Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Wed, 07/30/2014 - 00:42
"देव आहे की नाही ?" या प्रश्नाचे उत्तर शोधण्या-देण्यात जगभरच्या लोकांत अनंत काळापासून रणकंदन चालू आहे. शतकामागून शतके लोटली तरीपण या प्रश्नाचे नक्की उत्तर मिळण्याचे लक्षण दृष्टिपथात नाही. हे जग "देव आहे" असे म्हणणारे आस्तिक आणि "देव नाही" असे म्हणणारे नास्तिक असा दोन गटांत विभागलेले आहे असा सर्वसाधारण समज आहे. पण तो समज खरा आहे का ? कोणाला खरे ज्ञान आहे ? आणि मुख्य म्हणजे तुम्ही नक्की कोण आहात आस्तिक की नास्तिक ? चला पाहूया सापडतात का उत्तरे... जरा खोलवर विचार केला तर आस्तिक-नास्तिक हा प्रकार इतका सरळ-सोपा नाही हेच दिसून येते. हे दोन सरळसोट स्पष्ट गट नसून काळा आणि पांढरा या रंगांच्यामध्ये असलेल्या असंख्य करड्या रंगाच्या वर्णपटाप्रमाणेच आस्तिक-नास्तिकतेचा वर्णपट (स्पेक्ट्रम) समाजात असतो असेच दिसते. खरे किंवा प्रामाणिक आस्तिक आणि खरे किंवा प्रामाणिक नास्तिक ही त्या वर्णपटाची केवळ दोन टोके आहेत. चला तर मग ही टोके आणि त्यांमधील वर्णपटाचे केलेले ढोबळ गट पाहूया...

प्रामाणिक आस्तिक

१. या लोकांचा देव आहे या "संकल्पनेवर" दृढ आणि "प्रामाणिक" "विश्वास" असतो. २. त्यांचा हा विश्वास लहानमोठ्या स्वार्थासाठी नसतो अथवा असाहाय्यतेने किंवा सोयीचा म्हणून घेतलेला पवित्रा नसतो. ३. त्यांचा हा विश्वास त्यांच्यावर वाढत्या वयात झालेल्या कौटुंबिक अथवा सामाजिक परिस्थितीचा परिणाम असू शकतो. चालू असलेल्या संशोधनांत या विश्वासामागे त्या व्यक्तींच्या मेंदूची जडणघडण कारणीभूत असल्याचे शास्त्रीय पुरावे मिळत आहेत. ४. हे लोक: (अ) "माझा विश्वास आहे (I believe)" असे म्हणून डोळे मिटून धर्माने सांगितलेले आचरण करतात आणि / किंवा (आ) परम ज्ञानाच्या उपासनेच्या मार्गाने ज्ञानी होण्याचा प्रयत्न करतात आणि / किंवा (इ) पूजाअर्चा, नामस्मरण, कर्मकांडे इ मार्गांनी देव शोधण्याचा प्रयत्न करतात आणि / किंवा (ई) धर्माच्या मार्गाने ज्ञानी झालो की मुक्ती मिळून परमात्म्यात विलीन होणार असा विश्वास ठेवतात. म्हणजे एकूण या जगात असेपर्यंत आपण अज्ञानीच राहणार हेच एका अर्थाने कबूल करतात. ५. हे लोक देव ही "पुराव्याने सिद्ध झालेली गोष्ट" नसून "ज्यावर विश्वास आहे अशी गोष्ट" आहे असे कबूल करून आणि त्या देवावर बेतलेल्या धर्माला "विश्वास (belief)" असे संबोधून अवधानाने किंवा अनवधानाने "देव म्हणजे नक्की काय?" हे माहीत नाही असेच कबूल करतात. ६. शास्त्रात एक फार महत्त्वाचा दंडक आहे, तो म्हणजे : "एकाच गोष्टीला सिद्ध करण्यासाठी अनेक मान्य (सर्वमान्य नव्हे) सिद्धांत असणे हे ती गोष्ट नक्की कोणालाच माहीत नसल्याचे निदर्शक असते." म्हणजेच त्याबाबतीत आपल्याला कामचलाऊ ज्ञान असले तरी खर्‍या दृष्टीने आपण अज्ञानीच असतो. देव आणि धर्म ह्या दोन्हीहीबद्दलचे वैविध्यपूर्ण सिद्धांत या नियमात चपखल बसतात आणि मानव जात "देव" या संकल्पनेबद्दल अजूनही अज्ञानी आहे हेच सिद्ध करतात. ७. प्रामाणिक आस्तिक लोकांची संख्या किती हे सांगणं कठीण आहे... पण खूप कमी असते हे नक्की. थोडक्यात : प्रामाणिक आस्तिक लोक "अल्पसंख्य", "प्रामाणिक" आणि "अज्ञानी" असतात.

प्रामाणिक नास्तिक

या गटातिल लोकांचे गुणधर्म खालिलप्रमाणे असतातः १. या लोकांचा देव आहे या "संकल्पनेवर" दृढ आणि "खरोखरच प्रामाणिक" "अविश्वास" असतो. २. त्यांचा हा अविश्वास लहानमोठ्या स्वार्थासाठी अथवा असाहाय्यतेने अथवा सोयीचा म्हणून घेतलेला पवित्रा नसतो. ३. त्यांचा हा अविश्वास त्यांच्यावर वाढत्या वयात झालेला कौटुंबिक अथवा सामाजिक परिस्थितीचा परिणाम असू शकतो. चालू असलेल्या संशोधनांत या अविश्वासामागे त्या व्यक्तींच्या मेंदूची जडणघडण कारणीभूत असल्याचे शास्त्रीय पुरावे मिळत आहेत. ४. हे लोक: (अ) "माझा अविश्वास आहे (I do not believe)" असे म्हणत आस्तिक लोकांच्या म्हणण्याचे खंडन करत असतात. (आ) "देव आहे याचा शास्त्रीय पुरावा नाही" इतकेच त्यांना आपले म्हणणे खरे आहे हे म्हणण्यासाठी पुरेसे वाटते. त्यांचे म्हणणे शास्त्रीय आहे असे म्हणत असतानाच ते म्हणणे शास्त्रीय पद्धतीने सिद्ध करायला "देव नाही याचा शास्त्रीय पुरावा" सुद्धा जरूर आहे हा शास्त्रीय नियम ते सहजपणे विसरतात. आस्तिकांनी देवाच्या नावाने दिलेल्या आणि शास्त्रीय पद्धतीने उकल न होऊ शकणार्‍या सर्व गोष्टींना ते "अंधश्रद्धा" किंवा "याची भविष्यात शास्त्रीय कारणे मिळतील" असे म्हणून झटकून टाकतात. म्हणजे एकूण आपण देवाच्या बाबतीत पूर्णणे ज्ञानी नसल्याचे (पर्यायाने अज्ञानी असल्याचे) कबूल करतात. ५. हे लोक देव ही "पुराव्याने सिद्ध न झालेली गोष्ट" नसून "ज्यावर विश्वास नाही अशी गोष्ट" आहे असे कबूल करून आणि ते स्वत:ला "विश्वास नसणारे (non-believers)" असे संबोधून अवधानाने किंवा अनवधानाने "देव नाही हे नक्की माहीत नाही" असेच कबूल करतात. ६. प्रामाणिक आस्तिक लोकांची संख्या किती हे सांगणं कठीण आहे... पण खूप कमी असते हे नक्की. थोडक्यात : प्रामाणिक नास्तिक लोक "अल्पसंख्य", "प्रामाणिक" आणि "अज्ञानी" असतात. आतापर्यंत आपण पाहिलेला वर्णपट आणि त्याची दोन टोके खालच्या आकृतीत दाखवली आहेत...

