✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

नाही तर नाही.... जा!

प — प्राजु, Fri, 10/24/2008 - 22:04

प्रतिक्रिया द्या
7253 वाचन

💬 प्रतिसाद (30)

या आधी ना

मदनबाण
Fri, 10/24/2008 - 22:07 नवीन
या आधी ना भेटलो कधी कसे मला हे पटले नाही ह्म्म्..असचं काहीस वाटत कधी कधी आपल्याला. सोडुन तू गेलीस तरीही प्रेम जराही घटले नाही क्लासचं.. मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments

या आधी ना

सखाराम_गटणे™
Fri, 10/24/2008 - 22:23 नवीन
या आधी ना भेटलो कधी कसे मला हे पटले नाही होते रे असे कधी कधी सोडुन तू गेलीस तरीही प्रेम जराही घटले नाही पण असले नकारात्मक विचार काढुन टाक मना म्हधुन अवांतरः शुभ्राचा खालचा ओठ थोडा मोठा वाटतो ना. तुम्हाला थंडी वाजेल, तेव्हा लक्षात ठेवा की कोणाच्या तरी उबीने तुमची थंडी दुर होउ शकते. त्या उबीला लाख सलाम.
  • Log in or register to post comments

छान...

बिपिन कार्यकर्ते
Fri, 10/24/2008 - 22:42 नवीन
मस्त आहे. आणि सर्टिफाईड पण आहे. :)
असंख्य झाले वाद तरीही नाते अपुले तुटले नाही
हे खूप महत्वाचे आहे.
त्यासाठी माझे गुरू आणि मिपाचे गझलकार आणि निवृत्त विडंबन सम्राट केशव सुमार उर्फ अनिरूद्ध अभ्यंकर यांना भरपूर त्रास दिला आहे. त्यांची सहनशक्ती वाढली असल्याचे नुकतेच समजले आहे.
आता केसुंनी एक कडवे टाकायला हरकत नाही. त्रास दिला तू किती तरीही बोट तुझे मी सोडले नाही......... :) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

अरे वा !

शितल
Fri, 10/24/2008 - 23:38 नवीन
असंख्य झाले वाद तरीही नाते अपुले तुटले नाही हे मस्त लिहिले आहेस. हे म्हणजे कसे तुझे माझे पटेना आणि तुझ्या वाचुन जमेना :) प्राजु, शेवटी गझल रचलीस म्हणायची. :)
  • Log in or register to post comments

अरे वा प्राजू छान!

चतुरंग
Sat, 10/25/2008 - 00:16 नवीन
गजल मस्तच झाली आहे! :) (पाडून तू गेलीस गजल विडंबन मी केले नाही!;)) (खुद के साथ बातां : प्राजूने त्रास दिल्यामुळे केसुशेठ फिरकेनासे झाले की काय हल्ली? :? :W ) चतुरंग
  • Log in or register to post comments

अभिनंदन.

मीनल
Sat, 10/25/2008 - 04:52 नवीन
आम्ही काय बुवा लिहाव? : : : या प्रतिक्रिया आमच्या अकलेत खूप खूप भर मात्र घालत आहेत. प्राजु,तू तर गझल लिहायचा नव्हे दोष रहित गझल लिहायचा चंगच बांधला होता.तो सफल झाला. अभिनंदन. आता पुढली गझल केव्हा वाचायला मिळणार? मीनल.
  • Log in or register to post comments

असंख्य

विसोबा खेचर
Sat, 10/25/2008 - 06:42 नवीन
असंख्य झाले वाद तरीही नाते अपुले तुटले नाही वा! या ओळी सुंदर...प्राजू, छान लिहिली आहेस हो गझल! तात्या.
  • Log in or register to post comments

साधे, सोपे

अरुण मनोहर
Sat, 10/25/2008 - 08:08 नवीन
साधे, सोपे शब्द. चांगला आषय.
  • Log in or register to post comments

मस्त !!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 10/25/2008 - 08:25 नवीन
गझल आवडली !!! प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

लै भारी!

ऋषिकेश
Sat, 10/25/2008 - 09:55 नवीन
लै भारी.. गझल आवडली.. भावही उत्तम! प्राजुताई बॉ फॉर्मात आहे सध्या ;) एक शंका: या गझलेत अलामत काय समजावी? क्वचित 'अ' च्या जागी र्‍हस्व 'इ' किंवा 'उ' हा स्वर अलामत म्हणून वापरता येतो. मात्र गझलेच्या पहिल्या शेरातच अ आणि उ अलामत आहे. तेव्हा अश्यावेळी काहि नियम आहेत का? की अ, इ आणि उ स्वरचिन्ह म्हणून कधीही घेतलेले चालते? -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments

अलामतीची सूट

बेसनलाडू
Sat, 10/25/2008 - 14:13 नवीन
गझलेच्या पहिल्या शेरात - म्हणजे मतल्यातच वरच्या ओळीत एक आणि खालच्या ओळीत दुसरी अलामत अशा प्रकारे अलामतीची 'सूट' घेतली असेल, तर तुटले, सुटले, पटले, म्हटले, विटले असे काफिये पूर्ण गझलेत वापरता येतील. मात्र मतल्याच्या दोन्ही ओळींमध्ये समजा पटले, म्हटले हे काफिये आले, तर अलामत 'अ' निश्चित होईल; आणि मग पूर्ण गझलेत ती कायम ठेवावी लागेल, 'उ', 'इ' चालायचे नाहीत. पण तरीही, असे झाल्यावरही अलामतीची 'सूट' घ्यायचीच असेल, तर गझलेत दोन मतले लिहावेत (अशा गझलेला हुस्न-ए-मतला गझल म्हणतात; दुसर्‍या मतल्याला 'सानी मतला' म्हणतात) मग दोन्ही मतल्यांमध्ये मिळूनही अशी 'सूट' घेता येते. या प्रकारात र्‍हस्व अलामतींसाठी अशी सूट घ्यावी की नाही, याबाबत 'घ्यावी' आणि 'घेऊ नये; दीर्घ अलामतीसाठी घेतलेली चालेल' अशी विभिन्न मते असणारे कंपू आहेत. पण या मतमतांतरांचे मूळ कोणत्याही तर्कात नसून गझलेच्या इतिहासात, परंपरेत आणि उर्दूकडून तिच्या मराठीमध्ये झालेल्या प्रवासात आहे, असे (मला) वाटते. (माहीतगार)बेसनलाडू व्यक्तिशः, 'शक्यतोवर' अलामतीची सूट घेणे टाळावे, असे माझे मत आहे. शेरातून/गझलेतून मांडला जाणारा विचार, भावना जर सशक्त असतील आणि त्यांच्या प्रकटीकरणासाठी अशी सूट घेणे स्वतःला पटत असेल, तसेच अशी सूट घेऊन काफिया संच समृद्ध करणे व इतर सशक्त कल्पना राबविणे हा हेतू असेल, तरच ती घ्यावी या मताचा मी आहे. (व्यक्तिशः)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

बेसनलाडू, धन्यवाद.

प्रशांत उदय मनोहर
Wed, 09/09/2009 - 10:57 नवीन
अलामतबद्दल ज्ञानात भर पडली. आतापर्यंत गज़लसदृश कविता करून पाहिल्या. (त्यांना गज़ल म्हणावं का याबद्दल मला शंका आहे.) पण अशी माहिती साठवल्यावर प्रयत्न करायला नक्की सोपं जाईल. आपला, (कृतज्ञ) प्रशांत --------- मी 'देव'प्रुफ कवितासुद्धा करतो. :? :) माझा ब्लॉग - लेखणीतली शाई
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू

छान लिहिलंय!

राघव
Sat, 10/25/2008 - 10:03 नवीन
गझलांबद्दल आपली माहिती फार तोकडी... त्यामुळे त्याबद्दल नो कमेंट्स :D येऊ देत अजून... वाट बघतोय! पुढील रचनेस शुभेच्छा :) मुमुक्षु
  • Log in or register to post comments

गझल

रामदास
Sat, 10/25/2008 - 13:39 नवीन
हा माझा विषय नाही त्यामुळे गझल या बाबत काही लिहीणार नाही. परंतू कविता फार सुंदर आहे. कुमार गंधर्वांनी गायलेल्या एका गाण्यात गायलेल्याकधी गहीवरलो कधी धुसफुसलो या ओळीची आठवण झाली. अवांतरः गझलेसाठी आता शिकवणी लावण्याचा विचार करतो आहे.
  • Log in or register to post comments

सुंदर गझल

जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)
Sat, 10/25/2008 - 17:15 नवीन
सुंदर गझल ! तुफान वारा भिडून गेला तारू हे भरकटले नाही सोडुन तू गेलीस तरीही प्रेम जराही घटले नाही वा मनातलं लिहलं आहे ! जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग
  • Log in or register to post comments

सुंदर गझल

दत्ता काळे
Sat, 10/25/2008 - 17:46 नवीन
असंख्य झाले वाद तरीही नाते अपुले तुटले नाही हे फार छान
  • Log in or register to post comments

धन्यवाद..

प्राजु
Sat, 10/25/2008 - 20:30 नवीन
आपणा सर्वांचे मनापासून धन्यवाद. बेला, आपल्याला विशेष धन्यवाद. गझलेबद्दल इतकी सुंदर माहिती आपण इथे सांगितलीत. मी आपली आभारी आहे. असेच मार्गदर्शन करत रहा ही विनंती.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

+१

टारझन
Fri, 10/31/2008 - 21:58 नवीन
धन्यवाद.. सहमत, असेच म्हणतो आमच्या गंजलेल्या डोक्याला गझल झेपली.. आवडली आहे. सब के साथ बातां : आम्हाला काय सुचत नाय बॉ खविसगिरी शिवाय, आम्ही तस स्वप्नात पण गद्याच्या वर जात नाय. :) --टाराज ठाकरे (मिसळपाव नवनिर्माण सेना) बघता काय सामिल व्हा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

फार छान

महेश काळे
Fri, 10/31/2008 - 21:12 नवीन
फार छान
  • Log in or register to post comments

छान

नंदन
Sat, 11/01/2008 - 02:01 नवीन
गझल आवडली. पहिलीच गझल आहे, असं वाटत नाही. अगदी सफाईदार आहे. जीर्ण जाहली किनार त्याची वस्त्र तरीही विटले नाही - खासच.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

अगदी हेच मनात बसले...

एकलव्य
गुरुवार, 09/10/2009 - 12:02 नवीन
जीर्ण जाहली किनार त्याची वस्त्र तरीही विटले नाही - खासच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

सुरेख गझल

महेश काळे
Mon, 09/07/2009 - 12:33 नवीन
वाह वाह... सुरेख गझल आहे...
मी माझा ..महेश
  • Log in or register to post comments

कोडे अजुन सुटले नाही..

कानडाऊ योगेशु
Mon, 09/07/2009 - 12:50 नवीन
गझल आवडली. कोडे अजुन सुटले नाही.. ही ओळ वृत्तात पूर्णपणे निर्दोष आहेच पण तरीही "कोडे अजुनहि सुटले नाही.." अशी (चुकुन)वाचल्यावर छान वाटली(माझे व्यक्तिगत मत). ह्यामागे काय कारण असावे ? बहुतांशवेळा आपण अजुन हा शब्द जेव्हा जेव्हा वापरतो तेव्हा त्याच्यापुढचा शब्द 'हि' किंवा 'सुध्दा' (अजुनहि,अजुनसुध्दा) असल्यामुळे असेल.
  • Log in or register to post comments

मस्तच !!!

पाऊसवेडी
Mon, 09/07/2009 - 15:27 नवीन
खूपच छान गझल आहे >>माझे मलाच पटले नाही कोडे अजून सुटले नाही >>या आधी ना भेटलो कधी कसे मला हे पटले नाही मस्त!! हे पट्ले सुंदर
  • Log in or register to post comments

सुरेख

संदीप चित्रे
Wed, 09/09/2009 - 00:54 नवीन
गझल पुन्हा एकदा वाचायला खूप आवडली. >> होकार तुझा मिळून गेला 'होय' जरी तू म्हटले नाही असंख्य झाले वाद तरीही नाते अपुले तुटले नाही >> हे शेर तर खूप मस्त आहेत.
  • Log in or register to post comments

छान.

प्रशांत उदय मनोहर
Wed, 09/09/2009 - 10:59 नवीन
छान. आवडली. आपला, (काव्यप्रेमी) प्रशांत --------- मी 'देव'प्रुफ कवितासुद्धा करतो. :? :) माझा ब्लॉग - लेखणीतली शाई
  • Log in or register to post comments

उत्तम भाव

sneharani
Wed, 09/09/2009 - 12:46 नवीन
गझल आवडली... पहिलीच गझल आहे, असं वाटत नाही.
  • Log in or register to post comments

छान

अजिंक्य
Wed, 09/09/2009 - 13:25 नवीन
छान गझल आहे. आवडली. गझल कशी लिहावी, त्यात वृत्त वगैरे काय असावं याची मला अजिबातच माहिती नाही. त्यामुळे वर 'बेसनलाडू' यांची प्रतिक्रिया नीटशी कळली नाही. थोडं थोडं समजलं, पण पूर्ण नाही. अलामत, मतला, काफिये इ. चा अर्थ समजावून सांगणार्‍या लेखाची 'लिंक' उपलब्ध असेल तर ती द्यावी, ही विनंती. -अजिंक्य
  • Log in or register to post comments

ही घ्या लिंक

बेसनलाडू
गुरुवार, 09/10/2009 - 12:07 नवीन
ही घ्या लिंक (दुवादार)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजिंक्य

फार छान

फ्रॅक्चर बंड्या
गुरुवार, 09/10/2009 - 18:06 नवीन
फार छान गझल आहे या आधी ना भेटलो कधी कसे मला हे पटले नाही हा शेर आवडला
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा