Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by ज्ञानोबाचे पैजार on Wed, 08/06/2014 - 09:43
वीस वर्षांपूर्वी म्हणजे दि. ५ ऑगस्ट २०१४ रोजी हम आपके है कौन हा चित्रपट प्रदर्शीत झाला होता. त्यातली माधुरी दिक्षीत आठवली की अजुनही हृदयातुन हलकीशी कळ उठते. असा चित्रपट आपण मराठीतही करायचा हे आम्ही त्याच वेळी ठरवले होते. त्याच्या आधिच, म्हणजे साधारण १९९४ सालच्या आधिच आम्ही एक गाणे लिहिले होते. ते आमच्या आगामी चित्रपटासाठी योग्य आहे असे आम्हाला वाटले. आज आम्ही ते रसिकांच्या चरणी अर्पण करत आहोत. तरी सुध्दा एक खुलासा करावासा वाटतो. ही कविता संपूर्ण पणे स्वतंत्र आहे आणि तीचा इतर कोणत्याही मराठी किंवा हिंदि किंवा इतर कोणत्याही भाषेत प्रकाशित झालेल्या कवितेशी कोणताही संबंध नाही. जर असा संबंध आहे असे कोणाला वाटले तर तो केवळ योगायोग आहे असे समजून तो विषय तिकडेच सोडून द्यावा व कवितेचा आनंद लुटावा. मोठ्या वहिनीच्या बहिणी बरोबर सगळ्या होतकरु तरुणांना जवळीक साधायची असते. अनेक हिंदी सिनेमातुन झालेल्या संस्कारातून निर्माण झालेली ही परंपरा आहे. अशाच एका संस्कारी कुटूंबातील एका तरुणीचे मनोगत या कवितेत मांडण्याचा प्रयत्न मी केला आहे. त्या नंतर शेवटच्या काही कडव्यांमधे एका संस्कारक्षम व परंपरा जपणार्‍या होतकरु तरुणाचे मनोगत आहे. आशा आहे ही कविता तुम्हाला नक्की आवडेल.
ती.......
ताई दीर तुझा गं वेडा, -२ बाई गं, मुलींना मारतो खडा मोठा याच्या खोड्यांचा पाढा, बाई गं, मुलींना मारतो खडा ||धृ|| ल ल्ल ला लै लै लै लै ला ल ला -२ चिंचा आणायाला, मी पाठवला त्याला , खुळ्या सारखा खजुर घेउन तो आला डचमळले मला, तर वाटून काळाजी, कलिंगड आणले, त्याने लिंबा ऐवजी वेडा आहे बाई तो थोडा, -२ बाई गं, मुलींना मारतो खडा ||१|| मी म्हणाले त्याला, आण थोडेसे ताक, बावळट घेउन आला, गं साखरेचा पाक, अणाया धाडले, मी अंबट काही, बाजारातुन घेउन, तो आला मिठाई, ओय ओय ओय ओय बनतो येडा खाउन तो पेढा, बाई गं, मुलींना मारतो खडा ||२||
तो.....
वहिनी तुझ्या बहिणीस नमस्कार, सध्याचे, मुलांचे दिवस बेकार देवा काही कर रे चमत्कार, सध्याचे, मुलांचे दिवस बेकार ||ध्रु|| राप पा, तुरु तुरु तुरु तुरु ता ररा -२ निर्देश मी आपले, नाहि हो पाळले, क्षमस्व मला, मर्म नाही समजले शासन जे मिळेल, त्याचा स्विकार होईल , दुविधा या मनाची, कशी दुर होइल? होईल केव्हा मला सा़क्षात्कार, सध्याचे, मुलांचे दिवस बेकार,||३|| ----(फुटकळ सुपारीबाज कवी) पैजारबुवा,----

Submitted by ज्ञानोबाचे पैजार on Wed, 08/06/2014 - 09:45

Permalink

शुध्दीपत्र,

वीस वर्षांपूर्वी म्हणजे दि. ५ ऑगस्ट २०१४ रोजी हम आपके है कौन हा चित्रपट प्रदर्शीत झाला होता. त्यातली माधुरी दिक्षीत आठवली की अजुनही हृदयातुन हलकीशी कळ उठते. च्या ऐवजी वीस वर्षांपूर्वी म्हणजे दि. ५ ऑगस्ट १९९४ रोजी हम आपके है कौन हा चित्रपट प्रदर्शीत झाला होता. त्यातली माधुरी दिक्षीत आठवली की अजुनही हृदयातुन हलकीशी कळ उठते. असे वाचावे पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

Submitted by कविता१९७८ on Wed, 08/06/2014 - 09:47

Permalink

मस्तं आहे.

