✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

वधू आणि वरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत का?

म
मुक्त विहारि यांनी
गुरुवार, 01/15/2015 - 03:24  ·  लेख
लेख
मला बरेच जण विचारतात की बाबारे कशाला आखातात नौकरी करतो? कालच एक लेख वाचला. (http://www.misalpav.com/node/30015) आणि मनांत थोडे विचारांचे काहूर उठले म्हणून हा काथ्या कुटत आहे. माझी सौ.आई गेली ५-६ वर्षे वधू-वर सुचक मंडळांत काम करते.तिच्या मतानुसार, आजकाल मुलांच्या आणि विशेषतः मुलींच्या अपेक्षा फार वाढल्या आहेत. भरपूर शिक्षण, भरगच्च पगार, स्वतःचा फ्लॅट आणि चार-चाकी असल्याशिवाय मुलांनी लग्नाच्या बाजारात उतरू नये असे सौ.आईचे मत पडले. शिक्षण आणि नौकरी , हे जरी मुलांच्या हातात असले तरी वयाच्या २६-२८ वर्षी स्वतःचा फ्लॅट असणारी तरूण मंडळी किती असतील? एकतर मुलांना शिक्षण द्या.नौकरी मिळवून द्यायला प्रयत्न करा.फ्लॅट घेवून द्या. मुलींचे एक बरे असते.जबादारीने शिकतात.नौकरी मिळवतात.फ्लॅट घेवून द्यायची आवश्यकता नसते. ह्यापेक्षा मुलगी असती तर अजिबात गल्फ मध्ये आलो नसतो. माझे लग्न झाले (१९९२ साली) त्यावेळी माझ्याकडे काहीच न्हवते. शिक्षण : जेमतेम डिप्लोमा पगार : २२००/- नौकरी : खाजगी. जागा : भाड्याची त्यात परत उंदीर आणि साप हे बिनभाड्याचे पोट-भाडेकरू. इंधन : रॉकेल (हे मात्र भरपूर असायचे.शेजारीच सरकारमान्य धान्य-दुकान होते.) वाहन : समोरच्या शेजार्‍याने दिलेली सायकल. आता सांगा त्या काळात पण मला कुणी मुलगी दिली असती का?पण सुदैवाने बायको भेटली ती पण मनापासून प्रेम करणारी. लग्नानंतर स्वपैशावर आणि स्वबळावर (त्यात पण बायकोने खूप मदत केली.) शिक्षण पुर्ण केले. शिक्षण वाढले, तशी जबाबदारी पण वाढली आणि पगार पण वाढला. अद्याप स्वतःची जागा नसली तरी, बायकोच्या नावाने फ्लॅट आहे. दोन मोटरसायकली आहेत.उगाच हौस न्हणून एक चार-चाकी २/३ कि.मी. साठी वापरून पण झाली. थोडक्यात काय? तर लग्नाच्या वेळी ज्या-ज्या गोष्टी न्हवत्या त्या सगळ्या गोष्टी २२-२३ वर्षात आल्याच की.आज-उद्याकडे माझी पण मुले वधू संशोधन करतील.त्यांना पण हाच प्रश्र्न भेडसावेल का?हल्लीच्या मुली तडजोड करायला तयार असतात का? संसारात तडजोडीला पर्याय नाही, हेच माझ्या मते सत्य. डिस्केमर : मी मुलांचा बाप म्हणून माझे विचार व्यक्त करत आहे.मुलींच्या पालकांचे मत जाणून घ्यायला नक्कीच आवडेल..
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
364375 वाचन

💬 प्रतिसाद (1423)

प्रतिक्रिया

दोन लोक परस्परसंमतीने काही का

सूड
गुरुवार, 01/22/2015 - 16:13 नवीन
दोन लोक परस्परसंमतीने काही का करेनात. जोवर कुणाला त्रास देत नाहीत तोवर संभोगाला असे हीन लेखायचे कारणच काय?
ब्याट्या ह्या वाक्यासाठी एक मँगो केसर मस्तानी लागू माझ्याकडून!! काय का करेनात, मला त्रास होत नाही तोवर त्या गोष्टीशी शष्प देणं घेणं नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

धन्स रे. आठवणीने घेईन!

