हे असं लेखन आजकाल अभावानेच वाचायला मिळतं.
१. वाल्मीकीसारखा साक्षात्कार होण्याची आवश्यकता नाही. पण पण ..सहसंवेदनांचे डोळे फार उशिरा उघडतात.
२. दादा म्हणाले देवघर नसलं तरी चालेल पण एक शिवण घर हवय आम्हाला.
आईच्या शिवणकामाच्या कारकिर्दीला एक लाईफ टाईम ऍवॉर्ड मिळालं.
३. आई खुर्चीवर बसून मशिन कुरवाळते. मोठ्ठ्यानी रडते. डोकं टेकून हूंदके देत राहते.
गेल्या वर्षी डायबेटीस मुळे आईचे दोन्ही पाय कापल्यानंतर हे असचं चालू आहे. -
- डोळ्यात पाणी आलं
अफाट, अप्रतिम, ह्रिदयस्पर्षी. शब्द कमी पड्तील लिखाणाचे कौतुक करताना. मागे तुमचे काटेकोरांटीची फुले (तुमचेच होते ना ते पण?)?वाचले होते. ते पण निव्वळ अप्रतिम होते.
>>आता वाईट वाटतं की तिचा एकटेपण वाटून घ्यायला तेव्हा कुणिच नव्हतं. जेव्हा कळायला लागल तेव्हा वेळ नव्हता. घरातल्या बाईची ट्रॅजेडी आपोआप लिहीली जाते.
वाल्मीकीसारखा साक्षात्कार होण्याची आवश्यकता नाही. पण पण ..सहसंवेदनांचे डोळे फार उशिरा उघडतात.>>
काळजाला भीडलं!!!
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
गेल्या वर्षी डायबेटीस मुळे आईचे दोन्ही पाय कापल्यानंतर हे असचं चालू आहे.
शेवटच वाक्य वाचुन जीव चरकला आणि त्याच क्षणी आईचा चेहरा डोळ्यासमोर आला...........पाय हा अवयव फक्त नावापुरता शरीराला जोडलेला आहे त्यातल त्राण तर केंव्हाच निघुन गेलय्.आयुष्यभर संसारासाठी काढलेल्या खस्तांमुळे व खर्चाचा ताळमेळ बसवताना केवळ शक्य तितके पैसे वाचवता यावेत यासाठी तरुणपणी परळ ते वरळी ,आणि नंतर रेमंड ते हरिनिवास सर्कल असे रोजच्यारोज व सतत बरेच वर्ष चालत केलेल्या प्रवासापायी आज आई स्वतःच्या पायावर उभी देखिल राहु शकत नाही........
संसारासाठी व आपल्या पिलांसाठी सतत कष्ट उपसणार्या अश्या असंख्य माऊल्यांपुढे सदैव नतमस्तक...........
"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।
संध्याकाळी आई मात्र एकटी पडायची. तिचा गळा मात्र सुरेल होता त्यामुळी गाणं गुणगुणत एकतीच काम करायची. माझ्या कानावर येता जाता संस्कार व्हायला लागले.
घर दिव्यात मंद ...बघ अजून जळते वात..तेव्हाच म्हणायला शिकलो .
आता वाईट वाटतं की तिचा एकटेपण वाटून घ्यायला तेव्हा कुणिच नव्हतं. जेव्हा कळायला लागल तेव्हा वेळ नव्हता. घरातल्या बाईची ट्रॅजेडी आपोआप लिहीली जाते.
वाल्मीकीसारखा साक्षात्कार होण्याची आवश्यकता नाही. पण पण ..सहसंवेदनांचे डोळे फार उशिरा उघडतात.
आजही आई म्हटलं की मशिनवर बसलेली आईच आठवते.
निशब्द !!
जाहिरातीत शिलाई मशिन आलं की टीव्ही खाडकन बंद करून रडायला लागते. मावशीबाई आईला समजावतात. दादा मुके मुके हूओन बघत राहतात. मशिनच्या बाजूला आईची व्हीलचेअर आहे. आई खुर्चीवर बसून मशिन कुरवाळते. मोठ्ठ्यानी रडते. डोकं टेकून हूंदके देत राहते.
गेल्या वर्षी डायबेटीस मुळे आईचे दोन्ही पाय कापल्यानंतर हे असचं चालू आहे.
वाचून खुपच बधीर झाले ....डोळे पाणावले अन सुन्न झाले .. शेवटच्या Paragraph ने तर भलतिच भावनिक कलाटणी घेतली !
नेहमी प्रमाणेच अप्रतिम !!