मराठी भाषांतर आवडलं
  • Log in or register to post comments

Submitted by मृगनयनी on Wed, 08/06/2014 - 10:30

In reply to मस्तं आहे. by कविता१९७८

Permalink

निर्देश मी आपले, नाहि हो

निर्देश मी आपले, नाहि हो पाळले, क्षमस्व मला, मर्म नाही समजले शासन जे मिळेल, त्याचा स्विकार होईल , दुविधा या मनाची, कशी दुर होइल?
हाऊ स्वीईईईईईट्ट्ट्ट ट्रान्स्लेशन!!! ... अ‍ॅक्चुअल मूव्हीत.. या (हिन्दी) ओळींवर सलमान'ने दिलेले एक्स्प्रेशन्स......... ला ज वा ब !!! .. कदाचित "तसे" एक्स्प्रेशन्स तो स्वतःही आत्ता देऊ शकणार नाही.... :) लव यु.. सलमान!!!!! :) :)
  • Log in or register to post comments

Submitted by यसवायजी on Wed, 08/06/2014 - 09:49

Permalink

पैजारबुवा _/\_ Lai bhaaree

पैजारबुवा _/\_ Lai bhaaree
  • Log in or register to post comments
Profile picture for user सुहास..

Submitted by सुहास.. on Wed, 08/06/2014 - 09:52

Permalink

बुवा पेटलेत

बुवा पेटलेत ;) राप पा, तुरु तुरु तुरु तुरु ता ररा -२ >>> लयच !! =)) =))
  • Log in or register to post comments

Submitted by psajid on Wed, 08/06/2014 - 10:28

Permalink

छान भाषांतर !

छान भाषांतर !
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on Wed, 08/06/2014 - 10:53

Permalink

लईच फुटकळ

=)) लईच फुटकळ
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Wed, 08/06/2014 - 22:12

In reply to लईच फुटकळ by स्पा

Permalink

हल्ली स्पा शी सहमत असतो.

हल्ली स्पा शी सहमत असतो. ;)
  • Log in or register to post comments
Profile picture for user धन्या

Submitted by धन्या on Wed, 08/06/2014 - 11:11

Permalink

भावस्पर्शी भावानुवाद !!!

भावस्पर्शी भावानुवाद !!!
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on Wed, 08/06/2014 - 21:53

Permalink

भलताच अर्थ

ताई दीर तुझा गं वेडा,
ह्यातील 'दीर तुझा वेडा गं' ह्याचा अर्थ 'तुझा दीर वेडा आहे' असा आहे हे समजायला बराच वेळ लागला ...तोवर 'दीर तुझा वेडा आहे' असा अर्थ लागत असल्याने भलताच अनर्थ होत होता *lol*
  • Log in or register to post comments

Submitted by यसवायजी on Wed, 08/06/2014 - 22:05

In reply to भलताच अर्थ by प्रसाद गोडबोले

Permalink

दीर आए.. दुरुस्ताए.

दीर आए.. दुरुस्ताए.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on Wed, 08/06/2014 - 22:38

Permalink

लैच भन्नाट

छाऊन गेले गुरू.... :-).
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on गुरुवार, 08/07/2014 - 00:45

Permalink

हा हा हा. काहीही.

हा हा हा. काहीही.
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on गुरुवार, 08/07/2014 - 00:55

Permalink

का ही ही....