बॅटमॅन
गुरुवार, 01/22/2015 - 16:19 नवीन
धन्स रे. आठवणीने घेईन!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

>>दुसर्याच्या बाईलीवर डोळा

सूड
गुरुवार, 01/22/2015 - 16:11 नवीन
>>दुसर्याच्या बाईलीवर डोळा ठेवला
दुसर्‍याच्या बायलेवर डोळा ठेवा कोण म्हणतंय, हौसच असेल तर आपल्या वेगवेगळ्या कराव्या!! आणि शिंची महाभारतातली उदाहरणे देता; त्या अर्जुनान् चार (का पाच?) लग्ने केलांन् ती बरी चाल्ली!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

अगदी अगदी....कृष्ण गोकुळात

बॅटमॅन
गुरुवार, 01/22/2015 - 16:19 नवीन
अगदी अगदी....कृष्ण गोकुळात गोपींशी काय काय करतो याची गीतगोविंदातली वर्णने चालतात. त्याची राधेबरोबरची वर्णने मिटक्या मारत वाचतात. पण तेच प्रत्यक्षात कुणी करू म्हटलं की पित्त खवळते. इतकेच असेल तर आपल्या ग्रंथांवर बंदी घालून दाखवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

खरे आहे लोक हो

विटेकर
गुरुवार, 01/22/2015 - 16:19 नवीन
खरे आहे लोक हो .... म्हणने तुमचे खरेच आहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

ह घ्या हो!!

सूड
गुरुवार, 01/22/2015 - 17:11 नवीन
ह घ्या हो!! यंदा मानाच्या पहिल्या पाच गणपतींत आलो की मी डोळे मिटायला मोकळा!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

खिक्क...कोणाचे डोळे

टवाळ कार्टा
गुरुवार, 01/22/2015 - 17:13 नवीन
खिक्क...कोणाचे डोळे मिटवायच्या मागे आहेस ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

तू निश्चिंत राहा, तुझे नाही

सूड
गुरुवार, 01/22/2015 - 17:17 नवीन
तू निश्चिंत राहा, तुझे नाही मिटायला लावणार!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

अरे मी पहिल्या ५ गणपतीत

टवाळ कार्टा
गुरुवार, 01/22/2015 - 17:19 नवीन
अरे मी पहिल्या ५ गणपतीत असणारै असे वाटतेय ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

बरं मग?

सूड
गुरुवार, 01/22/2015 - 17:21 नवीन
बरं मग?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

रक्षिती

सूड
गुरुवार, 01/22/2015 - 15:45 नवीन
रक्षिती
र्‍हस्व असायला हवाय का? बाकी ही ओळ कशासाठीही खपवून नेतात राव. मागे एकदा संभाजी बागेत 'वृक्षो रक्षति...' असा पाठभेद वाचला होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

बर .. दुसरी तर दुसरी वेलांटी

विटेकर
गुरुवार, 01/22/2015 - 16:01 नवीन
बर .. दुसरी तर दुसरी वेलांटी .. हाय काय अन नाय काय .. वृक्ष ? असेल बाबा , पुणे तिथे काय उणे ? आणि अर्थ तसाच घेतला तरी काही फार फरक पडत नाही. परस्परांचे रक्षण हा आपला धर्मच आहे. न राज्यं न राजाsssसीत न दण्ड्यो न च दण्डिक: | धर्मेणैव प्रजास्सर्वा रक्षन्ति स्म परस्परम || There is no kingdom nor any king; no criminal nor any judge to administer penalty to the criminal. People protect each other by virtue of dharma.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

ऑब्जेक्शन ओव्हररूल्ड!