 आस्तिक-नास्तिक वर्णपट : ०१

एकंदरीत वरची दोन्ही टोके एकूण समाजाचा फार फार लहान भाग असतात. तर मग "ह्या वर्णपटात बसणारे इतर लोकगट कोणते?" असा प्रश्न मनात येणे साहजिक आहे. चला तर एक एक करत सगळा वर्णपट उलगडून पाहूया...

धूर्त आस्तिक

या लोकांचे वर्णपटातले स्थान आस्तिक लोकांच्या टोकाजवळ असते. त्यांचे मूळ गुणधर्म असे: १. देव या संकल्पनेबद्दल आपण अज्ञानी आहोत हे या लोकांना पक्के ठाऊक असते. २. परंतू देव या संकल्पनेचा पाठपुरावा करण्याशी या लोकांचे महत्त्वाचे हितसंबद्ध जोडलेले असतात. तसे करण्यामुळे त्यांना होणारा फायदा खालील एक किंवा अनेक प्रकारचा असू शकतो: (अ) चरितार्थ चालणे (आ) आर्थिक फायदा (इ) सामाजिक फायदा (ई) राजकीय फायदा, इ. आणि हे हितसंबद्ध त्यांच्यासाठी सर्वोच्च असतात, देवाची भलावण हे केवळ एक साधन असते. ३. या लोकांमध्ये, देव ही संकल्पना (अगदी देवा-धर्माशी संबंध नसलेलाही) स्वार्थ साधण्याचे फार प्रभावी साधन म्हणून वापरण्याची विलक्षण हातोटी असते. मग तसे करताना 'देव', 'धर्म' आणि 'त्या देवा-धर्माची तत्त्वे' यांना चलाखीने हरताळ फासणे आणि वर त्या कृतीचे चलाखीने समर्थन करणे या गोष्टी हे लोक मोठ्या चलाखिने करतात... शिवाय तसे करताना भल्याबुर्‍या मार्गांचा अवलंब करून लोकमताचा पाठिंबा मिळविण्याचे कसब या लोकांत असते. ४. धर्मा-धर्मातल्या फरकांचाच नव्हे तर एकाच धर्मातल्या विविधतेचा फायदा हे लोक मोठ्या चलाखीने घेताना दिसतात... उदा. हल्लीच्या काळात शिवमंदिर बांधण्या ऐवजी साईबाबा मंदिर अथवा बालाजी मंदिर बांधणे हा जास्त फायदेशीर व्यवहार आहे हे त्यांना बरोबर कळते. ५. त्यांच्या वर नमूद केलेल्या गुणधर्मांमुळे, अर्थातच, हे लोक आर्थिक सुस्थितीत आणि सामाजिक व राजकीय सत्ताकेंद्रात अथवा सत्ताकेंद्राजवळ असल्यास आश्चर्य नाही. ६. यांची लोकसंख्या प्रामाणिक आस्तिकांपेक्षा जास्त असली तरी ती तितकीशी मोठीही असू शकत नाही... कारण त्यांचे इतके सगळे गुणधर्म एका व्यक्तित असणे तितकेसे सामान्य नसते ! थोडक्यात : धूर्त आस्तिक लोक "अल्पसंख्य नसलेले पण बहुसंख्यही नसलेले", "धूर्त " आणि "अज्ञानी" असतात. आपण अज्ञानी असल्याचे ते जाणतात.

धूर्त नास्तिक

या लोकांचे वर्णपटातले स्थान नास्तिक लोकांच्या टोकाजवळ असते. त्यांचे मूळ गुणधर्म असे: १. देव या संकल्पनेबद्दल आपण अज्ञानी आहोत हे या लोकांना पक्के ठाऊक असते. २. परंतू देव या संकल्पनेचा विरोध करण्याशी या लोकांचे महत्त्वाचे हितसंबद्ध जोडलेले असतात. तसे करण्यामुळे त्यांना होणारा फायदा खालील एक किंवा अनेक प्रकारचा असू शकतो: (अ) चरितार्थ चालणे (आ) आर्थिक फायदा (इ) सामाजिक फायदा (ई) राजकीय फायदा, (उ) देव-धर्माचा बदला घेतल्याचे वैयक्तिक समाधान इ. आणि हे हितसंबद्ध त्यांच्यासाठी सर्वोच्च असतात, देवाचा विरोध हे केवळ एक साधन असते. यातल्या शेवटच्या प्रकारात; देवाची खूप विनवणी करूनही झालेल्या प्रेमभंगामुळे आलेला देवाचा तिटकारा, प्रेम असलेल्या व्यक्तीबरोबर लग्न न होऊ शकल्याने आलेला त्या व्यक्तीच्या देवा-धर्माचा तिटकारा, इ अनेक उपप्रकार असू शकतात... यातल्या काही केसेस तात्कालीक असतात व बसलेल्या धक्क्यातून सावरल्यावर काही कालाने सुधारतात तर इतर काही कायम स्वरूपी असू शकतात. ३. या लोकांमध्ये, देव या संकल्पनेला विरोध करणे हे (अगदी देवा-धर्माशी संबंध नसलेलाही) स्वार्थ साधण्याचे फार प्रभावी साधन म्हणून वापरण्याची विलक्षण हातोटी असते. मग तसे करताना असंबद्ध / अतार्किक / उपहासपूर्ण वाद घालणे यात यांचा हातखंडा असतो. मुद्दा उलटवल्यावर तो भरकटवून भलतीकडे नेण्यात यांचा हात धरणे कठीण असते. कारण आपला मुद्दा जिंकणे हाच त्यांच्या लेखी मुख्य मुद्दा असतो... सत्य, सारासारविवेक वगैरे इतर सर्व गोष्टी त्यापुढे दुय्यम असतात. ४. धर्मा-धर्मातल्या फरकांचाच नव्हे तर हिंदू धर्मासारख्या एकाच धर्मातल्या विविधतेचा फायदा हे लोक मोठ्या चलाखीने घेताना दिसतात... एखाद्या धर्मातील उणीव (सर्व धर्मात असे काही ना काही असतेच) हेरून त्याचा फायदा घेण्यात हे लोक पटाईत असतात. मात्र असे करताना सोईस्कर नसणार्‍या वस्तुस्थितीकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करण्यात यांचा हातखंडा असतो. ५. अर्थातच, हे लोक सामाजिक आणि राजकीय सत्ताकेंद्रात अथवा सत्ताकेंद्राजवळ असल्यास आश्चर्य नाही... किंबहुना आर्थिक फायदा, पदभार, मानसन्मान यांची खैरात करत अश्या प्रकारच्या तथाकथित विचारवंतांची फौज पदरी बाळगणे ही सत्ताकेंद्रांची एक महत्त्वपूर्ण गरज असते. ६. यांची लोकसंख्या प्रामाणिक नास्तिकांपेक्षा जास्त असली तरी ती तितकीशी मोठीही असू शकत नाही... कारण त्यांचे इतके सगळे गुणधर्म एका व्यक्तित असणे तितकेसे सामान्य नसते ! थोडक्यात : धूर्त नास्तिक लोक "अल्पसंख्य नसलेले पण बहुसंख्यही नसलेले", "धूर्त " आणि "अज्ञानी" असतात. आपण अज्ञानी असल्याचे ते जाणतात. आतापर्यंत आपण पाहिलेले गट सामील करून तयार झालेला वर्णपट खालच्या आकृतीत दाखवला आहे...

