✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

"किरण नगरकर....." ३५ वर्षात एकच मराठी पुस्तक... तरीही !

इ
इन्द्र्राज पवार यांनी
Sat, 05/08/2010 - 16:32  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
17268 वाचन

💬 प्रतिसाद (43)

प्रतिक्रिया

छान ओळख

डावखुरा
Sat, 05/08/2010 - 17:23 नवीन
छान ओळख करुन दिलीत.. धन्यवाद....... ---------------------------------------------------------------------- "निसर्ग संगती सदा घडो, मंजुळ पक्षीगान कानी पडो, कलंक प्रदुषणाचा घडो, वृक्षतोड सर्वथा नावडो...!" Image removed.
  • Log in or register to post comments

मी.पा.वरिल एक अत्यंत सुंदर

प्रमोद देर्देकर
गुरुवार, 07/24/2014 - 12:57 नवीन
मी.पा.वरिल एक अत्यंत सुंदर पुस्तक परिक्षणाचा लेख. मी मागे एकदा वाचला होता. पुस्तकाची ओळख तर झाली आहे. पण ते पुस्तक वर लेखात म्ह्टल्याप्रमाणे खरचं दुर्मिळ आहे. मी गेले २ महिने शोध घेत आहे, जर कुणाकडे हे पी.डी.एफ. मध्ये कुठे उपलब्द्ब असेल तर त्या साईटचा पत्ता द्यावा. तसेच शक्य असल्यास श्री. इंद्राज पवार यांचाही संपर्क पत्ता द्यावा. धन्स
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डावखुरा

प्रतिक्रिया

मुक्तसुनीत
Sat, 05/08/2010 - 18:05 नवीन
उत्तम लेख. सविस्तर प्रतिक्रियेसाठी जागा राखून ठेवतो :-)
  • Log in or register to post comments

पहिल्यांदाच नाव ऐकतोय.

प्रमोद देव
Sat, 05/08/2010 - 18:16 नवीन
तसं माझं वाचन फारसं नाही आणि त्यातून हे नाव आजवर कुठेच ऐकल्यासारखंही वाटत नाहीये... त्यामुळे त्यांचे काहीही वाचलेले नाहीये. इंद्रराज, आपण ह्या व्यक्तीची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. मी कादंबर्‍या वगैरेंसारखे भारंभार लेखन वाचायचं केव्हांच बद केलंय आणि आजवर इंग्लीशच्या वाटेलाही कधी गेलो नाही आणि भविष्यातही जाण्याची सुतराम शक्यता नाहीये...त्यामुळे हा लेखक आमच्यापासून दूरच राहणार हे नक्की....मात्र त्यांनी मराठीत लिहिलेले स्फुट,ललित इत्यादि लेखन कुठे वाचायला मिळणार असेल तर नक्कीच वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments

मला

रामदास
Sat, 05/08/2010 - 19:02 नवीन
वाटलं की कुशंकला लोकं विसरलेत.पण देवकाकांच्या प्रतिक्रियेवरून असं वाटतं की बर्‍याच जणांनी हे पुस्तक वाचले नसावे. या पुस्तकाचा परिचय करून दिल्याबद्दल लेखकाचे आभार.
  • Log in or register to post comments

परिचय

प्रदीप
Sat, 05/08/2010 - 19:33 नवीन
पुस्तक व लेखक परिचय, दोन्ही आवडले. 'सात सकं त्रेचाळिस' बद्दल बरेच ऐकून आहे. १९७४ साली ती प्रथम प्रसिद्ध झाली ही मलातरी नवीनच बातमी आहे. त्याच्याही बर्‍याच अगोदरपासून मी मराठी साहित्य वाचतोय (जी. ए. नावाचे भूत १९६५ साली मानगूटीवर बसले ते आजतागायत मी आनंदाने पेललेय--), ललित आमच्या घरी सुमारे ६७- ६८ सालापासून येत असे; मराठी साहित्यात रमणारी मित्र मंडळी आजूबाजूस होती. तेव्हा दिपुचित्रे, अरूण कोलटकर, भाऊ पाध्ये, ढसाळ इत्यादींची नावे गाजत असत-- अर्थात दळवी, तेंडुलकर आणि जी. एंच्या व्यतिरीक्त-- तरीही नगरकरांचे नाव तेव्हा कुठल्याही संदर्भात वाचल्याचे आठवत नाही! ह्या कादंबरीविषयी खरे तर मी नव्वदीच्या सुमारास प्रथम वाचले, तेव्हा ही अलिकडची कांदबरी असावी असा माझा समज होता! आता 'ककोल्ड' घेऊन वाचली पाहिजे.
  • Log in or register to post comments

