मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सौदी क्षणचित्रे : ०९ : जेद्दाह् (भाग २)

डॉ सुहास म्हात्रे · · भटकंती
=================================================================== सौदी क्षणचित्रे : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... =================================================================== …जेद्दामध्ये बघण्यासारखे अजून खूप आहे. यापुढची सफर आपण पुढच्या भागात चालू ठेवूया.

जेद्दाह् शहरातला खुल्या आकाशाखालील सौंदर्याविष्कार (ओपन एअर आर्ट)

सत्तरच्या आणि ऐशीच्या दशकात खनिज तेलाच्या किमतीच्या चढत्या कमानीमुळे आलेल्या समृद्धीमध्ये जेद्दाह् च्या सार्वजनिक ठिकाणांवर कलेला वाव देण्याचा प्रस्ताव पुढे आला. त्याअंतर्गत केलेल्या एका प्रकल्पामुळे, शहरभर रस्त्यांच्या चौकांत आणि इतर मोकळ्या जागांवर, १२५ पेक्षा जास्त शिल्पकृती स्थापन केलेल्या आहेत. त्या कलाकृतींचे विषय आम जीवनातल्या वस्तूंपासून ते नवकलेच्या (अ‍ॅबस्ट्रॅक्ट आर्ट) आविष्कारांपर्यंत आहेत. यामुळे हे सर्व शहरच जगातले सर्वात मोठे खुले कलाप्रदर्शन (ओपन एअर आर्ट एक्झिबिशन) झाले आहे. मक्का प्रांतातल्या व हजच्या वाटेवरील शहरामध्ये असा अनोखा कलाविष्कार आणि तोही खुल्या आकाशाखाली बघणे हा एक आश्चर्यकारक अनुभव होता. तर चला आपण जेद्दाह् ची चारचाकीने सफर करत हे जगावेगळे प्रदर्शन पाहूया...

 जेद्दाह् मधले सौंदर्याविष्कार : धार्मिक प्रतीके

.

 जेद्दाह् मधले सौंदर्याविष्कार : मनोरा / इमारत (नवकला)

.

 जेद्दाह् मधले सौंदर्याविष्कार : पृथ्वीगोल

.

 जेद्दाह् मधले सौंदर्याविष्कार : नकाशा

.

 जेद्दाह् मधले सौंदर्याविष्कार : पक्षी (नवकला)

.

 जेद्दाह् मधले सौंदर्याविष्कार : धूपदाने (सांस्कृतिक प्रतीक)

.

 जेद्दाह् मधले सौंदर्याविष्कार : नवकला

.

 ...... जेद्दाह् मधले सौंदर्याविष्कार : नवकला

.

 जेद्दाह् मधले सौंदर्याविष्कार : नवकला

.

 जेद्दाह् मधले सौंदर्याविष्कार : विमान (हे शिल्पात वापरलेले विमान खरेखुरे आहे !)

.

 ... जेद्दाह् मधले सौंदर्याविष्कार : सायकल

.

 ... जेद्दाह् मधले सौंदर्याविष्कार : मेणबत्ती आणि नवकला

.

 ... जेद्दाह् मधले सौंदर्याविष्कार : नवकला (उंट) आणि भूमिती संच

.

 जेद्दाह् मधले सौंदर्याविष्कार : घड्याळ

.

 जेद्दाह् मधले सौंदर्याविष्कार : मूठ

.

 जेद्दाह् मधले सौंदर्याविष्कार : फळे

. आणि हा अरबस्थानातला (कार घेऊन चाललेला आधुनिक) उडता गालिचा ! :)

 जेद्दाह् मधले सौंदर्याविष्कार : कार घेऊन चाललेला आधुनिक उडता गालिचा !

खेळाची मैदाने

आपल्या इथल्या क्रिकेटइतका फुटबॉल हा खेळ सर्व अरबी जगतात लोकप्रिय आहे. टेलिव्हिजनवर कोणत्याच चॅनलवर फुटबॉल (चालू अथवा जुन्या) सामन्याचे प्रक्षेपण चालू नाही असे दिवसाच्या चोवीस तासांत एकही मिनिट तेथे असणे शक्य नाही ! अश्या या खेळातील सौदी अरेबियाचे सर्वात जुने आणि नावाजलेले अल् इत्तेहाद आणि अल् अहली हे दोन क्लब जेद्दाह् मध्ये आहेत. अर्थातच या शहरात अनेक मोठी आणि आधुनिक खेळाची मैदाने आहेत. त्यातली ही दोन...

 किंग अब्दुल्ला मैदान, जेद्दाह्

.

 किंग अब्दुलअझिझ विद्यापीठ मैदान, जेद्दाह्

किंग फाहाद कारंजे

जेद्दाह् च्या किनार्‍यावर समुद्रात असलेले हे कारंजे इथले एक मोठे आकर्षण आहे. १९८० मध्ये गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये त्याची "जगातील सर्वात उंच (३१२ मीटर / १०२४ फूट) पाण्याचे कारंजे" अशी नोंद केली गेली आहे. जेद्दाह् कॉर्निशवरून फिरताना त्याचा नजारा बघता येतो. समुद्रकिनार्‍यावरच्या अनेक हॉटेल्स आणि र्रिसॉर्ट्समध्ये हे कारंजे पाहत पाहत संध्याकाळचे जेवण घेण्यासाठी खास व्यवस्था केलेली आहे. शंभर मजली इमारतीपेक्षा जास्त उंच उडणारे हे कारंजे रात्रीच्या अंधारात त्याच्यावर टाकलेल्या प्रकाशझोतांत पाहणे हा एक मनोरंजक अनुभव असतो...

 किंग फाहाद कारंजे : दिवसा दिसणारे सोनेरी धुपदान म्हणजे कारंज्याचा बुंधा आहे. तेथून पाणी उडते.

.

 किंग फाहाद कारंजे : रात्री, पाण्याचा फवारा सुरू झाल्यावर

.

किंग फाहाद कारंजे (कॅमेरा हातात धरून व्हिडिओ काढल्यामुळे कारंजे हालताना दिसत आहे. प्रत्यक्षात कारंजे स्थिर आहे, माझा कॅमेरा हालत होता ! :) )

राष्ट्रीय व्यापारिक बँक

जगभरच्या प्रवाशांच्या गर्दीमुळे साहजिकच हे शहर तेथील आंतरराष्ट्रीय चलनाची अदलाबदल करणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी (money changers) प्रसिद्ध आहे. या प्रकारच्या सगळ्यात मोठ्या व्याप्याऱ्याने इथली एक मोठी राष्ट्रीय व्यापारिक बँक (National Commercial Bank; NCB) स्थापन केली आहे. तिची वैशिष्ट्यपूर्ण इमारत बघण्यासारखी आहे...

 राष्ट्रीय व्यापारिक बँक (National Commercial Bank; NCB) : ०१ (जालावरून साभार)

.

 राष्ट्रीय व्यापारिक बँक (National Commercial Bank; NCB) : ०२ : स्वागतकक्ष

किंगडम टॉवर

ही इमारत अजून बांधून झालेली नाही. पण जेद्दाह् ची गोष्ट तिची चर्चा केल्याशिवाय पुरी होऊ शकत नाही. ज्याने रियाधमधली किंगडम सेंटर ही सौदी अरेबियातली सर्वात उंच इमारत बांधली त्याच राजपुत्र अल् वलिद बिन तलाल याने ही जगातील सर्वात उंच इमारत बांधण्याचा घाट घातला आहे. अगोदर या इमारतीची उंची एक मैल म्हणजे १.६ किलोमीटर इतकी ठरवली होती. पण ज्या जमिनीवर ती बांधली जात आहे ती इतक्या उंच इमारतीसाठी योग्य नसल्याने ध्यानात आले. त्यामुळे पूर्णावस्थेत तिची उंची नक्की किती असेल हे गुलदस्त्यात ठेवले आहे. मात्र या इमारतीची उंची कमीतकमी एक किलोमीटर (१००० मीटर / ३२८०.८४ फूट) असेल असे जाहीर केलेले आहे. अगदी एक किलोमीटर उंचीही दुबईतील बुर्ज खलिफा या सद्याच्या जगातील सर्वात उंच इमारतीच्यापेक्षा १७८ मीटरने जास्त असेल ! ही इमारत पूर्ण झाल्यावर कशी दिसेल याची झलक या खालच्या दोन चित्रांवरून दिसेल...

  किंगडम टॉवरची मानचित्रे (जालावरून साभार)

या इमारतीच्या उंचीची खरी ओळख तिच्या बाजूला इतर आकाशाला शिवणार्‍या उंचीच्या इमारती उभ्या करून तुलना दाखवणार्‍या चित्रामुळे होते...

 किंगडम टॉवरची जगातल्या इतर आकाशाला शिवणार्‍या उंचीच्या इमारतींशी तुलना करणारे चित्र

जेद्दाह् बंदर

जेद्दाह् रक्तसमुद्रावरील सर्वात मोठे बंदर आहे. मक्का-मदिनेच्या तीर्थयात्रेसाठी समुद्रमार्गे येणार्‍या यात्रेकरूंची येथे मोठी वर्दळ असते. याशिवाय सौदी अरेबियाच्या समुद्रमार्गे होणार्‍या आयातीचा ६०% हिस्सा या बंदरातून होतो. वाढत्या वाहतुकीच्या सोयीसाठी १९७६ साली याचा विस्तार व आधुनिकीकरण केले गेले. १०.५ चौ किमी क्षेत्रफळावर पसरलेल्या या बंदराच्या ११ किमी पेक्षा जास्त लांबीच्या धक्क्यांवर एका वेळेस ५० पेक्षा जास्त बोटी उभ्या राहू शकतात.

 जेद्दाह् बंदर

.

 जेद्दाह् बंदराचा जलवाहतूक नियंत्रण मनोरा (जालावरून साभार)

फळांच्या रसाचे खास दुकान

आमच्या टॅक्सीचालक आणि स्वनियुक्त मार्गदर्शकाच्या खास शिफारशीने एका फळांच्या रसांच्या दुकानात गेलो आणि जेद्दातली एक खासियत बघता आणि चाखता आली. या १८ - २०,००० चौ फूट आकाराच्या दोन मजली रेस्तराँत जवळ जवळ शंभर प्रकारचे फळांचे रस आणि मॉकटेल्स मिळतात. आम्ही गेलो तेव्हा बसायला जागा मिळायलाच १०-१५ मिनिटे गेली. पण दुकानाच्या प्रदर्शनी भागांत आणि बुकिंग काउंटरच्या बाजूला असलेल्या फळांच्या रचनांची सजावट पाहताना तो वेळ केव्हा गेला हे समजलेच नाही...

 जेद्दाह् मधले एक फळांच्या रसाचे खास दुकान : ०१

.

 जेद्दाह् मधले एक फळांच्या रसाचे खास दुकान : ०२

.

 जेद्दाह् मधले एक फळांच्या रसाचे खास दुकान : ०३

.

 जेद्दाह् मधले एक फळांच्या रसाचे खास दुकान : ०४

.

 जेद्दाह् मधले एक फळांच्या रसाचे खास दुकान : ०५

. त्या दुकानाची सर्वोत्तम खासियत असलेले एक मस्त मॉकटेल पिऊन तृप्त मनाने हॉटेलवर पोहोचलो. समाप्त ===================================================================

मनोगत

सौदी अरेबिया या देशाचे नाव सर्वसाधारपणे लोकांना माहीत असते. पण त्या देशाची ओळख अत्यंत जुजुबी किंवा माध्यमांतून ऐकलेल्या सनसनाटी बातम्यांपलीकडे नसते. माझीही सौदीची ओळख अशीच "ऐकीव-वाचीव" होती. त्यामुळे तेथे जाताना मनात बर्‍यापैकी धाकधूक होती. मुलाखतीच्या वेळेस मुलाखत घेणार्‍या अधिकार्‍यांपर्यंत ती पोचली असावी. म्हणून जेव्हा त्यांच्याकडूनच प्रथम "लोकम" म्हणून एक-दोन महिने जागेचा अनुभव घ्या आणि नंतर आवडल्यास स्थायी करार करा असा पर्याय आल्यावर ताबडतोप हो म्हणून टाकले. या मालिकेतील माझ्या एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे सुदैवाने "जागा, माणसे, वातावरण, इ माझ्या सोयीचे निघाले" आणि तेथे जास्त काळ रहावे की नाही याचा निर्णय सोपा झाला. म्हणता म्हणता साडेसात वर्षे कशी गेली हे कळले नाही. या कालावधीत अर्थातच माझ्या पायावरचे चक्र मला स्वस्थ बसून देणे शक्य नव्हते. मी केलेल्या त्या भटकंतीचे काही क्षण कॅमेर्‍याच्या डोळ्यातून तुमच्यापुढे ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. माध्यमांत नेहमी चर्चेत असलेले मुद्दे टाळून सौदी अरेबियाच्या चर्चेत नसलेल्या काही पैलूंची ओळख तुम्हाला करून देणे यावर या लेखमालेत माझा भर होता. त्या भटकंतीच्या क्षणांची मजा मी पुरेपूर अनुभवली. त्या मजेतील काही वाटा तुमच्यापर्यंत पोहोचवू शकलो असेन अशी आशा आहे. या सर्व वाटचालीत वाचकांचा सहभाग हा नेहमीच उत्साहवर्धक असतो. त्याबद्दल सर्व वाचकांना अनेक धन्यवाद. काही वाचकांनी कळफलक पुढे ओढून कौतुकाचे शब्द टंकले. त्यांचे आभार मानायला शब्द कमी पडतील. आपल्या सर्वांचा हा लोभ पुढे असाच असू द्यावा. इस्पीकचा एक्का =================================================================== सौदी क्षणचित्रे : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... ===================================================================

वाचन 17414 प्रतिक्रिया 0