Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by दिपक.कुवेत on गुरुवार, 09/25/2014 - 11:54
नमस्कार मंडळी, आजपासून नवरात्र सुरु होतयं. सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. गरब्याच्या साथीने हे नउ दिवस जाउन दसरा कधी उजाडतो ते कळतहि नाहि. दसर्‍याच्याहि सर्वांना आगाउ शुभेच्छा. वेल तर ह्या कालावधीत काहि लोकं नॉनवेज तर खात नाहिच पण ९ दिवस सगळीकडे अनवाणी फिरतात; अगदि ऑफिस ला सुद्धा बिना चप्पल / बूट येतात. हा नक्कि काय प्रकार आहे? हे असं करण्यामागे नक्कि काय भावना आहेत? व्यक्तिश निदान मला तरी हे पटत नाहि. अर्थात प्रत्येकाची भक्ती करण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते त्या बद्द्ल आक्षेप नाहि पण मी पाहिलयं जाताना वाटेवर एखादं मंदिर असेल तर लोक रस्त्यावरुन पण नमस्कार करताना चपला/बूट काढून करतात. निदान मी तरी बूट घालूनच नमस्कार करायचो/अजूनहि करतो. तुमच्यापैकि कोणी असं काहि फॉलो करतं का?
  • Log in or register to post comments
  • 28893 views

प्रतिक्रिया

Submitted by विजुभाऊ on गुरुवार, 09/25/2014 - 11:58

Permalink

नॉनवेज न खाणे समजून शकतो. जैन

नॉनवेज न खाणे समजून शकतो. जैन धर्मात चामडी चप्प्ला वर्ज्य आहेत. त्याच धर्तीवर लोक नवरात्रात पादत्राणे घालत नसावेत. नवरात्रात नऊ चपला न घालणे हे मी पुण्यात सर्वप्रथम पाहिले. हे खूळ जेवढ्या लवकर जाईल तेवढे चांगले. श्री राम प्रसन्न किंवा श्रीराम जयराम जयजयराम असे लिहून वह्या च्या वह्या वाया घालवणे आणि नवरात्रीचे नऊ दिवस चपला न घालणे हे दोन्ही एकाच प्रकारचे अंधश्रद्ध खुळचट आचार आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by सुनील on गुरुवार, 09/25/2014 - 12:14

In reply to नॉनवेज न खाणे समजून शकतो. जैन by विजुभाऊ

Permalink

हस्ताक्षर

श्री राम प्रसन्न किंवा श्रीराम जयराम जयजयराम असे लिहून वह्या च्या वह्या वाया घालवणे
हस्ताक्षर सुधारते! ;)
  • Log in or register to post comments

Submitted by जेपी on गुरुवार, 09/25/2014 - 12:01

Permalink

नवरात्रात अनवाणी चालायची

नवरात्रात अनवाणी चालायची पद्धत मी गेल्यावर्षीपर्यंत पाळत होतो.यावर्षी लक्षातच राहिल नाही.बाहेर गेल्यावर लक्षात आले मागे कुठलाही तर्क नाही.मी तुळजापुरात 10 वर्ष घालवली आहेत.त्यामुळे असु शकतो.
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on गुरुवार, 09/25/2014 - 12:02

Permalink

श्री राम प्रसन्न किंवा

श्री राम प्रसन्न किंवा श्रीराम जयराम जयजयराम असे लिहून वह्या च्या वह्या वाया घालवणे आणि नवरात्रीचे नऊ दिवस चपला न घालणे हे दोन्ही एकाच प्रकारचे अंधश्रद्ध खुळचट आचार आहेत. ज्यांच्यासाठी या श्रद्धा आहेत त्यांच्यासाठी त्या राहु दे ना, तुम्ही त्याला अंधश्रद्ध चे लेबल का चिकटवत आहात ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- टोलकोंडी नुसतीच लूट!
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on गुरुवार, 09/25/2014 - 12:34

In reply to श्री राम प्रसन्न किंवा by मदनबाण

Permalink

ज्यांच्यासाठी या श्रद्धा आहेत

ज्यांच्यासाठी या श्रद्धा आहेत त्यांच्यासाठी त्या राहु दे ना, तुम्ही त्याला अंधश्रद्ध चे लेबल का चिकटवत आहात ?
ज्याच्यातुन काहीही निष्पन्न होत नाही अशाच गोष्टी आहेत त्या. त्याला दुसरे काय म्हणायचे?
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on गुरुवार, 09/25/2014 - 12:50