 आस्तिक-नास्तिक वर्णपट : ०२

आतापर्यंत आपण पाहिलेले सर्व लोकगट अल्पसंख्य आहेत. मग उरलेल्या मोठ्या समूहाचे काय?

धोका प्रबंधक

उरलेल्या बहुसंख्य लोकसमूहातील बहुतेक लोक "धोका प्रबंधक" या वर्गवारीत मोडतात. हे का ? याचे उत्तर त्यांच्या खालील गुणधर्मात सापडेल. १. देव या संकल्पनेबद्दल आपण अज्ञानी आहोत हे या लोकांना ठाऊक असते किंवा कमीत कमी देव या संकल्पनेबद्दल त्यांच्या मनात खात्री नसते. २. परंतू त्याचबरोबर हे सत्य उघडपणे मानणे सामाजिक अथवा राजकीय दृष्टीने फायद्याचे / सोयीचे नाही हे त्यांना पुरेपूर ठाऊक असते. त्याशिवाय आपले मत उघडपणे व्यक्त करण्यामुळे होणारे दुष्परिणाम भोगण्याची त्यांची तयारी नसते. ३. वरच्या १ व २ मधील वस्तुस्थितीमुळे हे लोक "त्यांच्या आजूबाजूच्या सर्वसाधारण सामाजिक-राजकीय प्रवाहाबरोबर वाहणे" हा कमीत कमी धोकादायक पर्याय स्वीकारतात. असे लोक कडक कम्युनिस्ट राजवटीत निधर्मी असल्यासारखे तर कडक धार्मिक राजवटीत कर्मठ धार्मिक असल्यासारखे "वागतात". ४. अर्थातच हे लोक सत्ताकेंद्रातले नसून त्यांच्या धार्मिक-सामाजिक-राजकीय सत्ताकेंद्राने ठरवलेल्या नियमांचे पालन करणारी आणि आपले नेहमीचे जीवन शक्य तेवढे निर्धोक ठेवण्याच्या प्रयत्नात असलेली सामान्य जनता असते. ५. जर देव खरोखरच असला तर आपलाही दंडवत त्याच्या नावे असावा, झाला तर फायदाच होईल असाही एक व्यावहारीक धार्मिक विचार यांच्या मनात असतो... हे सुद्धा त्यांचे एक प्रकारचे धोका प्रबंधनच असते ! ६. वरच्या सर्व वस्तुस्थितीमुळे आपले मत अथवा चेहरा नसलेल्या या बहुसंख्य अगतिक गटाला "धोका प्रबंधक" हेच नाव योग्य आहे. थोडक्यात : धोका प्रबंधक लोक "बहुसंख्य", "परिस्थितीशी जुळवून घेण्यात चलाख" आणि "अज्ञानी" असतात. आपण अज्ञानी असल्याचे ते जाणतात. आतापर्यंत आपला वर्णपट खालच्या आकृतीत दाखवला आहे तसा झाला आहे...

 आस्तिक-नास्तिक वर्णपट : ३

पण आतापर्यंत पाहिलेल्या सर्व गटांनी जरी बहुतेक सर्व लोकसंख्येचे वर्गीकरण झाले असले तरी एक छोटा पण फार महत्त्वाचा गट शिल्लक आहे.

अज्ञेयवादी

आपल्या या वर्णपटात बरोबर मध्यभागी बसणार्‍या या गटाचे गुणधर्म खालीलप्रमाणे असतात: १. देव या संकल्पनेबद्दल आपण अज्ञानी आहोत हे या लोकांना पक्के ठाऊक असते. २. आपले हे अज्ञान उघडपणे व्यक्त करायला या लोकांना भिती अथवा लाज वाटत नाही आणि त्यामुळे होऊ शकणार्‍या धोक्याला सामोरे जाण्याची त्यांची तयारी असते. ३. "देव आहे" आणि "देव नाही" या दोन्ही दाव्यांबद्दलचे आपले अज्ञान उघडपणे मान्य करण्याबरोबरच आस्तिक आणि नास्तिक या दोन्हीं गटांचे दावे शास्त्रिय कसोटीवर जोखून त्यातले योग्य ते सत्य / अर्धसत्य "आहे तसे" स्वीकारण्याची त्यांची तयारी असते. त्याचबरोबर भविष्यात मिळणारे नवीन सबळ पुरावे स्वीकारून आपले मत त्याप्रमाणे बदलत राहणे त्यांना गैरसोयीचे अथवा मानहानीचे वाटत नाही. ४. सत्य आणि शास्त्र यांच्यावर श्रद्धा असणारे हे लोक शात्रज्ञ म्हणून यशस्वी होत असले तरी त्याच कारणामुळे राजकारणाशी त्यांचे जमणे कठीण असते. त्यामुळे कर्मठ नास्तिक (उदा. कम्युनिस्ट), धूर्त आस्तिक, धूर्त नास्तिक, मिथ्या-धर्मनिरपेक्ष किंवा कर्मठ धार्मिक प्रकारच्या राजसत्तांशी त्यांचा संघर्ष होऊ शकतो. ५. "देव या संकल्पनेबद्दल मला सत्य माहीत नाही... मी अज्ञानी आहे" हे सत्य उघडपणे मानत असल्याने यांना अज्ञेयवादी (agnostic) म्हटले जाते. ६. अर्थातच अश्या गुणधर्मांचे लोक समाजात फारच थोड्या संख्येने असणे आश्चर्यकारक नाही. थोडक्यात : अज्ञेयवादी लोक "अल्पसंख्य", "आपल्या मतांसाठी परिस्थितीशी टक्कर देण्यासाठी तयार असणारे", "प्रामाणिक" आणि "अज्ञानी" असतात. आपण अज्ञानी असल्याचे ते जाणतात आणि तसे उघडपणे कबूल करतात. या गटाबरोबरच आपला वर्णपट पुरा होतो. पूर्ण वर्णपट खालच्या आकृतीत दाखवल्याप्रमाणे दिसतो:

 आस्तिक-नास्तिक वर्णपट : ०४

सारांश

हे वरचे विश्लेषण खालील तक्त्यात सारांशाने दाखवले आहे.