एस
गुरुवार, 01/22/2015 - 16:29 नवीन
विवाहसंस्था हा समाजाचा पाया नव्हे. समाजाचा पाया हा समाजाने राहण्याची, एकत्र राहण्याची प्रवृत्ती आहे. सृष्टीतील सर्वच प्राणी 'सामाजिक' नसतात. बिबट्या, वाघ ह्यांच्यात नर-मादी केवळ मीलनापुरते एकत्र येतात तर सिंहांमध्ये, रानकुत्र्यांमध्ये कळप अथवा टोळी करून राहण्याची प्रवृत्ती दिसते. मानव हा समाजशील प्राणी आहे हे खरंच आहे आणि मानवसमाजाचा पाया लग्नसंस्था नाही हेही तसेच आहे. लग्न हे शारीरिक गरजेच्या पूर्तीसाठी निर्माण झालेला एक समाजव्यवहार आहे. लग्नाचा पाया हा शरीरसंबंध आहे. लग्न हे 'ऑप्शनल' आहे, कारण निव्वळ शारीरिक सुखासाठी किंवा दोन व्यक्तींनी एकत्र राहण्यासाठी ते केलेच पाहिजे असे काही नाही. समाजबांधणीची प्रक्रिया ही आदिम इतिहासात डोकावून पाहिले असते विवाहसंस्था अस्तित्त्वात येण्याच्या फार आधी सुरू झाली होती. तुम्ही भारतीय संस्कृतीचं उदाहरण देताय म्हणून सांगतो. वसंतोत्सव हा टोळीतील किंवा गणातील सर्व प्रजननक्षम स्त्रीपुरुषांनी एकत्र जमून मुक्त शृंगारात रात्र घालवावी आणि त्यामुळे प्रजोत्पादन व्हावे अशा स्वरूपाचा उत्सव होता. त्यात हळूहळू बदल होत पुढे अशा व्यवहारास औपचारिक स्वरूप येऊ लागले. त्यातही दोन व्यक्तींनी एकत्र रहायचे आणि त्यातील कुणी त्या नात्याबाहेर संबंध ठेवायचे नाहीत अशा प्रकारचे बंधन अस्तित्त्वात यायला अजूनही बराच काळ जावा लागला. नंतर हे नाते जन्मभराचे होणे ही पुढची पायरी, विधवापुनर्विवाहबंदी ही त्यापुढची पायरी, विवाहीत स्त्रियांची आणि काही प्रमाणात पुरुषांची घुसमट ही पायरी अशा टप्प्याटप्प्याने विवाहसंस्थेचे स्वरूप, फायदे आणि तोटेही विकसित होत गेले. आर्थिकदृष्ट्या विवाहसंस्थेची आवश्यकता भासली ती मानवसमूहांनी भटके, शिकारी जीवन सोडून शेती करायला सुरूवात केली तेव्हा. विवाहसंस्थेची लवचिकता हाही मुद्दा काही अगदी अतिप्रगत, अर्वाचिन नसून पूर्वीपासूनच ती आहे. बॅटमन यांनी दिलेल्या आदिवासींमधील, पशुपालक समूहांमधील अशी लवचिकता प्रातिनिधिक ठरावी. आदिवासींमध्ये, विशेषतः गोंड आदिवासींमध्ये एक 'घोटुल' नावाचा प्रकार अगदी वीस-तीस वर्षांपर्यंत अस्तित्त्वात होता. थोडा शोध घेऊन पहा घोटुल म्हणजे काय ते. पुढारलेपणाबरोबर, आर्थिक-सामाजिक स्वातंत्र्याबरोबर लग्न या संस्थेची अपरिहार्यता, कर्मकठोरपणा अगदी संपणार नसली तरी विवाहसंस्थेची वाटचाल तिच्या शिखरापासून उतरणीच्या दिशेने नक्कीच सुरू झाली आहे आणि ती अटळ आहे. लग्न मोडीत काढा असे मी म्हणत नाही. पण त्या गोष्टीस वाजवीपेक्षा जास्त महत्त्व देऊन आपल्या आणि इतरांच्याही आयुष्याचे मूल्यमापन त्याभोवती मर्यादित ठेऊ नका. समाजाच्या भुवयांना स्वतःच्या आयुष्याची होकायंत्रे बनू देऊ नका. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

एक नंबर प्रतिसाद.

