सगळ्याना ओपन चॅलेंज........र ला ट न जुळवता चारोळी

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जे न देखे रवी...
14 Mar 2008 - 12:15 pm

केशवसुमार तात्या, डांबिसकाका, धमु, सगळे डॉन ,सगळे अभिजीत ,सॄष्टीलावण्य मावशी..सगळ्याना ओपन चॅलेंज
र ला ट न जुळावता चारोळी लिहुन दाखवा?
हे समर्थानासुद्धा जमले नाही
उदा: मना सज्जना
भक्तिपंथेची जावे
तरी श्री हरी
पाविजे तो स्वभावे

मराठीत शिरिष पै यानी हा प्रकार जपानी मधुन आणला.याला हायकू म्हणतात ( कायकू विचारू नका)
मूळ जपानी हायकू मधे तीनच ओळी असतात....
उदा: पानावर फुलपाखरू
अलगद विसावले
स्वप्नांना भेटत.........
मराठीत हायकू चार ओळीत हे असे लिहिता येइल.
पावसाचा थेंब
तलावात पडला..........
पाण्यावरचा तरंग
वाढवत वाढवत.....

केशवसुमार तात्या, डांबिसकाका, धमु, सगळे डॉन,सगळे अभिजीत सॄष्टीलावण्य मावशी.सगळ्याना ओपन चॅलेंज
र ला ट न जुळावता चारोळी लिहुन दाखवा?
होउन जाउदे एकदा म्हणणारा
विजुभाऊ

प्रतिक्रिया

सागर's picture

14 Mar 2008 - 12:21 pm | सागर

विजुभाऊ ,

तुम्हाला यमक न जुळवता केलेली चारोळी म्हणायची आहे का?
तसे असेल तर माझा हा एक प्रयत्न,

काय हे आव्हान दिले कोणी
पेलायची ताकद मनगटात असते
वादळाशी ही झुंझ मी घेईन
पण वावटळीला ते का विचारु?

विजुभाऊ... जमले का हे?

(फाश्ट कवी) सागर

यन्ना _रास्कला's picture

14 Mar 2008 - 12:22 pm | यन्ना _रास्कला

घ्या माझी चारोळी. र ला ट च काय, कोणत्याच अक्षराला इतर कुठलेही अक्षर जोडलेले नाही.

............
..........
...............
..................

:)
:)

विजुभाऊ's picture

14 Mar 2008 - 12:27 pm | विजुभाऊ

सागर्...........झकास...अजून तात्या / डॉन्या विचार करत बसले आहेत

केशवसुमार's picture

14 Mar 2008 - 2:33 pm | केशवसुमार

१.ओ भाऊ, तुमच्या गमज्या चल्यात चालू द्या ...
२.ही समदी काठावर बस्लित गुमान..बसु द्या त्यांना..उगाच कशाला चिखलात दगड मारताय..
३.तात्या, डांबिसकाका, धमु, सगळे डॉन ,
४.घ्यारं त्या भाऊला राऊंडात
केशवसुमार ठोकरे

बघा लिव्हल्याकी नाही चार ओळी
आनि कुठ बी र ला ट नाय जोडला..
उगा आपल्याल चालेंज नाय द्ययाचा..
काय कलं की नायं

तदमाताय.. परत चार ओळि झाल्या..

इनोबा म्हणे's picture

14 Mar 2008 - 3:02 pm | इनोबा म्हणे

आयला डोक्याची मंडई
रोजचा नवा वाद
हा काही बोलला तर
तो वढतोय पाय

जमलं का हो? आयला जमलंच पायजे आपल्याला.

(पद्य क्रांतीकारक-इनोबा )
"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे

जुना अभिजित's picture

14 Mar 2008 - 3:09 pm | जुना अभिजित

पावसाच्या सरींनी
दरवळला मृद्-गंध
गुंजतो आहे नाद
अजून थेंबांचा

ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित

स्वयम्भू's picture

14 Mar 2008 - 3:43 pm | स्वयम्भू (not verified)

बसलो होतो काल,
मित्रन्च्या संगे,
सुर्य उगवला,
बाटली रिकामी.

आपला,

स्वयंभू

धमाल मुलगा's picture

14 Mar 2008 - 3:55 pm | धमाल मुलगा

स्वयम्भू राव,

लय भारी...सुर्य उगवला, बाटली रिकामी :-)))

कोणाला वाटत असेल कै च्या कै, तर असुदे, आपल्याला आवडली. एकदम वस्तुस्थितीचे यथार्थ वर्णन :-)

विजुभाऊ,
जरा दम धरा, मला जरा वेळच लागेल रि॑गणात यायला. पण सुटलो ना तर मला आवरण॑ उभ्या मिपाला अवघड होईल. तात्या डायरेक्ट मला तडीपार करतील :)

के.सु.शेठ,
आपण खुन्नस नाय धरायची. ऊठ-सुठ ह्याला ठोकरे त्याला ठोकरे नको बॉ. त्यापेक्षा जरा राजकारन खेळू. आपन म्हनजे आमी वो, ल्हितो चारोळ्या-बेदाने जमतील तशे. ईजुभाव आन बाकी सगळे आपसुक गप होत्याल 'हे असल॑ झे॑गाट कशापाई उरावर घेतल॑ म्हनून' :-)

अवा॑तर : शेठ तद् माताय लैच आवडलेल॑ दिसत॑य. कालधरन॑ चार-पाच ठिकानी पाह्यल॑ :-))

केशवसुमार's picture

14 Mar 2008 - 4:43 pm | केशवसुमार

१.'तिच्यामायला' म्हणल की लोक उगाच तोंड हाय की गटार हाय म्हणत्याती..
२.तद माताय म्हणल म्हण्जे कस (कुनालच कलत नाय)...संस्कृतमधे बोलतुया .. साना मानुस दिसतुया .. किती गार वाटतया....अजून येऊदे, आम्ही वाचतोय ..अस म्हणत्यात
३.बाकी तदमाताय.. हे ज ह ब ह रा..
४.र्‍हाता राहिल त्या विजुभाऊच..आर.. ठोकून काढायच म्हण्जे.. तू म्हणतोस तसच ईजुभाव आन बाकी सगळे आपसुक गप गार होईस्तोवर चरोळ्या पाडायच्या..

अर् !!तद् मातय!! झाल्या का पुन्हा चार-ओळी
(चारोळा)केशवसुमार

मनस्वी's picture

14 Mar 2008 - 6:22 pm | मनस्वी

आवडलं.

मनस्वी

संदीप चित्रे's picture

17 Oct 2008 - 7:37 pm | संदीप चित्रे

तुझी चारोळी आवडलीच एकदम :)

चन्द्रशेखर गोखले's picture

18 Oct 2008 - 7:22 am | चन्द्रशेखर गोखले

मी पण बसलो होतो
मित्रांसंगे रात्रभर
सूर्य उगवला सकाळी
झिंगत.. झिंगत..!

ब्रिटिश टिंग्या's picture

14 Mar 2008 - 4:11 pm | ब्रिटिश टिंग्या

शांती पडली
सांवरियाच्या प्रेमात
धोनी युवराजनंतर
पुढचा जोकर रणबीरचा

-छोटी टिंगी ;)

प्रमोद देव's picture

14 Mar 2008 - 4:32 pm | प्रमोद देव

माझा होशील का(गडी)
कशाला?
आज मोलकरीण नाही आली
जरा भांडी घास ना!

स्वयम्भू's picture

14 Mar 2008 - 4:42 pm | स्वयम्भू (not verified)

ये ना गड्या घरी,
असे ती म्हणाली,
जेंव्हा तो घरी गेला,
तिने त्याचा खरंच गडी केला.

आपला,

स्वयंभू

छोटा डॉन's picture

14 Mar 2008 - 4:33 pm | छोटा डॉन

हे घ्या ... हिंदीतून आहे ....
"चांद गया भजिया तलने,
सितारे तोडकर लाऊंगा,
विजूभाऊ तू 'चारोळी' की बात करता है,
तेरेलिये तो "शाकुंतल" लिख डालुंगा ...."

अवांतर : जे लिहलय ते ग्वाड मानून घ्या कारण आ.का. व. चा. घं. क. ना. हे. ज.जा. आ.
[ म्हणजे आम्हाला काव्य व चारोळीतलं घंटा कळत नाही हे जग जाहीर आहे .....]

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

धमाल मुलगा's picture

14 Mar 2008 - 4:46 pm | धमाल मुलगा

कोण म्हणतो मी एकटा आहे,
एका॑तही जसा मित्र माझा
क॑टाळतो मी गर्दीला,
गर्दीतही मी एकटाच आहे!

हा हा हा..घ्या तद् माताय!
मीटर, मात्रा, यम,नियम सगळ॑ तिच्याआयला नेऊन घातल॑ तिकडे....सात गडगड्याच्या विहीरीत.

आपला
-ध मा ल रावसाहेब.

धमाल मुलगा's picture

14 Mar 2008 - 4:57 pm | धमाल मुलगा

कुणाच्या खा॑द्यावर कुणाचे ओझे,
कोणि झोकलेली
अन् भोग कोणाच्या नशिबी !

आयला, चारोळी बेदाणे म्हणता म्हणता हे काय? जर्दाळूच झाला :-)

ना चार ओळी
ना दोन ओळी
काय म्हणावे ह्याला
प्रश्न माझ्या अ॑तरी

घ्या च्यामारी, अजुन एक.

- ध मा ल.
(मॅनेजि॑ग डायरेक्टर, पौष्टीक ड्रायफ्रूट्स प्रा. लि.)

ब्रिटिश टिंग्या's picture

14 Mar 2008 - 5:01 pm | ब्रिटिश टिंग्या

थोडेसे 'सुमार' विडंबन -

कुणाच्या खांद्यावर कुणाचे डोके,
कोणि कलेली
अन् वास कोणाच्या नशिबी !

धमाल मुलगा's picture

14 Mar 2008 - 5:14 pm | धमाल मुलगा

वाह वाह!!!
च्यायला ह्याला म्हणतात काव्यप्रतिभा !!!!

हे म्हणजे एकदम हाsssण तिच्याआयला !!!

विजुभाऊ's picture

24 Apr 2015 - 3:00 pm | विजुभाऊ

लैच्च भारी

की काय अज्याबात न्हाई... पन र ला ट जुळवने काय कटिनबी न्हाई. हे पाह्य म्या पाडली जिलबी मी चार वळींची. च्या मारी टोपी आहे काय नी न्हाई काय.

चायलेंज खेल आपल्याला बी आवडतु,
माझ्या तीन रान्या असे कोनतरी बोलतं,
मी विचार करतु च्या मारी माज्या हातात दोन लाल रान्या,
मग ह्याच्याकडं काय घंटा...

>
>
सदा सर्वदा देव सन्निध आहे । कृपाळूपणे अल्प धारिष्ट पाहे ।।

धमाल मुलगा's picture

14 Mar 2008 - 5:15 pm | धमाल मुलगा

मी विचार करतु च्या मारी माज्या हातात दोन लाल रान्या,
मग ह्याच्याकडं काय घंटा...

हा हा हा..सृष्टीताई, फर्मास....लगे रहो !!!!

कुणाच्या खांद्यावर कुणाचे डोके, मस्तच की रे
बघा कसं एक्दम वस्तुस्थिती ला धरून काव्ये होताहेत की नाय.

हातातल्या सिगरेट ने मला मोठे केले
तारुण्य नेले आणि म्हातारपण आणले

माझा हात तुझ्या हाती असावा
आणि माझे डोके उशाशी......
स्टेथास्कोप छातीशी
मी खोकतो ठक ठक....

आता ओकतो मी सगळी दु:खे
केवढा सागर साठला....
तुला पामराला
राहीला दूर किनारा

एकटा मी असतो प्रिये
विना तक्रार जीणे जगतोय तुझ्या विना
पण खरे सांगू प्रिये
जगणे हे जीणेच उरले नाही तुझ्या विना......
(या कवितेला आंधी च्या तेरे बिना जिंदगी से कोइ..चा वास आला तर तो केवळ योगायोग समजावा)

तात्या विन्चू's picture

14 Mar 2008 - 5:19 pm | तात्या विन्चू

पु. ल. नी हा .प्रयोग फार आधीच केलेला.

http://cooldeepak.blogspot.com/2007/01/blog-post.html

आपला,
ओम फट स्वाहा....
तात्या विन्चू

तात्या उगाच पु लं च्या मागे दडू नका.....तुम्ही अजून हा चॅलेंज स्वीकरला नाय.

धमाल मुलगा's picture

14 Mar 2008 - 5:23 pm | धमाल मुलगा

तिला पाहिले एकदा
तळ्याच्या पलिकडे,
मनी आस तिला आणण्याची
मळ्याच्या खोलीकडे

- (धाकल॑) देशमुख-पाटील.

(स्वगत :आता खातोय जोडे सगळ्या॑चे)

स्वयम्भू's picture

14 Mar 2008 - 5:37 pm | स्वयम्भू (not verified)

तिला म्हणालो तुझ्या डोळ्यात,
बुडावसं वाटतंय,
ती म्हणाली लाजून,
पोहता येतं का तुला?

आपला,

स्वयंभू

विजुभाऊ's picture

14 Mar 2008 - 5:48 pm | विजुभाऊ

आरं तद माताय्.......धमाल्या मस्त रे....
बघा बघा मंडळी स्वतःला काव्यातले काहीही कळत नाही म्हणणारा धमल्या कसा मस्त रंगलाय
आन स्वयंभूशेठ्.....हाण तद माताय्..........जबरदस्तच

धमाल मुलगा's picture

14 Mar 2008 - 6:28 pm | धमाल मुलगा

कसल॑ काय विजुभाऊ,

इथ॑ कशाचा कशाला पायपोस नाही म्हणून आपल॑ चालल॑य आमच॑ प्राची ला गच्ची.

बाकी, मजा येते हो स्वतः असल॑ काहीतरी जुळवायला. अन् त्याहून जास्त मजा ते वाचायला देऊन इतरा॑ना छळायला :-))

कोणि म्हणे तू बडा माणूस,
कोणि नि॑दे तू आय.टी. हमाल
मी ना होतो दु:ख्खी मुळीच
मी तर आहे ध मा ल धमाल !!!!

कै च्या कै काव्यसम्राट
-ध मा ल.

मनस्वी's picture

14 Mar 2008 - 6:17 pm | मनस्वी

पिझ्झा घेणार की बर्गर..
नाहीच जमणार आपलं!
वेटर, १ मिसळपाव.. कांदा जास्त
बिल वेगवेगळं

मनस्वी

स्वयम्भू's picture

14 Mar 2008 - 6:22 pm | स्वयम्भू (not verified)

मिसळी वर लिम्बू,
ताटा मधे पाव,
सन्गती येउ दे,
कोकम सरबत.

आपला,

स्वयंभू

मनस्वी's picture

14 Mar 2008 - 6:25 pm | मनस्वी

मला पन्हे चालेल.

मनस्वी

स्वयम्भू's picture

14 Mar 2008 - 6:43 pm | स्वयम्भू (not verified)

उन्हाळा वाढला,
वाळ्याचे पडदे,
आंब्याच्या झाडाला,
पन्ह्याची तहान.

आपला,

स्वयंभू

टिपः- ही चारोळी मनावर घेउ नका मनस्वी ताई.

तो तिच्या कानाशी हळूच कुजबुजला
..........
आपण डायल केलेल्या मार्गावर
सर्व लाइन्स व्यस्त आहेत
कृपया थोड्या वेळाने डायल करा

विजुभाऊ's picture

14 Mar 2008 - 8:07 pm | विजुभाऊ

.

चतुरंग's picture

14 Mar 2008 - 8:03 pm | चतुरंग

विजुभाऊ म्हणतात 'सगळ्याना' 'ओपन' च्यालेंज?
हे तर 'शाकाहारी' 'आहार' झालं?
'पुन्हा' 'द्विरुक्ती' बघून फारच रहावेना,
तेव्हा म्हटलं द्यावी टाकून एक 'चार ओळींची' 'चारोळी'!:))

चतुरंग

अनिता's picture

14 Mar 2008 - 11:17 pm | अनिता

मागितली रसमलाई
कान्हा खातो लोणी
सकाळची शाळा
डोक्याची कल्हई

प्राजु's picture

14 Mar 2008 - 8:09 pm | प्राजु

गेले घेऊन गुलाबी फुले
त्याला भेटायला..
आर्जव करीत म्हणाले,
इथे भेटलास वर भेटू नको....

- (सर्वव्यापी)प्राजु

चन्द्रशेखर गोखले's picture

18 Oct 2008 - 7:36 am | चन्द्रशेखर गोखले

फुले घेउन मी म्हणालो
तुला आजिबात "वर" भेटणार नाही
माझ्या इतका सुयोग्य
चल मधुचन्द्रावर....!

(सर्वसाक्षी )चन्दु

चन्द्रशेखर गोखले's picture

18 Oct 2008 - 7:36 am | चन्द्रशेखर गोखले

फुले घेउन मी म्हणालो
तुला आजिबात "वर" भेटणार नाही
माझ्या इतका सुयोग्य
चल मधुचन्द्रावर....!

(सर्वसाक्षी )चन्दु

llपुण्याचे पेशवेll's picture

14 Mar 2008 - 8:23 pm | llपुण्याचे पेशवेll

खूप पिऊन ना चढली
तेव्हा राग मला आला
तेव्हा म्हणे कोणी मला
"काय रे आज पाणीच का?"

-बळच कवि
पुण्याचे पेशवे

प्राजु's picture

14 Mar 2008 - 8:31 pm | प्राजु

पाऊस इतका पडला
की शिगघ्रकवी जन्मले
बघ माझी आठवण येते..का..?
सर्रास विचारू लागले

- (सर्वव्यापी)प्राजु

भडकमकर मास्तर's picture

15 Mar 2008 - 1:04 am | भडकमकर मास्तर

प्रयत्न करून पाहिला खूप
नको नको ते यमक...
अरेरे ...
तरीही जुळलेच...

स्वयम्भू's picture

14 Mar 2008 - 8:39 pm | स्वयम्भू (not verified)

शेकडो पावसाळे पाहीले,
तरी मी कोरडाच,
शेवटी स्वताला ढग म्हणून,
मनाचं समाधान केलं.

आपला,

स्वयंभू

पिवळा डांबिस's picture

14 Mar 2008 - 10:44 pm | पिवळा डांबिस

शेकडो पावसाळे पाहीले,
तरी मी कोरडाच,
शेवटी स्वताला ढग म्हणून,
मनाचं समाधान केलं.

छान आहे, मला आवडलं!

llपुण्याचे पेशवेll's picture

14 Mar 2008 - 9:58 pm | llपुण्याचे पेशवेll

ढग म्हणून गडगडलो
पण बरसलो कधीही नाही
म्हणूनच कायम नोकर मी
न झालो कधीही साहेब
पुण्याचे पेशवे

सौरभ's picture

17 Mar 2008 - 5:31 pm | सौरभ

साहेबच कय घेउन बसलात
नोकर म्हणुन गडगडून बघा
साहेबाचे होइल पाणी पाणी
होताल लिडर

पिवळा डांबिस's picture

14 Mar 2008 - 10:37 pm | पिवळा डांबिस

केशवसुमार तात्या, डांबिसकाका, धमु, सगळे डॉन ,सगळे अभिजीत ,सॄष्टीलावण्य मावशी..सगळ्याना ओपन चॅलेंज
र ला ट न जुळावता चारोळी लिहुन दाखवा?

चायलेंज देऊन,
आम्हाला चढवता
अंतस्थ कावा,
कळला बरं का

-डांबिसकुमार
(डिसक्लेमरः वरील चार ओळींत कुणाला काव्याचा संशय आला तर तो केवळ योगायोग समजावा)

चतुरंग's picture

14 Mar 2008 - 11:30 pm | चतुरंग

वरील चारोळीत आम्हाला गनिमी'काव्या'चा संशय मात्र आला!!:))

चतुरंग

अहो मला काव्य म्हणायचं होतं! :))))

मराठी भाषा कशी समृद्ध आहे नाही!
योग्य शब्द योग्य ठिकाणी वापरले गेले तर काय काय काड्या करता येतात!! :))

खट्याळ,
पिवळा डांबिस

विजुभाऊ's picture

15 Mar 2008 - 11:52 am | विजुभाऊ

कालचा पाउस आमच्या
गावी आलाच नाही
सदरहु आम्ही
पीक आसवांवर काढले आहे.
( ही कविता मला १२ वी ला होती.कवी माहीत नाही)

सचिन's picture

15 Mar 2008 - 4:55 pm | सचिन

विजुभाऊ,
कवी होते "यशवन्त मनोहर".
संपूर्ण कविता येणेप्रमाणे :
कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही
सदरहू पीक आम्ही आसवांवर काढले आहे
कालपर्यन्त पावलांनी रस्त्यांपाशी तक्रारी मांडल्या नाहीत
झाडे करपली, माथी हरपली
नदीच्या काठाने मरण शोधीत फिरलो
आयुष्याच्या काठाने सरण नेसून भिरभिरलो
कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही

या पुस्तकाला प्रस्तावना पुलंची होती.कवि श्याम मनोहर(??????)

विजुभाऊ's picture

15 Mar 2008 - 11:55 am | विजुभाऊ

इथे भेटलास वर भेटू नको.... प्राजु मस्त.....

देता प्रतिसाद मला तुम्ही ;
......साद आली घरुन
मेल्या लौकर ये.........
सैपाक कोण करणार
..............बिचारा सैपाकी विजुभाऊ

विजुभाऊ's picture

15 Mar 2008 - 1:00 pm | विजुभाऊ

मला टोचता खडे...
तुझ्या डोळा पाणी
हा देश परका झाला
पोरका झालो मी.......

स्वयम्भू's picture

15 Mar 2008 - 1:45 pm | स्वयम्भू (not verified)

सुट्टी च्या दीवशी,
अन्घोळीला पण सुट्टी,
काराण अन्घोळ केली की,
कपडे ही धुवावे लगतात.

आपला,

स्वयंभू

विसोबा खेचर's picture

15 Mar 2008 - 3:21 pm | विसोबा खेचर

तात्या मरतो अनुष्कावर
तिच्यावर आहे जीव
असेल मोठी ती हिरॉईन
तर घरची तिच्या!

विजुभाऊ, ह्या घ्या रे चार ओळी! लिहिल्या की नाही तत् माताय?! :)

अवांतर - "यमकवाल्या किंवा 'र' ला 'ट' जुळवणार्‍या चारोळ्या" असं मी मुद्दामून म्हटलं होतं. र ला ट कोडल्याशिवाय किंवा यमकाशिवाय काव्यात तेवढी मजा नाही याची मलाही कल्पना आहे, अहो पण ते काव्य जर अर्थानेही तेवढंच सुंदर नसेल तर केवळ त्यात र ला ट जोडण्यापलिकडे काहीच केललं नाही असंच म्हणावं लागतं!

मध्यंतरी उगाच पाडायच्या म्हणून पाडायच्या, या हेतूने मिपावर जे चारोळ्यांचं पीक आलं होतं त्यामुळे आपण तर साला पार हैराण झालो होतो. छ्या! त्यातील काहीकाही चारोळ्या एकापेक्षा एक फालतू अन् पाडायच्या म्हणून पाडलेल्या बेमतलब चारोळ्या होत्या! नुसत्या र ला ट जुळवलेल्या गोड नी गुडीगुडी प्रेम मुतणार्‍या! :)

साला मिपाला काही ष्टँडर्ड आहे की नाही असंच त्या चारोळ्या वाचून एखाद्या मिपाबाहेरच्या परक्या माणसाला वाटलं असतं!

बाय द वे, तात्या विन्चू या नांवाने वावतणारा प्राणी मी नाही! तो मी नव्हेच.. !

आपला,
(अनुष्काचा प्रेमीपागल) तात्या.

ॐकार's picture

15 Mar 2008 - 3:58 pm | ॐकार

पुण्यातल्या टरॅफिकमंदी
फलक लावा स्मारट
हितचिंतक म्हणाले
आता ट्र र्ट बाद

शरबुद्दीन जॉन फुलपुडीकर वाडीतील सर्व ख्रिश्वन, मुस्लिम, हिंदू बांधवांना गुड शुक्रवार, होली होळी आणि पवित्र ईदच्या हाद्रीक शुभेच्छा!

शुभेच्छूक -
तळहात, पंकज, तीरकमठा, घड्याळ, गजराज इ . इ. पक्षांचे निष्ठावान नगरसेवक (आजी, माजी, भावी)

मीनल's picture

15 Mar 2008 - 5:37 pm | मीनल

एरवी यमक जुळवायचं जुळवायचं म्हटल तरी जुळता जुळत नाही
आणि आता ते जुळवायच नाही म्हटल की आपोआप शब्द सुचत होते आणि यमक जुळून जात होते.
प्रयत्नपुर्वक टाळावे लागले.

मी केलेला प्रयत्न---

तुझ्या न माझ्या
जु ळल्या तारा,
म्हणूनी हे जिवन
सुरेल न संगीत.

यमकाशिवाय काव्यात तेवढी मजा नाही याची मलाही कल्पना आहे, अहो पण ते काव्य जर अर्थानेही तेवढंच सुंदर नसेल तर केवळ त्यात र ला ट जोडण्यापलिकडे काहीच केललं नाही असंच म्हणावं लागतं!
तात्या खरे आहे....कविता लिहिणे तेही लोकाना आवडणार्‍या हे अवघड असते.यमकाशिवाय लिहिणे तर त्य्यहुन अवघड असते...
नुसते लिहिणे दोन/चार ओळी खरडणे म्हणजए काव्य नव्हे
या एक्ससाइझ मधुन काही खरेच चांगले प्रयत्न ही झाले सगळ्या चारोळ्या काही फक्त आरोळ्या नव्हत्या.........काही सुंदर रांगोळ्याही होत्या..
यमकामुळे एक प्रकरचा ताल्(र्हिदम) मिळतो.....पण अर्थ हा कवितेचा प्राण असतो र ल ट जोडण्याचा खेळ सुरु होता तेंव्हा मी सदस्य नव्हतो पण या थ्रेड वर्च्या काही कविता खरेच चांग्ल्या होत्या
सगळ्याच काही प्रेम ठिबकवणार्‍या नव्हत्या....वात्रट , धमाल , वास्तविक , प्रामाणीक अशा सर्व प्रकरच्या कविता होत्या
दोस्तानो....या खेळात मला मजा आली.

कविता रचताना मी माझा राहीलो नाही
कविता वाचतानाही मी माझा राहीलो नाही
एक धागा गीत माझे
मला तुला गुंफणारे..............

मी आता कशास चिंता करु....
तू सवे असताना
स्वप्नांच्या मागे कशास लागू...
मी स्वप्न माझे जगताना.

विजुभाऊ's picture

17 Mar 2008 - 12:04 pm | विजुभाऊ

या इथे या सांजवेळी
सूर्य मावळताना आकाशी
माझीच सावली झाली
माझ्याहून खूप मोठी

चॅलेंज घेणारे संपले का सगळे?
धमाल्या थकलास का रे बाळ?
हरला असे डीक्लेर करा...............
तात्या सुधा विचार करुन करुन करुन करुन करुन करुन करुन करुन करुन करुन करुन करुन करुन करुन करुन करुन दमले हुशशश्श्श्श्श्श्श्श्श्श्श्श.......
असे असेल तर आपण धागा विसर्जीत करूया...........

भारताची लोकसन्ख्या
....नारळाच्या झाडावर
....आणि, पण, परन्तु.....

विजुभाऊ's picture

17 Mar 2008 - 4:16 pm | विजुभाऊ

शब्दा ला शब्द जोडीले
त्यांते काव्य म्हणीतले
ऐशा उक्तीने ;गंज चढला उक्तितें
वेळ जाय बुडोनी फक्त्; सांगे विजुभाऊ

विजुभाऊ's picture

17 Oct 2008 - 5:04 pm | विजुभाऊ

त्रिवेणीच्या निमित्ताने पुन्हा एकदा आस्वाद घेउयात या चारोळ्यांचा

यशोधरा's picture

17 Oct 2008 - 10:43 pm | यशोधरा

ही चालेल का विजूभाऊ?

नातं उमलावं सुगंधी,
ज्याला समर्पणाची जोड,
मनी रुजावी कृष्णाच्या,
प्रिय सखी राधेची ओढ...

स्नेहश्री's picture

18 Oct 2008 - 11:31 am | स्नेहश्री

ते भिरभिरणारे सुंदर
मनोहर अन मखमली
गुलाबाच्या रोपावरचे फुलपाख्ररु..........!!!

--@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@--
आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी
दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी
पण खुप काही देउन जातात हे
आयुष्यात पुढे जाण्यासाठी

विजुभाऊ's picture

18 Oct 2008 - 6:02 pm | विजुभाऊ

ज्याला त्याला आपले घर असते
येणार्‍याचे स्वागत करणारे दार असते
......................यापुढच्या दोन ओळी कोणी ल्हिणार का?

सगळे प्रतिसाद नि चारोळ्या वाचून कॉमेडी एक्स्प्रेस चे 'नवकविता' फेम कवी महाशय (सतीश तावडे ) आणि 'एकेदिवशी काय जाहले' फेम इन्स्पेक्टर(कमलाकर सातपुते ) यांची आठवण झाली

Challenge accepted

बुडलो तेव्हा नव्हते
डोक्यावर आकाश
खाली नव्हते पाणी
कसे असेल विचारात बुडल्यावर ?

:) :)

टवाळ कार्टा's picture

24 Apr 2015 - 5:17 pm | टवाळ कार्टा

हायला काय धागा आहे हा :)

शब्दबम्बाळ's picture

30 Jun 2015 - 2:05 pm | शब्दबम्बाळ

पाहताच एकमेकां
थोडी चलबिचल झाली
सावरताच पुन्हा ती
मी अनोखळी निघालो…

वेल्लाभट's picture

30 Jun 2015 - 2:16 pm | वेल्लाभट

ससा म्हणाला सिंव्हाला
मी तुला घाबरत नाही
सिंह म्हणाला अच्छा?
ये ना मग जवळ ये

अत्रुप्त आत्मा's picture

1 Jul 2015 - 4:25 pm | अत्रुप्त आत्मा

ससा म्हणाला सिंव्हाला
मी तुला घाबरत नाही
सिंह म्हणाला अच्छा?
ये ना मग जवळ ये
===============
http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing004.gif
===============
भानावर येण्यापूर्वी
पावसात जळाया लागलो
नंगा नाचेन मी एक दिवस
पाऊस पडून गेल्यावर ...
===================
http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing001.gif

मूकवाचक's picture

30 Jun 2015 - 2:21 pm | मूकवाचक

भानावर येण्यापूर्वी
पावसात जळाया लागलो
नंगा नाचेन मी एक दिवस
पाऊस पडून गेल्यावर ...

कहर's picture

30 Jun 2015 - 3:24 pm | कहर

_/\_

बॅटमॅन's picture

30 Jun 2015 - 2:53 pm | बॅटमॅन

तुझ्यासाठी मी पाडलेल्या जिल्ब्या जपून ठेवीन....
तू ये, तुला फुकट देईन...

टवाळ कार्टा's picture

30 Jun 2015 - 3:01 pm | टवाळ कार्टा

=))

अत्रुप्त आत्मा's picture

1 Jul 2015 - 4:29 pm | अत्रुप्त आत्मा

हलकट खाटुक! http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt004.gif

--------------------------
अग्निबंदुकात्रुप्त-भाजक्ब्याटुकमॅन
http://www.sherv.net/cm/emoticons/guns/machine-gun.gifhttp://www.easyfreesmileys.com/smileys/free-character-smileys-50.gif

तुडतुडी's picture

1 Jul 2015 - 4:04 pm | तुडतुडी

घर असावे घरासारखे
नकोत नुसती नाती !
तिथे असावी जाळ्या जळमटे
नको स्वच्छता नुसती

वेल्लाभट's picture

1 Jul 2015 - 4:17 pm | वेल्लाभट

ती - ती जुळलं.

तुडतुडी's picture

1 Jul 2015 - 4:46 pm | तुडतुडी

पण र ला टनाही जुळला ना :-)

गरजू पाटिल.'s picture

1 Jul 2015 - 4:52 pm | गरजू पाटिल.

......डोहात..
पाण्यावरचा तवंग फोफावत जाणारा ....
भला मोठ्ठा मिठाचा खडा ...
नावेत बसलेला मी .....
आणि ती नसलेला माझा शेजार...

श्रीमंत गरजू पाटिल. (धाकले)

प प पाटलाचा.
श श ती शेजारीण.
ड ड त्या डोहात,
डुबुक.... डुबुक.....

गरजू पाटिल.'s picture

1 Jul 2015 - 9:25 pm | गरजू पाटिल.

जुनाट रद्दीची काही पानं...
रद्दीवाल्यानं नाकारलेली...
पुसट झालेल्या काही ओळी...
..........'तुझीच'.....

गरजू पाटिल.'s picture

1 Jul 2015 - 9:45 pm | गरजू पाटिल.

माझ्या काही गुढ अगम्य कल्पना.....
तीची केविलवाणी दु:ख.....
गरुड कि रेडा......
सताड उघडे डोळे......