 आस्तिक-नास्तिक वर्णपट : गुणधर्म सारांश

तुम्ही कोण म्हणून काय पुसता ?... आता, तुम्हीच ठरवा तुम्ही कोण ते !
  • Log in or register to post comments
  • 67668 views

प्रतिक्रिया

Submitted by यशोधरा on Wed, 07/30/2014 - 15:54

In reply to ढापा :) by धन्या

Permalink

फुकटात हवेय! :D

फुकटात हवेय! :D
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on Wed, 07/30/2014 - 14:27

In reply to तु प्रामाणिक आस्तिक काय रे? by मृत्युन्जय

Permalink

मुळात आधी त्यांना स्वतालाच

मुळात आधी त्यांना स्वतालाच कसलाच अनुभव नाही उगाच शे दीडशे पुस्तकेत्यांनी वाचून काढली आहे आणि ह्याची जळली , त्याची जळली असे प्रतिसाद देत सुटतात अशा लोकांना कितपत गांभीर्याने घ्यायचे हे ज्याचे त्याने ठरवावे असो
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Wed, 07/30/2014 - 14:33

In reply to मुळात आधी त्यांना स्वतालाच by स्पा

Permalink

हेच का ते चडफडणे? =))

हेच का ते चडफडणे? =))
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on Wed, 07/30/2014 - 14:37

In reply to हेच का ते चडफडणे? =)) by प्रचेतस

Permalink

एक भोळा प्रश्न : स्पावड्या

एक भोळा प्रश्न : स्पावड्या नक्की कोणत्या गटातील आहे ? दांभिक , नवदांभिक , मॉडर्न दांभिक की मॉडर्नोत्तरनवदांभिक ?
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Wed, 07/30/2014 - 14:40

In reply to एक भोळा प्रश्न : स्पावड्या by प्रसाद गोडबोले

Permalink

ते वरच सांगितले ना. स्पा हे

ते वरच सांगितले ना. स्पा हे प्रामाणिक आस्तिक गटातले आहेत.
  • Log in or register to post comments
Profile picture for user धन्या

Submitted by धन्या on Wed, 07/30/2014 - 14:37

In reply to हेच का ते चडफडणे? =)) by प्रचेतस

Permalink

हो हो...

अगदी बरोबर ओळखळंत. आता ते त्यांच्या स्वभावानूसार ही बाब नाकारतील ती गोष्ट वेगळी.
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on Wed, 07/30/2014 - 14:39

In reply to हेच का ते चडफडणे? =)) by प्रचेतस

Permalink

होय, हेच ते चडफडणे

होय, हेच ते चडफडणे त्याला योग्य उत्तर दिलेले आहे फक्त :)
  • Log in or register to post comments

Submitted by मृत्युन्जय on Wed, 07/30/2014 - 14:43

In reply to होय, हेच ते चडफडणे by स्पा

Permalink

अरेरे यह कॉन्वर्सेशन तर

अरेरे यह कॉन्वर्सेशन तर सिरियस होउन राह्यलय. जौद्या गड्यांनो शेकहँड करा बरं (एकमेकांशी ;) नायतर काढाल वेगळाच अर्थ.
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on Wed, 07/30/2014 - 14:50

In reply to अरेरे यह कॉन्वर्सेशन तर by मृत्युन्जय

Permalink

नै शिरेस काही नाही ओ यात :)

नै शिरेस काही नाही ओ यात :)
  • Log in or register to post comments
Profile picture for user धन्या

Submitted by धन्या on Wed, 07/30/2014 - 14:44

In reply to होय, हेच ते चडफडणे by स्पा

Permalink

आणि ह्याची जळली , त्याची जळली

आणि ह्याची जळली , त्याची जळली असे प्रतिसाद देत सुटतात अशा लोकांना कितपत गांभीर्याने घ्यायचे हे ज्याचे त्याने ठरवावे असो
आम्हाला लो़कांनी गांभिर्याने किंवा अजून कसं घ्यावं किंवा न घ्यावं अशी आमची कुठलीच अपेक्षा नाही. :)
  • Log in or register to post comments

Submitted by हाडक्या on Wed, 07/30/2014 - 15:11

In reply to आणि ह्याची जळली , त्याची जळली by धन्या

Permalink

भलतेच 'पोचलेले' आहात हो धनाजी

भलतेच 'पोचलेले' आहात हो धनाजी महाराज..!! ;)
  • Log in or register to post comments
Profile picture for user धन्या

Submitted by धन्या on Wed, 07/30/2014 - 15:24

In reply to भलतेच 'पोचलेले' आहात हो धनाजी by हाडक्या

Permalink

तुमच्या मनात कोणती दिशा आहे

तुमच्या मनात कोणती दिशा आहे हे कळलं. :) माझ्या:
लोकांशी थोडीशी शाब्दिक लढाई झाली की चार गोष्टी नव्याने कळतात, लोकांबद्दल आणि स्वतःबद्दलही. :)
या म्हणण्याचं प्रत्यंतर मला याच धाग्यात आलं. मी इथे स्पांडूरंगशास्त्रींवर हल्ला केला आणि त्यांनी तितक्याच निकराने प्रतिहल्ला केला. इथे मला हे लक्षात आलं की वैयक्तिक हल्ले टाळायला हवेत. त्यामुळे विषयाचं गांभिर्य निघून जातं. :)
  • Log in or register to post comments

Submitted by हाडक्या on Wed, 07/30/2014 - 15:30

In reply to तुमच्या मनात कोणती दिशा आहे by धन्या

Permalink

आपल्या त्या प्रतिक्रियेशी

आपल्या त्या प्रतिक्रियेशी अंशतः सहमत पण आधीच कोणीतरी म्हटल्याप्रमाणे आता या गोष्टींची वर्तुळे झाल्यासारखे आहे, तिथे-तिथेच फिरणार चर्चा. असो.. अरेरे, स्माईली काढून टाकल्या की काय. ? (अत्रुप्त आत्म्याचे आता कैचे होणे ?)
  • Log in or register to post comments
Profile picture for user धन्या

