दाल बाटी.
किती वर्ष झाली बरं? बाळ्या दोन वर्षाची असेल. तेंव्हा, तेंव्हा गेलो होतो आम्ही राजस्थान पहायला.
तिथल्या सरदारांनी आपापल्या हवेल्या आता हॉटेल म्हणुन वापरायला सुरवात केल्याने आम्ही शाही पाहुणचार घेत फिरत होतो अस म्हणायला हरकत नाही. तर चितोड मध्ये एका रिक्षावाल्याला मी आपल माझ्या बडबड्या स्वभावानुसार विचारल राजस्थानात त्यांच अस वैशिष्ट्यपुर्ण अस खाणं कोणत? म्हणजे आपली कशी झुणका-भाकर तस काही? तर त्याने सुचवली दाल-बाटी. वेगळ काही खायचं म्हंटल की माझ्या नवर्याच्या कपाळावर सतराशेसाठ आठ्या पडतात. पण आता सतराशेसाठमध्ये एकसश्ठावी आठी मी असल्याने, त्याला नंदीबैलासारखी मान हलवत गपगुमानं हॉटेलमध्ये ही ऑर्डर द्यावी लागली. अर्थात त्याच नशिब जोरावर असल्याने दालबाटी अशी रोज नाही बनत अन ऑर्डर दिल्यावर अर्ध्यातासात तर नाहीच मिळणार अस पुणेरी स्टायल उत्तर मिळालं. मग दुसर्यादिवशी तोच रिक्षावाला आम्हाला जेथे हमखास दाल-बाटी मिळते अश्या ठिकाणी घेउन गेला, अन राखेत भाजलेल्या बाटीज विथ उडदाची आमटी अस खाण आम्ही तोंड वेडवाकड करत खाउन बाहेर पडलो. (त्यानंतर नवर्याने काय आकांडतांडव केला असेल तो मी येथे उधृत करु इच्छीत नाही)
एकुण काय प्रकरण असतं याची चुणु़क आम्ही पाहिली अन परत या डिशकडे वळायच नाही असा अलिखीत करार केल गेला. पण मेलबर्नमध्ये किर्ती सिन्हा म्हणुन राजस्थानी कायस्थ (हे काय असत? अस विचारायच नाही. ते अगदी अभिमानाने सांगतात,"हम राजस्थानी कायस्थ है।) मैत्रीण भेटली. माझ चिकन हाणुन गेल्यावर तिने आम्हाला तिची दाल-बाटी खायच आमंत्रण दिलं. अर्थात आम्ही घरुन निघताना पोटभर खाउन निघायची खबरदारी घेतली होतीच, पण काय आश्चर्य? अहो चक्क खुसखुशीत अन चमचमीत निघाली ही घरची दाल-बाटी. त्यात अन ती "कायस्थ" पद्धतिने बनवल्यामुळे म्हणे खुपच वेगळी असते. मग काय? त्यानंतर घरात अधुन मधुन हा प्रकार बनायला लागला.
तर मंडळी गप्पा फार झाल्या आता कामाला लागा. तसेही चारच दिवस उरले कार्याला तर अजुन नवर्यामुलाला केळवणाला अथवा गडनेराला नसेल बोलवलं तर दाल-बाटी बनवुन अगदी खुशाल आमंत्रण धाडा.
तर पहिला साहित्यः-
१/२ वाटी तुर डाळ
१/२ वाटी अख्खे चणे (हरभरे)
१/२ वाटी हिरवे मूग
१/२ वाटी राजमा
१/२ वाटी मसुर
३/४ वाटी काळे उडीद
हे सगळ स्वच्छ धुवुन एक अर्धातास भिजत ठेवा.
अर्थात आता अर्धातास करायच काय म्हणुन मग मी असा टाइमपास केला...
अहो असं स्वच्छ उन्हं आल होत घरात म्हणुन सांगु ?
तर असो. आता या भिजलेल्या डाळीत
१/२ कांदा चिरुन
१ टोमॅटो
चविप्रमाणे मिठ, हिंग हळद अन आमचं कोल्हापुरी तिखट (माझ्या सिंगापुरच्या मैत्रीणींच्या दाल मख्खानी माझ्या या तिखटाशिवाय होत नव्हत्या. जाम डिमांड होता मैत्रीखात्यात) हे सर्व घालुन मस्तपैकी शिजवुन घ्या.