"ककल्ड" ची घाई करू नका.....

इन्द्र्राज पवार
Sat, 05/08/2010 - 20:53 नवीन
".....आता 'ककोल्ड' घेऊन वाचली पाहिजे....." नको..... "ककल्ड" ची घाई करू नका. १९६५ ला "जी. ए." भुताने तुम्हाला झपाटले असल्याने कदाचित १९७२ ते १९७६ या काळात मराठी साहित्यात काय प्रयोग होत होते याची जाणिव झाली नसेल. म्हणून सर्वप्रथम "सात सक्कं त्रेचाळीस" खाऊन टाका...."किरण" झाड तुमच्या अंगणात त्यामुळे येईल, मगच "रावण अँड एडी"... "ककल्ड" आहेतच. तुम्ही कुठे राहता हे माहित नाही, पण आपल्या गावी "नगर वाचन मंदीर" असेल... किंवा एखादे जुने नामांकित कॉलेज असेल तरच "सात सक्क....." मिळण्याची शक्यता आहे. पुस्तक विक्रेत्यांकडे मिळण्याची अतिशय धूसर शक्यता आहे. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप

चांगला

श्रावण मोडक
Sat, 05/08/2010 - 20:30 नवीन
चांगला लेख. मला वाटतं "सात सक्कं त्रेचाळीस"ची दुसरी आवृत्ती अलीकडेच निघाली आहे. माझ्याकडे आहे. या कादंबरीच्या प्रवासाची कथा हीच मराठी प्रकाशन व्यवसायाची स्थिती कशी भिक्कार आहे हे सांगणारी कथा आहे.
  • Log in or register to post comments

दुसरी आवृत्ती.....

इन्द्र्राज पवार
Sun, 05/09/2010 - 00:42 नवीन
श्री. श्रावण >>> तीस पस्तीस वर्षानंतर इतक्या गाजलेल्या (खपाच्या दृष्टीने नव्हे तर चर्चेच्या....) कादंबरीची दुसरी आवृत्ती निघते याचा अर्थ प्रकाशकांना "किरण नगरकर" या लेखकाविषयी काही विशेष ममत्व वाटते म्हणून नव्हे तर "ककल्ड" ला इंग्रजी भाषेतील लिखाणाचा साहित्य अकादमीचा पुरस्कार लाभला लागोपाठ अनेक भाषात तिचे अनुवाद निघु लागले, आणि मराठी विश्वात "कोण हे नगरकर" अशी अपेक्षित चर्चा सुरु झाली, कारण नाव अस्सल महाराष्ट्रियन. त्या अगोदर मुंबईत "रावण अँड एडी" वर देखील मंथन सुरु होतेच. श्याम बेनेगल, निहलानी, आमीर खान आदी मंडळीसमवेत किरणचे फोटो सिने मॅगेझिनमधून झळकू लागल्यावर आपल्या महान प्रकाशकांना किरण नगरकर हे भलतेच "चलनी" नाणे असल्याचा साक्षात्कार झाला.... मग चला धुऊन घेऊ या वाहत्या गंगेत हात... म्हणून दुसरी आवृत्ती. बाकी काही नाही. फार घाणेरडे राजकारण आहे या प्रकाशकांच्या दुनियेत. (नेमाडे यांच्या "बिढार" मध्ये वाचले असेलच...आवाज करणार्‍या लेखकाला हे प्रकाशक कसे "झोपवतात" ते..) ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

सुंदर ओळख

चिरोटा
Sat, 05/08/2010 - 22:11 नवीन
७x6=43 वाचली पाहिजे.माझ्या माहितीप्रमाणे नगरकर 'द हिंदु'मध्येही बराच काळ कॉलम लिहायचे. भेंडी P = NP
  • Log in or register to post comments

कोसला आणि 'सात सक्कं...'

चिंतातुर जंतू
Sat, 05/08/2010 - 22:51 नवीन
ज्यांना कोसला आपल्या शालेय/महाविद्यालयीन काळात प्रचंड आवडलेली असते, अशांनी जर वाढत्या वयाबरोबर आपले वाचन अधिकाधिक प्रगल्भ करत नेले, तर कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर 'सात सक्कं त्रेचाळीस' त्यांना गाठतेच. याउलट ज्यांना कोसलामधल्या उदाहरणार्थ वगैरेंविषयी 'फुकट काहीतरी बोअर करायचं आणि त्याला प्रायोगिक प्रायोगिक म्हणत उगाच डोक्यावर घ्यायचं!' एवढेच वाटलेले असते, त्यांना 'सात सक्कं...' कधीच भेटत नाही, असा साधारणतः अनुभव आहे. कोसला अजिबातच आवडली नाही, पण 'सात सक्कं...' प्रचंड आवडली, असे येथे कुणी आहे काय, हे जाणून घ्यावयास आवडेल, कारण त्यामुळे वरील सर्वसाधारण अनुभवास छेद जाईल. - चिंतातुर जंतू :S "ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त | भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||
  • Log in or register to post comments

श्री. जंतु,

बिपिन कार्यकर्ते
Sat, 05/08/2010 - 23:36 नवीन
श्री. जंतु, भाष्य / निरीक्षण आवडले. कोसला आवडली असल्याने आता नगरकर वाचावेच बहुतेक... बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतातुर जंतू

दोनच ऑप्शन्स...!!

इन्द्र्राज पवार
Sun, 05/09/2010 - 00:55 नवीन
"...कोसला अजिबातच आवडली नाही, पण 'सात सक्कं...' प्रचंड आवडली, असे येथे कुणी आहे काय,...." नाही, असे होणार नाही असा माझा तरी विश्वास आहे..... दोनच शक्यता >>> "कोसला आणि सात सक्कं त्रेचाळीस दोन्हे ग्रेट आहेत" वा "कोसला आणि सात सक्कं त्रेचाळीस दोन्ही टाकाऊ आहेत". "पहिली आवडली मात्र दुसरी नाही.... किंवा व्हाईस व्हर्सा..." असे होणार नाही. (निदान मी तरी या मताशी ठाम आहे.) ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतातुर जंतू

ज्यांना

भडकमकर मास्तर
Sun, 05/09/2010 - 03:56 नवीन
ज्यांना कोसला आपल्या शालेय/महाविद्यालयीन काळात प्रचंड आवडलेली असते, अशांनी जर वाढत्या वयाबरोबर आपले वाचन अधिकाधिक प्रगल्भ करत नेले, तर कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर 'सात सक्कं त्रेचाळीस' त्यांना गाठतेच. याउलट ज्यांना कोसलामधल्या उदाहरणार्थ वगैरेंविषयी 'फुकट काहीतरी बोअर करायचं आणि त्याला प्रायोगिक प्रायोगिक म्हणत उगाच डोक्यावर घ्यायचं!' एवढेच वाटलेले असते, त्यांना 'सात सक्कं...' कधीच भेटत नाही, असा साधारणतः अनुभव आहे. हे निरीक्षण प्रचंड आवडले... आणि तुमच्यासारखीच दोहोंपैकी एकच कादंबरी आवडलेला कोणी आहे का ते पहायची उत्सुकता आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतातुर जंतू

निरीक्षण

प्रदीप
Sun, 05/09/2010 - 10:17 नवीन
....अशांनी जर वाढत्या वयाबरोबर आपले वाचन अधिकाधिक प्रगल्भ करत नेले, तर कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर 'सात सक्कं त्रेचाळीस' त्यांना गाठतेच.
चांगले आहे, आवडले. माझ्यापुरते सांगायचे तर 'कोसला' मला प्रचंड आवडली होती. पण माझे वाचन अलिकडच्या एक-दोन दशकांमधे फिक्शनकडून अन्यत्र सरकले आहे. अवचट (सर्वच), रेणू गावस्कर तसेच चरित्मक लेखने/ललित निबंधः उदा.'भगिरथाचे वारस', मेमॉयर्स (डॉ. सुनिलकुमार लवटे ह्यांचे 'खाली जमिन, वर आकाश', डॉ. हिम्मतराव बावस्करांचे 'बॅरिस्टरचे कार्टे', विठठल कामतांचे 'ऑर्किड्स आणि इडली आणि मी', प्रकाश आमट्यांचे 'प्रकाशवाटा', किशोर आरसांचे 'आठवणींच्या आठवणी, रामदास भटकळांचे 'जिगसॉ', मंगला आठलेकरांचे 'जयवंत दळवींविषयी' इ.) आता हे असले वाचन बहुधा (किंवा नक्कीच) 'प्रगल्भ' ह्या सदरात मोडत नसावे, तेव्हा 'सात सक्कं...', मेघना पेठे, कविता नरवणे, अनंत सामंत इत्यादि लेखकांचे काहीही माझ्या वाचनात नाही. जाता जाता, सत्तरीच्या दशकातील गाजलेल्या आणि मलाही अत्यंत आवडलेल्यांपैकी अजून एक चांगले पुस्तक म्हणजे हमोंचे 'निष्पर्ण वृक्षावर, भर दुपारी...' तसे हमो नंतर कुठे भेटले नाहीत. त्यांचे प्रदीर्घ आत्मचरित्मक 'बालकांड' ही फारसे मनास भिडू शकले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतातुर जंतू

प्रगल्भता ....

इन्द्र्राज पवार
Sun, 05/09/2010 - 11:57 नवीन
"....पण माझे वाचन अलिकडच्या एक-दोन दशकांमधे फिक्शनकडून अन्यत्र सरकले आहे....." असे हे प्रकटन म्हणजे वाचनात प्रगल्भता आली याचेच उदाहरण आहे, आणि त्यात वावगे तरी काय आहे ? मला स्वतःला "अरेबीयन नाईट्स" वाचायला खूप आवडतात, तसेच मन कधीतरी कोणत्यातरी कारणास्तव खिन्न असते त्यावेळी तर मी चक्क "इसापनिती" वाचनाची मजा घेत असतो.... पण ही स्थिती सदासर्वकाळ चालू ठेवता येत नाही...शैक्षणिक वाट्चालीत पदवी, पदव्युत्तरसाठी शेक्सपीअर वाचणे, अभ्यासने केवळ अपरिहार्य असते, मात्र आता मला त्याच्या नावाच्या कोणत्याही पुस्तकाकडे बघवत नाही व वाचवतही नाही. आपल्याकडेही खांडेकर-फडके-नाथ माधव-आपटे-पेंडसे आदीनी राज्य केले होतेच की... पण या क्षणी आपल्यातीलच असे कितीजण असतील की जे यांची पुस्तके दुकानातून आणून उत्सुकतेने वाचत बसतील? टीप ~~ ह. मो. नी "निष्पर्ण...." नंतर किती लिहीले यापेक्षा पुण्यामुंबईच्या प्रकाशकांनी त्यांच्याकडून किती लिहवून घेतले याची "सुरस आणि चमत्कारिक" कथा खुद्द ह. मो.च पुढे कधीतरी एका "कांडात" सांगतीलच..! आणि ते सर्व एक प्रकाशकच प्रसिद्ध करेलदेखील... करेलच.... कारण? लेखक खपाऊ आहे. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप

कुतुहल

स्पंदना
Sat, 05/08/2010 - 23:02 नवीन
कुतुहल चाळवलत अगदी यशस्वी रित्या. आता शोधलीच पहिजेत ही पुस्तक!! आभार या ओळखी बद्दल. तसा माणुस दिसतोच कलन्दर!! फोटोत हो! शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.
  • Log in or register to post comments

कलन्दर!!....

इन्द्र्राज पवार
Sun, 05/09/2010 - 14:28 नवीन
"....आता शोधलीच पहिजेत ही पुस्तक!!.." नक्कीच तुम्हाला आवडेल त्यांचे साहित्य.... मात्र सुरुवात "सात सक्कं त्रेचाळीस" पासुनच करावी. गंगा आवडायची तर ती उगमापासूनच निरखावी. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

उत्तम

बिपिन कार्यकर्ते
Sat, 05/08/2010 - 23:34 नवीन
इंद्र, अतिशय उत्तम आणि महत्वाचा धागा टाकल्याबद्दल धन्यवाद. भारतिय साहित्यातील अतिशय उंचावरचे नाव अशी नगरकरांची ख्याति ऐकून आहेच. ती यानिमित्ताने अधोरेखित झाली. नगरकरांचे साहित्य वाचायचे आहेच. यानिमित्ताने अजून खूप काही वाचायचे आहे ही रूखरूख ताजी झाली. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

नगरकरांचे साहित्य ....

इन्द्र्राज पवार
Mon, 05/10/2010 - 10:01 नवीन
"सतत वाचनाची भूक.... " हे लक्षण उत्तम आरोग्याचे उदाहरण मानले जाते, आणिi "किरण" मुळे तुमची वाचन भूकेची रुखरुख ताजी झाली ही एक चांगलीच बाब आहे. जरूर वाचा.... पण प्रथम "सात....". ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

अप्रतिम

शुचि
Sun, 05/09/2010 - 01:21 नवीन
अप्रतिम लेख आहे हा. कुतूहल पूर्ण चाळवणारा. >>"त्या" दुर्दैवी "युवराज"च्या नजरेतून या प्रकरणाकडे पाहिले आहे. ..>>>> काय अफलातून "आउट ऑफ बॉक्स" विचार केला असेल नगरकरांनी : ) खरच! सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
  • Log in or register to post comments

आउट ऑफ बॉक्स" विचार

इन्द्र्राज पवार
Sun, 05/09/2010 - 09:28 नवीन
"...काय अफलातून "आउट ऑफ बॉक्स" विचार केला असेल नगरकरांनी : ) खरच!..." खुद्द खुशवंत सिंग यांनी याच मुद्द्यावर "हिंदुस्तान टाईम्स" मध्ये प्रभावी मत मांडले आहे. श्री कृष्णाला प्रियकर मान, आणि कुंवरर्जीला त्यागून एकतारा वाजवीत "मीरा कहे गिरीधर..." म्हणत म्हणत सो-कॉल्ड भाविकांच्या डोळ्यातून अश्रुच्या धारा काढणे हे तर मद्रास धर्तीचे हिंदी चित्रपट आख्यान झाले. इतके जर मीरा कृष्णाची इतकी दिवानी होतीच तर तितक्याच ठामपणे ती भोज बरोबरच्या लग्न प्रस्तावाला नकार देऊ शकली नसती का? सुप्रसिद्ध लेखिका श्रीमती कमल देसाई यांनी नेमका हाच बिंदू पकडून म्हटले आहे की, "कुंवरर्जी हा या कादंबरीचा नायक आहे. इतिहास त्याच्याबद्दल फार मूक आहे... त्याचे अस्तित्वच पुसून टाकले आहे काळाच्या पाटावरून. हीच फार मोठी शिक्षा आहे त्याला." ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

७ सक्कं ४३.

डॉ.श्रीराम दिवटे
Sun, 05/09/2010 - 08:22 नवीन
खरे तर ४२ असतात परंतु ते ४३ का? याची प्रचिती नगरकरांच्या कादंबरीतून मिळते.. असो प्रत्येकाने एकदा तरी वाचावीच!
  • Log in or register to post comments

प्रतिसाद

मुक्तसुनीत
Sun, 05/09/2010 - 08:41 नवीन
सर्वप्रथम इंद्रराज यांचे या लेखाबद्दल आभार. नगरकर यांच्याबद्दल लिहायला मी त्याना विनविले व त्यानी या गोष्टीला मान देऊन आवर्जून इतका मोठा लेख लिहिला. नगरकर यांच्या लेखनाच्या क्षेत्रातल्या महत्त्वाच्या घटनांकडे लेख प्रकाश टाकतो. मराठीपासून इंग्रजीकडे वळलेल्या मोहर्‍यामागची मीमांसा विशद करतो. हे सारे लेखकाने दिलेल्या त्या प्रदीर्घ मुलाखतीमधे आलेलेच आहे. नगरकर नावाचा कुणी लेखक मराठीमधे आहे, तो आवर्जून दखल घेण्यालायक आहे आणि मराठी पलिकडच्या जगात या नावाला निश्चित असे स्थान आहे या सर्व बाबी अगदी व्यवस्थित अधोरेखित झाल्यात. मात्र याहून अधिक या लेखात निश्चित हवे होते.. अजूनही लिहिता येईल. "सात सक्कम.." वाचून प्रस्तावलेखकाच्या मनावर एक खोल संस्कार उमटला आहे असे लेखात (थोड्या निराळ्या शब्दांत ) म्हण्टलेले आहे. मात्र , हा संस्कार नक्की का उमटलेला आहे ? ही कादंबरी अशी काय आहे की जिला काही सन्माननीय नावांनी "संप्रति कोण हा नवा पुरुषावतार ?" च्या जातीच्या प्रतिक्रिया द्याव्यात ? "ककल्ड" मधे असे काय आहे की जिला "आजवर वाचलेल्या इंग्रजी कादंबर्‍यांपेक्षा निराळ्या जातकुळीची" असे परांजप्याना वाटावे? थोडक्यात , हा लेख काहीसा "हाय ऑन र्‍हेटरिक, लो ऑन डेलिव्हरी" असा झाल्याचा प्रत्यय , विशेषतः किरणबद्दल अनभिज्ञ असणार्‍या (माझ्यासारख्या ) लोकांना येऊ शकतो. काही प्रतिक्रियांमधे "कोसला"चा उल्लेख आलेला आहे. "सात सक्कम" आणि "कोसला" यांच्यामधे "एक्स्क्लुझिव ऑर" असणे अशक्य आहे असे प्रतिपादन झालेले आहे आणि त्यावर इंद्रराज यांनी ठामपणे रुकार भरलेला आहे. या प्रतिपादनामागची/रुकारामागची भूमिका त्यांनी उपरोल्लेखित मूलभूत घटकांच्या विश्लेषणासोबत मांडावी असे सुचवितो.
  • Log in or register to post comments

"संप्रति कोण हा नवा पुरुषावतार ?"....

इन्द्र्राज पवार
Mon, 05/10/2010 - 18:30 नवीन
श्री. एमएस.... आपण दिलेल्या मनमोकळ्या प्रतिक्रियेबाबत आभार अन् जे मुद्दे अधोरेखीत केले आहेत त्यांना सविस्तर उत्तर दिले पाहिजेच, पण ते इथे न देता त्यांना स्वतंत्र धाग्याचे रूप देत आहे. ~~ गिव्ह मी सम टाईम...! ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

किरण

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 05/09/2010 - 15:44 नवीन
किरण नगरकरांच्या लेखनाबद्दल फारसे माहिती नाही. 'सात संक्कं...ही वाचलेले नाही. मात्र आपल्या लेखनामुळे पुस्तक वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे. विशेष करुन आपण ज्या 'ककल्ड' मधे 'कोसला' पाहात आहात तर त्यात काय असेल त्याचीही तितकीच उत्सूकता लागली आहे. किरण नगरकरांचा उत्तम परिचय करुन दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

उत्सूकता लागली आहे. ....!

इन्द्र्राज पवार
Sun, 05/09/2010 - 23:04 नवीन
धन्यवाद सर.... वास्तविक अशा चर्चांचा खर्‍या अर्थाने हाच उपयोग म्हटला पाहिजे की, अचानक असे काही समोर येते जिच्यामुळे आपणास निखळ आनंदच मिळतो. मात्र "ककल्ड" च्या अगोदर "सात..." वाचण्याचा आग्रह धरा. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेखक आणि पुस्तक ओळख . .उत्तम

दत्ता काळे
Sun, 05/09/2010 - 16:10 नवीन
लेखक आणि पुस्तक हे दोन्हीही मला माहीत नव्हते, पण दोन्हींचीही ओळख छान करून दिलीत. सात सकं त्रेचाळीस वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
  • Log in or register to post comments

उत्सुकता निर्माण....!!

इन्द्र्राज पवार
Mon, 05/10/2010 - 12:06 नवीन
"सात...." ची दुसरी आवृती "प्रतिमा प्रकाशन" ने काढली आहे अशी बातमी वर श्री. श्रावण मोडक यांनी दिली आहे.... आपल्या भागातील स्थानिक पुस्तक केंद्राकडून ती मागवून घ्यावी लागेल..... लेखक "खपाऊ" गटात नसला की, विक्रेतेदेखील अशा पुस्तकावर गुंतवणूक करीत नाहीत.... मात्र वैयक्तिकरित्या सांगीतल्यास मिळवून देतात, असा अनुभव मला आला आहे. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दत्ता काळे

चित्पावन

अविनाशकुलकर्णी
Sun, 05/09/2010 - 19:32 नवीन
चित्पावन ब्राह्मण कुटुंबीयांनी वाळीत टाकलेल्या नगरकर कुटुंबाला इकडून तिकडे तिकडून इकडे फिरावे????? वाळीत>? हे नविनच ऐकतो आहे
  • Log in or register to post comments

वाळीत>? हे नविनच ऐकतो आहे...

इन्द्र्राज पवार
Mon, 05/10/2010 - 00:10 नवीन
खालील वाक्य खुद्द श्री. किरण नगरकर यांचे आहे. मुलाखतीत ते म्हणतात : He (his grandfather) was ostracized because he broke away from the stranglehold of the Chitpavan brahmins. He died early and he left my father to look after the family. But despite the poverty, as is usually the case with middle-class Indians, education had a very high value. And then because moved around a lot there was a change in the medium of instruction. I moved to and stayed with English. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी

वाचले पाहिजे

विनायक पाचलग
Sun, 05/09/2010 - 19:39 नवीन
या माणसाबद्दल अगदी छोटे कुठेतरी वाचले होते हे खरे..... वाचले पाहिजे .. नक्की वाचीन
  • Log in or register to post comments

लेख आवडला

विष्णुसूत
Mon, 05/10/2010 - 04:02 नवीन
लेख आवडला.
  • Log in or register to post comments

महत्प्रयासाने हे पुस्तक

धन्या
गुरुवार, 07/24/2014 - 13:24 नवीन
महत्प्रयासाने हे पुस्तक मिळवून वाचले. आंतरजालावर कार्यरत असणार्‍या राज जैन या प्रकाशक अधिक पुस्तक विक्रेत्या दोस्ताने मिळवून दिले. पुस्तक जितका गाजावाजा झाला आहे तितके भावले नाही मनाला. अर्थात आवड ज्याची हा भाग आहेच. हीच गोष्ट कमलेश वालावलकर लिखित "बाकी शुन्य"ची. ती ही कादंबरी फारशी भावली नाही मनाला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या दोन्ही कादंबर्‍या दोन वर्षांपूर्वी आऊट ऑफ प्रिंट होत्या.
  • Log in or register to post comments

द एक्स्ट्राज हे रावण अँड

आदूबाळ
गुरुवार, 07/24/2014 - 13:43 नवीन
द एक्स्ट्राज हे रावण अँड एडीचे सीक्वलही आहे.
  • Log in or register to post comments

मीराबाई ही मेराथची राजकुमारी

आयुर्हित
गुरुवार, 07/24/2014 - 15:54 नवीन
मेराथ नव्हे ते मेड़ता आहे.(आजच्या घडीला त्याचे नाव "मेड़ता सिटी" असुन ते नागौर जिल्ह्यात आहे) बाकी चालू द्या!
  • Log in or register to post comments

"सात सक्कं त्रेचाळीस" अजिबात

श्रीगुरुजी
Fri, 07/25/2014 - 11:46 नवीन
"सात सक्कं त्रेचाळीस" अजिबात आवडले नव्हते. सुरवातीपासूनच लेखकाला नक्की काय म्हणायचे होते ते कळतच नव्हते. नेट लावून शेवटपर्यंत पुस्तक वाचले आणि संपल्यानंतर सुद्धा कणभरही पुस्तक समजले नाही ही जाणीव झाली. काही काळानंतर "ककल्ड" चा मराठी अनुवाद वाचायचा प्रयत्न केला. पुस्तक इतके कंटाळवाणे होते की ६०-७० पाने वाचल्यानंतर पुस्तक बाजूला ठेवले. असो.
  • Log in or register to post comments

"सात सक्कं त्रेचाळीस" अजिबात

धन्या
Fri, 07/25/2014 - 12:49 नवीन
"सात सक्कं त्रेचाळीस" अजिबात आवडले नव्हते. सुरवातीपासूनच लेखकाला नक्की काय म्हणायचे होते ते कळतच नव्हते. नेट लावून शेवटपर्यंत पुस्तक वाचले आणि संपल्यानंतर सुद्धा कणभरही पुस्तक समजले नाही ही जाणीव झाली.
अगदी अगदी. कशाचाच कशाला ताळमेळ लागत नाही. एखदया कथा नसलेल्या चित्रपटासारखी आहे ही कादंबरी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

मी अजून सात सक्कं त्रेचाळीस

संपत
Fri, 07/25/2014 - 12:25 नवीन
मी अजून सात सक्कं त्रेचाळीस वाचली नसली तरी रावण आणि एडी वाचली आहे जी खूप आवडली. कोसला मात्र पूर्ण कादंबरी म्हणून नावडती असली तरी काही भाग खूप जमून आले आहेत. प्रतिस्पर्धी लिस्ट वर आहे. बघू कधी योग येतोय.
  • Log in or register to post comments

ही कादंबरी निपोंची पण भयानक

पुस्तकमित्र
Mon, 07/28/2014 - 17:00 नवीन
ही कादंबरी निपोंची पण भयानक आवडती आहे. :)
  • Log in or register to post comments

+१

प्रचेतस
Mon, 07/28/2014 - 17:01 नवीन
निपो कुठे गेलेत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुस्तकमित्र

किरण नगरकरांवरील लेख आठवला

मारवा
Sun, 09/08/2019 - 11:02 नवीन
किरण नगरकर या असामान्य महान लेखकाला श्रद्धांजली !
  • Log in or register to post comments

कोसला आवडलेली असल्याने 'सात

मनो
Mon, 09/09/2019 - 05:38 नवीन
कोसला आवडलेली असल्याने 'सात सक्कं त्रेचाळीस' ची पहिली २० पाने वाचली, आणि नाही आवडली. Cuckold चा मराठी अनुवादाची काही पाने वाचली आणि ती मात्र आवडली, थोडी वि स खांडेकरांच्या ययाती सारखी आहे असं वाटलं. इथे दोन्ही पुस्तकांची सुरुवात मोफत वाचता येईल https://www.bookganga.com/Preview/BookPreview.aspx?BookId=5614275792721057100&PreviewType=books https://www.bookganga.com/Preview/BookPreview.aspx?BookId=4786108156490606668&PreviewType=books
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा