी

कविता खुप खुप आवडली. मराठी भाषेचा र्‍हास रोखण्यासाठी अश्याच नवकाव्याची आवश्यकता आहे. आपणास अश्या कविता लिहिण्याची प्रेरणा, स्फुर्ती आणि भरघोस उत्साह देवानी जरुर द्यावा. मिपावरच्या ह्या टवाळ आणि अच्रत मेल्या लोकांच्या तिमिरामधे तुमच्या कविता तेजकिरणे टाकित आहेत. अनेक वाचनमात्र असणार्‍या आयडी/ आयडेंटीटीज तुमच्या कवितांमधल्या अमोघ ताकदीमुळे प्रतिसाद लिहिते होत आहेत. महिनाभर ते असेच लिहित राहिले तर त्यांनाही तुमच्याकडुन प्रेरणा मिळेल. तेही आपलं दर्जेदार साहित्य इथे लिहितील. वैश्विक मराठी दिनानिमित्त एक नवमिपाकर म्हणुन मी तुमच्याकडे एवढी मागणी करतो. बाकी लिहित रहाचं. आपलं लिखाण फक्त कविता पातळीवरचं नं ठेवता लेख, अनुभव वगैरे वगैरे गोष्टींमार्फतही येतील अशी आशा मी बाळगतो. इथे लेटेष्ट लिखाणचं लिहिलं पाहिजे असं नाही. तुमच्या कडे चार-पाच वर्षापुर्वी लिहिलेले लेख, कविता वगैरे असतील तर जरुर टाका. इथल्या लेखनभुकाड्या (नवं लेखन वाचायसाठी उत्सुक) लोकांची भुक अफाट आहे. ते आपल्या लेखांच मनापासुन स्वागत करतीलचं. (नवमिपाकरांचा प्रवक्ता) कॅ.जॅ.स्पॅ.
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Fri, 02/27/2015 - 19:12

Permalink

डोळ्यापुढे तिमिर पसरला आणि

डोळ्यापुढे तिमिर पसरला आणि चुकीचा प्रतिसाद दिला गेला तर त्याला जबाबदार कोण?
  • Log in or register to post comments

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on Fri, 02/27/2015 - 19:13

In reply to डोळ्यापुढे तिमिर पसरला आणि by रेवती

Permalink

काव्यजनक...!!!

काव्यजनक...!!! बाकी नुसता तिमिर दिसत नाही हल्ली. त्यामधे बारिक बारिक काजवे पण असतात. ते पण एवढे की तिमिराची एखादी लकेर दिसते त्यामधुन =))
  • Log in or register to post comments

Submitted by ज्योति अळवणी on Fri, 02/27/2015 - 19:13

Permalink

बहुतेक मीपा कराना नविन

बहुतेक मीपा कराना नविन लिखाणापेक्षा व्यक्तींची allergy आहे; असे मला वाटते. योग्य शब्दात अपमान करणे ही पुणेकरांची खासियत आहे हे ऐकून होते... आता अनुभवले. धन्यवाद. एकदा या साईट वर नाव नोदवल्यानंतर मी काही add करावे की नाही हे सं.म. आणि मी यांच्यातील प्रश्न आहे; असे माझे मत आहे. बाकी... अनाहूत सल्ले आणि ओशट कमेंट्स यासाठीदेखिल आभारी आहे. आपल्या सर्वांचे म्हणणे बरोबर आहे... काहीही न add करता फ़क्त इथे नेमस्त लिहिणा-यांचे लेखन वाचावे हेच योग्य.
  • Log in or register to post comments

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on Fri, 02/27/2015 - 19:25

In reply to बहुतेक मीपा कराना नविन by ज्योति अळवणी

Permalink

ह्याच्यापे़क्षा जर का

ह्याच्यापे़क्षा जर का प्रतिसाद देण्यामधे आणि त्यातुन घडणार्‍या गमतीजमतीचा भाग जर का झालात तर कसं? जेवढ्या मिळुन मिसळुन वागाल तेवढ्या लवकर मिपा परिवाराचा भाग व्हाल. लोकही तुम्हाला ओळखायला लागतील त्या निमित्ताने. लिहित रहा. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on Fri, 02/27/2015 - 19:26

In reply to बहुतेक मीपा कराना नविन by ज्योति अळवणी

Permalink

तुम्हाला एक व्यनि केलाय तो

तुम्हाला एक व्यनि केलाय तो जरुर वाचा. प्रतिसाद अपेक्षित आहे. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Submitted by विशाखा पाटील on Fri, 02/27/2015 - 19:30

In reply to बहुतेक मीपा कराना नविन by ज्योति अळवणी

Permalink

१. कोणी लिहिलंय यापेक्षा काय

१. कोणी लिहिलंय यापेक्षा काय लिहिलंय, हे महत्वाचं असत. २. पुणेकरांचा इथे काय संबंध? इथे माझ्यासह अनेक जण मुळचे पुणेकर नाहीत. ३. टाकले (add) केले की ते वाचकांसाठी खुले होते. त्यावर प्रतिसाद येणारच. ४. तुमचा इतरांचे लेखन वाचण्याचा निर्णय आवडला. ५. 'नेमस्त' म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय ते कळले नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by मधुरा देशपांडे on Fri, 02/27/2015 - 19:33

In reply to १. कोणी लिहिलंय यापेक्षा काय by विशाखा पाटील

Permalink

+१००

प्रत्येक मुद्द्याला सहमती.
  • Log in or register to post comments

Submitted by पलाश on Fri, 02/27/2015 - 20:04

In reply to १. कोणी लिहिलंय यापेक्षा काय by विशाखा पाटील

Permalink

सहमत.

सहमत.
  • Log in or register to post comments

Submitted by सविता००१ on Sat, 02/28/2015 - 14:01

In reply to १. कोणी लिहिलंय यापेक्षा काय by विशाखा पाटील

Permalink

+१०००

अत्यंत सहमत. तुम्हाला न आवडलेल्या प्रतिक्रिया फक्त पुणेकरांनी दिल्यात असा जावईशोध लावल्याबद्द्ल अभिनंदन बरंका!
  • Log in or register to post comments

Submitted by असंका on Sat, 02/28/2015 - 14:25

In reply to १. कोणी लिहिलंय यापेक्षा काय by विशाखा पाटील

Permalink

शेवटचा प्रश्न अगदी नैसर्गिक

शेवटचा प्रश्न अगदी नैसर्गिक आहे.लेखिका/ कवयित्री बाईंनी कृपया समजून सांगावे...
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Fri, 02/27/2015 - 19:50

In reply to बहुतेक मीपा कराना नविन by ज्योति अळवणी

Permalink

माफ करा ज्योतीताई, तुम्हाला

माफ करा ज्योतीताई, तुम्हाला दुखवण्याचा हेतू नव्हता पण आधीही अनेकजणांनी सुचवल्याप्रमाणे दोन लेख, कवितांमध्ये थोडा वेळ घ्या! तुमचे लेख, कविता जरूर प्रकाशित करा पण अठवड्याला एक याप्रमाणे! हे मी सुचवतीये, अन्यथा मिपावर तसे काही बंधन नाही. रागावून वाचनमात्र राहू नका.
  • Log in or register to post comments

Submitted by यसवायजी on Sat, 02/28/2015 - 14:55

In reply to बहुतेक मीपा कराना नविन by ज्योति अळवणी

Permalink

** ओ! शट! **

ओशट म्हन्जे काय?
  • Log in or register to post comments

Submitted by मोहनराव on Fri, 02/27/2015 - 19:40

Permalink

चान चान!!

चान चान!!
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रगुप्त on Fri, 02/27/2015 - 20:33

Permalink

चाकोरिबद्ध आयुष्य

चाकोरिबद्ध आयुष्य नकोय मला
.... म्हणून आम्ही जे जे काही उद्योग केलेत, त्यातले काही इथे वाचा: मी चित्रकार कसा बनलो... काही आठवणी... http://www.misalpav.com/node/18587 आणखी काही: http://www.misalpav.com/user/9160/authored
  • Log in or register to post comments

Submitted by असंका on Fri, 02/27/2015 - 21:44

In reply to चाकोरिबद्ध आयुष्य by चित्रगुप्त

Permalink

सुरेख!! _/\_

सुरेख!! _/\_
  • Log in or register to post comments

Submitted by जेपी on Fri, 02/27/2015 - 20:33

Permalink

ज्योती ताई ,

ज्योती ताई , तुम्ही संजय कोकरे सायबांच्या संघटनेत सामील व्हा. या जुन्या लोकांना नवमिपाकरांच काय कौतीक नाय!!! (नमिसंअ)जेपी
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Fri, 02/27/2015 - 22:11

Permalink

बाकी अनाहिता एका अबलेच्या

बाकी अनाहिता एका अबलेच्या लेखावर वस्सकन खौचट प्रतिसाद देताना पाहून एक मिपकर म्हणुन शरम वगैरे वगैरे...
  • Log in or register to post comments

Submitted by खटपट्या on Fri, 02/27/2015 - 23:31

Permalink

कीती छान लिवता वो तुमी....