~ वाहीदा
रामदासजी तूमचे लेखन नेहमीच अप्रतीम असते. हा लेख माझा वाचायचा सुटला होता.
आपल्यासारख्यांमुळे मिपा वर वारंवार यावेसे वाटते.
आपल्या नव्या लेखाच्या प्र्तीक्षेत --- मोहन
आपण तर नि:शब्द!
प्रसंगनिर्मिती आणि लेखनशैली अतिशय परिणामकारक..
आईंना प्रणाम आणि त्यांच्याप्रती कृतज्ञतेची भावना जोपासणार्या, त्यांनी आयुष्यभर केलेल्या श्रमांचे मोल समजून घेणार्या मुलां नातवंडांचही कौतुक..
माझा ब्लॉग - उपास मार आणि उपासमार
आईच्या शिवणकामाच्या कारकिर्दीला एक लाईफ टाईम ऍवॉर्ड मिळालं.
....................कित्येकदा वाचलं तरी शेवटच्या परीच्छेदानंतर नकळत डोळ्यात पाणी तरळते.
रामदासकाका, या दिवाळीच्या मुहूर्तावर तुमच्या लेखणीमधून अजून अशाच लेखांच्या माणकांची आशा आहे.
कसलं सुंदर लिहिलय ...
इंटर्नेटवर बर्याचदा "हसता हसता खुर्चीवरुन पडावे " असे विनोदी लेखन पहायला मिळते ...
पण इतकं हळ्वं करणारं लेखन फारच क्वचित ...
शेवट्याच्या वाक्यावर डोळ्यात पाणी तरळल :(
फारच मनस्वी... काळजला हात घालणारं लेखन !!
मध्यमवर्गीय कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध, कष्टणारी मागची पिढी, मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी घेतलेले कष्ट, प्रसंगी आपल्या आवडीनिवडींना मुरड घालून, आपली स्वप्ने बासनात गुंढाळून मुलांचे शिक्षण, कोणाचे लग्नकार्य, कोणाचा सांभाळ, कोणाचे आजारपण ह्या कौटुंबिक कर्तव्याला दिलेले प्राधान्य वगैरे वगैरे वाचताना मी माझा राहिलोच नाही. त्या घरातला सदस्य झालो, त्या कष्टाळू आणि सोशिक आईचा मुलगा झालो....शेवट वाचून अक्षरश: ढसाढसा रडलो.
आई आणि तिचे शिलाई मशीन हा माझ्याही बालपणाच्या आठवणींचा अविभाज्य भाग आहे.
ह्या इतक्या ताकदीच्या लि़खाणावर प्रतिक्रिया द्यायची माझी लायकी नाहीये, हे माहीत असूनही हिम्मत करतोय..
काका, शक्य झाल्यास तुम्हाला भेटून तुमचा हात हातात घेईल म्हणतो..
सगळा गोतावळा तूपात भिजवलेल्या वातींसारखा एकमेकांना धरून होता .
शब्दच खुंटले ह्या असल्या अस्सल उपमांपुढे..
मुजरा स्विकारावा, मालक !
आईची आठवण आली . माझ्या आईनेही वयाच्या पन्नाशीपर्यंत काम केलं .शेवटी गुढगे दुखीनं तिला मशिनीपासुन दूर केलं , पण माझ्या आणि माझ्या भावाचा शिक्षणाचा बराच वाटा आईच्या मशिनिनं उचललाय.
खुप छान मांडणी केलीय लेखाची .
आजही आई म्हटलं की मशिनवर बसलेली आईच आठवते.
"घरात खूप कधीच न पाहिलेले पैसे आले. पण आता ते हवे होते कुणाला.शिलाईच्या पैशावर वाढलेली मुलं श्रीमंत झाली होती. वेगवेगळ्या देशात राहत होती."
---एक नंबर वाक्य
फ्लॅटचा नकाशा दाखवायला आर्कीटेक्ट आला तेव्हा त्यानी कागदावर दाखवलं हे तुमचं देवघर. दादा म्हणाले देवघर नसलं तरी चालेल पण एक शिवण घर हवय आम्हाला.
--एकदम काळजाला भिडून गेले.
गेल्या वर्षी डायबेटीस मुळे आईचे दोन्ही पाय कापल्यानंतर हे असचं चालू आहे.
--ह्या वाक्यावर डोळ्यात खळकन पाणी आले.
बस नकळत कुठेतरी गुंतत जावे असे लिखाण, एकदम आवडेश.
सुंदर लिखाण .
पण गंमत बघा ! या मशीनचा धक्का मला फार मोठा बसला
बायकोला मनापासून साथ देणारा मी ,ती जेव्हा माहेरहून मशीन आणते म्हणाली तेंव्हा चक्क ओरडून नाही म्हणालो
ते मशीन तिने तिच्या पगारातून मोठ्या हौसेने घेतलेले होते
माझे ओरडणे ऐकून ती आशचर्याने पाहू लागली कारण असे मी ओरडत नाही
मराठी सिनेमा पाहणे हा नित्य कार्यक्रम असण्याचा हा परिणाम होता
शिवण्याचे मशीन आणि घरावर येणारे संकट यांचे घनिष्ट संबंध मी विसरूच शकत नव्हतो
ते मशीन मी आणि बायको निवृत्त झालो तेंव्हा घरी आणले
कालानुसार त्यात बदल केला ,त्याला इलेक्ट्रिक मोटार लावली पण तिला काम नसते
आता ते मशीन का घरात आहे याचे साधे सरळ उत्तर आताच्या पिढीला रुचेल ?
कॅलिडोस्कोप सारखं प्रत्येक वेळी नवं वाटणारं नि प्रत्येक वेळी वेगवेगळ्या प्रकारे भिडणारं, बरंचसंच्च रिलेट करणारं....
आईवडलांचे कष्ट, एकत्र घरातली परवड, एकाच्या जीवावर दुसर्यानं खाऊन माज दाखवणं, सगळे प्रकार. त्यातून घरातून बाहेर पडणं असं सगळं. नंतर ह्या माज कर्त्या काकानं वडिलोपार्जित जमीन परस्पर विकणं असं सगळं केलं.
वडील शिक्षक. अतिशयच सरळमार्गी. ट्युशनचा पैसा पण नको म्हणणारे.
१० बाय १५ च्या भाड्याच्या खोलीत रात्र रात्र शिवणयंत्र चालवणं, चहापावडर, गंध, कॉस्मेटिक्स, ब्लँकेट्स, ब्लाऊजपीस विकणं, हे सगळं आईनं केलंय. ७२ला लग्न झाल्यावर ८६-८९ बाह्य परीक्षा देऊन मराठी बी ए झाली. आईनं भाकरी करता करता नोट्स वाचून दाखवायच्या बहिणीने. ८९ ते २००३ बँक कलेक्शन चं पिग्मीचं काम. १०० रु ला ३ रुपये मिळणार. आज प्रत्येक वेळी हॉटेलात खर्च करताना, ब्राण्डेड कपडे घ्यायचे म्हटलं की आधी तेच आठवतं.
लिहीण्यासारखं बरंच आहे. बहिणींनी ह्यापेक्षाही जास्त हाल काढलेत.
आज ईशकृपेनं बरं आहे पण भूतकाळ आठवला की शहारायला होतं.
प्रतिक्रिया
अप्रतिम
पँडोराज बॉक्स
नि:शब्द
शिंपीणिचं घरटं - फार भावलं
केवळ
अफाट,
आता वाईट वाटतं
गेल्या
वा..
आधीपण
सुन्न केले ...
नि:शब्द!
हृद्य
अप्रतीम
खूप हृदयस्पर्शी, रामदास..
आSSई ग्ग !!!
माझी सायीसारखी सुरकुतलेली आजी
अप्रतिम ! आतून आतून आलेलं,
बापरे!
बापरे!
खुप भावस्पर्शी
कित्येकदा वाचलं तरी
रामदास तुमच्या कथा वाचायच्या
निशब्द... :-(
.
अप्रतिम लेखन
+१
तुम्ही आयडी सारखेच दिसता राव
म्हणजे निष्पाप, निरागस वैग्रे
मध्यमवर्गीय कौ
मध्यमवर्गीय कौटुंबिक
निव्वळ नि:शब्द.
कस्लं सुरेख
हा धागा वर आणल्याबद्द्ल शतशः धन्यवाद!
क्रांतीजींशी सहमत
निशब्द..
पुन्हा एकदा..
आईची आठवण आली . माझ्या आईनेही
खरच खूप छान वाट्ले वाचून..
खरच नि:शब्द.......
अप्रतिम लेखन
परत परत वर आणावा असा धागा..
"घरात खूप कधीच न पाहिलेले
शेवट वाचुन मन सुन्न झाले.
अप्रतिम लघुकथा !
वाह..
सुंदर लिखाण .
__/\___
कॅलिडोस्कोप सारखं प्रत्येक
..............