का ही ही.... बाकी आमच्या एका मित्रानं 'टवाळ भुंगे हळू हळू गातात' असं 'एका गाण्याचं' भाषांतर केलेलं आठवतंय.
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on गुरुवार, 08/07/2014 - 01:04

Permalink

ओळीओळोंनी येतय हसू इतकच

ओळीओळोंनी येतय हसू =)) इतकच वाचून मी गप कसा बसू! ;) तस्मात .. अजून येऊ द्या! *biggrin*
  • Log in or register to post comments

Submitted by मिसळलेला काव्यप्रेमी on गुरुवार, 08/07/2014 - 17:10

Permalink

क्या बात

क्या बात क्या बात.. लईच भारी... बाकी
----(फुटकळ सुपारीबाज कवी) पैजारबुवा,----
हि स्वाक्षरी वाचून डॉले पाणावले...
  • Log in or register to post comments

Submitted by तिमा on गुरुवार, 08/07/2014 - 18:41

Permalink

हेडिंग

हेडिंग वाचून लीलाधराची कविता असेल असे वाटले होते. म्हणजे, साय आणि तत्सम काहीतरी वाचायला मिळेल असे वाटले होते. पण पैजारबुवांची कविता आहे म्हटल्यावर धागा उघडलाच. ओरिजिनल गाणे पाठ नसल्याने पहिल्या वाचनात भाषांतर समजले नाही. स्तुत्य प्रयत्न!
  • Log in or register to post comments
Profile picture for user धन्या

Submitted by धन्या on गुरुवार, 08/07/2014 - 18:54

Permalink

हेडिंग वाचून लीलाधराची कविता

हेडिंग वाचून लीलाधराची कविता असेल असे वाटले होते. म्हणजे, साय आणि तत्सम काहीतरी वाचायला मिळेल असे वाटले होते.
लीलाधर यांच्यासारख्या महान कवीचे साहित्यिक मुल्यमापन त्यांच्या केवळ साय या काव्यावरुन "तत्सम काहीतरी" असे करणे म्हणजे शाहीर दादा कोंडकेंचे "अंजनीच्या सुता" हे गाणं ऐकून शाहीर केवळ भक्तीगीते लिहित असत असे म्हणण्यासारखे आहे. आपण लीलाधर यांच्या फळा आणि एक बिचारे आण्णा या सामाजिक आशयाने ओतप्रोत भरलेल्या कविता जरुर वाचाव्यात.
  • Log in or register to post comments

Submitted by तिमा on Mon, 08/11/2014 - 12:48

In reply to हेडिंग वाचून लीलाधराची कविता by धन्या

Permalink

धनाजीराव

तसं नव्हे हो धनाजीराव! लीलाधराची योग्यता आम्ही काय जाणत नाही ? पण दीर म्हटला की साय कविता आठवते, इतकी ती पावरबाज आहे. त्यांच्या इतर कवितांइतकीच 'साय' ही कविता आम्हाला आवडली होती.
  • Log in or register to post comments
Profile picture for user धन्या

Submitted by धन्या on Mon, 08/11/2014 - 14:46

In reply to धनाजीराव by तिमा

Permalink

>> पण दीर म्हटला की साय कविता

>> पण दीर म्हटला की साय कविता आठवते, इतकी ती पावरबाज आहे. हे अगदी एकशे एक टक्के खरे आहे. :)
  • Log in or register to post comments

Submitted by मराठे on Fri, 08/08/2014 - 01:03

Permalink

एकेकाळी आम्ही केलेला असा एक

एकेकाळी आम्ही केलेला असा एक भावानुवाद आठवला. हरवला हरवला चंद्र, मोकळं आकाश डोळ्यात सारी रात्र जाईल, तुलाही कश्शी झोप येईल
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Mon, 08/11/2014 - 17:18

In reply to एकेकाळी आम्ही केलेला असा एक by मराठे

Permalink

>>डोळ्यात सारी रात्र जाईल

>>डोळ्यात सारी रात्र जाईल आजवर डोळ्यात बोट जातं एवढंच माहित होतं.
  • Log in or register to post comments
Profile picture for user धन्या

Submitted by धन्या on Mon, 08/11/2014 - 17:21

In reply to >>डोळ्यात सारी रात्र जाईल by सूड

Permalink

आजवर डोळ्यात बोट जातं एवढंच

आजवर डोळ्यात बोट जातं एवढंच माहित होतं.
ते कवी आहेत. जे न देखे रवी, ते देखे कवी.
  • Log in or register to post comments

Submitted by निनाद मुक्काम … on Mon, 08/11/2014 - 14:29

Permalink

लय भारी

लय भारी
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 14182 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com