✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

वधू आणि वरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत का?

म
मुक्त विहारि यांनी
गुरुवार, 01/15/2015 - 03:24  ·  लेख
लेख
मला बरेच जण विचारतात की बाबारे कशाला आखातात नौकरी करतो? कालच एक लेख वाचला. (http://www.misalpav.com/node/30015) आणि मनांत थोडे विचारांचे काहूर उठले म्हणून हा काथ्या कुटत आहे. माझी सौ.आई गेली ५-६ वर्षे वधू-वर सुचक मंडळांत काम करते.तिच्या मतानुसार, आजकाल मुलांच्या आणि विशेषतः मुलींच्या अपेक्षा फार वाढल्या आहेत. भरपूर शिक्षण, भरगच्च पगार, स्वतःचा फ्लॅट आणि चार-चाकी असल्याशिवाय मुलांनी लग्नाच्या बाजारात उतरू नये असे सौ.आईचे मत पडले. शिक्षण आणि नौकरी , हे जरी मुलांच्या हातात असले तरी वयाच्या २६-२८ वर्षी स्वतःचा फ्लॅट असणारी तरूण मंडळी किती असतील? एकतर मुलांना शिक्षण द्या.नौकरी मिळवून द्यायला प्रयत्न करा.फ्लॅट घेवून द्या. मुलींचे एक बरे असते.जबादारीने शिकतात.नौकरी मिळवतात.फ्लॅट घेवून द्यायची आवश्यकता नसते. ह्यापेक्षा मुलगी असती तर अजिबात गल्फ मध्ये आलो नसतो. माझे लग्न झाले (१९९२ साली) त्यावेळी माझ्याकडे काहीच न्हवते. शिक्षण : जेमतेम डिप्लोमा पगार : २२००/- नौकरी : खाजगी. जागा : भाड्याची त्यात परत उंदीर आणि साप हे बिनभाड्याचे पोट-भाडेकरू. इंधन : रॉकेल (हे मात्र भरपूर असायचे.शेजारीच सरकारमान्य धान्य-दुकान होते.) वाहन : समोरच्या शेजार्‍याने दिलेली सायकल. आता सांगा त्या काळात पण मला कुणी मुलगी दिली असती का?पण सुदैवाने बायको भेटली ती पण मनापासून प्रेम करणारी. लग्नानंतर स्वपैशावर आणि स्वबळावर (त्यात पण बायकोने खूप मदत केली.) शिक्षण पुर्ण केले. शिक्षण वाढले, तशी जबाबदारी पण वाढली आणि पगार पण वाढला. अद्याप स्वतःची जागा नसली तरी, बायकोच्या नावाने फ्लॅट आहे. दोन मोटरसायकली आहेत.उगाच हौस न्हणून एक चार-चाकी २/३ कि.मी. साठी वापरून पण झाली. थोडक्यात काय? तर लग्नाच्या वेळी ज्या-ज्या गोष्टी न्हवत्या त्या सगळ्या गोष्टी २२-२३ वर्षात आल्याच की.आज-उद्याकडे माझी पण मुले वधू संशोधन करतील.त्यांना पण हाच प्रश्र्न भेडसावेल का?हल्लीच्या मुली तडजोड करायला तयार असतात का? संसारात तडजोडीला पर्याय नाही, हेच माझ्या मते सत्य. डिस्केमर : मी मुलांचा बाप म्हणून माझे विचार व्यक्त करत आहे.मुलींच्या पालकांचे मत जाणून घ्यायला नक्कीच आवडेल..
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
364375 वाचन

💬 प्रतिसाद (1423)

प्रतिक्रिया

चिरंतन धागा..

