निवडणूक २०१४: अनुभव ५: दिल्ली: मतदानानंतर
अनुभव ४
दिल्लीत दहा एप्रिलला मतदान झालं आणि नंतर मी तिथं पोचले.
नेहमीप्रमाणे पहिला संवाद 'मेरू' च्या चालकाशी.
मग वेळ मिळेल तेव्हा आणि तसतसा रिक्षाचालक, सायकल रिक्षाचालक, ऑफिसातले सहकारी, मेट्रोतले सहप्रवासी ... वगैरे.
संवादातली काही महत्त्वाची वाक्यं:
"काँग्रेस तो गायब हो जायेगी"
"बस, मोदीजी की हवा हैं"
"झाडू नहीं चलाया इस बार हमने"
"सब एक जैसे हैं"
"महंगाई कम हो, और क्या चाहिये?"
"थोडा तो सुकुन मिले यह सोचते हैं - लेकिन किसको मत दे?"
"भाग गये ना वो, हमे उल्लू बनाके"
"हां! भाजपाभी क्या नये चिराग जलायेगी?"
"ये तो खेल हैं एक, हम तो लूट जाते रहेंगे"
"इस बार कमल खिलेगा, लेकिन ये "अटलजी"वाला कमल नही हैं यह ध्यान मे रखियेगा"
"राज करना तो एक काँग्रेसही जाने, लेकिन जरा जादा हो गया घोटालोंका सिलसिला"
"एक सीट अजय माखनजी (कॉंग्रेस) तो पक्की है; बुरी पार्टीमे भला आदमी है वह एक"
"आप को ४० प्रतिशत मतदान तो हुआ हैं, लेकिन शायद दो ही सीटे मिलेगी"
"ये अरविंदसाब थोडा कम बोलते तो अच्छा होता, बोलते जाते हैं और फसते जाते हैं"
"वाराणसी इस बार कुरुक्षेत्र हैं; मान लो वहा मोदी हारेंगे तो थोडेही पीएम बन पायेंगे?"
"दो तीन साल टिकेगा परिवर्तन, फिर आयेगी लौटके काँग्रेस"
दिल्लीतल्या हवेचा काही एक अंदाज आला या सगळ्यातून.
लोकांना 'तिसरा पर्याय' हवा आहे आणि तो उपलब्ध नाही हे कळल्याने लोक निराश वाटले.
कुणीही जिंको, आपला कुणी वाली नाही - ही भावना अधिकाधिक प्रबळ होत चालली आहे का कष्टकरी वर्गात?
स्वप्नं तशी साधीच आहेत लोकांची - सुखासमाधानाने दोन घास पोटात जावेत, लेकरं शिकावीत आणि आपल्यापेक्षा चांगल्या आर्थिक स्थितीत असावीत, भीती नसावी, आजारी पडलो तर उपचार घ्यायची ऐपत असावी, हसता यावं कधी उगाच...
पण हे करणार कोण?
मतदानातून परिवर्तन - हा मध्यमवर्गीय आशावाद भाबडा आहे की काय अशी शंका वाटत राहिली माझी मला. पुन्हा एकदा.
जे लोकशाहीचे आधारस्तंभ आहेत त्यांच्या ख्यालीखुशालीचं, समाधानाचं, त्यांच्या आकांक्षांचं प्रतिबिंब उमटेल का यावेळच्या मतदानातून?
Book traversal links for निवडणूक २०१४: अनुभव ५: दिल्ली: मतदानानंतर
वर्गीकरण
प्रतिक्रिया
आत्ताच ब्लॉगवरही वाचलं.
भाबडा असेल पण आशावाद आहे
नेमके वर्णन
ह्याच विचारांची लाट आहे सध्या
परिस्थितीत फरक हवाच आहे. पण
रोचक
दुसऱ्या भागाला +१. (पहिल्याशी
+१
दिल्ली विधानसभा निवडणुकांमधे
दिल्ली विधानसभा निवडणुकांमधे देखील भाजप सगळ्यात जास्त मिळवलेला पक्ष होता तसेच एकूण % मते देखील भाजपाला ३३% तर आप ला २९.५% आणि काँग्रेसला २४.५५% मिळाली होती. थोडक्यात त्या वेळेस देखील आपला तिसरा पर्याय म्हणून पूर्ण बहूमत जाउंदेत पण सगळ्यात जास्त जागा जनतेकडून मिळाल्या नव्हत्या.आकड्यांच्या मागे दृष्टिकोन असतात. आकडे हवे तसे वळवता येतात म्हणजे त्यांचा अर्थ लावता येतो हे मान्य करूनही (रेडिफचे विश्लेषण मी वाचले नाही) ही आकडेवारी रोचक माहिती सांगते. ६५ वर्षांहून अधिक काळ अस्तित्व असलेले दोन पक्ष (भाजपा तांत्रिकदृष्ट्या कमी काळाचा आहे हे मान्य, पण त्याची नाळ जुन्या विचारधारेशी आहे आहे हे सर्वज्ञात आहे)३३% आणि २४.५५% मतं मिळवतात; आणि केवळ एक वर्ष वय असलेला आप २९.५% मतं मिळवतो - लोक तिस-या पर्यायाच्या शोधात आहेत हे सांगायला आणखी काय पाहिजे? २००८ ची या दोन पक्षांची मतांची आकडेवारी पाहिल्यास २०१३ मध्ये ती कमी झाल्याचे दिसते - याचाच अर्थ लोक तिसरा पर्याय शोधत आहेत. 'आप'ने प्रत्यक्षात लोकांच्या अपेक्षा पूर्ण केल्या का हा वेगळा मुद्दा आहे; तो या लेखाचा विषय नाही. पण लोक पर्याय शोधताहेत ही एक वस्तुस्थिती आहे. फक्त दिल्लीत नाही, इतरत्रही.पाच वर्षात एकदा नुसतं मतदान
पाच वर्षात एकदा नुसतं मतदान
पाच वर्षात एकदा नुसतं मतदान ह्यापेक्षा लोकांचा राजकारणातला सहभाग वाढला तरच लोकशाही यशस्वी होईलयाच्याशी सहमत आहे. पण प्रत्यक्षात असं होण्यात अनंत अडचणी आहेत. आपल्यापैकी ज्यांनी कोणी आपण ज्या निवासी संकुलात राहतो तिथल्या सभांमधून काही सकारात्मक घडवण्याचा प्रयत्न केला आहे त्यांना 'सामूहिक राजकारणा'च्या, लोकांच्या सहभागातून प्रशासन चालवण्याच्या वाटेत किती काटे आहेत हे लक्षात आलं असेल. म्हणून कदाचित लोकांची 'आम्ही निवडून देतो त्या व्यक्तीने/सरकारने योग्य काय ते निर्णय घ्यावेत' अशी अपेक्षा असते. तत्त्वतः लोकसहभागातून प्रशासन हे मला मान्य आहे - पण व्यावहारिक पातळीवर आपला समाज अजून तितका प्रगल्भ झालेला नाही (सहमतीच्या निर्णयप्रक्रियेसाठी)असं माझं अनेक अनुभवांतून बनलेलं मत आहे. अर्थात ही परिस्थिती बदलण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत राहिलं पाहिजे - याविषयीही दुमत नाही. (अशा सर्व प्रयत्नांना माझा केवळ पाठिंबा नाही तर जमेल तितकं त्यात सामील होण्याचाही प्रयत्न असतो.)'''''''''''''''''''''''''''''
लोक निराश आहेत हे नक्कीच
'निराश' हा शब्द किती नेमका
या निमीत्ताने आठवलेला एक आवांतर प्रश्न
दिल्लीकरांनी एकुणच आशाही लगेच
आपला दिल्लीत ४० % मतदान
ग्रेट पॉवर
हे का झालं? याची चिकित्सा
जनमानसातल्या अचूक भावना टिपल्यात!
जागा
सहमत
हम्म
बलराज मधोक
सहमत
थोडा आणखी मसाला घ्या.
माहिती आवडली
दिल्लीत ६२% वोटिंग झालेले आहे