कीती छान लिवता वो तुमी.... बाकी कोणी काही म्हणोत, अल्पावधीत मी तुमचा फॅन झालो आहे.
कुणाशीतरी हे सगळ discuss करायचय मला..
इथेच, हीच जागा बरोबर आहे. सगळं discuss होणार....
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Sat, 02/28/2015 - 10:47

In reply to कीती छान लिवता वो तुमी.... by खटपट्या

Permalink

आणि डिस्कस थ्रो पण चांगला

आणि डिस्कस थ्रो पण चांगला रंगणार... :-)
  • Log in or register to post comments

Submitted by पिवळा डांबिस on Fri, 02/27/2015 - 23:32

Permalink

एक मार्ग सुचवतो बघा,

एक मार्ग सुचवतो बघा, चाकोरीबाहेर जगण्याचा, धृव-हवामान तज्ञ होऊन, अंटार्क्टिकावर रहाण्याचा... शांत सन्नाटा चोहिकडे, मग कवितांनाही खळ नाही, मज्जाच की हो सर्वत्र, कारण पेंग्विनना मराठी येत नाही.... :)
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Sat, 02/28/2015 - 00:01

In reply to एक मार्ग सुचवतो बघा, by पिवळा डांबिस

Permalink

हाहाहाहाहा!

काय ह्यां!!! *ROFL*
  • Log in or register to post comments

Submitted by पिवळा डांबिस on Sun, 03/01/2015 - 11:45

In reply to हाहाहाहाहा! by पैसा

Permalink

आमी काय केलां?

आमी काय केलां? नवोदित आसतलां म्हणान प्रोत्साहन दिला... आणाहितं आसतलां म्हणान पुरुषसुलभ दुर्लक्षही करून बघितलां... पण हे भंकस जिलब्यो संपतीत तर शपथ!!! प्रशासकांक तर काय मार्ग सुचलेलो दिसणां नाय, मगे आम्ही एक मार्ग सुचवलो!!!! :) काय, चुकलां काय?
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Sat, 02/28/2015 - 11:12

In reply to एक मार्ग सुचवतो बघा, by पिवळा डांबिस

Permalink

@कारण पेंग्विनना मराठी येत

@कारण पेंग्विनना मराठी येत नाही....>>> :-D पण सदर आय डी जर तिकडे गेला, तर त्यांनाही मरा ठि येइल!
  • Log in or register to post comments

Submitted by आदूबाळ on Sat, 02/28/2015 - 12:51

In reply to एक मार्ग सुचवतो बघा, by पिवळा डांबिस

Permalink

करेक्ट. आणखी तिथे सहा महीने

करेक्ट. आणखी तिथे सहा महीने तिमिर असतंच. एक्का काका म्हणतात तसं ते चमकतही असेल.
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Sat, 02/28/2015 - 13:15

In reply to करेक्ट. आणखी तिथे सहा महीने by आदूबाळ

Permalink

ह्ह्हा ह्ह्ह्हा ह्ह्ह्हा

ह्ह्हा ह्ह्ह्हा ह्ह्ह्हा =))
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Sat, 02/28/2015 - 13:35

In reply to करेक्ट. आणखी तिथे सहा महीने by आदूबाळ

Permalink

चमकणारे तिमिर...? छ्या बॉ...

चमकणारे तिमिर...? छ्या बॉ... नाही येत डोळ्यासमोर.. कवयिट्रीची विजुलायझेशन क्यापाषिटी भन्नाट हाय.. कॉलींग चित्रगुप्त... काहीतरी मदत करा......
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Sat, 02/28/2015 - 13:38

In reply to चमकणारे तिमिर...? छ्या बॉ... by संदीप डांगे

Permalink

समथिंग लायिक धिस..

Image removed.
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »
  • Log in or register to post comments
  • 13705 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com