बॅटमॅन
गुरुवार, 01/22/2015 - 16:33 नवीन
आवडला. त्यातही
समाजाच्या भुवयांना स्वतःच्या आयुष्याची होकायंत्रे बनू देऊ नका.
हे वाक्य एक नंबर जबराट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

अरे हे इतके सोप्पे आहे तर मग

विटेकर
गुरुवार, 01/22/2015 - 16:33 नवीन
अरे हे इतके सोप्पे आहे तर मग " वधू- वराच्या अपेक्षा" या गोष्टीवर का काथ्या कुटण्यात येतोय ? वसंतोत्सवाची वाट बघायची .. कशाला हवे ते जाचक विवाहबंधन ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

विटूकाका,

एस
गुरुवार, 01/22/2015 - 16:38 नवीन
मुद्द्यांना विचारपूर्वक आणि खुल्या दिलाने उत्तरे द्या. आपण 'सर्वज्ञ' किंवा 'मसीहा' यांच्यासारखे वागणार नाहीत अशी निदान आपल्याकडून अपेक्षा आहे. नपेक्षा सोडून द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

मी सर्वज्ञ असण्याचा प्रश्नच

विटेकर
गुरुवार, 01/22/2015 - 16:49 नवीन
मी सर्वज्ञ असण्याचा प्रश्नच नाही आणि तसा मी नाहीही. "भारतीय विवाह संस्थेचा इतिहास" ( वि का राजवाडे, गुग्लले तर पीदीएफ मिळेल ) वाचला तर तुम्ही सांगताय त्यापेक्षा भयानक गोष्टी समोर येतील. इतिहासातील/ पुराणातल्या नेमक्या कोणत्या गोष्टी आदर्श मानायचा यालाही काहीतरी ताळ तंत्र हवे की नको ? की मला सोयीस्कर आहे तेवढेच घेईन? सेक्स हा बेसिक इन्स्टि़क्ट आहे .. पण तो पशुन्चा ! जो पशुपासून मानव म्हणून उन्नत होऊ पाहतो त्याला धर्माधिश्ठित काम आणि अर्थ स्वीकारलाच पाहीजे. समाजाला फाट्यावर मारून मी जर कुत्र्या- मांजरां सारखा रस्त्यावर रत होणार असेन आणि पूर्वी हे निषिद्ध नव्हते म्हणून त्याचे समर्थन करणार असेन तर काय डोंबलाचा संतुलीत प्रतिसाद देणार? नपेक्शा मी गप्प बसणे पसंत करीन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

कुत्र्या-मांजरांसारखे रत होणे

बॅटमॅन
गुरुवार, 01/22/2015 - 16:52 नवीन
कुत्र्या-मांजरांसारखे रत होणे आणि पार्टनर बदलणे यात फरक नाही का? तुम्हांला तिटकारा असलेल्या गोष्टीबद्दल कसेही अंदाधुंद बोलावे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