In reply to ज्यांच्यासाठी या श्रद्धा आहेत by विजुभाऊ

Permalink

फुकटची बासरी वाजवून पण तोंडची

फुकटची बासरी वाजवून पण तोंडची वाफ दडवली जाते, साध्य काहीच होत नाही
  • Log in or register to post comments

Submitted by किसन शिंदे on गुरुवार, 09/25/2014 - 12:54

In reply to फुकटची बासरी वाजवून पण तोंडची by स्पा

Permalink

=))

=)) स्पावड्याचा अपेक्षित प्रतिसाद.!
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on गुरुवार, 09/25/2014 - 12:56

In reply to फुकटची बासरी वाजवून पण तोंडची by स्पा

Permalink

अरे अरे, असं म्हणू नये

अरे अरे, असं म्हणू नये स्पावड्या. शांत हो बघू आधी. मोठे आहेत ना ते?
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on गुरुवार, 09/25/2014 - 14:19

In reply to फुकटची बासरी वाजवून पण तोंडची by स्पा

Permalink

श्री श्री श्री स्पाजी.

श्री श्री श्री स्पाजी. मग म्या पामराने काय करावे या बद्दल म्या पामर बालकास बहुमोल मार्गदर्शन करावे.
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on गुरुवार, 09/25/2014 - 14:20

In reply to श्री श्री श्री स्पाजी. by विजुभाऊ

Permalink

सध्यातरी बासरी फुकट न वाजवता

सध्यातरी बासरी फुकट न वाजवता तिकीट लावून वाजवता येईल या प्रयत्नात आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on गुरुवार, 09/25/2014 - 14:48

In reply to श्री श्री श्री स्पाजी. by विजुभाऊ

Permalink

इजाभाय चिल :D

इजाभाय चिल :D
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on गुरुवार, 09/25/2014 - 14:49

In reply to इजाभाय चिल :D by स्पा

Permalink

ज्याच्यातुन काहीही निष्पन्न

ज्याच्यातुन काहीही निष्पन्न होत नाही अशाच गोष्टी आहेत त्या. त्याला दुसरे काय म्हणायचे?
तुमचेच विचार आहेत हे , सो तिकीट लावणे योग्य वाटते :)
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on गुरुवार, 09/25/2014 - 23:55

In reply to फुकटची बासरी वाजवून पण तोंडची by स्पा

Permalink

पांडोबा... , महत्वाचा फरक

पांडोबा... , महत्वाचा फरक आहे हो! बासरी वाजविणे ही "श्रद्धा" नाहीये! त्यामुळे "काय वाया जातं?" हां प्रश्नच निकालात निघतो! निरर्थक ठरतो.
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on Fri, 09/26/2014 - 12:52

In reply to पांडोबा... , महत्वाचा फरक by अत्रुप्त आत्मा

Permalink

काय आहे मग बाजरी वाजवणे?

काय आहे मग बाजरी वाजवणे?
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Fri, 09/26/2014 - 13:12

In reply to काय आहे मग बाजरी वाजवणे? by स्पा

Permalink

छंद.

छंद.
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on Fri, 09/26/2014 - 13:28

In reply to छंद. by बॅटमॅन

Permalink

छंदाची व्याख्या काय?

छंदाची व्याख्या काय?
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Fri, 09/26/2014 - 16:01

In reply to छंदाची व्याख्या काय? by स्पा

Permalink

@छंदाची व्याख्या काय?>>>

@छंदाची व्याख्या काय?>>> मनाला आनंद देणारं कृतीबद्ध प्रमेय!
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on Fri, 09/26/2014 - 16:13

In reply to @छंदाची व्याख्या काय?>>> by अत्रुप्त आत्मा

Permalink

मग वहीवर रामनाम लिहिणे, किंवा

मग वहीवर रामनाम लिहिणे, किंवा कविता लिहिणे किंवा निबंध लिहिणे हे कृतीबद्ध नाही का ? तो एखाद्याचा छंद नसू शकतो का?
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Fri, 09/26/2014 - 16:25

In reply to मग वहीवर रामनाम लिहिणे, किंवा by स्पा

Permalink

>>मग वहीवर रामनाम लिहिणे,

>>मग वहीवर रामनाम लिहिणे, किंवा कविता लिहिणे किंवा निबंध लिहिणे हे कृतीबद्ध नाही का ? तो एखाद्याचा छंद नसू शकतो का? +१ Till its not making any harm to you, be happy in your world let them be in their world !!
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Fri, 09/26/2014 - 16:34

In reply to मग वहीवर रामनाम लिहिणे, किंवा by स्पा

Permalink

मग त्याला छंदच का म्हणत नाही?

मग त्याला छंदच का म्हणत नाही? श्रद्धा का म्हणता?
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on Fri, 09/26/2014 - 16:46

In reply to मग त्याला छंदच का म्हणत नाही? by अत्रुप्त आत्मा

Permalink

कोण म्हणतंय श्रद्धा ?

कोण म्हणतंय श्रद्धा ?
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on Fri, 09/26/2014 - 16:47

In reply to मग त्याला छंदच का म्हणत नाही? by अत्रुप्त आत्मा

Permalink

विजुभाऊ उवाच : श्री राम

विजुभाऊ उवाच : श्री राम प्रसन्न किंवा श्रीराम जयराम जयजयराम असे लिहून वह्या च्या वह्या वाया घालवणे आणि नवरात्रीचे नऊ दिवस चपला न घालणे हे दोन्ही एकाच प्रकारचे अंधश्रद्ध खुळचट आचार आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on Fri, 09/26/2014 - 16:48

In reply to विजुभाऊ उवाच : श्री राम by स्पा

Permalink

ज्याला जे वाटेल ते त्याने

ज्याला जे वाटेल ते त्याने खुशाल करावे. राम नाम लिहून इतर लोकांना तर इतरास झालेला मी पाहिलेला नाही किंवा नवरात्रात चपला ण घातल्याने ण घातलेल्या त्रास होईल णा, तुम्हाला त्याने काही वाईट वाटून घ्यायचे कारण नाही
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Fri, 09/26/2014 - 13:30

In reply to छंद. by बॅटमॅन

Permalink

निरर्थक छंद म्हणायचा का ?

निरर्थक छंद म्हणायचा का ? काही निष्पन्न होत नाही हो त्यातून. कष्ट करुन चांगला बांबू निवडायचा, तो व्यवस्थित मोकळा करायचा, त्याला स्मूथ फिनिश द्यायचं, योग्य अंतरावर छिद्र पाडायची, त्यात हवा भरायची, सोडायची, बांबूवर बोटं कशी चालवायची ते शिकायचं. आणि निष्पन्न काय तर काहीच नाही... उगाच कसला तरी आवाज! वादासाठी वाद घालत जाऊ आम्ही, ध्वजा मिसळपावची उंच धरु आम्ही. नेहमीचाच विषय असे जरी तो, नव्याने उगाळू, टाईमपास करु आम्ही. (बूस्टर दिलाय, हाणा स्मॅश! ;) )
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on Fri, 09/26/2014 - 13:31

In reply to निरर्थक छंद म्हणायचा का ? by प्यारे१

Permalink

प्यारे काका मध्येच आल्याने

प्यारे काका मध्येच आल्याने आमचा पास पुढील चर्चा आमच्या खरड वहीत करू :)
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Fri, 09/26/2014 - 13:35

In reply to प्यारे काका मध्येच आल्याने by स्पा

Permalink

ओ मी मधेच कुठं आलो?

ओ मी मधेच कुठं आलो? तुमच्या प्रतिसादानंतर खाली कडेला आहे प्रतिसाद. कैपण नै ऐकून घेणार आधीच सांगतो. (दीपकची सेन्च्युरी झाली. आता सुखे डोळे मिटायास मोकळे)
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on Fri, 09/26/2014 - 13:36

In reply to ओ मी मधेच कुठं आलो? by प्यारे१

Permalink

+१

(दीपकची सेन्च्युरी झाली. आता सुखे डोळे मिटायास मोकळे)
याचसाठी केला होता अट्टाहास
  • Log in or register to post comments

Submitted by कवितानागेश on Fri, 09/26/2014 - 21:48

In reply to +१ by स्पा

Permalink

स्पाउ, त्यापेक्षा विजुभाउंना

स्पाउ, त्यापेक्षा विजुभाउंना छुंदा म्हंजे काय ते विचार! वेडा कुठला!! मी तुला 'छंदांविषयी' नावाचं पुस्तक वाचायला देउ का?
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Sat, 09/27/2014 - 12:53

In reply to स्पाउ, त्यापेक्षा विजुभाउंना by कवितानागेश

Permalink

हो हो टाकतो छुन्दा ची पाककृती

हो हो टाकतो छुन्दा ची पाककृती. पण छुन्दा करायचा तर कच्च्या कैर्‍या साठी इंडिया स्टोअर्स मधे जाणे आले
  • Log in or register to post comments

Submitted by दिपक.कुवेत on Sat, 09/27/2014 - 18:47

In reply to हो हो टाकतो छुन्दा ची पाककृती by विजुभाऊ

Permalink

विजुभाऊ

आता छुन्दा छंद लागूनच जौ दे सगळ्यांना....ल्वकर टाका पाकृ
  • Log in or register to post comments

Submitted by खटपट्या on Sat, 09/27/2014 - 02:02

In reply to निरर्थक छंद म्हणायचा का ? by प्यारे१

Permalink

येवडं कराय लागतं व्हय

येवडं कराय लागतं व्हय बासरीसाठी ? मला वाटलं समदीजन कळव्याच्या जत्रत बासरी इकत घेतात म्हून !!!
  • Log in or register to post comments

Submitted by दिपक.कुवेत on Sat, 09/27/2014 - 18:48

In reply to येवडं कराय लागतं व्हय by खटपट्या

Permalink

हां मन्ग

फार खटपट लागते बासरीसाठि. एवढं सोप्प नाहि खट्टु काका
  • Log in or register to post comments

Submitted by खटपट्या on Sun, 09/28/2014 - 00:03

In reply to हां मन्ग by दिपक.कुवेत

Permalink

हम्म !!

हम्म !!
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on गुरुवार, 09/25/2014 - 12:43

In reply to श्री राम प्रसन्न किंवा by मदनबाण

Permalink

ज्यांच्यासाठी या श्रद्धा आहेत

ज्यांच्यासाठी या श्रद्धा आहेत त्यांच्यासाठी त्या राहु दे ना, तुम्ही त्याला अंधश्रद्ध चे लेबल का चिकटवत आहात ?
या हिशोबाने सगळ्याच अंधश्रध्धा या श्रध्धा क्याटेगरीत जमा होतात...
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on गुरुवार, 09/25/2014 - 14:21

In reply to ज्यांच्यासाठी या श्रद्धा आहेत by टवाळ कार्टा

Permalink

परफेक्ट टवाळभौ

परफेक्ट टवाळभौ
  • Log in or register to post comments

Submitted by जेपी on गुरुवार, 09/25/2014 - 12:06

Permalink

आणखिन एक श्रद्धा

नवरात्रीच्या काही दिवस आधी आणी नंतर भवानी निद्राअवस्थेत असते.याकाळा बरेच लोक गादीवर पंलगावर झोपत नाहीत.जमीनीवर झोपतात.शिवाय नवरात्रीचे 9 उपवास.हे उपवास मात्र मी स्वत:करतो.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रमोद देर्देकर on गुरुवार, 09/25/2014 - 12:39

Permalink

हो पण खरे श्रध्दाळु लोक

हो पण खरे श्रध्दाळु लोक राहिले बाजुला आणि हे खुळ कॉलेजमध्ये पण पोहचले. मग काय ती करते तर मी पण करतो (बघ तुझ्यासाठी कायपण)अशी स्टाईल झाली आहे. आणि एक की जो चप्पल घालणार नाही त्याची भक्ती जास्त का? म्हणजे तोच खरा भक्त की काय?
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on गुरुवार, 09/25/2014 - 12:42

In reply to हो पण खरे श्रध्दाळु लोक by प्रमोद देर्देकर

Permalink

+१११११११

+१११११११
  • Log in or register to post comments
Profile picture for user सुहास झेले

Submitted by सुहास झेले on गुरुवार, 09/25/2014 - 12:41

Permalink

अरे ९ दिवसांची कलर स्कीम

अरे ९ दिवसांची कलर स्कीम राहिली की... ;-)
  • Log in or register to post comments
Profile picture for user सुहास..

Submitted by सुहास.. on गुरुवार, 09/25/2014 - 12:45

Permalink

*त्यागिरी !

तुमच्यापैकि कोणी असं काहि फॉलो करतं का? >> हो पाहिलय !! मुस्लीम बांधव आहे , पाच वेळची नमाज ही करतो आणि रोजे ही धरतो ..मुलगी स्वाईन फ्लु ने आजारी होती, डॉक्टर ने भरोसा सोडला होता , रुबीच्या हॉल च्या खाली मंदीरात नवस बोलला...मुलगी वाचली.... प्रचीती आली ..तेव्हापासुन करतो ..भक्ती , श्रध्दा अशी जागृत होते ...त्या कर्मकांड लागत नाहीत ,,,धन्यवाद !! हल्ली मिपावर चर्चांचां पण दर्जा घसरायला लागलाय असे निरीक्षण नोंदवितो ...भक्ती कमी की जास्त ही काय चर्चा करायची गोष्ट आहे का ;)
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on गुरुवार, 09/25/2014 - 12:51

In reply to *त्यागिरी ! by सुहास..

Permalink

>>> हल्ली मिपावर चर्चांचां पण

>>> हल्ली मिपावर चर्चांचां पण दर्जा घसरायला लागलाय हल्ली ह्या शब्दावर आक्षेप.
  • Log in or register to post comments

Submitted by पिवळा डांबिस on Fri, 09/26/2014 - 03:11

In reply to >>> हल्ली मिपावर चर्चांचां पण by प्यारे१

Permalink

आँ?

हल्ली ह्या शब्दावर आक्षेप.
'चर्चा' आणि 'दर्जा' या शब्दांवर नाय आक्षेप? कसले जाज्वल्य मिपाकर तुम्ही? :)
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on गुरुवार, 09/25/2014 - 13:50

In reply to *त्यागिरी ! by सुहास..

Permalink

पाहिलय !! मुस्लीम बांधव आहे ,

पाहिलय !! मुस्लीम बांधव आहे , पाच वेळची नमाज ही करतो आणि रोजे ही धरतो .. आमच्या कंपनीतले आणि इतर कंपन्यां मधले मुसलमान तरुण नमाज ची वेळ झाली पार्कींग लॉट मधे जाउन नमाज पठण करतात. त्यांची ही त्यांच्या धर्मा विषयची आस्था आणि कट्टरता मला नेहमीच आवडली आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- टोलकोंडी नुसतीच लूट!
  • Log in or register to post comments
Profile picture for user सुहास..

Submitted by सुहास.. on गुरुवार, 09/25/2014 - 12:52

Permalink

अवांतर : पुण्यात राहिले की

अवांतर : पुण्यात राहिले की असे वांदे होतात बोलताना ;) का ब्वा ? लिंक देतो खव त थोड्या वेळात :)
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on गुरुवार, 09/25/2014 - 12:53

Permalink

आस्तिक-नास्तीक्पाव.कॉम :)

आस्तिक-नास्तीक्पाव.कॉम :)
  • Log in or register to post comments

Submitted by किसन शिंदे on गुरुवार, 09/25/2014 - 12:57

Permalink

वेल :P, हा धागा शंका निरसन

वेल :P, हा धागा शंका निरसन कमी आणि आस्तिक-नास्तिकतेच्या वादावर शतकी प्रतिसाद ओढायला काढलेला वाटतो. ;)
  • Log in or register to post comments
Profile picture for user सुहास..

Submitted by सुहास.. on गुरुवार, 09/25/2014 - 12:59

Permalink

आस्तिक-नास्तिकतेच्या वादावर

आस्तिक-नास्तिकतेच्या वादावर शतकी प्रतिसाद ओढायला काढलेला वाटतो. >> पुन्हा ( हल्ली ) बरेच आयडी शतकी प्रतिसाद-पिपासु झालेत , दिपक कडुन अपेक्षा नव्हती असे पुन्हा स्पारीक्षण नोंदवतो ;)
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on गुरुवार, 09/25/2014 - 13:02

In reply to आस्तिक-नास्तिकतेच्या वादावर by सुहास..

Permalink

पाटा खेळपट्टीवर रन होतात मग

पाटा खेळपट्टीवर रन होतात मग पाटा खेळपट्टीवरच का खेळू नये? का मॅचेस भरवू नयेत?
  • Log in or register to post comments
Profile picture for user सुहास..

Submitted by सुहास.. on गुरुवार, 09/25/2014 - 13:06

In reply to पाटा खेळपट्टीवर रन होतात मग by प्यारे१

Permalink

तो खेळ बे-भरवशाचा ...जास्त रन

तो खेळ बे-भरवशाचा ...जास्त रन व्हायला लागले, आणी ते चेस ही व्यायला लागले की मग खेळातली मजा ही जाते ..भविष्यात तो खेळ बघण बंद करतील की लोक्स !! बाकी खेळताना तेच तेच गडी बघुन ही कंटाळा येतोच ...एक सचिन सोडला तर ;)
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on गुरुवार, 09/25/2014 - 13:08

In reply to तो खेळ बे-भरवशाचा ...जास्त रन by सुहास..

Permalink

प्रेक्षकांनी अशा मॅचेसकडं पाठ

प्रेक्षकांनी अशा मॅचेसकडं पाठ फिरवणं आवश्यक असताना किमान दोन प्रेक्षक मॅचेस कशा चुकीच्या पद्धतीने खेळवल्या जात आहेत अशी चर्चा स्टेडीयममध्ये बसूनच करत आहेत. ते थांबवणं शक्य आहे ना? ;)
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com