आत्म"मुक्ति!
आज माझ्या आत्म्याला मुक्त मी केले जरी
बोलतो माझ्या सवे तो मुक्त तू केंव्हा तरी???
प्राण जातो ज्या कुडितून त्यास का मुक्ति म्हणा?
मरण येते परत जनना हाच त्याचा पाळणा.
मी विचारी हाय मृत्यो मुक्तिही मजला कुठे?
पानंगळं ही तव प्रवाही वाहते..!,सुटते कुठे???
तू न माझ्या अंतरिही मंदिरीही तूच तू.
शरिर मिळते त्या निसर्गी बदलता..तू ही ऋतू!
सांग मृत्यो खरी मुक्ती तू कधी देशिल का?
जर दिली तर तू कधिही..,मृत्यू तरं असशील का?
मृत्यू म्हणतो हाय आत्म्या सोडूनी जाऊ नको..
निसर्गाच्या परमं आत्मी तू तिथे राहू नको.
अरे तुम्हा तशी मुक्ति देण्यास का रे सांगता?
तुम्हा मुक्ति मिळे जेंव्हा होईल माझी-सांगता.
मी म्हणालो याच वेळी तू मला मारू नको.
मृत्यू म्हणतो , अरे चोरा तू मला तारू नको.
जनन मरणी तूच आत्मा मुक्तं तू ही हो खरा.
जगी माझे कार्यं करण्या जगू दे मजला जरा.
मी हि त्यावरं दया केली सोडुनी गेलो दुरी.
आत्म्याला मुक्त केले अतृप्तता धरुनी उरी!
मूळं रूपी मुळं प्रवाही मुक्त मी ही जाहलो.
अजुनी पुढचा जन्मं येण्या, अत्रुप्त आता राहिलो.
====================================
मी पहिला. आता वाचतो आत्मालेस
मी पहिला. आता वाचतो आत्मालेस
आयडीच्या बारश्यानिमित्त साभार
क्लिष्ट!!
अत्यंत सहज सुंदर असे काव्य.
थोड़ी अवघड वाटलि
छान कविता..
हही हही! असेच काहीसे
आत्म"मुक्ति!
परवा आत्मा राहिला होता, आता
आत्मा यांना सोडून गेला अन हे
दूष्ष्ष्ष्ट!
"दु दु कंजुस काका" असे हवे ना
ते "दू...दू" आत्मा बोलत असेल
आत्मा यांना सोडून गेला अन हे
अात्मालेस अत्रुप्त अजून
सहमतं. म्हणुन तर ते नावं
आता अत्रुप्त चे त्रुप्त कधी
ते तृप्तीच्या प्राप्तीची
आहे ती प्रतिक्षा वळणावर उभी।
(No subject)
वा गुर्जी !
अता ही माधुरी कोण?
अता???
@अता ही माधुरी कोण? >>>
छान.
मस्त हो बुवा.. सोडलं म्हणून
त्ये तांब्याधिपती मठाचे काम
ह्म्म्म.. तुमाला अॅडमिशन
बुवा..