तुम्ही सर्वज्ञ नाहीत हो,

एस
गुरुवार, 01/22/2015 - 17:06 नवीन
तुम्ही सर्वज्ञ नाहीत हो, 'सर्वज्ञ' आणि 'मसीहा' या पदव्या आहेत काही आयडींच्या. :-) भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास हे खरंच आपल्या संस्कृतीश्रेष्ठत्त्वाच्या, उदात्तीकरणाच्या ढोंगाचा पडदा फाडणारं पुस्तक आहे. प्रत्येकाने जरूर वाचावे असे. इतिहास, पुराणे इत्यादी माध्यमांतून आपण जे पाहतो, ऐकतो, शिकतो ते सर्वच जसेच्या तसे आंधळेपणाने स्वीकारणे हा तद्दन मूर्खपणा आहेच; तोच न्याय लावला तर अशीच बंधने तथाकथितरित्या पूर्वीपासूनच चालत आलेली आहेत म्हणून पुढेही टिकली पाहिजेत असे मानणे हेही चुकीचेच ठरेल. त्यातही ती टिकवण्याचे कर्तव्य स्वतःच्या शिरावर घेणे आणि समाजाच्या, संस्कृतीच्या प्रवाही स्वरूपाला विरोध करत बसणे हा तर नतद्रष्टपणाच म्हटला पाहिजे. लैंगिक गरजा ह्या मूलभूत गरजा पशूंच्या आणि मानवाच्याही आहेत. त्या नाकारण्याचे काही कारण नाही. इथेही तुम्हीच म्हटल्याप्रमाणे ताळतंत्र ठेवलेच पाहिजे, फक्त ते ताळतंत्र हे पूर्वसूरींनी सांगितलेल्या धर्माच्या नावाखाली चालत आलेल्या चालीरीतींप्रमाणे असण्यापेक्षा 'नैतिक' अधिष्ठानावर आधारित असायला हवे. नैतिकता आणि धार्मिकता ह्या दोन्ही संपूर्ण वेगवेगळ्या गोष्टी आहेत ही बाब इथे विशेष उल्लेखनीय. रस्त्यावर कामक्रीडेबाबत - ज्या समाजात ही फारशी विशेष बाब मानली जात नाही तिथे त्याचे कुणाला आश्चर्य वाटणार नाही. जिथे संपूर्ण बुरख्याआड स्त्रीचे आख्खे आयुष्य जाते तिथे पाण्याने भरलेला खड्डा चुकवण्यासाठी चार बोटे जरी तिने झगा वर घेतला तर तिच्या टाचाही कापल्या जातात (संदर्भ - तालिबान) त्या समाजात इतकीही गोष्ट धक्कादायकच मानली जाईल. प्रश्न पुनरेकवार समाजाच्या मूल्यांच्या प्रवाहीपणाचा आहे. ह्या प्रवाहीपणाला, बदलाला कुणालाही बांध घालता येणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

पूर्वी हे निषिद्ध नव्हते

सूड
गुरुवार, 01/22/2015 - 18:33 नवीन
पूर्वी हे निषिद्ध नव्हते म्हणून त्याचे समर्थन करणार असेन तर काय डोंबलाचा संतुलीत प्रतिसाद देणार?
किती मजेशीर आहे बघा हे विटुकाका!! आदर्शवाद जेव्हा पटवून सांगायचा असतो तेव्हा पुराणातली उदाहरणे चालतात, तेच जेव्हा जी गोष्ट तुम्ही आता निषिद्ध मानताय ती तुम्ही म्हणताय त्याच ग्रंथांमध्ये निषिद्ध नव्हती हे समोरचा जेव्हा सांगतो तेव्हा ते पटायला फारफार जड जातं. वर स्वॅप्स ने जे लिहीलंय त्यात समाजाला फाट्यावर मारायचा उल्लेख कुठेही दिसला नाही. उलट लोक काय म्हणतील याचा विचार करुन तुमच्या आयुष्यातले निर्णय नका घेऊ, इतका सरळसोट निष्कर्ष काढला मी!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

लग्न मोडीत काढा असे मी म्हणत

हाडक्या
गुरुवार, 01/22/2015 - 16:43 नवीन
लग्न मोडीत काढा असे मी म्हणत नाही. पण त्या गोष्टीस वाजवीपेक्षा जास्त महत्त्व देऊन आपल्या आणि इतरांच्याही आयुष्याचे मूल्यमापन त्याभोवती मर्यादित ठेऊ नका. समाजाच्या भुवयांना स्वतःच्या आयुष्याची होकायंत्रे बनू देऊ नका.
हा अख्खा प्रतिसादच सुंदर आहे. मला वाटत नाही, मी एवढ्या साक्षेपात मांडू शकलो असतो. :) जर सगळी वाक्ये तुमचीच असतील तर आमचा सलाम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

वसंतोत्सव हा पुरुषांच्या

सुबोध खरे
गुरुवार, 01/22/2015 - 18:52 नवीन
वसंतोत्सव हा पुरुषांच्या दृष्टीने अतिशय सोयीचा आहे परंतु त्यातून गरोदर झालेल्या स्त्रियांचे काय? मानवी आयुष्यात लहानपण हे सर्वात लांब असते. मुल पूर्णपणे स्वावलंबी व्हायला आदिवासींमध्ये सुद्धा १५ वर्षे जायला लागतात. मांजर बिबळे, वाघ किंवा चित्ते यांच्यात मादी हि पूर्ण पाने पिल्लाला एकटी वाढवते. तिचा गर्भधारणेचा काळ ८०-९० दिवस असतो. या काळात सुद्धा ती शिकार करून आपले पोट भरत असते. मानवी स्त्रीला २८० दिवस गर्भारपण असते यातील १०० दिवस ती पूर्ण स्वावलंबी नसते यानंतर १५० दिवस (५ महिने पूल पूर्णपणे तिच्या वर अवलंबून असते या काळात स्त्री हि पूर्ण स्वावलंबी नसते. निर्माण होणार्या संततीने आदिवासिंसारखे भटके जीवन जगायचे असेल तर वेगळे परंतु जर स्थिर जीवन जागून शिक्षण घ्यायचे असेल तर हा वसंतोत्सव स्त्रियांच्या कोणत्याही कामाचा नाही. क्षणाची मजा आणी आयुष्यभराची सजा हि स्थिती स्त्रियांच्या आणी पर्यायाने समाजाच्या हिताची नाही यामुळेच जगभरातील सर्व संस्कृती मध्ये लग्न हि संस्था उदयास आली. यात एका संस्कृतीचा दुसरीशी काहीही संबंध नसताना सगळीकडे थोड्याफार प्रमाणात सारखीच लग्नसंस्था का विकसित झाली याचा मुद्दाम विचार करा. भटक्या जमातीत फक्त मुक्त सेक्स आहे कारण होणार्या संततीला देण्यास पुरुषाकडे काहीच नसते. जेंव्हा मानव स्थिर जीवन जगायला लागला आणी आपली संपत्ती निर्माण करू लागला तेंव्हा हि संपत्ती आपल्याच संततीला जावी हा नैसर्गिक विचार त्याच्या मनात आला. त्याचबरोबर वृद्धावस्थेत आपली काळजी फक्त आपलीच संतती घेईल हा स्वार्थी विचारही त्यात होता. वसंतोत्सवात होणारी संतती माहित नसलेल्या पित्याची का काळजी घेईल. ( वाघ सिंह ई प्राणी आपली नसलेली संतती सरळ मारून टाकतात). यातून पत्नी हि केवल आपलीच असावी या हेतूने लग्न हि संस्था अस्तित्वात आली म्हणजे होणारी संतती आपलीच असावी हा हेतू साध्य करता आला. लग्न संस्था हि परिपूर्ण नाहीच पण त्याला सशक्त पर्याय अजूनतरी उपलब्ध नाही. आदिवासींचे उदाहरण फक्त त्यांच्या उन्मुक्त सेक्स पुरते देणे ठीक आहे पण नैसर्गिक आपत्तीत त्यांची होणारी परवड या बद्दल कोणी बोलत नाहीत. समजा पुण्यात ५० मुलामुलींचा गट उन्मुक्त जीवन जगत आहे आणी त्यातील १५ मुली पुढच्या ३ महिन्यात गरोदर झाल्या तर त्यांचे पुढे काय होणार हे सरळच दिसते. यावेळेस मग आपल्याला आधुनिक वैद्यक शास्त्राचा आधार घ्यावा लागेल. अन्यथा त्या मुलांचे आयुष्य अनाथालयात( यासाठी पण तुम्हाला समाजाची गरज पडतेच) कसे जाईल किंवा त्या कुमारी मतांचे आयुष्य कसे असेल याचा विचार करून पहा. आदिवासी सेक्स जीवनाबद्दल आकर्षण तेवढ्यापुरते ठीक आहे. सध्या इतकेच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

सिलेक्टिव्ह रीडिंगचे उदाहरण.

एस
गुरुवार, 01/22/2015 - 19:48 नवीन
सिलेक्टिव्ह रीडिंगचे उदाहरण. माझा प्रतिसाद वसंतोत्सवाबद्दल नसून समाजातील वाढत जाणार्‍या मोकळेपणाच्या अपरिहार्यतेबद्दल होता. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

आगामी निबंधस्पर्धा विषय

कंजूस
Fri, 01/23/2015 - 14:22 नवीन
आगामी निबंधस्पर्धा विषय 'विवाहसंस्थेचे भारतीय समाजातले स्थान' जज माननीय श्री स्वॉप्स.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

हाहाहा!

एस
Fri, 01/23/2015 - 15:16 नवीन
हाहाहा! बादवे, जज नाही, पण समुपदेशन कधीकधी करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

वाचतो आहे!!!!!!!

अविनाश पांढरकर
गुरुवार, 01/22/2015 - 16:06 नवीन
वाचतो आहे!!!!!!!
  • Log in or register to post comments

अजून नाना-माई आले नाहित..

टवाळ कार्टा
गुरुवार, 01/22/2015 - 16:34 नवीन
अजून नाना-माई आले नाहित...त्यांचे अनुभव घेउन अवांतर - का आधीच येउन गेले...दुसर्या रुपात ;)
  • Log in or register to post comments

हे असं होतं टका भौ.. जे आहेत

हाडक्या
गुरुवार, 01/22/2015 - 16:46 नवीन
हे असं होतं टका भौ.. जे आहेत किंवा जे कधी नव्हे ते आलेत, त्यांच्याकडे दुर्लक्ष आणि जे नाही आलेत (संक्षी, नाना, माई) त्यांचा धोसरा काढून उंबर्‍याबाहेर बघत बसायचे. असं कसं चालायचं हो ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

कधी कधी ते आले नाहित की आठवण

टवाळ कार्टा
गुरुवार, 01/22/2015 - 20:32 नवीन
कधी कधी ते आले नाहित की आठवण येते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या

इतके विचार वाचले पण पटतो एकच

सस्नेह
गुरुवार, 01/22/2015 - 16:45 नवीन
इतके विचार वाचले पण पटतो एकच !..
अरे संसार संसार, दोन जिवांचा विचार ! देतो सुखाला नकार, आणि दु:खाला होकार
..मग तो संसार आणि विचार लग्नाचा असो नाहीतर 'बिन'लग्नाचा !
  • Log in or register to post comments

+१

टवाळ कार्टा
गुरुवार, 01/22/2015 - 20:32 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

७००

टवाळ कार्टा
गुरुवार, 01/22/2015 - 16:58 नवीन
७००
  • Log in or register to post comments

टाळ्या... आणि हा ७०० वा

मीता
गुरुवार, 01/22/2015 - 16:59 नवीन
टाळ्या... आणि हा ७०० वा प्रतिसाद ..
  • Log in or register to post comments

(No subject)

टवाळ कार्टा
गुरुवार, 01/22/2015 - 17:02 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मीता

(No subject)

मीता
गुरुवार, 01/22/2015 - 17:08 नवीन
*beee*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

खिक्क...तुमची स्माईली बघून

टवाळ कार्टा
गुरुवार, 01/22/2015 - 17:10 नवीन
खिक्क...तुमची स्माईली बघून मिपावरच्या एका "बालीकेची" आठवण झाली ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मीता

अरे बास का आता?

पैसा
गुरुवार, 01/22/2015 - 17:00 नवीन
सगळ्यांचं समाधान झालं का? खरडफळ्याच्या पुढची अवस्था येण्यापूर्वी थांबूया आता!
  • Log in or register to post comments

थांबा की

बॅटमॅन
गुरुवार, 01/22/2015 - 17:02 नवीन
७०० झालेत. एकदाच फक्त १००० होऊद्या. मग बूच लावा कायमचं. आम्ही पुन्हा कध्धी कध्धी हट्ट धरणार नाही. शपथ!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

आवरा !

सस्नेह
गुरुवार, 01/22/2015 - 17:06 नवीन
आवरा ! *lol*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

अगदी अगदी...माझी पण

टवाळ कार्टा
गुरुवार, 01/22/2015 - 17:07 नवीन
अगदी अगदी...माझी पण प्रतिसादांची सेंच्युरी होईल ;) (पण मी टिमस्पिरीटने ब्याटींग करतो ;) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

आम्ही पण हेच म्हणतो. बाकी

हाडक्या
गुरुवार, 01/22/2015 - 17:31 नवीन
आम्ही पण हेच म्हणतो. बाकी संमं ला बूच लावायची एवढी का घाई असते ? खरच विचारतोय, म्हणजे मिपावर लोड येतो का ५०० वगैरे प्रतिसाद झाल्यावर ? कारण कदाचित एखाद्याला एखादा मुद्दा नंतर आठवेल मग हा धागा बंद ( आणि बंद का तर ५०० + झालेत ) म्हणून नवाच काढावा लागेल .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

धागा ओपन व्हायला

पैसा
गुरुवार, 01/22/2015 - 18:04 नवीन
धागा ओपन व्हायला वेळ लागतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या

आपण या धाग्याला लोड टेस्टींग

हाडक्या
गुरुवार, 01/22/2015 - 18:10 नवीन
आपण या धाग्याला लोड टेस्टींग समजू की मग.. किती ताणतंय ते पाहू . :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

आपण या धाग्याला लोड टेस्टींग समजू की मग...

मुक्त विहारि
Fri, 01/23/2015 - 10:33 नवीन
+ १ सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या

म्हणजे मिपा लाईव्ह जाताना

टवाळ कार्टा
Fri, 01/23/2015 - 10:37 नवीन
म्हणजे मिपा लाईव्ह जाताना विनाटेस्टींगचे रिलीज केले??? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

असेलही...

मुक्त विहारि
Fri, 01/23/2015 - 10:46 नवीन
ही हौशी साईट असल्याने, अजून पण इथे बरेचसे बग्स आहेत. उदा. १. दुसर्‍या पानापासून नविन प्रतिसाद दिसत नाहीत. २. आपल्या पीसी किंवा मोबाईल वरून फोटो टाकता न येणे.आधी गुगल मध्ये टाका आणि मग इथे लिंक द्या, असला द्राविडी प्राणायाम करायला लागतो. ३. खरड-वहीत आलेली खरड दिसत नाही. त्यामुळे प्रतिसादांचे लोड-टेस्टींग पण झालेले नसावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

(No subject)

टवाळ कार्टा
Fri, 01/23/2015 - 11:05 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

*मोबाइल व्ह्यू पर्याय ठेवलेला

कंजूस
Fri, 01/23/2015 - 14:35 नवीन
*मोबाइल व्ह्यू पर्याय ठेवलेला असला तर खरडवहीतली नोंद उघडूनच येते *इमेजिज ऑफ (/सिलेक्ट बैंडविड्थ=लो Low)ठेवूनच मोठे धागे पटकन उघडले जातात) .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

धागा ओपन व्हायला वेळ लागतोय.

टवाळ कार्टा
Fri, 01/23/2015 - 13:30 नवीन
धागा ओपन व्हायला वेळ लागतोय.
धागा उघडून प्रतिसादांसकट "पुर्ण" वाचेल का =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

आपण सर्वज्ञ - आपलं ते संपादक

एस
गुरुवार, 01/22/2015 - 17:31 नवीन
आपण सर्वज्ञ - आपलं ते संपादक आहात. काय तो साक्षेपाने निर्णय घ्या! :-) संपादकांनी आठवावे स्वरुप । संपादकांनी आठवावा साक्षेप । संपादकांनी आठवावा प्रताप । मिपावरी ॥
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
  • «
  • ‹
  • 12
  • 13
  • 14
  • 15
  • 16
  • 17
  • 18
  • 19
  • 20
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा