Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by दिवाळी अंक on Sun, 08/24/2014 - 12:13
राम राम मंडळी. :) मंडळी... कळविण्यास अतिशय आनंद वाटतो की गेल्या वर्षीच्या यशस्वी दिवाळी अंकानंतर आपण याही वर्षी आपल्या मिपाचा दिवाळी अंक काढणार आहोत. तेव्हा आपल्या कविता, व्यंगचित्र, कथा, माहितीपूर्ण लेखन, चुटकुले, विनोदी लेखन, अशा सर्व प्रकारचे लेखन दिनांक २०/०९/२०१४ पर्यंत वर्ड फाईल असेल तर mipa.sampadak@gmail.com या स्वतंत्र ईमेल आयडीला ईमेलद्वार किंवा दिवाळी अंक या मिपावरच्या आयडीला व्यनिद्वारे पाठवा. जास्त चित्रे असतील तर शक्यतो gmail आयडीला पाठवावे ही विनंती. कारण व्यनिद्वारे आलेली फाईल अंकात समाविष्ट करणे जरा जिकिरीचे काम आहे. अन्यथा जणू धागाच प्रकाशित करतो आहोत अशा रितीने मिपा एडिटरमधे (इमेज टॅग्जसकट) लिहीलेली पोस्ट तशीच्यातशी एचटीएमएल टॅग्जसहित चोप्य पस्ते करुन टेक्स्ट फाईल (नोटपॅड) जीमेलवर अटॅच करुन पाठवली तरी दिवाळी अंक संपादकांचे काम सोपे होईल. १. कोणकोणत्या साहित्यप्रकारात लेखन अपेक्षित आहे. कविता, व्यंगचित्र, कथा, माहितीपूर्ण लेखन, चुटकुले, विनोदी लेखन, कादंबरी, अन्य ललित लेखन, पाककृती,चित्रे, छायाचित्रे, व्हिडिओ इ. प्रकारचे साहित्य पाठवावे. अंक पीडीएफ स्वरूपातही काढायचा आहे त्यामुळे मल्टिमिडिया फाईल्स असतील तर त्या पीडीएफ अंकात फक्त लिंक या स्वरूपात येतील, तरी दिवाळीच्या निमित्ताने स्वतंत्रपणे प्रकाशित करायला हरकत नाही. २. कोणत्या प्रकारचे साहित्य स्वीकारता येणार नाही (बंधने -विषय, आकार इत्यादिबाबतची) नेहमीचे म्हणजे अगदी एकोळी दोनोळी साहित्य पाठवू नये, तसेच उत्सवी अंक असल्यामुळे दु:खी, सणाच्या दृष्टीने अप्रिय, किळसवाणे, मृत्यूशी संबंधित, थेट ट्रॅजेडीने भरलेले असे प्रकार कृपया न पाठवल्यास बरे. ३. साहित्य पाठवण्याची अंतिम तारीख : २०/०९/२०१४ ४. इतर अटी: साहित्य दिवाळी अंकात प्रसिद्ध करण्याच्या बाबतीत दिवाळी अंक संपादक मंडळाचा निर्णय अंतिम राहील. दिवाळी अंकात समाविष्ट न होऊ शकलेलं साहित्य तुम्ही नेहमीप्रमाणे मुख्य बोर्डावर प्रसिद्ध करू शकताच! ५. साहित्य पाठविण्याचा पर्याय. वर लिहिल्याप्रमाणे mipa.sampadak@gmail.com या जीमेल आयडीला पाठवल्यास उपकृत राहू. पण काही कारणाने ते शक्य नसेल तर दिवाळी अंक आयडीला मिपावर व्यनि करावा. ६. अंकासाठी पाठवलेलं साहित्य पूर्व प्रकशित असू नये. आणि मिपा दिवाळी अंकात हे लिखाण प्रकाशित झाल्यावर निदान ३० दिवसांपर्यंत ते लेखन अन्यत्र प्रकाशित करू नये. मंडळी, आपल्या सहकार्याशिवाय कोणताच उपक्रम यशस्वी होऊ शकत नाही. आपले सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. अजून साधारण २५ दिवस बाकी आहेत. तरी सर्वांनी भरभरून प्रतिसाद द्यावा ही विनंती ! आम्ही आपल्या लेखनाची वाट पाहात आहोत, धन्यवाद !!!
  • Log in or register to post comments
  • 36027 views

प्रतिक्रिया

Profile picture for user सुहास झेले

Submitted by सुहास झेले on Sun, 08/24/2014 - 14:01

Permalink

ज्ये बात.... शुभेच्छा

ज्ये बात.... शुभेच्छा :)
  • Log in or register to post comments

Submitted by मिसळलेला काव्यप्रेमी on Fri, 10/17/2014 - 11:52

In reply to ज्ये बात.... शुभेच्छा by सुहास झेले

Permalink

कधी

कधी येतोय म्हणे हा अंक. फार वाट पहायला पाहू नका रे..
  • Log in or register to post comments

Submitted by शिद on Fri, 10/31/2014 - 15:25

In reply to कधी by मिसळलेला काव्यप्रेमी

Permalink

मिपा दिवाळी अंक - २०१४

मिपा दिवाळी अंक - २०१४
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on Sun, 08/24/2014 - 14:27

Permalink

जरूर.....

धन्यवाद आणि मिपाच्या पाठीवर एक कौतुकाची थाप. नक्कीच, दिवाळी अंकास एखादा लेख, एखादी पाककृती पाठवून सक्रिय सहभागाचा प्रयत्न करेन.
  • Log in or register to post comments

Submitted by सस्नेह on Sun, 08/24/2014 - 14:41

Permalink

शुभेच्छा !

उत्सुकतेने वाट पहात आहे..अंकाची
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Mon, 08/25/2014 - 12:55

In reply to शुभेच्छा ! by सस्नेह

Permalink

आणि

मी दिवाळी अंकासाठी तुझ्याकडून एखाद्या मस्त लेखाची!
  • Log in or register to post comments

Submitted by सस्नेह on Mon, 08/25/2014 - 15:46

In reply to आणि by पैसा

Permalink

(No subject)

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Sun, 08/24/2014 - 17:48

Permalink

दिपावली अंकाला अनेक शुभेच्छा

दिपावली अंकाला अनेक शुभेच्छा !
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Mon, 08/25/2014 - 12:54

In reply to दिपावली अंकाला अनेक शुभेच्छा by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

फक्त शुभेच्छा?

लिवा एखादी मस्त अंतराळातली लाखों वर्षांची सफर!
  • Log in or register to post comments

Submitted by एस on Sun, 08/24/2014 - 22:23

Permalink

रामराम, रामराम

ह्यावर्षी चार ओळी दिवाळी अंकासाठी खरडण्याचा निश्चितच विचार केला जाईल.
  • Log in or register to post comments

Submitted by vrushali n on Mon, 08/25/2014 - 12:49

Permalink

अनेकानेक शुभेच्छा !

प्लीझ प्लीझ खुप जास्त संखेत कथा कादंबरी लिहा सगळ्या लेखक्/लेखीकांनो
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Mon, 08/25/2014 - 12:56

Permalink

धन्यवाद!

पेठकर काका, स्वॅप्स, धन्यवाद! लेखाची वाट बघत आहे. सुहास झेले, अजून जरा मोठ्या शुभेच्छा पाहिजेत, एक पानभर! :P
  • Log in or register to post comments
Profile picture for user सुहास झेले

Submitted by सुहास झेले on Mon, 08/25/2014 - 13:21

In reply to धन्यवाद! by पैसा

Permalink

नक्कीच ताई.....

नक्कीच ताई..... :)
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Mon, 08/25/2014 - 13:17

Permalink

सुचना दीर्घ असायला हवी ना?...

सुचना दीर्घ असायला हवी ना?... सूचना अशी?
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Mon, 08/25/2014 - 13:29

In reply to सुचना दीर्घ असायला हवी ना?... by प्यारे१

Permalink

धन्यवाद!

बदल करत आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Mon, 08/25/2014 - 22:06

In reply to धन्यवाद! by पैसा

Permalink

आमच्या सूचनेचं काम संपलं.

आमच्या सूचनेचं काम संपलं. उडवायला हरकत इल्ले.
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Mon, 08/25/2014 - 14:09

Permalink

डॉ.खरेंचे लेख असलेच पाहिजेत

डॉ.खरेंचे लेख असलेच पाहिजेत आणि तेसुध्धा नविन :)
  • Log in or register to post comments

Submitted by आदूबाळ on Mon, 08/25/2014 - 14:43

In reply to डॉ.खरेंचे लेख असलेच पाहिजेत by टवाळ कार्टा

Permalink

त्याचबरोबर आतिवास,

त्याचबरोबर आतिवास, स्नेहांकिता, गवि, रामदास, जयंत कुलकर्णी, रणजीत चितळे, जैक डेनियल, अभ्या, इ. नियमित न लिहिणार्या मंडळींनीही लिहायचं मनावर घ्यावं ही विनंती. मोजी आणि मकले यांनाही आग्रहाची विनंती ;)
  • Log in or register to post comments

Submitted by सौंदाळा on Mon, 08/25/2014 - 15:01

In reply to त्याचबरोबर आतिवास, by आदूबाळ

Permalink

+१ आणि पिवळो डांबिस पण

+१ आणि पिवळो डांबिस पण
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on Mon, 08/25/2014 - 15:02

In reply to +१ आणि पिवळो डांबिस पण by सौंदाळा

Permalink

+२

ह्येच बोल्तो
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Mon, 08/25/2014 - 15:15

In reply to +२ by स्पा

Permalink

+३

त्याशिवाय टवाळ कार्टा, आदूबाळ, सौंदाळा आणि स्पा याम्च्या लेखाच्या प्रतीक्षेत. (स्पा यांनी गेली २ वर्षे कबूल करून कल्टी मारली होती याची झाईर आठवण करून देत आहे.)
  • Log in or register to post comments

Submitted by सस्नेह on Mon, 08/25/2014 - 15:50

In reply to +३ by पैसा

Permalink

आणि

ज्योती, यशोधरा, प्यारे १, मस्त कलंदर व मोदक यांनाही आग्रहाची लेखन विनंती Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Mon, 08/25/2014 - 14:16

Permalink

हम्म!!

नोटेड!!
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Mon, 08/25/2014 - 22:43

In reply to हम्म!! by सूड

Permalink

कारवाई करा!

नुसतंच नोट करू नका!
  • Log in or register to post comments

Submitted by भाते on Mon, 08/25/2014 - 15:00

Permalink

शुभेच्छा!

दिवाळी अंकासाठी समस्त मिपाकरांना लिखाणासाठी हार्दिक शुभेच्छा! दिवाळी अंकाची वाट पाहतो आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by दिपक.कुवेत on Mon, 08/25/2014 - 15:12

Permalink

दिवाळी अंकासाठी हार्दिक शुभेच्छा!

चला परत दर्जेदार साहित्यकृती वाचायला मिळणार तर! आतुरतेने वाट बघतोय.
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Mon, 08/25/2014 - 22:42

In reply to दिवाळी अंकासाठी हार्दिक शुभेच्छा! by दिपक.कुवेत

Permalink

और आप?

तुझी काहीतरी गोड पाकृ हवीच ना दिवाळीला!
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Wed, 08/27/2014 - 01:59

In reply to और आप? by पैसा

Permalink

तसं कुठं ल्हिलय वर? पाकृ

तसं कुठं ल्हिलय वर? पाकृ चालतील असा उल्लेख केला नसल्याने आम्ही माघार घेतली होती ना पैतै!
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Mon, 08/25/2014 - 21:42

Permalink

कधी प्रकाशित होणार आहे?

तारीख काय?
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Mon, 08/25/2014 - 22:38

In reply to कधी प्रकाशित होणार आहे? by मुक्त विहारि

Permalink

नेहमीप्रमाणे

दिवाळीच्या पहाटे प्रकाशित करू असा विचार आहे! आगे भगवान आणि नीलकांत की मर्जी आणि क्रिपा! :D
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Tue, 08/26/2014 - 00:03

In reply to नेहमीप्रमाणे by पैसा

Permalink

मिपाचा दिवाळी अंक

क्रिसमसच्या वेळी जरी प्रसिद्ध झाला तरी, त्याचे स्वागत दिवाळी सारखेच केल्या जाईल. (मिपाभक्त) मुवि...
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on Tue, 08/26/2014 - 01:22

In reply to मिपाचा दिवाळी अंक by मुक्त विहारि

Permalink

हा: हा: हा:

माझ्या लहानपणी एकदा वर्तमानपत्रात बातमी छापून आली होती. 'हवामानखात्याच्या अंदाजानुसार यंदाही ७ जून रोजी पावसाळा सुरु होईल' ह्या बातमीचा संदर्भ देऊन दुसर्‍या दिवशी आचार्य अत्रे ह्यांची टिपण्णी आली होती, 'एक तारखेला पाऊस सुरु झाला तरी जनतेने, 'पावसाळा सुरु झाला आहे' असे मानू नये.'
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Tue, 08/26/2014 - 12:31

In reply to हा: हा: हा: by प्रभाकर पेठकर

Permalink

@पावसाळा सुरु झाला आहे' असे

@पावसाळा सुरु झाला आहे' असे मानू नये.'>>> =))
  • Log in or register to post comments

Submitted by नगरीनिरंजन on Mon, 08/25/2014 - 22:04

Permalink

दिवाळी अंकाला हार्दिक

दिवाळी अंकाला हार्दिक शुभेच्छा! संपादकांच्या निवडीच्या उमेदवार पानांमध्ये आम्हीही एखादं पान सरकवण्याचा प्रयत्न निश्चितच करु.
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Mon, 08/25/2014 - 22:41

In reply to दिवाळी अंकाला हार्दिक by नगरीनिरंजन

Permalink

लक्षात ठेवते!

विसरलात तर आठवण करून देईन.
  • Log in or register to post comments

Submitted by सस्नेह on Tue, 08/26/2014 - 12:26

In reply to दिवाळी अंकाला हार्दिक by नगरीनिरंजन

Permalink

प्रयत्न नाही,

आश्वासन हवे. ननि तुम्ही मागच्या दिवाळीअंकानंतर मिपासाठी काहीच लिहिले नाही. लिहिते व्हा..
  • Log in or register to post comments

Submitted by चौथा कोनाडा on Mon, 08/25/2014 - 22:52

Permalink

मी पण भाग घेणार या वेळी ....

मी पण भाग घेणार या वेळी .... (असं आत्ता तरी म्हणतोय )
  • Log in or register to post comments

Submitted by मिसळलेला काव्यप्रेमी on Tue, 08/26/2014 - 13:21

Permalink

चला

कामाला लागतो... (स्वगतः असं म्हणून कविता होत नाही, पण... बघू..)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on Wed, 08/27/2014 - 01:16

In reply to चला by मिसळलेला काव्यप्रेमी

Permalink

चूर्ण....

>>>>(स्वगतः असं म्हणून कविता होत नाही, पण... बघू..) कांहीतरी 'चुरण' घेऊन पाहा.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on Wed, 08/27/2014 - 01:20

In reply to चला by मिसळलेला काव्यप्रेमी

Permalink

हलकेच घ्या हो. हसरी smiley

हलकेच घ्या हो. *biggrin* हसरी smiley टाकायला विसरलो होतो.
  • Log in or register to post comments

Submitted by दशानन on Tue, 08/26/2014 - 23:49

Permalink

यावर्षी माझा देखील सहभाग आहे,

यावर्षी माझा देखील सहभाग आहे, काही व्यक्तिगत कारणामूळे अनेक दिवस मिपावर मी उपलब्ध नव्हतो, पण आता असेन.
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Tue, 08/26/2014 - 23:52

Permalink

धन्यवाद!

चौथा कोनाडा, मिका आणि दशानन, लिखाणाची वाट बघते. पुढची आठवण कधी करू ते सांगा!
  • Log in or register to post comments

Submitted by दशानन on Tue, 08/26/2014 - 23:56

In reply to धन्यवाद! by पैसा

Permalink

मी लिहतो आहे सध्या, आठवण करुन

मी लिहतो आहे सध्या, आठवण करुन द्यावी लागेल असे वाटत नाही आहे ;)
  • Log in or register to post comments

Submitted by चौथा कोनाडा on गुरुवार, 08/28/2014 - 12:19

In reply to धन्यवाद! by पैसा

Permalink

उत्तेजनासाठी धन्यवाद, पैसाताई

उत्तेजनासाठी धन्यवाद, पैसाताई ! लिखाण चालू आहे. अधून मधून आठवण करून दिली तरी चालेल. असा पुश मिळाला की वेळेत होइल.
  • Log in or register to post comments

Submitted by खुशि on Wed, 08/27/2014 - 16:33

Permalink

दिवाळी अन्काची वाट पाहते.

दिवाळी अन्काची वाट पाहते.
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on Wed, 08/27/2014 - 16:40

Permalink

मनःपूर्वक शुभेच्छा!

मनःपूर्वक शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

Submitted by पिंपातला उंदीर on Wed, 08/27/2014 - 19:26

Permalink

शुभेच्छा : )

शुभेच्छा : )
  • Log in or register to post comments

Submitted by एस on गुरुवार, 08/28/2014 - 14:17

Permalink

अजून एक शंका!

१. कोणकोणत्या साहित्यप्रकारात लेखन अपेक्षित आहे. कविता, व्यंगचित्र, कथा, माहितीपूर्ण लेखन, चुटकुले, विनोदी लेखन, कादंबरी इ. प्रकारचे साहित्य पाठवावे.
चित्र चालेल काय हो? फोटूबिटू? की 'वर्थ अ थाउजंड वर्ड्स' हे वर्ड्समध्येच पाहिजे?
  • Log in or register to post comments

Submitted by सस्नेह on गुरुवार, 08/28/2014 - 22:09

Permalink

फोटो, कलाकृती आणि पाकृन्चेपण

फोटो, कलाकृती आणि पाकृन्चेपण स्वागत आहे
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on गुरुवार, 08/28/2014 - 23:30

Permalink

शुभेच्छा.

शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com