Submitted by धन्या on Wed, 07/30/2014 - 15:38

In reply to आपल्या त्या प्रतिक्रियेशी by हाडक्या

Permalink

आता या गोष्टींची वर्तुळे

आता या गोष्टींची वर्तुळे झाल्यासारखे आहे, तिथे-तिथेच फिरणार चर्चा.
या म्हणण्याशी प्रचंड सहमत आहे. या विषयावर इथून पुढे अगदी मुळीच चर्चा नाही झाली तरी चालण्यासारखे आहे. पण होतं काय, एकदा हा विषय बोर्डावर आला की हात प्रतिसाद दयायला हात शिवशिवतात. मानवी स्वभाव. :)
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Wed, 07/30/2014 - 15:39

In reply to आता या गोष्टींची वर्तुळे by धन्या

Permalink

>>> मानवी स्वभाव.

>>> मानवी स्वभाव. ओ तुम्ही कुठले मानव? तुम्ही तर महामानव. ;) हलकं घ्या हो.
  • Log in or register to post comments
Profile picture for user धन्या

Submitted by धन्या on Wed, 07/30/2014 - 15:41

In reply to >>> मानवी स्वभाव. by प्यारे१

Permalink

तुमचे म्हणणे अंशतः बरोबर आहे.

तुमचे म्हणणे अंशतः बरोबर आहे. आमची महामानव होण्याच्या दिशेने वाटचाल चालू आहे. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Wed, 07/30/2014 - 15:45

In reply to आपल्या त्या प्रतिक्रियेशी by हाडक्या

Permalink

वर्तुळे तर होणारच. प्रिथ्वीच

वर्तुळे तर होणारच. प्रिथ्वीच गोल नाही का? मग प्रिथ्वीवरच्या गष्टीमंची वर्तुळे होतील ह्यात नवल ते काय बरे?
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Wed, 07/30/2014 - 15:45

In reply to वर्तुळे तर होणारच. प्रिथ्वीच by यशोधरा

Permalink

* गोष्टींची

* गोष्टींची
  • Log in or register to post comments

Submitted by हाडक्या on Wed, 07/30/2014 - 16:18

In reply to * गोष्टींची by यशोधरा

Permalink

ह्म्म.. मग आता

ह्म्म.. मग आता जन्मजन्मांतराच्या फेर्‍यांच्या मध्ये हे फेरे करीत बसायचे म्हणजे.. :)
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Wed, 07/30/2014 - 14:39

In reply to हेच का ते चडफडणे? =)) by प्रचेतस

Permalink

=))

=))
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Wed, 07/30/2014 - 14:40

In reply to =)) by बॅटमॅन

Permalink

मूळ कवी अर्थातच अआ.

मूळ कवी अर्थातच अआ.
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रगुप्त on Wed, 07/30/2014 - 09:05

Permalink

आणखी एक गट ?

देव या विषयाबद्दल ज्यांना काहीच घेणे-देणे नाही, याबद्दल कोणताच आग्रह वा मत नाही, आणि जाणून घेण्याची इच्छा/ गरजही वाटत नाही, असे लोक कोणत्या गटात येतील म्हणता? की त्यांचा आणखी एक गट मानायचा? मी स्वतः असा आहे. (माझे १८९६ मधे जन्मलेले वडीलही असेच होते).
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Wed, 07/30/2014 - 14:12

In reply to आणखी एक गट ? by चित्रगुप्त

Permalink

तुम्हाला देवाबद्दल उघड आकर्षण

तुम्हाला देवाबद्दल उघड आकर्षण नाही हे मान्य करूनही सर्वव्यापी देव या संकल्पनेबद्दल काहीच घेणे-देणे नाही असा माणूस नाही असे मला वाटते. म्हणजे असे बघा की जर उद्या देव आहे किंवा नाही असा काही सबळ शास्त्रिय पुरावा पुधे आला तर त्याबद्दल तुमच्या गटाला उत्सुकता नक्की वाटेल... कमीत कमी कुतुहलाने आणि / किंवा आता या बदललेल्या परिस्थितीचा आपल्यावर काय परिणाम होईल इतके जाणण्याइतपत तरी नक्की. म्हणून आपण तुमच्यासारख्या लोकांच्या समुहाला अज्ञेयवादी गटातील "सुप्त अज्ञेयवादी उपगट" असे म्हणू शकू !
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद१९७१ on Wed, 07/30/2014 - 17:07

In reply to आणखी एक गट ? by चित्रगुप्त

Permalink

माझे १८९६ मधे जन्मलेले वडीलही

माझे १८९६ मधे जन्मलेले वडीलही असेच होते
तुमचे आत्ता वय कीती हा प्रश्न मला पडला आहे?
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रगुप्त on गुरुवार, 07/31/2014 - 00:44

In reply to माझे १८९६ मधे जन्मलेले वडीलही by प्रसाद१९७१

Permalink

माझे वय

माझे वय आता बासष्ठ आहे. वडील ५६ वर्षांचे असताना मी जन्मलो. त्याकाळी हे कॉमन होते हो.
  • Log in or register to post comments

Submitted by तिमा on Wed, 07/30/2014 - 18:47

In reply to आणखी एक गट ? by चित्रगुप्त

Permalink

अज्ञानवादी

देव या विषयाबद्दल ज्यांना काहीच घेणे-देणे नाही, याबद्दल कोणताच आग्रह वा मत नाही, आणि जाणून घेण्याची इच्छा/ गरजही वाटत नाही, असे लोक कोणत्या गटात येतील म्हणता? अशा लोकांचा 'अज्ञानवादी' असा गट करावा.
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रगुप्त on गुरुवार, 07/31/2014 - 00:42

In reply to अज्ञानवादी by तिमा

Permalink

त्यातही 'वादी' कशाला?

अशा लोकांचा 'अज्ञानवादी' असा गट करावा.
ज्यांना काही घेणे-देणेच नाही, कसल्याही वादात पडायचेच नाही, त्यांनापण 'वादी' ही उपाधी कशाला?
  • Log in or register to post comments

Submitted by इरसाल on Wed, 07/30/2014 - 10:09

Permalink

हुम्म्म

या वरुन मला मक्या आणी सच्या चा एक सीन आठवला. कायद्याच बोला मधला. आस्तिक "देव आहे" म्हणतो आणी नास्तिक "देव नाही". पण दोघेही एकाच एंटीटी बद्द्ल बोलतात.
  • Log in or register to post comments

Submitted by कवितानागेश on Wed, 07/30/2014 - 10:22

Permalink

लेख वाचण्याआधी एक जोक सांगते;

लेख वाचण्याआधी एक जोक सांगते; रशियचे २ अंतराळवीर अंतरळात जाउन परत येतात. अख्ख्या जगात त्यांचे कौतुक होतं. सगळ्यांनाच त्यंना भेटण्याची आणि प्रश्न विचारण्याची उत्सुकता असते. पण सर्वात आधी रशियाचे अध्यक्ष त्यांना दोघांना खाजगीत बोलावून घेतात. आणि विचारतात, 'तुम्ही पृथ्वीच्या वर गेलात. वेगळ्याच जगात गेलात. तिथे बाहेर तुम्हाला कुणी पांढरा अंगरखा घातलेली, पांढरी दाढी असलेली, अशी कुणी व्यक्ती दिसली का?' दोघे एकदम बोलतात,'हो. आम्ही पाहिली अशी व्यक्ती.' अध्यक्ष गालातल्यागालात हसतो. म्हणतो, 'मला खात्रीच होती. असं कुणीतरी नक्की असणारेय! पण तुम्ही दोघे लक्षात ठेवा. कुणालाही हे सांगू नका. सांगितलत तर.....' पुढे दोघे अंतराळवीर जगप्रवासाला जातात. अनेक ठिकाणी त्यांचा सत्कार होतो. व्हॅटिकनल गेल्यावर पोप त्यांना दोघांना खाजगीत भेटायल बोलावतो. आणि विचारतो, 'तुम्ही पृथ्वीच्या वर गेलात. वेगळ्याच जगात गेलात. तिथे बाहेर तुम्हाला कुणी पांढरा अंगरखा घातलेली, पांढरी दाढी असलेली, अशी कुणी व्यक्ती दिसली का?' दोघे एकदम बोलतात, 'नाही. अजिबात नाही' पोप गालातल्यागालात हसतो. म्हणतो, 'मला खात्रीच होती. असं कुणीतरी नक्की नसणारेय! पण तुम्ही दोघे लक्षात ठेवा. कुणालाही हे सांगू नका!'
  • Log in or register to post comments

Submitted by विवेकपटाईत on Wed, 07/30/2014 - 10:26

Permalink

दिल्लीतल्या सरकारी

दिल्लीतल्या सरकारी कार्यालयांमध्ये पूर्वी एक चुटूकला फार प्रसिद्ध होता आठवत नाही तरीही एकदा ख्रुस्चेव भारतात आला होता. त्याने इथला भ्रष्टाचार आणि हलगर्जी प्रमाणे होणारे सरकारी कार्य पहिले. त्याचे मत परिवर्तन झाले, बाकी राजनेत्यानी आणि अधिकार्यांनी देश बुडवायला काही कमी केले नाही तरी ही देश पुढे जातो आहे या अर्थी निश्चित देवच या देशाला चालवितो आहे....
  • Log in or register to post comments

Submitted by बाळ सप्रे on Wed, 07/30/2014 - 11:16

Permalink

वर्गीकरण पटत नाही.

वर्गीकरण पटत नाही. उदा. धूर्त नास्तिक
परंतू देव या संकल्पनेचा विरोध करण्याशी या लोकांचे महत्त्वाचे हितसंबद्ध जोडलेले असतात.
देव संकल्पनेला विरोध करुन कोणाचा आर्थिक फायदा झालाय किंवा चरितार्थ चाललाय??
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Wed, 07/30/2014 - 14:20

In reply to वर्गीकरण पटत नाही. by बाळ सप्रे

Permalink

१. कम्युनिस्ट

१. कम्युनिस्ट २. देवा-धर्माचा विरोध करून सत्ता, संपत्ती आणि प्रसिद्धी मिळवता येते याची इतरहि अनेक उदाहरणे आहेत. जरा आजूबाजुला निरखून पहा !
  • Log in or register to post comments

Submitted by बाळ सप्रे on Wed, 07/30/2014 - 14:44

In reply to १. कम्युनिस्ट by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

कै च्या कै

कै च्या कै कम्युनिस्ट विचारसरणी देवाधर्माला अजिबात महत्व देणारी नसली तरी देवाधर्माच्या विरोधावर सत्ता संपत्ती मिळवली हा फारच ओढून ताणून आणलेला निष्कर्ष आहे.. हे म्हणजे बहुराष्ट्रीय कंपन्या देवाधर्माला जास्त महत्व देत नाहीत म्हणून बहुराष्ट्रीय कंपन्यांनी कमवलेला पैसा हा देवाधर्माच्या विरोधावर मिळवलेला आहे असे म्हणण्यासारखे आहे..
  • Log in or register to post comments

Submitted by आतिवास on Wed, 07/30/2014 - 11:31

Permalink

विश्लेषणाचा प्रयत्न चांगला

विश्लेषणाचा प्रयत्न चांगला आहे. आस्तिक असूनही शास्त्रीय पद्धतीने विचार करणारी, नास्तिक असूनही श्रद्धावान असणारी, अज्ञेयवादी असूनही गूढवादी असणारी.... अशा माणसांच्या कितीतरी छटा असतात. शिवाय माणसं एकाच विचाराने आयुष्यभर जगतात हे गृहितक थोडं न पटणारं आहे. एके काळी आस्तिक असणारे ठार नास्तिक होताना पाहिले आहेत अणि एके काळचे कट्टर नास्तिक देवपूजा करताना पाहिले आहेत... माझ्यासाठी 'देव' हा विषय जगात 'फक्त काळं-पांढरं नसतं' लक्षात आणून देणारा आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on Wed, 07/30/2014 - 11:54

In reply to विश्लेषणाचा प्रयत्न चांगला by आतिवास

Permalink

+MH-05-73

कडक प्रतिसाद अनुमोदन
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Wed, 07/30/2014 - 14:28

In reply to विश्लेषणाचा प्रयत्न चांगला by आतिवास

Permalink

म्हणुन तर हा वर्णपट आहे...

म्हणुन तर हा वर्णपट आहे... त्या वर्णपटात कोणीएक माणूस एकाच स्थानाला कायमचा चिकटून राहतो असे मी लेखात कोठेच म्हटलेले नाही. आस्तिक-अज्ञेयवाद-नास्तिकता ही मुख्यतः प्रत्येक माणसाची वैयक्तिक विचारशैली आहे... त्यामुळे काल-स्थल-अनुभव-विवेक यांचा परिणाम होऊन तिच्यात बदल झाला तर ते नैसर्गिकच आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रमोद देर्देकर on Wed, 07/30/2014 - 12:06

Permalink

झालं रतीब मिळाला आता या

झालं रतीब मिळाला आता या धाग्याचं येळ्ळुर होणार.