मोहनराव
गुरुवार, 01/22/2015 - 17:06 नवीन
चिरंतन धागा..
  • Log in or register to post comments

हो तर!! आता संपादक उदंड नाही

सूड
गुरुवार, 01/22/2015 - 17:12 नवीन
हो तर!! आता संपादक उदंड नाही म्हणत तोवर मेंबरं आपले प्रतिसाद ओतत राहणार!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोहनराव

मिपावर hall of fame वगैरे

साधा मुलगा
गुरुवार, 01/22/2015 - 17:27 नवीन
मिपावर hall of fame वगैरे प्रकार आहे का? सर्वात जास्त प्रतिक्रियेचा धागा, सर्वात जास्त वाचनाचा धागा वगैरे वगैरे? याचे statics कुणाकडे आहे का?
  • Log in or register to post comments

हे घ्या!!

मोहनराव
गुरुवार, 01/22/2015 - 20:50 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साधा मुलगा

top १० धागे

मोहनराव
गुरुवार, 01/22/2015 - 20:52 नवीन
top १० धागे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोहनराव

कंटाळा आला आता,

मृत्युन्जय
गुरुवार, 01/22/2015 - 17:42 नवीन
कंटाळा आला आता,
  • Log in or register to post comments

तुमचा कंटाळा जरा वेळ आवरून

बॅटमॅन
गुरुवार, 01/22/2015 - 17:49 नवीन
तुमचा कंटाळा जरा वेळ आवरून धरा. १००० होऊदेत मग आमी सगळे सग्गळे गुड बॉईज़ होणार आहोत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

तुम्हाला कळत कसे नाही. माझा

मृत्युन्जय
गुरुवार, 01/22/2015 - 18:09 नवीन
तुम्हाला कळत कसे नाही. माझा एक एक प्रतिसाद धाग्याला इंचाइंचाने १००० कडे नेउन इतिहासाचे पुनर्लेखन करायला भाग पाडत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

अर्र हो की. कळालंच नाही.

बॅटमॅन
गुरुवार, 01/22/2015 - 18:11 नवीन
अर्र हो की. कळालंच नाही. आयमाय स्वारी. इंचाइंचाने धागा तारू!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

वाचत आहे,कृपया सहभाग नोंदवून

मालोजीराव
गुरुवार, 01/22/2015 - 18:14 नवीन
वाचत आहे,कृपया सहभाग नोंदवून घ्यावा ;)
  • Log in or register to post comments

वा वा वा

कोमल
गुरुवार, 01/22/2015 - 20:02 नवीन
धाग्याची सप्तपदी झाली म्हणायची.. हाभिणंडण मु.वि. काका... Image removed.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

मुक्त विहारि
Fri, 01/23/2015 - 10:32 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोमल

मग काय ठरवले शेवटी?

कवितानागेश
गुरुवार, 01/22/2015 - 20:49 नवीन
मग काय ठरवले शेवटी?
  • Log in or register to post comments

अर्रे हो..

हाडक्या
गुरुवार, 01/22/2015 - 20:52 नवीन
अर्रे हो.. इथे अवांतर असेल पण समलिंगी व्यक्तींच्या विवाहविषयक अपेक्षा वगैरे बद्दल कोणीच कसे काही बोलले नाही अजून ?
  • Log in or register to post comments

आता १००० काय १५०० ची

सूड
गुरुवार, 01/22/2015 - 22:37 नवीन
आता १००० काय १५०० ची निश्चिंती झाली. मी आलोच पॉपकॉर्न घेऊन !! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या

तुम्ही तुमची मते लिहा की

टवाळ कार्टा
Fri, 01/23/2015 - 11:28 नवीन
तुम्ही तुमची मते लिहा की :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या

अगदी अगदी.. टका म्हणतोय तसे

हाडक्या
Fri, 01/23/2015 - 15:19 नवीन
अगदी अगदी.. टका म्हणतोय तसे सूडभौ, तुमचे मत लिहा पाहू.. आमच्या माहितीतले सगळे समलैंगिक इंग्रज पब्लिक प्रेम विवाह केलेले आहेत आणि जास्त काही विचारता येत नाही त्यांना (आणि भारतीय कोणी माहीत नाहीत अजून .. ;) ) पण एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे त्यांच्यात पण घरात "नवरा"(एक प्रकारे कर्ती व्यक्ती/dominance अशा अर्थाने) हा रोल कोणाचा यावर छुपा संघर्ष चालू असतो, अर्थात फार कमी असेल पण जास्त विदा नाही ब्वा आपल्याकडे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

नव्रा म्हणजे दोघांत "वरचढ"

टवाळ कार्टा
Fri, 01/23/2015 - 15:25 नवीन
नव्रा म्हणजे दोघांत "वरचढ" कोण असाच अर्थ घ्यायचा ना ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या

टका म्हणतोय तसे सूडभौ, तुमचे

सूड
Fri, 01/23/2015 - 16:04 नवीन
टका म्हणतोय तसे सूडभौ, तुमचे मत लिहा पाहू..
असं म्हणता? बरं!! मी आधीच एका प्रतिसादात म्हटलंय, दोन व्यक्ती परस्परसंमतीने काही करत असतील आणि त्या गोष्टीचा मला जोवर पर्सनली काही इम्पॅक्ट होत नाही तोवर मला त्याच्याशी शष्प घेणं देणं नसतं. तोच नियम इथेही!! आमच्या कॉलेजात आलेल्या काऊंन्सेलरने समलिंगी संबंध नैसर्गिक असतात असं सांगितलं होतं, त्यामुळे ज्यांना पटत असतील आणि त्यातून जे होईल ते निस्तरायची (सगळ्याच प्रकारची मानसिक, शारीरिक इ.) तयारी असेल त्यांनी ते खुशाल ठेवावेत असं माझं मत आहे.
आमच्या माहितीतले सगळे समलैंगिक इंग्रज पब्लिक प्रेम विवाह केलेले आहेत आणि जास्त काही विचारता येत नाही त्यांना (आणि भारतीय कोणी माहीत नाहीत अजून ..
तुम्हाला परदेशात तरी असलं काही पाहायला मिळालं!! आमचं परदेशगमन शिंचं जेमतेम सात दिवसाचं होतं. त्यामुळे आता याहून मोठ्ठं मतप्रदर्शन हवं असेल तर मला हिरव्या देशात जायला मिळावं म्हणून नवस करा अंबाबाईला!! तिकडे कोणी सापडलंच माहितीत तर मुलाखती घेऊन लेखच पाडतो. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या

दोन व्यक्ती परस्परसंमतीने

टवाळ कार्टा
Fri, 01/23/2015 - 16:05 नवीन
दोन व्यक्ती परस्परसंमतीने काही करत असतील आणि त्या गोष्टीचा मला जोवर पर्सनली काही इम्पॅक्ट होत नाही तोवर मला त्याच्याशी शष्प घेणं देणं नसतं. तोच नियम इथेही!! आमच्या कॉलेजात आलेल्या काऊंन्सेलरने समलिंगी संबंध नैसर्गिक असतात असं सांगितलं होतं, त्यामुळे ज्यांना पटत असतील आणि त्यातून जे होईल ते निस्तरायची (सगळ्याच प्रकारची मानसिक, शारीरिक इ.) तयारी असेल त्यांनी ते खुशाल ठेवावेत असं माझं मत आहे.
+११११११११११११११११११११११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

जरा अवांतर

श्रीरंग_जोशी
गुरुवार, 01/22/2015 - 21:15 नवीन
धाग्याच्या आशयाशी सहमत आहेच. पण माझ्या निरिक्षणाप्रमाणे पत्रिका या प्रकारामुळे अनेकदा अपेक्षा जुळत असूनही चांगल्या जोड्या बनता बनता राहतात अन एकमेकांशी जुळवून न घेता येणार्‍या जोड्यांचे प्रमाण वाढते. हे पत्रिकेचे जोखड संपूर्ण समाज दूर करेल तो सुदिन.
  • Log in or register to post comments

हे पत्रिकेचे जोखड संपूर्ण समाज दूर करेल तो सुदिन. ....

मुक्त विहारि
Fri, 01/23/2015 - 11:36 नवीन
पत्रिका हवीच पण ती आधुनिक... आता ह्या पत्रिकेवर पण एखादा धागा कुटायला घेवू या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

खिक्क

टवाळ कार्टा
Fri, 01/23/2015 - 13:30 नवीन
खिक्क
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

मला एक कुतूहल आहे कि माझी आणि

सुबोध खरे
Sat, 01/24/2015 - 09:14 नवीन
मला एक कुतूहल आहे कि माझी आणि माझ्या बायकोच पत्रिका जुळते कि नाही? पण एक भीती पण वाटते कि समजा पत्रिका जुळत नसेल तर "आता" (२२ वर्षांनी) आपसात पटणार नाही. असे झाले तर काय घ्या. या पत्रिकांचे काही सांगता येत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

बायको :- माझ्या मनाचा मोठेपणा

मदनबाण
गुरुवार, 01/22/2015 - 22:08 नवीन
बायको :- माझ्या मनाचा मोठेपणा बघा... मी तुम्हाला न बघताच लग्न केलं. नवरा :- माझा मोठेपणा बघ... मी तुला बघुन पण तुझ्याशीच लग्न केलं ! *LOL*

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Oi Amma Oi Amma... ;) - { Mawaali }
  • Log in or register to post comments

७८६

प्रसाद गोडबोले
गुरुवार, 01/22/2015 - 23:35 नवीन
७८६ ७८६ वा प्रतिसाद टंकण्यासाठी जागा पकडुन बसलोय . -- धर्मनिरपेक्ष प्रगो
  • Log in or register to post comments

ओ, इथे धर्माच्या नाय

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 01/22/2015 - 23:50 नवीन
ओ, इथे धर्माच्या नाय लगिनाच्या गोष्टी चाल्ल्यात ! :) (काय नंबर मारलाय्त !)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

अहो धर्माचा आणि लग्नाचा गंभीर

प्रसाद गोडबोले
Fri, 01/23/2015 - 00:00 नवीन
अहो धर्माचा आणि लग्नाचा गंभीर संबंध आहे , आपणास ठाऊक नाही काय ? बहुतेक ठाउक आहेच पण तुम्हीही कदाचित सहस्त्रकासाठी हातभार लावत आहात =)) --
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

प्रतिसादसहस्रनामात सर्वांचीच

बॅटमॅन
Fri, 01/23/2015 - 01:09 नवीन
प्रतिसादसहस्रनामात सर्वांचीच वर्णी लागेल, सो टेन्षण इल्ले!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

"ह.भ.प.सगामहाराज

टवाळ कार्टा
Fri, 01/23/2015 - 11:26 नवीन
"ह.भ.प.सगामहाराज भावीसंपादनकार" यांचे प्रतिसाद आले नाहीत अज्जून
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

हे आले दांभिक सनातनी..

हाडक्या
Fri, 01/23/2015 - 15:21 नवीन
हे आले दांभिक सनातनी.. :))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

मी पण मी पण

अभ्या..
Fri, 01/23/2015 - 09:44 नवीन
Image removed. हा ७८६ नं चा पर्तिसाद हाय. खास अंक काढला हाय. मधले आणि नंतर कीती बी टाका. :) बादवे मुवि हाबिणंड्ण बर्का. (गोड्बोल्याला थांकू ही खुर्ची मला दिल्याबद्दल ;) )
  • Log in or register to post comments

मला ७७३ दिसत आहेत...संमंनी

टवाळ कार्टा
Fri, 01/23/2015 - 10:32 नवीन
मला ७७३ दिसत आहेत...संमंनी काय काय उडवले कसे शोधणार आता???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

अभ्या लेका, काय खतरनाके बे हे

बॅटमॅन
Fri, 01/23/2015 - 19:02 नवीन
अभ्या लेका, काय खतरनाके बे हे =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

अग्गागा...लै म्हन्जे लैच

टवाळ कार्टा
Fri, 01/23/2015 - 19:47 नवीन
अग्गागा...लै म्हन्जे लैच =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

@ अभ्या....

मुक्त विहारि
Fri, 01/23/2015 - 21:54 नवीन
भारी पोस्टर.... बाद्वे, एक ४-५ दिवसांपुर्वीच मुलाने पल्सर घेतली. किंबहूना पल्सरच्या चाक-गुणांमुळे ७८६ आकडा पार झाला...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

लै भारी

श्रीरंग_जोशी
Sat, 01/24/2015 - 00:20 नवीन
यकदम समयोचित व्यंगचित्र!! धन्यवाद अभ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

अश्या प्रकारे धाग्यात फायनली

कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 01/23/2015 - 09:52 नवीन
अश्या प्रकारे धाग्यात फायनली संपादकांना काम मिळालेले है!! कपिलमुनिंनी टाकलेला शांती मंदीरा बेदीचा फोटो उडाल्येला आहे!!!!!! =))
  • Log in or register to post comments

चायला कधी टाकलेला?

टवाळ कार्टा
Fri, 01/23/2015 - 10:32 नवीन
चायला कधी टाकलेला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

काल रात्री रे. देतो नंतर

कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 01/23/2015 - 11:29 नवीन
काल रात्री रे. देतो नंतर आवडेल तुला =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

व्हत्सप वर पाठव

टवाळ कार्टा
Fri, 01/23/2015 - 13:30 नवीन
व्हत्सप वर पाठव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

त्या दुसर्या धाग्यावर अजुन

टवाळ कार्टा
Fri, 01/23/2015 - 19:48 नवीन
त्या दुसर्या धाग्यावर अजुन आहे तो...इथे असायला काय प्रॉब्लेम मग?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

७८६

प्रसाद गोडबोले
Fri, 01/23/2015 - 11:39 नवीन
७८६ Image removed.
  • Log in or register to post comments

टप्पुनच बसला होता वाट्टे

टवाळ कार्टा
Fri, 01/23/2015 - 11:43 नवीन
टप्पुनच बसला होता वाट्टे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

+ १

मुक्त विहारि
Fri, 01/23/2015 - 11:44 नवीन
+ १
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

सकाळीच अभ्यारावांन्नी बन्नेर

प्रसाद गोडबोले
Fri, 01/23/2015 - 11:46 नवीन
सकाळीच अभ्यारावांन्नी बन्नेर दाखवला होता , तो इथे अपडेट करणार आहे .... :) त्यांनी तो आधीच वर प्रकाशित केला आहे तो इथे मुव्ह कराना संपादक काका ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

१००० वा किंवा १००१ वा किंवा

टवाळ कार्टा
Fri, 01/23/2015 - 11:48 नवीन
१००० वा किंवा १००१ वा किंवा ११११ वा "बुच लावणारा" प्रतिसाद लिहायला संपादकांमधे सुध्धा काम्पिटिशन असेल काय? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

अभ्या!

पैसा
Fri, 01/23/2015 - 12:04 नवीन
अक्षरं नीट वाचता येत नाहीयेत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

मुविशेख - बगळ्यांची माळफुले..

टवाळ कार्टा
Fri, 01/23/2015 - 12:21 नवीन
मुविशेख - बगळ्यांची माळफुले...अजुनी वाळवंटात बाजूला बसलेला काय बोलतोय ते त्यालाच ठौक :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

अर्रेच्चा "बगळ्यांची माळफुले"

टवाळ कार्टा
Fri, 01/23/2015 - 15:27 नवीन
अर्रेच्चा "बगळ्यांची माळफुले" च्या ऐवजी मुविशेख - उंटांची माळफुले...अजुनी वाळवंटात असे हवे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
  • «
  • ‹
  • 13
  • 14
  • 15
  • 16
  • 17
  • 18
  • 19
  • 20
  • 21
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा