Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by स्वाती राजेश on Fri, 12/21/2007 - 16:35
  • Log in or register to post comments
  • 10000 views

प्रतिक्रिया

Submitted by सागर on Fri, 12/21/2007 - 16:41

Permalink

मनाला टच् करणारी ई-मेल आहे ही...

अगदी सुंदर स्वाती खरेच अगदी मनाला टच् करणारी ई-मेल आहे ही... नक्कीच आचरणात आणण्याच्या गोष्टी आहेत या. तुम्हाला यासाठी धन्यवाद की माझ्याकडे ही ईमेल इमेज स्वरुपात होती. ती तुम्ही मराठीतून टंकल्याबद्दल धन्यवाद... (सर्वांचे हित इच्छीणारा ...) सागर
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Fri, 12/21/2007 - 18:20

Permalink

सुरेख..

धावता धावता एकाचा तोल गेला. काही गोलांट्याखाऊन तो पडला आणि रडू लागला. त्याच्या रडण्याचा आवाज ऐकून अन्य आठही जण पळायचे थांबले . सारे मागे फिरले ... सारे जण... सुरेख! --
  • Log in or register to post comments

Submitted by छोटा डॉन on Fri, 12/21/2007 - 21:38

Permalink

अहो आश्रर्यंम !!! मला पण आजच हा ई-मेल आला ....

खरच अती सुरेख मेल आहे ........... "क्रियेविण वाचाणता व्यर्थ आहे " असे काही तरी सावरकरांचे वचन आहे..... तेव्हा आचरणात आणण्याचा प्रयत्न करा ...........
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Sat, 12/22/2007 - 03:01

In reply to अहो आश्रर्यंम !!! मला पण आजच हा ई-मेल आला .... by छोटा डॉन

Permalink

छोटी दुरुस्ती

"क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे " हे रामदासांचे वचन आहे. चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by शितल on Sun, 03/22/2009 - 20:39

In reply to अहो आश्रर्यंम !!! मला पण आजच हा ई-मेल आला .... by छोटा डॉन

Permalink

+१

मला ही हा मेल आला होता. तेव्हा ही वाचुन छान वाटले होते आता मस्त वाटले, मनाला संजिवनी देणारा मेल आहे. :)
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Sat, 12/22/2007 - 03:13

Permalink

एक झेन गोष्ट.

दोन साधू बसलेले असतात. एक अगदी शांतपणे घडणारे सारे बघत . दुसरा अस्वस्थ असतो, कश्याच्यातरी शोधात असल्यासारखा. पहिला विचारतो, "काय रे, काय झालं?" दुसरा म्हणतो, "काहीच घडत नाहीये. काहीतरी घडायची वाट बघतोय." पहिला हसून म्हणतो, "अरे समोर चालले आहे तेच घडतंय, तेच आयुष्य. अजून वेगळं काही नसतं!" चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by किशोरी on Sat, 12/22/2007 - 13:24

Permalink

खुप छान आहे!!

मला याच ईमेल बरोबर खालील कविता आली होती, कधीतरी असेही जगून बघा.... माणूस म्हणून जगताना हा एक हिशोब करुन तर बघा! 'किती जगलो' याऐवजी 'कसे जगलो', हा एक प्रश्न जरा मनाला विचारुन तर बघा! कधी असेही जगून बघा... कधीतरी एखाद्यावर विनोद करण्याआधी समोरच्याचा विचार करुन तर बघा! तर कधी कोणाच्या हास्यासाठी,समाधानासाठी न आवडलेल्या विनोदावरही हसुन तर बघा! कधी असेही जगून बघा... संकटांमुळे खचुन जाणारे,तर शेकडोंनी मिळतात कधीतरी अडचणींवर मात करण्याची हिंमत दाखवून तर बघा! स्वत:पुरता विचार तर नेहमीच करतो आपण कधीतरी बुडत्यासाठी काठीचा आधार होऊन तर बघा! कधी असेही जगून बघा... वर्तमान आणि भविष्याची चिंता तर सदाचीच असते कधीतरी भूतकाळाच्या विश्वात गुंगून तर बघा! काळाची वाळू हातातून निसटली म्हणून काय झाले? आधी अनुभवलेल्या क्षण पुन्हा एकदा जगून तर बघा! कधी असेही जगून बघा... प्रतिसादाची काळजी का करावी नेहमी? एखाद्यावर जिवापाड,निर्मळ प्रेम करुन तर बघा! कधी असेही जगून बघा...
  • Log in or register to post comments

Submitted by योगेश्चन्द्र on Mon, 12/24/2007 - 21:55

Permalink

नविन

नविन वर्शासाथि कहितरि विचारदिशा नक्किच मिलेल असे कहि वाचुन आपला योगेश्चन्द्र
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Wed, 12/26/2007 - 08:48

In reply to नविन by योगेश्चन्द्र

Permalink

लाघवी! :)

अवांतर - योगेशराव, आपलं मराठी लेखन खूप लाघवी आणि निष्पाप आहे! असंच राहू द्या! :) तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by केवळ_विशेष on Mon, 03/23/2009 - 15:11

In reply to लाघवी! :) by विसोबा खेचर

Permalink

+१

ठ्यॉ...फुटलो...
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश घाटपांडे on Tue, 12/25/2007 - 16:55

Permalink

सुंदर विरोप

या विरोपातून आलेल्या मजकूराचा जनक कोण असेल? त्याने जाणीवपुर्वक आपले नाव अज्ञात ठेवले असेल का? जो कुणी अज्ञात असेल त्याला मनापासून धन्यवाद. किशोरी , स्वाती आमच्या पर्यंत पोहोचवल्या बद्द्ला धन्यवाद. सोहम कोहमच्या गोष्टी ले. प्रा. दत्ता दंडगे या प्रायोगिक नाटकाची आठवण झाली. प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्तसुनीत on Wed, 12/26/2007 - 10:22

Permalink

सुंदर इमेल , यथार्थ भाषांतर

...आणि मनात निरनिराळ्या विचारांची गर्दी करणारे तुमचे मूळ टिपण. असे काही वाचले की जाणवते , की अरे, हे काही आपल्याला अज्ञात नव्हते ! पण रोजच्या धबडग्यात हे आपण पार विसरून गेलेले आहोत. माझ्या एका आवडत्या लेखकाने (एका अगदी वेगळ्या संदर्भात ) असे काही म्हण्टले आहे की जे इथे चपखल लागू पडेल. आपल्या जगण्याची तुलना ते एका अतिशय गुंतागुंतीच्या यंत्राशी करतात. एखादे यंत्र मोठ्या प्रयत्नाने कसे चालते, कसे चालवले जाते हे आपण शिकतो आणि काहीतरी विशेष मिळवल्यासारखे ते साजरे करतो. पण हे यंत्र घेऊन कुठे जावे , त्याचा नक्की उपयोग काय हे काही आपल्याला उमगले नाही अद्याप ! असो. "लाइफ इज जस्ट व्हॉट हॅपन्स टू यू व्हाईल यू आर मेकींग अदर प्लॅन्स" असे लेनन नावाचा माणूस म्हणून गेला ते खरे अगदी ! तेव्हा पुढे जात रहाण्याच्या , काहीतरी काबीज करण्याच्या रोजच्या झगड्यात, थोडे थांबा , मिसळपावाचा थोडा आस्वाद घ्या ; इथल्या जित्याजागत्या माणसाना हलो म्हणा (वाटल्यास चार "श्या" द्या !!) आणि पुढे चला ; खरे ना ? :-)
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Sat, 12/29/2007 - 10:49

In reply to सुंदर इमेल , यथार्थ भाषांतर by मुक्तसुनीत

Permalink

:)

रोजच्या झगड्यात, थोडे थांबा , मिसळपावाचा थोडा आस्वाद घ्या ; इथल्या जित्याजागत्या माणसाना हलो म्हणा (वाटल्यास चार "श्या" द्या !!) आणि पुढे चला ; खरे ना ? :-) अगदी खरे! :) तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Sun, 12/30/2007 - 08:06

Permalink

खरंच..

खूप सुंदर आहे मेल. प्रत्येकाने आवर्जून वचावे असे आहे. स्वाती.. धन्यवाद. - प्राजु.
  • Log in or register to post comments

Submitted by इनोबा म्हणे on Tue, 01/01/2008 - 19:59

Permalink

अप्रतिम

फारच सुंदर आणि 'विचार' करायला लावणारे विचार आहेत.पण केवळ विचार आणि स्तुती करण्यापेक्षा कृती करण्यावर भर द्यायाला हवा,नाहितरी म्हटलेच आहे की... "क्रियेवीण 'वाचा'ळता व्यर्थ आहे रे | आधि केलेची पाहिजे"- संत तुकारामदास (संदर्भः मिसळबोध)
  • Log in or register to post comments

Submitted by केशवराव on Tue, 01/29/2008 - 10:36

Permalink

नवा द्रुष्टीकोन !

स्वाती , मि.पा. वर तसा नवीन आहे. जुने लेखन वाचत असताना हे सापडले. ई-मेल खुप खुप आवडला. बर्‍याच जणाना एक नविन द्रुष्टीकोन मिळेल. सिऍटल ऑलिंपीकचा किस्सा एकदम टचिंग ! ई - मेल ईथे दिल्याबद्दल धन्यवाद. केशवराव.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रिया८ on Sat, 03/21/2009 - 02:29

Permalink

छान!!

छान आहे इ-मेल. सिऍटल ऑलिंपीकचा किस्सा खरोखरच एकदम टचिंग ! धन्यवाद!! अश्विनि.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रिया८ on Sat, 03/21/2009 - 02:32

Permalink

चतुरंग

चतुरंग, तुमची झेन कथा पण आवडली, पण झेन कथा म्हणजे काय ते सांगाल का? अश्विनि.
  • Log in or register to post comments

Submitted by समिधा on Sat, 03/21/2009 - 03:07

Permalink

खुपच सुंदर

खरच खुपच सुंदर आहे हा मेल. सिऍटल ऑलिंपीकचा किस्सा वाचुन.... =D> स्वातीताई,किशोरी हा मेल आणि कविता सगळ्यांपर्यंत पोहचवल्या बद्द्ल धन्यवाद. समिधा (चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)
  • Log in or register to post comments

Submitted by उर्मिला०० on Sun, 03/22/2009 - 19:27

Permalink

खूप छान!

खरंच खूपच भावस्पर्शी मेल आहे.प्रकाशित केल्याबद्दल धन्यवाद.
खरं असंय, की आनंदात असण्यासाठी , सुखात असण्यासाठी आत्ताच्या वेळेपेक्षा दुसरी योग्य वेळ कोणतीही नाही. आयुष्यात आव्हानं तर असणार आहेतच. ती स्विकारायची आणि ती झेलता झेलताच आनंदी राहायचा निश् चय करायचा हेच बरं नाही का ?
हे विधान विशेषतः आवडले.पुनश्च अभिनंदन.
  • Log in or register to post comments

Submitted by चिरोटा on Mon, 03/23/2009 - 16:02

Permalink

अतिशय सुन्दर

ईमेल आहे. हा धागा उडवु नये. भेन्डि(बेन्गळुरु)
  • Log in or register to post comments

Submitted by सोनम on Mon, 03/23/2009 - 20:00

Permalink

अतिसुंदर

स्वाती ताई मेल छान आहे. डाउन्स सिन्ड्रोम'ची व्याधी असलेली एक मुलगी त्याच्या जवळ बसली. तिने त्याला मिठी मारली आणि मग विचारलं, "" आता बरं वाटतंय ?'' मग साऱ्यांनी त्याला उभं केलं आणि अंतिम रेषेपर्यंत सारे खांद्याला खांदा लावून चालत गेले. मस्त आहे. त्याला म्हणतात माणूसकी. एकमेकाना बरोबर घेऊन आपण आपले लक्ष्य गाठावे. Image removed.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com