  • Log in or register to post comments

Submitted by मृत्युन्जय on Wed, 07/30/2014 - 12:06

Permalink

मी कदाचित प्रामाणिक आस्तिक

मी कदाचित प्रामाणिक आस्तिक आणि धोका प्रतिबंधक यामध्ये कुठेतरी येइन. देव आहे असे मला मनातुन वाटते. कोणी शास्त्रीय कसोट्यांवर सिद्ध करायला सांगितले तर ते सिद्ध करण्याइतके ज्ञान किंवा कुवत माझ्यात नाही. पण असे सिद्ध करु शकणारे लोक जगात असु शकतील यावर माझा विश्वास आहे. असे लोक कुठे सापडतील मला माहिती नाही. सगळ्याच कर्मकांडांवर माझा विश्वास नाही. पण सत्यनारायणाची पूजा घातली की प्रसन्न वाटते हा अनुभव आहे. अतिंद्रिय गोष्टी घडण्यामागचे शास्त्रीय कारण मला माहिती नाही. पणा अश्या गोष्टी घडतात हे प्रत्यक्ष अनुभवले आहे (अतिंद्रिय म्हणजे भूत पिशाच्च नाही तर जे सामान्य माणसांना पंचेद्रियांच्या सहाय्याने जमत नाही असे काहितरी). मंदिरात जायला मला आवडते. पण देवाचे दर्शन घेण्यासाठी २ तास रांगेत उभे रहायचे असेल तर मी बाहेरुन दंडवत घालुन परत फिरायला तयार असतो. देवाच्या नावावर कोणी मला कर्मकांडे करण्यास प्रवृत्त करत असेल तर कदाचित मी त्याला मधले बोट दाखवुन वाटेला लावेन. पण कधीतरी स्वतःच्याच इच्छेने एखादी पूजा घालणार नाही असेही नाही. मी रोजची पूजा करत नाही. कंटाळा येतो. पण रस्त्यात मंदिर असेल तर बाहेरुन जाताजाता नमस्कार करतो. थोडक्यात माझा देवावर विश्वास आहे. पण डोळे मिटुन कुठलेही कर्मकांड करेनच असे नाही. कोणी देवाचे अस्तित्व नाकारले तर तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे म्हणुन मी सोडुन देतो. पण त्यामुळे अश्या लोकांनी नास्तिकांची थट्टा केली तर मी वैतागतो. या आस्त्क नास्तिक चर्चेला अंत नसल्याने त्यावर फारसा वाद घालण्यात अर्थ नाही हे मला माहिती आहे (तरीही कधीकधी वाद घालतो). मी अज्ञेयवादी नक्की नाही कारण देव आहे यावर माझा विश्वास आहे. तर मग इस्पिक एक्का साहेब मला सांगा की मे कुठल्या क्याटेगरीत मोडतो. खुप वेळा एक कथा वाचली आहे " एका सुताराचा मुलगा त्याला विचारतो की देव आहे याला पुरावा काय? सुतार म्हणतो काहिच नाही. मुलगा म्हणतो तर मग माझे म्हणणे आहे की देवच नाही, सुतार काहिच प्रतिवाद करत नाही. त्या रात्री तो रात्रभर जागुन बैलगाडीसाठी अतिशय कुशलतेने एक अतिशय सुंदर चाक बनवतो. सकाळी मुलगा विचारतो की हे चाक कोणी बनवले. त्यावर सुतार म्हणतो की कोणीच नाही ते आपोआप बनले. मुलगा अविश्वासाने म्हणतो की असे होणे शक्य नाही. इतके सुंदर चाक कोणीतरी बनवलेच असणार. आपोआप तर नाही बनणार ते. सुतार म्हणतो अगदी तसेच इतकी सुंदर सृष्टी सुद्धा आपोआप तयार नाही झाली आणि ती आपोआप चालतही नाही. ती तयार करण्यामागे आणि चालवण्यामागे एक शक्ती नक्कीच आहे. कोण ते आपल्याला माहिती नाही, जसे हे चाक कोणी तयार केले याबद्दल तु अंदाज बांधु शकतोस पण नक्की कोणी तयार केले हे तुला माहिती नाही." ही नक्कीच एक खुप बाळबोध कथा आहे. पण या कथासारावर विचार करण्याजोगी नक्की आहे. माझा देवावरचा विश्वास हा अनेक गृहितकांपैकी अज्ञाताच्या अस्तित्वाबद्दल असणार्‍या विश्वासातुन देखील आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Wed, 07/30/2014 - 14:49

In reply to मी कदाचित प्रामाणिक आस्तिक by मृत्युन्जय

Permalink

वर्णपटातले प्रत्येकाचे स्थान

वर्णपटातले प्रत्येकाचे स्थान ज्याने त्याने स्वतः ठरवायचे आहे. कारण तुमच्या मनात काय आहे हे पूर्णपणे तुम्हीच जाणू शकता. तुम्हीच दिलेली खालील उदाहरणे याबाबतीत बोलकी आहेतः १. सत्यनारायणाची पूजा घातली की प्रसन्न वाटते हा अनुभव आहे. २. देवाच्या नावावर कोणी मला कर्मकांडे करण्यास प्रवृत्त करत असेल तर कदाचित मी त्याला मधले बोट दाखवुन वाटेला लावेन.
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Wed, 07/30/2014 - 15:47

In reply to मी कदाचित प्रामाणिक आस्तिक by मृत्युन्जय

Permalink

मस्त प्रतिसाद. आवडला :)

मस्त प्रतिसाद. आवडला :)
  • Log in or register to post comments
Profile picture for user धन्या

Submitted by धन्या on Wed, 07/30/2014 - 15:58

In reply to मी कदाचित प्रामाणिक आस्तिक by मृत्युन्जय

Permalink

एका सुताराचा मुलगा त्याला

एका सुताराचा मुलगा त्याला विचारतो की देव आहे याला पुरावा काय? सुतार म्हणतो काहिच नाही. मुलगा म्हणतो तर मग माझे म्हणणे आहे की देवच नाही, सुतार काहिच प्रतिवाद करत नाही. त्या रात्री तो रात्रभर जागुन बैलगाडीसाठी अतिशय कुशलतेने एक अतिशय सुंदर चाक बनवतो. सकाळी मुलगा विचारतो की हे चाक कोणी बनवले. त्यावर सुतार म्हणतो की कोणीच नाही ते आपोआप बनले. मुलगा अविश्वासाने म्हणतो की असे होणे शक्य नाही. इतके सुंदर चाक कोणीतरी बनवलेच असणार. आपोआप तर नाही बनणार ते. सुतार म्हणतो अगदी तसेच इतकी सुंदर सृष्टी सुद्धा आपोआप तयार नाही झाली आणि ती आपोआप चालतही नाही. ती तयार करण्यामागे आणि चालवण्यामागे एक शक्ती नक्कीच आहे. कोण ते आपल्याला माहिती नाही, जसे हे चाक कोणी तयार केले याबद्दल तु अंदाज बांधु शकतोस पण नक्की कोणी तयार केले हे तुला माहिती नाही.
जर सुंदर चाक आपोआप बनू शकत नाही, सुंदर सृष्टी आपोआप बनू शकत नाही तर मग हे सारं निर्माण करणारा देव तरी आपोआप कसा बनेल? त्यालाही कुणीतरी बनवले असेलच की? किंवा याच्या उलट तुम्ही जर म्हटलंत की देव स्वयंभू आहे तर मग ही सुंदर सृष्टीही स्वयंभू असू शकते. तिला तरी निर्माता कशाला हवा?
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on Wed, 07/30/2014 - 16:16

In reply to एका सुताराचा मुलगा त्याला by धन्या

Permalink

धन्या

Rx

http://en.wikipedia.org/wiki/Nasadiya_Sukta#Nasadiya_Sukta_with_English_translation :ड
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Wed, 07/30/2014 - 16:17

In reply to धन्या by प्रसाद गोडबोले

Permalink

जबर्‍या

कॊ ।आद्धा वॆद क‌।इह प्रवॊचत् कुत ।आअजाता कुत ।इयं विसृष्टि: । अर्वाग्दॆवा ।आस्य विसर्जनॆनाथाकॊ वॆद यत ।आबभूव ॥६॥ But, after all, who knows, and who can say Whence it all came, and how creation happened? the gods themselves are later than creation, so who knows truly whence it has arisen? इयं विसृष्टिर्यत ।आबभूव यदि वा दधॆ यदि वा न । यॊ ।आस्याध्यक्ष: परमॆ व्यॊमन्त्सॊ आंग वॆद यदि वा न वॆद ॥७॥ Whence all creation had its origin, he, whether he fashioned it or whether he did not, he, who surveys it all from highest heaven, he knows - or maybe even he does not know.[9] ठ्ठो!!!! या एका वाक्यामुळे नासदीय सूक्ताला जो आयाम आलाय त्याला तोड नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by सुधीर on गुरुवार, 07/31/2014 - 11:21

In reply to जबर्‍या by बॅटमॅन

Permalink

अवांतर

अलिकडेच भारत एक खोज ही मालिका पाहिली. या मालिकेची सुरुवात आणि शेवट नासदीय सूक्ताच्या श्लोकाने आणि पाठोपाठ हिंदी अनुवादाने होते. (START Track आणि END Track जालावर इथे सापडला) अनुवाद आणि गाणं खूप चांगलं वाटलं.
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Wed, 07/30/2014 - 17:44

In reply to धन्या by प्रसाद गोडबोले

Permalink

:)

:)
  • Log in or register to post comments

Submitted by मृत्युन्जय on Wed, 07/30/2014 - 16:24

In reply to एका सुताराचा मुलगा त्याला by धन्या

Permalink

यग्झॅक्टली. हा विरोधाभास आहे

यग्झॅक्टली. हा विरोधाभास आहे म्हणुन तर कथेला बाळबोध म्हटले होते. आता देव आणि सॄष्टी यापैकी नक्की काय स्वयंभू आहे ते मला माहिती नाही. उण्यापुर्‍या ६०-७० वर्षांच्या (त्यातली सध्या निम्म्याहुन कमी झालेली) आयुष्यात या गोष्टीची उकल मला होइल असे वाटतही नाही. त्यामुळेच मी देवावर विश्वास ठेवणे योग्य मानले. जर तो असला तर माझा विश्वास सार्थ होइल. नसलाच तर विश्वास ठेवल्याने वाईट काय घडणार आहे?
  • Log in or register to post comments
Profile picture for user धन्या

Submitted by धन्या on Wed, 07/30/2014 - 16:26

In reply to यग्झॅक्टली. हा विरोधाभास आहे by मृत्युन्जय

Permalink

आपल्या मताचा आदर आहे. :)

आपल्या मताचा आदर आहे. :)
  • Log in or register to post comments

Submitted by बाळ सप्रे on Wed, 07/30/2014 - 16:26

In reply to एका सुताराचा मुलगा त्याला by धन्या

Permalink

अगदी समजा ही सृष्टी देवाने

अगदी समजा ही सृष्टी देवाने निर्माण केली.. त्याच्या आधी काय होतं?? देवान कुठे बसुन (की उभ राहुन ) निर्माण केली ही सृष्टी?? एकदा अनादी अनंत याचा विचार करायला लागलं की देव, निर्माता हे प्रश्न फार किरकोळ आहेत. तेच space च्या संदर्भात.. सर्वात लहान काय ? अणू.. तो कशापासून बनलाय ?? सर्वात मोठं काय ?? आकाशगंगा?? त्याच्यापुढे काय??? या सगळ्याचा उलगडा होईल??
  • Log in or register to post comments

Submitted by मृत्युन्जय on Wed, 07/30/2014 - 16:45

In reply to अगदी समजा ही सृष्टी देवाने by बाळ सप्रे

Permalink

नुसतेच समजण्याने काहीच होणार

नुसतेच समजण्याने काहीच होणार नाही. समजुन उमजले तर त्यातुन काही निष्पत्ती होउ शकेल.
  • Log in or register to post comments

Submitted by हुप्प्या on Wed, 07/30/2014 - 23:25

In reply to एका सुताराचा मुलगा त्याला by धन्या

Permalink

भोळसटपणा

किती बरे सुंदर ही सृष्टी वगैरे भावनेला हात घालणारी भाषणे करुन टाळ्या खेचणे ठीक आहे. पण खरोखर तसे आहे का? ही सृष्टी कुणी बनवली ह्याचे उत्तर माहित नसल्यामुळे सोपे उत्तर देवाने बनवली असे आपण देतो. लाखो लोक, ज्यात निष्पाप अर्भके, प्राणी, वनस्पती नष्ट होतात ते भूकंप कोण बरे घडवून आणतो? सुनामी, पूर, चक्रवात, अवर्षण अशी महाभयंकर संकटे आणून अनेक निष्पाप लोकांना, प्राण्यांना, झाडांना कोण ठार मारतो? अब्जावधी रुपयांचे नुकसान कोण बरे करतो? शेकडो वर्षे अंधार पडेल असे भीषण, भयंकर विध्वंसक ज्वालामुखी कोण घडवून आणतो? डायनोसोरस सारखे निष्पाप जीव लाखांनी कोण नष्ट करतो? पोलियो, देवी, कॉलरा, मलेरिया, प्लेग ह्यासारखे जीवघेणे रोग कोण निर्माण करतो? अशा रोगांच्या साथीत मरणारे निष्पाप लोक ह्यांच्या प्राक्तनामागे कोण असतो?
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • पान 5
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com