आता फोडणी -
नेहमीचीच जीरे, मोहरी, कडीपत्ता, हिंग लसूण अन १/४ चिरलेला कांदा.
मोठ्या पातेल्यात तेल चांगले गरम करुन गॅस बंद करा. आता त्यात मोहरी घालुन तडतडु द्या, मग जीरे घाला मग कडीपत्ता अन लसूण घालुन गॅस पुन्हा मंद सुरु करा. आता त्यात कांदा घालुन मग शेवटी हिंग टाका.
या फोडणीवर शिजलेली डाळ घालुन थोडे पाणी मिसळा. तिखट मिठ आपण डाळ शिजताना घातल्याने आता फक्त अॅडजस्ट करा. झाली दाल तयार.
आता बाटी.
बाटी साहित्य- गव्हाचे पिठ चार वाट्या.
१/४ चमचा ओवा
३/४ ते १ वाटी तेल.
वरुन लावायला कलौंजी (फ्लेवरसाठी ऑप्शनल)
आता या पिठात ओवा अन तेल गरम करुन मोहन घाला. मोहन इतक हवे की पिठाचा मुटका करुन उडवला (हलकेच ! लगेच बॉलींग नका करु) तरी तो टिकला पाहीजे( हाच तो कायस्थ टच!!) आता हे पिठ जरा घट्टसर मळुन घ्या. त्याचे छान जरा चपटे अन आत मध्ये किंचीत हॉलो गोळे तयार करा अन ओव्हन मध्ये २०० सेंटीग्रेड्वर साधारण चाळीस मिनिट भाजुन घ्या. हे गोळे वळताना आपण मोदकाला कशी पाती तयार करत जातो तशी तयार करुन मिटवायची .

तयार आहे दाल-बाटी.

__/\__
अपर्णा

याद्या
125246
प्रतिक्रिया
85
मिसळपाव
मस्त..
वाह......!!!!!!!!
मस्तच... नक्की करुन बघेन
मस्त!
तूपाच नाव नका काढु हो!
In reply to मस्त! by विंजिनेर
मस्त.. माझी सर्वात आवडती डीश आहे ही ................
+ १ तूप नसेल तर दाल बाटीची
In reply to मस्त.. माझी सर्वात आवडती डीश आहे ही ................ by रितुश्री
तुम्ही केलेली बाटी ही चुलीत (
In reply to + १ तूप नसेल तर दाल बाटीची by आतिवास

चवीचवीनं सांगितलेली कृती आहे
अहाहा
दालबाटी माझ्या एक राजस्थानी
थोडसं आवांतर....
ब्राह्मण कायस्थ
In reply to थोडसं आवांतर.... by मदनबाण
धन्यवाद मदनबाण. आता मी तिला
In reply to थोडसं आवांतर.... by मदनबाण
वाह!
नेहमीप्रमाणेच खुशखुशीत
In reply to वाह! by दिपक.कुवेत
नेहमीप्रमाणेच खुशखुशीत लेखनासहित खुशखुशीत बाट्या.+१११होय हो दिपकराव
In reply to वाह! by दिपक.कुवेत
अरे वा.. मस्त रेसेपी..!!
धन्यु पिलीयन रायडर.
In reply to अरे वा.. मस्त रेसेपी..!! by पिलीयन रायडर
मस्तं.
निखार्यावर ती व्यवस्थीत
In reply to मस्तं. by प्रभाकर पेठकर
बट्ट्या शिजवणे - एक कला.
In reply to निखार्यावर ती व्यवस्थीत by स्पंदना
मस्तच रेसेपी
फोटो आवडला! येऊदेत तुमची पण
In reply to मस्तच रेसेपी by मी_देव
हो मी कालच माबो वर वाचली
In reply to मस्तच रेसेपी by मी_देव
मिरचीचं वरण!!!
In reply to मस्तच रेसेपी by मी_देव
आवडती डीश! मस्त फोटो
मस्त!
पाकृ सांगण्याची स्टाईल आणि
In reply to मस्त! by पैसा
+१
In reply to मस्त! by पैसा
ए गप ग! व्हिडीओ पाहिजेत म्हणे
In reply to मस्त! by पैसा
एकूणच ह्या प्रकाराबद्दल खूप
खुप खुप आवडीची.आता तुमच्या
छान !!
'बोलकी' पाकृ मस्तच.
+१
In reply to 'बोलकी' पाकृ मस्तच. by प्यारे१
ते राजस्थानी फोटोचं सांगायचं
In reply to 'बोलकी' पाकृ मस्तच. by प्यारे१
दाजींच्या दाढीवर ते राजस्थानी
In reply to ते राजस्थानी फोटोचं सांगायचं by प्यारे१
रामदेवबाबा...ढाब्याची अठवण
कुणीतरी दालबाटी आयती करुन
आम्हा दोघान कडून तुम्हाला आजच
>>>आम्हा दोघान कडून
In reply to आम्हा दोघान कडून तुम्हाला आजच by त्रिवेणी
तुमच्या पाकृ बाकी भारी जिवंत
धन्यु!
In reply to तुमच्या पाकृ बाकी भारी जिवंत by बॅटमॅन
खल्लास!!!!
जबराट .. भारी वाटतेय
वा..
तिची दालबाटीची पध्दत खूपच
In reply to वा.. by स्वाती दिनेश
पाकृ व माडंणी दोन्ही मस्तच....!
बाफल्या?
In reply to पाकृ व माडंणी दोन्ही मस्तच....! by रुमानी
दाल बाटी
बाबुलनाथ मंदिरासमोरचं ' सोम '
In reply to दाल बाटी by सुधीर
कधी पाहिली नाहीय!
होटेलात एकदा दाल बाटी खाल्ली
रोचक गोष्टीच्या सजावटीत पेश
पाकृ मस्तच..
ओव्हन शिवाय बाटी तुम्ही केक
In reply to पाकृ मस्तच.. by garava
मस्त लिहिलय. पण तरिहि मी करेन
थांब आता! नाही तुला बाटी
In reply to मस्त लिहिलय. पण तरिहि मी करेन by कवितानागेश
नाही म्हटलं,
In reply to थांब आता! नाही तुला बाटी by स्पंदना
पुन्हा एकदा फोटू बघून गेले.
बाट्या कशा अगदी लाडवांसारख्या
In reply to पुन्हा एकदा फोटू बघून गेले. by रेवती
तंबिट!!!!!!!!
In reply to बाट्या कशा अगदी लाडवांसारख्या by गवि
कधी मिळ्णार हे लाडू?
In reply to तंबिट!!!!!!!! by बॅटमॅन
समय से पहले भाग्य से ज्यादा
In reply to कधी मिळ्णार हे लाडू? by कवितानागेश
तंबिट का लाडू?
In reply to समय से पहले भाग्य से ज्यादा by बॅटमॅन
गवि, तुम्ही मला माफ कराच आता!
In reply to बाट्या कशा अगदी लाडवांसारख्या by गवि
अप्रतिम! पाककृती इतकीच
दोघिच्या हि नाहि......!
@श्रुती ...मराठवाडा का ?
मराठवाडा का ?
दाल बाटी
ओ? भाकरीची आठवण कोणी काढायला
In reply to दाल बाटी by कर्ण
शॉट एक्स्टेंडेड...
In reply to ओ? भाकरीची आठवण कोणी काढायला by स्पंदना
कुणी हाय का?
In reply to शॉट एक्स्टेंडेड... by धमाल मुलगा
_/\_
In reply to कुणी हाय का? by स्पंदना
धम्या...अरे नको रे
In reply to शॉट एक्स्टेंडेड... by धमाल मुलगा
ऊसाचं कांडकं
In reply to शॉट एक्स्टेंडेड... by धमाल मुलगा
घोळ मिटवून आज सकाळी घरला
In reply to ओ? भाकरीची आठवण कोणी काढायला by स्पंदना
कितीही अॅअॅअॅअॅ केलास तरी
In reply to घोळ मिटवून आज सकाळी घरला by प्यारे१
सर्वात वरचं रंगीबेरंगी
अपर्णा, मस्तच गं! इन्दुरला
फारच सुन्दर .....
सत्वर पाव ग मला भवानी आई